Saturday, 3 October 2020

*कॉंग्रेस कठपुतली बनले आहे*

लॉकडाऊन लाऊन पुर्ण देशाचा संघ व मोदीने सत्यानाश केला, पण आता चर्चा फक्त उत्तर प्रदेश व योगी यांच्यावर आणुन ठेवली, तिकडे कितीही नंगानाच केला तरी पचवता येतो, राम राज्य है ना वहा पे. 
 
आपन एबीपी माझा चे पत्रकार सुधारलोय म्हणुन हुरळुन जातोय पन संघ सर्व गोष्टी थंड डोक्याने व विचारपुर्वक करतो हे आपन विसरतो,
  तिसरी आघाडी स्थान निर्माण करत आहे हे लक्षात येताच राहुल व प्रियांका सारख्या फेल झालेल्या विरोधकांनाच पुन्हा स्थिर करायचा भाजपचा हा डाव आपल्या लक्षात कसा येत नाही?

भाजपकडची नाराज जनता तिसर्या आघाडी कडे न वळता पुन्हा कॉंग्रेस कडे वळावी हा साधा खेळ आहे.

पाच वर्षात किती दलित अत्याचारा बद्दल गांधी कुटुंब आक्रमक झाले व मनुवादी मीडियाने त्यांना सपोर्ट केला? या वेळीच का सर्व अद्भुत परिवर्तन दिसतय? 

भाजपाला राहुल गांधी सारखा विपक्ष नेता पाहीजे.

*बिहार निवडणुका प्रत्येकवेळी तिव्र विषमता व उघड जातीवादाच्या बेसवरच लढवली जाते, बिहार ला लैब सारखे वापरले जाते, मागच्या निवडणुकात आरक्षण संपवले पाहीजे अशा उघड भुमिका घेऊन भाजप निवडणुकात उतरले होते, यावेळी हाथरस व बाबरी चा जुलुम करुन निवडणुकाला सामोरे जात आहेत.

बिहार हे बुद्धभुमी आहे, तिकडे विकास होवो की न होवो, संघाला देनेघेने नसते, तिकडे ते तिव्र जातीवादाच्या बेसवर निवडणुका लढुन जनमत तपासत असतात.
बहुजनांनी कॉंग्रेस व भाजपा या दोन्ही पासुम सावध रहायला पाहीजे, गेली 65 वर्ष कॉंग्रेसने तेच केले जे आता 7 वर्ष भाजपा करत आहे, हे दोन्ही पक्ष वैदिक जानवेधारी विचारधारेचेच आहे, राहुल गांधी ने लोकसभा निवडणुकात जानवे जाहिर पने दाखवले होते. 

- मनोज काळे.

Thursday, 1 October 2020

कॉंग्रेसचे नरकाश्रू...!!




     काल ऊत्तर प्रदेशातील हाथरस येथे कॉग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांना ऊत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केली असा कांगावा करीत कॉग्रेस पक्ष रस्त्यावर ऊतरला आहे...!!
    दलितांची सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न कॉंग्रेस पक्ष करीत आहे...!!
  खरं म्हणजे कॉग्रेस आणि भाजप मध्ये काहीच फरक नाही, हे आता देशातील दलित आणि मुस्लिम समुहाला कुणीही सांगायची गरजच राहिली नाही,एवढं मोठं अनुभवाच गाठोड जनतेच्या जवळ जमा झालं आहे...!!
  १९७३ मध्ये गरीबी हटाव चा नारा देणारा कॉग्रेस पक्ष किती दगलबाज आहे हे आता पुन्हा पुन्हा सांगायची गरजच नाही...!!
,गरीब अधिक गरीब झाला तथा दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीची टक्केवारी वाढतचं गेली...!!
  कॉंग्रेस पक्षाच्याच सरकारने भांडवली निर्णय घेऊन खाजगीकरण केले देशात भांडवलदारांसाठी नवं दालनं उघडलं आणि नवा भांडवलदार वर्ग निर्माण झाला...!!

 गरीबांच्या नांवानें दलितांची मते घेतली आणि काम मात्र भांडवलदार भावंडासाठी केलं हे आज सिद्ध झालेले आहे.आता कॉग्रेस पक्षाने आणखी नौटंकी करु नये...!!

