Thursday, 17 September 2020

बाबासाहेबांचे संकल्पनेतील राजकीय प्रशिक्षण विद्यालय 'अर्थात अकोला पॅटर्न'

 बाबासाहेबांचे संकल्पनेतील राजकीय प्रशिक्षण विद्यालय 'अर्थात अकोला पॅटर्न'.



ह्यापूर्वी अनेकांनी आपापल्या पद्धतीने भारिप बहुजन महासंघाची चळवळ, बाळासाहेब आंबेडकर व अकोला पॅटर्नची मांडणी केली आहे.मी बाबासाहेबांच्या स्वप्नातील राजकीय पक्ष व त्यांनी सुरु केलेल्या राजकीय प्रशिक्षण केंद्राशी जोडून, भारिप, भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडी कशी समर्पक आहे, ही मांडणी करणार आहे.हे दोन दुवे प्रथमच अश्या पद्धतीने जोडले जाणार आहेत.बाबासाहेबांच्या संकल्पनेतील राजकिय पक्ष आणि राजकीय प्रशिक्षण विद्यालय समजून घेताना बाळासाहेब आंबेडकरांचा 'अकोला पॅटर्न' हा कश्या पद्धतीने बाबासाहेबांच्या संकल्पनेतील प्रत्यक्ष राजकीय प्रशिक्षण विद्यालय ठरलाय हे आपण समजून घेऊया.

आपण सर्वजण जाणतो की, बाबासाहेब  ’रिपब्लीकन पक्ष’ नावाचा पक्ष स्थापन करणार होते.त्यासाठी ३० सप्टेबर १९५६ रोजी शेडुल्ड कास्ट फ़ेडरेशन च्या कार्यकारणीची बैठक बाबासाहेबांच्या दिल्ली निवासस्थानी बोलविण्यात आली होती. बैठकीत ’शेडुल्ड कास्ट फ़ेडरेशनचे’विसर्जन करून 'रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडीया’ स्थापनेचा निर्णय घेण्यात आला होता.तत्पूर्वी बाबासाहेबांनी हे देखील हेरलं होते की देशातील लोकशाहीला परिणामकारक चालना देणे गरजेचे आहे.देशाला लोकशाही पद्धती नवीन असल्याने राजकीय प्रशिक्षण असलेले कार्यकर्ते घडविणे गरजेचे आहे.त्या प्रमाणे नियोजित रिपब्लिकन पक्षात तरुणांची भरती होत रहावी आणि राजकारणात प्रत्यक्ष सहभाग घेणारांसाठी एक प्रशिक्षण विद्यालय असावे. करिता  मुंबई मध्ये  ’प्रशिक्षण विधालय’ सुरु करण्याचे बाबासाहेबांनी ठरविले होते.ज्यांना विधीमंडळात कामकाज करण्याची महत्वाकांक्षा आहे, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था या विद्यालयात करावयाची होती.त्या प्रशिक्षण विधालयाचे  मुख्याध्यापक पदासाठी त्यांना सक्षम व्यक्ती हवी होती.उत्तम व्याख्याता,विषयात पारंगत असलेला आणि आकर्षक व्यक्तीमत्व असलेला व्यक्ती त्यांना मुख्याध्यापक हवा होता.त्या साठी सिध्दार्थ विधालयाचे ग्रंथपाल रेगे यांचे सहाय्याने हे प्रशिक्षण विधालय स्थापन करुन चालविण्याचा त्यांचा मानस होता.ह्या विधालयाचा लौकीक हा तेथील शिक्षकांच्या प्रतिभा आणि वक्तॄत्व सामर्थ्यावर अवलंबुन असेल, असे बाबासाहेबांना वाटत होते.१ जुलै १९५६ ते मार्च १९५७ पर्यंत रेगे यांच्या देखरेखी खाली ते प्रशिक्षण विधालय कार्यरत होते.बाबासाहेबांच्या अकाली जाण्याने हे राजकीय प्रशिक्षण केंद्र पोरके होवुन कायमचे बंद पडले.प्रशिक्षण केंद्राची संकल्पना मांड्णा-या बाबासाहेबांना कधीच ह्या प्रशिक्षण केंद्राला भेट देता आली नाही, हे देखील त्या केंद्राचे दृभाग्य होते.

बाबासाहेबांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष त्यांच्या हयातीत आणि त्यांच्या मार्गदर्शनात उभा होवु शकला नाही.बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणा नंतरच्या निवडणुकीत शेडुल्ड कास्ट फ़ेडरेशन वर अनेक आमदार खासदार निवडुन आले.तत्कालीन नेतुत्वाने जसे ३० सप्टेबर १९५६ च्या शेकाफ़े बर्खास्ती  आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडीया स्थापनेच्या ठरावाला मुठमाती दिली.तशीच ती ह्या प्रशिक्षण केंद्राला सुद्धा दिली गेली.बाबासाहेबांच्या संकल्पनेतील राजकिय प्रशिक्षण विद्यालय त्यांचे हयातीत सुरु होऊन अवघ्या नऊ महिन्यात बंद पडले.बाबासाहेबांच्या दूरदृष्टीने  स्थापन झालेले राजकीय प्रशिक्षण केंद्राला संजीवनी देवुन कार्यरत करता आले असते.त्यातून देशाला ख-या अर्थाने लोकशाही बळकट करणारे साधन मिळाले असते.शिवाय राज्यकारभाराला योग्य वळण लावणारे निष्णात, विद्वान, कर्तूत्ववान आमदार, खासदारांचा विधीमंडळ, लोकसभा, राज्यसभेला लाभ झाला असता.सोबतच बाबासाहेबांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाला देखील सक्षम नेते आणि कार्यकर्ते मिळाले असते.असे एखादे प्रशिक्षण केंद्र उभे झाले तर रिपब्लिकन चळवळ आणि पक्षाला उज्वल भवितव्य देणारे उमदे तरूण नेते, कार्यकर्ते निर्माण होवु शकतात.असे सातत्याने मांडणी केली जाते.ती उणीव काही अंशी अकोला जिल्हाने भरून काढली आहे.दिग्विजयी नेते डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या ’ शासनकर्ती जमात’ होण्याच्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवित आहे.बाबासाहेबांच्या स्वप्नातील राजकीय प्रशिक्षण केंद्र अकोला जिल्हा बनलाय.अनेक नेते, पदाधिकारी घडविण्याचे कार्य  अकोला पॅटर्नच्या माध्यमातून उभे झालेले आपण पाहतोय.ज्यातून सर्वहारा समूहाला सत्तेचा वाटा तर मिळालाच सोबतच सामान्य कार्यकर्ते कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतांना सत्तेतील मोठया पदावर पोहचु शकले.

 

अकोला पॅटर्न समजून घेताना आपण अकोला जिल्ह्यातील बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे राजकीय क्षितिजावरील कारकीर्द सुरु होण्या पूर्वीची अर्थात १९८४ पुर्वीची आंबेडकरी चळवळ व बाळासाहेबांचे आगमना नंतर त्या चळवळीने राज्यात घडविलेला मोठा राजकीय व सामाजिक बदल समजून घेवुया.अकोल्यातील आंबेडकरी चळवळीचे १९५२ ते १९८४ सिंहावलोकन केले असता ह्या काळात आंबेडकरी चळवळ विशेष प्रभावी होती असे दिसते.अकोला जिल्हा चळवळीचा बालेकिल्लाच होता. कलापथके,गीतकार, शाहीर, जलसे, धंडारी,भजनी मंडळानी जागृतीचा वणवा सतत पेटत ठेवला होता.१९४२ साली परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे शेडूल्ड कास्ट फेडरेशन स्थापन केले.त्याकाळी व-हाड प्रांतिक शेडूल्ड कास्ट फेडरेशनची पहिली परिषद ९ आणि १० डिसेंबर १९४५ ला अकोलयात संपन्न झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर परिषदेचे अध्यक्ष म्हणून अकोल्यात आले होते.शेडूल्ड कास्ट फेडरेशन ने अकोला लोकसभा निवडणूकीत १९५२ साली व बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाना नंतर १९५७ च्या निवडणूकीत दुसऱ्या आणि तिस-या क्रमांकाची मते घेतली होती.अकोला जिल्हा बाबासाहेबांच्या आदेशाचे काटेकोर पालन करणारा जिल्हा आहे.  .१९०१ सालच्या जनगणनेत अकोला - वाशीम संयुक्त जिल्ह्यात बौद्ध धर्मीय म्हणून शून्य नोंद होती.१९५६ साली बाबासाहेबांच्या बौद्ध धम्म स्विकाराच्या आवाहना नुसार १००% बौद्ध धम्म स्वीकारणारा जिल्हा अकोलाच आहे.धम्म स्वीकाराच्या नंतर १९६१ च्या जनगणनेत दोन लाख बेचाळीस हजार चारशे चौसष्ट बौद्ध धर्मीयांची संख्या नोंदविण्यात आली होती.एवढी प्रचंड आंबेडकरी निष्ठा असलेला जिल्हा म्हणून अकोल्याचा लौकिक होता.१९५६ साली बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले.एकूणच आंबेडकरी चळवळीवर त्याचे दुरगामी परिणाम झाले.अकोला जिल्हा देखील त्याला अपवाद राहिला नाही. रिपब्लीकन पक्षाची स्थापना ३ ऑक्टोबर १९५७ झाली.रिपब्लीकन पक्षाच्या प्रेसेडीयमची बैठक देखील अकोल्यात संपन्न झाली होती.१९५७ च्या निवडणूकीत रिपब्लीकन पक्षाला लोकसभेत ५ जागा व विधानसभेत १३ जागांवर विजय मिळाला होता.१९६४ ला पक्ष फुटला त्या मुळे गायकवाड - गवई यांचा एक आणि खोब्रागडे यांचा दुसरा गट निर्माण झाला .गटबाजी मुळे अकोल्यातील कार्यकर्ते  देखील विभागले आणि ताकदवान पक्ष कमकुवत बनला. १९७१ आणि १९७७ च्या निवडणूकीत अकोला लोकसभेत कोणत्याही आंबेडकरी गटाचा अधिकृत उमेदवार नव्हता.विधानसभेत मात्र रिपाइं उमेदवारांना दुस-या, तिस-या क्रमांकाची मते मिळत होती. गटबाजी होती मतदार मात्र कायम होता.त्या काळी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, शेकाफे कार्य जिल्ह्यात मोठ्या गतीने सुरु होते.भय्यासाहेब आंबेडकरांनी देखील पाच वेळा ह्या जिल्ह्याचा दौरा केला होता.

