Friday, 10 April 2020

भिमजयंतीेचे स्वरुप ( आत्मचिंतन)


भीमजयंतीचे स्वरुप - महामानवाचा सन्मान की ..........?
( आत्मचिंतन)
- मनोज नागोराव काळे. 

मित्रांनो, सदर लेखाचे शीर्षक कदाचित तुम्हाला खटकण्याची शक्यता आहे, पन वास्तवाचे भान व डॉ बाबासाहेब यांच्या विचारांप्रती तुम्ही प्रामाणिक राहुन थोडासा विचार केलात तर तुम्ही या शीर्षकास व या पारंपारिक चालत आलेल्या जयंती स्वरुपावरील लेखास दुजोरा द्याल यात मला शंका वाटत नाही.
वरवर पाहिले तर भारतभरात किंवा आपल्या महाराष्ट्रात भीमजयंती म्हणजे मोठा उत्सव, भीमजयंती म्हणजे आमचा एकमेव सण, भीमजयंती म्हणजे आमचा बाप येतोय, भीम जयंंती म्हणजे फक्त जल्लोष अशा प्रकारचे एक स्वरुप दिसते, प्रत्येकजन या दिवसाची वर्षभर वाट पहाताना दिसतो.
आणि सर्वांच्या प्रतिक्षा संपवत १४ एप्रिल चा दिवस येतो व सर्वांचा जल्लोष एकदाचा घडुन येतो, महाराष्ट्रात तर भीम जयंती पासुन बुद्ध जयंती या दरम्यान साधारन एक महिनाभर हा कार्यक्रम वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो, मी मराठवाड्याचा असल्यामुळे मी या सर्व जयंत्या स्वतः पाहिल्या आहेत व ते उघड्या डोळ्यांनी पाहुन, बाबासाहेबांचे लिखान वाचल्यानंतर मला एक गोष्ट ध्यानात आली आहे की भीम जयंती दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचा गौरव होत नसुन त्या दिवशीच या महामानवाची त्यांच्याच भक्तांकडुन जाहिररित्या वाजत गाजत विटंबना केली जाते. हे सत्य मला नाईलाजाने मांडावे लागत आहे.
भिमजयंती ला आता आलेले स्वरुप म्हणजे एखाद्या संत माणसाने आयुष्यभर दारुबंदी साठी झटावे व नंतर त्यांच्याच भक्तांनी त्या संताच्या नावाने मोठे दारुचे दुकान लावण्यासारखेच आहे किंवा एखाद्या महापुरुषाने जीवनभर अहिंसा तत्वासाठी खर्ची घातले असतील त्याच महापुरुषाच्या नावाने कत्तलखाना सुरु करुन आम्ही त्या महापुरुषाचे अनुयायी आहोत व आम्ही त्या महापुरुषाचा हे दारु दुकान किंवा कत्तलखाना त्यांच्या नावाने सुरु करुन त्यांचा गौरव करत आहोत असे बोलण्यासारखेच आहे.
विषय खुप गंभीर आहे, विषय अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे त्यावर प्रत्येकाने वैयक्तिक आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
हे सत्य मांडुन आपल्यातीलच काही अज्ञानी किंवा अति बुद्धीजीवींच्या रोषाला मला सामोरे जावे लागेल याची कल्पना असुनही मी हे सत्य मांडायचे ठरवले आहे याला कारणही तसेच आहे, क्रांतीबा ज्योतीबा फुलेंनी लिहीलेला शेतकर्यांचा आसुड वाचत असताना जानवत होते की ब्राह्मनांनी हिंदु समाजाला लुबाडण्यासाठी अनेक सण, कर्मकांड व व्रत वैकल्यांना जन्म दिला आहे, त्यांना संस्कृतीचे नाव देऊन ब्राह्मन लोक बहुजनांनी स्वकष्टाने कमावलेला घामाचा पैसा अलगदपने त्यांच्यापासुन काढुन घेत असतो, हि संस्कृतीच्या नावाने बहुजनांची होणारी आर्थिक लुट आपन हिंदु धर्म सोडुन बौद्ध धम्म स्विकारल्या नंतर कमी होत गेली, तेव्हा भटांनी त्यांचा रोजगार हमी योजनेचा कार्यक्रम असलेला सत्यनारायण घरा घरात पोचवुन त्याच्या आडुन पैसे लाटायचा धंदा वाढवला पन तरीही काही बौद्ध व आंबेडकरी समाज सत्यनारायणाला स्विकारयला तयार नव्हता. त्यानंतर हळुहळु भीमजयंतीलाच वाढती लोकप्रियता पाहुन भांडवलदारांनी या दिवसाला मार्केट बनवले.
काही लोक भीमजयंतीचे आजचे आलेले विकृत स्वरुप पाहुन त्या कार्यक्रमाला "निळ्या कोटातला गणपती" म्हणतात, त्यात मलाही थोडा विचार केल्यास तथ्य आढळले. मागच्या विस वर्षात भिमजयंती व सार्वजनिक गणेशोत्सव यात फक्त मुर्तीचाच फरक उरला आहे, ते लोक गुलाल उधळतात तर आपन निळ उधळतो, ते लोक धांगडधिंगाना करुन विचित्र नाचतात तेच आपन डिजे भिमगितांवर करताना दिसत आहे, ते लोक गल्ली गल्लीतुन मिरवणुका काढुन चढाओढ करतात तसीच चढाओढ व मिरवणुकात स्पर्धा आपल्यातही असते. ते लोक जशी दादागीरी करुन वर्गनी गोळा करतात तसेच काही अपवादात्मक का असेना घडताना दिसतेच, ते लोक ऑर्केष्ट्रा ठेवतात, पत्ते खेळतात तर आपलेही लोक ऑर्केष्ट्रा ठेवतात, व त्याच भिम विचारांची विटंबना करणारे गाणे लावुन बिनधास्त नाचतात, भिम के लक्ते जीगर आधे इधर आधे उधर या गाण्याचे डिजे स्वरुपात लावुन नाचताना मी पाहीले आहे, जे गीत समाजाच कशी दुफळ्या पडल्यात हे सांगते त्याची लाज वाटायची सोडुन बुद्धीजीवी नाचताना दिसतात,
एक नविनच गीत आहे उडतो धुरुळा, ज्याचे प्रत्येक कडवे बाबासाहेबांच्या उच्च विचारांची विटंबना करणारे आहे ते गाणे लावुन बिनधास्त नाच केला जातो,
भिमगीत कशाला म्हणावे हे सुद्धा आजकालच्या गायक मंडळींना भान राहीले नाही, व ते लावुन नाचणारांना शुद्ध नाही.
निळा झेंडा हा बहुजन अस्मिता व विशालतेचे प्रतिक होता तो आता  फक्त धुरुळा उडवायच्या कामाचा राहीलाय का?
या गीतामध्ये मांडले आहे की आमच्या नादी लागनारांचे डोळे काढु, हात लुळा करु अशी भाषा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संपुर्ण जीवनात कधीतरी केली होती का?
बाबासाहेबांच्या नावावर बाबासाहेबांच्या विचारांची मोडतोड करणार्या गीतांना आपन भीमगीत का बोलतो? हे आणि असे अनेक गीते आता बाजारात आलेत जी बाबासाहेबांच्या पुर्ण जीवन संघर्षाचा अपमान करणारी आहेत. मी एक उदाहरना पुरते दिले आहे बाकी आपन सुज्ञ आहात, यापुढे गीतांचा अर्थ समजुन घ्याल अशी अपेक्षा करतो.
हिंदु लोक गणेश मुर्तीचे विसर्जन करतात पन आपन मात्र बाबासाहेबांच्या विचारांची विटंबना करतो हाच तो काय या दोन उत्सवात फरक दिसतो.
बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला त्याच्या फोटो किंवा मुर्तीसमोर दारु पिऊन बिभत्स नाचनारेही कमी नसतात, ही बाबासाहेबांची विटंबना नव्हे का?
ज्या महामानवाने एकीचे महत्व सांगताना जीवन खर्चले त्यांच्या जन्मदिनी आपापल्या गल्ली मोहल्ल्याच्या वेगवेगळ्या मिरवणुका काढुन, त्याची स्पर्धा करणे ही महामानवाच्या विचारांची विटंबना नव्हे का?
बाबासाहेब सुद्धा तथागत बुद्ध, क्रांतीबा फुले व कबीरांना आपल्या गुरुस्थानी मानत होते, पन त्यांनी या तीन महामानवांची जयंती अशा रितीने कधी साजरी केली असे आपनास दिसले का? कि आपन बाबासाहेबांना मानतो त्यापेक्षा बाबासाहेब त्या गुरुंना कमी प्रमानात मानत होते का?
बाबासाहेबांचे जीवन हाच आपल्यासाठी संदेश आहे असे आपन बोलतो मग आपन बाबासाहेबांच्या जन्मदिवशीच त्यांच्या विचारांना सर्वाधिक पायदळी का तुडवतो?
बाबासाहेबांनी त्यांचे आदर्श असलेल्या महामानवांना कशा स्वरुपात स्विकारले हे आपन का समजु शकत नाही?
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कबीरांच्या, फुलेंच्या, तथागत बुद्धांच्या विचांराना स्थापित करने महत्वाचे वाटले की त्यांच्या मुर्ती बसवने , स्मारके बांधने  व जयंत्या करने जास्त मोलाचे वाटले?
बाबासाहेब पुतळावादी असते पुस्तकवादी नसते तर आपला उद्धार झाला असता का? मग आपन का पुतळा, स्मारक यात अडकुन पुस्तकांपासुन, विचारांपासुन दुर झालोय?