   कॉंग्रेस का हाथ,गरीबोके साथ...!!
अशी भावनिक साद घालायची मात्र गरीबांना देशोधडीला लावायचं काम कॉग्रेस पक्षाने केले याचा अनुभव देशातील जनतेने घेतला आहे...!!
      दलित, मुस्लिम समाजाची मते घेऊन कॉग्रेस पक्षाने संपूर्ण देशात जातदांडगे नेते निर्माण केले, घराणेशाही मजबुत केली आणि जातियवाद  मजबूत केला,त्याचीच फळे आज दिसतं आहेत...!! 
 दलितांवर इथला मोठ्या जातीचा धनदांडगा हा जातीय अत्याचार आणि अन्याय करतो आहे...!!
   ज्या हाथरस गॅंगरेप प्रकरणाचा निषेध नोंदवायला राहुल गांधी आणि प्रियंका गांधी चालल्या होत्या ते बलात्कारी कोण आहेत,..??
 ऊत्तर प्रदेशातील जातदांडगे "ठाकुर" जातीचे नराधम आहेत...!!
ऊत्तर प्रदेशातील या जातदांडग्यांना आजपर्यंत कॉग्रेस पक्षानेच मोठे केले आहे हे पाप कॉग्रेस पक्षाचेच आहे...!!
      महाराष्ट्रात कॉग्रेस पक्षाचे सरकार असतांनाच खैरलांजी हत्याकांड घडले ते हत्याकांड जगाच्या वेशीवर टांगल्या गेले तरीही त्या हत्याकांडातील आरोपींना शिक्षा झाली नाही कारण उघडं आहे, सत्ताधारी पक्षाने पोलिस प्रशासनाला वापरून पुरावे नष्ट केले,कच्चे दुवे ठेवले आणि वरुन अतिरेक करीत त्याच खैरलांजी गावाला तंटामुक्त पुरस्कार दिला...!!
   महाराष्ट्रातील मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाच्या आडुन दलितांची प्रचंड नाकेबंदी कॉग्रेस पक्षाच्याच सरकारने केली होती हा अनुभव आहे...!!
    एक नाही अनेक घटना आहेत की, देशात दलितांवर अन्याय,अत्याचार हे कॉग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केले आहेत आणि सत्तेच्या माजोरीवर ते दडपून टाकण्यात आले आहेत...!!
     आजही बेशरम कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते राहुल गांधींच्या धक्काबुक्की साठी रस्त्यावर उतरले मात्र ते मनिषा वाल्मीकी या तरुणीला न्याय मिळावा अशी मागणी करीत नाहीत...!!
 त्यांना दलित मुलीवर बलात्कार झाला किंवा दलितांवर अन्याय होतो याच्याशी काही देणंघेणं नाही...!!
   केवळ राहुल गांधी,राहूल गांधी असा टाहो फोडाणारा मिडिया आणि मनुवादी कॉग्रेशी एकाच मानसिकतेचे प्रतिक आहेत,त्यांना दलित मुलीला न्याय मिळाला पाहिजे याच्याशी काही देणंघेणं नाही...!!
  *भाजप आणि काँग्रेस पक्षाचं आर्थिक धोरणं एकच आहे...!!
* भाजप आणि काँग्रेस पक्षाचं निर्गुंतवणीकीचं धोरण एकच आहे...!!
* भाजप आणि काँग्रेस पक्षाचं भांडवलदार धार्जीन धोरणही एकसमान आहे...!!
* भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी वेळोवेळी आरएसएस या वैदिक संघटनेला मदतचं केली आहे...!!
*बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्याचा मनसुबा भाजपाने आखला मात्र त्याला मुर्त रुप कॉग्रेस पक्षाच्या नरसिंहराव सरकारने दिले....!!
* भाजप धर्माच्या नावाने तर कॉग्रेस जातीच्या नावावर राजकारण करतो...!!
 * कॉंग्रेस पक्षाने लोकशाही संपवून आणिबाणीचा प्रयोग केला होता,तोच प्रयोग आजच्या भाजपच्या सरकारनेही सुरू केलेला आहे...!!

