Monday, 18 February 2019

ये भीड कहासे आती है ? - राजेंद्र पातोडे

ये भीड कहासे आती है ? - राजेंद्र पातोडे

आज उभ्या महाराष्ट्राला एकाच गहन प्रश्नाचे कोडे उकलत नाहीय आणि ते म्हणजे वंचीत बहुजन आघाडीच्या प्रत्येक सभेला रेकॉर्डब्रेक लाखोंची गर्दी कशी जमते?  जिथे सत्ताधारी आणि विरोधकांना पंचवीस-पन्नास हजार माणसे गोळा करायला घाम फुटतोय, तिथे बाळासाहेब आंबेडकरांच्या सभेला सलग जमणारा लाखोंचा जनसागर येतोच कसा हा यक्ष प्रश्न सध्या देशातील मनुवाद्यांची झोप उडवीत आहे.बरं ह्या 'मास चा एकच क्लास आहे' असेही नाही.अगदी उच्च शिक्षित, गर्भ श्रीमंत, उद्योजक व्यापारी, वकील, प्राध्यापक, इंजिनीयर,आयटीयन्स पासून ते थेट कलावन्त,विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी - शेतमजूर ते अगदी सामान्य माणूस अगदी तृतीयपंथी देखील ह्या सभेला आवर्जून हजर असतात.प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस आणि गुप्तचर खातं देखील हैरान असतं. नेमका आकडा किती द्यायचा हा अंदाजच बांधता येत नाही.
कारण त्या त्या जिल्ह्यात आर्थिक परिस्थिती बेताचीच असलेले भारिप बहुजन महासंघ, वंचीत बहुजन आघाडीच्या घटक असलेल्या पदाधिकारी कार्यकर्ते आहेत.त्यात कुणीही गडगंज संपत्तीचे मालक नाहीत.म्हणावी तशी कार्यकर्त्यांची कुमकही नाही. इतर राजकीय पक्षा प्रमाणे पुरविली जाणारी रसद नाही, कुणीही स्पॉन्सर नाही.कुठेही पावती पुस्तकं नाही, वर्गणी नाही.नियोजन आणि सभेची तयारी म्हणून विशेष काही दिसत नाही.राबणारे हात देखील लिमिटेड दिसतात.तरीदेखील सभेचे भले मोठे मैदानच बुक केले जाते.लोकवर्गणीतून उभा केलेला भव्य स्टेज आणि क्वालिटी साउंड सिस्टीम तसेच सभा लाईव्ह दिसावी म्हणून लावलेले स्क्रीन्स ह्या पलीकडे कोणताही तामझाम दिसत नाही.
वर्तमानपत्रात किंवा मीडियात जाहिराती नसतात.माणसं आणायला वाहनं व्यवस्था नसते, जेवणाची पाकीटं, बिसलेरी आणि मजुरी दिली जात नाही, मैदानात बसायला खुर्च्या नाहीत की रखरखत्या उन्हात डोक्यावर मंडप नाही.तरीही तौबा गर्दी होते.शहर पूर्णवेळ जाम झालेलं असते.महिला पुरुष  आणि युवक युवतींनी मैदानं ओव्हरफ्लो होतात.दुपारी २ पासून मैदान भरायला सुरुवात होते ते थेट रात्री सभा संपेपर्यंत कायम असते.प्रत्येक सभेला हा आकडा वाढतच आहे.त्या मुळे संघ भाजपासहीत काँग्रेस-राष्ट्रवादीला धडकी भरली आहे.पूर्वी दखल न घेणा-या मिडीयाला आता ह्या सभा लाईव्ह करावं लागताहेत, कव्हर करावं लागते.सम्पूर्ण महाराष्ट्रात हाच पॅटर्न कायम झाला आहे.राज्यात सलग होत असलेल्या वंचीत बहुजन आघाडीच्या सभांना जनप्रतिसादाचा आलेख वाढत गेलेला दिसतो.नव्या इतिहासाची नांदी ठरणा-या सभांच्या यशाचे गमक काय असावे? हा प्रश्न एकदाच उलगडून दाखवावा म्हणून केलेला लेखन प्रपंच.