आपन मार्ग भटकलोय, आपन ध्येयापासुन विरुद्ध दिशेने जातोय, आपन चळवळीच्या नावावर चळवळीचाच घात करतोय हे आपल्या लक्षात आलेले नाही पन हे चळवळीच्या शत्रुंना मात्र स्पष्टपने समजले आहे त्यामुळे तुम्हाला भाजपा, कॉंग्रेस, सेना, राष्ट्रवादी किंवा इतर मनुवादी राजकीय पक्षांचे पुढारी जयंती च्या वेळी भरघोस मदत करतात, हवी ती मदत पुरवतात कारण आपन जितके गाफिल राहु, आपन जितके ध्येया च्या विरुद्ध दिशेने चालु तितके त्यांच्या हिताचे रहाणार आहे, हे आपल्या लक्षातही येत नाही,
एखाद्या जयंती मंडळाने जर पुस्तकवादी, विचारांची देवानघेवान करणारी, चळवळीला योग्य मार्गावर नेणारी जयंती करायचे ठरवले तर पहा किती बौद्धेतर लोक त्याला मदत करतील.
जागृतीचा विस्तव तेवत ठेवा असे बाबासाहेबांनी सांगीतले होते पन असा जागृती करणारांना हे चाणाक्ष जातीवादि एकटे पाडतात व चंगळवादी चळवळ्या वळवळ्यांना भरघोस मदत करुन चळवळीला दिशाहीन कसे ठेवता येईल याचा प्रयत्न करतात.त्यामुळे भीमजयंती ला आलेले जत्रेचे स्वरुपच चळवळीला कमकुवत करण्यासाठी भीमद्रोही लोकांना सोयिस्कर व सोपा मार्ग सापडलेला दिसतो आहे.
भीमजयंती हे एक खुप मोठे मार्केट झाले आहे, झेंडे, निळ, पताका, फटाके व आतिषबाजी, इलेक्ट्रिक रोषनाई, डिजे, बैन्जो किंवा बैंड, आकाश कंदिले या गोष्टींची कोट्यावधींची उलाढाल होते व हा सर्व धंदा करणारे भांडवलदार हे उच्चवर्णिय, मारवाडी गुजरातीच प्रामुख्याने आढळतील.
ज्या आर्थिक लुटी पासुन आपले रक्षण व्हावे या हेतुने आपले कर्मकांड, जत्रा, देव देव , हिंदु धर्म यापासुन बाबासाहेबांनी आपणास सोडवले आपन बाबासाहेबांच्याच नावाने तो धांगडधिंगा पुन्हा आनला आहे व त्याला समाजमान्यताही मिळत आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांसमोर वेडेवाकडे नाचताना आपणास शरमही कशी वाटत नाही? त्यांनी एकट्याच्या बुद्धीच्या, नितीमत्ता व शीलाच्या जोरावर हजारो वर्षाचा इतिहास फक्त ३६ वर्षात बदलला आहे पन आपन लाखो लोख शिकुनही चळवळीला तसुभरही पुढे नेऊ शकलेलो नाहीत मग आपनास बाबासाहेबा समोर त्यांच्या जन्मदिनीच नाचने शोभते का?
बाबासाहेबांच्या जयंतीत लाखो रुपयांचा चुराडा करुन आपन बाबासाहेबांच्या विचारांचा अपमान करतोय याचे भान कधी येणार आहे की नाही?
एक दिवस नाचनार बाकी दिवस वाचनार असे बोलणा-यांनी मागील ३६४ दिवसात काय वाचले आहे व त्या वाचनाचा समाजाच्या प्रगतीसाठी कसा उपयोग करणार?
बाबासाहेबांनी जर त्यांच्या आदर्शांची जयंती साजरी करताना फक्त त्या महापुरुषांच्या विचारांना आचरणात आणणारी पिढी निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले होते मग आपन बाबासाहेबांना गणपती सारखे स्वरुप देऊन काय साध्य करत आहोत याचे चिंतन व्हायला हवे.
बाबासाहेबांच्या जयंतीला आपन आजवर काय केले व येत्या वर्षभरात काय करायला हवे यावर विचारमंथन होण्याची प्रथा आपल्याकडे असती तर गेल्या साठ वर्षात आपन साठ वेळा आपन आपले स्वताचे मुल्यमापन केले असते व साठ वेळा एक एक वर्षाचे ध्येय धोरने आखुन बराच मार्गक्रमन केले असते, पण माझा जन्म १९८४ ला झाला तेव्हा पासुन आतापर्यंत भीमजयंती म्हणजे काय असते हे दरवर्षी पाहुन आज मला खरच स्वतःची शरम वाटते, 
कि आपल्याला ज्ञानसुर्याने जन्म दिला पन आपन त्या सुर्यालाच बैटरी लावुन चमकण्याचा प्रयत्न करत राहीलो जो स्वतःच तेजोमय व स्वयंप्रकाशीत आहे, त्या सुर्यप्रकाशाने आपन आपले काही चांगले करुन घेण्यास असमर्थ ठरलोय.
सत्तर वर्ष झाले स्मारक, पुतळा, चोकाला नाव, समाज मंदिर याच विवंचनेत आपन दिसतोय, मनुवादी विचारांचे, घरानेशाहीचे राजकारन करणारे असाच एक मुद्दा आपल्या तोंडावर मारुन आपल्यावर बिनदिक्कतपने राज्य करत आलेत,
आपन महामानवाला आपला बाप मानतो तर मग आपन महामनवाच्या विचारांशीच इमान राखले पाहीजे, महामानवा समोर नाचने कुणालाही अशोभनियच आहे, गल्ली ते दिल्ली पर्यंत आरएसएस ने सत्ता हस्तगत केली आहे, जम्मु कश्मिर व आसाम हे दोन राज्य या हिटलरवाद्यांनी गिळंकृत केली आहेत, आता दिल्ली ला आर्धे गिळले आहे, एकदाच पुर्ण भारत गिळने यांना परवडनारे नाही म्हणुन एक एक राज्य ते हस्तगत करत आहेत, संविधान कुठेही लागु नाही, फक्त ते जिवंत असल्याचा भास जागा ठेवला गेलाय, लोकशाहीचे चारही खांब त्यांची बटिक बनले आहे अशा परिस्थितीत कोणत्या तोंडाने बाबासाहेबांच्या फोटोसमोर नाचणार आहात?
आपन लाखो रुपयांची उधळन करुन त्या महामानवाच्या त्याग बलिदानाची थट्टा करतोय, कारण आपन आजही राजकीय वाटा, बेरोजगारी, दारिद्र्य, गरीबी, जातीभेद या समस्यांना सोडवु शकलेलो नाही,दररोज एका बहिनीवर बलात्कार होतोय, रोज एकाची धिंड निघते, आपन कोणत्या गोष्टिचा जल्लोष करतोय? आपली संवेदनशीलता आपल्या जोश व जल्लोषा समोर थिटी पडतेय का?
कि डॉ बाबासाहेब आंबेडतर यांची व्यापक अर्थाची चळवळ काय आहे हे आपणास समजलेले नाही?
मी कोणावर वैयक्तिक टिका करत नाही, मी जे वास्तव स्वतः पाहिले आहे ते शब्दशः मांडतोय, तुम्ही सुद्धा यापेक्षा वेगळा काही अनुभव घेतला असेल असे मला वाटत नाही,
आता आपन गाफिल रहायची वेळ नक्कीच नाही उरली, आता हुकुमशहाने त्याची मुठ घट्ट आवळली आहे, मागील सहा वर्षात विद्यार्थी, महाविद्यालये यावर होणारे हल्ले आपन पहातोच आहोत त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांना वाढवने हे मोलाचे आहे, आपन श्रीमंत आहोत अशा अविर्भावात आपन बाबासाहेबांच्या गरीबी व त्यागाचा अपमान होईल असे वागने टाळायला हवे, बाबासाहेबांची जाती अंताची चळवळ लोकशाही मार्गाने चालवावी लागेल, त्यासाठी लोकशाही टिकवावी लागेेल. तुम्ही तुमच्या जन्मभरात कोणत्या वर्षी वैचारिक जयंती साजरी केली आहे का? याचा स्वतःच विचार केलेला बरा राहिल.
आपला उद्धार हा बाबासाहेबांच्या पुतळा स्मारकाने केलेला नसुन बाबासाहेबांच्या उच्च व सच्च्या विचारांनी केला आहे त्यामुळे विचार जपने आपले कर्तव्य आहे, या भारतात मनुचा फक्त एकच पुतळा आहे पन केंद्रात बहुमताने सत्तेवर बसलेले कट्टर मनुवादी संघ भाजपवाले मनु, गोळवळकर, हेगडेवार यांचे कुठेच पुतळे उभारताना आपनास दिसनार नाहीत तर ते लोक गोळवळकर व  मनुचा विचार मानसा मानसात रुजवण्यासाठी दिवसाात्र एक करुन झटताना दिसतील व ते त्यामुळे यशस्वी होतात. एकही ऑक्रेष्ट्रा, कव्वाली, सामना न करता मनुवाद पेरण्यात त्यांना यश कसे काय मिळाले याचे चिंतन होमे आवश्यक आहे.
आपन बाबासाहेबांचे फक्त गुनगान करतो, बाबासाहेबांच्या कार्य, त्यागाची आठवन करतो व जयंती चा दिवस आमच्या मुक्तीदात्याने आम्हाला गुलामीतुन सोडवले असे म्हणुन साजरा करतो पन आपली आताची कृती ही पुन्हा गुलामीकडे नेनारी आहे, आपल्या कृतीतुन महामानवाला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणुन करत असलो तरी तिचे स्वरुप महामानवाच्या पुर्ण जीवनाचा घोर अपमान करणारी आहे याचे भान मात्र आपनास नसते,
खुप लिहीले, क्षमा करावी, पन मनु आपल्या छाताडावर बसुन थयथयाट करत असताना जर आपन बाबासाहेबांना शुद्ध वैचारिक स्वरुपात स्विकारले नाही तर मात्र आपल्यासारखे करंटे आपनच.....
भीमजयंती ला निळ्या कोटातला गणपती करायचा कि "बोधिसत्व बाबासाहेब" करायचे सर्वस्वी तुम्हा बुद्धीजिवींवर सोपवतो.
( आपन किती अंतर चाललो यापेक्षा आपन कोणत्या दिशेने चाललो याला महत्व असते)

