Wednesday, 23 January 2019

वंचितांनो कॉर्नर मिटिंग हीच आपली शक्ती - सुमित वासनिक

वंचितांनो कॉर्नर मिटिंग हीच आपली शक्ती
- सुमित वासनिक

आंबेडकरी चळवळ ही संसाधन विहिन चळवळ आहे, त्याचप्रमाणे ज्या वंचित समूहाच्या कल्याणाची लढाई ही चळवळ  लढते आहे तो वंचित समूह सुद्धा संसाधन विहिन समूह आहे. निवडणुका जवळ आलेल्या आहेत एकीकडे वंचितांना डावलणारे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेने सारखे पैसा आणि प्रसिद्धी माध्यमांनी अतिशय बळकट असलेले प्रस्थापित पक्ष आहेत. तर दुसरीकडे पैसा नसलेले आणि प्रसिद्धी माध्यमं विरोधात असलेले आपण वंचित समूह आहोत.
संसाधनांनी परीपूर्ण असलेल्या या प्रस्थापितांना पराजित करून आपल्याला आपल्यासाठी संसदेची दारे उघडायची आहेत. मार्ग कठीण आहे पण अशक्य नाही. ऍड.बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात आपण विना पैसा आणि प्रसिद्धी माध्यमांचा विरोध असूनही  लाखोंच्या सभा प्रत्येक जिल्ह्यात घेऊन दाखवत आहोत, हीच आपली शक्ती आहे. ही आपल्या एकीची शक्तीच या धनदांडग्यांना भुईसपाट करण्यासाठी पुरेशी आहे. आपल्या या अफाट जनशक्तीला आपण मतपेटित पोहचविण्यात यशस्वी झालो तर आपल्याला संसदेत जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही हे आपण ओळखले पाहिजे.
जे आपले समर्थक आहेत, आपल्या समविचारी आहेत , वंचित आहेत त्यांना मतदानासाठी तयार करायच्या कामाला आपण सर्वांनी आता लागले पाहिजे. मतदार बनविणे, मतदानासाठी लोकांना तयार करणे यासाठी अनेक मार्गांचा उपयोग आपल्याला करावा लागेल. या अनेक मार्गांपैकी एक मार्ग म्हणजे प्रत्येक वाडी, वस्ती, आणि गावखेड्यात काँर्नर मिटिंग, छोट्या सभा घेणे हे होय.
कॉर्नर मिटिंग, छोट्या सभा आयोजित करा या सभांच्या माध्यमातून जनतेला सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबद्दल अवगत करत रहा. जनतेला मतदानाचे महत्व समजावून सांगा, मतदार तयार करा. निवडणूक काळात प्रस्थापित पक्ष पैश्याच्या आणि प्रसिद्धी माध्यमांच्या जोरावर ऍड.बाळासाहेब आंबेडकरांच्या बद्दल आणि आपल्या  उमेदवाराबद्दल अफवा पसरवीतात अश्या अफवांपासून सावध राहण्यासाठी जनतेला या सभांच्या माध्यमातून तयार करा. भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडिबद्दल होत असलेला अपप्रचार खोडुन काढा. निवडणुकीच्या दिवशी लोकं स्वयंस्फूर्तीने आपले मत वंचित बहुजन आघाडिला देतील असे वातावरण या कॉर्नर मिटिंग आणि छोट्या सभांच्या माध्यमातून तयार करा. प्रत्येक 10-15 दिवसांच्या नंतर अश्या मिटिंग ,सभा आयोजित करा. या कॉर्नर मिटिंग, छोट्या सभा म्हणजे मतदारांपर्यंत पोहचण्याचा सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय होय हे लक्षात ठेवा.
मित्रांनो आपल्या कडे कुठलेच संसाधन नाही पण आपल्या जवळ जनशक्ती आहे. या जनशक्तीच्या जोरावरच आपल्याला बदल घडवायचा आहे त्यामुळे आपणच जबाबदारी उचलली पाहिजे आणि आहेत त्या मार्गांचा उपयोग करून मतदार जागृती केली पाहिजे, वंचित बहुजन आघाडिचा मतदार तयार केला पाहिजे. आपण हे करण्यात यशस्वी झालोतर येणारा काळ आपला असेल , समतेचा असेल याची जाणीव असू द्या.