इतिहासात प्रथमच 'वंचित' ह्या शब्दाची व्याख्या वंचीत समूहाच्या लक्षात आली आहे.आणि ह्या आत्मभानातूनच अनेक लहान लहान जाती समूहांनी आपला आवाज बुलंद करण्यासाठी वंचीत बहुजन आघाडीत ऍड बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाची कास धरली आहे.त्यामुळे आजवर सत्ताधारी म्हणून वावरलेल्या सर्व पक्षांनी आपला ‘वोटींग मशीन’ म्हणून कायम कसा वापरच केला आहे हे मांडलं जाऊ लागले आहे. ७० वर्षात आम्ही सत्ता आणि संपत्ती, संधी वंचित कसे राहिलो हे अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, भटके विमूक्त, अल्पसंख्यांक समूहाला ह्या सभेच्या माध्यमातून पटायला लागले आहे.त्यातून दररोज अगदी लहान लहान समूहाच्या संघटना, नेते, कार्यकर्ते ह्या लोकजागरात सहभागी व्हायला लागलेत.कुठलंही आर्थिकच पाठबळ नसलं तरी आपण हा लोकलढा उभा करू शकतो.यशस्वी करू शकतो, हे सभेगणिक सिद्ध व्हायला लागल्याने.कार्यकर्ते आणि पदाधिका-यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.त्या मुळे ह्या सभा वंचीतांचा संवाद,वंचीतांचा हुंकार,वंचीत एल्गार, आणि वंचितांचा सत्ता संपादन निर्धार ह्या वेगवेगळ्या टायटलखाली गाजायला लागल्यात.
सभेच्या सुरुवातीला ऍड बाळासाहेब आंबेडकर आणि बॅरिस्टर अससोद्दीन ओवेसी ह्यांचेसह नेते मंडळींची एंट्री हा ग्रँड इव्हेंट ठरतो.पांढ-या एसयूव्ही मध्ये असलेले बाळासाहेब,त्यांचे पाठोपाठ आलेला गाड्यांचा काफिला, त्याला एस्कॉर्ट करणारे काळ्या कपड्यातील सोशल कमांडो, गाड्यापाठी उस्फुर्तपणे ध्वज घेऊन धावणारे तरुण आणि स्टेजवरून दिल्या जाणा-या घोषणांना तेवढाच बुलंद प्रतिसाद देणारा लाखोंचा समूह यामुळे सभेत जोश भरतो.अगदी रणमैदानावरील रणभेरी आणि युद्धाची सुरुवात वाटावी असा तो क्षण असतो.स्टेजवर बसलेल्या नेत्यांना बांधलेले विविध रंगांचे फेटे हे तमाम वंचितांचे सामाजिक प्रतिनिधीत्व करीत एक विशिष्ठ रंग आणि धर्माची मक्तेदारी आम्ही मोडून काढलीय हे दिमाखाने सांगत असतो. त्या स्टेजकडे पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील आणि संकल्पनेतील धर्मनिरपेक्ष भारत आणि रिपब्लीकन पक्ष प्रत्यक्षात उतरल्याचे दिसते.           
त्या नंतर सभेला साज चढतो तो सभेतील वक्त्यांच्या पोटतिडकीने मांडलेल्या अभ्यासू व जोशपूर्ण भाषणांनी.त्यात देश, संविधान आणि सर्वहारा समूहाचा उत्थानाची भलावण केली जाते.सत्ता हस्तगत करण्याचा निर्धार असतो.येथल्या व्यवस्थेला आपला वाटा मागण्याचा इशारा असतो.वंचीताच्या विविध घटकातील वक्ते त्यांच्या समूहाच्या वेदना मांडताना उपस्थितांच्या काळजाचा वेध घेत असतात.आमदार इम्तियाज जलील आणि खासदार ओवेसी ह्यांची उर्दू हिंदीतील फटकेबाजीने सभेचा नूर बदलून जातो.