 

 

अश्या वातावरणात बाळासाहेबांचे अकोल्यात पहिल्यांदा आगमन झाले ते १४ ऑगस्ट १९८० रोजी. अकोल्यातील रेल्वे स्टेशन नजीकच्या सर्किट हाऊस येथे ते उतरले होते. नगर परिषदेत आयोजित बाळासाहेबांचा कार्यक्रम काही कारणास्तव रद्द झाला होता.ही बातमी अकोल्यातील तत्कालीन नेतृत्व दिनबंधू गुरुजी, केरुबुवा गायकवाड ह्यांचे कार्यकर्ते लंकेश्वर गुरुजी, गुणवंतराव पाटील,पी. आर. महाजन,शत्रुघन मुंडे, कृष्णराव मोहोड, यादवराव पाटील ह्यांना समजली.बाबासाहेबांचे नातू सभा न होता परत जाणे ही आपल्या जिल्ह्यासाठी नामुष्कीची बाब आहे, हे हेरून त्या सर्व कार्यकर्त्यानी दुपारी बाळासाहेबांची भेट घेतली. सभेसाठी वेळ देण्याची मागणी केली.साहेबांचा होकार घेऊन रात्री ८ वाजता अकोट फैल येथे सभा ठरविण्यात आली.तत्पूर्वी सायंकाळी सहा वाजता भीम नगर येथे तत्कालीन जुने पुढारी शंकरराव खंडारे ह्यांचे घरी बाळासाहेबाना नेण्यात आले.साक्षात बाबासाहेबांचे नातू भिम नगर मोहोल्यात आल्याने बाळासाहेबांना पहायला तोब्बा गर्दी झाली.प्रत्येकाला ह्या तरण्याबांड आंबेडकरां मध्ये बाबासाहेबच दिसत होते.भारावलेली जनता डोळे भरून हे प्रतिरूप पाहत होते.त्यांच्या पाया पडत होती, त्यांना स्पर्श करत होती, त्यांच्या पायाची माती कपाळावर लावत होती.सर्व आसमंत भारवला होता.ह्या प्रचंड गर्दीत पहिली सभाच भीमनगर मध्ये पार पडली.अर्थात त्या नंतर रात्री ८ वाजताची नियोजित सभा भारतीय बौद्ध वाचनालय अकोट फैल येथे प्रचंड गर्दीत संपन्न झाली.या दोन सभा नंतर बाळासाहेबांशी जुळलेल्या कार्यकर्त्यानी लगेच दोन महिन्यात बाळासाहेबांची सभा ११ ऑक्टोबर १९८० रोजी अकोट येथील खरेदी विक्री संघाच्या पटांगणावर आयोजित केली.त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला.त्या मुळे वातावरण निर्मिती झाली.भारावलेले कार्यकर्ते संपूर्ण ताकदीने कामाला लागले. त्याकाळी कार्यकर्त्या कडे पैसा, साधने, मोटर वाहने किंवा साधा लाऊडस्पिकरची सोय नव्हती.केवळ चळवळ मोठी झाली पाहिजे ह्या ध्यासाने खेडोपाडी, वस्त्यांमध्ये सायकलवर फिरत कार्यकर्त्यानी अकोला जिल्हा बांधायला सुरुवात केली.अश्या पद्धतीने बाळासाहेब आंबेडकरांना अकोला जिल्ह्याने नेता स्वीकारून कामाला सुरुवात केली. एखाद्या जिल्ह्याने स्वतःचा नेता निवडून एकदिलाने त्यांचे नेतृत्वात काम करायला सुरु करण्याचे हे दुर्मिळ उदाहरण आहे.

अकोला जिल्ह्यास जातीय दंगली व अत्याचाराचा मोठा इतिहास आहे.त्यात प्रामुख्याने मराठा विरुद्ध बौद्ध असा संघर्ष होत असे. त्यात धाकली येथील गवई बंधूचे डोळे काढण्याचे प्रकरण, सुकळी नंदापूर येथील सामाजिक बहिष्कार, मुंडगाव लोहारी, कान्हेरी,देगांव, देऊळगांव, चान्नी चतारी, कोठारी,कळंबा, बोरगाव, पळसो बढे दंगल, मिरवणुकीवर हल्ले अश्या दंगलीच्या नोंदी होत्या.हा रक्तरंजित इतिहास देखील बाळासाहेबां मुळे कायमचा बदलला.त्याकाळी जे समुह एकमेकांशी संघर्ष करीत होते ते पक्ष म्हणून एकत्र आणण्यास यश आल्याने अकोला जिल्ह्यातील दंगली जवळ जवळ हद्दपार करण्यात यश आले. ही अकोल्यातील चळवळीची महत्वाची सामाजिक उपलब्धी आहे.

 

'अकोला पॅटर्न' नेमका आहे तरी काय ? असा प्रश्न अनेकांना असतो. त्याचे उत्तर सोपे आहे, सर्व वंचित जाती समूहांना एकत्र करून एकमेकाला मते देऊन सत्ता हस्तगत करणे.ही अकोला पॅटर्नची सोपी व्याख्या आहे.बाळासाहेब आंबेडकरांचा 'अकोला पॅटर्न' सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेने अनेक वर्षे वंचित ठेवलेल्या जातीसमूहांना संघटित करणारा आहे.  ' भीक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची, ' हा स्वाभिमानी विचार बहुजन समाजात पेरणी करणारा ठरला."नही भी होगी संख्या भारी फिर भी मिलेगी भागीदारी" हे सूत्र बाळासाहेब आंबेडकरांनी पुढे आणलं.त्यातून बहुजनांमध्ये ठाम विश्वास निर्माण केला. लोकशाही व्यवस्थेत सत्तेमध्ये सर्व समाज घटकांना योग्य न्याय मिळावा, सत्तेचा लाभ सर्व समाज घटकांना व्हावा. त्यातून सामाजिक न्याय,सत्तेचे सार्वत्रीकरणाची बांधणी सुरु झाली.निर्णायक सत्तेचे स्वरूप बहुजनांना अनुकूल व्हावे आणि समाजातील अन्याय व विषमतेचा प्रतिकार करणे शक्य व्हावे, हा मुद्दा बाळासाहेबांनी प्रभावीपणे मांडला.बौद्ध समाजाची एकगठ्ठा मते अल्पमतात असलेल्या समूहाला देणे आणि त्याच बरोबर बौद्ध समूहाला इतर सर्व बहुजन समाजाची मते ट्रान्सफर होणे हा राजकीय चमत्कार घडविला.त्यातून प्रस्थापित, घराणेशाही कडून राजकीय सत्ता हिसकावून बहुजन वर्गाकडे आणता येते, हे महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब आंबेडकर यांनी 'अकोला पॅटर्न'च्या माध्यमातून दाखवून दिले आहे.

बाळासाहे बांनी १९८४ साली आपल्या राजकीय जीवनाला प्रारंभ केला.त्याआधी ते भारतीय बौद्ध महासभा व सम्यक समाज आंदोलन मार्फत सामाजिक कार्यात अग्रेसर होते.त्याला आता ३६ वर्षे पूर्ण झाली आहेत. १९८४ मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची हत्या झाल्याने ८४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला देशपातळीवर व राज्यपातळीवर सहानुभूती होती. इंदिरा गांधींच्या हत्येच्या सहानुभूतीने काँग्रेसविरोधातील अनेक दिग्गज पराभूत झाले होते. याच ८४च्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेब आंबेडकर यांनी ईशान्य मुंबई व अकोला या दोन लोकसभा मतदारसंघांतून निवडणूक लढविली होती. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात साहेबांना ४९ हजार ७५८ मते मिळाली होती, तर अकोला लोकसभेत मधूसुदन वैराळे यांच्या विरोधात निवडणूक लढवून १,६५,६६४ मते मिळवली होती .वैराळे यांना १,७८,८७४ मते मिळाल्याने १३,२१० इतक्या अल्प मतांनी वैराळे विजयी झाले होते.अकोला मतदारसंघात अत्यंत कमी मतांनी पराभूत झाल्याने ह्या मतदार संघातील स्पार्क त्यांनी ओळखला आणि अकोला ह्या खुल्या लोकसभा मतदार संघाची  आगामी राजकारणासाठी निवड केली.