टिप - हा लेख देशात लॉकडाऊन लागण्यापुर्वी परंपरागत होत असलेल्या जयंती सोहळ्याच्या स्वरुपाबद्दल आत्मचिंतन म्हणुन लिहीला होता.
जगभरात कोरोना व्हायरस ने दहशतीचे वातावरन तयार केले आहे, भारतात फिजीकल डिस्टंसिंग लागु केले आहे त्यामुळे यावर्षी जयंती तसेही आपनास सार्वजनिक रित्या साजरी करायची नाही, असे अवाहन देशातील एकमेव जागृत नेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी केले आहे, त्यांचे मी मनःपुर्वक आभार, मानतो, बाळासाहेबांनी आवाहन केल्यामुळे या वर्षी भिमजयंती सर्वांनी आपापल्या घरातच साजरी करायची आहे व ते कसे केले याचे फोटो व विडीयो सोशल मिडीयावरुन प्रसारित करायचे आहेत, लॉकडाऊन परिस्थितीमुळे "प्रबुद्ध भारत" चैनलच्या माध्यमातुन बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जगातली पहिली ऑनलाईन डिजीटल जयंती करण्याचा उपक्रम सुद्धा केला आहे, आपल्यापर्यंत आपल्या आवडीचे वक्ते, गायक, कवी, कार्यकर्ते यांचे विचार घरपोच मिळतील हा सुद्धा एक नवा विक्रम आपन करत आहोतच.
१३ तारखेला रात्री कदाचित लॉकडाऊन उठवले गेले तरी कुनीही १४ तारखेला एकत्र जमायचे नाही कारन या व्हायरसला तुमची निष्ठा, तुमची चळवळ, तुमचा जोश हे काहीही कळत नाही हा व्हायरस जिवघेना आहे त्यामुळे हा व्हायरस संपला आहे असे  WHO जोपर्यंत जाहिर करत नाही तोवर आपन आपल्या लोकांची,  आपल्या परिवाराची काळजी घ्यायची आहे. आपल्यातील जे लोक बाबासाहेबांचे अनुयायी नसतील ,ज्यांना समाजाला धोक्यात घालावे वाटत असेल तेच निर्बुद्ध लोक बाहेर पडतील व पोलिस कारवाईला बळी पडतील, सुज्ञानी लोकांनी हि जयंती आपल्या परिवारा सोबत साजरी करायची आहे अशी हात जोडुन विनंती करतो.