सरतेशेवटी एड बाळासाहेब आंबेडकर आपली भूमिका मांडतात.अत्यंत संयमितपणे,अभ्यासपूर्ण भाषणातून आपण हा वंचितांचा लढा का उभा केलाय, तो कसा यशस्वी होणार, त्यासाठी काय पथ्य पाळली पाहिजे, सत्ताधारी होणे म्हणजे काय आणि सत्ता कशी मिळवायची हा मूलमंत्र ते सांगतात.सोबतच भाजप आणि संघ हा कसा विषमतावादी आहे, सनातनी आहे, देशातील मनुवादी व्यवस्थेने देशातील संविधान आणि संवैधानिक व्यवस्था कशी धोक्यात आली आहे.२०१९ लढा जिंकल्याशिवाय देशातील मनुवाद पराभूत होऊ शकत नाही.ही अभ्यासपूर्ण मांडणी करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे खरा चेहरा देखील जनतेसमोर आणतात.
बाळासाहेब बोलायला उभे राहिले की प्रचंड घोषणा व आतिषबाजी होऊन पिनड्रॉप सायलेन्स होतो.जसजसं भाषण पुढे जाते तसे टाळ्यांचा व घॊषणाचा आवाज व प्रतिसाद अधिक वाढतो.ते जेव्हा मोदी आणि संघाला आव्हान देतात तेंव्हा जनतेने अख्ख मैदान डोक्यावर घेतलेलं असते."स्वतःचा मिडीया स्वतः उभा करा.माझा कार्यकर्ताच माझा मिडीया आहे".ह्या त्यांचे आवाहनाला अनुसरून लाखोचा समूह स्वतः तल्लीन होऊन  ऐकत असताना बाळासाहेबांचा मिडीया म्हणून आपल्या मोबाईलवर हे भाषण लाईव्ह करीत असतात.सोबत प्रबुद्ध भारत ची टीम देखील हे सर्व जनतेपर्यंत पोहचवीत असते.त्यातून इतर जिल्ह्यातील वंचीत समूह ऊर्जावंत होत जातो.
आपल्या जिल्ह्यात वंचीत बहुजन आघाडीची सभा कधी आहे, ह्याची माहिती होताच त्या त्या जिल्ह्यातील सामाजिक संघटना भारिप बमसं,एमआयएम, वंचीतचे पदाधिकारी कार्यकर्ते आम्हीही सत्ताधारी होणार ह्या निर्धाराने कामाला लागतात.त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळतो तो महाराष्ट्रातील जनतेचा.हजारो वर्षे माणूसपण नाकारलेल्या आणि व्यस्थेने गुलाम केलेल्या व्यवस्थेच्या मुळावर घाव घालण्याचा निर्धार घेऊन वंचीत समूह सहभागी होत चाललेत.त्यांनी आता ऐक्य, युती, आघाडी ह्या शब्दांना कायमची मूठमाती दिली आहे.'बहुजन सारे एक होऊ, सत्ता आपल्या हाती घेऊ' या निर्धाराने पेटून उठलेल्या समूहांनी ही आरपारची लढाई लढण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात आपली ताकद वंचीत बहुजन आघाडीच्या पाठीशी उभी केल्याने ह्या विक्रमी सभा सलगपणे यशस्वी होत आहेत.लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि गिनीज बुक मध्ये ह्या सलग सुरु असलेल्या लाखोंच्या सभांची नोंद व्हावी असा प्रयत्न तर होणारच आहे.सोबतच देशाची सत्ता वंचितांची असावी हाच अंतिम लढा यशस्वी करण्याची लोकभावना बाळासाहेबांनी वंचीत समूहात पेरली.त्याच भावनेचे मूर्त रूप म्हणजे लाखोंच्या सभा आहेत.शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार, एड. बाळासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व,वंचीत समूहाची साथ, सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य जनतेचे पाठबळ हेच सर्व ऐतिहासिक सभाच्या विक्रमी उपस्थितीच्या यशाचे गमक आहे.
ह्याचे रूपांतर वंचीत बहुजनांच्या सत्तेत झाल्या शिवाय राहणार नाही हे मात्र निर्विवाद सत्य आहे.
@ राजेंद्र पातोडे
  अकोला
९४२२१६०१०१
(लेखक भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते आहेत)