दरम्यान १९८७ साली नांदेड लोकसभेची पोटनिवडणुक लागली.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवाजी पाटील निलंगेकर मुलीच्या गुणवाढ प्रकरणात पदावरून पायउतार झाले होते. त्या वेळी शंकरराव चव्हाण यांची मुख्यमंत्री म्हणून वर्णी लागली.शंकरराव चव्हाण यांच्या खासदारकीच्या राजीनाम्याने ८७ मध्ये नांदेडची पोटनिवडणुक जाहीर झाली होती.कॉंग्रेस कडून अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली होती.तर भारिपच्या वतीने बाळासाहेब उभे होते.नांदेड पोटनिवडणुकीत बाळासाहेबांच्या प्रचाराला जॉर्ज फर्नांडिस आले होते .या निवडणूकीत सात उमेदवार उभे होते. परंतु खरी लढत झाली ती अशोक चव्हाण आणि बाळासाहेब यांच्यात. अशोक चव्हाण यांना २,८३,०१९ तर बाळासाहेबांना १,७१,००१ इतकी मते मिळाली. ह्या संघर्षमय लढतीत बाळासाहेबांचा पराभव झाला. प्रचाराची साधने,पैसा,राजकीय पाठबळ नसताना मुख्यमंत्र्याचे मुलाच्या विरोधात पावणेदोन लाख मते घेणे हा मोठा राजकीय चमत्कार होता. मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी अनेक मतपेट्या वाजंरा नदीच्या पात्रात बुडविल्या होत्या, असे आजही नांदेड मध्ये जुने कार्यकर्ते बोलतात.

बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली १९८९ मध्ये लोकसभा निवडणुकीत भारिपला ६ लाख २ हजार १७४ मते मिळाली होती. यात अकोला लोकसभा मतदारसंघात साहेबांना ३ लाख ३२ हजार २४२ मते मिळाली होती. उर्वरित मतदान इतर लोकसभा मतदारसंघांत झाले होते.आताच्या शिवसेना नेत्या डॉ. नीलम गो-हे यांनी भारिपच्या वतीने ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती.त्यांना १ लाख ९ हजार २५३ मते मिळाली होती. प्रत्येक निवडणूकीत भारीपच्या मतांमध्ये वाढ होत होती.

 १९९० साली बाळासाहेब राज्यसभेवर खासदार होते. त्याकाळी भारिप हा पक्ष स्वतंत्र होता.१५ फेब्रुवारी १९९३ रोजी बहुजन महासंघाची स्थापना झाली होती.अकोला पॅटर्न चा पहिला प्रयोग यशस्वी झाला तो फेब्रुवारी १९९२ साली.भारतीय रिपब्लीकन पक्ष आणि बहुजन समाज महासंघाच्या वतीने संयुक्तपणे लढविण्यात आली होती.अकोला जिल्हा परिषद वर १९६२ पासून प्रस्थापित काँग्रेसचे बडे नेते व त्यांचे नातेवाईकांची मक्तेदारी होती.त्याकाळात काँग्रेसच्या नेत्यांच्या किंवा त्यांनी नेमलेल्या प्रशासका मार्फत जिल्हा परिषद चालवली जात होती.विशिष्ठ घराणे सोडले तर इतर कुणाला ह्या सत्तास्थानां मध्ये शिरकाव नव्हता.राखीव जागेवर देखील कामावरचे घरगडी किंवा सालदार निवडून आणून सत्ता ताब्यात ठेवली जाई, त्याला कुणाचाही निर्बंध नव्हता.

अकोल्यात धोत्रे, कोरपे, भुईभार, सपकाळ व धाबेकर ही त्या काळची प्रस्थापित घराणी.एकमेकांचे नातेवाईक असलेल्या ह्या कुटुंबांनी जिल्ह्यातील सर्व सत्ता आपापल्या कुटुंबात वाटून घेतली होती.घराणेशाही आणि मक्तेदारीच्या ह्या सत्तेला पहिला सुरुंग लागला १९९२ सालच्या निवडणुकीत. 'अकोला पॅटर्न' ने जिल्हा परिषद निवडणुकीत हादरा दिला.भारतीय रिपब्लीकन पक्ष आणि बहुजन समाज महासंघाचे ६० पैकी १५ उमेदवार जिल्हा परिषदेत विजयी झाले.२० उमेदवार १०० ते २०० मतांनी पराभूत झाले होते.ह्या निवडणुकीत भाजप सेनेचे सर्व उमेदवार पराभूत झाले होते, त्यापैकी अनेकांच्या अनामत रकमा देखील जप्त झाल्या होत्या. दोन माजी आमदारांना निवडणुकीत आस्मान दाखविण्यात आले होते. एक आमदार भारतीय रिपब्लीकन पक्ष आणि बहुजन समाज महासंघाच्या आदिवासी उमेद्वारा विरोधात राजकीय बनाव करून विजयी झाले होते.अकोला जिल्हा काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष भारतीय रिपब्लीकन पक्ष आणि बहुजन समाज महासंघाच्या मुसलीम उमेद्वारांमुळे तिस-या क्रमांकावर फेकले गेले होते.अनेक करोडोपती उमेदवारां विरोधात शेतकरी, कष्टकरी, मजूर उमेदवार असताना देखील कोट्याधीश उमेदवारांना दारुण पराभव स्विकारावा लागला होता.

अकोला जिल्ह्याच्या १३ पंचायत समितीच्या निवडणुकीत फेब्रुवारी १९९२ मध्ये १२० उमेद्वारां पैकी ३० उमेदवार भारतीय रिपब्लीकन पक्ष आणि बहुजन समाज महासंघाचे निवडून आले होते.४८ उमेदवार अत्यल्प मतांनी पराभूत झाले होते. अकोला व बार्शीटाकळी ह्या दोन अत्यंत प्रतिष्ठेच्या पंचायत समित्या धनदांडग्याच्या व कुटुंबशाहीतील प्रस्थापिता कडून हिसकावून घेण्यात आल्या.बार्शीटाकळी पंचायत समितीत बौद्ध तर अकोला पंचायत समिती मध्ये धनगर समाजाचे सभापती विजयी झाले.मूर्तिजापूर पंचायत समितीत टाकोनकर समाजाचे बबन डाबेराव हे पक्षाचे सहकार्याने सभापती झाले तर दर्यापूर पंचायत समिती मध्ये कोळी समाजाचे वासुदेवराव खेडकर सभापती झाले.बाळापूर व कारंजा पंचायत समिती मध्ये एक एक सदस्य कमी पडल्याने पक्षाला सभापती पदाने हुलकावणी दिली.विशेष म्हणजे अकोला जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या १५ पैकी ५ सदस्य हे त्यांच्या तालुक्याचे बाहेर निवडणूक लढून विजयी झाले होते.त्यापैकी चारजण बौद्ध होते आणि ते खुल्या प्रवर्गातून निवडून आले होते.हा 'अकोला पॅटर्न'चा उदय होता.

बाळासाहेब आंबेडकर यांचा अकोला पॅटर्न हा एवढा जबरदस्त ठरला कि पुढे अगदी स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते विधानसभा, लोकसभेपर्यंत आपले अस्तित्व निर्माण केले.बहुजन सत्तेच्या अकोला पॅटर्न अनेक दालने काबीज केली. २१ मार्च १९९३ साली शेगांव येथील राज्यस्तरीय अधिवेशनात भारिप व बहुजन महासंघ विलीन झाला.१९९३ मध्ये नांदेड मधील किनवट येथून पोटनिवडणुकीत आदिवासी समाजातील भिमराव केराम यांना विधानसभेत आमदार म्हणून निवडून आणले. १९९५ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत मखराम पवार आमदार म्हणून निवडून आले तसेच इतर उमेदवारांना लक्षणीय मते मिळाली होती. १९९८ आणि १९९९ मध्ये लोकसभेत बाळासाहेब आंबेडकर खासदार म्हणून संसदेत गेले. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब यांचे तीन आमदार निवडून आले.याच काळात कॉंग्रेसच्या सरकार मध्ये भारिप बहुजन महासंघाला दोन कॅबिनेट व एक राज्यमंत्री पद होते.२००४, २००९ आणि २०१४ मध्ये भारिप बहुजन महासंघाचे आमदार निवडून आले.२०१२ साली अकोल्याचे महापौर पदावर बौद्ध समाजाची महिला विजयी झाली.अनेक पंचायत समित्यावर सत्ता आली.त्यात भारतीय बौद्ध महासभेच्या आयोजनातील अकोल्यातील धम्मचक्रप्रवर्तन दिन सोहळा आणि भव्य मिरवणुकीचा देखील मोठा वाटा आहे.