Monday, 21 January 2019

राजकारणातील नैतिकता आणि लाचारी....!

राजकारणातील नैतिकता आणि लाचारी....!
: भास्कर भोजने.
       डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांसदीय लोकशाही ही कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडली आहे...!
   कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेत जे जे उपेक्षित आहेत,संधीवंचित आहेत,त्यांना संधी निर्माण करुन देऊन समग्र समाजाचा " समतेने " विकास साधणे ही भुमिका घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली आणि आपली सांसदीय लोकशाही ऊभी केली...!
    आपल्या देशातील वर्णवर्चस्ववादी मंडळीने या समतेच्या तत्वाला छेद देण्यासाठी ज्यांना संधी द्यायची आहे,ज्यांना आरक्षण द्यायचे आहे असे उपेक्षित घटकामध्ये लाचार व्यक्ती शोधून त्यांना उपेक्षित घटकांचे नेते म्हणून प्रपोज केले आणि उपेक्षितांच्या हक्क आणि अधिकाराला शह दिला ...!
    उपेक्षित समाज हा उपेक्षितचं राहिलं,त्याचा प्रतिनिधी हा आपला " गुलाम " किंवा सांगकाम्या किंवा पदाचा लालची किंवा " दलाल "प्रवृत्तीचा असेल अशी भुमिका घेऊन मनुवादी पक्षांनी गेली सत्तर वर्षे आपले राजकारण आणि पक्षीय धोरण राबविले आहे...!
    भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या सत्ताधारी पक्षाच्या तिकिटावर निवडून येणारे राखीव जागेवरील खासदार बघा त्यांचे काम आणि विचार बघा चटकण लक्षात येते त्यांनी एस.सी.,एस.टी, ओबीसी बांधवांसाठी काय केले त्याचा आराखडा बघा...!
    त्यांची लायकी बघा,पुर्वी बुलढाणा मतदारसंघ राखीव होता तेव्हा भाजप, शिवसेना आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जे होते तेच उमेदवार आज बुलढाणा मतदारसंघ खुला झाला तेव्हा नाहीत,तर त्या राखीव जागेवरुन निवडून येणारे, आनंदराव अडसूळ, मुकुल वासनिक, किंवा शिवसेनेचे काळे आता कुठे आहेत...??
   त्यांची लायकी केवळ राखीव जागेवर उभे राहण्याऐवढी आणि गुलामी करण्याऐवढीचं आहे.ते नेते होऊ शकत नाहीत...!
   अंगी कुठलीही लायकी नसतांना इथल्या प्रस्थापित पक्षांनी काही बुजगावण्यांना आंबेडकरी नेते म्हणून प्रपोज केले आहे त्यांची लाचारी आणि दलाली आता उघडं होऊ लागली आहे...!
    आजचा काळ हा अतिशय टोकदार आणि कठीण काळ म्हणून इथला विचारवंत मांडतं आला आहे...!
आजचा काळ हा आणिबाणीचा काळ आहे अशी जनभावना तयार झाली आहे,त्याचे कारण देशात घडणाऱ्या घडामोडी जनता ऊघड्या डोळ्याने बघते आहे...!