Friday, 15 February 2019

लोकशाहीचे सामाजिकरण होतं आहे....!

लोकशाहीचे सामाजिकरण होतं आहे....!
: भास्कर भोजने
    गेल्या सत्तर वर्षात इथल्या प्रस्थापित, सत्ताधारी पक्षांनी छोट्या छोट्या जातींची मते घेतलीत मात्र या समाजातील सामान्य आणि गुणवंत माणसाला संसदेत पोहचू दिले नाही...!
    इथल्या कॉंग्रेस पक्षाने घराणेशाही पोसली आणि मोठ्या जातीतील जातदांडगे उमेदवार बनवून राजकारणात जातीयवाद मजबूत केला...!
    ज्यांना ज्यांना सत्ता हवी होती त्यांनी तोच पायंडा कायम ठेवतं जातीयवाद आणि घराणेशाही अधिक मजबूत केली...!
   त्याचा परिणाम असा झाला की, छोट्या छोट्या जातींची माणसे कितीही लायक असली तरीही सत्तर वर्षात अद्याप संसदेत पोहचले नाहीत...!
   ही लोकशाहीची थट्टा नव्हे काय..??
   आता लोकशाहीचे सामाजिकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे...!
    लहानातील लहान जातीचा प्रतिनिधी हा, संसदेत आणि विधानभवनात पोहचला पाहिजे ही भुमिका वंचित बहूजन आघाडीचे संयोजक अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली आहे...!
लोकसभा  २०१९ साठी वंचित बहूजन आघाडीचे आता पर्यंत १५ उमेदवार जाहीर केले आहेत,त्यांची वर्गवारी बघा...!
आजपर्यंत अशा छोट्या छोट्या जातींचे आणि सामान्य कुटुंबातील व्यक्तींना कोणत्याच पक्षाने उमेदवारी दिली नाही...!
१) बुलढाणा:-श्री.बळीराम सिरस्कार ......  (माळी.)
२) अमरावती:- श्री.गुणवंत देवपारे.
                          (बौद्ध.)
३) नांदेड:-डाॅ.यशपाल भिंगे.
                   ( धनगर.)
४) यवतमाळ वाशीम:-डाॅ.प्रविण पवार .....          ( बंजारा.)
५) लातूर:- श्री.रामभाऊ गारकर.
                      (मातंग.)
६) माढा:-अॅड.विजयराव मोरे.
                (धनगर)
७) सातारा:-श्री.सहदेव अप्पा अहिवळे...    (होलार.)
८) सांगली:-जयसिंग ऊर्फ तात्या शेंडगे.            (धनगर.)
९) पुणे:- श्री.विठ्ठल लक्ष्मण सातव.
                      (माळी.)
१०) बारामती:-श्री.नवनाथ पडवळकर.         (धनगर.)
११) हातकणंगले:-श्री.ओलेमा.
                          (मुस्लिम.)
१२) रावेर:- श्री.नितीन कांडेलकर.
                         (कोळी.)
१३) धुळे, मालेगाव:-इंजि.काश्मी मो.हाशमी.              (मुस्लिम.)
१४) चिमुर:- डॉ रमेश गजबे.
                       (माना,गोवारी,)
१५) वर्धा:- अॅड धनराज वंजारी.
                     (तेली.)
असे उमेदवार सामान्य कुटुंबातील परंतु ऊच्चविद्या विभुषीत आणि कुठलीही घराणेशाहीची पार्श्र्वभूमी नसलेले,इतर पक्ष देणार नाहीत...!
  ही लोकशाहीच्या सामाजिकरणाची सुरुवात आहे...!
  जयभीम.

Wednesday, 13 February 2019

कॉंग्रेस पक्ष संविधानवादी आहे का..??