 

१९९२ च्या पहिल्याच दणक्याने अकोला जिल्हा परिषदेत प्रस्थापित, धनदांडगे व कुटुंबशाहीच्या पाट्या पुसण्यात यश आले.सर्वसामान्य आणि वंचित बहुजन समाजाला पहिल्यादा स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रवेश मिळाला.पुढे भारिप बहुजन महासंघाचे कोळी,माळी,बौद्ध,तेली, मुस्लिम, कुणबी व बौद्ध हे जिल्हा परिषद अध्यक्ष बनलेत.विशेष म्हणजे राज्य मंत्री दर्जा असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपद खुल्या प्रवर्गाकरिता राखीव असताना पुष्पाताई इंगळे आणि प्रतिभाताई भोजने ह्या जिल्हा परिषद अध्यक्षा बनल्या आहेत.ही किमया अकोला जिल्हा परिषद सोडली तर संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही पहायला मिळत नाही.राखीव जागा असल्या शिवाय बौद्ध पदाधिकारी होऊ शकत नाही, महिला तर अजिबातच होऊ शकत नाही असा जणू अलिखित नियमच ! तो नियम देखील भारिप बहुजन महासंघाने अकोल्यात मोडून काढला.खुल्या प्रवर्गात दोनवेळा बौद्ध महिला जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून निवडून आणल्या. सामान्य गृहिणी आणि सर्वसामान्य कुटुंबातील वंचित, दुर्लक्षित घटकांना आपली नावे जिल्हा पातळीवर कोरण्यात यश प्राप्त झाले आहे. बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व जाती-धर्मांतील लोकांना एकत्र केले.अनेक वर्षे सत्तेपासून वंचित राहिलेल्या छोट्या-मोठय़ा समूहाचे सरपंच, सभापती व जिल्हा परिषद अध्यक्ष,महापौर, आमदार,मंत्री हे केवळ बाळासाहेब आंबेडकर व अकोला पॅटर्नमुळेच बनू शकले.

अकोला पॅटर्नमध्ये वेगवेगळ्य़ा जाती-धर्माचे नेते सत्तेतून मोठे झाले.काहीनी अति महत्त्वाकांक्षेसाठी पक्ष सोडला.इतर पक्षात मध्ये गेलेले हे नेते राजकीयदृष्ट्या संपलेत.आज हे नेते कुठे आहेत? त्याचा शोध घ्यावा लागतो.अकोल्यात पक्षाची राजकीय ताकद कायम आहे.

असाच राजकीय पक्ष बाबासाहेबांना अपेक्षित होता. ज्यात सर्व जाती समूहाचा सहभाग असेल आणि त्याची मार्गदर्शक तत्वे ही स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव असतील.त्याचाच अंगीकार भारिप बहुजन महासंघ - वंचित बहुजन आघाडीने केला आहे. १ जानेवारी २०१९ रोजी स्थापन झालेल्या आणि २४ मार्च २०१९ रोजी निवडणूक आयोगा कडे नोंदणी झालेल्या वंचित बहुजन आघाडीने तर भारतीय घटनेचा सरनामा हाच पक्षाचा जाहीरनामा घोषित केला आहे.

अकोल्यातील कार्यकर्ते हे ग्राम पंचायत, नगर पालिका, कृषी उत्पन्न बाजार समित्या, खरेदी विक्री अश्या सर्व निवडणुका लढतात. त्यातून जिल्हा परिषद, महापालिका, विधानसभा उमेदवार म्हणून पुढं येतात. किंवा पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणायला आपले कसब पणाला लावतात.पक्षासाठी जीवाचे रान करतात.भारिप बहुजन महासंघ - वंचित बहुजन आघाडीने असे हजारो जनप्रतिनिधी घडविले आहेत.बाबासाहेबांना असेच प्रशिक्षित नेते आणि कार्यकर्ते घडवायचे होते. आणि म्हणूनच अकोला पॅटर्न हे बाबासाहेबांच्या स्वप्नातील राजकीय प्रशिक्षण महाविद्यालय बनले आहे.


राजेंद्र पातोडे

प्रदेश प्रवक्ता

वंचित बहुजन आघाडी.  

9422160101

भिती घालणाऱ्या बातम्या आणि कोविडची वस्तुस्थिती. राजेंद्र पातोडे.

 भिती घालणाऱ्या बातम्या आणि कोविडची वस्तुस्थिती.


राजेंद्र पातोडे.


अकोल्यात कोरोनाचा उद्रेक , रुग्ण संख्या सहा हजारा कडे ! 

असल्या सनसनाटी आशयाखाली दररोज बातम्या प्रसारित होत आहेत.परिणामी जनमानसात कोरोनाच्या नावावर प्रचंड दहशत निर्माण केली जात आहे.समूह संसर्ग सुरू झाला असून आता अकोलकरांनी ठरवायला हवं की कोरोनाच्या सोबत जगायचे कसे ? अश्या बातम्या मुळे ही भिती अधिकच गडद केली जात आहे. खरोखरच अकोल्यात सहा हजार रुग्ण आहेत का ? तर त्याचे उत्तर येते अजिबात नाही.मग हा मोठा आकडा येतो कुठून ? हा प्रश्न सामान्य माणसाला पडणे स्वाभाविक आहे.

चला वस्तुस्थिती जाणून घेऊया.

नेमके एक्टीव्ह रुग्ण किती ?

कोरोनाच्या सद्यस्थिती पहा एकूण पॉझिटीव्ह अहवाल आहेत ५८९५ म्हणजे अकोल्यात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्या पासून आजवर ५८९५ लोक बाधित होऊन तपासणीत पॉझिटिव्ह आलेत.त्यांचेवर उपचार झाले.अर्थातच १६ सप्टेंबर २०२० ह्या तारखेपर्यंत ४७६६ + ९७४ + १५५ = ५८९५ असे एकूण बाधित व तपासणी मध्ये पॉसिटीव्ह रुग्ण आहेत.हा आकडा एक्टीव्ह रुग्णाचा नाही तर सहा महिन्यांत बाधित व तपासणी मध्ये पॉसिटीव्ह आलेल्या एकूण रुग्णांचा आहे.त्या मधील कोरोना मुक्त ४४१३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. अर्थात दाखल (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह) तसेच उपचार सुरू असलेली रुग्ण संख्या केवळ - १२९३ इतकी आहे.पाच हजार आठशे पंचानव नाही.एकूण बाधित संख्या पैकी ४४१३ जनांना डिस्चार्ज मिळाला असताना कोरोना उद्रेक, रुग्णसंख्या सहा हजारा कडे ...ह्या  सारख्या सनसनाटी टायटल मुळे अकोल्यात साडेपाच हजार पेक्षा जास्त रुग्ण असल्याचा भास निर्माण होतो.

दरम्यान कोरोना कालावधी मध्ये मयत झालेले रुग्ण आहेत १८९ आहेत.ह्या १८९ मृत्यूचे विश्लेषण जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा प्रशासन निटपणे केले जात नाही.मृत्यू झालेले सर्व रुग्ण हे कोरोना मुळे दगावले की अन्य आजाराने ? ह्याची माहिती सादर केली जात नाही.त्यामुळे देखील गोंधळ आहे.बरं अकोल्यातील सामान्य परिस्थिती मध्ये जिल्ह्यात अपघात, आजार व नैसर्गिक कारणांमुळे किती मृत्यू होत होते ? हे तपासून पहिल्यास तो आकडा कमी होता की कोरोनामुळे मृत्यू अधिक झाले हे देखील स्पष्टपणे जाहीर केले जात नाही.

 

भिती कोरोनाची नाही तर .....


आता कम्युनिटी स्प्रेड अर्थात समुह संसर्ग सुरु झाला आहे.लोकांमध्ये भिती काय निर्माण झाली आहे ? तर ती आहे, वेळेवर उपचार न मिळण्याची,बेड / हाॅस्पीटल न मिळण्याची,

ऍब्युलन्स न मिळण्याची,ऑक्सीजन/ व्हेन्टीलेटटर वेळेवर न मिळण्याची,शासकीय रुग्णालयात रुग्णाची योग्य देखभाल नसल्याची, जेवण अयोग्य असल्याची, खाजगी रुग्णालयात सुरू असलेल्या आर्थिक लुटीची ! ही भिती निराधार आहे का ? तर अजिबात नाही.औषधे,ऑक्सिजन, पीपीई किट, मास्क चा तुटवडा ह्या नित्याच्या बातम्या.त्यात जिल्हा रुग्णालयात खाटेवरून पडून कोरोना पोजिटिव्ह रुग्णाचा मृत्यू.अकोल्यात बेड उपलब्ध होत नसल्याने मित्राच्या वडिलांना नागपुरात हलवून देखील प्रचंड त्रास झाल्याचा अनुभव राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी ह्यांनी फेसबुकवर मांडलाय.त्यावर जिल्हाधिकारी ह्यांनी कालच्या अर्थात १६ तारखेला प्रकाशित लोकमत मध्ये खुलासा केला आहे.हॅलो, अकोला जिल्हा पानावर जिल्हाधिकारी ह्यांचा खुलासा असून " जीएमसी मध्ये पुरेसे बेड उपलब्ध असल्याचे" वृत्त आहे.बातमीनुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये ९०, आयकॉन मध्ये २४, ओझोन मध्ये २८, बाबन हॉस्पिटल मूर्तिजापूर येथे आवश्यकते नुसार बेड, अवधाते हॉस्पिटलमध्ये २०, युनिक हॉस्पिटलमध्ये १८, अकोला ऍकसिडेंट हॉस्पिटलमध्ये १६ असे एकूण १९६ आणि बाबन हॉस्पिटलमध्ये आवश्यकतेनुसार उपलब्ध होणार बेड पाहता २०० पेक्षा अधिक खाटा उपलब्ध असल्याचे जिल्हा प्रशासन जाहीर करते ! मग प्रश्न पडतो तो असा की नेमकं खोटं काय आहे? खाटा उपलब्ध नसणे की अधिक काही तरी ?