- मनोज नागोराव काळे, 8169291009



____________________________________

Monday, 2 December 2019

महामानवाचे बोल - एकीचे महत्व

महामानवाचे बोल..."एकीचे महत्व".
- शब्दांकन - मनोज काळे.
दि. ९ मार्च १९२४ ला मुंबईमधील दामोदर हॉल या ठिकाणी
डॉ बाबाााहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात 'बहिष्कृत हितकारीनी सभा' या संघटनेची स्थापना करण्यात आली होती, आपल्या समजाला शिकवा, चेतवा व संघटना निर्माण करा या ब्रीदवाक्यासह संघटनेचे काम सुरु झाले, समाजबांधवांना सुशिक्षित करणे, त्यांना गुलाम अवस्थेची जाणीव करुन देऊन त्या गुलामगीरीतुन बाहेर पडण्यासाठी प्रेरीत केले जाऊ लागले, प्रत्येक शनिवार रविवारी विविध ठिकाणी सभा घेऊन सभासद वाढवण्याचे काम उत्साहात होत होते, ब.हि. सभेचे बहुतेक जबाबदार्या शिवतरकरांकडे असायच्या, ते सर्व जबाबदार्या चोख पार पाडतही असत, पण त्यावेळी बाबासाहेबांचे समर्थक असलेल्या अनेक प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवतरकरांवर खुप राग असायचा, ते नेहमी बाबासाहेबांकडे तशा तक्रारी करत असत, बाबासाहेबांना आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांमधील हि धुसफुस आवडली नाही, त्यांनी एके दिवशी कार्यालयात शिवतरकरांना विरोध करणारांना समजावुन सांगताना म्हटले " शिवतरकर हे नेहमी माझ्या सहवासात रहातात, पडेल ते संस्थेचे काम करतात, तुम्ही त्यांना विरोध का करता? मी आपल्या समाजाची सर्वांगीन प्रगती व्हावी म्हणुन कसोशीने व प्रामाणिकपने काम करनार आहे, त्यासाठी मी इतका विद्याभ्यास केलेला आहे, मी मिळवलेल्या ज्ञानशक्तीचा उपयोग मी केवळ माझे कुटुंब व माझी जात यांच्यासाठी करणार नाही, मी सर्व अस्पृश्य समाजाच्या चळवळीसाठी तिचा उपयोग करणार आहे, त्यासाठी मी अनेक योजना आखल्या आहेत, त्या सफल झाल्या तर अस्पृश्य समाज व स्पृश्य समाज यांचा फायदा होईल. अस्पृश्यांचे प्रश्न फार बिकट आहेत, अस्पृश्यांच्या समस्या म्हणजे प्रचंड हिमालय आहे, या हिमालयाशी टकरा मारुन मी माझे डोक फोडुन घेणार आहे, हिमालय कोसळला नाही तरी माझं रक्तबंबाळ डोके पाहुन सात कोटी अस्पृश्य लोक तो हिमालय जमिनदोस्त करण्यास एका पायावर तयार होतील व त्यासाठी प्राणार्पन करतील. हे तुम्ही पक्के ध्यानात ठेवा.
आपसात जर अशी तेढ पिकवत राहीलात तर मलाच काय प्रत्यक्ष परमेश्वरालाकी याबाबत काहीही करता येणार नाही"

बाबासाहेबांच्या या भाषनाचा सर्वांवर चांगला परिणाम झाला व त्यानंतर सर्वजन शिवतरकरांशी सहकार्याने वागु लागले.

टिप - डॉ बाबासाहेब आंबेडकरांना समाजावर किती विश्वास होता हे यातुन दिसते, व आपन बेकीने राहुन बाबासाहेबांचा विश्वास मातीत मिसळत आहोत?  आपल्या समस्या वाढत आहेत पण आपन आपसातील तेढ सोडुन एक व्हायला तयार नाहीत. यावर प्रत्येकाने आत्मचिंतन करावे लागेल

क्रमशः

- शब्दांकन - मनोज काळे, ठाणे 8169291009

_____________________________________

Friday, 11 October 2019

भांडवलदारांकडुन होणारी आधुनिक अस्पृश्यता.
- मनोज काळे, ठाणे.

