Monday, 24 December 2018

समान नागरी कायदा , बौद्ध विवाह कायदा आणि आंबेडकरी चळवळ

समान नागरी कायदा , बौद्ध विवाह कायदा आणि आंबेडकरी चळवळ
- सुमित वासनिक
समान नागरी कायदा लग्न, घटस्फोट, पोटगी, वारसा हक्क, दत्तक विधान या मोजक्या विषयांवरील कायद्यांसाठीच आहे. पण आरएसएस ने समान नागरी कायदा हा प्रत्येक क्षेत्रात लागू असणारा कायदा आहे असा अपप्रचार केला आहे. विशेषतः या कायद्यामुळे आरक्षण संपुष्टात येईल असा संघाचा प्रचार आहे. या कायद्यामुळे आरक्षण संपेल अशी भीती आरक्षण समर्थकांना दाखवल्यामुळे ते या कायद्याला विरोध करतील , ही संघाची रणनीती आहे. संघाचा हा खोडसाळ प्रचार देशात समान नागरी कायदा लागू होऊ नये यासाठीच आहे. समान नागरी कायदा धार्मिक कायद्यांचि जागा घेणारा कायदा आहे. हा कायदा संघाच्या हिंदू राष्ट्राच्या नावाने सवर्णांचे हित जपणारे वैदिक राज्य निर्माण करण्यातील मोठा अडसर आहे, कारण या कायद्याने देशातील स्त्रियांना मुक्ती मिळेल. स्त्री गुलाम असल्याशिवाय हिन्दु राष्ट्र निर्माण होणार नाही. म्हणूनच हा कायदा होऊ नये अशी संघाची इच्छा आहे. याच कारणाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या हिंदू कोड बिलास संघाने कडाडून विरोध केला होता. समान नागरी कायदा अस्तित्वात यावा ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचीही इच्छा होती. या कायद्याच्या समर्थनात ते संविधान सभेतही बोलले होते. ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांचीही हीच इच्छा आहे. सत्तेत असूनही भाजप समान नागरी कायदा लागू का करीत नाही ? हा प्रश्न विचारून त्यांनी या विषयावरील संघाची दुटप्पी भूमिका सर्वांसमोर आणलि आहे. संघ समान नागरी कायदा होऊ नये यासाठी इतर सर्व धर्मांचे वेगवेगळे कायदे तयार करण्याच्या कामाला लागला आहे. शीख समाजाचे कायदे पास करण्यात आले आहेत. आता बौद्ध विवाह कायदा बनविण्याचे कारस्थान संघाने रचले आहे. जेवढ्या जास्त धर्मांचे स्वतःचे कायदा अस्तित्वात येतील तेवढा समान नागरी कायद्याला विरोध होईल हे बौध्द विवाह कायदा तयार करण्यामागील षडयंत्र आहे. ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी संघाची ही चाल ओळखूनच बौद्ध विवाह कायद्याला कडाडून विरोध केला आहे.  हिंदू विवाह कायदा मान्य नाही त्यांना स्पेशल मॅरेज ऍक्ट ने लग्न नोंदविण्याचा उपाय असतांना बौद्ध विवाह कायद्याची आणि इतर धर्मांचे वेगळे कायदे बनविण्याची गरज काय? असा सवाल ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. 
समान नागरी कायदा तयार करण्यासाठी मुस्लिमांचाही  विरोध आहे यावरही ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी उपाय सुचविलेला आहे.  मुस्लिमांमधील मौलवींशी चर्चा करून मुस्लिमांनाही अडचण होणार नाही अश्याप्रकारचा मध्यम मार्ग काढायचा प्रयत्न करावा आणि जोपर्यंत यावर एकमत होत नाही तोपर्यंत मुस्लिम सोडून जे धर्म समान नागरी कायद्यास तयार आहे त्यांच्यासाठी समान नागरी कायदा बनवून अमलात आणावा असे ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांचे म्हणने आहे. पण भाजप सरकार यापैकी काहीही करत नाही आहे, ते फक्त समान नागरी कायद्याच्या आडून देशात आरक्षण मिळत असलेल्या वर्गाविरोधात आणि मुस्लिमांच्या विरोधात देशात वातावरण तयार करायचा प्रयत्न करीत आहेत.
समान नागरी कायदा आणि बौद्ध विवाह कायदा याविषयी ऍड.बाळासाहेब आंबेडकर हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावरच चालत आहेत. पण बिएसपि आणि बामसेफ या संघटना समान नागरी कायदा आणि बौद्ध विवाह कायदा या विषयांवरून ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात अपप्रचार करीत आहेत. ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांना रोखण्याच्या प्रयत्नात हे लोक बाबासाहेबांच्या विचारांना आणि कार्याला विरोध करायला लागले आहेत. मागे राष्ट्रवादी काँग्रेसने सोशल मीडियावरून  बाळासाहेबांना विरोध केला तेंव्हा आंबेडकरी समाजाने राष्ट्रवादीला चांगलाच धडा शिकवला होता. त्यामुळे सावध झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने बिएसपि , बामसेफला पुढे करून बाळासाहेबांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. शरद पवार प्रायोजित अपप्रचाराच्या या मोहिमेत बिएसपि आणि बामसेफ या संघटनांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनाच विरोध करणे सुरू केले आहे. ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांना विरोध केला की प्रसिद्धी मिळते हे एक दुसरे कारणही आहेच बाळासाहेबांना विरोध करण्याचे. या संघटनांचा ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रति असलेला द्वेष सर्वांनाच माहिती आहे. पण आंबेडकरी जनता खंबीर पणे ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहे त्यामुळे बीएसपी,बामसेफच्या या अपप्रचारा त्यांना काहीही फायदा होणार नाही, उलट आंबेडकरी जनता यांना घरभेदी म्हणूनच ओळखेल. 
भारिपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी प्रायोजित बिएसपि आणि बामसेफच्या अपप्रचारावर लक्ष देऊ नये भारिपला या संघटनांचा विरोध करण्यात गुंतवून आपल्यासाठी मोकळे रान मिळविणे हा राष्ट्रवादी कॉग्रेसचा कट आहे. या संघटनांकडे दुर्लक्ष करा , आपले लक्ष वंचितांना प्रतिनिधित्व , सत्ता मिळवून देणे हे आहे आपण त्यावरच लक्ष केंद्रित केले पाहिजे हे लक्षात ठेवा.
जयभीम,
सुमित वासनिक...

