Thursday, 11 April 2019

भाजपने केला अकोल्यातील कुणब्यांचा घात- सुमित वासनिक

भाजपने केला अकोल्यातील कुणब्यांचा घात- सुमित वासनिक

अकोला लोकसभा मतदारसंघात कुणबी नेते भाजपचे भाऊसाहेब फुंडकर सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. पण 1998 सालि निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर भाजपने अकोल्यात कुणबी समाजाला हळू हळू राजकारणातुन हद्दपार करण्याचा डाव खेळायला सुरुवात केली. लोकसभेला पराभव झाल्यानंतर 2004 मध्ये पुन्हा भाजप कडुन निवडून यायची संधी होती तेंव्हा भाजपने भाऊसाहेबांचं तिकीट कापलं आणि संजय धोत्रे यांना उभं केलं. भाऊसाहेबांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्यानंतरही भाजपने जाणीवपूर्वक भाऊसाहेबांना उमेदवारी नाकारून संजय धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळेस भाऊसाहेब संसदेत गेले असतेतर केंद्रीय मंत्री झाले असते हे ओळखूनच अकोल्यातील सहकार लॉबीने आपले वजन वापरून भाऊसाहेबांचं तिकीट कापायला लावले होते असे आजही जिल्ह्यातील जुने जाणकार सांगतात. भाऊसाहेब फुंडकरांच्या जागी संजय धोत्रे खासदार झाल्यावर धोत्रेंनि अकोल्यातील कुणबी नेते संपविण्याचा सपाटाच सुरू केला. भाऊसाहेब फुंडकरांच्या नंतर 2004 मध्ये भाजप कडुन आमदार असलेले नारायण गव्हाणकर यांना राजकारणातुन संपविण्याचा नवीन डाव भाजपने आणि खासदार संजय धोत्रेंनि आखला होता.


2004 ते 2009 मध्ये बाळापूर मतदारसंघातून आमदार असलेले भाजपचे नारायणराव गव्हाणकर यांना पाडण्यासाठी 2009 मध्ये त्यांच्या विरोधात मराठा समाजातील अपक्ष उमेदवार उभे करण्यात आले होते. हे अपक्ष उमेदवार संजय धोत्रे यांनीच उभे केले होते हे कोणापासूनही लपलेले नाही. मराठा अपक्ष उमेदवारांचा परीणाम असा झाला की गव्हाणकरांना अपेक्षीत असलेले मतदान मिळालं नाही आणि यामुळे गव्हाणकारांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 2009 मधील निवडणुकि पासूनच नारायण गव्हाणकारांना राजकारणातुन संपवायची कसरत सुरू झाली होती. ज्या पक्षाला कुणबी समाजाने वाढविले त्याच पक्षाने जिल्ह्यातून कुणबी नेतृत्व संपविण्याचे काम केले. भाजप मध्ये खासदार संजय धोत्रें कडुन होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून गव्हाणकारांना भाजप सोडावी लागली होती. भाजप सोडून काँग्रेस मध्ये गेलेल्या गव्हाणकरांना आश्वासन देऊनही 2014 मध्ये लोकसभेचि उमेदवारी नाकारण्यात आली होती. गव्हाणकारांना उमेदवारी नाकारून काँग्रेसनेही कुणब्यांची अवहेलनाच केली होती. गव्हाणकर आता पुन्हा भाजप मध्ये आले आहेत पण खासदार धोत्रें कडुन त्यांना त्रास देणे अजूनही थांबलेले नाही. जिल्ह्यात भाजपमध्ये कोणताही कुणबी नेता मोठा होऊ नये असे संजय धोत्रेंना वाटते म्हणून ते जिल्ह्यात कुणबी नेत्यांचे पंख छाटण्याचे काम विना थांबता करत असतात असे ठाम मत अकोल्यातील कुणबी समाजाचे झाले आहे.


ज्या भाजप पक्षाला जिल्ह्यात आपण उभे केले त्याच पक्षातून आपल्यावरच अन्याय करण्यात येत असल्याची भावना अकोल्यातील कुणबी समाज बांधवांमध्ये वाढीस लागली आहे. ज्याने जिल्ह्यातून आपले नेतृत्व संपविले त्याला यावेळी निवडणुकीत पाडून आपण धडा शिकवला पाहिजे असे कुणबी युवक उघडपणे बोलत आहेत.