आज २०१९ सालामधेही मनुवाद्यांकडुन अस्पृश्यता पाळली जाते असे विधान कदाचित कुनाला सहज रुचनार नाही, तुम्ही म्हणाल की डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहीले तेव्हाच भारतातुन अस्पृश्यतेला कायदेशीर संपवले आहे, पण मी त्या अस्पृश्यतेबद्दल लिहीत नसुन आजच्या काळात माजलेल्या राजकीय अस्पृष्यतेबद्दल लिहीत आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीने ओतप्रोत असे विशाल संविधान आपल्या देशाला बहाल केले व आपन आता एका विसंगत परिस्थितीला सामोरे जात आहोत, लोकशाही टिकवायची की संपवायची हे सर्वथा या देशील बहुसंख्य लोकांच्या मानसिकतेवर अवलंबुन आहे असा इशारा सुद्धा दिला होता, आणि आज २०१९ ला आपन तो विषय चर्चेला घेत आहोत त्याचे कारण आहे अॅड प्रकाश आंबेडकरांनी सुरु केलेली वंचित बहुजन आघाडी व या लोकचळवळीतुन उभ्या राहिलेल्या सशक्त राजकीय पर्यायाकडे पहाण्याचा उच्चवर्णिय भांडवलदार, राजकीय नेते व जनतेचा दृष्टीकोन.
लोकसभा २०१९ च्या निवडणुकी पुर्वी फक्त ४० दिवस आगोदर या पक्षाचा जन्म झाला व महाराष्ट्रातील जनतेने या पक्षाचे निश्कलंक मुत्सद्दा नेतृत्व, पक्षाची प्रामाणिक भुमिका, पक्षाचा जाहिरनामा या गोष्टीना मोकळ्या मनाने स्विकारले व एक करोड च्या वरती मदतान दिले, इविएम मशीन ने चोरुन शेवटी वंचित च्या वाट्याला फक्त ४३ लाख मते शिल्लक राहीली व तेवढेच अधिकृत मदतान मिळाले असे जाहीर झाले.
*दिडशे वर्ष जुनी राजकीय परंपरा असलेला कॉंग्रेस व जवळपास शंभर वर्षाची आरएसएस चे अपत्य असलेला भाजपा या दोन पक्षांसमोर हा चाळिस दिवसाचा नवखा पक्ष सर्वात जास्त ताकदिने उभा राहु शकला याला कारण आहे कि हा पक्ष लोकचळवळीतुन व लोकनिधीतुन उभा राहिला आहे.*
तरीही फक्त या पक्षाची मनुवाद्यांकडुन बदनामी केली गेली त्याची कारणे वरवर पहाता.

१. हा पक्ष महाराष्ट्रातील जलसाठ्यांचे नियोजन करुन पुरग्रस्त भागाचे पाणी दुष्काळी भागात नेऊन दोघांचे कल्याण करणार आहे.
२. हा पक्ष देशातील सर्व निष्कलंक लोकांनी मिळुन उभा केला आहे.
३.हा पक्ष लोकशाहीला काही कुटुंबांच्या घरानेशाहीतुन मुक्त करण्यासाठी बनला.
४.हा पक्ष लोकशाहीचे सार्वत्रीकरन करणार आहे.
५.हा पक्ष सर्व जाती धर्मातील वंचितांना त्यांची लोकसंख्या न पहाता, त्यांना प्रतिनिधित्व देत आहे.
६. हा पक्ष बलाढ्य धनगर समाजाची अस्मिता जागी करतोय.
७. हा पक्ष मुस्लिमांचे राजकीय सशक्तीकरन करतोय.
८.हा पक्ष भांडवलदारांची गुलामी नाकारुन शेतकर्याच्या बाजुन लढतोय.
९ हा पक्ष केजी ते पिजी शिक्षण मोफत करणार आहे ज्यामुळे शिक्षणाला धंदा करुन बसलेल्यांना धोकादायक वाटतोय.
१०.हा पक्ष पोलिसांना राजकीय गुलामगिरीतुन मुक्त करुन त्यांना इतर नोकरदारा प्रमाणे सुविधा देणार आहे.
११.या पक्षाकडुन शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार या सर्व ज्वलंत प्रश्नाना सोडवण्याची धोरने आखले गेले आहेत.
१२.हा पक्ष बुडत चाललेल्या बैंकाना सावरनार आहे
१३ हा पक्ष अशी लोकहिताची कामे करणार आहे जी आजवर कोणत्याही राजकीय पक्षाने करायची नियत ठेवली नव्हती.

वरिल सर्व मुद्दे देशातील प्रत्येक जाती धर्माच्या नागरिकाच्या जिवन मरनाचे प्रश्न आहेत, वरील सर्व प्रश्न त्या सर्व मतदारांची आहेत ज्यांनी आजवर कॉंग्रेस व भाजपा व त्यांच्या मित्रपक्षांना फुकट किंवा काही ठिकाणी पाचशे रुपये, दारु मटनावर मतदान दिले गेले आहे,
- आजवर शिक्षणाचे बाजीरीकरन करुन त्यातुन नफा मिळवावा यासाठी राजकीय नेते शिक्षण माफियाचे काम करत होते,
- आजवर पोलिसांना घरातील भाजीपाला आनने, घरातील कुत्र्याला शि सु करायला बाहेर नेने व मुलांना शाळेत सोडने व आनने यासाठी नेत्यांनी वापरले,
- आजवर शिक्षकांना सेवक म्हणुन वापरले गेले
- आजवर अंगनवाडी सेविकांचे शोषन केले गेलेय
- आजवर अनेकांना आर्थिक मंदिच्या नावावर नोकर्या गमवाव्या लागल्या आहेत व उच्च शिक्षित लोक बेकार राहीलेत ( मी सुद्धा)
- आजवर लोकप्रतिनिधी म्हणुन निवडुन येने म्हणजे पुढच्या सात पिढ्यांसाठी रग्गड पैसा कमावने असेच होत राहीले.
- आजवर एकाच जातीच्या माणसाच्या चार पाच पिढ्या लोकसभा, विधानसभेवर गेले व त्यांच्या जिल्हातील जनता चार पाच पिढ्या पासुन त्याच घरान्याला मत देत आले व त्याने लोकशाहीत समांतर हुकुमशाही उभी रहात गेली.
- निवडणुक फॉर्म भरायला होणारी गर्दी दाखवली गेली नाही
- लाखांच्या सभा मीडियातुन पुर्ण दुर्लक्षित केले गेले.
- टिवी चर्चासत्रात ऐंकर भाजपची बाजु मांडु लागलेत व वंचित बहुजन आघाडी बद्दल अफवा टिवी वरुन पेरल्या जात आहेत.
- आजवर सिनेमा, क्रिकेट, सिरीयल यात मतदारांना गुंतवुन त्यांना त्याची सवय लावुन, एक नशा भिनवली गेली, जनतेला राज्यकारभार व राजकीय नेत्यांच्या भानगडी कडे लक्ष द्यायला वेळच शिल्लक ठेवला नाही.

