Friday, 8 February 2019

वंचित वडार समजला प्रकाश आंबेडकरच न्याय देऊ शकतात!
- प्रा.प्रमोद भुंबे.
वडार समाज हा स्वातंत्र्याचा 70वर्षा नंतरही समाजाच्या मुख्य प्रवाहात आलेला नाही. भटक्या विमुक्त जमाती पैकी असणारा हा समाज अत्यंत मागासलले जीवन जगताना दिसून येतो. प्राचीन कळात निर्माण केलेले गड किल्ले , हिन्दु,जैन ,बौद्ध यांच्या लेण्याचे कमे याच वडार समजणे केल्याचे काही इतिहासकार संगतात. कायद्याने गुन्हेगरना खाडी फोडण्याची सजा मिळते असे सांगितले  जाते पण कसलाही गुन्हा न करता या समजला जन्मजात खडी फोडण्याची सजा भोगावी लगते.
       कॉंग्रेस , भाजप, राष्ट्रवादी किवा अन्य कोणताही पक्ष या समजला न्याय देऊ शकला नाही. राज्य पातळीवर लिडरशिप उभी करु शकला नाही. समाजाची महाराष्ट्रातील संख्या कमी असल्याने मतदार म्हणुनही त्यना ग्राह्य धरले जात नाही. 1991च्या रिपोर्ट  नुसार त्यांची संख्या 4.35लाख एवढी आहे . ती अता किमान तिप्पट वाढली असेल. पण चांगली लिडरशिप उभी न राहिल्याने अजुनही सामजिक , आर्थिक आणि शैक्षणिक बाबतीत इतरां पेक्षा कोसो मैल मागे आहे. राजकारणात या समाजाची बाजू मांडणारा कोणीच नसल्याने आजपर्यंत साधी दखलही कोनी घेतली नाही. या समाजातील व्यसनाधिनता ,बेरोजगारी , पराकोटीचे दारिद्र्य ही मुळ समस्या आहे. शिक्षणाची परस्थीती ही तशीच आहे. बोटावर मोजण्या एवढे लोक उच्चशिक्षण घेतलेले अढळतील.
         इतिहासात मोठे राजवाड्यांचे, लेण्याचे उत्कृष्ठ काम करणार्या वडार समजला अता केवळ दगडच्या खानित, रस्त्यावर खडी फोडणे , बिगारी काम करावे लगते. ज्यांच्या पिढ्यांनी एतिहसिक वारसे उभे केले त्यांच्या त्याना आज आपली कला जोपसतना मोठी कसरत करावी लगते. आजही आनेक वडार अतिशय सुबक मुर्त्या घडवतात . पण आधुनीक प्रशिक्षण नसल्याने ती कला फक्त रस्त्याच्या कडेला उघड्या जागेवर आपले भविष्य (मुले )धुळीत माखताना दिसतात.
      या समजला गरज आहे ती चांगल्या नेतृत्वाची जी त्यांच्या वेदना समजून घेईल आणि संधीची दारे खुली करेल. अशा समाजाच्या भावना समजून घेण्याची आणि न्याय देण्याची भुमिका फक्त प्रकाश आंबेडकर च घेऊ शकतात. अकोला जिल्ह्यात लोकशाहीच्या    समजिकरणचा जो प्रयोग प्रकाश आंबेडकर यांनी राबवला त्यात कविताताई ढाळे या पथर्वट वडार समाजाच्या स्त्री ला पंचायत समिती मतदार संघात केवल 100मते असताना निवडून आणले आणि पंचायत समितीचे उपसभापती केले. हाच विचार घेऊन वंचित समूहाला लोकसभा आणि विधानसभेत पाठवण्याची तयारी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यानी केली आहे.
         आजच्या परस्थितीत वडार समाजातील अनेक तरुणाकडे शिल्पकलेसारखी कला आहे पण ती चांगल्या प्रशिक्षणा अभावी व आधुनीक तंत्रज्ञान अभावी ती दबून गेली आहे. जर ते प्रशिक्षण दिले गेले तर अनेकाना चांगला रोजगार मिळू शकतो. त्याच बरोबर मोफत शिक्षण, वेळचे वेळी शिष्यवृत्ती, उद्योग धंद्यासाठी कर्ज मिळायला सुरुवात झाल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढून ते समाजाच्या मुख्यप्रवहत येतील.
       गेल्या 70वर्षाचा विचार केल्यास हे केवळ  प्रकाश आंबेडकरच करु शकतात.