कॉंग्रेस पक्ष संविधानवादी आहे का..??
: भास्कर भोजने
       कॉंग्रेस हा पक्ष ब्राम्हण्यवादी आहे अशी धारणा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची होती.,म्हणूनचं बाबासाहेब आंबेडकर कॉंग्रेस पक्षाला "जळतं घर म्हणायचे " ही धारणा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुभवातून निर्माण झाली होती...!
       कॉंग्रेस पक्षाने गेल्या सत्तर वर्षात अधिकाधिक काळ,देशाची आणि प्रांताची सत्ता आपल्या अंकित ठेवली आहे...!
      ज्या संविधानावर देशाचा कार्यभार चालतो त्या संविधानातील पहिली घटना दुरुस्ती पं.जवाहरलाल नेहरू यांनी १९५७ साली केली, आणि पहिली घटना दुरुस्ती ही आरक्षणाच्या विषयावर करण्यात आली, तेव्हा पासून तर आजपर्यंत राज्यघटनेत १२४ वेळा घटना दुरुस्ती केल्या गेली...!
      संविधानाचा सन्मान करण्याऐवजी स्वहितासाठी, संविधान राबविण्यात कॉंग्रेस पक्षाने धन्यता मानली आहे...!
   कॉंग्रेस पक्षाच्या व्यतिरिक्त इतर पक्षांचे राज्यसरकार घालवण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने ३५६कलमाचा कित्येकदा गैरवापर केला आहे, आणि संविधानाचा पायदळी तुडवीले आहे...!
     १९७५ साली देशात आणीबाणी लादून कॉंग्रेस पक्षाने संविधानाचे महत्व झुगारुन अतिरेक केला आहे...!
       कॉंग्रेस पक्षाच्या राजवटीत " राष्ट्रपती " हे पद रबरी स्टॅम्प आहे अशी छबी तयार करण्यात आली...!
      कॉंग्रेस पक्षाच्या कारकिर्दीतच "निवडणूक आयुक्त " यांचे अधिकार कुणालाही माहित नव्हते हे वास्तव आहे,१९९० च्या अगोदर निवडणुकीतील प्रचार हा रात्रीचे बारा वाजेपर्यंत चाले, निवडणूक काळात सरकार अर्थात कॉंग्रेस पक्ष कोणतीही घोषणा करुन जनतेला आमिष देतं असतं आणि निवडणूका जिंकतं असतं.ही सर्रास संविधानाची पायमल्ली होती...!
   १९८९ ला टि.एन शेषण निवडणूक आयुक्त झाले आणि निवडणूक आयोगाचे अधिकार जनतेला कळू लागले.यापुर्वी कॉंग्रेस पक्षाने संविधानाची पायमल्ली केली आहे...!
       १९७३साली कॉंग्रेस पक्षाने गरीबी हटाव चा नारा दिला मात्र अद्याप गरीबी हटवू शकले नाही ,त्या ऊलटं भांडवली व्यवस्था ऊभी करण्यात कुठलीही कसर सोडली नाही, हा एक प्रकारे संविधान द्रोह नाही का..??
     संविधानाचा  उघडं ऊघडं विरोध करणारे आरएसएस आणि भाजपाचे मंत्री संविधान बदलण्याची भाषा करीत असतांना कॉंग्रेस पक्षाने कुठलीही भुमिका घेतली नाही,असे का.??
     संविधानाच्या प्रति दिल्ली येथील जतंरमंतरवर जाळण्यात आल्या तेव्हा कॉंग्रेस पक्षाची भूमिका काय...??
     केवळ निवडणुका आल्या की, संविधान बचाव भुमिका घ्यायची म्हणजे आपणं संविधानवादी आहोत अशी प्रतिमा तयार होईल या भ्रमात आता कॉंग्रेस पक्षाने राहू नये...!
    कॉंग्रेस पक्ष खरेच संविधानवादी असेल तर आता कॉंग्रेस पक्षाला ठोस भूमिका घ्यावी लागेल...!
    बोलायचं एक आणि वागायचे भलतेचं ही लबाडी आत्ता जनतेच्या लक्षात आली आहे, म्हणून लेखी स्वरूपात कॉंग्रेस पक्षाने भुमिका घेतली पाहिजे की, आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्यासाठी आम्ही काय करु हा आराखडा कॉंग्रेस पक्षाने दिला पाहिजे...!
    जर अशाप्रकारचा आराखडा कॉंग्रेस पक्षाने दिला नाही तर कॉंग्रेस हा पक्ष संविधानवादी नाही हेही सिद्ध होईल...!
    आता भारतीय संविधान धोक्यात आहे, अशावेळी संविधानवादी आणि संविधान विरोधक यांच्यामधील भेदरेषा स्पष्ट असली पाहिजे अशी जनतेची अपेक्षा आहे...!
    अशा आणिबाणीच्या काळात जर ढोंगी पक्षाच्या,तकलादू आणि फसव्या भुमिकेवर विश्र्वास ठेवला तर संविधान बचाव करताचं येणार नाही म्हणूनच कॉंग्रेस पक्षाने आपणं सच्चे संविधानवादी आहोत हे प्रत्यक्ष कृतीने सिद्ध केले पाहिजे ही काळाची गरज आहे...!
  जयभीम.