जर एवढ्या मोठ्या संख्येने खाटा उपलब्ध असतील तर त्याची माहिती सामान्य जनतेला देणारी हेल्पलाईन जिल्हा प्रशासन गेली सहा महिने विकसित करू शकली का ? तर त्याचे उत्तर नकारार्थी येते.


खाजगी रुग्णालयात ठराविक रक्कम जमा केल्या शिवाय रुग्ण दाखल केला जाणार नाही असे बोर्ड खाजगी रुग्णालयात लावण्यात आले.त्यावर उपचारासाठी जास्त दराने पैसे घेतल्यास कार्यवाही करण्याचा जिल्हा प्रशासनाने दिलेला हवाई इशारा सुद्धा आलाय.परंतु त्यावर काही होणार नाही हे जिल्ह्यातील नागरिकांनी अनुभवले आहे.खाजगी डॉक्टर सेवा आणि खाजगी रुग्णालये अधिग्रहित करण्याचा शासन निर्णय आला.नोटीस निघाल्या परंतु लुटुपुटूच्या लढाई पलीकडे कार्यवाही गेली नाही.

आजारा पेक्षा सुविधा आणि अंमलबजावणी चा केमिकल लोचा झाला आहे. त्यात अश्या मोठया आकडेवारी मुळे जनमानस ढवळून निघाले नाही तर नवलच आहे.


राजेंद्र पातोडे

प्रदेश प्रवक्ता

वंचित बहूजन आघाडी 

9422160101

Tuesday, 18 August 2020

 #वैचारिक गोंधळ नको...भास्कर भोजने


:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

    #मनुवादी नेहमी प्रत्येक नेत्याला एका जातीत बांधून ठेऊन त्याचा राजकीय परिघ संकोचून त्याला एका मर्यादेत बंदिस्त करतात.मात्र त्याच वेळी वैदिकांचा नेता हा देशातील समस्त समाजाचा नेता ठरवितात.हा बामणी कावा आहे...!!

उदा:- शरद पवार...मराठा नेता.

       वारीस पठाण..... मुस्लिम      

                                       नेता.

     अनिल अण्णा गोटे.. धनगर नेता.

     आनंदराव अडसूळ... चर्मकार

                                     नेता.

    लक्ष्मणराव ढोबळे.... मातंग नेता.

  सुधाकरराव नाईक... बंजारा नेता.

   बबनराव पाचपुते...वारक-यांचा

                                     नेता.

    

    रामदास आठवले... दलित नेता.

    गोपिचंद पडळकर..... धनगर नेता.

    छगन भुजबळ......माळी नेता.

  गोपीनाथ मुंडे..... वंजारी नेता.

          बहूजनांचा कुणीही राजकीय पुढारी असो,त्याला त्याच्या जातीच लेबल लावून त्याचा राजकीय परिघ संकोचून त्याची मर्यादा खुंटविली जाते...!!

   महाराष्ट्रातील या वरील नेत्यांची ही ओळख कुणीही नाकारु शकतं नाही.,

       मात्र

देवेंद्र फडणवीस, नितिन गडकरी तथा शरद जोशी,मनोहर जोशी यांची अशी कोणतीही ओळख निर्माण झाली नाही. असे का.??

   या प्रश्नाचे उत्तर खूप सोपे आहे...!!

आपणं आपली भूमिका कशी तयार करतो,??किंवा आपला समज कसा समृद्ध होतं जातो...??

   ज्ञात असलेल्या साधनांचा वापर करून समाजातील तरुण आपली वैचारिक भुमिका दृढ करीत असतो...!!

 राजकीय पुढाऱ्यांच्या संदर्भात कुठलेही पुस्तक वा साहित्य उपलब्ध नसते मग वाचक वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया वरील माहितीच्या आधारे त्या त्या नेतृत्वाच्या पैलूंचा शोध घेत घेत त्याच्या बद्दलची समाजात भूमिका किंवा मतं तयार होतं जाते....!!

   सगळ्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडियात वैदिक धर्मीय कावळ्यांनी कब्जा मिळवला आहे,ते सरळ सरळ प्रत्येक नेत्यांच्या जातीचा उल्लेख करुन त्याची तशी ओळख निर्माण व्हावी म्हणून शब्दांचे खेळ करीत असतात दृष्टबुद्धीने खोट्या गोष्टी पण रेटून बोलतात आणि शब्दांचा भडिमार करीत करीत त्या नेत्यांचं आपणं जातीय वर्गीकरण करून बसतो आणि त्या नेत्याला आपणही त्याचं जातीचं लेबल लावून मोकळे होतो...!!

     जर देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी सारख्यांना ब्राम्हणांचे नेते म्हणून मान्यता दिली तर ते बहुमताच्या राजकारणात अत्यल्प संख्याक असल्यामुळे यशस्वी झाले असते का.??

 याची अजिबात शक्यता नाही परंतु आपणं त्यांना तशी ओळख दिली नाही कारण त्यांच्या जातीचा कोणत्याही वृत्तपत्राने वा टि.व्ही.चॅनलने आपणांस नेहमी नेहमी शब्दांचा खेळ करुन त्यांची ओळख करुन दिली नाही....!!

त्याच्या उलटं ते कसे मानवतावादी आहेत,ते कसे आक्रमक आहेत,ते कसे विद्वान आहेत,ते कसे कर्तृत्वान आहेत,त्यांनी किती आणि कशा पदव्या संपादन केल्या आहेत याचाच भडिमार केला जातो आणि त्यांचं नेतृत्व बहूजन समाजाच्या मेंदूत फिट बसविले जाते.हेच वास्तव आहे, हेच सत्य आहे...!!

   मिडियातील जातियवादी किड्यांनी, अतिशय विकृत बुद्धीने, समाजाची मानसिकता तयार करुन सर्वच नेत्यांच्या मर्यादा आखून त्यांना एका छोट्या परिघात बंदिस्त करून आपलं राजकीय नेतृत्व पुढे दामटतात...!!

  समाज मनं मात्र जातिय विखारात डुंबून राजकीय नेतृत्वाची मर्यादा आखून त्या नेत्याला त्याच्याच जातीचा नेता म्हणून संबोधतो किंवा तश्याच मानसिकतेने पाहतो वा विचार करतो.हा अनुभव आहे,हीच वास्तविकता आहे,हेच सत्य आहे...!!


    वैदिकांची ही दृष्टबुद्धी परास्त करायची असेल तर जातीच्या पलिकडे जाऊन नेतृत्वाला काम करावे लागेल ही काळाची गरज ओळखून वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी गेल्या चाळीस वर्षांपासून आपलं राजकीय धोरण बहूजन समाजाच्या हितासाठी झटणारे नेते म्हणून आखलं आणि त्याच दिशेने कामही केले आहे...!!

    त्या संदर्भात गेल्या चाळीस वर्षाचा अॅड बाळासाहेब आंबेडकरांच्या कामाचा आलेख बघा...!!

  #मंडल आयोग लागु करा म्हणून महाराष्ट्रभर दौरे. आंदोलन केले,परिषदा घेतल्या...!!

 #एनरॉन प्रकल्प रद्द करा म्हणून आंदोलन...!!

#गायरान जमीनी तथा अतिक्रमीत जमीनीसाठी लढा...!!

#ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून आंदोलन आणि लढा...!!

#धोबी समाजाचा एस.सी.प्रवर्गात समावेश व्हावा म्हणून मोर्चा...!!

#वारकरी संप्रदायाच्या मागणी साठी नागपूर विधानभवनावर मोर्चा...!!

#संत तुकाराम महाराजांची समाधी वाचविण्यासाठी डाऊ कंपणी विरोधात भामरागड डोंगर वाचविण्यासाठी आंदोलन...!!

#महिला मुक्ती परिषदांचे सलग दहा वर्षे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात आयोजन...!!

 #वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन...!!

#शेतकयांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून आंदोलन, रस्ता रोको आंदोलन...!!

#शेतक-यांचे कर्ज माफी साठी मोर्चा, आंदोलन...!!

#कापूस परिषदेचे आयोजन...!!

 #१३महामंडळामधून देण्यात आलेले कर्ज माफ करावे म्हणून मुंबई आझाद मैदानावर विशाल मोर्चा...!!

#सच्चर समितीच्या शिफारशी लागू कराव्यात म्हणून आंदोलन...!!

#जाचक पोटा कायदा रद्द करावा म्हणून यवतमाळ, परभणी येथे परिषदांचे आयोजन...!!


    वरील आंदोलने,लढे आणि परिषदांचे विश्लेषणात्मक विवरण केले तर अॅड बाळासाहेब आंबेडकरांनी समाजातील ओबीसी, मुस्लिम, दलित, महिला,विद्यार्थी, शेतकरी,कष्टकरी,भुमिहीन,अशा सर्वच घटकांसाठी काम केले आहे हा लेखाजोखा आहे. आधी केले मग सांगितले...!!

   आता अॅड बाळासाहेब आंबेडकरांनी ३१अॉगस्ट ला पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरासाठी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. त्यावर काही स्वत:ला आंबेडकरवादी म्हणवून घेणाऱ्या मित्रांनी आक्षेप नोंदवला आहे...!!

    मित्रांनो वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर हे सर्वधर्मसमभाव मानणारे राजकीय पुढारी आहेत...!!