बामसेफ़च्या मुखोट्यात दडलेला संघ .....

बामसेफ़च्या मुखोट्यात दडलेला संघ .....
- राजेंद्र पातोडे
जय मुलनिवासी, ब्राम्हण विदेशी ’ असे सांगत बेंबीच्या देठापासुन ब्राम्हण व आंबेडकरी समुहाला शिव्या घालणारे संघटन म्हणजे बामसेफ़. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श सांगायचे आणि त्यांचा सिद्धांत नाकारायचा, त्यांच्या मानवमुक्तीच्या लढ्याचा धिक्कार करण्यासाठी संघपरिवारानेच जन्माला घातलेले मनुवादी व्यवस्थेचे दुसरे अपत्य आणि हिंदुराष्ट्र निर्मीती करीता कार्यरत कर्मचा-यांचे एक मोठे संघठन म्हणजे बामसेफ़ आहे. त्याची पाळेमुळे आणि कार्यप्रणाली तपासली असता अनेक धक्कादायक बाबी समोर येतील.
बाबासाहेबांच्या जाती निर्मुलानाच्या विरोधात जावुन जाती गोळा करण्याचा हा उद्योग करण्याचा कांशीराम चा उद्देश काय होता ? तर त्याचे उत्तर येते संघपरिवाराच्या इशा-यावर हे सर्व घडविण्यात येत होते.बामसेफ़ च्या स्थापनेच्या वेळी कांशीराम ह्यांच्या डोळ्यासमोर आर एस एस चा आदर्श होता.नोंदणी नसताना आर एस एस चे सुरु असलेले कार्य ह्या बद्दल कांशीराम ह्यांना कौतुक होते.मुळात संघपरिवार हा देखील हिंदुना संघटीत करुन ’हिंदुराष्ट्र’ निर्मिती च्या ध्येयासाठी काम करीत आहे.संघाचे नेतृत्व वरच्या जातीचे लोक करीत असल्याने खालच्या जातीचे लोक त्यांचे नेतृत्व मान्य करीत नाहीत. ही संघासमोरची सर्वात मोठी अडचण होती.त्या साठी बामसेफ़चा वापर करण्यात आला.संघपरिवाराने वरच्या जातीचे संघठन करायचे आणि बामसेफ़ने खालच्या जातीचे असा हा खेळ आहे.आणि हिंदुंना संघटीत करुन ’हिंदुराष्ट्र ’ साकारायचे हा आहे दोन्ही संघटनांचा मुळ अजेंडा ठरविण्यात आला.
त्या साठी बामसेफ़ने "बॅकवर्ड अ‍ॅंड मायनॉरिटी कम्युनिटीज एम्पलॉईज फ़ेडरेशन " अश्या जातीवाचक नावाचा स्विकार केला.या उलट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संघटना, संस्था, नियतकालिका ह्यांना नाव देतांना प्रचलीत धर्मव्यवस्था, सामाजिक व्यवस्था या विरोधातील लोकशाहीपुरक नावांची निवड केली होती.या उलट बामसेफ़ जातीवाचक नाव घेउन कामाला लागली. ही संघटना नेमकी काय आहे ह्याचे थोडक्यात उत्तर असे आहे -
·       जाती विरहीत समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी सहा हजार जातींचेच संघटन करते.
·       ’ जय भिम ’ एवजी ’ जय मुलनिवासी’ जयघोष करते.
·       पुणे कराराच्या निमीत्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्याचा धिक्कार करते.
·       ’ वर्गणी एके वर्गणी ’ वसुली करते.
·       डॉ. बाबासाहेब आंबेडकर,भय्यासाहेब आंबेडकर, दादासाहेब गायकवाडा पासुन बाळासाहेब आंबेडकर आणि पुढे थेट नामांतर शहीदा पर्यंत सर्व विचारवंत, नेते, कार्यकर्त्यांना, समाजातील जनप्रतिनिधींना, दलाल, भडवे संबोधते.
·       बाबासाहेब स्वत:च्या घरी नेहरु करीता दारु ठेवत असत, असा नीच विनोद वामन मेश्राम भाषणात करतो.
·       बामसेफ़ी शिर्ष नेतृत्वच समलैंगिक, पैसा खाणारे, चारित्र्यहीन असल्या्चे आरोपाची भाषणे यु ट्युब वर उपलब्ध असलेले संघटन म्हणजे बामसेफ़.
·       शाहु, फ़ुले, आंबेडकरांसहीत आदर्शांची भली मोठी यादी असणारे परंतु भाषा, भाषणे, वर्तन व प्रवृत्ती प्रचंड विसंगती असणारे संघटन म्हणजे बामसेफ़.
·       जातीय अन्याय, अत्याचार,आरक्षण, शिष्यवृत्ती, जातीय दंगल ह्या साठी एकदाही मोर्चा, आंदोलन, जनहीत याचिका न करणारी संघटना म्हणजे बामसेफ़.
·       आंबेडकरी समुहाला ’धेड’, ’महार ’ संबोधणा-या कांशीरामला युगात्मा मानणारा वर्ग म्हणजे बामसेफ़.