एकंदरीत म्हणायचे तर संजय धोत्रे यांनी भाजपमध्ये पूर्ण जिल्ह्यात इतर कोणासही मोठं न होऊ देण्याचा जो कार्यक्रम चालविला त्याचे परिणाम त्यांना या निवडणुकीत भोगावे लागतील असे दिसते आहे.

Sunday, 7 April 2019

प्रस्थापितांना वंचित बहुजन आघाडीची एवढी धास्ती का वाटते? - सुमित वासनिक

प्रस्थापितांना वंचित बहुजन आघाडीची एवढी धास्ती का वाटते? -  सुमित वासनिक

ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात ओबीसी, भटक्या आणि इतर अनेक जाती सोबत आल्या आहेत. हजारो वर्षे आपले शोषण झाल्यावर स्वातंत्र्योत्तर काळातही प्रस्थापित पक्षांनी आपले शोषण संपविले नाही, उलट आपल्या मतांवर निवडून येऊन प्रस्थापित पक्षांनीही आपले शोषणच केले आहे अशी भावना आता या सर्व वंचित जातींमध्ये वाढीस लागलेली आहे. सत्तेतील आपला वाटा मिळावा, आपल्यालाही प्रतिनिधित्व मिळावं या हेतूने हे सर्व जातीसमूह एक झालेत आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 48 च्या 48 जागांवर प्रस्थापितांसमोर दंड थोपटून उभे झालेत.

वंचित बहुजन आघाडीच्या या झंझावाताला पूर्ण महाराष्ट्रात अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो आहे. आघाडीला मिळत असलेला हा प्रतिसाद पाहून भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शीवसेना या पक्षांनी आणि स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या काही पत्रकारांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी आणि ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात गरळ ओकणे सुरू केलेले आहे. यासर्वांचा एककलमी कार्यक्रम झालेला आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या एकाही उमेदवारास विजयी न होऊ देणे. या लोकांनि वंचित बहुजन आघाडीचा एवढा धसका का घेतला आहे? ज्यांना हजारो वर्षे वंचित ठेवण्यात आले आहे त्यांच्यापैकी एकही जण संसदेत पोहचावा असे यांना का वाटत नाही? हे वंचितांचा विरोध का करतायत?

 वरील प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या जागा निवडून आल्यावर राजकारणात  काय फरक पडेल हे समजून घेतले पाहिजे. आघाडीच्या जागा निवडून आल्यास महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील वंचित जातींमध्ये एक विश्वास निर्माण होईल तो म्हणजे आपल्या सारख्या वंचित जातींनी मिळून प्रस्थापितांना आव्हान दिल्यास आपण या प्रस्थापितांना हरवू शकतो. आपल्या जवळ कोणतेही  संसाधन नसलेतरि, पैसे नसलेतरी आपण या जातीयवादी धनदांडग्यांना हरवून सत्ता मिळवू शकतो. हा विश्वास , ही भावना एकदा का वंचितांच्या डोक्यात घट्ट बसली की देशातील सर्व वंचित आपआपल्या राज्यात एक होतील आणि महाराष्ट्रा प्रमाणे प्रस्थापितांच्या समोर आव्हान उभे करतील. वंचितांच्या एकत्र शक्तीने प्रत्येक राज्यात प्रस्थापितांची सत्ता , प्रस्थापितांचे वर्चस्व संपुष्टात येईल. यासोबतच फक्त लोकसहभागाने कमी पैश्यात निवडणुका जिंकता येतात हे सुद्धा समाजमनावर आपोआप बिंबविले जाईल, यामुळे भारतातील निवडणुकांना धनदांडग्यांच्या कचाट्यातून मुक्तता मिळेल. पैश्या अभावी निवडणुकांपासून दूर राहणारे वंचित आत्मविश्वासाने निवडणुका लढवायला लागतील. एकदा का हा बदल झाला की भारतातील राजकारणावर असलेली सवर्णांची एकाधिकारशाही संपुष्टात येईल आणि पूर्ण देशात वंचितांच्या राजकारणाचे नवे पर्व सुरू होईल. प्रस्थापित पक्षांना नेमके हेच नको आहे. 