या व अशा अनेक गोष्टी राजकीय पक्षांनी कॉंग्रेस, भाजपा, सेना,  राष्ट्रवादी, मनेसे व इतर उच्चवर्णिय पक्षांनी मिळुन जनतेला आलटुन पालटुन सतत लुट केली, कॉंग्रेस भ्रष्टाचारी म्हणुन भाजपला मतदान करा, भाजप जातावादी म्हणुन कॉंग्रेस ला मतदान करा अशीच एक परंपरा या राज्यात पडली, जनेतेला जातीवाद व भ्रष्टाचार या दोन मुद्यांवर खेळवत ठेवुन या दोन मनुवादी, संघवादी, भांडवलशाही पक्षांनी ७० वर्ष महाराष्ट्राला मुर्खात काढले, आपनही *टिवी, न्युज, मिडीया जसे आपल्या मेंदुचे कंडीशनिंग करेल तसे त्यांच्या तालावर नाचु लागलो* व आपल्याला या असा भास निर्माण करुन दिला गेला की या दोनच पक्षांपैकी एकाला तुम्ही निवडले पाहीजे, तिसरा पर्याय तुमच्याकडे नाहीच, त्यामुळे सतत ७० वर्ष छ.शिवराय,छ शाहु महाराज, क्रांतीबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, अन्नाभाऊ साठे, गाडगे बाबा यांची जन्मभुमी, कर्मभुमी असलेला हा महाराष्ट्र भाजप व कॉंग्रेस या पक्षांनी पुर्णपने पोखुन टाकला आहे, या महामानवांनी या देशाला सावरले होते पन यांचे नाव हे मनामानव ज्या वेगवेगळ्या जातीत जन्मले त्या जातीत वाद पेटवुन मनुवाद्यांनी सत्ता कायम स्वतःच्या हातात ठेवली, कारण सत्ता ही सर्व प्रश्नांची गुरुकिल्ली आहे असे बाबासाहेब म्हणत होते, हि किल्ली मनुवाद्यांनी स्वताकडे कायम ठेवली.
आता २०१९ मधे वंचित बहुजन आघाडी का महाराष्ट्रातील सर्वात मोठा राजकीय पर्याय उभा असुनही जाणिवपुर्वक मीडिया मधुन या पक्षाला बदनाम केले जात आहे, या पक्षाचे अस्तित्व नाहीच अशी प्रतिमा बनवली जात आहे.
१. लोकसभेला सर्व ४८ जागांवर उच्चशिक्षित उमेदवार देणारा एकमेव पक्ष.
२.विधानसभेला सर्व २८८ जागांवर उच्चशिक्षित उमेदवार देणारा एकमेव पक्ष
३.जनता जमेल तेवढा पैसा पक्षाला जाहीर सभांमधे दान देते आहे, असा एकमेव पक्ष
४. एक रुपया न देता लाखो लोक सभांना गर्दी करतात असा एकमेव पक्ष
५.जनतेमधुन प्रत्येकजन स्वतःला जमेल ते योगदान देऊन हा पक्ष सत्तेत यावा असा प्रयत्न होतोय, असा एकमेव पक्ष.

तरीही या देशातील  (१००% )५०० इलेक्ट्रॉनिक न्युज चैनल, सर्वच्या सर्व वर्तमानपत्रे मात्र या सर्वात मोठ्या पक्षाची एकही खरी बातमी चैनल वर दाखवत नाही किंवा वर्तनान पत्र बातमी छापत नाही, ही आहे राजकीय अस्पृश्यता.
या पक्षातील नेत्यांचे वक्तव्ये मोडुन तोडुन चुकीच्या अर्थाने लोकांपर्यंत पोचवली जातात व पक्षाची बदनामी केली जात आहे.
वंचित बहुजन आघाडी या पक्षाला मदत करने म्हणजे हा पक्ष ज्या पक्षांशी लढतोय त्यांचीच मदत केल्यासारखे आहे त्यामुळे तुमचे मतदान वाया घालवु नका असा भ्रम पसरवला जात आहे.

मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही ७० वर्ष कॉंग्रेस, भाजपा,सेना ला पोसले आहे, आता तुमच्या प्रश्नासाठी लढत असलेल्या एका प्रामाणिक पक्षाची ताकद वाढत आहे ती आणखी वाढवा, मीडीया ही भांडवलदारांच्या मालकिची आहे त्यामुळे ते लोक तुमच्या हिताच्या गोष्टी कधीच तुमच्या पर्यंत पोचु देणार नाही, त्यामुळे आपन *अशा झाडांना खत पाणी देऊन वाढवु नका ज्याच्या फांदीवर तुमच्या गळ्यातील गळफासाची दोरी बांधली गेली आहे, ते झाड ( भाजपा/ कॉंग्रेस/ सेना / राष्ट्रवादी)  जर वाढले तर तुमच्याच गळ्याचा फास आवळला जाणार आहे.* त्यामुळे आपल्या जातीचाच उमेदवार असावा असा संकुचित विचार करुन आपल्याच पुढच्या पिढ्यांना हुकुमशाहीत ढकलु नका, विचार करा,

*या देशाला लोकशाही व सर्व नागरिकांना स्वातंत्र्य, बंधुता,समता, न्याय, शिक्षण देण्यासाठी हजारो वर्षानंतर एक आंबेडकरांना जन्म घ्यावा लागला होता,* त्यांनी सर्व काही कायदेशीर मिळवुन दिले पण घरानेशाहीने त्यावर मात करत ती लोकशाही बंदिस्त करुन ठेवली होती, *आता पुन्हा एक आंबेडकर आपल्याला लाभले आहेत, कृपया यावेळी आंबेडकरांची ताकद बना, आपल्या दोशाला मोठ्या अनर्थापासुन वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ला यशस्वी करा.*
भांडवलदारांकडुन होत असलेली राजकीय अस्पृश्यता आता मतदार जनतेने हानुन पाडली पाहीजे व आम्हाला टिवी मीडिया पेक्षा सोशल मिडीयावर सतत सक्रिय राहुन जागृतीचा हा वणवा घराघरात पोचवावा लागेल. सोशल मीडियाच या मनुवादी व भांडवलदारांच्या निर्मित राजकिय अस्पृश्यतेवरचा तोडगा आहे व आपन त्याचा पुरेपुर वापर करुन वंचित बहुजन आघाडी लहानात लहान बातमी, फोटो, प्रचारगीत एकुन एक मतदारापर्यंत कसे पोचवता येईल यासाठी प्रयत्न करुयात.
*आपला विजय निश्चित आहे, आपन प्रामाणिक लोक आहोत.*
- मनोज नागोराव काळे, ठाणे 8169291009

_________________________

Friday, 20 September 2019

"वंचित बहुजन आघाडीला आता रोखणे शक्य नाही.."
- संतोष आगबोटे, नांदेड

'वंचित बहुजन आघाडी' प्रचंड वेगाने सर्व पक्षांना ओव्हरटेक करत सत्तेच्या दिशेने निघालीय. आम्हास रोखण्याची कोणत्याही पक्षात धमक नाही. त्याच कारण 'वंचित बहुजन आघाडी' Intellectual honesty चं राजकारण इथल्या व्यवस्थेत उभं करू पाहात आहे. त्यासाठी त्या प्रकारचे जाणीवपूर्वक प्रयत्नही मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत.