   अशा आणिबाणीच्या काळात लोकशाही आणि राज्यघटना धोक्यात आली असतांना,कोणताही नेता हा राजकारण करतांना अतिशय दक्षतेने आणि नैतिक मुल्यांवर आधारीत राजकारण करेल,तरच तो नेता काळाच्या कसोटीवर तगेल अन्यथा जनता आता लबाडांना हद्दपार करील यात शंकाच नाही...!
    अशा टोकदार वळणावर ए आय एम आय एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जनाब असोद्ऊद्दीन ओवेशी साहेब यांनी युतीच्या संदर्भात एक निवेदन नांदेड येथील जाहीर सभेत केले की,जर एम आय एम पक्षाची कॉंग्रेस पक्षाला अडचड वाटतं असेल तर, कॉंग्रेस पक्षाने अॅड बाळासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या मानसन्मानातील जागा द्याव्यात मला एकाही जागेची गरज नाही,मी कोणतीही जागा लढविणार नाही मात्र, दलित बहुजन समाजाला सत्तेतील वाटा मिळावा म्हणून तुमच्या सोबतं राहिलं...!
    ही भाषा,हा त्याग,हा दिलेरपणा आणि ही राजकीय नैतिकता एका पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी वापरली आहे...!
  ए आय एम आय एम पक्षाचे तेलंगणा मध्ये खासदार, सात आमदार आणि महाराष्ट्रात दोन आमदार आहेत, त्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष ही नैतिकता दाखवितो आहे त्याचे कारण आहे आजची देशातील परिस्थिती...!
    परंतु ज्यांना मनुवादी पक्षाच्या मंडळीने नेते म्हणून प्रपोज केले आहे आणि जे स्वत:ला रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणवून घेतात, परंतु त्यांचा कोणता मतदारसंघ आहे हे त्यांनाही माहित नाही त्या नेत्यांना नैतिकता म्हणजे काय हे माहितच नाही...!
त्यांना त्याग कशासोबतं खातात तेही माहित नाही...!
   आजही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नांवाने राजकीय दुकानदारी चालविणारे आंबेडकरी जनतेला फसवू पाहतं आहेत, परंतु आता ही लबाडी किंवा दलाली तुमची तुम्हाला लखलाभ ,जनता तुम्हाला भिकं घालणार नाही...!
  तुमची लाचारी जनतेच्या लक्षात आली आहे...!
     आता जनता कॉंग्रेस पक्षाला सेक्युलर पक्ष म्हणून जाब विचारल्याशिवाय मतं देणारं नाही, कॉंग्रेस पक्षाने आपलं सेक्युलॅरिझम सिद्ध केले पाहिजे...!
   वंचितांसाठी काय देता ते कॉंग्रेस पक्षाने सांगितले पाहिजे,तुमची घराणेशाही आता कुणीही डोक्यावर घेऊन नाचणारं नाही...!
   बुरखाधारी आंबेडकरी नेते, किंवा लाचार,दलाल नेते जनता सहन करणार नाही हेही बुजगावण्यांनी लक्षात घ्यावे,नाहिपेक्षा या वंचितांच्या लाटेत तुम्ही कालबाह्य होऊन, संपणार हे लक्षात घ्या...!
जयभीम.
@.भास्कर भोजने.

