Friday, 20 September 2019

"वंचित बहुजन आघाडीला आता रोखणे शक्य नाही.."
- संतोष आगबोटे, नांदेड

'वंचित बहुजन आघाडी' प्रचंड वेगाने सर्व पक्षांना ओव्हरटेक करत सत्तेच्या दिशेने निघालीय. आम्हास रोखण्याची कोणत्याही पक्षात धमक नाही. त्याच कारण 'वंचित बहुजन आघाडी' Intellectual honesty चं राजकारण इथल्या व्यवस्थेत उभं करू पाहात आहे. त्यासाठी त्या प्रकारचे जाणीवपूर्वक प्रयत्नही मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत.

आजपर्यंतच्या एकाही राजकीय पक्षाने लोकांच्या जीवनात अमुलाग्र परिवर्तन करण्याच्या उद्देशाने प्रामाणिक प्रयत्न केलेला दिसत नाही. मतदारांना साधन म्हणूनच वापरण्यावर या पक्षांचा भर होता.आहे.

इथल्या राजकीय पक्षांनी मानवी विकासाची संकल्पनाच पुरती बदलवून टाकली. संकुचित केली. उच्च मानवी मूल्यांच्या संवर्धन त्याच्या उत्थानासाठी नैतिक व्यवस्था निर्माण करण्याचा विचार कुणी मांडला नाही. नैतिक मूल्यांची जोपासना करणार्या परिवर्तनवादी चळवळी इथं वाढणार नाहीत. यासाठी बहुतांशी राजकीय पक्षांनी दक्षता घेतली. त्या वारंवार मोडीत काढण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला. इथं विशिष्ट विचारांभोवती राजकारण फिरवल्या जातं.

घराणेशाहीने सर्व राजकीय पक्षात आपले स्थान निश्चित केलेले आहे.

व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याकडून इथं प्रयत्न होताना दिसत नाहीत.

शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई, गरीबी, खाजगीकरण, यावर दुरगामी आणि परिणामकारक धोरण निश्चितीचा अभाव राहिलेला आहे मग ते सरकार कोणाचेही असो.

व्यापक दूरदृष्टीचा लोकहितदक्ष फ्युचर प्लान सरकार
कडे अथवा कोणत्याही राजकीय पक्षाकडे असेल अस मला वाटत नाही.

सत्ता तुमच्या ताब्यात का द्यायची याचं यथोचित उत्तर एकही राजकीय पक्ष व्यवस्थितरीत्या देऊ शकणार नाही..

परंतु या सर्वांना एक राजकीय पक्ष अपवाद आहे तो म्हणजे 'वंचित बहुजन आघाडी' होय.

एक नियोजनबद्ध प्लाॅन-आराखडा घेऊन
वेगवान गतीने 'वंचित बहुजन आघाडी' ची
सत्तेच्या दिशेने सुसाट घोडदौड चालु आहे.

व्यवस्थेने सर्वच बाबतीत वर्षानुवर्षे 'वंचित' ठेवलेल्या
सर्व घटकांना एकत्रित करणं, एका सूत्रात बांधणं हेच मुळी मोठं आव्हान होतं. ते जिकिरीचे आव्हान बाळासाहेब आंबेडकर यांनी यशस्वीपणे पेललंय.

आजघडीला मृतप्राय झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस वा काँग्रेसमध्ये लढण्याचे बळ राहिलेले नाही. सर्वार्थाने ते खचलेले आहेत. ते खेळाआधीच मैदान सोडण्याच्या तयारीला लागलेत. सेना- भाजपकडे गाय, राममंदिर, धर्म, पाकिस्तान, कलम 370, याच्या पलिकडे मुद्दे राहिलेले नाहीत.

दिलेल्या एकाही आश्वासनांची पूर्तता ते करू शकलेले नाहीत. याऊलट नोटबंदी, जिएसटी, यासारख्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होणार्या बाबी त्यांनी घडवून आणल्या.

परके असणार्या इंग्रजांना देशाचं जितकं वाटोळे करता आले नाही ते या सरकारने करून दाखवले.

वरून विविधतेतही एकतेने नांदणार्या देशातील वेगवेगळ्या समुहांत असुरक्षिततेचं-अविश्वास- भीती संशयाचे वातावरण निर्माण करण्याचं श्रेय या विद्यमान सरकारलाचं जातं. सार्वभौम देशाला विघटीत करायला निघालेले हे सरकार आहे.

विद्यार्थी, शेतकरी, मजूर, शेत मजूर, कामगार, नोकरदार वर्ग, व्यापारी यासह कोणता वर्ग यासरकारच्या धोरणामुळे त्रस्त नाही ते सांगा !

परंतु वंचित बहुजन आघाडीने सर्व वर्गांच्या कल्याणाचा बारकाईने अभ्यास करून अजेंडा बनवलेला आहे.

'संविधानाचे धोरण हेच वंचित बहुजन आघाडीचे तोरण असेल..'

EVM च्या भरवशावर भाजप विसंबून आहे. बॅलेट पेपर वर निवडणूक होऊद्या भाजप हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही.

'वंचित बहुजन आघाडी'ला आता कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. अगदी सत्ताधारी धर्मांध सेना-भाजपही नाही.  पण अट एकच लढाई ही प्रामाणिकपणे व्हावी..

-संतोष आगबोटे, नांदेड.
संपर्क- 9527626968

Friday, 2 August 2019

मनसे राष्ट्रवादीचा मोर्चा म्हणजे "सोन्याचा खंजीर"
- मनोज नागोराव काळे







काल दि.२ ऑगस्ट २०१९,रोजी मनसे व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी एका मोर्चाची घोषना केली आहे, तो मोर्चा इविएम मशीन विरुद्ध असल्याचे त्यांचे म्हणने आहे. पण हा मोर्चा म्हणजे सोन्याचा खंजीर आहे व तो ज्यांना फक्त सोन्याचा आहे म्हणुन छातीत खुपसुन घ्यावा वाटतोय त्यांनी खुशाल खुपसुन घ्यावे, राजकीय आकलनशक्तीचा अभाव व वैचारिक दारिद्र ज्यांच्या डोक्यात भरलेले आहे तेच काही लोक या मोर्चाच्या ढोंगाला बळी पडुन त्या मोर्चात सामिल होतील असा मला ठाम विश्वास आहे.

या मोर्चाला सोन्याचा खंजीर बोलन्यामागे त्या मोर्चाचे म्होरके कोन आहेत व त्यांची आजवरच्या राजकारणातील भुमिका काय होत्या हे पाहिले की प्रत्येकाला या मोर्चामागील ढोंग कळायला वेळ लागनार नाही.