मग कॉग्रेस आणि भाजप मध्ये फरक कोणता आहे...??

  दर पाच वर्षांनी जेव्हा जेव्हा निवडणूका येतात तेव्हा तेव्हा भारतीय जनतेला फसविण्यासाठी या दोन्ही पक्षांची नाकटे सुरू होतात...!!
  तु मारल्या सारखे कर...!!
  मी रडल्या सारखे करतो...!!
 हा नाटकाचा प्रयोग सुरू झाला आहे...!!

  म.गांधीच्या हत्येनंतर जर आरएसएस वर कायमची बंदी घातली गेली असती तर आजचा दिवस दिसला नसता, परंतु कॉग्रेस पक्षाने सत्तेसाठी म.गांधीच्या हत्येचाही वापर केला आणि गांधी तत्वज्ञान गुंडाळून ठेवले...!!
 तीच कॉग्रेस दलितांना काय न्याय देऊ शकेल...??
  कॉंग्रेस पक्ष आता सत्तेसाठी नरकाश्रू गाळते आहे हे जनतेला पटलेले आहे...!!
   जयभीम.
@.. भास्कर भोजने.

Saturday, 26 September 2020

गरीब मराठ्यांनो...!!

गरीब मराठ्यांनो...!!

      गरीब मराठा बांधवांनो, एकेकाळी संपन्न असलेल्या मराठा समाजाला आरक्षण मागायची वेळ का आली.?? या प्रश्नाचे उत्तर मिळवावे लागेल...!!
      झालेल्या चुका टाळल्या शिवाय,प्रगती साधता येणार नाही, आरक्षण हा एकच पर्याय डोळ्यासमोर ठेवून पुढिल वाटचाल केली तर पुन्हा फसगत होण्याची दाट शक्यता आहे...!!
 आरक्षणामुळे विकास साधता येतो हा समज निर्माण झाला आहे...!!
   आरक्षणामुळेच आंबेडकरी समुहाचा विकास झाला असाही समज निर्माण झाला आहे...!!
  आणि म्हणूनच मग
   आरक्षण संपवण्यासाठी मनुवादी गिधाडे संपूर्ण सरकारी खात्यांच खाजगीकरण करीत आहेत...!!
   खाजगीकरणातून आरक्षण संपले तर मग आरक्षण मिळूनही समस्त समाजाचा विकास साधता येईल का...??
   आरक्षणामुळे नोकरी मिळेल मात्र नोकरीचे क्षेत्र किती टक्के आहे.२% नोकरीत संपुर्ण समाजाला न्याय देता येईल का...??
    सारासार विचार करता आरक्षणा सोबतंच काही मुलभूत बाबींचा विचार सुद्धा करावा लागेल...!!
  ज्या महाराष्ट्रात मराठा जात ही प्रबळ असतांनाच आणि गेल्या साठ वर्षात महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मराठा नेतृत्व असतांना मराठा समाजचं कसा रसातळाला गेला याचाही विचार व्हायला हवा की, नको...??
   ज्यांनी जातीच्या नावावर मते मागितली आणि सत्तेत बसले त्यांनी जातीचा विकास केला का..??
ऊत्तर नकारार्थी आहे...!!
  ज्यांनी जातीच्या नावावर मते मागितली त्यांनीच जातीच्या ऐवजी आपली घराणेशाही मजबुत केली, हेही समजून घ्यावे लागेल...!!
   केवळ सत्ताच उपभोगली नाही तर प्रचंड आर्थिक सुबत्ता हस्तगत केली हेही समजून घ्यावे लागेल...!!
    काही मोजक्या लोकांचे वारसदार परंपरागत पद्धतीने सत्तेचे ठेकेदार झाले आहेत आणि सत्तेतून संपत्ती वान बनले आहेत...!!
   पहिल्या पिढीतील शरद पवार साहेब...!
 दुसऱ्या पिढीतील अजित पवार साहेब आणि सुप्रिया ताई सुळे...!!
 तिसऱ्या पिढीतील पार्थ पवार आणि रोहित पवार ही घराणेशाही कुणाच्या वाट्याची सत्ता ऊपभोगतं आहेत,? याचाही विचार करावा लागेल...!!

