Sunday, 30 December 2018

आधुनिक भारताचा पाया - भीमा कोरेगावची लढाई.

आधुनिक भारताचा पाया - भीमा कोरेगावची लढाई.
- मनोज नागोराव काळे, ठाणे.
जगाच्या इतिहासात अनेक लढाया झाल्या, प्रत्येक लढाई ही राजकीय होती, दुसर्या राजाचा पराभव करुन त्याचे राज्यक्षेत्र आपल्या ताब्यात घ्यायचे अशीच चढाओढ असायची, काही ठिकाणी आपापल्या धार्मिक मान्यता लादण्यासाठीही काही लढाया झाल्याचे इतिहीसात नमुद आहेत, अनेक लुटुपुटुच्या लढायांनाही भारतीय इतिहासात गौरवाने सांगितल्या जातात.
मात्र जगाच्या ज्ञात इतिहासातील सर्वात महत्वपुर्ण, विरतेने व स्वाभिमानी बाण्याने ओतप्रोत अशी फक्त ५०० आलुतेदार बलुतेदारांनी २८००० च्या विशाल जालिम पेशव्यांच्या सैन्याला एका रात्रीत कापुन काढुन एका देशाच्या प्रतिगामी इतिहासाला प्रगतीशील पुरोगामी राष्ट्राकडे घेऊन जाणारी कोरेगाव भीमा च्या पात्रात १ जानेवारी १८१८ ची लढाई जाणीवपुर्वक लपवली गेली होती.
हि लढाई दोन राज्यांमधील नव्हती, जमीनीवर ताबा मिळवण्यासाठी नव्हती तर ही लढाई होती "आम्ही माणुस आहोत व आम्हाला माणसा सारखे जगता यावे" या अधिकारा साठी.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या इतिहासाला एका ओळीत मांडताना सांगितले आहे की “भारत देशाचा इतिहास म्हणजे श्रमण संस्कृती विरुद्ध ब्राह्मन संस्कृतीचा झालेला संघर्ष आहे"
१) तथागत गौतम बुद्धांनी ब्राह्मण संस्कृतीवर पुर्ण विजय मिळवला व श्रमन संस्कृती देशात झपाट्याने पसरली, देवनामपिय महान सम्राट अशोकाने पुर्ण जगभरात तथागतांचे विचार पेरले, त्यानंतर प्रतिक्रांती झाली व देशात पुन्हा चातुर्वर्णाची ब्राह्मण संस्कृती जबरदस्तीने लादली गेली.
२) तथागतांची संस्कृती संत परंपरेने कायम जागृत ठेवली, तुकाराम महाराजांच्या सहाय्याने श्रमन / मातृ सत्ताक संस्कृती व स्वाभिमानाचे धडे आऊसाहेब राजमाता जिजाऊंनी शिवरायांना दिले व पुन्हा चातुर्वर्णाच्या शृंखला तोडण्याचे काम शिवरायांनी केले, त्यांनी सप्तबंदी धुडकावली व शुद्र समजल्या गेलेल्या सर्व नागवंशियांच्या हातात शस्त्र दिले व स्वराज्य / लोकशाही / गणराज्य स्थापन केले.
३) शिवशाही विरुद्ध पेशवे या लढाईत पेशव्यांनी शिवशाही संपवली, शिवशक बंद केला व शिवरायांच्या साथिदारांना गुलाम केले.
४) छ. शिवरायांना स्वराज्य स्थापनेत व स्वराज्य चालवण्यात ज्या ज्या जातीच्या लोकांनी मदत केली त्या सर्वांना शुद्र म्हटले गेले, मराठा जातीच्या लोकांनाही पेशव्यांनी शुद्रच समजले याचे ज्वलंत उदाहरण आहे शाहु महाराज व सयाजीराव गायकवाड या दोन महाराजांचे वेदोक्त प्रकरण.
५) पेशव्यांनी संभाजी महाराजांना कापुन टाकण्यात सहाय्य केले व ज्या महार गोविंद गायकवाड ने संभाजी महाराजांचे अंतिम संस्कार करुन पेशव्यांच्या धार्मिक फतव्याचा धुव्वा उडवला त्यामुळे पेशव्यांनी संपुर्ण महार जातीलाच बहिष्कृत केले, महार समाजावर अनेक अनिष्ट नियम लागु केले.
६) महारांनी बाजीराव पेशव्याकडे सर्व जुलमी नियम बंद करुन आम्हाला माणसासारखे जगण्याचा अधिकार द्यावा अशी मागणी केली पन माजोरी सत्तेच्या मस्तीत धुंद असलेल्या बाजीरावाने ती मागणी धुडकावली, तेव्हा महार समाजाला या गुलामितुन मुक्त होण्याची संधी ब्रिटीश अधिकार्याने दिली. व जिवाची पर्वा न करता छ. संभाजी राजांचे अंत्यसंस्कार केले म्हणुन पेशव्यांनी लादलेली गुलामी संपवण्यासाठी महारांनी निश्चय केला व कोरेगाव भीमा ची लढाई लढली गेली, २८००० सैन्यांना फक्त ५०० लोकांनी पुर्णतः कापुन काढले व छ. संभाजी राजांच्या हत्येचा बदला घेतला, शिवशाही संपवणार्या पेशव्यांचा खात्मा केला.