आजपर्यंतच्या एकाही राजकीय पक्षाने लोकांच्या जीवनात अमुलाग्र परिवर्तन करण्याच्या उद्देशाने प्रामाणिक प्रयत्न केलेला दिसत नाही. मतदारांना साधन म्हणूनच वापरण्यावर या पक्षांचा भर होता.आहे.

इथल्या राजकीय पक्षांनी मानवी विकासाची संकल्पनाच पुरती बदलवून टाकली. संकुचित केली. उच्च मानवी मूल्यांच्या संवर्धन त्याच्या उत्थानासाठी नैतिक व्यवस्था निर्माण करण्याचा विचार कुणी मांडला नाही. नैतिक मूल्यांची जोपासना करणार्या परिवर्तनवादी चळवळी इथं वाढणार नाहीत. यासाठी बहुतांशी राजकीय पक्षांनी दक्षता घेतली. त्या वारंवार मोडीत काढण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला. इथं विशिष्ट विचारांभोवती राजकारण फिरवल्या जातं.

घराणेशाहीने सर्व राजकीय पक्षात आपले स्थान निश्चित केलेले आहे.

व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याकडून इथं प्रयत्न होताना दिसत नाहीत.

शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई, गरीबी, खाजगीकरण, यावर दुरगामी आणि परिणामकारक धोरण निश्चितीचा अभाव राहिलेला आहे मग ते सरकार कोणाचेही असो.

व्यापक दूरदृष्टीचा लोकहितदक्ष फ्युचर प्लान सरकार
कडे अथवा कोणत्याही राजकीय पक्षाकडे असेल अस मला वाटत नाही.

सत्ता तुमच्या ताब्यात का द्यायची याचं यथोचित उत्तर एकही राजकीय पक्ष व्यवस्थितरीत्या देऊ शकणार नाही..

परंतु या सर्वांना एक राजकीय पक्ष अपवाद आहे तो म्हणजे 'वंचित बहुजन आघाडी' होय.

एक नियोजनबद्ध प्लाॅन-आराखडा घेऊन
वेगवान गतीने 'वंचित बहुजन आघाडी' ची
सत्तेच्या दिशेने सुसाट घोडदौड चालु आहे.

व्यवस्थेने सर्वच बाबतीत वर्षानुवर्षे 'वंचित' ठेवलेल्या
सर्व घटकांना एकत्रित करणं, एका सूत्रात बांधणं हेच मुळी मोठं आव्हान होतं. ते जिकिरीचे आव्हान बाळासाहेब आंबेडकर यांनी यशस्वीपणे पेललंय.

आजघडीला मृतप्राय झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस वा काँग्रेसमध्ये लढण्याचे बळ राहिलेले नाही. सर्वार्थाने ते खचलेले आहेत. ते खेळाआधीच मैदान सोडण्याच्या तयारीला लागलेत. सेना- भाजपकडे गाय, राममंदिर, धर्म, पाकिस्तान, कलम 370, याच्या पलिकडे मुद्दे राहिलेले नाहीत.

दिलेल्या एकाही आश्वासनांची पूर्तता ते करू शकलेले नाहीत. याऊलट नोटबंदी, जिएसटी, यासारख्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होणार्या बाबी त्यांनी घडवून आणल्या.

परके असणार्या इंग्रजांना देशाचं जितकं वाटोळे करता आले नाही ते या सरकारने करून दाखवले.

वरून विविधतेतही एकतेने नांदणार्या देशातील वेगवेगळ्या समुहांत असुरक्षिततेचं-अविश्वास- भीती संशयाचे वातावरण निर्माण करण्याचं श्रेय या विद्यमान सरकारलाचं जातं. सार्वभौम देशाला विघटीत करायला निघालेले हे सरकार आहे.

विद्यार्थी, शेतकरी, मजूर, शेत मजूर, कामगार, नोकरदार वर्ग, व्यापारी यासह कोणता वर्ग यासरकारच्या धोरणामुळे त्रस्त नाही ते सांगा !

परंतु वंचित बहुजन आघाडीने सर्व वर्गांच्या कल्याणाचा बारकाईने अभ्यास करून अजेंडा बनवलेला आहे.

'संविधानाचे धोरण हेच वंचित बहुजन आघाडीचे तोरण असेल..'

EVM च्या भरवशावर भाजप विसंबून आहे. बॅलेट पेपर वर निवडणूक होऊद्या भाजप हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही.

'वंचित बहुजन आघाडी'ला आता कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. अगदी सत्ताधारी धर्मांध सेना-भाजपही नाही.  पण अट एकच लढाई ही प्रामाणिकपणे व्हावी..

-संतोष आगबोटे, नांदेड.
संपर्क- 9527626968

Friday, 2 August 2019

मनसे राष्ट्रवादीचा मोर्चा म्हणजे "सोन्याचा खंजीर"
- मनोज नागोराव काळे







काल दि.२ ऑगस्ट २०१९,रोजी मनसे व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी एका मोर्चाची घोषना केली आहे, तो मोर्चा इविएम मशीन विरुद्ध असल्याचे त्यांचे म्हणने आहे. पण हा मोर्चा म्हणजे सोन्याचा खंजीर आहे व तो ज्यांना फक्त सोन्याचा आहे म्हणुन छातीत खुपसुन घ्यावा वाटतोय त्यांनी खुशाल खुपसुन घ्यावे, राजकीय आकलनशक्तीचा अभाव व वैचारिक दारिद्र ज्यांच्या डोक्यात भरलेले आहे तेच काही लोक या मोर्चाच्या ढोंगाला बळी पडुन त्या मोर्चात सामिल होतील असा मला ठाम विश्वास आहे.

या मोर्चाला सोन्याचा खंजीर बोलन्यामागे त्या मोर्चाचे म्होरके कोन आहेत व त्यांची आजवरच्या राजकारणातील भुमिका काय होत्या हे पाहिले की प्रत्येकाला या मोर्चामागील ढोंग कळायला वेळ लागनार नाही.

EVM मशीन चा मुद्दा राष्ट्रवादी कॉंग्रेस व मनसे सारख्या जातीवादी पक्षांना अचानक महत्वाचा वाटु लागला याचे कारणे उघड उघड आहेत

१) वंचित बहुजन आघाडी ने इविएम मशीन विरुद्ध पुकारलेला निर्धारपुर्वक न्यायालयीन लढा.
२) वंचित बहुजन आघाडी ची वाढती लोकप्रियता
३) मनसेच्या नेत्यांचे सेनेत व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे भाजप प्रवेश
४) अॅड. प्रकाश आंबेडकरांभोवती एकवटलेला बहुजन समाज
५) धनगर, मुस्लिम, ओबीसी, भटके विमुक्त, आदिवासी, मातंग समाजाची लोकसंख्या व वंचित बहुजन आघाडी मधुन या सर्व समाजांना मिळत असलेले प्रतिनिधित्व.
६) पुरोगामी विचारांनी प्रस्थापितांना चारलेली राजकीय धुळ
७) बैलेट पेपर वर निवडणुका झाल्यास त्याचे या लढाच्या मुळ नायक असलेल्या आंबेडकरांना श्रेय मिळु न देण्याची कपटी भावना
८) मनसे व राष्ट्रवादी कॉंग्रेस हे लोकशाहीवादी आहेत असा भास निर्माण करण्याचा प्रयत्न.
९)  वंचित बहुजन आघाडी काबीज करत असलेली राजकीय स्पेस ब्रेक करण्याचे षडयंत्र
१०) मोदी विरोधकांना वंचित बहुजन आघाडी शिवाय इतरही उच्चवर्णिय पक्षाचे पर्याय आहेत हे निम जातीयवादी लोकांवर ठसवण्याचे प्रयत्न.