महाराष्ट्रात येत्या सहा महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. लोकसभेत वंचित बहुजन आघाडीच्या काही जागा निवडून आल्यास  महाराष्ट्रातील वंचित जातींमध्ये जो आत्मविश्वास आणि सत्तेची ओढ निर्माण होईल त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेला आघाडीच्या कमीतकमी 60-70 जागा स्वबळावर निवडून येतील. वंचित बहुजन आघाडीच्या 50च्या वर जागा निवडून आल्यातर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा वंचित समूहातून असेल. प्रस्थापित पक्षांना याच बदलाची धास्ती लागलेली आहे. याच कारणातून काँग्रेसने वंचितांसोबत युति केली नाही, याच कारणाने वंचित बहुजन आघाडिला बदनाम करायचा प्रयत्न केल्या जात आहे. 

वंचित बहुजन आघाडिला मिळत असलेला अतिप्रचंड पाठिंबा पाहून देशातील अनेक राज्यांमधून ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांना वंचितांचा हा पॅटर्न त्यांच्या राज्यातही राबविण्यासाठी बोलविणे सुरू झाले आहे , यावरूनच लक्षात घ्या वंचित बहुजन आघाडी देशातील राजकारणात वंचितांचे स्थान निर्माण करणार आहे याची चाहूल प्रस्थापितांना लागलेली आहे. त्यामुळेच प्रस्थापित आणि त्यांचे दलाल असलेले पुरोगामी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते बिथरले आहेत. मित्रांनो वंचित बहुजन आघाडीच्या जागा निवडून आणा आणि या बिथरलेल्या प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून द्या. तुम्ही दिलेलं मत हे वंचित समूहांच्या येणाऱ्या पिढ्यांचे वंचितपण दूर करेल हे लक्षात ठेवा.

Wednesday, 3 April 2019

......सेम बाबासाहेबच - मनोज काळे, ठाणे

......सेम बाबासाहेबच

- मनोज काळे, ठाणे


फुरोगामी पनाचा बुरखा पांघरलेले नकली लोकशाहीवादी लोक गोपिचंद पडळकरांच्या वंचित बहुजन आघाडीतील  सहभागाबद्दल जराही तारतम्य न बाळगता, जराही विचार न करता द्वेश, राग व तिरस्कार व्यक्त करताना दिसले, तेव्हा याचा मी विचार केला व मला काय जानवले ते वाचा,

काही काळ भाजपा पक्षात काम केलेल्या गोपीचंद पडळकर या धनगर समाजाच्या एक अतिषय लोकप्रिय, हुशार नेत्याने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला, वंचित बहुजन आघाडी चा कणा बनलेल्या धनगर समाजाचे ते एक अतिषय भक्कम नेते आहेत, धनगर आरक्षणावरुन त्यांचा भाजपाशी वाद झाला व त्यांनी वैचारिक मतभेदातुन भाजपा सोडली व इतर धनगर नेत्यांप्रमाणे बाळासाहेबांचे नेतृत्व स्विकारले. आता असे भरकटलेले तरुन जर मनुवादी संस्कृती व घरानेशाहीची मुजोरी लक्षात आल्यास त्यापासुन दुर जाऊन आंबेडकरी चळवळीत येऊन  मनुवादी संस्कृतीशी लढुन त्यांच्या भुतकाळातील चुकांचे प्रायश्चित करणार असतील तर आपण त्यांना का स्विकारु नये? त्यासाठी आपन बाबासाहेबांच्या जीवनातील एक प्रसंग आठवुन पाहु.


बाळासाहेबांंना पाहुन ग भीम परतुन आल्यासारख वाटतय...हे गीत आपन रोज ऐकतोय पन बाळासाहेब खरोखरच बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकुन हा चळवळीचा रथ पुढे चालवत आहेत हे आपनास पटेल.

