कॉंग्रेस पक्ष संविधानवादी आहे का..??
: भास्कर भोजने
कॉंग्रेस हा पक्ष ब्राम्हण्यवादी आहे अशी धारणा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची होती.,म्हणूनचं बाबासाहेब आंबेडकर कॉंग्रेस पक्षाला "जळतं घर म्हणायचे " ही धारणा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुभवातून निर्माण झाली होती...!
कॉंग्रेस पक्षाने गेल्या सत्तर वर्षात अधिकाधिक काळ,देशाची आणि प्रांताची सत्ता आपल्या अंकित ठेवली आहे...!
ज्या संविधानावर देशाचा कार्यभार चालतो त्या संविधानातील पहिली घटना दुरुस्ती पं.जवाहरलाल नेहरू यांनी १९५७ साली केली, आणि पहिली घटना दुरुस्ती ही आरक्षणाच्या विषयावर करण्यात आली, तेव्हा पासून तर आजपर्यंत राज्यघटनेत १२४ वेळा घटना दुरुस्ती केल्या गेली...!
संविधानाचा सन्मान करण्याऐवजी स्वहितासाठी, संविधान राबविण्यात कॉंग्रेस पक्षाने धन्यता मानली आहे...!
कॉंग्रेस पक्षाच्या व्यतिरिक्त इतर पक्षांचे राज्यसरकार घालवण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने ३५६कलमाचा कित्येकदा गैरवापर केला आहे, आणि संविधानाचा पायदळी तुडवीले आहे...!
१९७५ साली देशात आणीबाणी लादून कॉंग्रेस पक्षाने संविधानाचे महत्व झुगारुन अतिरेक केला आहे...!
कॉंग्रेस पक्षाच्या राजवटीत " राष्ट्रपती " हे पद रबरी स्टॅम्प आहे अशी छबी तयार करण्यात आली...!
कॉंग्रेस पक्षाच्या कारकिर्दीतच "निवडणूक आयुक्त " यांचे अधिकार कुणालाही माहित नव्हते हे वास्तव आहे,१९९० च्या अगोदर निवडणुकीतील प्रचार हा रात्रीचे बारा वाजेपर्यंत चाले, निवडणूक काळात सरकार अर्थात कॉंग्रेस पक्ष कोणतीही घोषणा करुन जनतेला आमिष देतं असतं आणि निवडणूका जिंकतं असतं.ही सर्रास संविधानाची पायमल्ली होती...!
१९८९ ला टि.एन शेषण निवडणूक आयुक्त झाले आणि निवडणूक आयोगाचे अधिकार जनतेला कळू लागले.यापुर्वी कॉंग्रेस पक्षाने संविधानाची पायमल्ली केली आहे...!
१९७३साली कॉंग्रेस पक्षाने गरीबी हटाव चा नारा दिला मात्र अद्याप गरीबी हटवू शकले नाही ,त्या ऊलटं भांडवली व्यवस्था ऊभी करण्यात कुठलीही कसर सोडली नाही, हा एक प्रकारे संविधान द्रोह नाही का..??
संविधानाचा उघडं ऊघडं विरोध करणारे आरएसएस आणि भाजपाचे मंत्री संविधान बदलण्याची भाषा करीत असतांना कॉंग्रेस पक्षाने कुठलीही भुमिका घेतली नाही,असे का.??
संविधानाच्या प्रति दिल्ली येथील जतंरमंतरवर जाळण्यात आल्या तेव्हा कॉंग्रेस पक्षाची भूमिका काय...??
केवळ निवडणुका आल्या की, संविधान बचाव भुमिका घ्यायची म्हणजे आपणं संविधानवादी आहोत अशी प्रतिमा तयार होईल या भ्रमात आता कॉंग्रेस पक्षाने राहू नये...!
कॉंग्रेस पक्ष खरेच संविधानवादी असेल तर आता कॉंग्रेस पक्षाला ठोस भूमिका घ्यावी लागेल...!