  समतेचा संदेश देणा-या वारकरी संप्रदायाचे मंदिर खुले व्हावे म्हणून आंदोलन करीत आहेत ही भुमिका समजून घ्या...!!

वैदिक धर्मीयांशी वारकरी संप्रदायाचे काहीही नातं नाही...!!

आंबेडकरी विचारधारेचा विरोध वैदिक धर्मीयांच्या विचारधारेशी आहे, समतावादी वारकरी संप्रदायाशी नाही...!!

 तुम्ही आंबेडकरवादी असाल तर (?)

   तुम्ही स्वत: मनुवादी मिडियाने तुमच्या डोक्यात निर्माण केलेला वैचारिक गोंधळ काढून टाका...!!

   वैदिकांना अॅड बाळासाहेब आंबेडकर हे एका जातीचे नेते आहेत ही भुमिका मांडायची आहे,त्यांची तशीच मनिषा आहे, मात्र बाळासाहेब आंबेडकरांचे गेल्या चाळीस वर्षातील काम तर बहूजनांचे नेते म्हणून आहे,मग तुम्ही वैदिकांना अभिप्रेत असलेली भुमिका का मांडता...??

  तुम्ही आंबेडकरवादी असुनही तुम्हाला समतावादी वारकरी संप्रदाय मान्य नाही का.??

   तुम्ही आंबेडकरवादी असुनही तुम्हाला समतावादी वारकरी संप्रदायाचा ऐतिहासिक संदर्भ माहिती नाही का..??

  तुम्ही आंबेडकरवादी आहात की पुरोगाम्या सारखे ,ढोंगी आहात...??

   तुमच्या मनातील वैचारिक गोंधळ काढून टाका आणि स्वतंत्र बुद्धीने विचार करून वैचारिक विरोध करा.तुमचे स्वागत होईल,मात्र मनुवादी वैदिकांचीच री ओढली तर तुम्ही ढोंगी आहात हेचं सिद्ध होईल...!!

      जयभीम.

@.. भास्कर भोजने.


Monday, 25 May 2020

कोरोना व्हायरस ,आयोध्या वाद व एक मोठे षडयंत्र - मनोज नागोराव काळे, ठाणे

कोरोना व्हायरस ,आयोध्या वाद व एक मोठे षडयंत्र
- मनोज नागोराव काळे, ठाणे


आयोध्या येथील राम मंदिर ( पुर्वीची बाबरी मज्जीद)  हे प्राचिन बौद्ध स्थळ आहे व ते बौद्धांच्या ताब्यात दिले पाहीजे असा या आठवड्यात अचानक एकदम उद्रेक झाला, सोशल मिडीयावर सगळीकडे तीच चर्चा सुरु झालेली दिसली, जो तो सर्व मुद्दे विसरुन फक्त आयोध्या मंदिर आता बौद्धांनी मिळवले पाहीजेच असा सुर उमटायला सुरवात झालेले दिसले, यात भाजपात असलेले रामदास आठवले व इतर संघाचे गुलाम असलेले बहुजन नेते प्रामुख्याने ही मागनी करताना दिसले या गोष्टीला अधोरेखित केले पाहीजे.

★आयोध्या हे बौद्ध क्षेत्र आहे यासाठी जे कोर्टात केस लढत आहेत त्या वीनीतभाई मौर्य यांच्याशी स्वतः फोनवर बोललो आहे, ते म्हणाले की सोशल मीडियावर जी कोर्टाने बौद्धांच्या बाजुने निकाल दिला आहे अशी बातमी व्हायरल होत आहे ती फेक आहे ,कोर्ट त्यांचे काही ऐकुनही घेत नाही, मागच्या तारखेला तर यांना बोलुही दिले नव्हते,तरी या बद्दल खोट्या बातम्या पसरवुन समाजात संभ्रम व अस्थिरता निर्माण केली जात आहे, आद विनीत मौर्य यांनी खंत व्यक्त केली की त्यांच्याकडे केस लढायला पैसेही कमी पडत आहे, सोबत त्यांचा नंबर देतो ज्यांना सविस्तर माहीती हवी असेल त्यांनी विनीत मौर्य स्वता कॉल करुन मिळवावी हि विनंती ( 9919519333 )

कोरोना ने जगात थैमान घातले, भारतातही मार्च महिण्यापासुन लॉकडाऊन लावला गेला,
कोणत्याही नियोजनाशिवाय देशात लॉकडाऊन लावला गेला, भारतीय मजुर, कामगार, हातावर पोट असणारा प्रत्येक नागरिक उद्धस्त झाला, देशातील जवळपास शंभर कोटी पेक्षा जास्त नागरिकांचे जीवन उध्वस्त झाले,पन मीडिया मधुन मात्र ईतर देशांपेक्षा भारत किती चांगल्या स्थितीत आहे असाच प्रचार लावुन धरला, हजारो किलोमिटर चालुन घरी पोचलेला कानगार किंवा गावाबाहेर अस्पृश्यासारखे जगत असलेला क्वारंटाईन मजुर याची व्यथा मिडीयाने लपवली, नियोजन शुन्यता किंवा जानीवपुर्वक केले असेल पन आज देश उद्धस्त झालेला आहे, या सर्वांचा रोष मीडिया व आरएसएस भाजपाच्या आयटी सेलने चायना कडे वळवण्याचा प्रयत्न केला, पन हा रोग चायना ने भारतात आणुन सोडलेला नाही तर जे भारतीय कामगार विदेशात कामाला होते त्यांच्याकडुन नकळत हा आजार भारतात आलेला आहे हे सर्वांना मान्य असेल,

जगभरातुन भारतात आलेल्या प्रत्येक प्रवाशांचा विजा नंबर, पासपोर्ट नंबर व पत्ता सरकार कडे असतो तरीही या सर्वांना न तपासता त्यांना आपापल्या घरी जाऊ दिले गेले,
त्यांच्यापैकी ज्यांना या वायरस ची लागन झालेली त्यांनी तो व्हायरस देशात पसरवला व आज संपुर्ण देश मरन संकटात आलाय,

सरकारने सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळे लॉक करुन तेथे सर्व प्रवाशांची तपासनि केली असती,विदेशातुन आलेल्या फक्त लाखभर प्रवाशांची तपासनी करुन त्यांना घरी सोडले असते तर 130 कोटी नागरिक उद्धस्त झाले नसते, त्यामुळे याला मी पुर्वनियोजित कट म्हणतोय.

सरकारने नोटबंदी करुन जनतेचे कंबरडे मोडले, नंतर जिएसटी लावुन व्यापार्यांचे कंबरडे मोडले, आता लॉकडाऊन लावुन 100% मजुरांचे जीवन मातीत मिळवले आहे,  इतके सर्व करुनही पुन्हा मिडीयाच्या आधारे हेच लोक देशाचे तारनहार घोषित केले जातील, पन देश म्हणजे जनताच ना, जी आज पुर्नतः उद्धस्त झालेली आहे,

★सरकारच्या मागच्या सात वर्षातील अपयशांना झाकण्यासाठी कोरोनाचा रामबाण म्हणुन उपयोग करुन घेण्यात संघ परिवाला यश आले आहे, सरकाने सहा वर्षात बुडवलेल्या अर्थव्यवस्थेचे खापर आता लॉकडाऊनवरच टाकले जाणार आहे,
 या सर्व पार्श्वभुमीवर भारतातील बौद्ध समाजच फक्त सरकारला धारेवर धरत होते, सरकारच्या प्रत्येक गोष्टीवर बारिक नजर ठेवुन होते,

मागच्या आठवड्यातच अॅड प्रकाश आंबेडकरांनी कोरोना हा रोग मोदीने देशात आनला आहे, व कोरोना मुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या परिवाराने मोदीवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा असे अवाहन जनतेला केले होते व त्याच बरोबर देशातील सर्व मंदिरांची संपत्ती ही सरकारने ताब्यात घेऊन त्याचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी करावी असे सुचवले होते. पन हे सरकार धर्मवेडे व धर्मांध लोकांच्या खांद्यावर तरले आहे, उभे आहे, त्यांनी या बौद्ध समाजाला बदनाम करण्यासाठी किंवा बौद्धांना डायवर्ट करण्यासाठी
नवा मुद्दा चर्चेत आनला आहे की आयोध्या मंदिर हे प्राचिन बौद्ध मंदिर आहे व ते आता बौद्धांनी ताब्यात घेतले पाहीजे...

होय, तेच नाही तर भारतातील सर्वच प्राचीन मंदिले ही बुद्ध विहारे व स्तुपेच आहेत हे आम्हालाही माहीत आहे, तिरुपती बालाजी, पंढरपुरचे विठ्ठल मंदिर, उडीसाचे, केरळे सर्व मंदिरे ही प्राचीन बौद्ध मंदिरेच आहेत, यावर शंभर वर्षांपासुन संशोधन होत आहेत,
महान सम्राट अशोकाने ८४,००० स्तुपे बनवली होती त्यामुळे भारतातील कोणत्याही डोंगरावर टिकाव मारला तर तेथे फक्त बुद्ध सापडतात,  या देशाचा सुवर्ण काळ बौद्ध काळालाच म्हटले जाते.

★ ऐन लॉकडाऊन काळात बौद्धांना राम मंदिर की बुद्ध विहार या वादात गुंतवण्यामागचे कारण काय?