ज्यावेळी बाबासाहेबांना भारतातील अस्पृश्यांना ब्राह्मणी धर्माच्या जाचातुन मुक्त करण्याचे पहीले चवदार तळ्याचे आंदोलन छेडले होते त्यावेळी काही ब्राह्मणांच्या विरोधात काम करणारे लोकही त्यांचे काम करत होते, त्यांच्या संघटना कार्यरत होत्या त्यापैकि एक होते प्रसिद्ध *जेधे जवळकर ,या दोघांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहुन सुचना केली होती की "आंबेडकर साहेब, तुम्ही जे अस्पृश्यता निवारनाचे काम करत आहात ते अतिषय मोलाचे आहे, आम्ही पन तुमच्या कार्यात सहभाग घेऊ इच्छितो पन अट आहे की आपल्या संघटनेत एकाही ब्राह्मणाला घेऊ नये"*


डॉ बाबासाहेब आंबेडकर हे प्रचंड लोकशाहीवादी होते, *बाबासाहेबांनी जेधे जवळकरांची ती कट्टरवादी मागणी फेटाळुन लावली  इतकेच नव्हे तर चवदार तळे मुक्तीच्या त्या आंदोलनात चित्रे, टिपनीस, सहस्त्रबुद्धे यांना बाबासाहेबांनी पुढाकार दिला, त्यांच्याच हातुन मनुस्मृतीचे दहन करुन घेतले*


आता आपन बाळासाहेबांनी सुरु केलेल्या वंचित बहुजन आघाडी या लोकचळवळीकडे पाहुयात, आज संविधान विरोधी विरुद्ध संविधान समर्थक अशी राजकीय लढाई होत आहे, त्या चळवळीचे नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर करत आहेत, त्यामुळे संविधानाच्या रक्षणाचा मुद्दा आजवर ज्या ज्या लोकांना महत्वाचा, जिव्हाळ्याचा वाटतो त्यांनी बाळासाहेबांचे नेतृत्व माणुन काम करण्याची तयारी दाखवली आहे, ही मोठी क्रांतीकारी घटना आहे, आपनही अशा *भरकटलेल्या पण आता आंबेडकरी वादळ पाहुन जागृत झालेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्यात सामावुन घेऊन आपली संविधान रक्षणाची लढाई लढले पाहीजे.*


राजगृहाकडे चला चा नारा देत असताना जे लोक राजगृहाकडे येत आहेत त्यांचे खुल्या दिलाने स्वागत केले पाहीजे, बाबासाहेबांनी जी लोकशाही आपनास दिली ती तशीच आपन ती जपायची आहे व ती वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातुन तळागाळापर्यंत पोचवायची आहे, 

बाबासाहेबांच्या चवदार तळ्याच्या आंदोलनातुन आपल्या अस्पृश्यतेला वाचा फुटली व त्या अस्पृश्यतेला संविधानाने कायद्याने समाप्तच केले. 


संविधानाने आपल्याला उन्नतीसाठी लोकशाही दिली, पन लोकशाही घरानेशाहीने कैद केली, त्या कैदेतुन लोकशाहीला मुक्त करण्यासाठी मोठ्या व्यापक भावनेतुन वंचित बहुजन आघाडी निर्माण झाली आहे, चवदार तळ्याच्या आंदोलना प्रमाणेच 2019 ची वंचित बहुजन आघाडीची ही लोकचळवळ महत्वपुर्ण आहे, आपन त्या वेळी नव्हतो पन आज आपन या आंदोलनात सहभाग घ्यावा, बाबासाहेबांना आपन साथ द्यायला नव्हतो, आपन बाळासाहेबांना साथ देऊयात, बाळासाहेब हे प्रति बाबासाहेबच आहेत, त्यांची प्रत्येक कृती ही लोकशाही व आंबेडकरी चळवळ यासाठी मैलाचा दगड आहे.


ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी चवदार तळ्याच्या हजारो वर्षांचा बामनवादाशी लढा देताना काही परिवर्तनवादी ब्राह्मणांना सोबत घ्यायला संकोच केला नाही, सेम तसेच आज बाळासाहेब आंबेडकरांनीही सत्तर वर्षांची घरानेशाही मोडण्याच्या या लढ्यात गोपीचंद पडळकर सारखा विरोधी गोटात राहुन, तिकडची कार्यप्रणाली,तिकडचे मनुवादी वातावरन, जातीवादी धोरने पाहुन त्यांना लाथाडुन आज जागृत होऊन वंचित आघाडीला साथ द्यायला तयार झाले त्यांचे कौतुक करीवे ते कमीच आहे, पण त्यांना स्विकारुन श्रद्धेय बाळासाहेबांनी जो लोकशाहीवादी निर्णय घेतला ते पाहिल्यास मनात आपसुकच शब्द आले.... 