७) त्यानंतर ब्रिटीशांनी तेथे हा क्रांती स्तंभ बांधला,ब्रिटीशांनी पुन्हा या क्रांतीला मोठ्या क्रांतीत रुपांतरीत केले, ब्राह्मणी वर्चस्वाला ब्रिटीशांनी धक्का दिला व सर्व जाचक रुढी परंपरा बंद केल्या, सर्व शुद्रांना शिक्षण दिले पाहीजे अशी पुरोगामी भुमिका ब्रिटीशांनी घेतली, क्रांतीबा फुले, शाहु महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण प्रसारासाठी ब्रिटीशांनी सहाय्य केले व या देशाला आज ज्या पुरोगामित्व व प्रगतीशिलतेचा गर्व वाटतो ते सर्व काही ब्रिटीशांनी या देशाला दिले.
जर १ जानेवारी १८१८ चे ते युद्ध महार सैनिक हरले असते तर या देशातील स्त्री कधीच मुक्त झाली नसती, या देशात समता, स्वातंत्र्य, बंधुता,न्याय, शिक्षण या विषयावर समाजसुधारक निर्माण झाले नसते, या देशात आजही मनुस्मृती चे राज्य असते.
त्यामुळे क्रांतीबा फुलेंनी पहीली शाळा १ जानेवारी लाच सुरु केली, क्रांतीबांनी शिवरायांची समाधी शोधली, शाहु महाराजांनी मराठा समाजासह इतर समाजाला आरक्षण दिले, पेशव्यांनी बंद केलेला शिवशक पुन्हा सुरु केला, 
छ.शाहु महाराजांनी व सयाजी गायकवाड या ब्राह्मणी जुलमाचे शिकार झालेल्या महाराजांनी एका महाराच्या पोराला ( विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर)  शिक्षणासाठी मदत केली व त्याच महाराच्या पोराने या देशाला प्रबुद्ध भारताची वाट दाखवली,या देशाची सत्ता राजाच्या हातची काढुन लोकांच्या हातात दिली व देशातील प्रत्येक नागरिकाला राजा बनवले,
राज्याचा शेअर सर्वांना समान वाटला,
प्रज्ञासुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भिमा कोरेगाव लढाईच्या मजबुत पायावर फुले - शाहुंनी उभ्या केलेल्या समतेच्या मंदिरावर लोकशाहीचा कळस रचला व भारतातुन मनुस्मृतीचा कायदा संपवुन संविधान दिले.
५०० आलुतेदार बलुतेदार सैनिकांनी ( प्रामुख्याने महार जात  )
सुरु केलेला समतेच्या आधुनिक लढ्याला कायदेशिर स्वरुप देऊन बाबासाहेबांनी कोरेगाव भिमा च्या पायावर एक अधुनिक भारत निर्माण केला व आज आपन पहातोय भारत देश किती झपाट्याने प्रगती करुन जगात नावाजला गेला.
भिमा कोरेगाव चा तो  विजय स्तंभ छ. शिवराय, छ.संभाजी राजे यांच्या शुर व निष्ठावान मावळ्यांनी  लढलेल्या समतेच्या लढ्याचे प्रतिक आहे हे आता जगानेही मान्य केले आहे.
आजच्या आधुनिक भारताचा कळस जर भारतीय संविधान असेल तर याचा पाया निर्विवादपने ती कोरेगाव भिमाची लढाईच आहे, त्यामुळे २०१४ ला नवपेशवे सत्तेवर येताच पहिला हल्ला त्यांनी या स्तंभाला वंदन करायला आलेल्या आलुतेदार बलुतेदारांवरच केला. पन यावेळीही डॉ बाबासाहेबांचे रक्तच ( आद.प्रकाश आंबेडकर)  या पेशव्यांसमोर खंबीरपने उभे राहीले व पेशव्यांची पळता भुई थोडी केली आहे, ते राजकीय मार्गाने पुन्हा या देशाला ब्राह्मण संस्कृतीकडे लोटायचा प्रयत्न करत आहेत व बाळासाहेब आंबेडकर सर्व आलुतेदार बलुतेदारांना एकत्र करुन त्याच राजकीय मार्गाने पेशव्यांना जेरीस आनत आहेत व सर्व बहुजन समाज आज त्यांच्यामागे एकमताने उभा ठाकुन पुन्हा प्रतिक्रांती होणार नाही, पुन्हा आम्ही गुलाम होणार नाही असा एल्गार केला जात आहे.
त्यावेळी ते सैनिक तलवारी च्या सहाय्याने लढले व जिंकले पन लोकशाहीत आपल्याला हिच आधुनिक पेशवाई विरुद्ध शिवशाही / लोकशाही हि लढाई मता च्या सहाय्याने जिंकायची आहे, आपले हत्यार आपले " मतदान " असणार आहे. त्यामुळे नवपेशवाई संपवण्यासाठी आपला मताधिकार आपल्या अस्तित्वावर उठलेल्या मनुवाद्यांना न विकता तो मताधिकार वापरुन पेशव्यांना सत्तेपासुन कायमचे दुर करा व त्या ५०० विरांना खरी आदरांजली वहा असे अवाहन करतो.
जय भीम, जय शिवराय
जय संविधान
- मनोज नागोराव काळे, 8169291009