बोलायचं एक आणि वागायचे भलतेचं ही लबाडी आत्ता जनतेच्या लक्षात आली आहे, म्हणून लेखी स्वरूपात कॉंग्रेस पक्षाने भुमिका घेतली पाहिजे की, आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्यासाठी आम्ही काय करु हा आराखडा कॉंग्रेस पक्षाने दिला पाहिजे...!
जर अशाप्रकारचा आराखडा कॉंग्रेस पक्षाने दिला नाही तर कॉंग्रेस हा पक्ष संविधानवादी नाही हेही सिद्ध होईल...!
आता भारतीय संविधान धोक्यात आहे, अशावेळी संविधानवादी आणि संविधान विरोधक यांच्यामधील भेदरेषा स्पष्ट असली पाहिजे अशी जनतेची अपेक्षा आहे...!
अशा आणिबाणीच्या काळात जर ढोंगी पक्षाच्या,तकलादू आणि फसव्या भुमिकेवर विश्र्वास ठेवला तर संविधान बचाव करताचं येणार नाही म्हणूनच कॉंग्रेस पक्षाने आपणं सच्चे संविधानवादी आहोत हे प्रत्यक्ष कृतीने सिद्ध केले पाहिजे ही काळाची गरज आहे...!
जयभीम.
Wednesday, 13 February 2019
कॉंग्रेस पक्ष संविधानवादी आहे का..??
Friday, 8 February 2019
- प्रा.प्रमोद भुंबे.
वडार समाज हा स्वातंत्र्याचा 70वर्षा नंतरही समाजाच्या मुख्य प्रवाहात आलेला नाही. भटक्या विमुक्त जमाती पैकी असणारा हा समाज अत्यंत मागासलले जीवन जगताना दिसून येतो. प्राचीन कळात निर्माण केलेले गड किल्ले , हिन्दु,जैन ,बौद्ध यांच्या लेण्याचे कमे याच वडार समजणे केल्याचे काही इतिहासकार संगतात. कायद्याने गुन्हेगरना खाडी फोडण्याची सजा मिळते असे सांगितले जाते पण कसलाही गुन्हा न करता या समजला जन्मजात खडी फोडण्याची सजा भोगावी लगते.
कॉंग्रेस , भाजप, राष्ट्रवादी किवा अन्य कोणताही पक्ष या समजला न्याय देऊ शकला नाही. राज्य पातळीवर लिडरशिप उभी करु शकला नाही. समाजाची महाराष्ट्रातील संख्या कमी असल्याने मतदार म्हणुनही त्यना ग्राह्य धरले जात नाही. 1991च्या रिपोर्ट नुसार त्यांची संख्या 4.35लाख एवढी आहे . ती अता किमान तिप्पट वाढली असेल. पण चांगली लिडरशिप उभी न राहिल्याने अजुनही सामजिक , आर्थिक आणि शैक्षणिक बाबतीत इतरां पेक्षा कोसो मैल मागे आहे. राजकारणात या समाजाची बाजू मांडणारा कोणीच नसल्याने आजपर्यंत साधी दखलही कोनी घेतली नाही. या समाजातील व्यसनाधिनता ,बेरोजगारी , पराकोटीचे दारिद्र्य ही मुळ समस्या आहे. शिक्षणाची परस्थीती ही तशीच आहे. बोटावर मोजण्या एवढे लोक उच्चशिक्षण घेतलेले अढळतील.
इतिहासात मोठे राजवाड्यांचे, लेण्याचे उत्कृष्ठ काम करणार्या वडार समजला अता केवळ दगडच्या खानित, रस्त्यावर खडी फोडणे , बिगारी काम करावे लगते. ज्यांच्या पिढ्यांनी एतिहसिक वारसे उभे केले त्यांच्या त्याना आज आपली कला जोपसतना मोठी कसरत करावी लगते. आजही आनेक वडार अतिशय सुबक मुर्त्या घडवतात . पण आधुनीक प्रशिक्षण नसल्याने ती कला फक्त रस्त्याच्या कडेला उघड्या जागेवर आपले भविष्य (मुले )धुळीत माखताना दिसतात.