 जसे पवार घराणे तसेच नांदेडचे चव्हाण घराणे,तसेच विखे पाटलांचे घराणे एक नाही अनेक घराणे प्रस्थापित झाले,सतत सत्तेत राहिले मात्र आपलेच भाऊबंद आर्थिकदृष्ट्या मागे पडतं आहेत याचा कधीच विचार केला नाही आणि सत्तेचा त्यासाठी वापरही केला नाही...!!
 ज्यांच्या मतांवर सत्तेत बसलो त्यांच्यासाठी सत्तेचा योग्य वापर केला असता तर कदाचित आज मराठा समाजाला आरक्षण मागायची वेळ आली नसती.हा विचार कधीतरी सत्ताधारी मराठा नेत्यांनी केला आहे का..?? किंवा तशा प्रकारची खंत कधीतरी व्यक्त केली आहे का..??

  सत्तेशिवाय सहकाराचे मोठे क्षेत्र मराठा समाजाच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्राने विकसित केले,देशाला दिलेली ती महाराष्ट्राची देणगी आहे एवढं महत्त्वाचं आणि पुढचं पाऊल टाकणार काम महाराष्ट्राने केले आहे...!!
 सहकार क्षेत्राचं खोबरं कुणी केलं...??
 कारखान्याच्या नांवावर किती सरकारी निधी मिळविला आणि तरीही कारखाना अवसायनात कसा गेला,?? हेही समजून घ्यावे लागेल...!!
  सहकारी कारखाना घाट्यात आणि तोच कारखाना खाजगी झाला की,नफ्यात चालतो हे गौडबंगाल सुद्धा समजुन घ्यावे लागेल...!!
     एका साखर कारखान्याच्या बाजुला तीस पस्तीस छोटे छोटे ऊद्योग उभे राहू शकतात अशी रोजगार निर्मिती आणि समाज विकासाची संधी असुनही ते छोटे ऊद्योग महाराष्ट्रातील साखर कारखान्याच्या बाजुला उभे का राहिले नाही.?? याच्या पाठिमागचे कारण काय..??
साखर कारखानदारांना विकासाची बुद्धी नाही का..??
 साखर सम्राटांना विकासाची दृष्टी आहे मात्र स्वत:पुरती मर्यादित आहे, समाजासाठी नाही...!!
  त्यांना कुणीही प्रतिस्पर्धी तयार होऊ द्यायचा नव्हता म्हणूनचं तर छोटे ऊद्योग उभे राहू दिले नाही...!!
  आणखी एक बाब समजून घेतली पाहिजे, राजकीय पटलावर रामदास आठवले सारखा रोडवरचा तरुण उचलून गरीब घरचा पोरगा ऊचलला आणि कॅबिनेट मंत्री बनविला,त्याला कायम सत्तेतच बसविले तसे किती गरीब मराठा तरुणांना संधी दिल्या गेली याही दिशेने गरीब मराठा बांधवांनी विचार केला पाहिजे...!!
  अनेक अर्थाने आणि चौफेर विचार करून गरीब मराठा बांधवांनी आपल्या विकासासाठी आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे हे लक्षात घ्यावे...!!
 कु-हाडीचा दांडा गोतास काळ...!!
 घरका भेदी लंका ढाये....!!
 या बोध वाचनातून काही बोध घेता येईल का...??
  जयभीम.
@.. भास्कर भोजने.

Thursday, 24 September 2020

वंचित बहूजन आघाडीची राष्ट्रीय पक्षाच्या दिशेने वाटचाल...!!