______________________________

१ जानेवारी च्या निमित्ताने समाजबांधवांसाठी..भिमा कोरेगाव म्हणजे शौर्याचा तथा स्वाभिमानाचा इतिहास..

१ जानेवारी च्या निमित्ताने समाजबांधवांसाठी..
भिमा कोरेगाव म्हणजे शौर्याचा तथा स्वाभिमानाचा इतिहास..
----------------------------------------
भिमा कोरेगांव येथील उभा असलेला  *विजयस्तंभ* हा पेरणे ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असुन मोठया दिमाखानं भिमानदीच्या काठावर उभा असुन आपल्या महार समजल्या जाणा-या पुर्वजांच्या शौर्याचं तथा स्वाभिमानाचं प्रतिक आहे,जेव्हा हुकूमशहा पेशव्यांनी आक्रमण केलं तेव्हा पिढ्यान् पिढ्या गुलामीच्या बंधनात अडकलेल्या गुलामांचा स्वाभिमान जागा झाला,आम्हाला माणुस म्हणुन जगण्याचा हक्क नाकारणा-या पेशवाईचा खात्मा झाला पाहीजे अशी खुणगाठच जणु या पुर्वजांनी बांधली होती असे या इतिहासातून दिसते,असे असले तरी ही आपल्या पुर्वजांकडून द्वेषातून तथा गनीमी काव्यातून झालेली नाही तर ती समजुन उमजुन आणि ठरवुन झालेली ही लढाई होती,आपले हक्क जर मागुन मिळत नसतील तर ते हिसकावुन घ्यावे लागतील,माणुस म्हणुन जगता येत नसेल तर जगण्यात काय अर्थ,याची जाणिव आपल्या पुर्वजांना झाली असावी,पेशवाईने जरी अचानक व द्वेषातुन हे आक्रमण केले असले तरी आपल्या पुर्वजांकडून द्वेषातून झाली नाही हेही तितकेच सत्य आहे, *उद्देश स्पष्ट ठेवुन हक्कासाठी लढणारांचा विजय नक्की होतो,* आणि तसेच आपल्या पुर्वजांनी पेशवाई विरूध्द आपल्या हक्काची लढाई लढुन नेत्रदिपक असं यश मिळवलं,आणि आपल्या शौर्याचा तथा स्वाभिमानाचा विजयी इतिहास रचला,हे यश आपल्याला असे मिळाले की पिढ्यान् पिढ्या त्याची नोंद इतिहास घेतच राहील,त्यामुळे
*येतील किती अन् जातील किती त्याची न आम्हाला भिती*
आता भिती आहे ती आपल्याच्यांचीच आपल्याला,कारण गाडलेली पेशवाई आता नवपेशवाईत पुन्हा जन्माला आलेली आहे,आणि ही नवपेशवाई आपल्याशी कुठल्याही प्रकारे लढत नाही तर ती आपल्या आपल्यात लढत ठेवुन आपल्या पुर्वजांच्या शौर्याचा बदला घ्यायला निघाली आहे,हे जर आपल्याला वेळीच कळलं नाही तर मोठा अनर्थ होऊ शकतो,म्हणुन आता पुर्वजांच्या शौर्याचा अभिमान असणा-या वारसदारांनी आता वेळीच सावध झालं पाहीजे,आपल्याला शौर्याच्या इतिहासाबरोबर विचारांचा वारसासुध्दा आहे,म्हणुन आपली कृती ही विचारांच्या आधारावर असली पाहीजे असे मला वाटते.ज्या अहंकारामुळे पेशवाई संपली तीच अहंकाराची बाधा जर आपल्याला होत असेल तर आपणच आपल्याला संपवायला निघालेलो आहोत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.त्यामुळे माझ्या तमाम समाज बांधवानो तथा बाबासाहेबांची विचारधारा मान्य असलेल्या बहुजन बांधवांनो आपण आता आपल्याला वेळीच सावरायला हवं, *युध्दाला नव्हे तर बुध्दालाच स्विकारायला हवं* हीच खरी समाज व देशाच्या सुरक्षिततेची हमी असेल,आणि यामुळेच भिमा कोरेगाव येथे झालेल्या घनघोर लढाईची आपल्या पुर्वजांची शौर्य गाथा येणा-या पिढ्यान् पिढ्यांच्या काळजावर कोरली भिमा कोरेगावचा हाच शौर्याचा तथा स्वाभिमानाचा इतिहास अजरामर राहील..
मी तमाम समाज बांधवांना या निमित्ताने विनंती करेन आपण बुध्द व बाबासाहेब यांच्या विचारधारेवर चालणारे अनुयायी आहोत,आपल्या हातुन कोणताही अनुचित कृत्य घडणार नाही याची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे,त्यामुळे कोणतीही अफवा पसरवु नका व अफवांना बळी पडु नका,भिमा कोरेगाव येथे येणा-या प्रत्येक व्यक्तींनी या पवित्र भुमिला व पराक्रमी पुर्वजांना सन्मानाची सलाम द्या व विजयत्सोव साजरा करा,कुणालाही व कुठेही वाईट बोलुन चिडवु नका किंवा घोषणाबाजी करू नका..
येणा-या प्रत्येकाचा प्रवास सुखाचा होवो व येणारे नवीन वर्ष सुखासमाधानाचे जावे ही मनोकामना..
भिमाकोरेगाव विजय दिनाच्या सर्वांना सदिच्छा.
आपला,
विकास साळवे,पुणे
+919822559924...✍