पार्श्वभुमी :-

बामसेफ़ची स्थापना कांशीराम ह्यानी केली आहे.बामसेफ़ स्थापने बाबत त्याचे संस्थापक सदस्यात कमालीचे मतभेद आहे. डी.के. खापर्डे हे १९७३ ला पुण्यात तर सी.पी. थोरात हे १९७३ ला दिल्लीत स्थापना झाल्याचे सांगतात.बामसेफ़चे प्रवर्तक कांशीराम हे ६ डिसेंबर १९७८ ला बोट क्लब दिल्ली ला स्थापना झाल्याचे सांगतात.कांशीराम ह्यांनी ६ डिसेंबर हाच दिवस का निवडला ? जगातील शोषित,पिडीत व सर्वहारा समुहाच्या जिवनातील अत्यंत दु:खाचा दिवस.त्याच महापरिनिर्वाण दिनाला डी एस फ़ोर अर्थात जातीअधिष्ठीत संघटनेच्या स्थापना दिवस संस्थापक आणि संघटनेचा हेतु स्पष्ट करणारा आहे.दुसरे महत्वाचे म्हणजे सहा हजार जातीचे संघठन करताना बामसेफ़ हिंदु धर्माचे विरोधात भुमिका घेत नाही.ब्राम्हण, वैश्य व क्षेत्रीय यांना लक्ष करताना त्यांचे समाज व्यवस्थेतील स्थान कायम राखते.मनुचा धर्म व हिदुत्व ह्याचा त्याग करणे हे खरे समता, स्वातंत्र्य, बंधुता स्विकारण्या सारखे होते.परंतु बामसेफ़ ही जातींची संघटना असल्याने हिंदु धर्मातील सहा हजार जातींचे संघटन हे त्यांचे प्रमुख कार्य आहे. एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगतात की, " जात ही केवळ संघठन विरोधी आहे, असे नव्हे तर सुधारणा विरोधी देखील आहे.जातीच्या आधारावर कोणत्याही योजनेची इमारत उभारता येत नाही.तुम्ही राष्ट्र निर्मीती करु शकत नाही.तुम्ही जातीच्या आधारावर काहीही करायला जाल तर ते कोसळुन पडल्याशिवाय राहणार नाही."
महाराष्ट्रातील हरिजनवादी डी. के. खापर्डे यांनी बहुजनवाद किंवा मुलनिवासीवादाचे विष आंबेडकरी समाजात पेरले आहे. " आर्य ब्राम्हण विदेशी होत व इथले संपुर्ण अनुसुचीत जाती, अनुसुचित जमाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्यांक लोक या आर्यब्राम्हणा व्यतिरिक्त आहेत असल्या मुळे मुलनिवासी ठरतात," असा शोध लावण्यात आला.तोच मुलनिवासी सिद्धांत अनुसुचीत जाती, अनुसुचित जमाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्यांक गळी उतरविला जात आहे. बामसेफ़च्या आदर्शांची यादी पाहील्यास लक्षात येते की त्या मध्ये बुद्ध, कबीर किंवा सम्राट अशोक नाहीत.त्याचे कारण संघपरिवार व बौद्ध संस्कृती च्या पारंपारिक संघर्षाला लक्षात घेवुन बामसेफ़ने बाबासाहेबांचे गुरु व आदर्श नाकारले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजव्यवस्थेची, संस्कृतीची, धर्मग्रंथांची कठोर चिकित्सा केली आहे. मानववंशशास्त्राच्या आधाराने त्यांनी जातीय व्यवस्थेचे सैद्धांतिक विश्लेषण केले आहे. आर्य बाहेरून आले व त्यांनी मूळच्या अनार्याना जिंकून दास्य किंवा गुलाम बनविले. आर्य म्हणजे ब्राह्मण आणि बाकीचे अनार्य म्हणे शूद्र वा बहुजन अशा आजवरच्या तकलादू इतिहासाला आंबेडकरांनी शूद्र पूर्वी कोण होते आणि अस्पृश्य मूळचे कोण होते, या दोन शोधप्रबंधांत छेद देणारे नवे निष्कर्ष काढले आहेत. शूद्र हे पूर्वी आर्यच होते, शूद्रांचे हिंदू-आर्य समाजात मूळचे स्थान दुसऱ्या म्हणजे क्षत्रिय वर्णात होते. ब्राह्मण व क्षत्रिय यांच्यातील वर्चस्ववादातून शूद्रांना चौथ्या वर्णात टाकून त्यांना खालचा दर्जा देण्यात आला, असे बाबासाहेब सांगतात.