भाजपाचे राजकीय अपयश जनतेसमोर मांडणार्या बौद्ध समाजाला मोदी कडुन एका वेगळ्या विषयाकडे वळवले पाहीजे हा एकच मुद्दा यामागे आहे, सहा दिवसा पासुन बौद्ध लोक मोदीच्या कुकर्मावर चर्चा करने बंद करुन बौद्ध मंदिर की राम मंदिर यावरच अडकुन पडलेले दिसत आहेत यातच संघ परिवाराचा विजय आहे.

 ★ काही बोद्ध म्हणत आहेत की हा मुद्दा अंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायची वेळ आहे.
 मित्रांनो, सार्या जगाला माहीत आहे की भारत ही बुद्धभुमी आहे व येथे सम्राट अशोकाने हजारो विहार स्तुपे बांधली होती व ती सर्व मुस्लिम व हिंदु कर्मठांनी मोडुन तोडुन टाकली होती,

जगाला हे पन माहीत आहे की जगातील प्रत्येक बौद्धाचे श्रद्धास्थान असलेले महाबोधी विहार, बुद्धगया हे ब्राह्मनांच्या ताब्यात आहे व त्यासाठी शंभर वर्ष लढा सुरु आहे.

जगाला हे पन माहीत आहे की या देशात ज्यांनी बौद्ध धम्म संपवला त्या विचारांचे लोक आता सत्तेवर आले आहेत

जगाला हे पन माहीत आहे की २००७ साली बुद्धगया विहारात झालेले बॉम्बस्फोट हे हिंदु अतिरेक्यांनी केले होते.

वरील कोणता मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर निकालात निघाला आहे का? कोणत्या मुद्याला न्याय मिळाला आहे का?  याचे एकच उत्तर आहे .....नाही.

म्हणुन आपन थोडा वेळ संयंम पाळावा लागेल,
जग कोरोनाशी लढत असताना बौद्ध लोक मात्र एका मंदिरासाठी झगडत होते असा आपल्यावर कंलंक लावला जाईल, जो बौद्ध समाज आज मोदीच्या कोरोना आडुन होत असलेल्या षडयंत्रांना उघडे पाडतोय तोच समाज देश संकटात असताना मंदिर विहार वाद करत होता असा डाग आपल्यावर लावला जाणार आहे त्यामुळे आपन लॉकडाऊन संपेपर्यंत तरी संयम ठेवायला हवा.

आयोध्या बुद्धकालीन साकेत या पुस्तकात सविस्तर सिद्ध केले आहे की तेथे बुद्ध विहारच होते, व असे अनेक संशोधने आहेतच, आपल्यासाठी हा मुद्दा खुप महत्वाचा आहे पन त्या मुद्यावर आपन कोरोना संकट व लॉकडाऊन अासताना अडुन बसलो तर आपले तिहेरी नुकसान होणार आहे ते असे
१. बौद्ध लोक मोदीला घेरत आहेत ते काम मागे पडेल
२. बोद्धांना पुन्हा आयसोलेट करने त्यांना सोपे जाईल
३.बौद्ध लोक देशापेक्षा धर्माला महत्व देतात असा प्रचाल होईल..

संघ परिवाराचे हे हातखंडे नविन नाहीत त्यांनी मुस्लिमांसोबतही हेच खेळ खेळुन मुस्लिमांना आज अविश्वसनीय ठरवले आहे, मुस्लिमां विरुद्ध सर्व ओबीसी, बहुजनांना कंडीशनिंग केले गेले आहे तसेच आता बौद्धांबद्दल करण्याचे संघाचे मनसुबे आहेत.

त्यामुळे लॉकडाऊन संपेपर्यंत तरी आयोध्या राम मंदिर की बुद्ध विहार ही चर्चा थांबवावी असे मला वाटते आहे, आपन या देशाचे सच्चे नागरिक आहोत, भाजपाचा राजकीय नालायकपना झाकण्यासाठी आपला हातभार लागु नये साठी सतर्क राहीले पाहीजे, त्यांच्या जाळ्यात आपन अडकले नाही पाहीजे, नंतर आपन आपले सर्व मुद्दे घेऊन लढायचेच आहे.
भाजपाला तारक ठरेल अशा मुद्यांना आपन तुल दिली नाही पाहीजे. आपन त्यांचे काम सोपे करु नये.

★ या वादाला हवा देणारे नेते मंडळी आहेत रामदास आठवले, वामन मेश्राम, राजरत्न आंबेडकर व इतर भाजप धार्जिन नेते...माझे या महान नेत्यांना माझे खुले अवाहन आहे की जर तुम्हाला लॉकडाऊन काळात भाजपाने या मुद्याला समाजात पेरुन समाजाला व लोकशाहीला अडचनीत टाकण्याचे काही कारस्थान केले असेल असे वाटत नसेल किंवा तुम्हाला ते कळत नसेल तर

१. रामदास आठवले केंद्रात मंत्री आहेत त्यांनी राम मंदिर बद्दल सुप्रिम कोर्टात ती वादग्रस्त जागा राम लल्लाची आहे असा निर्णय दिला तो बदलण्यासाठी लोकसभेत कायदा करुन घ्यावा कारण त्याशिवाय सुप्रिम कोर्टाचा निर्णय बदलता येत नाही,

२ वामन मेश्राम - यांच्या संघटनेकडे समाजाचे अनगिनत रुपये जमा आहेत त्यातुन त्यांनी राममंदिर विरुद्ध केस लढणार्या विनीत बौद्ध यांची आर्थिक मदत करावी, कारण त्यांची आर्थिक अडचन आहे असे त्यांनी सांगीतले आहे.

३.राजरत्न आंबेडकर यांनी या लढाईचे स्वता नेतृत्व करावे,

नुसते सोशल मीडियावर मोठमोठे बोलुन काही होणार नाही, या तीन नेत्यांनी आयोध्या मंदिर की बौद्ध विहार याबद्दल नेतृत्व केले पाहीजे.जे लोक कायदेशीर लढत आहेत त्यांची मदत केली पाहीजे,
फेक बातम्या वाचुन कोर्टात प्रलंबित वादग्रस्त व अतिसंवेदनशील मुद्यांना पेटवुन संपुर्ण समाज अडचनीत येईल अशी भुमिका घेणे आता तरी टाळावे.

हे माझे वैयक्तिक विश्लेषन आहे, याच्याशी कुनी सहमत असावे असा अग्रह नाही. फक्त डोकं वापरावे व विचार करावा एवढी माफक अपेक्षा ठेवतो.

- मनोज नागोराव काळे, ठाणे
__________________________________

Saturday, 18 April 2020

बामसेफ - संविधानाला समाज पातळीवर उध्वस्त करण्यासाठी कार्यरत असलेली संघटना. - मनोज नागोराव काळे.


बामसेफ - संविधानाला समाज पातळीवर उध्वस्त करण्यासाठी कार्यरत असलेली संघटना.
- मनोज नागोराव काळे.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील लोकशाही कशामुळे उध्वस्त होऊ शकते हे ठामपणे मांडले आहे, बंधुत्व किती महत्वाचे आहे हे मांडले आहे, सामाजिक लोकशाही निर्माण झाली नाही तर संविधानातुन मिळालेली राजकीय लोकशाही संपुष्टात येइल असा इशारा बाबासाहेबांनी दिला आहे. आणि लोकशाही टिकवण्यासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय यावर आधारित सामाजिक लोकशाही निर्माण करणे हे सर्वात मोठी देशसेवा आहे असे स्वतः बाबासाहेबांनी सांगीतले आहे.

आता आपन मुुख्य विषयाकडे वळुया, गेली जवळपास ४० वर्षांपासुन भारतात एक संघटना काम करते ती कामगारांची संघटना म्हणुन सुरु झाली, जी संघटना स्वताला सामाजिक, अराजकिय संघटन आहे असा दावा करते व बहुतेक काही अपवाद सोडला तर सर्व सरकारी कर्मचारी या संघटनेसाठी काम करत होते कालांतराने या संघटनांमधे नेतृत्व, पद प्रतिष्ठेच्या लालसेपोटी फुट पडल्या व आज अनेक शकले झालेले आपन पहात आहोत ती संघटना आहे बामसेफ.

बामसेफ ही संघटना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाला मुळातुनच उपटुन टाकण्यासाठी कार्यरत आहे असे माझे निरिक्षण आहे व ते मी आपणासमोर मांडतो आहे, आपन बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा सरनामा व बाबासाहेबांचे भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आगोदर भारतातील लोकशाहीच्या भवितव्या बद्दल दिलेले २५ नोव्हेंबर १९५० चे संविधान सभेतले शेवटचे भाषण वाचले असेलच, आता आपन संविधानाचा सरनामा, बाबासाहेबांनी लोकशाही संपण्यासाठी कारणीभुत ठरण्यासाठी वर्तवलेले धोके यांच्या अनुशंगाने बामसेफची थोडी उलटतपासनी करुयात. व त्यानंतर तुम्ही स्वतःच तुमच्या निष्कर्षाला पोचाल असा मला तुमच्या बुद्धीमत्तेवर विश्वास आहे.