Saturday, 29 December 2018

अहमदनगर निवडणूक आणि बसपा

अहमदनगर निवडणूक आणि बसपा

- सुमित वासनिक

अहमदनगर मध्ये बीएसपीच्या 4 नगरसेवकांनी भाजपला मतदान करून भाजपचा महापौर निवडून आणला आहे. बीएसपीच्या या चार नगरसेवकांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. या चार नगरसेवकांना निलंबित करून निवडणुकि आधी त्यांच्या सोबत झालेला सौदा बीएसपीने पुर्ण केला आहे.
अहमदनगर मधील महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रस्थापित पक्षांचे नगरसेवक असलेल्या चौघांना महानगरपालिकेतील 4 सदस्यांचा एक प्रभाग या निवडणूक पद्धतीत एकत्र निवडणूक लढवायची होती. या चौघांना एकच चिन्ह हवे होते त्यासाठी या सर्वांनी सर्वच प्रस्थापित पक्षांसोबत संपर्क साधला होता. इतर कोणत्याही प्रस्थापित पक्षाने चारही जागा देण्याचे मान्य केले नाही म्हणून बीएसपीची उमेदवारी घेऊन हे चौघेही लढले. बिएसपि तर्फे लढतांना प्रभागातील आंबेडकरी मतदानावरही या चौघांचा डोळा होता. याशिवाय निवडून आल्यावर पक्षाच कुठलेही बंधन राहणार नाही याची शाश्वती सुद्धा यांना बिएसपि नेतृत्वाकडून मिळाली होती. नगर मध्ये झालेल्या या सौदेबाजीत मोठी आर्थिक उलाढाल झाली असल्याचे निवडणुकि वेळी बोलल्या जात होते.
निवडणुकीत हे चारही उमेदवार निवडून आले , निवडून आल्यावर या चौघांनी भाजपचा महापौर पदाचा उमेदवार जाहीर व्हायच्या आधीच भाजपला मतदान करण्यासाठी व्हीप काढला होता. पण तिकीट वाटपावेळी कोणतेही बंधन राहणार नाही या अटीला पूर्ण करण्यासाठी बिएसपि नेतृत्वाने या चौघांवर कोणतीही कार्यवाही केली नाही. महापौर पदाच्या निवडणुकीत या चौघांनी भाजपला मतदान केले आणि आंबेडकरि मतदारांचा बाजार मांडला.
नगर मधील महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला मतदान करणाऱ्या या सदस्यांना आता बीएसपीने निलंबित केले आहे. या निलंबनामूळे हे चारही नगरसेवक पक्षाच्या बंधनातून पुर्णपणे मुक्त झाले आहेत. हे निलंबन, निलंबन नसून या चौघांसोबत झालेल्या सौंद्याचा शेवटचा भाग आहे, पुढिल 5 वर्ष हे चारही नगरसेवक आपल्या मनाने कोणालाही मतदान द्यायला मोकळे झाले आहेत.
निवडणूकांमध्ये आपल्या पक्षाची आकडेवारी इतर पक्षांपेक्षा कशी जास्त आहे हे दाखवण्यासाठी, पार्टीसाठी  फंड मिळविण्यासाठी आंबेडकरी मतांचा बाजार कसा मांडण्यात येतो हे या घटनेतून जनतेने समजून घेतले पाहिजे.

Thursday, 27 December 2018

राजकीय लबाड्या आणि समाज मनं...!