EVM मशीन चा मुद्दा राष्ट्रवादी कॉंग्रेस व मनसे सारख्या जातीवादी पक्षांना अचानक महत्वाचा वाटु लागला याचे कारणे उघड उघड आहेत

१) वंचित बहुजन आघाडी ने इविएम मशीन विरुद्ध पुकारलेला निर्धारपुर्वक न्यायालयीन लढा.
२) वंचित बहुजन आघाडी ची वाढती लोकप्रियता
३) मनसेच्या नेत्यांचे सेनेत व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे भाजप प्रवेश
४) अॅड. प्रकाश आंबेडकरांभोवती एकवटलेला बहुजन समाज
५) धनगर, मुस्लिम, ओबीसी, भटके विमुक्त, आदिवासी, मातंग समाजाची लोकसंख्या व वंचित बहुजन आघाडी मधुन या सर्व समाजांना मिळत असलेले प्रतिनिधित्व.
६) पुरोगामी विचारांनी प्रस्थापितांना चारलेली राजकीय धुळ
७) बैलेट पेपर वर निवडणुका झाल्यास त्याचे या लढाच्या मुळ नायक असलेल्या आंबेडकरांना श्रेय मिळु न देण्याची कपटी भावना
८) मनसे व राष्ट्रवादी कॉंग्रेस हे लोकशाहीवादी आहेत असा भास निर्माण करण्याचा प्रयत्न.
९)  वंचित बहुजन आघाडी काबीज करत असलेली राजकीय स्पेस ब्रेक करण्याचे षडयंत्र
१०) मोदी विरोधकांना वंचित बहुजन आघाडी शिवाय इतरही उच्चवर्णिय पक्षाचे पर्याय आहेत हे निम जातीयवादी लोकांवर ठसवण्याचे प्रयत्न.

माझ्या जागृत बहुजन मतदारांनो,
       वरील काही प्रमुख कारणांमुळे मनसे व राष्ट्रवादी कॉंग्रेसने इविएम विरुद्ध मोर्चा काढत असल्याचे ढोंग करताना आपल्याला दिसत आहेत, थोडा विचार करुन पहा कि आजवर सतत उघड जातीयवादी भुमिका घेणारे राज ठाकरे, जे  कायम हुकुमशाही च्या समर्थक व लोकशाहीचे विरोधक असलेल्या बाळ ठाकरेंना गुरु किंवा सर्वस्व मानतात, त्यांना अचानक लोकशाहीचा पुळका कसा काय आला? ,राज ठाकरे लोकशाही मानतात तर मग स्वतः निवडणुका का लढत नाहीत? तेही सोडा, जो माणुस चैत्यभुमीपासुन हाकेच्या अंतरावर रहात असुन जन्मात कधी  चैत्यभुमीवर दर्शनाला गेला नाही, कारण त्यांच्यात ठासुन भरलेला लोकशाही व बाबासाहेबाप्रतीचा त्यांचा द्वेश ते करु देत नाही, हेच लोकशाही समर्थक बनलेले राज ठाकरे ऐट्रोसिटी ऐक्ट रद्द करावा असे बिनधास्त बोलतात व तशी मागणी करतात, हेच राज ठाकरे आरक्षण रद्द करावे अशी मागणी करतात व ते आज तुम्हाला लोकशाहीवादी वाटु लागले, हे तुम्हाला पटले तरी कसे? इतकी आपली बुद्धी बालिश बनलिय का? आपन आपलीच नव्याने निर्माण झालेली राजकीय ताकद अशा भामट्यांच्या ढोंगापुढे झुकवणार आहोत का?

आंबेडकरी विचारातुन कोणापुढे लोटांगन न घालता, स्वाभिमानाने सत्ता मिळवता येते हे जेव्हा बाळासाहेब आंबेडकर सिद्ध करुन दाखवत आहेत तेव्हा अनेक जातीवाद्यांना पुतना मावशीचा पान्हा फुटला आहे व त्यांना आता लोकशाही वर जिव जडल्याचा दिखावा करने भाग पडले आहे.

याच मनसे व राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजव व सेनेला सक्षम व अनुभवी उमेदवार सप्लाय केले आहेत, गेल्या महिनाभरात पन्नास एक लोक तिकडे गेलेत व  काही बोटावर मोजन्या इतके लोक यांच्याकडे शिल्लक राहीलेत, आजनर बहुजनांना, आंबेडकरी समाजाला ज्या पक्षांनी वंचित ठेवले त्यांना वंचित बहुजन आघाडीने लाचार स्थितीत आणुन उभे केले असताना या राष्ट्रवादी कॉंग्रेस व मनसे ला भक्कम करण्यासाठी कोण कोण पुढे सरसावले आहेत त्यांची नावे पहा एकदा सुषमा आंधारे, जोगेंद्र कवाडे, सुरेश माने, वामन मेश्राम ( मुलनिवासींचा म्होरक्या). आजवर हे लोक आंबेडकरी राजकारण अपयशी का होते यावरुन प्रकाश आंबेडकरांवर टिका करत होते पन आज प्रकाश आंबेडकरांनी सर्व प्रतिगामींनी गुडघ्यावर आणले असताना हेच बांडगुळ नेते प्रस्थिपित पक्षांची डागडुजी करुन त्यांना पुन्हा सक्षम करण्यासाठी झटताना आपन पहात आहोत व ती गद्दारी करत असताना बहुजनांच्या एकमेव लोकनेते बाळासाहेब आंबेडकरांवर खोटे आरोप करुन त्यांची बदनाम  करण्याचे प्रयत्नही करत आहेत, जनता त्यांच्या खोट्या प्रचारांना आता बळी पडताना दिसत नाही याचे खुप समाधान वाटत आहे.
  काल एका अर्धवटरावाने सोशल मिडीयावर पोस्ट लिहीली की "प्रकाश आंबेडकरींनी या मोर्चाला पाठींबा द्यायला पाहीजे",
 यांना हे माहीत नाही की प्रकाश आंबेडकरांनी इविएम विरुद्ध घंटानाद आंदोलन करुन सर्व महाराष्ट्राच्या प्रशासनाला जागे केले, इविएम काऊंटींग मधील फरक हा विषय न्यायालयिन प्रक्रियेत आणले, दिल्लीत जाऊन निवडणुक आयोगावर दबाव आनला तेव्हा कुठे निवडणुक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन आम्ही काही सांगीतले तर आमच्या जिवाला धोका आहे असे जाहीरपने जगासमोर सांगीतले आहे, त्यामुळे आम्ही वाजवलेल्या घंटानादाने जागे झालेल्यांनी आम्हाला धडे शिकवु नयेत, ज्यांना तो सोन्याचा खंजीर खुपसुन घ्यायचा आहे त्यांनी घ्यावा पन प्रकाश आंबेडकरांना राजकीय सल्ले देण्याआधी जरा अभ्यास करावा. बहुजन समाजाची राजकीय गुलामगीरी संपवणार्या आंबेडकरांसोबत प्रत्येक लोकशाहीवादी समाजघटक जुडतो आहे, प्रत्येक राजकीय पक्षातुन लोकशाहीवादी लोक वंचित बहुजन आघाडीत येत आहेत व हुकुमशाही व घरानेशाहीवाले नेते भाजपात जात आहेत, हकुकुमशाही व लोकशाही या दोन्ही ठिकानी ध्रुवीकरन होत आहे, आता लढाई सरळ व थेट आहे त्यामुळे कोणत्याही अपप्रचाराला बळी पडु नये, ढोंगी व जातीवादी लोकांच्या गोंडस शब्दांना बळी पडुन स्वताचा राजकीय घात करुन घेऊ नये असे मला वाटते.