सेम बाबासाहेबच


- मनोज नागोराव काळे, 8169291009

Tuesday, 26 March 2019

या गर्दीमागचे कोडेे काय- राजेंद्र पातोडे

या गर्दीमागचे कोडेे काय- राजेंद्र पातोडे

आज उभ्या महाराष्ट्राला एकाच गहन प्रश्नाचे कोडे उकलत नाहीय आणि ते म्हणजे वंचीत बहुजन आघाडीच्या प्रत्येक सभेला रेकॉर्डब्रेक लाखोंची गर्दी कशी जमते? जिथे सत्ताधारी आणि विरोधकांना पंचवीस-पन्नास हजार माणसे गोळा करायला घाम फुटतोय, तिथे बाळासाहेब आंबेडकरांच्या सभेला सलग जमणारा लाखोंचा जनसागर येतोच कसा हा यक्ष प्रश्न सध्या देशातील मनुवाद्यांची झोप उडवीत आहे.बरं ह्या ‘मास चा एकच क्लास आहे’ असेही नाही.अगदी उच्च शिक्षित, गर्भ श्रीमंत, उद्योजक व्यापारी, वकील, प्राध्यापक, इंजिनीयर,आयटीयन्स पासून ते थेट कलावन्त,विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी – शेतमजूर ते अगदी सामान्य माणूस अगदी तृतीयपंथी देखील ह्या सभेला आवर्जून हजर असतात.प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस आणि गुप्तचर खातं देखील हैरान असतं. नेमका आकडा किती द्यायचा हा अंदाजच बांधता येत नाही.


कारण त्या त्या जिल्ह्यात आर्थिक परिस्थिती बेताचीच असलेले भारिप बहुजन महासंघ, वंचीत बहुजन आघाडीच्या घटक असलेल्या पदाधिकारी कार्यकर्ते आहेत.त्यात कुणीही गडगंज संपत्तीचे मालक नाहीत.म्हणावी तशी कार्यकर्त्यांची कुमकही नाही. इतर राजकीय पक्षा प्रमाणे पुरविली जाणारी रसद नाही, कुणीही स्पॉन्सर नाही.कुठेही पावती पुस्तकं नाही, वर्गणी नाही.नियोजन आणि सभेची तयारी म्हणून विशेष काही दिसत नाही.राबणारे हात देखील लिमिटेड दिसतात.तरीदेखील सभेचे भले मोठे मैदानच बुक केले जाते.लोकवर्गणीतून उभा केलेला भव्य स्टेज आणि क्वालिटी साउंड सिस्टीम तसेच सभा लाईव्ह दिसावी म्हणून लावलेले स्क्रीन्स ह्या पलीकडे कोणताही तामझाम दिसत नाही.


वर्तमानपत्रात किंवा मीडियात जाहिराती नसतात.माणसं आणायला वाहनं व्यवस्था नसते, जेवणाची पाकीटं, बिसलेरी आणि मजुरी दिली जात नाही, मैदानात बसायला खुर्च्या नाहीत की रखरखत्या उन्हात डोक्यावर मंडप नाही.तरीही तौबा गर्दी होते.शहर पूर्णवेळ जाम झालेलं असते.महिला पुरुष आणि युवक युवतींनी मैदानं ओव्हरफ्लो होतात.दुपारी २ पासून मैदान भरायला सुरुवात होते ते थेट रात्री सभा संपेपर्यंत कायम असते.प्रत्येक सभेला हा आकडा वाढतच आहे.त्या मुळे संघ भाजपासहीत काँग्रेस-राष्ट्रवादीला धडकी भरली आहे.पूर्वी दखल न घेणा-या मिडीयाला आता ह्या सभा लाईव्ह करावं लागताहेत, कव्हर करावं लागते.सम्पूर्ण महाराष्ट्रात हाच पॅटर्न कायम झाला आहे.राज्यात सलग होत असलेल्या वंचीत बहुजन आघाडीच्या सभांना जनप्रतिसादाचा आलेख वाढत गेलेला दिसतो.नव्या इतिहासाची नांदी ठरणा-या सभांच्या यशाचे गमक काय असावे? हा प्रश्न एकदाच उलगडून दाखवावा म्हणून केलेला लेखन प्रपंच.