राजकीय लबाड्या आणि समाज मनं...!
- भास्कर भोजने

        आपणं सांसदीय लोकशाही स्विकारुन ऊणेपुरे सत्तर वर्षे होतं आहेत...!
    सांसदीय लोकशाही मध्यें कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडली आहे...!
   सांसदीय लोकशाही ही शेवटच्या घटकांपर्यंत पोहचायला पाहिजे अशी अपेक्षा आहे...!
   सांसदीय लोकशाही मधील कल्याणकारी राज्याची संकल्पना सत्ताधारी वर्गाने संपूर्ण धुळीस मिळविली आहे...!
   कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेला मूर्त रूप देण्याचा प्रयत्न म्हणजे उपेक्षित वर्गाला आरक्षण देणे होय...!
    ज्यांना सामाजिक कारणाने संधी नाकारल्या जाते त्यांना संधी प्रदान करणे म्हणजे आरक्षण होय...!
   म्हणूनचं त्याला"प्रतिनिधित्व "म्हटले जाते...!
   आरक्षण या विषयाला सत्ताधारी वर्गाने संपूर्णरित्या चेष्टेचा विषय बनविले आहे...!
    राज्यघटनेत तरतूद असुनही ओबीसी वर्गाला आरक्षण मिळविण्यासाठी तब्बल ४० वर्षे संघर्ष करावा लागला...!
  आणि ओबीसी वर्गाला मिळालेल्या आरक्षणातं किर्रीमिलेअरची अट घालुन खोडा घातला गेला...!
    धनगर समाजाचे आरक्षणाच्या संदर्भात केवळ "धनगर "आणि"धनगड "एवढाचं शब्दबदल आहे,तो शब्दभेद गेली पन्नास वर्षे झाली आहेत मिटतं नाही...!
     धोबी समाज हा मध्यप्रदेशात एस.सी.प्रवर्गात आहे आणि महाराष्ट्रात ओबीसी वर्गात आहे...!
धोबी समाजाला एस.सी.चे आरक्षण पाहिजे,हा शहानिशा करण्याचा प्रकार आहे, परंतु ती शहानिशा गेली पन्नास वर्षे झाली आहेत होतं नाही...!
    आदिवासी बांधवांच्या आरक्षणाच्या संदर्भात खरे आदिवासी आणि बोगस आदिवासी असा वाद निर्माण केल्या गेला आहे...!
   या वादात ८२ हजार कर्मचारी वर्गाचा जीव टांगणीला लागला आहे परंतु निवड करण्यात येतं नाही.भिजतं घोंगड ठेवायचं आणि सत्तेची गणिते मांडायची असा खेळ चालला आहे....!
मुस्लिम समाजाला आरक्षण देतो अशी भुल देऊन भरीस पाडलं जातं आहे, तसेच मराठा समाजाला सुद्धा आरक्षणाचं गाजरं दाखवून,झुंजविलं जातं आहे.
   संपुर्ण समाज मनं अस्वस्थ ठेऊन सत्ताधारी आजपर्यंत राज्य करीत आले आहेत...!
  प्रत्येक उपेक्षित घटकाला सत्ताधारी आणि प्रस्थापित वर्गाने झुंजवतं ठेऊन आपली राजकीय पोळी भाजून घेतली आहे...!
   हा खेळ गेली सत्तर वर्षे जनता ऊघड्या डोळ्याने पाहते आहे...!