जय वंचित,  जय संविधान

- मनोज नागोराव काळे  8169291009
____________________________


Friday, 10 May 2019

वंचीतांचा एल्गार महताब होवो...

वंचीतांचा एल्गार महताब होवो...   

-राजेंद्र पातोडे, प्रदेश प्रवक्ता 

गेली अनेक वर्षे  महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर “ अकोला पॅटर्न “ जन्माला घालनारे एड. बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचीत बहुजन आघाडीच्या निम्मीतीने डिप्रेस/ सप्रेस क्लासेसच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत.आज साहेबांचा वाढदिवस आहे. हा दिवस राज्यभरात स्वाभिमान दिन म्हणून साजरा केला जातो.ह्या दिवसाला एड. बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकीय सामाजिक कार्यकर्तृत्वाचा ओझरता आढावा घेणे संयुक्तिक ठरेल.बाळासाहेब आणि त्यांची चळवळ ही प्रबंधाचा विषय आहे, त्यामुळे केलेली मांडणी ओझरती आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे. 


 अशी झाली सुरुवात ... 


 १९८० साली सामाजिक क्षेत्रातून कार्यकर्ता  म्हणून सुरुवात करणा-या बाळासाहेबांचा जन्म १० मे १९५४ चा आहे.त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सेंट सँटेनिस लेंस हायस्कुल मुंबई मध्ये तर उच्च शिक्षण सिद्धार्थ महाविद्यालयात  झाले.आपल्या आजोबांच्या नावावर वारस म्हणून येणा-या नेतेपणाच्या तकलादू बाबी टाळून एक कार्यकर्ता म्हणून मला चळवळ करण्याचा अधिकार आहे, असे ठरवून सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी सुरूवात केली. १९८२ साली मुंबईत बहिष्कृत हितकारीणी सभेच्या सुवर्ण महोत्सव मेळाव्यात त्यांनी सम्यक समाज आंदोलन स्थापन झाल्याची घोषणा केली.बाबासाहेबानी आपल्या राजकीय सामाजिक जीवनाची सुरुवात बहिष्कृत हितकारीणी सभेपासून केली होती.बाळासाहेबांनी बहिष्कृत हितकारीणी सभेच्या सुवर्ण महोत्सव मेळाव्यात आपल्या सामाजिक लढ्याची सुरुवात केली. इतिहासाला कलाटणी देणारा हा दिवस ठरला.


बाबासाहेबांचा शेडूलड कास्ट फेडरेशन पक्ष नुसता दलीतांचा नव्हे तर सर्व भारतीयांचा असावा म्हणून बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली.त्यांचे हयातीत पक्ष स्थापन होऊ शकला नाही.त्यांचे महापरिनिर्वाणा नंतर स्थापन झालेला पक्ष पुन्हा एक जातीय आणि एककल्ली ठरला होता.नेतृत्वाचे वाद, अनेक गटाचा उदय आणि १९७० च्या दशकात उदयास आलेले दलित पँथरचे वादळ १९७७ साली शमले होते.त्यातही १९७७ साली  'भारतीय दलित पँथर' निर्माण झाले.परंतु समाजाला एकसंघ पक्ष नव्हता , नेतृत्व उभे झाले नव्हते.बाळासाहेबांनी सम्यक समाज आंदोलनाचे माध्यमातून २ मार्च १९८३ रोजी नाशिक मधून स्त्रियांचे प्रश्न, भूमिहीन शेतकरी शेतमजुरांच्या साठी मुंबई विधान भवनावर पायी मोर्चा काढला.मराठवाडा विषयापीठाचे नामांतर झाले पाहिजे.वाढत्या महागाईला विरोध, भूमिहीन शेतमजुरांना पडक्या जमिनी देण्यात याव्यात,नवबौद्ध आणि आदिवासींना सवलती देण्यात याव्यात ह्या मोर्च्याच्या मागण्या, दादासाहेब गाईकवाडांच्या भूमिहानाच्या लढ्याची आठवण करून देणारे आंदोलन होते.ह्यातून आंबेडकरी चळवळीने एकजातीय राजकारणातून मुक्त होऊन सर्वसमावेशक प्रश्नावर लढण्याची सुरुवात केली.


शेकाफे व रिपब्लीकन पुढा-यांनी पक्ष आणि स्वतःचे नेतृत्व काँग्रेसच्या दावणीला बांधले होते. त्या मुळे महाराष्ट्रात जातीय अन्याय अत्याचारांनी उचल खाल्ली होती.प्रभावहीन झालेल्या चळवळीला उभारी देण्यासाठी बाळासाईब आंबेडकरांनी  २७ नोव्हेंबर १९८३ रोजी सिद्ध्यर्थ विहार वडाळा येथे काही समविचारी मंडळींना निमंत्रित करून बाबासाहेबांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याचा निर्णयावर सखोल चर्चा केली.आणि ६ मी १९८४ साली पूणे येथील नानापेठेतील अहिल्याश्रम येथे अधिवेशन बोलाविले.ह्याच अधिवेशनात भारतीय रिपब्लिकन पक्ष ह्या राजकीय पक्षाची बांधणी केली.ह्या अधिवेशनाचे वैशिष्टय म्हणजे ह्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान मिनाबाई गायकवाड ह्यांनी भूषविले होते.सम्यक समाज आंदोलन ते भारतीय रिपब्लिकन पक्ष हे आवर्तन पूर्ण झाले होते. 