इतिहासात प्रथमच ‘वंचित’ ह्या शब्दाची व्याख्या वंचीत समूहाच्या लक्षात आली आहे.आणि ह्या आत्मभानातूनच अनेक लहान लहान जाती समूहांनी आपला आवाज बुलंद करण्यासाठी वंचीत बहुजन आघाडीत ऍड बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाची कास धरली आहे.त्यामुळे आजवर सत्ताधारी म्हणून वावरलेल्या सर्व पक्षांनी आपला ‘वोटींग मशीन’ म्हणून कायम कसा वापरच केला आहे हे मांडलं जाऊ लागले आहे. ७० वर्षात आम्ही सत्ता आणि संपत्ती, संधी वंचित कसे राहिलो हे अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, भटके विमूक्त, अल्पसंख्यांक समूहाला ह्या सभेच्या माध्यमातून पटायला लागले आहे.त्यातून दररोज अगदी लहान लहान समूहाच्या संघटना, नेते, कार्यकर्ते ह्या लोकजागरात सहभागी व्हायला लागलेत.कुठलंही आर्थिकच पाठबळ नसलं तरी आपण हा लोकलढा उभा करू शकतो.यशस्वी करू शकतो, हे सभेगणिक सिद्ध व्हायला लागल्याने.कार्यकर्ते आणि पदाधिका-यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.त्या मुळे ह्या सभा वंचीतांचा संवाद,वंचीतांचा हुंकार,वंचीत एल्गार, आणि वंचितांचा सत्ता संपादन निर्धार ह्या वेगवेगळ्या टायटलखाली गाजायला लागल्यात.


सभेच्या सुरुवातीला ऍड बाळासाहेब आंबेडकर आणि बॅरिस्टर अससोद्दीन ओवेसी ह्यांचेसह नेते मंडळींची एंट्री हा ग्रँड इव्हेंट ठरतो.पांढ-या एसयूव्ही मध्ये असलेले बाळासाहेब,त्यांचे पाठोपाठ आलेला गाड्यांचा काफिला, त्याला एस्कॉर्ट करणारे काळ्या कपड्यातील सोशल कमांडो, गाड्यापाठी उस्फुर्तपणे ध्वज घेऊन धावणारे तरुण आणि स्टेजवरून दिल्या जाणा-या घोषणांना तेवढाच बुलंद प्रतिसाद देणारा लाखोंचा समूह यामुळे सभेत जोश भरतो.अगदी रणमैदानावरील रणभेरी आणि युद्धाची सुरुवात वाटावी असा तो क्षण असतो.स्टेजवर बसलेल्या नेत्यांना बांधलेले विविध रंगांचे फेटे हे तमाम वंचितांचे सामाजिक प्रतिनिधीत्व करीत एक विशिष्ठ रंग आणि धर्माची मक्तेदारी आम्ही मोडून काढलीय हे दिमाखाने सांगत असतो. त्या स्टेजकडे पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील आणि संकल्पनेतील धर्मनिरपेक्ष भारत आणि रिपब्लीकन पक्ष प्रत्यक्षात उतरल्याचे दिसते.


त्या नंतर सभेला साज चढतो तो सभेतील वक्त्यांच्या पोटतिडकीने मांडलेल्या अभ्यासू व जोशपूर्ण भाषणांनी.त्यात देश, संविधान आणि सर्वहारा समूहाचा उत्थानाची भलावण केली जाते.सत्ता हस्तगत करण्याचा निर्धार असतो.येथल्या व्यवस्थेला आपला वाटा मागण्याचा इशारा असतो.वंचीताच्या विविध घटकातील वक्ते त्यांच्या समूहाच्या वेदना मांडताना उपस्थितांच्या काळजाचा वेध घेत असतात.आमदार इम्तियाज जलील आणि खासदार ओवेसी ह्यांची उर्दू हिंदीतील फटकेबाजीने सभेचा नूर बदलून जातो.