   सत्ताधारी वर्गाने कल्याणकारी राज्य तर राबविले नाहीचं परंतु लबाडी वर लबाडी करुन समाजाला ठगविले आहे...!
   सांसदीय लोकशाही ही शेवटच्या घटकांपर्यंत पोहचायला पाहिजे होती परंतु याच सत्ताधारी वर्गाने घराणेशाही निर्माण करुन सत्ता काही कुटुंबातंच बंदिस्त केली आहे...!
सत्तेचे विकेंद्रीकरण होऊ दिले नाही...!
महाराष्ट्रात केवळ १६९ घराणे गेली सत्तर वर्षे राज्य करीत आहेत..!
आलटुन पालटून सत्ता उपभोगण्याचा फंडा त्यांनी व्यवस्थित राबविला आहे...!
  कॉंग्रेस सत्तेबाहेर गेली की,सेना भाजप आणि सेना भाजप बाहेर गेली की, कॉंग्रेस सत्तेत कशी येईल याची तजविज सत्ताधारी करीत असतात...!
सत्तर वर्षाचा कालखंड हा काही कमी नाही म्हणून तुम्ही सर्वकाळ सर्वांना मुर्ख बनवू शकत नाही...!
   आता जनतेच्या ही लबाडी लक्षात आली आहे...!
  कॉंग्रेस असो की, भाजप हे एकाचं नाण्याच्या दोन बाजू आहेत हे जनतेला कळून चुकले आहे...!
     म्हणून आता समाजात मोठा बदल जाणवतो आहे...!
धनगर समाज आपल्या आरक्षणासाठी कुणावरही अवलंबून राहण्यापेक्षा स्वत: सत्ताधारी होऊ इश्चितो...!
   आदिवासी आपल्या आरक्षणाचा प्रश्न स्वत:च सत्तेत बसुन सोडवू इश्चितो...!
लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता सत्ताधारी झाल्याशिवाय मिळविता येणारं नाही हे कळून चुकले आहे म्हणून लिंगायत सत्ताधारी होण्यासाठी प्रयत्नशिल झाला आहे...!
मराठा समाजातील जो घटक सत्ताधारी आहे तो केवळ मोजक्या घराण्यातील आहे, सामान्य मराठा माणसाला जातीसोबत माती खाण्याची शपथं देऊन थापाड्या घराणेशाहीच्या पोशिंद्यांनी मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे, म्हणून संभाजी ब्रिगेड सारखे संघटन राजकारणात ऊतरुन प्रतिनिधित्व मागते आहे,सकल मराठा नांवाने मराठा समाज प्रतिनिधित्व मागते आहे...!
    महाराष्ट्रातील समाज मनं जे सत्ताधारी वर्गाने अस्वस्थ केले होते तेचं समाजमनं सत्तेसाठी कार्यरत झाले आहे ही मोठी उपलब्धी आहे...!
म्हणून आता महाराष्ट्रात मोठा बदल होणारं आहे...!
सत्ताधारी कॉंग्रेस असो की भाजप यांना आता संधी नाही...!
  घराणेशाही पोसणारे कुणीही असो त्यांनाही संधी नाही...!
    नवा पर्याय समाजाला हवा आहे आणि तोही वंचित असला पाहिजे हा निकष आहे....!
   जयभीम.
-भास्कर भोजने.