       देश पातळीवर आंबेडकरवादी विचाराचा पक्ष ऊरला नाही, जी अपेक्षा बसपा कडुन जनतेला होती त्या अपेक्षेला छेदून बसपाने राजकीय डावपेच खेळले...!!
   बसपा भाजपच्या मांडीवर जाऊन बसली सत्तेची फळे चाखली आणि जनतेच्या मनातून बसपा हद्दपार झाली...!!
   त्याचाच परिणाम म्हणजे उत्तरेकडील राज्यांत पंजाब हरियाणा बिहार आणि दिल्ली मधील बसपाचा जनाधार संपला , आणि बसपा केवळ ऊत्तरप्रदेशा पुरती सीमित झाली...!!
  एवढेंच नाही तर बसपाचा उत्तर प्रदेशातील जनाधार सुद्धा घसरला आहे, हे २०१४ आणि २०१९ च्या निवडणूकीत सिद्ध झाले आहे...!!
   म्हणून देश पातळीवर आंबेडकरवादी विचाराचा पक्षाची नितांत गरज लक्षात घेऊन वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी, वंचित बहूजन आघाडीचा परिघ विस्तारायला सुरुवात केली आहे...!!
  मध्यप्रदेशातील पोटनिवडणुकीच्या २७ जागा वंचित बहूजन आघाडी लढवित असुन,आता बिहार विधानसभेत सुद्धा बहूजन आघाडी ऊतरली आहे...!!
   यापुर्वीही वंचित बहूजन आघाडीने कर्नाटक विधानसभेच्या आठ जागांवर उमेदवार ऊभे करुन जनतेचा कौल घेतला होता...!!
     आज रोजी देशात फॅसिस्ट शक्ती विरोधात लढण्यासाठी आंबेडकरवादी विचारधारेची नितांत गरज निर्माण झाली आहे...!!
   वंचित बहूजन आघाडीचा विस्तारलेला परिघ देशातील वंचित समुहाला निश्र्चितच न्याय देऊ शकेल याची शाश्वती वाटते...!!
 कारण गेल्या ४० वर्षाच्या राजकीय जीवनात वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी कधीही विचारांशी तडजोड केली नाही हेचं त्यांच साफसुथर चारित्र्य उद्याच्या जनसामान्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणू शकते हा विश्वास वाटतोय...!!
      जयभीम.
@.. भास्कर भोजने.

Tuesday, 22 September 2020

श्रीमंत मराठ्यांचा कांगावा...!!

श्रीमंत मराठ्यांचा कांगावा...!!

       मराठा आरक्षणाच्या निमित्ताने श्रीमंत मराठे विरुद्ध गरीब मराठे असा शब्दप्रयोग करुन वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी विचार मांडले, म्हणून श्रीमंत मराठ्यांचा तिळपापड झाला...!!
   म्हणे प्रकाश आंबेडकर मराठ्यांमध्ये भांडणं लावतं आहेत...!!

   श्रीमंत मराठे पुढे येऊन रोखठोकपणे बाळासाहेब आंबेडकरांना ऊत्तर मागू शकले नाही म्हणून श्रीमंत मराठ्यांनी आपल्या मर्जीतील लोकांना कामाला लाऊन आरोप करु लागले की,प्रकाश आंबेडकर मराठ्यां मध्ये भांडण लावीत आहेत...!!
   टि.व्ही चॅनल वरुन तशी हवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे...!!

   श्रीमंत मराठ्यांनो तुम्ही सत्य किती दिवस झाकून ठेऊ शकता...??

    महाराष्ट्रात मोजकेच मराठे आहेत की,ज्यांच्याकडे अरबो खरबो रुपयांची संपत्ती आहे...!!
   साखर कारखानदार आहेत,सुत गिरणीचे मालक आहेत, दूध डेअरीचे मालक आहेत,शिक्षण महर्षी आहेत,सतत सत्तेत आहेत, हे सत्य तुम्ही नाकारु शकता का..??
   परंतु महाराष्ट्रात संख्येने सर्वात मोठ्या असलेल्या मराठा जातीत मोठा वर्ग असा आहे की,तो अल्पभूधारक शेतकरी आहे, शेतमजूर आहे, शेतीशी निगडित अकुशल कामगार आहे, आर्थिकदृष्ट्या कमजोर आहे. हे सत्य तुम्ही नाकारु शकता का...??
 मराठा जातीत सरळ सरळ दोन वर्ग आहेत एक श्रीमंताचा आणि दुसरा गरीबांचा, हे सत्य तुम्ही नाकारु शकता का..??
 महाराष्ट्राच्या सत्तेत केवळ १६९ घराणेच आलटून पालटून सत्ता ऊपभोगतात हे सत्य तुम्ही नाकारु शकता का..??
   आज रोजी जे मराठे श्रीमंत आहेत,त्यांची आर्थिक सुबत्ता कशामुळे...??
   या प्रश्नाचे उत्तर शोधले तर सहजच लक्षात येते की, सत्तेतून आणि सहकारातून या वर्गाने आर्थिक संपन्नता मिळविली आणि सत्ता जातीच्या नावावर राजकारण करुन मिळविली हेही सत्य तुम्ही नाकारु शकता का...??
   श्रीमंत मराठयांनी इतरांकडे बोट दाखविण्याच्या ऐवजी सरळ सरळ ऊत्तर द्यावे की,ज्या जातीच्या नांवावर तुम्ही गेली साठ वर्षे सत्तेत आहात त्या जातीसाठी तुम्ही काय केले..??