या समजला गरज आहे ती चांगल्या नेतृत्वाची जी त्यांच्या वेदना समजून घेईल आणि संधीची दारे खुली करेल. अशा समाजाच्या भावना समजून घेण्याची आणि न्याय देण्याची भुमिका फक्त प्रकाश आंबेडकर च घेऊ शकतात. अकोला जिल्ह्यात लोकशाहीच्या समजिकरणचा जो प्रयोग प्रकाश आंबेडकर यांनी राबवला त्यात कविताताई ढाळे या पथर्वट वडार समाजाच्या स्त्री ला पंचायत समिती मतदार संघात केवल 100मते असताना निवडून आणले आणि पंचायत समितीचे उपसभापती केले. हाच विचार घेऊन वंचित समूहाला लोकसभा आणि विधानसभेत पाठवण्याची तयारी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यानी केली आहे.
आजच्या परस्थितीत वडार समाजातील अनेक तरुणाकडे शिल्पकलेसारखी कला आहे पण ती चांगल्या प्रशिक्षणा अभावी व आधुनीक तंत्रज्ञान अभावी ती दबून गेली आहे. जर ते प्रशिक्षण दिले गेले तर अनेकाना चांगला रोजगार मिळू शकतो. त्याच बरोबर मोफत शिक्षण, वेळचे वेळी शिष्यवृत्ती, उद्योग धंद्यासाठी कर्ज मिळायला सुरुवात झाल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढून ते समाजाच्या मुख्यप्रवहत येतील.
गेल्या 70वर्षाचा विचार केल्यास हे केवळ प्रकाश आंबेडकरच करु शकतात.
'वंचित बहुजनांच्या विकासासाठी,वंचित बहुजन आघाडी'
'विकासा ची नवी दिशा,प्रकाश आंबेडकर एकच आशा'
प्रा. प्रमोद भुंबे
फुले आंबेडकर विद्वत सभा,धुळे.
Thursday, 31 January 2019
कॉंग्रेस पक्षाने आपली ताकद जोखावी...!
कॉंग्रेस पक्षाने आपली ताकद जोखावी...!
- भास्कर भोजने.
कॉंग्रेस पक्षाला आम्ही सत्ताधारी आहोत,प्रस्थापित आहोत या प्रतिमेच्या बाहेर अजून निघता आले नाही...!
कॉंग्रेस पक्ष अजुनही स्वत:ला देशातील सर्वात मोठा आणि प्रस्थापित पक्ष समजतं आहे...!
कॉंग्रेस पक्षाने या भ्रमातुन लवकर बाहेर पडावे,नाहीतर कॉंग्रेस पक्ष हा लवकरच संपेल यात तिळमात्र शंका नाही...!
कॉंग्रेस पक्षाचा जो मुळ जनाधार होता,तो या देशातील दलित आणि मुस्लिम...!
दलितांची १३ टक्के आणि मुस्लिम समाजाची १६ टक्के मिळून एकूण २९ टक्के बेस तयार असायचा त्या २९ टक्के मतांना प्रत्येक मोठ्या जातीच्या उमेदवारा सोबतं जोडून कॉंग्रेस पक्ष सत्तेत जायचा...!
मोठ्या जातीतील काही घराणे तयार करुन कॉंग्रेस पक्षाने जातियवाद आणि घराणेशाही दोन्ही पोसले आणि आपल्या सत्तेची गणितं मांडली...!
गेली ६८ वर्षे भारतीय जनतेने कॉंग्रेस पक्षाच्या या नितीचा अनुभव घेतला आणि दलित, मुस्लिम हा मुळ जनाधार कॉंग्रेस पक्षाकडुन निघून गेला हे वास्तव आहे...!
गरीबी हटाव या ना-यावर दलितांना फसविले गेले हे दलित समुहाला कळुन चुकले आहे...!
बाबरी मशीद प्रकरणात आणि सच्चर समितीचा अहवाल यांनी मुस्लिम समाजाचे डोळे उघडले आणि त्यांनीही कॉंग्रेस पक्षाकडे पाठ फिरविली हे वास्तव आहे...!
कॉंग्रेस पक्षांकडील दलित, मुस्लिम हा मुळ जनाधार संपला...!