Thursday, 17 January 2019

आंबेडकरी समाज बांधवानो सावधान.
: भास्कर भोजने
   स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षात मनुवादी कधीचं चाचपडला नाही.
      त्याचे कारण असे की, सत्ताधारी काँग्रेस ही मनुवाद्यांची .काँग्रेसची सरकारे बघा. प्रत्येक सरकार मध्ये ब्राह्मणांचे वर्चस्व...!
    जेव्हा जेव्हा बिगर काँग्रेसचे सरकार आले तेव्हा तेव्हा काँग्रेसने स्थैर्याचा मुद्दा ऊपस्थित करुन सरकार पाडले किंवा पाठिंबा काढला आणि बहुजनांचे शासन कुचकामी ठरविले...!
      मंडल आयोगाच्या अमंलबजावणी पासून भाजप आणि संघाने आक्रमक पवित्रा घेतला आणि सरकार ताब्यात घेतले.
     धार्मिक धृवीकरणाचा फायदा घेत भाजपने देशात धार्मिक ऊन्माद ऊभा केला...!
    नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, डाँ.कलबुर्गी, गौरी लंकेश सारख्या हत्यामुळे देशात भयाचे अधिपत्य निर्माण झाले...!
    प्रबोधन आणि प्रयोग थांबवून धार्मिक ऊन्माद राबवायची खेळी सुरु राहिली...!
    याचं धार्मिक ऊन्मादाची पुढची कळी म्हणून भिमाकोरेगांव ची दंगल घडविण्यात आली...!
     भिमाकोरेगांव दंगलीचा जाब विचारणारे नेतृत्व प्रगल्भ, विवेकी आणि निडर निघाले..!
  अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी भिमाकोरेगांव दंगलीचा  मास्टर मांईन्ड शोधून सरळ वार केला. पुरावे दाखल केले आणि अतिरेकी हिंदुत्ववादी संघटनांचे धाबे दणाणले...!
   मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या वर अदखलपात्र गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांना अटक करण्याची जबाबदारी ही विद्यमान सरकारची आहे.
    सरकारने कारदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे ती सरकारची जबाबदारी आहे.
   मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे ला जर अटक झाली नाही तर सरकार कायद्याच्या पलिकडे जाऊन शासन व्यवस्था राबविते असा संकेत जाईल...!
    म्हणजे स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षात कधीच मनुवादी कोंडींत सापडला नव्हता, मात्र यावेळी मनुवाद्यांची गोची झाली आहे...!
     या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी मनुवादी मंडळीने भाड्याने काही माणसे कामाला लावली आहेत...! ही भाडोत्री माणसे आता आंबेडकरी नेतृत्व कसं खुजं आहे. आंबेडकरी चळवळीतील काही लोकांचे कसे नक्षलवादी मंडळीशी संबंध आहेत, अशाप्रकारे टिका टिप्पणी करीत आहेत.
       आंबेडकरी समुहातील बांधवानो ही वेळ अतिशय संयमाने वागण्याची आहे. आंबेडकरी नेतृत्व देशातील भयग्रस्त वातावरणात एक कणखर बाणा धारण करुन, मनुवाद्यांची गोची करीत आहे.
       देशातील जे जे समुह भयग्रस्त आहेत, ते आंबेडकरी नेतृत्वाखाली आश्रय शोधतं आहेत.
   देशात कायदा आणि सुव्यवस्था निकामी झाली आहे असे चित्र ऊभे केल्या गेले आहे.
    म्हणून आंबेडकरी समुहाने एकमुखी कणखर नेतृत्व स्विकारुन देशाचे पुढारपणं करावे.
  ही वेळ आक्रमक होऊन भयग्रस्त समाजाला दिलासा देण्याची आहे..!
    राजकीय पुढा-यांची बोलती बंद झालेली आहे. भ्रष्टाचारी बोलू शकतं नाहीत. एकप्रकारे दहशतीचे राज्य आहे...!
    अशावेळी आंबेडकरी बांधवानो, जे कोणी आंबेडकरी नेतृत्वावर टिका टिप्पणी करीत आहेत, ते मनुवाद्यांचे हस्तक आहेत याची जाणीव ठेऊन वागावे ही विनंती...!

Tuesday, 15 January 2019

लोकशाही रस्त्यावर सांडत आहे..- विकास साळवे.