Friday, 8 February 2019

वंचित वडार समजला प्रकाश आंबेडकरच न्याय देऊ शकतात!
- प्रा.प्रमोद भुंबे.
वडार समाज हा स्वातंत्र्याचा 70वर्षा नंतरही समाजाच्या मुख्य प्रवाहात आलेला नाही. भटक्या विमुक्त जमाती पैकी असणारा हा समाज अत्यंत मागासलले जीवन जगताना दिसून येतो. प्राचीन कळात निर्माण केलेले गड किल्ले , हिन्दु,जैन ,बौद्ध यांच्या लेण्याचे कमे याच वडार समजणे केल्याचे काही इतिहासकार संगतात. कायद्याने गुन्हेगरना खाडी फोडण्याची सजा मिळते असे सांगितले  जाते पण कसलाही गुन्हा न करता या समजला जन्मजात खडी फोडण्याची सजा भोगावी लगते.
       कॉंग्रेस , भाजप, राष्ट्रवादी किवा अन्य कोणताही पक्ष या समजला न्याय देऊ शकला नाही. राज्य पातळीवर लिडरशिप उभी करु शकला नाही. समाजाची महाराष्ट्रातील संख्या कमी असल्याने मतदार म्हणुनही त्यना ग्राह्य धरले जात नाही. 1991च्या रिपोर्ट  नुसार त्यांची संख्या 4.35लाख एवढी आहे . ती अता किमान तिप्पट वाढली असेल. पण चांगली लिडरशिप उभी न राहिल्याने अजुनही सामजिक , आर्थिक आणि शैक्षणिक बाबतीत इतरां पेक्षा कोसो मैल मागे आहे. राजकारणात या समाजाची बाजू मांडणारा कोणीच नसल्याने आजपर्यंत साधी दखलही कोनी घेतली नाही. या समाजातील व्यसनाधिनता ,बेरोजगारी , पराकोटीचे दारिद्र्य ही मुळ समस्या आहे. शिक्षणाची परस्थीती ही तशीच आहे. बोटावर मोजण्या एवढे लोक उच्चशिक्षण घेतलेले अढळतील.
         इतिहासात मोठे राजवाड्यांचे, लेण्याचे उत्कृष्ठ काम करणार्या वडार समजला अता केवळ दगडच्या खानित, रस्त्यावर खडी फोडणे , बिगारी काम करावे लगते. ज्यांच्या पिढ्यांनी एतिहसिक वारसे उभे केले त्यांच्या त्याना आज आपली कला जोपसतना मोठी कसरत करावी लगते. आजही आनेक वडार अतिशय सुबक मुर्त्या घडवतात . पण आधुनीक प्रशिक्षण नसल्याने ती कला फक्त रस्त्याच्या कडेला उघड्या जागेवर आपले भविष्य (मुले )धुळीत माखताना दिसतात.
      या समजला गरज आहे ती चांगल्या नेतृत्वाची जी त्यांच्या वेदना समजून घेईल आणि संधीची दारे खुली करेल. अशा समाजाच्या भावना समजून घेण्याची आणि न्याय देण्याची भुमिका फक्त प्रकाश आंबेडकर च घेऊ शकतात. अकोला जिल्ह्यात लोकशाहीच्या    समजिकरणचा जो प्रयोग प्रकाश आंबेडकर यांनी राबवला त्यात कविताताई ढाळे या पथर्वट वडार समाजाच्या स्त्री ला पंचायत समिती मतदार संघात केवल 100मते असताना निवडून आणले आणि पंचायत समितीचे उपसभापती केले. हाच विचार घेऊन वंचित समूहाला लोकसभा आणि विधानसभेत पाठवण्याची तयारी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यानी केली आहे.
         आजच्या परस्थितीत वडार समाजातील अनेक तरुणाकडे शिल्पकलेसारखी कला आहे पण ती चांगल्या प्रशिक्षणा अभावी व आधुनीक तंत्रज्ञान अभावी ती दबून गेली आहे. जर ते प्रशिक्षण दिले गेले तर अनेकाना चांगला रोजगार मिळू शकतो. त्याच बरोबर मोफत शिक्षण, वेळचे वेळी शिष्यवृत्ती, उद्योग धंद्यासाठी कर्ज मिळायला सुरुवात झाल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढून ते समाजाच्या मुख्यप्रवहत येतील.
       गेल्या 70वर्षाचा विचार केल्यास हे केवळ  प्रकाश आंबेडकरच करु शकतात.