ज्या मोठ्या जातीच्या आधारावर घराणेशाही पोसली होती,तोच प्रयोग इतर पक्षांनी सुरू केला आहे,उदा.. शिवसेना आणि भाजप मध्येही घराणेशाही निर्माण झाली आहे...!
त्यामुळे राजकीय प्लॅटफाॅर्म वर नवी प्रस्थापित घराणी तयारी झाली आहेत, म्हणूनच कॉंग्रेस पक्षाचा जनाधार आता प्रस्थापित मोठ्या जातीतही राहिला नाही...!
एकंदरीत त्याचाच परिणाम म्हणून देशात ५४५ पैकी कॉंग्रेस पक्ष केवळ ४४ या सर्वात निच्चांकी सदस्य संख्येवर पोहचला आहे...!
कॉंग्रेस पक्ष देशात विरोधी पक्ष म्हणूनही आपली पतं कायम राखू शकला नाही हे वास्तव आहे...!
महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षाचे ४८ पैकी केवळ २खासदार आहेत...!
म्हणजे कॉंग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील आपला जनाधार गमावलेला आहे,तरीही कॉंग्रेस पक्ष इतर सेक्युलर किंवा समविचारी पक्षांशी युती किंवा आघाडी करतांना इतरांना कमी लेखुन एक जागा देतो,दोन जागा देतो अशी मग्रुरीची भाषा वापरतो आहे हा कॉंग्रेसचा अहंकार कॉंग्रेस पक्षाला संपवणारं यात शंकाच नाही...!
मित्र पक्षांना विश्वासात न घेता केवळ कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपसात बसुन जागा वाटप करतात आणि ,राजू शेट्टी यांना एक जागा सोडली,शेकाप ला एक जागा दिली,अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी सोडली अशी सरंजामी भाषा बोलतं आहेत,ही नशा,हा तोरा,हा अहंकार कॉंग्रेस पक्षाने त्यागला पाहिजे,नाहीतर जनता शिक्षित झाली आहे,तुमची घराणेशाही आता सामान्य माणसाला पसंत नाही...!
तुमचे जातदांडगे उमेदवार छोटया छोटया जातीच्या ओबीसी बांधवांना मान्य नाहीत, तुमचं फसवं धोरण पुन्हा पुन्हा जनता स्विकारायला तयार नाही...!
जो हौद से गयी ,वो बुंद से आनेवाली नहीं....!
कॉंग्रेस पक्षाने आपली सेक्युलर ही इमेज राखायची असेल तर इतर समविचारी पक्षांना सन्मानाने सोबतं घेऊन धर्मवादी, असहिष्णू आणि मनुवादी पक्षांना रोखण्यासाठी आता समंजस भुमिका घेऊन आघाडी करावी,भ्रमातुन बाहेर यावे.नाहीतर तुमचा जनाधार संपलेला आहेचं,२०१९ मध्ये कॉंग्रेस मुक्त भारत होईल आणि त्यासाठी कॉंग्रेस पक्षाचं धोरणचं कारणीभूत असेल...!
कॉंग्रेस पक्षाला पर्याय म्हणून भाजप आणि भाजप पक्षाला पर्याय म्हणून कॉंग्रेस ही द्विपक्षीय देवाणघेवाण सुरु राहिलं या भ्रमातुन कॉंग्रेस पक्षाने बाहेर पडले पाहिजे...!
कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाचं धोरण एकचं किंवा सारखेचं आहे अशी धारणा असलेली नवी पिढी तयार झाली आहे, त्यामुळे भाजपला घालवण्यासाठी म्हणून जनता आता आम्हालाचं निवडून देईल या भ्रमातून कॉंग्रेस पक्षाने बाहेर पडावे,नाहीतर जनता कॉंग्रेस पक्षाला आता पुर्णविराम देण्याच्या मनस्थितीत आली आहे हेही लक्षात घेतले पाहिजे...!
जयभीम.
@.. भास्कर भोजने.
Monday, 28 January 2019
दांभिक मीडिया - जनतेची हितशत्रुच...