लोकशाही रस्त्यावर सांडत आहे..
- विकास साळवे.
जात्यांधाच्या भयान काळोखाला टार टार फाडुन अंधारात खितपत पडलेल्या मुर्दाड देहाला एक नवा उजेड दिलास तु,
उजेडाचा स्पर्श होताच हत्तीचं बळ एकवटून ताडकन उठलेली मुर्दाड देह आज सुर्यावर स्वार व्हायला निघालीत बघ..
पण खंत एकाच गोष्टीची आहे,
एकमेकांच्या उरावर बसुन कुरघोडीचा खेळ खेळणारी ही तुझीच लेकरे आपआपसांत भांडत आहे,
आणि पदरात पडलेली लोकशाहीची शिदोरी मात्र रस्त्यावर सांडत आहे..
तुझ्या लेकरांच्या भांडणात इथे वैरीच फायदा उचलत लोकशाही पायदळी तुडवत आहे,
आम्ही मात्र आमच्याच आईची अब्रु वेशीवर टांगुन स्वत:चाच ऊर बडवत आहे..
अाम्ही अामच्याच भावंडांना स्वत:चे वैरी समजुन भर चौका चौकात जेव्हा लाथाडु लागलो,
तेव्हा तोच तु टराटरा फाडलेला भयान काळोख पुन्हा नजरेसमोर फडफडू लागतोय बघ..
म्हणुन अस्वस्थ होतो कधी कधी,
कारण अविचारी भुसभुशीत बुरूजं आता ढासळु लागली आहेत,
अज्ञानी लेकरं काही,
नको तिथे उगीचच अक्कल पाजळु लागली आहेत..
बा भिमा,
तु आम्हाला बुध्दांचा धम्म दिला,
वै-याविरूध्द विचारांनी लढुन जिंकण्याचं बळ दिलं,
जग अंधारात बुडेल कदाचित पण आम्ही उजेडातच असु अशा प्रकाशित विचारांच्या शिखरावर बसवलं,
म्हणुन आज आम्ही निर्धास्त व सज्ज आहोत येणा-या संकटावर मात कराया..
तुझ्या लेखणीला पेलवण्याचं बळ नाही माझ्या मनगटात,
तरीही प्रयत्न करतोय मी ती  उचलण्याची,
कारण,
तुझ्या दिलेल्या संविधानाचं रक्षण करायचंय मला,
वाचवायचंय या देशाला जात्यांधाच्या विषारी विषापासुन,
अन् सुरक्षित ठेवायचंय तुझ्या ध्येयातला भारताला..
विकास साळवे,पुणे
+919822559924..

Sunday, 13 January 2019

झुटनीती, कपटनीती म्हणजेच पवारनीती- सुमित वासनिक.