सरतेशेवटी एड बाळासाहेब आंबेडकर आपली भूमिका मांडतात.अत्यंत संयमितपणे,अभ्यासपूर्ण भाषणातून आपण हा वंचितांचा लढा का उभा केलाय, तो कसा यशस्वी होणार, त्यासाठी काय पथ्य पाळली पाहिजे, सत्ताधारी होणे म्हणजे काय आणि सत्ता कशी मिळवायची हा मूलमंत्र ते सांगतात.सोबतच भाजप आणि संघ हा कसा विषमतावादी आहे, सनातनी आहे, देशातील मनुवादी व्यवस्थेने देशातील संविधान आणि संवैधानिक व्यवस्था कशी धोक्यात आली आहे.२०१९ लढा जिंकल्याशिवाय देशातील मनुवाद पराभूत होऊ शकत नाही.ही अभ्यासपूर्ण मांडणी करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे खरा चेहरा देखील जनतेसमोर आणतात.


बाळासाहेब बोलायला उभे राहिले की प्रचंड घोषणा व आतिषबाजी होऊन पिनड्रॉप सायलेन्स होतो.जसजसं भाषण पुढे जाते तसे टाळ्यांचा व घॊषणाचा आवाज व प्रतिसाद अधिक वाढतो.ते जेव्हा मोदी आणि संघाला आव्हान देतात तेंव्हा जनतेने अख्ख मैदान डोक्यावर घेतलेलं असते.”स्वतःचा मिडीया स्वतः उभा करा.माझा कार्यकर्ताच माझा मिडीया आहे”.ह्या त्यांचे आवाहनाला अनुसरून लाखोचा समूह स्वतः तल्लीन होऊन ऐकत असताना बाळासाहेबांचा मिडीया म्हणून आपल्या मोबाईलवर हे भाषण लाईव्ह करीत असतात.सोबत प्रबुद्ध भारत ची टीम देखील हे सर्व जनतेपर्यंत पोहचवीत असते.त्यातून इतर जिल्ह्यातील वंचीत समूह ऊर्जावंत होत जातो.


आपल्या जिल्ह्यात वंचीत बहुजन आघाडीची सभा कधी आहे, ह्याची माहिती होताच त्या त्या जिल्ह्यातील सामाजिक संघटना भारिप बमसं,एमआयएम, वंचीतचे पदाधिकारी कार्यकर्ते आम्हीही सत्ताधारी होणार ह्या निर्धाराने कामाला लागतात.त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळतो तो महाराष्ट्रातील जनतेचा.हजारो वर्षे माणूसपण नाकारलेल्या आणि व्यस्थेने गुलाम केलेल्या व्यवस्थेच्या मुळावर घाव घालण्याचा निर्धार घेऊन वंचीत समूह सहभागी होत चाललेत.त्यांनी आता ऐक्य, युती, आघाडी ह्या शब्दांना कायमची मूठमाती दिली आहे.’बहुजन सारे एक होऊ, सत्ता आपल्या हाती घेऊ’ या निर्धाराने पेटून उठलेल्या समूहांनी ही आरपारची लढाई लढण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात आपली ताकद वंचीत बहुजन आघाडीच्या पाठीशी उभी केल्याने ह्या विक्रमी सभा सलगपणे यशस्वी होत आहेत.लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि गिनीज बुक मध्ये ह्या सलग सुरु असलेल्या लाखोंच्या सभांची नोंद व्हावी असा प्रयत्न तर होणारच आहे.सोबतच देशाची सत्ता वंचितांची असावी हाच अंतिम लढा यशस्वी करण्याची लोकभावना बाळासाहेबांनी वंचीत समूहात पेरली.त्याच भावनेचे मूर्त रूप म्हणजे लाखोंच्या सभा आहेत.शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार, एड. बाळासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व,वंचीत समूहाची साथ, सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य जनतेचे पाठबळ हेच सर्व ऐतिहासिक सभाच्या विक्रमी उपस्थितीच्या यशाचे गमक आहे.


ह्याचे रूपांतर वंचीत बहुजनांच्या सत्तेत झाल्या शिवाय राहणार नाही हे मात्र निर्विवाद सत्य आहे.


-राजेंद्र पातोडे,अकोला

वंचितांना विनातारण कर्ज - सुमित वासनिक

वंचितांना विनातारण कर्ज - सुमित वासनिक

केस कापणे हा नाभीकांचा व्यवसाय पण आज भारतात केस कापणाऱ्या ज्या सर्वात मोठ्या आणि महागड्या सलून आहेत त्यामध्ये एकही नाभिकाची सलून नाही.