आर्य परकीय असतील तर मग पूर्वाश्रमीच्या शूद्रांना आणि आताच्या बहुजनांना परके ठरविण्यासारखे आहे. त्यानंतर अस्पृश्य मूळचे कोण, याचाही बाबासाहेबांनी शोध घेतला आहे. ते म्हणतात, विभिन्न वंशांचा निर्णय करण्याचे वांशिक शरीररचनाशास्त्र हेच खरे शास्त्र असेल, तर हिंदू समाजातील विभिन्न जातींना या शास्त्राची कसोटी लावून पाहिल्यास अस्पृश्य हे आर्य आणि द्रविड वंशापेक्षा भिन्न वंशाचे लोक आहेत, हा सिद्धांत कोलमडून पडतो. या मोजमापावरून हे सिद्ध होत आहे की, ब्राह्मण व अस्पृश्य हे एकाच वंशाचे लोक आहेत. जर ब्राह्मण आर्य असतील तर अस्पृश्यही आर्यच आहेत. ब्राह्मण जर द्रविड असतील तर अस्पृश्यही द्रविडच आहेत. ब्राह्मण नाग वंशाचे असतील तर अस्पृश्यही नाग वंशाचे आहेत. त्या आधारावर अस्पृश्यतेला वंशभेदाचा आधार नाही, असा निष्कर्ष बाबासाहेबांनी काढला आहे. चातुवर्ण व्यवस्थेत अस्पृश्य या अवर्णाची उपपत्ती कशी झाली, त्यालाही कोणता संघर्ष कारणीभूत आहे, हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. परंतु बाबासाहेबांनी येथील सर्व समाजव्यवस्थेचे मूळ शोधून काढले आहे, शूद्र पूर्वी कोण होते हे सांगितले, अस्पृश्य मूळचे कोण होते, याचीही सैद्धांतिक उकल करून दाखविली आहे. मुलनिवासीवादाचे प्रचारक ब्राम्हण किंवा आर्य बाहेरुन आले असे मानतात, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र शूद्र पूर्वी कोण होते आणि अस्पृश्य मूळचे कोण होते, या ग्रंथात आर्य हे बाहेरुन आल्याचे नाकारले आहे.बामसेफ़ी बाबासाहेबांचा हा सिद्धांत नाकारतात.
त्या करीता हे मुलनिवासी बामसेफ़ी आर्य संस्कृती व सिंधु संस्कृती वेगवेगळ्या आहेत म्हणुन आर्य बाहेरुन आले होते असे ठोकुन देतात.त्यांना माहीतच नाही की, सिंधु संस्कृतीतुन  मिळालेल्या अवशेषात मुळ गोष्टी सिद्ध करणारी लिपीच अजुन वाचता आलेली नाही.त्याही पुढे जाउन बाबासाहेबांचा सिद्धांत खोटा ठरविण्यासाठी हे महाभाग ’ डी एन ए चाचणी’ मधुन ब्राम्हण किंवा आर्य हे बाहेरुन आल्याचे सिध्द झाले असे बरळतात.बाबासाहेबांच्या काळात ही चाचणी करण्याची सोय नव्हती म्हनुन बाबासाहेबांनी आर्य बाहेरुन आले असे सिध्द करता आले नाही. हे सांगण्याचे धाडस देखील बामसेफ़ी करतात ! मुळात " डी एन ए चाचणी व्दारे " जन्मलेल्या किंवा गर्भातील बालकाचे आई वडील कोणते एवढेच निश्चित करता येते.डी एन ए चाचणी व्दारे भारतातील सर्व जाती धर्म व त्यांचा वंश कोणता हे ठरविता येत नाही.हे सॅम्पल घेताना उच्च, मध्यम आणि निम्न जातीतील केवळ आठ जाती समुहातील केवळ दहा व्यक्तीची निवड करण्यात आली होती व ते देखील आंध्र प्रदेशातुन घेण्यात आले आहेत.जेंव्हा की या देशातील एका राज्यातच हजारो जाती आढळुन येतात. ह्या डी एन ए चाचणीतील दुसरी त्रुटी अशी आहे की, त्या मध्ये केवळ ब्राम्हण, क्षेत्रीय आणि वैश्यांचाच उल्लेख आहे.शुद्र, अतिशुद्र व आदिम जातींच्या सॅम्पलचा उल्लेख नाही किंवा त्यांचे तुलनात्मक विश्लेषण केले गेले नाही. तरीही अनुवांशिक संशोधनाचे विश्लेषण केले असता भारतीय ब्राम्हण जाती युरोशियन लोकांशी आनुवांशिक दृष्टीने निकटचे ठरत असले तरी ब्राम्हण जाती युरोशियन लोकांपेक्षा जास्त क्षेत्रिय व वैश्य जातीच्या जवळचे ठरतात.त्या मुळे क्षेत्रिय व वैश्य आणि ब्राम्हण हे भारतातील रहीवाशी ठरतात.त्यायोगे बाबासाहेबांनी ’हु वेअर शुद्राज’ मध्ये केलेले संशोधन खरे ठरते.तरी देखील मुलनिवासीवादाचे पुरस्कर्ते जाणिवपुर्वक खोटा आणि भ्रामक प्रचार करत आहेत.