झुटनीती, कपटनीती म्हणजेच पवारनीती
- सुमित वासनिक.
अहमदनगर महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांनी भाजपला मतदान करून भाजपचा महापौर बनविला. एकीकडे राष्ट्रवादी धर्मनिरपेक्षतेच्या गोष्टी करून भाजपला विरोध करत असल्याचे दर्शविते आणि दुसरीकडे स्वतःच्या नगरसेवकांना भाजपला समर्थन द्यायलाही लावते. राष्ट्रवादीच्या या दुटप्पी भूमिकेचा पूर्ण महाराष्ट्रातिल जनतेकडून कडाडून विरोध करण्यात आला तेंव्हा लगेच महापौर निवडीच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादि काँग्रेस कडुन सर्वाच्या सर्व 18 नगरसेवकांना पक्षातून काढण्यात आल्याच्या बातम्या राष्ट्रवादी कडुन पसरविण्यात आल्या होत्या सोबतच भाजपला समर्थन देऊ नका असा पक्षाचा आदेश झुगारून स्थानिक नेत्यांनी भाजपला समर्थन करण्याचा निर्णय घेतला असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले होते. पण राष्ट्रवादी काँग्रेस कडुन करण्यात आलेले हे दोन्ही दावे लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी केल्या गेले होते, हे आता समोर आले आहे.
अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक 28 डिसेंम्बर या तारखेला झाली होती. राष्ट्रवादीने भाजपला मतदान करणाऱ्या सर्वच्या सर्व 18 नगरसेवकांना निष्कासित केल्याच्या बातम्या 29 डिसेंम्बरला पसरविण्यात आल्या होत्या. पण सत्यपरिस्थितीत या 18 नगरसेवकांना आणि यांच्या सोबत शहर जिल्हाध्यक्ष असलेल्या विधाते यांना काल म्हणजे 12 जानेवारीला पक्षातून अधिकारीक पणे काढण्यात आले आहे. निवडणुकीच्या नंतर लोकांकडुन होत असलेल्या विरोधाला थांबवण्यासाठी राष्ट्रवादीने या बातम्या पसरविल्या होत्या पण लोकं काही केल्यास आपली ही दुटप्पी आणि धर्मनिरपेक्षते विरोधी भूमिका विसरायला तयार नसल्याचे पाहून 12 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसने या नगरसेवकांना नाईलाजाने पक्षातून बडतर्फ केले आहे. जनता विसरली असतीतर कोणावरही कार्यवाही झाली नसती.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले होते की पक्षाने भाजप सोबत जाऊ नका असे आदेश दिल्यावरही स्थानिक नेत्यांनी भाजपला समर्थन दिले आहे. ही सुध्दा राष्ट्रवादी काँग्रेस कडुन मारण्यात आलेली एक शुद्ध थाप आहे.  'भाजपला पाठिंबा देऊ नका, असा निरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिलाच नाही' असे जाहीरपणे सांगून अहमदनगर महानगरपालिकेतील भाजप-राष्ट्रवादी युतीचे शिल्पकार आ.विक्रम जगताप यांनीच स्वतः जयंत पाटलांचा खोटारडेपणा उघड केला आहे. अहमदनगर महानगरपालिकेत आपल्या चुकीच्या भूमिकेवर पांघरूण घालण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पसरविण्यात आलेली ही दुसरी खोटी बातमी होय.
राष्ट्रवादी काँग्रेसचा हा दुटप्पीपणा अश्या खोट्या बातम्या पसरविण्यावरच थांबलेला नाही. 12 जानेवारीला भाजपला मतदान करणाऱ्या 18 नगरसेवकांना आणि शहर जिल्हाध्यक्ष असलेल्या विधाते यांना पक्षातून बडतर्फ केले पण त्याच वेळी ही युति ज्यांनी घडविली त्या आ.संग्राम जगताप यांच्यावर कोणतीच कार्यवाही राष्ट्रवादीने केलेली नाही. ज्या व्यक्तीने ही अभद्र युति घडविली आहे त्या व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठीशी घातले आहे, म्हणजे राष्ट्रवादीची या युतिला संमती आहेच हे स्पष्ट आहे. जनतेकडुन पक्षाला होत असलेल्या विरोधाला पाहून जगताप यांच्या शब्दाबाहेर नसलेल्या नगरसेवकांना राष्ट्रवादीने बडतर्फ केले पण जगताप यांना पक्षात ठेवले. 'साप भी मारो और लाठी भि ना टुटे' या म्हणी प्रमाणे राष्ट्रवादीचा हा निर्णय आहे.
अहमदनगर मध्ये भाजपला पाठिंबा देऊन राष्ट्रवादिने आपला खरा चेहरा सर्वांना दाखविला आहे. पण लोकांचा होत असलेला विरोध पाहता आपला हा सत्तापिपासू चेहरा लपविण्यासाठी राष्ट्रवादी कडुन सतत खोट्या गोष्टी पसरविण्यात येत आहेत. ज्याने युति घडविली त्याला पाठीशी घातले जात आहे. मित्रांनो सत्तेसाठी कोणत्याही पातळीवर जाणे हीच राष्ट्रवादी काँग्रेसची खरी विचारधारा आहे. राष्ट्रवादीची ही झुठनीती, कपटनिती म्हणजेच पवारनीती आहे हे महाराष्ट्रातील जनतेने अहमदनगर प्रकरणी चांगल्या प्रकारे ओळखले आहे.
सुमीत वासनिक


संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...