१९८३ मध्ये त्यांनी शेतक-याचा गायरान जमिनीचा लढा उभा केला.वसंत दादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांनी गायरान जमिनीसाठी मोर्चा काढला.हे मोर्चे आंदोलन सुरु होते, भुमिहीनांचे मोर्चे काढल्याने १४ एप्रिल १९९० साली सुधाकरराव नाईक मंत्री मंडळाने गायरान जमिनीचा शासन निर्णय बाळासाहेबांचे नावाने काढला आणि गायरान जमिनी मिळण्याचा प्रश्न मार्गी लागला, भूमिहीनाना जमिनीचे पट्टे मिळाले. 

 


 अकोला जिल्ह्याचा ऋणानुबंध  –


१४ ऑगस्ट १९८० ला विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे नातू एड. बाळासाहेब आंबेडकरांचे अकोल्यातील सर्किट हाऊस येथे प्रथमच आगमन झाले होते. कृष्णा इंगळे व एक रेल्वे कर्मचारी त्यांचे सोबत होते.नगर परिषद येथे आयोजित बाळासाहेबांचा कार्यक्रम काही कारणास्तव रद्द झाला होता.ही बातमी अकोल्यातील तत्कालीन नेतृत्व दिनबंधू गुरुजी, केरुबुवा गायकवाड ह्यांचे कार्यकर्ते लंकेश्वर गुरुजी, गुणवंतराव पाटील,पी. आर. महाजन,शत्रुघन मुंडे, कृष्णराव मोहोड, यादवराव पाटील व भाऊसाहेब इंगळे ह्यांना समजली.बाबासाहेबांचे नातू अकोला जिल्ह्यातून सभा न होता परत जाणे ही आपल्या जिल्ह्यासाठी नामुष्कीची बाब आहे, हे हेरून त्या सर्व कार्यकर्त्यानी दुपारी बाळासाहेबांची भेट घेतली.रात्री ८ वाजता अकोट फैल येथे सभेची निश्चिती झाली.तत्पूर्वी सायंकाळी सहा वाजता भीम नगर येथे तत्कालीन जुने पुढारी शंकरराव खंडारे ह्यांचे घरी बाळासाहेबाना नेण्यात आले.साक्षात बाबासाहेबांचे नातूच मोहोल्यात आल्याने बाळासाहेबांना पहायला तोब्बा गर्दी झाली.प्रत्येकाला ह्या तरण्याबांड आंबेडकरां मध्ये बाबासाहेबच दिसत होते.भारावलेली जनता डोळे भरून हे प्रतिरूप पाहत होते.त्यांच्या पाया पडत होती, त्यांना स्पर्श करत होती, त्यांच्या पायाची माती कपाळावर लावत होती.सर्व आसमंत भारवला होता.ह्या प्रचंड गर्दीत पहिली सभाच भीमनगर मध्ये पार पडली.अर्थातच त्या नंतर रात्री ८ वाजताची नियोजित सभा भारतीय बौद्ध वाचनालय अकोट फैल येथे प्रचंड गर्दीत संपन्न झाली.

दरम्यान अकोला जिल्ह्याला भारावून टाकणारा एक प्रसंग घडला होता तो अगदी पहिल्याच धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यात.ह्या पहिल्या सोहळ्यात मीराताई आंबेडकर ह्या भाषणासाठी उभ्या राहिल्या ,त्यांनी सांगितल की “ बाबासाहेबांनी आपल्या हयातीत जे काही कमवलं ते सर्व समाजाला देवून टाकलं, माझ्या कडे बाबासाहेबांनी कमाविलेल्या संपत्तीचे काहीही नाही.परंतु आज समाज आंबेडकर कुटुंबांकडे प्रचंड आशेने पाहतो,माझ्या कडे बाबासाहेबांची संपती नसली तरी माझ्या कडे बाबासाहेबांचा नातू आहे आणि तो मी आज समाजाच्या ओटीत टाकते ....” सभा स्तब्ध झाली, मीराताईंच्या भाषणाने उपस्थित समूहाच्या काळजाचा वेध घेतला. जनतेच्या डोळ्यात अश्रू तराळले.टाळ्यांचा कडकडाटात बाळासाहेबांच्या नेतृत्वाचा स्विकार केला गेला.आणि नेता, पक्ष, संघटना फिनिक्स पक्षा प्रमाणे झेपावली.पुढच्या काळात ’बहुजन सारे एक होवू सत्ता आपल्या हाती घेऊ ‘हा नारा देत सत्ताबाह्य समूहाला सत्ताधारी होण्याचा राजमार्ग प्रशस्त करणा-या ‘अकोला पॅटर्नने’ जन्म घेतला. महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटा वरील अनेक प्रस्थापितांना सत्तेतून बेदखल केले.आणि बहुजनांची सत्ता प्रस्थापित केली.ह्यात अनेक ज्ञात अज्ञात कार्यकर्ते पदाधिकारी ह्यांचे मोलाचे योगदान आणि आंबेडकर कुटुंबाची ३८ बहुमुल्य वर्ष आहेत हे विसरता येणे शक्य नाही.

या प्रसंगा नंतर बाळासाहेबांशी जुळलेल्या कार्यकर्त्यानी लगेच दोन महिन्यात बाळासाहेबांची सभा ११ ऑक्टोबर १९८० रोजी अकोट येथील खरेदी विक्री संघाच्या पटांगणावर घेतली.त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला.त्या मुळे वातावरण निर्मिती झाली.भारावलेले कार्यकर्ते संपूर्ण ताकदीने कामाला लागले आणि खिशात पैसा, साधने, मोटर वाहने किंवा साधा लाऊडस्पिकरची सोय नसताना केवळ चळवळ मोठी झाली पाहिजे ह्या ध्यासाने खेडोपाडी, वस्त्यांमध्ये सायकलवर फिरत अकोला जिल्हा बांधू लागले, गाजवू लागले.