ब्राम्हण, क्षेत्रीय व वैश्य हे मुलनिवासी नसतील तर मग छत्रपती शिवाजी महाराज, शाहु महाराज हे क्षेत्रीय राजे बामसेफ़च्या आदर्श्यांच्या यादीत कसे ह्याचे उत्तर बामसेफ़ देत नाही.त्याचे कारण बामसेफ़ला केवळ सत्ता हवी आहे.संघपरिवार व बामसेफ़ ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत.खालच्या जातीचे संघटन करण्यासाठी वरच्या जातींना शिव्या घालायच्या.आणि गोळा केलेल्या सहा हजार जाती हिंदुत्वाशी जोडुन बाबासाहेबांच्या जाती तोडण्याच्या लढ्याला शह द्यायचा हा डाव आहे.
त्या करीता आंबेडकरी नेतृत्व उभे होवु नये म्हणुन आंबेडकरी चळवळीतील नेत्यांच्या बदनामीची, खालच्या स्तरावर जावुन शिव्या घालण्याची मोहीम सुरु केली आहे.समदुखी: असणा-या लहान जाती समुहांनी आंबेडकरी नेते, पक्ष ह्यांना मते देउ नये ह्यासाठी त्यांना दलाल, भड्वे सांगितले जाते.संघाला पुरक असाच हा सर्व प्लान आहे.कांशीराम, मायावतींनी देखील उत्तर प्रदेशात सत्ता मिळविण्यासाठी तिनदा भाजपा आणि संघाचा पाठिंबा घेतला होताच.त्यामुळे आज उत्तर प्रदेशात भाजपाला अभुतपुर्व यश प्राप्त झाले आहे.बसपा आणि मायावतींच्या बॅंकखात्याचा तपशील ह्या सर्व बाबींची साक्ष देण्यास पुरेसा आहे.तोच आदर्श घेवुन बामसेफ़ कार्यरत आहे.बामसेफ़ला अपेक्षित व्यवस्था परिवर्तन हे समाजव्यवस्थेशी संबंधित नसुन सत्तेशी संबंधित आहे.म्हणुनच बामसेफ़ कधीच जातीय अन्याय, अत्याचार,आरक्षण, शिष्यवृत्ती, जातीय दंगल, अ‍ॅट्रोसिटी कायदा, एस सी एस टी बजेट  साठी एकदाही मोर्चा, आंदोलन, जनहीत याचिका दाखल करत नाही.रस्त्यावर उतरत नाही. तर ई व्ही एम मशिन साठी मात्र मोर्चे काढते. सर्वोच्च न्यायालयात जाण्याची भाषा करते पण याचिका दाखल करत नाही.
हल्ली तर सोशल मिडीयावर वामन भक्तांनी बाबासाहेबां पेक्षा वामन मेश्राम ह्यांची भिती मनुवाद्यांना असल्याचा प्रचार सुरु केला आहे.हे खरे आहे का ? तर अजिबात नाही. कारण देशात भारत मुक्ती मोर्चा, बामसेफ़ मनुवादाला आव्हान ठरल्या असत्या तर दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी व गौरी लंकेश आधी वामन मेश्राम आणि विलास खरात ठार केले गेले असते.तब्बल २५ वर्षे ब्राम्हन, हिंदु देवी देवता ह्यांना जाहीररित्या शिव्यांची लाखोली वाहणारे मेश्राम व खरात हे पहीले लक्ष्य बनले असते.संघाला पुरक असेच कार्य करत असल्यानेच त्यांना मोकळे रान आहे.आणि गेली अनेक वर्षे शिव्या घालुन ब्राम्हण किंवा मनुवादी व्यवस्थेचे एक केसही वाकडे झालेले नाही.उलट देशातील अनेक राज्यात सत्ता व देशातील राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानासहीत एकहाती सत्ता स्थापन करता आलेली आहे.त्याचे कारण म्हणजे बामसेफ़च्या मुखवट्यात दडलेल्या संघपरिवाराच्या अजेंड्याला जाते.