'वंचित बहुजनांच्या विकासासाठी,वंचित बहुजन आघाडी'

'विकासा ची नवी दिशा,प्रकाश आंबेडकर एकच आशा'

प्रा. प्रमोद भुंबे
फुले आंबेडकर विद्वत सभा,धुळे.

Thursday, 31 January 2019

कॉंग्रेस पक्षाने आपली ताकद जोखावी...!

कॉंग्रेस पक्षाने आपली ताकद जोखावी...!
- भास्कर भोजने.

        कॉंग्रेस पक्षाला आम्ही सत्ताधारी आहोत,प्रस्थापित आहोत या प्रतिमेच्या बाहेर अजून निघता आले नाही...!
    कॉंग्रेस पक्ष अजुनही स्वत:ला देशातील सर्वात मोठा आणि प्रस्थापित पक्ष समजतं आहे...!
    कॉंग्रेस पक्षाने या भ्रमातुन लवकर बाहेर पडावे,नाहीतर कॉंग्रेस पक्ष हा लवकरच संपेल यात तिळमात्र शंका नाही...!
       कॉंग्रेस पक्षाचा जो मुळ जनाधार होता,तो या देशातील दलित आणि मुस्लिम...!
   दलितांची १३ टक्के आणि मुस्लिम समाजाची १६ टक्के मिळून एकूण २९ टक्के बेस तयार असायचा त्या २९ टक्के मतांना प्रत्येक मोठ्या जातीच्या उमेदवारा सोबतं जोडून कॉंग्रेस पक्ष सत्तेत जायचा...!
    मोठ्या जातीतील काही घराणे तयार करुन कॉंग्रेस पक्षाने जातियवाद आणि घराणेशाही दोन्ही पोसले आणि आपल्या सत्तेची गणितं मांडली...!
    गेली ६८ वर्षे भारतीय जनतेने कॉंग्रेस पक्षाच्या या नितीचा अनुभव घेतला आणि दलित, मुस्लिम हा मुळ जनाधार कॉंग्रेस पक्षाकडुन निघून गेला हे वास्तव आहे...!
   गरीबी हटाव या ना-यावर दलितांना फसविले गेले हे दलित समुहाला कळुन चुकले आहे...!
    बाबरी मशीद प्रकरणात आणि सच्चर समितीचा अहवाल यांनी मुस्लिम समाजाचे डोळे उघडले आणि त्यांनीही कॉंग्रेस पक्षाकडे पाठ फिरविली हे वास्तव आहे...!
    कॉंग्रेस पक्षांकडील दलित, मुस्लिम हा मुळ जनाधार संपला...!
   ज्या मोठ्या जातीच्या आधारावर घराणेशाही पोसली होती,तोच प्रयोग इतर पक्षांनी सुरू केला आहे,उदा.. शिवसेना आणि भाजप मध्येही घराणेशाही निर्माण झाली आहे...!
     त्यामुळे राजकीय प्लॅटफाॅर्म वर नवी प्रस्थापित घराणी तयारी झाली आहेत, म्हणूनच कॉंग्रेस पक्षाचा जनाधार आता प्रस्थापित मोठ्या जातीतही राहिला नाही...!
     एकंदरीत त्याचाच परिणाम म्हणून देशात ५४५ पैकी कॉंग्रेस पक्ष केवळ ४४ या सर्वात निच्चांकी सदस्य संख्येवर पोहचला आहे...!
      कॉंग्रेस पक्ष देशात विरोधी पक्ष म्हणूनही आपली पतं कायम राखू शकला नाही हे वास्तव आहे...!
      महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षाचे ४८ पैकी केवळ २खासदार आहेत...!
   म्हणजे कॉंग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील आपला जनाधार गमावलेला आहे,तरीही कॉंग्रेस पक्ष इतर सेक्युलर किंवा समविचारी पक्षांशी युती किंवा आघाडी करतांना इतरांना कमी लेखुन एक जागा देतो,दोन जागा देतो अशी मग्रुरीची भाषा वापरतो आहे हा कॉंग्रेसचा अहंकार कॉंग्रेस पक्षाला संपवणारं यात शंकाच नाही...!
      मित्र पक्षांना विश्वासात न घेता केवळ कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपसात बसुन जागा वाटप करतात आणि ,राजू शेट्टी यांना एक जागा सोडली,शेकाप ला एक जागा दिली,अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी सोडली अशी सरंजामी भाषा बोलतं आहेत,ही नशा,हा तोरा,हा अहंकार कॉंग्रेस पक्षाने त्यागला पाहिजे,नाहीतर जनता शिक्षित झाली आहे,तुमची घराणेशाही आता सामान्य माणसाला पसंत नाही...!
   तुमचे जातदांडगे उमेदवार छोटया छोटया जातीच्या ओबीसी बांधवांना मान्य नाहीत, तुमचं फसवं धोरण पुन्हा पुन्हा जनता स्विकारायला तयार नाही...!
    जो हौद से गयी ,वो बुंद से  आनेवाली नहीं....!
    कॉंग्रेस पक्षाने आपली सेक्युलर ही इमेज राखायची असेल तर इतर समविचारी पक्षांना सन्मानाने सोबतं घेऊन धर्मवादी, असहिष्णू आणि मनुवादी पक्षांना रोखण्यासाठी आता समंजस भुमिका घेऊन आघाडी करावी,भ्रमातुन बाहेर यावे.नाहीतर तुमचा जनाधार संपलेला आहेचं,२०१९ मध्ये कॉंग्रेस मुक्त भारत होईल आणि त्यासाठी कॉंग्रेस पक्षाचं धोरणचं कारणीभूत असेल...!
      कॉंग्रेस पक्षाला पर्याय म्हणून भाजप आणि भाजप पक्षाला पर्याय म्हणून कॉंग्रेस ही द्विपक्षीय देवाणघेवाण सुरु राहिलं या भ्रमातुन कॉंग्रेस पक्षाने बाहेर पडले पाहिजे...!
    कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाचं धोरण एकचं किंवा सारखेचं आहे अशी धारणा असलेली नवी पिढी तयार झाली आहे, त्यामुळे भाजपला घालवण्यासाठी म्हणून जनता आता आम्हालाचं निवडून देईल या भ्रमातून कॉंग्रेस पक्षाने बाहेर पडावे,नाहीतर जनता कॉंग्रेस पक्षाला आता पुर्णविराम देण्याच्या मनस्थितीत आली आहे हेही लक्षात घेतले पाहिजे...!
      जयभीम.
@.. भास्कर भोजने.