तसा अकोला जिल्हा चळवळीचा बालेकिल्लाच होता..डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा भारताच्या सामाजिक राजकिय क्षितिजावर नेतृत्व उदय झाल्यानंतर त्यांचे पाठीशी हा जिल्हा प्रचंड ताकदीने उभा झाला.आंबेडकरी चळवळीतील कलापथके,गीतकार, शाहीर, जलसे, कलापथके, धंडारी,भजनी मंडळानी जागृतीचा वणवा सतत पेटत ठेवला होता.शेड्यूल कास्ट फेडरेशनचे व-हाड प्रांतिकचे ९ व १० डिसेंबर १९४५ ला बाबासाहेबांच्या उपस्थितीत अकोल्यात भरले होते.भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, शेकाफे चे कार्य मोठ्या गतीने सुरु होते.भय्यासाहेब आंबेडकरांनी देखील पाच वेळा ह्या जिल्ह्याचा दौरा केला होता.तसेच रिपब्लिकन पक्षाच्या प्रेसिडीयमची पहिली बैठक देखील २८,२९ व ३० डिसेंबर १९५७ साली अकोल्यातच संपन्न झाली होती.बाबासाहेबांच्या बौद्ध धम्म स्विकाराच्या आवाहना नुसार १००% बौद्ध धम्म स्वीकारणारा जिल्हा अकोलाच आहे.१९०१ सालच्या जनगणनेत एकही बौद्ध धर्मीयांची नोंद नसलेल्या अकोला (वाशीम संयुक्त) जिल्ह्यात १९५६ ला धम्म स्वीकाराच्या नंतर १९६१ च्या जनगणनेत दोन लाख बेचाळीस हजार चारशे चौसष्ट बौद्ध धर्मीयांची संख्या नोंदविण्यात आली होती.एवढी प्रचंड आंबेडकरी निष्ठा असलेला जिल्ह्या म्हणून अकोल्याचा लौकिक होता.त्या मुळे हे तरूण आंबेडकर पहिल्याच दिवशी नेते म्हणून स्विकारले गेले.भारतीय बौद्ध महासभेचे कार्य व महाउपासिका मीराताई आंबेडकर व बाळासाहेबांचा राबता ह्या जिल्ह्यात वाढविण्यात तत्कालीन पदाधिकारी कार्यकर्ते यशस्वी झाले.


भारिपचे विलीनीकरण .. 


१९८५ साली त्यांनी ऊस उत्पादक शेतका-या साठी पूणे ते माणगाव लॉंगमार्च काढला.साखर कारखाने केंद्रबिंदू न धरता ऊस उत्पादक शेतकरी केंद्रस्थानी असावा ही मुख्य मागणी होती.ह्या आंदोलनामुळे शेतक-यांना उसाला योग्य भाव मिळाला आणि साखर कारखान्यातील राखीव जागा भरल्या गेल्या. 

महाराष्ट्रातील विखुरलेल्या बहुजन समाजाला एकत्र करून एक प्रचंड मोठी राजकीय शक्ती निर्माण करण्यासाठी १९९० साली अकोला जिल्हा निवडला.१९९० साली मूर्तिजापूर विधानसभेत अपक्ष उभे असलेल्या मखराम पवारांना पाठिंबा देऊन निवडून आणले.हा बहुजन समाजाच्या विजयाचा मानदंड ठरला."बहुजन सारे एक होऊ सत्ता आपल्या हाती घेवू" हा नारा बुलंद झाला.पवारांच्या विजया मुळे प्रस्थापित व्यवस्थेला पराभूत करता येते हे आत्मभान बहुजन समाजाला प्राप्त झाले.२३ ऑगस्ट १९९० साली अकोला शहरातील प्रमिलाताई ओक हॉल येथे बहुजन समाजातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता.बहुजन समाजाचे स्वतंत्र संघटन उभे करणे हा त्या मागील मूळ उद्देश.ह्या मेळाव्यात "अकोला जिल्हा बहुजन समाज महासंघाची" स्थापना झाली, याच अधिवेशनात अकोला जिल्हा बहुजन समाज महासंघ हा भारिप सोबत राजकीय आणि सामाजिक वाटचाल करेल हे ठरविण्यात आले.

त्यातूनच बहुजनांच्या सत्तेचा स्वबळाचा मार्ग यशस्वी करणारा 'अकोला पॅटर्न' जन्माला आला.हाच बाबासाहेबानी अपेक्षिलेला रिपब्लीकन पक्ष होता. 

बहुजन महासंघाच्या स्थापने नंतर भारिप बहुजन महासंघाच्या विलीनीकरणाचा पहिला एपिसोड पार पडला तो बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव येथील अधिवेशनात.२१ मार्च १९९३ साली शेगांव येथे बहुजन महासंघाचे अधिवेशन मखराम अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते.ह्या अधिवेशनाला  बाळासाहेब आंबेडकर उद्घाटक होते.प्रमुख पाहुणे म्हणून सिने कलावंन्त निळू फुले आणि राम नगरकर प्रामुख्याने उपस्थित होते.ह्याच अधिवेशनात भारिप आणि बहुजन महासंघाचे विलीनीकरण झाले.हे दलितांच्या राजकीय सामाजिक चळवळीचे दुसरे आवर्तन नव्या आयामाला जन्म देत होते. एकजातीय, एक धार्मीय राजकीय कूस त्याने मोडून निघाली.

भारिप बहुजन महासंघाच्या उदयाचे पहिल्या टप्यात बाळासाहेबांचे नेतृत्वातील भारिप बमसंने आपला पहिला आमदार नांदेड जिल्ह्यातील किनवट मध्ये भीमराव केराम ह्यांचे रुपाने निवडून आणला.आणि बघता बघता बहुजनाना सत्तेची दालने बाळासाहेबांनी उघडी करून दिली.ह्या नंतर महाराष्ट्रात झंझावात निर्माण केला.त्यातून अनेक लहान लहान घटकांना विविध ठिकाणी सत्तेची पदे मिळालीत.विविध आंदोलने आणि मोर्चे ह्यांनी तो काळ प्रचंड गाजला होता.त्यात खो घातला तो शरद पवारांनी, भारिप बमसंचा पहिला आमदार फोडण्या पासून ते सत्तेतील भारिप बमसंचे मंत्री फोडण्याचे काम पवारासोबत काँग्रेसने केले. त्या वेळी बाळासाहेबांनी दिलेले भाषण शरद पवारांना मोठा धडा होता, " तुम्ही माझे मंत्री आमदार पळवू शकता, परंतु जनता नाही ".हे वाक्य प्रचंड आश्वासक होते. मराठवाडा विध्यापीठाचे नामांतर असो की रिडल्स बाळासाहेबांनी कधीही शरद पवारांवर किंवा काँग्रेसवर विश्वास ठेवला नाही. 


वंचित प्रयोगाचे दूरगामी परिणाम ... 