राजेंद्र पातोडे
अकोला.
९४२२१६०१०१

Saturday, 22 December 2018

पवार साहेब कुठे आहेत वंचित बहुजन?

पवार साहेब कुठे आहेत वंचित बहुजन?

- सुमित वासनिक

2014 मधे लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रातुन 19 जागि आपले उमेदवार उभे केले होते. या एकोणविस जागांपैकी एकही जागी शरद पवारांनी धनगर, भटके विमुक्त, बौद्ध, मातंग, चांभार आणि मुस्लिम यापैकी एकाही समूहातील उमेदवार दिला नव्हता. 19 उमेदवारांपैकि 10 उमेदवार मराठा जातीतून देण्यात आले होते, यामध्ये एकही सामान्य मराठा नव्हता सर्वच बँक,शिक्षण संस्था आणि कारखाने चालवणारे संस्थाचालकच होते. राष्ट्रवादीने ब्राह्मण, मराठा, जैन आणि पाटीदार अश्या सर्वच प्रस्थापित समूहांमधील लोकांना उमेदवारी दिलि पण वंचितांना डावलून त्यांना उपेक्षितच ठेवले. महाराष्ट्रातिल बौध्द, मातंग आणि चांभार यापैकि एकाहि अनुसुचित जातिंंमधिल व्यक्तिस उमेदवारी दिलि नाही, SC आरक्षित जागेवर बडनेराचे आमदार रवि राणा यांच्या पंजाबी दलित असलेल्या पत्निस उमेदवारी देण्यात आलि होति. एकच आदिवासी उमेदवार ते सुध्दा आरक्षित जागेवरच उभा करण्यात आला होता. ओबीसी मधिल कुणबि, धनगर अश्या सर्वच जातिंना एकहि जागा देण्यात आलि नाही. ज्या दोन जागि माळि उमेदवार (कृष्णराव इंगळे, छगन भुजबळ) देण्यात आले तेथे राष्ट्रवादिच्याच  नेत्या, कार्यकर्त्यांनी आपल्याच उमेदवारांविरोधात अत्यंत कडवट जातीय प्रचार करून त्यांना पाडण्यात मुख्य भुमिका बजावलि होती. पवार ज्या मुस्लिमांचे कैवार घेण्याचा देखावा करतात त्या मुस्लिमांमधून एकहि उमेदवार उभा करण्यात आलेला नव्हता. भटक्यांच्या तोंडालाहि पानेच पुसण्यात आलि होती.
शरद पवारांनी बौद्ध, धनगर, भटके विमुक्त , माळि, साळी, कोळी, मातंग, चांभार आणि मुस्लिम अश्या सर्वच समूहांमधील लोकांना राजकीय प्रतिनिधित्व देण्याचे टाळले आहे. ज्या समूहांच्या भरवश्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता भोगली, आपले उमेदवार निवडून आणले त्या वंचित समूहांनी आता भारिप बहुजन महासंघाचे नेते ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात एकत्र होऊन वंचित बहुजन आघाडी तयार केली आहे. या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वंचित समूहांना सत्तेत पोहचविण्यासाठी सर्वच वंचितांनि कंबर कसलेली आहे. त्यामुळे येत्या काळात पवारांनी वंचित समूहांना  वंचित ठेवायचा कार्यक्रम बंद न केल्यास या वंचित समूहांनी शरद पवारांनाच राजकीय वंचित बनविल्यास कोणालाही नवल वाटू नये.

Friday, 21 December 2018

आणिबाणी लागु झालेली आहे !