Wednesday, 26 December 2018

काव्यबाण - संविधान हाती घ्या रे - विकास साळवे

संविधान हाती घ्या रे
-----------------------------
विषारी नागाचे फणे आता डोलु लागले रे,
चावा घेण्या तोंड आता खोलु लागले रे..
सावधान व्हा गड्यांनो सावधान व्हा रे,
विषारी नागं ठेचण्या हाती संविधान घ्या रे..
लागले गळाला जे जे लाचार जाहले रे,
दलाल समाजाचे तिथे हजार जाहले रे..
सावधान व्हा गड्यांनो सावधान व्हा रे,
विषारी नागं ठेचण्या हाती संविधान घ्या रे..
आपले कोण परके कोण कळेना कुणाला रे,
घात तिथेच करती कसे कळेना मनाला रे..
सावधान व्हा गड्यांनो सावधान व्हा रे,
विषारी नागं ठेचण्या हाती संविधान घ्या रे..
विझवु चला सारे आज स्वार्थाच्या चुली रे,
सुरक्षित ठेवण्या आमुच्याच त्या मुली रे..
सावधान व्हा गड्यांनो सावधान व्हा रे,
विषारी नागं ठेचण्या हाती संविधान घ्या रे..
मनसुभे मनुचे आज इथे सुरक्षित जाहले रे,
लुटण्या अब्रु आईची आरक्षित जाहले रे..
सावधान व्हा गड्यांनो सावधान व्हा रे,
विषारी नागं ठेचण्या हाती संविधान घ्या रे..
उध्वस्त करण्या आयुष्य हे काळ डागलाय रे,
लढण्या अंधा-या आयुष्याशी सुर्य जागलाय रे..
सावधान व्हा गड्यांनो सावधान व्हा रे,
विषारी नागं ठेचण्या हाती संविधान घ्या रे..
विकृत धर्माधांने काल मेंदुच चोरला रे,
त्यासाठीच बुध्द भिमाने काळजात कोरला रे..
सावधान व्हा गड्यांनो सावधान व्हा रे,
विषारी नागं ठेचण्या हाती संविधान घ्या रे..
*विकास साळवे,पुणे*
*+919822559924...✍*

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...