आताच्या लोकसभा निवडणुकीत वंचीत बहुजन आघाडी ही राजकीय चमत्कार आहे.२४ मार्च २०१९ रोजी नोंदणी झालेला पक्ष राज्यात ४८ जागा स्वबळावर उभ्या करून लढतो काय आणि कुणीही स्पर्धेत धरत नसताना अल्पावधीत राज्यात प्रस्थापित पक्षांचा विरोधात तिसरा सक्षम पर्याय निर्माण होतो काय, सर्वच अनाकलीय आहे.प्रस्थापित राजकीय घराणी आणि पक्ष व नेत्याच्या उरात धडकी घडविणारी ताकद बाळासाहेबांनी वंचीत बहुजन आघाडीच्या रूपाने उभी केली आहे.सर्व बहुजन समाजाने देखील हा पक्ष आणि नेता स्वीकारला आहे.त्यामुळे आता खरे लोकशाहीचे विकेंद्रीकरण होऊन सत्ता वंचीताचा उत्कर्ष होईल. बाळासाहेबांचे नेतृत्वात लोकसभेच्या ह्या दमदार प्रदर्शना नंतर विधानसभेत वंचीतचे ४० प्लस आमदार असतील ह्यात मला कसलीच शंका नाही. 

बहुजनांच्या राजकीय सामाजिक चळवळीचा वेलू लोकसभा आणि विधानसभेच्या मांडवावर नेणा-या बहुजन नायक एड बाळासाहेब आंबेडकरांना वाढदिवसा निमित मंगल कामना.       

              

राजेंद्र पातोडे

(प्रदेश प्रवक्ता) 

वंचीत बहुजन आघाडी 

महाराष्ट्र प्रदेश 

९४२२१६०१०१

Tuesday, 7 May 2019

वंचितांच्या राजकारणाचा सर्वव्यापी अवकाश: अँड.बाळासाहेब आंबेडकर

वंचितांच्या राजकारणाचा सर्वव्यापी अवकाश: अँड.बाळासाहेब आंबेडकर 

डॉं.बाबासाहेब आंबेडकर हयात असेपर्यंत दलित समाजात त्यांच्या तोडीचं राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक समज असणारं सर्वव्यापी नेतृत्व उभं राहू शकलं नाही. शेवटी शेवटी बाबासाहेबांना ही जाणीव फार छळायची. इतक्या कष्टाने इथवर आणलेला हा गाडा पुढे घेवून जाणारा कुणी द्रष्टा कार्यकर्ता आसपास दिसत नव्हता. म्हणून किमानपक्षी मागे तरी घेवून जावू नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. झालेही तसेच. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर देशात कुळ कायद्याची चर्चा होत होती. तेंव्हा कसेल त्याची जमीन पण नसेल त्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित करत दादासाहेब गायकवाड यांनी उभारलेली भूमिहीनांची चळवळ वगळता देशाच्या राजकारणाला रिपब्लिकन नेतृत्वाची दखल घ्यायला भाग पाडणाऱ्या व्यापक चळवळी आणि सर्वव्यापी नेतृत्व उभे राहिले नाही. त्या नंतरचे बहुतांश आंबेडकरी राजकारण भावनिक आणि अस्मितेच्या मुद्द्याभोवती फिरत राहिले. मधल्या काळात दलित पँथरने देशभरात झंझावात निर्माण केला होता. दलितांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराला प्रखर विरोध करत सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेविरुद्ध मोठे बंड पुकारले होते. ती त्या काळाला दिलेली प्रतिक्रिया होती. दशकभराच्या आतच तीही संपुष्टात आली. त्यानंतर तब्बल १६ वर्षं नामांतराचे आंदोलन चालले. त्यात आंबेडकरी तरुणांची जवळ जवळ एक पिढी खर्ची पडली. मराठवाड्यासह महाराष्ट्रभरातील संपूर्ण दलित समाज अक्षरशः होरपळून निघाला. त्याचे फलित काय? तर फक्त नामाविस्तार ! त्यानंतर सामाजिक चळवळी मंदावत गेल्या आणि हळूहळू दलित चळवळींमधली दाहकता देखील कमी होत गेली.


या संबंध पार्श्वभूमीवर अँड.बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व आकार घेत होते. डॉं. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून आयत्या वंशाचे राजकारण त्यांना खेळता आले असते. पण तसे न करता आधी त्यांनी स्वतःतल्या नेतृत्व गुणांचा विकास केला. बाबासाहेबांप्रमाणे कायद्याचे पंडित आणि घटनेचे जाणकार बनले. इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या ज्ञानशाखांसोबतच भाषा- साहित्य- संस्कृती – धर्म – जात - वर्ग -वर्ण- लिंग यांचा खोलवर अभ्यास केला. राजकारणाआधी समाजकारण सुरु केलं. इ.स. १९८३ च्या ६ दिवसाच्या लॉंगमार्चने  आंदोलनाला सुरवात केली. अस्मिता आणि भावनिकतेचं राजकारण नाकारून रिडल्स, गायरान जमीनी, शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणी व्यवस्थापन, भ्रष्टाचार असे भौतिक प्रश्न घेऊन व्यापक चळवळ उभारण्याचा प्रयत्न केला. त्यांचं राजकारण केवळ दलीतांपुरतं मर्यादित नाही. शेतकरी, शेतमजूर, कामगार, आदिवासी ,ओबीसी ,भटके विमुक्त, अल्पसंख्य, स्त्रिया या सर्व घटकांना सोबत घेवून शोषित वंचितांची एक मोठी मोट बांधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु प्रस्थापित राजकारण्यांनी गेल्या साठ वर्षात जे राजकारण उभं केलं आहे त्याचा सांगाडा लोकशाहीचा असला तरी आत्मा जातशाही-धर्मशाही आणि भांडवलशाहीचा आहे. त्यामुळे भारतीय लोकांच्या मनात अजूनही लोकशाही रुजू शकली नाही. राजकारणाचे सगळे ठोकताळे जातीने बांधले जातात. आज जातीव्यवस्था ही राजकारणाची गरज बनलेली आहे. अशावेळी बाळासाहेब आंबेडकर जातीअंताचा अजेंडा घेवून जातीनिरपेक्ष राजकारण करत असतील तर त्यांच्या पाठीमागे नेमकी कोणती जनता उभी राहणार आहे हा खरा प्रश्न आहे. आरक्षणाने बुर्ज्वा बनलेला आंबेडकरी मध्यमवर्ग त्यांच्या पाठीमागे येणार नाही. कारण अनुसूचित जातीअंतर्ग आरक्षणाची वर्गवारी ते अजिबात मान्य करत नाहीत आणि बाळासाहेब नेमके त्यालाच सहमती दर्शवित आहेत. अशावेळी रीपब्लीकनचे छोटे छोटे तुकडे वाटून घेवून त्यावर पोट जाळणारी मंडळी या गोष्टीचं भांडवल करणार नाहीत तर नवलच! दुसरीकडे अनुसूचित जातीतील नव बौद्धेतर जाती बऱ्यापैकी त्यांच्या त्यांच्या जातीतील नेतृवाखाली उभ्या आहेत. तसाच प्रकार एसटी, एनटी, ओबीसी प्रवर्गातील सगळ्या जातींमध्ये आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससारख्या पक्षांनी याधीच प्रत्येक जातीत आपापलं नेतृत्व पेरून ठेवलं आहे. भाजप देखील आता तिच नीती अवलंबतो आहे. कारण त्यांना पक्कं ठाउक आहे, कि जातशाही आणि भांडवलशाही एकत्र आल्यावर मतदार बाहेर जात नाही. भावनिक आणि आर्थिक दृष्ट्या त्यांना बांधून ठेवता येतं. त्यामुळेच भौतिक प्रश्नांची लढाई लढणारे राजकारणी इथं निवडून येणं आणि प्रस्थापित होणं ही अत्यंत दुरापास्त गोष्ट बनलेली आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांचं सर्वसमावेशक लोकशाहीवादी राजकारण समजून घेणारा आणि अमलात आणणारा सुजाण वर्ग कितीसा आहे ? मराठा क्रांती मोर्चावेळी दलितांना प्रतीमोर्चे काढू नका असं म्हटल्याने त्यांचं कौतुक करणारे मराठे आज त्यांच्या पाठीमागे उभे राहतील का हाही प्रश्नच आहे.