Monday, 28 January 2019

दांभिक मीडिया - जनतेची हितशत्रुच...

दांभिक मीडिया - जनतेची हितशत्रुच...
- मनोज नागोराव काळे ठाणे.
दि.२७ जानेवारी २०१९ रोजी ठाणे जिल्ह्यातील कल्याण या ऐतिहासिक शहरात पुन्हा नवा इतिहास घडला, वंचित बहुजन आघाडी च्या "सत्ता बदलाची नांदी" या महासभेला कल्याण, भिवंडी व ठाणे परिसरातील सर्व बहुजन, आदिवासी, एस सी, एस टी, मुस्लिम, कोळी व इतर वंचित समाज घटकांनी अतिषय उत्साहाने व उमेदीने उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. सर्वांनी एकत्र येऊन आजवरच्या सर्व सभांच्या उपस्थितीचा उंच्चांक मोडीत काढला. आणि हे पेड व भांडवलदारांच्या मीडिया चैनल्स हा पहावलेले दिसत नाही, सर्व टिव्ही चैनल्स नी अतिषय खोट्या व बेजबाबदार बातम्यांचे प्रसारन सुरु केले व उपेक्षित, वंचित समाजाच्या विरोधात आपन कसे आहोत हेच जुनकाही त्यांनी सिद्ध केले.