      मराठा जातीचा आर्थिकदृष्ट्या विकास झाला असता तर आज आरक्षण मागण्याची वेळ आली असती काय..??

   एकटे प्रकाश आंबेडकर यांनी रोखठोक आणि सत्य मांडले म्हणून तुम्ही त्यांना भांडणे लावता का.??
असा प्रश्न विचारता.मात्र मराठा आरक्षणावर विनायक मेटे यांनी सुद्धा शंका उपस्थित केली की, काही मराठ्यांनाच मराठा जातीला आरक्षण मिळू द्यायचे नाही, विनायक मेटे तर स्वत: मराठा आहेत आणि मराठा आरक्षणासाठी झटत आहेत त्यांचेंवरही हाच आरोप करणारं का.??
   छत्रपती चे वंशज उदयनराजे भोसले आणि संभाजी राजे यांनी सुद्धा तोच सुर आवळला आहे की, काही मराठ्यांनाच मराठा आरक्षण मिळू द्यायचे नाही,त्यांचेवरही भांडणे लावण्याचा आरोप करणारं आहात का..??
    श्रीमंत मराठ्यांच्या दहशतीमुळे गरीब मराठ्यांमधील अनेकजण सत्य मांडण्यास कचरतात हे वास्तव आहे...!!
    आपल्या संपत्तीच्या आणि सत्तेच्या माजोरीतुन अनेकांना झुलवत ठेऊन, कित्येकांना बरेच आमिषे देऊन,तर कित्येकांना बर्बाद करुन तुम्ही जी दहशत निर्माण केली आहे त्यामुळे ब-याच जणांना सत्य समजूनही ते तोंड ऊघडतं नाहीत हे जमीनी वास्तव आहे...!!
   जातीच्या नांवावर जी सत्ता मिळविली जाते ती जाऊ नये म्हणून श्रीमंत मराठे हा कांगावा करीत आहेत...!!
 ज्या सहकारातुन संपन्नता मिळविली त्याच सहकाराच्या आडून किती शेतकऱ्यांना बर्बाद केले त्याचे उत्तर तुमच्याकडे आहे का..??
  एका साखर कारखान्याच्या बाजुला तीस पस्तीस छोटे ऊद्योग उभे राहू शकतात ते तुम्ही ऊभे केले नाही याचे समर्पक उत्तर देऊ शकता का..??
    रामदास आठवले सारख्या रोडवरच्या तरुणाला डायरेक्ट कॅबिनेट मंत्री बनविले आणि सतत सत्तेत बसविले तसे किती मराठा तरुणांना तुम्ही सत्ताधारी केले..??
 या प्रश्नाचे समर्पक उत्तर तुमच्याकडे आहे का..??
   प्रश्न अनेक आहेत, श्रीमंत मराठे त्या प्रश्नांची उत्तरे देण्याच्या भानगडीत पडत नाहीत,केवळ आपली आणि आपल्या नातेवाइकांची सत्ता कशी अबाधित राहील यासाठी नेहमीच दक्ष असतात म्हणून ती सत्ता जाऊ नये यासाठी श्रीमंत मराठयांनी कांगावा करायला सुरुवात केली आहे हे समस्त महाराष्ट्रातील जनतेने समजून घ्यावे हीच अपेक्षा...!!
     जयभीम.
@.. भास्कर भोजने.

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...