वंचित बहुजन आघाडीच्या या क्रांतीकारी सभेत आद.असदुद्दीन ओवैसी साहेबांनी केलेल्या भाषनातील एक ओळ पकडुन त्याचे चुकीच्या पद्धतीने प्रसारन करुन समाजात असंतोष पसरावा व समाजात तेढ निर्माम व्हावी हा मीडीयाचा अजेंडा उघडपने जानवत आहे.
आद. ओवेसी साहेबांनी भारतीय संविधानाने या देशातील सर्व नागरिकांना एका समान पातळीवर आनले आहे, आता या देशात कुनी कुनापोक्षा मोठा नाही तर सर्व समान आहोत या आशयाने त्यांनी थोडे उलगडुन सांगितले की कोणी ब्राह्मन असेल तर तो प्रकाश आंबेडकरांपेक्षा मोठा नाही किंवा कुनी मराठा असेल तर तो मुस्लिमांपेक्षा मोठा नाही, ओवेसी साहेबांनी जनतेला फक्त आपन सर्व समान आहोत असे न सांगता थोडे खोलात जाऊन आपन जातवार धर्मवार भेदभाव करत असतो त्यामुळे त्या जाती धर्मांना आपन कुनीही एकमेकांपेक्षा मोठे नाही तर आपन सर्व समान आहोत असा संदेश दिला, पन मीडिया ला तर अगदी सोपे करुन सांगितलेला संदेशही कळत नसेल तर त्यांनी टिव्ही चैनल्स बंद करुन भंगार गोळा करायचे काम करावे.
दंगली वर कोन कोनत्या पक्षाचे राजकारण चालते? मीडियाला दलालीच करायची आहे तर त्यांनी पत्रकारीता या लोकशाहीच्या चौथ्या खांबाला बदनाम न करता खुलेआम दलाली करावी त्यांना कुनी रोखले आहे?
त्यामुळे समतेच्या संदेशाचा द्वेश वाढविण्यासाठी उपोयग करुन घेण्याचे घानेरडे काम मीडियाने बंद करावे, मीडिया ने समाजहितासाठी, लोकशाही च्या संरक्षणासाठी, जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठवावा, समाज रक्षकांना बदनाम करने मीडियाचे काम नाही याचे आत्मपरिक्षण करावे.
दुसरा मुद्धा आद ओवेसी साहेबांनी जनतेला एक प्रश्न केला की इतका अन्याय होतोय, इतका अत्याचार होतोय पन तुम्ही गप्प का रहाता, तुम्ही ज्या भीमा कोरेगावच्या शुर महारांचे वंशज आहात त्यांना तरी आठवा, की त्या महार सैनिकांनी पेशव्यांना हरवले नविहते का? असा तो प्रश्न त्यांनी जनतेला विचारला..तो प्रश्न हा गाफिल व झोपेत असलेल्या जनतेला हलवुन जागे करण्यासारखा प्रभावी होता, अस्मिता जागी करणारा होता, नव पेशव्या विरुद्ध लढायची प्रेरना देणारा तो प्रश्न होता पन भांडवलदारांच्या मीडियाने बिनधास्तपने अशी खोटी बातमी फिरवली की ओवेसी म्हणाले की महारांनी पेशव्यांना हरवले नव्हते.
त्यामुळे मीडिया हा प्रस्थापित धनदांडग्याच्या हातचे बाहुले आहे स्पष्ट झाले,
जनतेने मीडिया बातम्या देते हा भ्रम डोक्यातुन काढावा, आता पेड मीडिया सुद्धा अफवा पसरवण्याचे काम करते हे वरील दोन मुद्दयावरुन सिद्ध झालेले आहे, त्यामुळे ज्या समाजाच्या हितचिंतकांना कायद्याचे ज्ञान आहे त्यांनी या मीडियावर दंगलीला प्रोत्साहन देने, समाजात तेढ निर्माण करणे, अफवा पसरवने अशा प्रकारच्या केसेस या मीडिया चैनल्स विरुद्ध दाखल करायला हरकत नसावी.