'वंचित बहुजनांच्या विकासासाठी,वंचित बहुजन आघाडी'

'विकासा ची नवी दिशा,प्रकाश आंबेडकर एकच आशा'

प्रा. प्रमोद भुंबे
फुले आंबेडकर विद्वत सभा,धुळे.

Thursday, 31 January 2019

कॉंग्रेस पक्षाने आपली ताकद जोखावी...!

कॉंग्रेस पक्षाने आपली ताकद जोखावी...!
- भास्कर भोजने.

        कॉंग्रेस पक्षाला आम्ही सत्ताधारी आहोत,प्रस्थापित आहोत या प्रतिमेच्या बाहेर अजून निघता आले नाही...!
    कॉंग्रेस पक्ष अजुनही स्वत:ला देशातील सर्वात मोठा आणि प्रस्थापित पक्ष समजतं आहे...!
    कॉंग्रेस पक्षाने या भ्रमातुन लवकर बाहेर पडावे,नाहीतर कॉंग्रेस पक्ष हा लवकरच संपेल यात तिळमात्र शंका नाही...!
       कॉंग्रेस पक्षाचा जो मुळ जनाधार होता,तो या देशातील दलित आणि मुस्लिम...!
   दलितांची १३ टक्के आणि मुस्लिम समाजाची १६ टक्के मिळून एकूण २९ टक्के बेस तयार असायचा त्या २९ टक्के मतांना प्रत्येक मोठ्या जातीच्या उमेदवारा सोबतं जोडून कॉंग्रेस पक्ष सत्तेत जायचा...!
    मोठ्या जातीतील काही घराणे तयार करुन कॉंग्रेस पक्षाने जातियवाद आणि घराणेशाही दोन्ही पोसले आणि आपल्या सत्तेची गणितं मांडली...!
    गेली ६८ वर्षे भारतीय जनतेने कॉंग्रेस पक्षाच्या या नितीचा अनुभव घेतला आणि दलित, मुस्लिम हा मुळ जनाधार कॉंग्रेस पक्षाकडुन निघून गेला हे वास्तव आहे...!
   गरीबी हटाव या ना-यावर दलितांना फसविले गेले हे दलित समुहाला कळुन चुकले आहे...!
    बाबरी मशीद प्रकरणात आणि सच्चर समितीचा अहवाल यांनी मुस्लिम समाजाचे डोळे उघडले आणि त्यांनीही कॉंग्रेस पक्षाकडे पाठ फिरविली हे वास्तव आहे...!
    कॉंग्रेस पक्षांकडील दलित, मुस्लिम हा मुळ जनाधार संपला...!
   ज्या मोठ्या जातीच्या आधारावर घराणेशाही पोसली होती,तोच प्रयोग इतर पक्षांनी सुरू केला आहे,उदा.. शिवसेना आणि भाजप मध्येही घराणेशाही निर्माण झाली आहे...!
     त्यामुळे राजकीय प्लॅटफाॅर्म वर नवी प्रस्थापित घराणी तयारी झाली आहेत, म्हणूनच कॉंग्रेस पक्षाचा जनाधार आता प्रस्थापित मोठ्या जातीतही राहिला नाही...!
     एकंदरीत त्याचाच परिणाम म्हणून देशात ५४५ पैकी कॉंग्रेस पक्ष केवळ ४४ या सर्वात निच्चांकी सदस्य संख्येवर पोहचला आहे...!
      कॉंग्रेस पक्ष देशात विरोधी पक्ष म्हणूनही आपली पतं कायम राखू शकला नाही हे वास्तव आहे...!
      महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षाचे ४८ पैकी केवळ २खासदार आहेत...!
   म्हणजे कॉंग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील आपला जनाधार गमावलेला आहे,तरीही कॉंग्रेस पक्ष इतर सेक्युलर किंवा समविचारी पक्षांशी युती किंवा आघाडी करतांना इतरांना कमी लेखुन एक जागा देतो,दोन जागा देतो अशी मग्रुरीची भाषा वापरतो आहे हा कॉंग्रेसचा अहंकार कॉंग्रेस पक्षाला संपवणारं यात शंकाच नाही...!
      मित्र पक्षांना विश्वासात न घेता केवळ कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपसात बसुन जागा वाटप करतात आणि ,राजू शेट्टी यांना एक जागा सोडली,शेकाप ला एक जागा दिली,अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी सोडली अशी सरंजामी भाषा बोलतं आहेत,ही नशा,हा तोरा,हा अहंकार कॉंग्रेस पक्षाने त्यागला पाहिजे,नाहीतर जनता शिक्षित झाली आहे,तुमची घराणेशाही आता सामान्य माणसाला पसंत नाही...!
   तुमचे जातदांडगे उमेदवार छोटया छोटया जातीच्या ओबीसी बांधवांना मान्य नाहीत, तुमचं फसवं धोरण पुन्हा पुन्हा जनता स्विकारायला तयार नाही...!
    जो हौद से गयी ,वो बुंद से  आनेवाली नहीं....!
    कॉंग्रेस पक्षाने आपली सेक्युलर ही इमेज राखायची असेल तर इतर समविचारी पक्षांना सन्मानाने सोबतं घेऊन धर्मवादी, असहिष्णू आणि मनुवादी पक्षांना रोखण्यासाठी आता समंजस भुमिका घेऊन आघाडी करावी,भ्रमातुन बाहेर यावे.नाहीतर तुमचा जनाधार संपलेला आहेचं,२०१९ मध्ये कॉंग्रेस मुक्त भारत होईल आणि त्यासाठी कॉंग्रेस पक्षाचं धोरणचं कारणीभूत असेल...!
      कॉंग्रेस पक्षाला पर्याय म्हणून भाजप आणि भाजप पक्षाला पर्याय म्हणून कॉंग्रेस ही द्विपक्षीय देवाणघेवाण सुरु राहिलं या भ्रमातुन कॉंग्रेस पक्षाने बाहेर पडले पाहिजे...!
    कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाचं धोरण एकचं किंवा सारखेचं आहे अशी धारणा असलेली नवी पिढी तयार झाली आहे, त्यामुळे भाजपला घालवण्यासाठी म्हणून जनता आता आम्हालाचं निवडून देईल या भ्रमातून कॉंग्रेस पक्षाने बाहेर पडावे,नाहीतर जनता कॉंग्रेस पक्षाला आता पुर्णविराम देण्याच्या मनस्थितीत आली आहे हेही लक्षात घेतले पाहिजे...!
      जयभीम.
@.. भास्कर भोजने.

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...