वंचित बहुजन आघाडीच्या या क्रांतीकारी सभेत आद.असदुद्दीन ओवैसी साहेबांनी केलेल्या भाषनातील एक ओळ पकडुन त्याचे चुकीच्या पद्धतीने प्रसारन करुन समाजात असंतोष पसरावा व समाजात तेढ निर्माम व्हावी हा मीडीयाचा अजेंडा उघडपने जानवत आहे.
आद. ओवेसी साहेबांनी भारतीय संविधानाने या देशातील सर्व नागरिकांना एका समान पातळीवर आनले आहे, आता या देशात कुनी कुनापोक्षा मोठा नाही तर सर्व समान आहोत या आशयाने त्यांनी थोडे उलगडुन सांगितले की कोणी ब्राह्मन असेल तर तो प्रकाश आंबेडकरांपेक्षा मोठा नाही किंवा कुनी मराठा असेल तर तो मुस्लिमांपेक्षा मोठा नाही, ओवेसी साहेबांनी जनतेला फक्त आपन सर्व समान आहोत असे न सांगता थोडे खोलात जाऊन आपन जातवार धर्मवार भेदभाव करत असतो त्यामुळे त्या जाती धर्मांना आपन कुनीही एकमेकांपेक्षा मोठे नाही तर आपन सर्व समान आहोत असा संदेश दिला, पन मीडिया ला तर अगदी सोपे करुन सांगितलेला संदेशही कळत नसेल तर त्यांनी टिव्ही चैनल्स बंद करुन भंगार गोळा करायचे काम करावे.
टिव्ही मी़डिया ला पुर्ण जाणिव आहे की कल्याण भिवंडी हा विभाग किती संवेदनशील आहे तरी अशा एका राजकीय नेत्याच्या भाषनाला तोडुन मोडुन मुद्दाम समाजात तेढ निर्माण करुन कोणत्या राजकीय पक्षाला फायदा पोचवायचा आहे?
दंगली वर कोन कोनत्या पक्षाचे राजकारण चालते? मीडियाला दलालीच करायची आहे तर त्यांनी पत्रकारीता या लोकशाहीच्या चौथ्या खांबाला बदनाम न करता खुलेआम दलाली करावी त्यांना कुनी रोखले आहे?
दोशात कोनताच समाज लहान नाही किंवा मोठा नाही हे तर भारतीय संविधानानेच दिलेला समतेचा नियम आहे, आणि काल ज्या वंचित बहुजन आघाडी ची सभा होती त्या सभेचे ब्रिदवाक्यच आहे की " माझ्या वरती कुनी नाही, माझ्या खाली कुनी नाही, आम्ही सर्व समान आहोत"
त्यामुळे समतेच्या संदेशाचा द्वेश वाढविण्यासाठी उपोयग करुन घेण्याचे घानेरडे काम मीडियाने बंद करावे, मीडिया ने समाजहितासाठी, लोकशाही च्या संरक्षणासाठी, जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठवावा, समाज रक्षकांना बदनाम करने मीडियाचे काम नाही याचे आत्मपरिक्षण करावे.
दुसरा मुद्धा आद ओवेसी साहेबांनी जनतेला एक प्रश्न केला की इतका अन्याय होतोय, इतका अत्याचार होतोय पन तुम्ही गप्प का रहाता, तुम्ही ज्या भीमा कोरेगावच्या शुर महारांचे वंशज आहात त्यांना तरी आठवा, की त्या महार सैनिकांनी पेशव्यांना हरवले नविहते का? असा तो प्रश्न त्यांनी जनतेला विचारला..तो प्रश्न हा गाफिल व झोपेत असलेल्या जनतेला हलवुन जागे करण्यासारखा प्रभावी होता, अस्मिता जागी करणारा होता, नव पेशव्या विरुद्ध लढायची प्रेरना देणारा तो प्रश्न होता पन भांडवलदारांच्या मीडियाने बिनधास्तपने अशी खोटी बातमी फिरवली की ओवेसी म्हणाले की महारांनी पेशव्यांना हरवले नव्हते.
त्यामुळे मीडिया हा प्रस्थापित धनदांडग्याच्या हातचे बाहुले आहे स्पष्ट झाले,
जनतेने मीडिया बातम्या देते हा भ्रम डोक्यातुन काढावा, आता पेड मीडिया सुद्धा अफवा पसरवण्याचे काम करते हे वरील दोन मुद्दयावरुन सिद्ध झालेले आहे, त्यामुळे ज्या समाजाच्या हितचिंतकांना कायद्याचे ज्ञान आहे त्यांनी या मीडियावर दंगलीला प्रोत्साहन देने, समाजात तेढ निर्माण करणे, अफवा पसरवने अशा प्रकारच्या केसेस या मीडिया चैनल्स विरुद्ध दाखल करायला हरकत नसावी.
वंचित बहुजन आघाडी ही नवपेशवाई, नवमोघलाई या दोंघाविरुद्घ नव शिवशाही सारखी उभी आहे याचे भान ठेवावे व वंचित बहुजन आघाडी च्या समाजहिताच्या भुमिकांचा सतत प्रचार करुन पेड मीडियाचा खोटा प्रचार हानुन पाडावा.
- मनोज काळे 8169291009