माझ्या जागृत बहुजन मतदारांनो,
       वरील काही प्रमुख कारणांमुळे मनसे व राष्ट्रवादी कॉंग्रेसने इविएम विरुद्ध मोर्चा काढत असल्याचे ढोंग करताना आपल्याला दिसत आहेत, थोडा विचार करुन पहा कि आजवर सतत उघड जातीयवादी भुमिका घेणारे राज ठाकरे, जे  कायम हुकुमशाही च्या समर्थक व लोकशाहीचे विरोधक असलेल्या बाळ ठाकरेंना गुरु किंवा सर्वस्व मानतात, त्यांना अचानक लोकशाहीचा पुळका कसा काय आला? ,राज ठाकरे लोकशाही मानतात तर मग स्वतः निवडणुका का लढत नाहीत? तेही सोडा, जो माणुस चैत्यभुमीपासुन हाकेच्या अंतरावर रहात असुन जन्मात कधी  चैत्यभुमीवर दर्शनाला गेला नाही, कारण त्यांच्यात ठासुन भरलेला लोकशाही व बाबासाहेबाप्रतीचा त्यांचा द्वेश ते करु देत नाही, हेच लोकशाही समर्थक बनलेले राज ठाकरे ऐट्रोसिटी ऐक्ट रद्द करावा असे बिनधास्त बोलतात व तशी मागणी करतात, हेच राज ठाकरे आरक्षण रद्द करावे अशी मागणी करतात व ते आज तुम्हाला लोकशाहीवादी वाटु लागले, हे तुम्हाला पटले तरी कसे? इतकी आपली बुद्धी बालिश बनलिय का? आपन आपलीच नव्याने निर्माण झालेली राजकीय ताकद अशा भामट्यांच्या ढोंगापुढे झुकवणार आहोत का?

आंबेडकरी विचारातुन कोणापुढे लोटांगन न घालता, स्वाभिमानाने सत्ता मिळवता येते हे जेव्हा बाळासाहेब आंबेडकर सिद्ध करुन दाखवत आहेत तेव्हा अनेक जातीवाद्यांना पुतना मावशीचा पान्हा फुटला आहे व त्यांना आता लोकशाही वर जिव जडल्याचा दिखावा करने भाग पडले आहे.

याच मनसे व राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजव व सेनेला सक्षम व अनुभवी उमेदवार सप्लाय केले आहेत, गेल्या महिनाभरात पन्नास एक लोक तिकडे गेलेत व  काही बोटावर मोजन्या इतके लोक यांच्याकडे शिल्लक राहीलेत, आजनर बहुजनांना, आंबेडकरी समाजाला ज्या पक्षांनी वंचित ठेवले त्यांना वंचित बहुजन आघाडीने लाचार स्थितीत आणुन उभे केले असताना या राष्ट्रवादी कॉंग्रेस व मनसे ला भक्कम करण्यासाठी कोण कोण पुढे सरसावले आहेत त्यांची नावे पहा एकदा सुषमा आंधारे, जोगेंद्र कवाडे, सुरेश माने, वामन मेश्राम ( मुलनिवासींचा म्होरक्या). आजवर हे लोक आंबेडकरी राजकारण अपयशी का होते यावरुन प्रकाश आंबेडकरांवर टिका करत होते पन आज प्रकाश आंबेडकरांनी सर्व प्रतिगामींनी गुडघ्यावर आणले असताना हेच बांडगुळ नेते प्रस्थिपित पक्षांची डागडुजी करुन त्यांना पुन्हा सक्षम करण्यासाठी झटताना आपन पहात आहोत व ती गद्दारी करत असताना बहुजनांच्या एकमेव लोकनेते बाळासाहेब आंबेडकरांवर खोटे आरोप करुन त्यांची बदनाम  करण्याचे प्रयत्नही करत आहेत, जनता त्यांच्या खोट्या प्रचारांना आता बळी पडताना दिसत नाही याचे खुप समाधान वाटत आहे.
  काल एका अर्धवटरावाने सोशल मिडीयावर पोस्ट लिहीली की "प्रकाश आंबेडकरींनी या मोर्चाला पाठींबा द्यायला पाहीजे",
 यांना हे माहीत नाही की प्रकाश आंबेडकरांनी इविएम विरुद्ध घंटानाद आंदोलन करुन सर्व महाराष्ट्राच्या प्रशासनाला जागे केले, इविएम काऊंटींग मधील फरक हा विषय न्यायालयिन प्रक्रियेत आणले, दिल्लीत जाऊन निवडणुक आयोगावर दबाव आनला तेव्हा कुठे निवडणुक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन आम्ही काही सांगीतले तर आमच्या जिवाला धोका आहे असे जाहीरपने जगासमोर सांगीतले आहे, त्यामुळे आम्ही वाजवलेल्या घंटानादाने जागे झालेल्यांनी आम्हाला धडे शिकवु नयेत, ज्यांना तो सोन्याचा खंजीर खुपसुन घ्यायचा आहे त्यांनी घ्यावा पन प्रकाश आंबेडकरांना राजकीय सल्ले देण्याआधी जरा अभ्यास करावा. बहुजन समाजाची राजकीय गुलामगीरी संपवणार्या आंबेडकरांसोबत प्रत्येक लोकशाहीवादी समाजघटक जुडतो आहे, प्रत्येक राजकीय पक्षातुन लोकशाहीवादी लोक वंचित बहुजन आघाडीत येत आहेत व हुकुमशाही व घरानेशाहीवाले नेते भाजपात जात आहेत, हकुकुमशाही व लोकशाही या दोन्ही ठिकानी ध्रुवीकरन होत आहे, आता लढाई सरळ व थेट आहे त्यामुळे कोणत्याही अपप्रचाराला बळी पडु नये, ढोंगी व जातीवादी लोकांच्या गोंडस शब्दांना बळी पडुन स्वताचा राजकीय घात करुन घेऊ नये असे मला वाटते.

जय वंचित,  जय संविधान

- मनोज नागोराव काळे  8169291009
____________________________


संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...