चामड्याच्या आणि चपलांचा व्यवसाय करणाऱ्या चांभार समाजातील एकाही व्यक्तीचा मोठा चामड्याच्या व्यवसाय नाही, चप्पल आणि बूट बनविणाऱ्या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये एकही कंपनी चांभाराची नाही.

आपल्या हाताच्या जोराने लोखंडाला आकार देऊन आपला उदरनिर्वाह चालविणाऱ्या लोहार समाजातील एकही व्यक्ती लोखंडाच्या व्यवसायात पुढे येऊ दिला गेलेला नाही.

वंचित बहुजन असलेल्या असंख्य अलुतेदार बलुतेदार जातींवर मनूच्या व्यवस्थेने जन्मजात काही कामे लादली ,त्यांना शिक्षणापासून दूर ठेवले. त्यासर्व जातींमधील लोक आपल्यावर लादण्यात आलेल्या  कामात निपुण झाली आहेत. आपल्या अंगी तयार झालेल्या या गुणांमुळे काही लोकांची कामे करून या जातींमधील लोक आपला उदरनिर्वाह चालवायचे. पण या जाती करीत असलेल्या कामांचे जेंव्हा व्यावसायिकरण झाले तेंव्हा या जातींना त्यांच्याच कामात पुढे जाण्यापासून थांबवण्यात आले. वर नाभिक, चांभार आणि लोहार जातींची उदाहरणे दिली आहेत त्यावरून आपण हे समजू शकतो. ज्यावेळी या जाती करीत असलेल्या कामांना व्यावसायिक रूप आले तेंव्हा सवर्ण जातींमधील लोकांनी या कामांची मोठमोठी उद्योगं सुरू केली आणि त्यातून भरमसाठ कमाई केलि. 

इथे अनेकांना हा प्रश्न पडला असेल की अलुतेदार, बलुतेदार करीत असलेले काम येत नसतांनाही सवर्ण या कामांचे मोठमोठे उद्योग कसे उभे करू शकले? आणि ज्यांची ही कामे होती त्या वंचित जाती मागे का पडल्या? या वंचित अलुतेदार-बलुतेदार जाती म्हणजे गरीब लोक, यांच्याकडे आपला व्यवसाय वाढवायला पैसा नाही, भांडवल उभे करायला पैसे नाही. बँकेकडे तारण ठेवायला मालमत्ता नाही , विनातारण बँक कर्ज देत नाही. या कारणामुळे हा वंचित समाज व्ययसायात पुढे येऊ शकलेला नाही. त्याचवेळी हजारो वर्षे सत्ता, संपत्ती आणि शिक्षणावर ठाण मांडुन बसलेल्या सवर्णांनी वंचितांचा वाटा बळकावून जमा केलेल्या मालमत्तेच्या जोरावर मोठमोठे व्ययसाय उभारले, यासाठी बँकांनी यांना हवे तेवढे कर्ज सुद्धा दिले.

या वंचित अलुतेदार-बलुतेदार जातींनाही जर व्यवसाय वाढविण्यासाठी कर्ज मिळाले असतेतर आज या जातींमधील व्यक्ती सुद्धा नावाजलेल्या उद्योगपती तयार करू शकल्या असत्या पण या देशातील प्रस्थापित काँग्रेस आणि भाजप सारख्या पक्षांनी हे कधीही होऊ दिले नाही, या प्रस्थापित पक्षांनी सवर्णांचे हित जोपासण्यासाठी वंचितांवर केलेला हा सर्वात मोठा अन्याय आहे. व्ययसायात पुढे जाण्यात येणारी ही अडचण ओळखून ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यास सर्व वंचित जातीसमूहांना व्यवसायासाठी विनातारण कर्ज देण्यात येईल असे जाहीर केले आहे.

मित्रानो आपले प्रश्न ओळखा, ज्या गोष्टी आपला विकास होण्यापासून थांबवत आहेत त्यांच्या विरोधात लढणाऱ्या ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या खांद्याला खांदा लावून लढा. लक्षात ठेवा संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही!

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...