भारतातल्या शोषण व्यवस्थेची मूळं बाळासाहेबांना पक्की ठाऊक आहेत. संघाने पेरलेल्या हिंदुत्ववादाच्या विषाची फळं आज भाजपच्या रूपाने भारतीय राजकारणाला लगडलेली आहेत. भाजपाने देशाला पाच वर्षात पन्नास वर्ष मागे नेले. अजून पाच वर्ष मिळाली तर देशाचा सिरीया झाल्याशिवाय राहणार नाही. तेंव्हा हे विष लवकरात लवकर नष्ट केलं पाहिजे. पण गेल्या नव्वद वर्षापासून सातत्याने पसरणारं हे विष असं अचानक नष्ट करणं एकट्या दुकट्या पक्षाचं काम नाही. त्यासाठी थोडेफार सेक्युलर थोडेफार लोकशाहीवादी असलेल्या सर्व पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. पण उजव्या पक्षांची नीती हिंदुत्ववाद नष्ट करणे नसून हिंदुत्ववाद्यांच्या हातातील सत्ता मिळवणे एवढीच आहे. त्यामुळे हिंदुत्ववादाला विरोध हे त्यांचे साधन राहिले आहे, साध्य नव्हे. सत्तेसाठी ते हिंदुत्ववाद्यांनाही विनाशर्त पाठींबा देवू शकतात हे आपण मागे अनुभवलेच आहे. सत्तेसाठी थुका चाटणाऱ्या या मत्सुद्यांचा काही भरोसा नसतो. ते कधीही पलटी मारू शकतात. बाळासाहेब मत्सुद्दी राजकारणी नाही, तर अभ्यासू राजकारणी आहेत. त्याहीपेक्षा अधिक विचारवंत आहेत. सामाजिक न्याय व मानवी अधिकारांसाठी लढा उभारणारे ते लढवय्ये नेते आहेत. तेच खरे बाबासाहेबांच्या सर्वव्यापी विचारांचे, बौद्धिक गुणांचे वारसदार आहेत. बाबासाहेबांचा गाडा पुढे घेवून जाण्याची क्षमता केवळ त्यांच्यात दिसते आहे. आज या देशातली लोकशाही आणि संविधान फार मोठ्या संकटात आहे. आपण त्यांच्या मागे सर्व ताकदीनिशी उभे राहिलो नाही तर नवी पेशवाई येण्यास उशीर लागणार नाही.  

बाळासाहेबांचा अजेंडाच शोषणाचं,विषमतेचं मूळ असणाऱ्या हिंदुत्ववादाच्या विरोधात आहे. देशाला हिंदुत्ववादाच्या जोखडातून मुक्त करणारं हे एकमेव नेतृत्व आहे. भिमाकोरेगावच्या दंगलीनंतर त्यांनी जाहीरपणे घेतलेल्या हिंदुत्ववाद्यांच्या विरोधी भूमिकेमुळे संघ भाजप प्रचंड खवळले आहे. त्यांना नक्षलवाद्यांचे समर्थक ठरवून बदनाम करण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. हिंसेने हिंसा वाढते, नक्षलवादाचं मूळ असणारी व्यवस्था नष्ट करा, नक्षलवाद आपोआप नष्ट होईल असं म्हणणं नक्षलवादाचं समर्थन ठरतं काय ? यावर आरएसएस ही दहशतवादी संघटना आहे, भाजप ही त्या दहशतवादी संघटनेची शाखा आहे. त्यामुळे भाजप समर्थक तो दहशतवादाचा समर्थक ठरतो असा युक्तिवाद करता येतो. पण उलट मागे काही मूर्ख दलित ब्राम्हणवाद्यांनी आनंद तेलतुंबडे, मिलिंद तेलतुंबडे आणि बाळासाहेब आंबेडकर यांचे नाते जोडणारे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून त्याचा नक्षलवादाशी संबंध जोडला होता. हे असले प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्याला ताबडतोब उत्तर देणे गरजेचे आहे. बाळासाहेबांकडे पूर्णवेळ कार्यकर्ते नाहीत. त्यांना पोसण्यासाठी सहकारी साखर कारखाने, दुध डेर्या, बँका नाहीत. आर्थिक रसद पुरवणारे व्यापारीही नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांना पगार देणे, सभांसाठी लाखो रुपये खर्च करणे त्यांना शक्य होत नाही. आपल्याकडे पैसा नाही पण बाबासाहेब आहेत, ज्ञानाची, विचारांची श्रीमंती आहे, शिक्षण आहे, लढाऊ बाणा आहे, व्यवस्थेला अंगावर घेण्याची ताकद आहे. ही सर्व ताकद आज बाळासाहेबांच्या पाठी उभी करणं ही आपलीच नव्हे तर लोकशाहीची गरज आहे.  

प्रा.सुदाम राठोड


साभार - मित्रवर्य Sudam Rathod

Friday, 19 April 2019

साध्वी प्रज्ञा सिंग म्हणजेच भाजपाचा खरा चेहरा

मालेगाव बॉंबस्फोटातील मुख्य आरोपी साध्वी प्रद्न्यासिंग ठाकुर  ला खासदारकीचं तिकिट देऊन RSS आणि भाजपाने हे सिद्ध केलय कि भाजपा हा पक्ष आपल्या देशा साठी किती घातक आहे . ही सामान्य बाब अजिबात नाही . हा शहिद हेमंत करकरे आणि त्यांच्या संपुर्ण टीमचा अपमान आहे असे म्हणायला हरकत नाही . 