Wednesday, 23 January 2019

वंचितांनो कॉर्नर मिटिंग हीच आपली शक्ती - सुमित वासनिक

वंचितांनो कॉर्नर मिटिंग हीच आपली शक्ती
- सुमित वासनिक

आंबेडकरी चळवळ ही संसाधन विहिन चळवळ आहे, त्याचप्रमाणे ज्या वंचित समूहाच्या कल्याणाची लढाई ही चळवळ  लढते आहे तो वंचित समूह सुद्धा संसाधन विहिन समूह आहे. निवडणुका जवळ आलेल्या आहेत एकीकडे वंचितांना डावलणारे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेने सारखे पैसा आणि प्रसिद्धी माध्यमांनी अतिशय बळकट असलेले प्रस्थापित पक्ष आहेत. तर दुसरीकडे पैसा नसलेले आणि प्रसिद्धी माध्यमं विरोधात असलेले आपण वंचित समूह आहोत.
संसाधनांनी परीपूर्ण असलेल्या या प्रस्थापितांना पराजित करून आपल्याला आपल्यासाठी संसदेची दारे उघडायची आहेत. मार्ग कठीण आहे पण अशक्य नाही. ऍड.बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात आपण विना पैसा आणि प्रसिद्धी माध्यमांचा विरोध असूनही  लाखोंच्या सभा प्रत्येक जिल्ह्यात घेऊन दाखवत आहोत, हीच आपली शक्ती आहे. ही आपल्या एकीची शक्तीच या धनदांडग्यांना भुईसपाट करण्यासाठी पुरेशी आहे. आपल्या या अफाट जनशक्तीला आपण मतपेटित पोहचविण्यात यशस्वी झालो तर आपल्याला संसदेत जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही हे आपण ओळखले पाहिजे.
जे आपले समर्थक आहेत, आपल्या समविचारी आहेत , वंचित आहेत त्यांना मतदानासाठी तयार करायच्या कामाला आपण सर्वांनी आता लागले पाहिजे. मतदार बनविणे, मतदानासाठी लोकांना तयार करणे यासाठी अनेक मार्गांचा उपयोग आपल्याला करावा लागेल. या अनेक मार्गांपैकी एक मार्ग म्हणजे प्रत्येक वाडी, वस्ती, आणि गावखेड्यात काँर्नर मिटिंग, छोट्या सभा घेणे हे होय.
कॉर्नर मिटिंग, छोट्या सभा आयोजित करा या सभांच्या माध्यमातून जनतेला सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबद्दल अवगत करत रहा. जनतेला मतदानाचे महत्व समजावून सांगा, मतदार तयार करा. निवडणूक काळात प्रस्थापित पक्ष पैश्याच्या आणि प्रसिद्धी माध्यमांच्या जोरावर ऍड.बाळासाहेब आंबेडकरांच्या बद्दल आणि आपल्या  उमेदवाराबद्दल अफवा पसरवीतात अश्या अफवांपासून सावध राहण्यासाठी जनतेला या सभांच्या माध्यमातून तयार करा. भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडिबद्दल होत असलेला अपप्रचार खोडुन काढा. निवडणुकीच्या दिवशी लोकं स्वयंस्फूर्तीने आपले मत वंचित बहुजन आघाडिला देतील असे वातावरण या कॉर्नर मिटिंग आणि छोट्या सभांच्या माध्यमातून तयार करा. प्रत्येक 10-15 दिवसांच्या नंतर अश्या मिटिंग ,सभा आयोजित करा. या कॉर्नर मिटिंग, छोट्या सभा म्हणजे मतदारांपर्यंत पोहचण्याचा सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय होय हे लक्षात ठेवा.
मित्रांनो आपल्या कडे कुठलेच संसाधन नाही पण आपल्या जवळ जनशक्ती आहे. या जनशक्तीच्या जोरावरच आपल्याला बदल घडवायचा आहे त्यामुळे आपणच जबाबदारी उचलली पाहिजे आणि आहेत त्या मार्गांचा उपयोग करून मतदार जागृती केली पाहिजे, वंचित बहुजन आघाडिचा मतदार तयार केला पाहिजे. आपण हे करण्यात यशस्वी झालोतर येणारा काळ आपला असेल , समतेचा असेल याची जाणीव असू द्या.