Wednesday, 23 January 2019
वंचितांनो कॉर्नर मिटिंग हीच आपली शक्ती - सुमित वासनिक
वंचितांनो कॉर्नर मिटिंग हीच आपली शक्ती
- सुमित वासनिक
आंबेडकरी चळवळ ही संसाधन विहिन चळवळ आहे, त्याचप्रमाणे ज्या वंचित समूहाच्या कल्याणाची लढाई ही चळवळ लढते आहे तो वंचित समूह सुद्धा संसाधन विहिन समूह आहे. निवडणुका जवळ आलेल्या आहेत एकीकडे वंचितांना डावलणारे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेने सारखे पैसा आणि प्रसिद्धी माध्यमांनी अतिशय बळकट असलेले प्रस्थापित पक्ष आहेत. तर दुसरीकडे पैसा नसलेले आणि प्रसिद्धी माध्यमं विरोधात असलेले आपण वंचित समूह आहोत.
संसाधनांनी परीपूर्ण असलेल्या या प्रस्थापितांना पराजित करून आपल्याला आपल्यासाठी संसदेची दारे उघडायची आहेत. मार्ग कठीण आहे पण अशक्य नाही. ऍड.बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात आपण विना पैसा आणि प्रसिद्धी माध्यमांचा विरोध असूनही लाखोंच्या सभा प्रत्येक जिल्ह्यात घेऊन दाखवत आहोत, हीच आपली शक्ती आहे. ही आपल्या एकीची शक्तीच या धनदांडग्यांना भुईसपाट करण्यासाठी पुरेशी आहे. आपल्या या अफाट जनशक्तीला आपण मतपेटित पोहचविण्यात यशस्वी झालो तर आपल्याला संसदेत जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही हे आपण ओळखले पाहिजे.
जे आपले समर्थक आहेत, आपल्या समविचारी आहेत , वंचित आहेत त्यांना मतदानासाठी तयार करायच्या कामाला आपण सर्वांनी आता लागले पाहिजे. मतदार बनविणे, मतदानासाठी लोकांना तयार करणे यासाठी अनेक मार्गांचा उपयोग आपल्याला करावा लागेल. या अनेक मार्गांपैकी एक मार्ग म्हणजे प्रत्येक वाडी, वस्ती, आणि गावखेड्यात काँर्नर मिटिंग, छोट्या सभा घेणे हे होय.
कॉर्नर मिटिंग, छोट्या सभा आयोजित करा या सभांच्या माध्यमातून जनतेला सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबद्दल अवगत करत रहा. जनतेला मतदानाचे महत्व समजावून सांगा, मतदार तयार करा. निवडणूक काळात प्रस्थापित पक्ष पैश्याच्या आणि प्रसिद्धी माध्यमांच्या जोरावर ऍड.बाळासाहेब आंबेडकरांच्या बद्दल आणि आपल्या उमेदवाराबद्दल अफवा पसरवीतात अश्या अफवांपासून सावध राहण्यासाठी जनतेला या सभांच्या माध्यमातून तयार करा. भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडिबद्दल होत असलेला अपप्रचार खोडुन काढा. निवडणुकीच्या दिवशी लोकं स्वयंस्फूर्तीने आपले मत वंचित बहुजन आघाडिला देतील असे वातावरण या कॉर्नर मिटिंग आणि छोट्या सभांच्या माध्यमातून तयार करा. प्रत्येक 10-15 दिवसांच्या नंतर अश्या मिटिंग ,सभा आयोजित करा. या कॉर्नर मिटिंग, छोट्या सभा म्हणजे मतदारांपर्यंत पोहचण्याचा सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय होय हे लक्षात ठेवा.
मित्रांनो आपल्या कडे कुठलेच संसाधन नाही पण आपल्या जवळ जनशक्ती आहे. या जनशक्तीच्या जोरावरच आपल्याला बदल घडवायचा आहे त्यामुळे आपणच जबाबदारी उचलली पाहिजे आणि आहेत त्या मार्गांचा उपयोग करून मतदार जागृती केली पाहिजे, वंचित बहुजन आघाडिचा मतदार तयार केला पाहिजे. आपण हे करण्यात यशस्वी झालोतर येणारा काळ आपला असेल , समतेचा असेल याची जाणीव असू द्या.
संदर्भासह स्पष्टीकरण...!
** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...