आणिबाणी लागु झालेली आहे !
- मनोज काळे, ठाणे
दि.२१ डिसेंबर २०१८ रोजी देशाचे कायदामंत्री मा.रविशंकर प्रसाद यांनी एक घोषना केली, त्या घोषनेत आणिबाणी लागु झाल्याचा संदेश उघडपने जाणवत होता, या देशाची न्यायव्यवस्था, मीडिया, आयबी, निवडणुक आयोग, सिबीआय, इनकमटैक्स विभाग या सर्व यंत्रणांचा भाजपा सरकार कडुन त्यांचे व आरएसएस चे मनुवादी अजेंडे राबवण्यासाठी दुरुपयोग करुन घेतला जात होता, फक्त सोशल मिडीया वर या हिटलरवाद्यांना नियंत्रण आणता येत नव्हते पन या सनातनी पाताळतंत्री सरकारने यावरही तोडगा काढला व देशाच्या सुरक्षेचे खोटे कारण पुढे करुन सोशल मीडीया ला स्वतःच्या व कायद्याच्या नियंत्रणात घेण्याच्या आडुन जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला संपवण्याचा डाव आखला आहे.
भाजपा सरकारने सर्वच्या सर्व न्युज चैनल विकत घेऊन त्यांना आरएसएस च्या कामाला लावले होते पव सोशल मिडीयाचा अतिषय कल्पकतेने वापर करुन आंबेडकरवादी, लोकशाहीवादी, संविधानवादी लोकांनी आपला वेगळा पर्यायी मीडिया तयार करुन यांच्या पेड मीडियापेक्षा जास्त प्रभावी काम सुरु केल्याने मनुवाद्यांची मोठी गोची होत होती,त्यामुळे त्यांनी केंद्रात कायदा करुन भारतीय लोकशाहीच्या रक्षकांविरुद्ध हा मोठा कट केला आहे. काल केंद्राने केलेला कायदा त्यांच्या भाषेत कसा आहे ते पहा.
संगणक, मोबाइलवर आता सरकारचे लक्ष
1) तुमच्या-आमच्या संगणक वा मोबाइलवरून होणारी माहितीची देवाण-घेवाण, त्यांत साठवलेली माहिती तपासण्याचा, तिच्यावर पाळत ठेवण्याचा आणि तिच्या छाननीचा अधिकार दहा तपास आणि गुप्तहेर यंत्रणांना देणारी अधिसूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केले.
2)ही अधिसूचना म्हणजे देशाची वाटचाल 'हुकुमशाही राज्या'कडे होत असल्याचे लक्षण आहे, टीका विरोधी पक्षांनी केली. तर 'या अधिसूचनेत काहीही नवे नाही, विरोधक नाहक आगपाखड करत आहेत', असे प्रत्युत्तर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिले.

3) राष्ट्राच्या सुरक्षेला बाधा पोहोचेल, अशी शंका आली तर संगणकांवरील माहितीच्या देवाणघेवाणीवर नजर ठेवण्याची अधिसूचना 2009 मध्ये काढण्यात आली होती. तशीच तंतोतत अधिसूचना केंद्रीय गृहखात्याने काढली.
4) संगणकावरील माहितीवर देखरेख ठेवण्याचे अधिकार दहा यंत्रणांना आपोपाप मिळणार नाहीत, तर केंद्रीय गृहसचिवांच्या परवानगीनेच एखाद्या व्यक्तीच्या संगणकावरील माहिती, फोनवरील माहितीचे आदानप्रदान वा इ-मेलवरील माहितीच्या वहनाची तपासणी केली जाईल, असे स्पष्टीकरण केंद्रीय गृहखात्याने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
आता लोकशाहीवादी, संविधानवादी लोकांची जबाबदारी वाढली आहे कारण इंदिरा गांधीनी लावलेल्या आणिबाणीत जे निर्बंध लादले होते तेच आता मोदी सरकारने लावले आहेत, याला गांभिर्याने पहावे. हा कायदा जाहीर करताना मंत्र्यांनी मुद्दाम इंदिरा गांधीने लावलेली आणिबाणीची आठवन करुन देणे म्हणजे आम्हीही तेच करत आहोत हा संदेश त्यांना जनतेला द्यायचा आहे.
शिवाय भाजपा च्या केंद्रीय नेत्यांच्या बहुतेक भाषनांमध्ये २०२२ या वर्षाबद्दल स्टेटमेंट जास्त येत आहे, २०१९ बद्दल भाजपा चे वरिष्ठ नेते काहीही बोलताना दिसत नाहीत याचा अर्थ २०१९ च्या निवडमुकाही कदाचित हे लोक होऊ देणार नाहीत, व या धोक्याची सुचना श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर मागील काही महीन्यांपासुन सतत देत आले आहेत व आता त्याचे चिन्हही दिसु लागले आहेत, माजी न्यायमुर्ती कोळसे पाटलांनीही २०१९ ची निवडणुक हे हिटलरवादी लोक होऊ द्यायचे नाहीत असा धोका वर्तवला होता हे आपन विसरु नये.
सनातन संस्थेचे लोक घरात बॉम्ब ठेवतात, कर्नल पुरोहीत आर्मिचा दारुगोळा देशात स्फोट करायला पुरवतो, देशात दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश, करकरे, कामटे,  साळसकर यांची हत्या होते पन त्याला या सनातनी सरकारी यंत्रणा पाठीशी घालतात मात्र आरएसएस च्या जातीवादी व मनुवादी षडयंत्राला विरोध करणारांना दहशतवादी व मोवोवादी म्हणुन खोटे पुरावे सादर करुण कशाप्रकारे अडकवण्याचा प्रयत्न केला जातो हे मागील चार वर्षात आपन सतत पहात आलो आहोत, या देशाच्या प्रगतीबद्दल बोलनारांना अडकवले जात आहे व देशात विषमता प्रस्थापित करुन देशाच्या संविधानाला नाकारणार्यांना रेड कारपेट अंथरले जाऊ लागले आहे. संभाजी भिडे ला रॉयल ट्रिटमेंट मिळते व संविधानवाद्यांवर केसेस चालवल्या जाऊ लागल्या आहेत.
आता या कायद्याचा उपयोग फक्त भाजपा व आरएसएस च्या टिकाकार व विरोधकांवर कायद्याच्या व देशाच्या सुरक्षिततेच्या नावावर लक्ष ठेवले जाईल, सतत दबाब आणुन विरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जाईल, आपन सतर्क राहुन श्रद्धेय बाळासाहेबांना साथ दिली पाहीजे, लोकशाही ला वाचवण्यासाठी त्यागाची भावना ठेवुन काम केले पाहीजे, लोकशाही व संविधान आहे तोपर्यंत या भारत देशाचे अस्तित्व आहे याचे भान प्रत्येकाने ठेवावे, व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या लढ्याचा सर्वात मोठा आधार अलेले संविधान संपवले जाणार नाही यासाठी लढा कायम ठेवावा.
- मनोज काळे, ठाणे - 8169291009
-----------------------------------------------------