Monday, 21 January 2019

राजकारणातील नैतिकता आणि लाचारी....!

राजकारणातील नैतिकता आणि लाचारी....!
: भास्कर भोजने.
       डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांसदीय लोकशाही ही कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडली आहे...!
   कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेत जे जे उपेक्षित आहेत,संधीवंचित आहेत,त्यांना संधी निर्माण करुन देऊन समग्र समाजाचा " समतेने " विकास साधणे ही भुमिका घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली आणि आपली सांसदीय लोकशाही ऊभी केली...!
    आपल्या देशातील वर्णवर्चस्ववादी मंडळीने या समतेच्या तत्वाला छेद देण्यासाठी ज्यांना संधी द्यायची आहे,ज्यांना आरक्षण द्यायचे आहे असे उपेक्षित घटकामध्ये लाचार व्यक्ती शोधून त्यांना उपेक्षित घटकांचे नेते म्हणून प्रपोज केले आणि उपेक्षितांच्या हक्क आणि अधिकाराला शह दिला ...!
    उपेक्षित समाज हा उपेक्षितचं राहिलं,त्याचा प्रतिनिधी हा आपला " गुलाम " किंवा सांगकाम्या किंवा पदाचा लालची किंवा " दलाल "प्रवृत्तीचा असेल अशी भुमिका घेऊन मनुवादी पक्षांनी गेली सत्तर वर्षे आपले राजकारण आणि पक्षीय धोरण राबविले आहे...!
    भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या सत्ताधारी पक्षाच्या तिकिटावर निवडून येणारे राखीव जागेवरील खासदार बघा त्यांचे काम आणि विचार बघा चटकण लक्षात येते त्यांनी एस.सी.,एस.टी, ओबीसी बांधवांसाठी काय केले त्याचा आराखडा बघा...!
    त्यांची लायकी बघा,पुर्वी बुलढाणा मतदारसंघ राखीव होता तेव्हा भाजप, शिवसेना आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जे होते तेच उमेदवार आज बुलढाणा मतदारसंघ खुला झाला तेव्हा नाहीत,तर त्या राखीव जागेवरुन निवडून येणारे, आनंदराव अडसूळ, मुकुल वासनिक, किंवा शिवसेनेचे काळे आता कुठे आहेत...??
   त्यांची लायकी केवळ राखीव जागेवर उभे राहण्याऐवढी आणि गुलामी करण्याऐवढीचं आहे.ते नेते होऊ शकत नाहीत...!
   अंगी कुठलीही लायकी नसतांना इथल्या प्रस्थापित पक्षांनी काही बुजगावण्यांना आंबेडकरी नेते म्हणून प्रपोज केले आहे त्यांची लाचारी आणि दलाली आता उघडं होऊ लागली आहे...!
    आजचा काळ हा अतिशय टोकदार आणि कठीण काळ म्हणून इथला विचारवंत मांडतं आला आहे...!
आजचा काळ हा आणिबाणीचा काळ आहे अशी जनभावना तयार झाली आहे,त्याचे कारण देशात घडणाऱ्या घडामोडी जनता ऊघड्या डोळ्याने बघते आहे...!
   अशा आणिबाणीच्या काळात लोकशाही आणि राज्यघटना धोक्यात आली असतांना,कोणताही नेता हा राजकारण करतांना अतिशय दक्षतेने आणि नैतिक मुल्यांवर आधारीत राजकारण करेल,तरच तो नेता काळाच्या कसोटीवर तगेल अन्यथा जनता आता लबाडांना हद्दपार करील यात शंकाच नाही...!
    अशा टोकदार वळणावर ए आय एम आय एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जनाब असोद्ऊद्दीन ओवेशी साहेब यांनी युतीच्या संदर्भात एक निवेदन नांदेड येथील जाहीर सभेत केले की,जर एम आय एम पक्षाची कॉंग्रेस पक्षाला अडचड वाटतं असेल तर, कॉंग्रेस पक्षाने अॅड बाळासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या मानसन्मानातील जागा द्याव्यात मला एकाही जागेची गरज नाही,मी कोणतीही जागा लढविणार नाही मात्र, दलित बहुजन समाजाला सत्तेतील वाटा मिळावा म्हणून तुमच्या सोबतं राहिलं...!
    ही भाषा,हा त्याग,हा दिलेरपणा आणि ही राजकीय नैतिकता एका पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी वापरली आहे...!
  ए आय एम आय एम पक्षाचे तेलंगणा मध्ये खासदार, सात आमदार आणि महाराष्ट्रात दोन आमदार आहेत, त्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष ही नैतिकता दाखवितो आहे त्याचे कारण आहे आजची देशातील परिस्थिती...!
    परंतु ज्यांना मनुवादी पक्षाच्या मंडळीने नेते म्हणून प्रपोज केले आहे आणि जे स्वत:ला रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणवून घेतात, परंतु त्यांचा कोणता मतदारसंघ आहे हे त्यांनाही माहित नाही त्या नेत्यांना नैतिकता म्हणजे काय हे माहितच नाही...!
त्यांना त्याग कशासोबतं खातात तेही माहित नाही...!
   आजही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नांवाने राजकीय दुकानदारी चालविणारे आंबेडकरी जनतेला फसवू पाहतं आहेत, परंतु आता ही लबाडी किंवा दलाली तुमची तुम्हाला लखलाभ ,जनता तुम्हाला भिकं घालणार नाही...!
  तुमची लाचारी जनतेच्या लक्षात आली आहे...!
     आता जनता कॉंग्रेस पक्षाला सेक्युलर पक्ष म्हणून जाब विचारल्याशिवाय मतं देणारं नाही, कॉंग्रेस पक्षाने आपलं सेक्युलॅरिझम सिद्ध केले पाहिजे...!
   वंचितांसाठी काय देता ते कॉंग्रेस पक्षाने सांगितले पाहिजे,तुमची घराणेशाही आता कुणीही डोक्यावर घेऊन नाचणारं नाही...!
   बुरखाधारी आंबेडकरी नेते, किंवा लाचार,दलाल नेते जनता सहन करणार नाही हेही बुजगावण्यांनी लक्षात घ्यावे,नाहिपेक्षा या वंचितांच्या लाटेत तुम्ही कालबाह्य होऊन, संपणार हे लक्षात घ्या...!
जयभीम.
@.भास्कर भोजने.

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...