         विचार करण्यासारखी गोष्ट आहे कि , मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणी तब्बेतीच कारण दाखऊन  जामिनावर बाहेर असलेली आणि आतंकवादी कृत्यात प्रत्यक्ष सहभाग असलेली व्यक्ती खासदारकीच्या निवडणुकीला उभी राहते . ही बाबच मुळी भयंकर आहे . इतक्या मोठ्या हत्याकांडाची आरोपी आणि इतके वर्षे जेलमध्ये राहिलेल्या व्यक्तिच समर्थन करणारा भाजप पक्षाची काय विचारधारा असु शकते हे वेगळ सांगायला नकोय . नथुराम ज्यांचे वंशज आहेत , त्यांच्याकडुन वेगळ्या काय अपेक्षा करणार . उद्या आसाराम बापु सारखे लिंगपिसाट आणि दळभद्री लोक तुरुंगातुन जामिनावार बाहेर आल्यावर निवडणुकीला उभे राहिले व अश्यांच्या समर्थनार्थ जनता रस्त्यावर उतरली तर आश्चर्य वाटण्याचं अजिबात कारण नाही . 


       मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणाचा सत्य खुलासा असलेले " हु किल्ड करकरे ? " आणि शहीद करकरेंच्या सुविद्य पत्नी स्मृतीशेष करकरे मॅड्म ह्यांनी लिहिलेले " द लास्ट बुलेट " हे पुस्तक वाचल्यावर डोक ठिकाणावर राहात नाही. किती अमानवीय पद्धतीने कट करुन हा हमला केला गेला .. आणि नियोजनबद्ध रित्या करकरे, कामठे आणी साळसकर ह्याना मारण्यात आले . ह्याचे हसन मुश्रीफ ह्या तत्कालिन पोलीस अधिकार्याने केलेल भाष्य अगदी जबरदस्त आहे . कॉ. गोविंद पानसरे ह्यान्नी कोल्हापुरमध्ये ह्याच विषयावर जेव्हा मुश्रीफांचा कार्यक्रम आयोजीत केला .. त्यांच्या नंतर त्याना खुनाच्या धमक्या RSS वाल्यांकडुन आल्या आणि नंतर त्यांची नियोजनबद्ध हत्या झाली . 


       हार्दिक पटेल सारख्या ओबीसी कुणबी पाटीलला कोर्ट निवडणुकीत अर्ज भरु देत नाही .. ज्याच्यावर कोणताही मनुष्यवधाचा गुन्हा नाही आणि ज्यांच्यावर गुन्हा आहे .. त्यांना परवानगी दिली जाते . हे अगदी अकल्पित आहे . आम्ही नेमके कुठ जात आहोत ह्याच भान सुद्धा आम्हाला नाहीये . जनता जनार्दन १००-५०० रुपयाच्या आहारी जाऊन, खोट्या राष्ट्रप्रेमवर विश्वास ठेउन तोंडाला कुलुप लावुन बसली आहे . 


        करकरे हे संपुर्ण टिमसह मालेगाव बॉंबस्फोटातील ह्या हिंदुआतंकवाद्यांना लॅपटॉपसहित अटक करुन त्यांच्यावर आरोप सिद्ध करणार होते व शिक्षा होणार होती . मात्र ह्या अगोदरच त्यांचा गेम केला गेला . नासिकच्या तुरुंगात असताना RSS चा भागवत करकरेंना भेटायला गेला . मात्र करकरे खरा देशभक्त होता . जिवाशी गेला . 


      साध्वी बोलत आहे की करकरेला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली . साध्वी जे बोलतेय .. ती तीची विचारधारा आहे . करकरे हे बहुजन होते . साध्वी ही RSS ची कट्टर कार्यकर्ता अर्थात मनुवादाची आणि हिंदुराष्ट्र संकल्पनेची सक्रिय समर्थक ! ह्यांना देश्यात हिंदुराष्ट्राच्या नावाखाली ब्राह्मणांची संपुर्ण सत्ता व्यवस्था आणायची आहे . त्यात ते जवळ जवळ ९५% यशस्वी झालेले आहेत. संविधान संपऊन मनुस्मृतीवर आधारीत ब्राह्मणराष्ट्र अर्थात हिंदुराष्ट्र ! ह्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे कालपरवाला कोणतीही परिक्षा न देता केंद्रात सचिव पदावर  झालेल्या नऊ ब्राह्मणवाद्यांची  एकजात निवड होय . 


        ब्राह्मणादी सवर्णान्ना शिक्षा देण्याचा अधिकार ओबीसी , एससी ,  एसटी ला नाही .. म्हणुन सुप्रिम कोर्टात आजही सगळेच एकजात ब्राह्मण आहे . हे आहे हिंदुराष्ट्र ! ब्राह्मणराष्ट्र म्हटल्यास ह्यांना कुत्र पण विचाराणार नाही , म्हणुन हिंदुच्या आड आम्हाला अधिकारवंचित ठेवण्याच ब्राह्मणांच खुप मोठ षडयंत्र यशस्वी होताना दिसत आहे .


        जो ब्राह्मणाला शिक्षा देईल .. त्याला मृत्युदंडाची शिक्षा मनुस्मृतीत आहे. हाच प्रकार छत्रपती संभाजी महाराजांबरोबर ब्राह्मणांनी घडवला होता .. कारण त्यांनी मोरोपंत पिंगळे .. आण्णाजी दत्तो आणि राहुजी सोमनाथ ह्या तिघा ब्राह्मणान्ना शिवरायांच्या हत्येच्या गुन्ह्यात रायगडावर हत्तीच्या पायी देऊन देहदंडाची शिक्षा दिली होती . संभाजी महाराज शुद्र होते आणि मनुस्मृतीत शुद्राला ब्राह्मणाला शिक्षा देण्याचा अधिकार सपशेल नाकारते . हा इतिहास आहे . 


       ब्राह्मण फक्त आमच्यावर अन्याय करण्याची फक्त पद्धत बदलतो .. मुळ विचारधारा कधीच बदलत नाही . त्यांना मनुस्मृतीवर आधारीत व्यवस्था आजही निर्माण करायची आहे . म्हणुन हा सर्व EVM चा घोटाळा सुरु आहे . साध्वी तीची मुळ ब्राह्मणी विचारधारा बोलत आहे आणि आमचे उपटसुंभ अंधभक्त त्याचे समर्थन करत आहे . ह्याचा अर्थ आम्हीच आमच्या हातानी आमच्या पायावर कुऱ्हाड मारुन घेत आहोत. 


     प्रतिक्रांतीसाठी तयार रहा ! 

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...