शासनकर्ती जमात बना...!

शासनकर्ती जमात बना...!
- भास्कर भोजने
        महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात जा आणि बघा. अकोला जिल्ह्यात जे बौद्धांना मिळाले ती राजकीय पदे इतर जिल्ह्यात मिळाली का...??
  १) प्रा.रणजित मेश्राम .महाराष्ट्र राज्याचे खनिकर्म महामंडळ अध्यक्ष.
२) सौ.ज्योत्सनाताई गौतम गवई.
           महापौर अकोला मनपा.
३) आयु.सुनील मेश्राम.
             ऊपमहापौर अकोला मनपा.
४) आयु. गजानन गवई .
          गटनेता अकोला मनपा.
५) आयु.श्रावण शेकोजी इंगळे.
               अध्यक्ष, जि.प.अकोला.
६)आयु.शरद गवई.
            अध्यक्ष जि.प. अकोला.
७) सौ.पुष्पाताई इंगळे.
          अध्यक्ष जि.प.अकोला.
८) आयु.बी.आर. सिरसाट.
           ऊपाध्यक्ष जि.प.अकोला.
९) आयु. दामोदर जगताप.
         ऊपाध्यक्ष जि.प. अकोला.
१०) आयु. दिलिप तायडे.
             सभापती कृषी उत्पन्न बाजार समीती
                      अकोला.
११) सौ.रमाताई धांडे.
          सभापती अकोट पंचायत समिती.
१२) सौ.बकुळाताई बोदळे.
           नगराध्यक्षा तेल्हारा नगरपालिका.
१३) आयु.संघपाल वाकोडे.
           सभापती अकोट पंचायत समिती.
१४) आयु. राहूल सदार.
            सभापती पातुर पंचायतसमिती.
१५) आयु.भारत निकाडे.
                 सभापती बाळापुर पंचायत समिती.
१६) आयु.ऊद्धवराव दामोदर.
              सभापती बाळापुर पंचायतसमिती.
१७) आयु.निरंजन सिरसाट.
              सभापती बाळापुर पंचायत समिती.
१८) आयु.जिवन गवई.
            सभापती अकोला पंचायत समिती.
१९) आयु.बि.आर.सिरसाट.
             सभापती बार्शिटाकळी पंचायसमीती.
२०)आयु.संजय वाकोडे.
           ऊपसभापती पंचायतसमिती बाळापुर.
२१)आयु.डिगांबर ऊमाळे.
             ऊपाध्यक्ष नगरपालिका बाळापुर.
२२) सौ.संगिताताई ऊमाळे.
                 ऊपाध्यक्षा  नगरपालिका बाळापुर.
     ही पदाधिकारी यांची यादी आहे.
जि.प.सदस्य,पं.स.सदस्य आणि नगरसेवक अनेक झालेत.
      ज्या अकोला जिल्ह्यात आंबेडकरी समुहाची संख्या केवळ १८ % आहे. त्या जिल्ह्यात अँड बाळासाहेब आंबेडकरांनी  बौद्धांना अशी शासनकर्ती जमात बनविले आहे...!
डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत राजकारण केले आहे...!
म्हणून अकोला पँटर्न हा मार्गदर्शक आराखडा आहे. महाराष्ट्रातीलसर्व जिल्ह्यात लागु करावा अशी कार्यकर्ते, मतदार आणि जनतेला विनंती...!



संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...