1) आम्ही भारताचे लोक - म्हणुन बाबासाहेबांनी संविधानाची सुरवात केली आहे, त्यात सर्व 100% भारतीय लोकांना गृहित धरलेले आहे त्यात जात, धर्म, पंथ, लिंग असा कोणताही अपवाद ठेवला गेलेला नाही, त्यातुन कुणालाही कोणत्याही द्वेशापोटी वगळले गेले नाही.
पण गेली जवळपास चाळीस वर्षांपासुन बामसेफ ही संघटना काही जातींना या देशाचे नागरिक नसल्याचा प्रचार करत आहे, ज्या समाजांना खुद्द डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचे नागरिकत्व बहाल केले त्यांचे भारतीय नागरिकत्व जातीय द्वेशातुन नाकारनी हि एकमेव संघटना असावी. त्यासाठी त्यांना संविधाना पेक्षा DNA रिपोर्ट महत्वाचा वाटतो.

2) धर्मनिरपेक्षता - बाबासाहेबांनी या राष्ट्राला कोणत्याही एक विशिष्ट धर्माचे राष्ट्र ठरवण्यास विरोध होता कारण त्यामुळे देशात धार्मिक तेढ कायम राहीली असती, सर्व धर्मांना या देशाने स्विकारले आहे, पण बामसेफ हि संघटना धर्मद्वेश शिकवणारी शिबीरे, कैडर कैम्प आयोजित करते व त्यात उपस्थितांचे ब्रेनवॉशिंग करुन, हजारो वर्षा पुर्वी तुमच्यावर या समाजाने अन्याय केला आहे तुम्ही त्यांना या देशाबाहेर घालवले पाहीजे असा प्रचार करते, त्यासाठी ते स्वताला या देशाचे मुलनिवासी म्हणुन घेतात, हा मुलनिवासी शब्द संविधानात कुठेही सापडत नाही, या देशातील मुळ नागरिकांना आदिवासी म्हणुन ओळखले जाते पन बामसेफ या संघटनेने स्वताला या देशाचे आपण मुलनिवासी आहोत व ब्राह्मन विदेशी आहेत असा प्रचार करुन संविधानातील आम्ही भारताचे लोक या पहिल्या ओळीलाच निकालात काढले आहे.

3) बाबासाहेबांनी सांगीतले आहे की बंधुत्वाशिवाय स्वांतंत्र्य किंवा समता अस्तित्वात रहाणार नाही - बामसेफ या संघटनेचा बंधुत्वाशी दुरदुर पर्यंत काही संबंध दिसत नाही, हि संघटना देशात लोकशाही अासतानाही टोकाचा जातीवाद करते व जे कुनी परिवर्तनवादी यांच्या विचारांशी सहमत नसते त्यांना हे दलाल, गद्दार म्हणुन हिणवतात त्यामुळे काही लोक मजबुरी ने यांच्या जातीवादी भुमिकेला बळी पडलेले दिसतात.

4) श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य - हा अधिकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील प्रत्येक नागरिकाला संविधानातुन दिलेला अधिकार आहे पन बामसेफ संघटनेचे सर्व कार्यकर्ते हे प्रचंड कर्मठपने त्यांची विचारधारा मानण्यासाठी समाजाला जबरदस्ती करताना दिसते, एससी एसटी एन टी, ओबीसी या समाजातील हिंदु व्यक्तींनी त्यांच्या घरात हिंदु देव देवतांची उपासना केलेली यांना पटत नाही, हे लोक त्या लोकांना आंबेडकरद्रोही समजतात, ज्या आंबेडकरांनी श्रद्धा व उपासनेचा घटनेतुन अधिकार दिला त्याच आंबेडकरांचे नाव वापरुन सदर दलित बहुजनांवर विचार थोपवण्याचा प्रयत्न केला जातो. अन्यथा त्यांच्यावर बहिष्कार टाका असा उपाय सुचवतात, बहिष्कार हा मनुवादी संस्कृतीचा भाग आहे हे नोट केले जावे.

5) एकात्मता - भारतीय समाजात एकात्मता रहाणार नाही यासाठी हे संघटन त्यांच्या कार्यकर्त्यांकडुन जे लोक हिंदुंच्या सार्वजनिक सण उत्सवात सामिल होतात त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचे फतवे काढतात, त्यांना गद्दार म्हणुन हिनवतात, बाबासाहेबांनी सांगीतले होते की धर्म ही प्रत्येकाची आवश्यक व खाजगी बाब आहे तरीही त्यात हि संघटना हस्तक्षेप करताना दिसते.
धर्म हा वैयक्तिक आहे, आपल्या घरात आपन आपल्या धर्माचे हवे तसे पालन केले पाहीजे पन दरवाज्याची चौकट ओलांडुन जेव्हा आपन समाजात जातो तेव्हा आपले धर्म नियम न मानता आपन भारताचे नागरिक म्हणुन आपन संविधाााच्या सरनाम्यानुसार समानता व बंधुभावाने वागले पाहीजे या गोष्टीचा या संघटनेला काहीच गंध नाही.

6) विभुतीपुजा - व्यक्तीपुजा हा लोकशाहीतील सर्वात मोठा अडसर आहे असे बाबासाहेबांनी सांगुनही बामसेफने बाबासाहेबांच्या नावानेच हा सर्व खेळ मांडला आहे, बाबासाहेबांच्या नावाने हि संघटना बाबासाहेबांचेच विचारांची मोडतोड करताना दिसते.

7) डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या सर्व संघटनांची बदनामी करणे, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबियांची बदनामी करने हा एककलमी कार्यक्रम गेली चाळीस वर्ष हि संघटना करत आली आहे.

8) डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा उद्देश्य होता, या देशातील जातीव्यवस्था संपवने व जातीविहीन, वर्गविहीन समाजाची निर्मिती करणे. संविधानातुन बर्याच प्रमाणात ते झालेही पन बामसेफने बाबासाहेबांच्या जाती तोडो आंदोलनाला जाती जोडो आंदोलनाने रिप्लेस केले, जाती संपवण्याचे सोडुन प्रत्येक जातीची अस्मिता जागी करुन त्यांना त्यांच्या जातीचा अभिमान बाळगायला या संघटनेने शिकवले त्यासाठी यांनी प्रत्येक जातीतील एक महापुरुष शोधुन दिला व सर्व जातींमध्ये चढाओढीची स्पर्धा लावण्यात या संघटनेला यश आले.
आज मातंग फक्त जय लहुजी बोलतो, जय आण्णा बोलतो, माळी फक्त जय सावता, जय ज्योती बोलतो, चांभार जय रविदास बोलतो, वाल्मिकी समाज जय वाल्मिकी बोलतो...अन्यायाच्या प्रतिकारासाठी तयार झालेला जय भीम शब्द फक्त बौद्धांपुरता राहीला, त्याला तेथेही जय मुलनिवासीने बदलण्याचा डाव यांनी आखला होता पन तो फारसा यशस्वी झाला नाही.
उदा. मातंगाला बौद्धाने जय भीम केला तर तो उत्तरात थोड्या चढ्या आवाजात जय आण्णा किंवा जय लहुजी बोलतो,यामुळे समाजात दुरावा होत गेलाय हे आपन पहात आहोत. समाजाची एकात्मता तोडण्यासाठी असे अनेक हातखंडे बामसेफने तयार केलेत.

9) या संघटनेत सामिल होण्याची एकच अट असते तुम्ही ब्राह्मनाचा टोकाचा द्वेश केला पाहीजे, तुम्ही शीलवान नसाल, तुम्ही चारित्र्यवान नसाल तरी चालते पन तुम्ही बामनाला चोविस तास शिव्या देऊ शकत असाल तरच या संघटनेत तुम्हाला प्रवेश आहे. यामुळे 3% वाल्यांना नको तेवढे महत्व प्राप्त झाले आहे, चाळीस वर्ष हि संघटना बामनांना शिव्या देत राहीली व बामन हळुहळु गल्ली ते दिल्ली पर्यंतची सत्ता काबीज करुन बसला, बामसेफच्या चाळीस वर्षांच्या संघटनात्मक कार्याचे हे फळ आहे. निगेटिव पब्लिसीटीचा सिद्धांत बामनांनी योग्य रित्या वापरुन घेतला.
बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या संघटनेत ब्राह्मनांना येण्यास कधीच विरोध केला नाही, त्यांचा विरोध प्रवृत्तीला होता मानसाला नव्हता ( जेधे जवळकरांची ब्राह्मनांना चळवळीत सामिल करुन घेऊ नये हि सुचना बाबासाहेबांना धुडकावुन लावली होती)

बाबासाहेब आयुष्यभर सांगत राहीले की जन्माने कुणी ब्राह्मन होत नाही कुनी दलित होत नाही तर कर्माने दलित किंवा ब्राह्मन होतो.
पन बाबासाहेबांच्या या विचारांना पायदळी तुडवत बामसेफ सर्वच्या सर्व ब्राह्मनांचा सारखा द्वेश करते व तसा प्रचारही करते यामुळे आगरकर, दाभोळकर सारखा परत कुनी एखादा ब्राह्मन समाजसुधारक देशात तयारच होणार नाही याची पुर्ण खबरदारी बामसेफ घेते.

10) धर्मांतर चळवळ - डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी Anhilation of caste जातीसंस्थेचे उच्चाटन या ग्रंथात जाती च्या निर्मुलनाचे दोन मार्ग सुचवलेत धर्मांतर व अंतरजातीय विवाह. बाबासाहेबांनी या दोन्ही मार्गांचा स्वतः अवलंब केला आहे. बाबासाहेबांनी धर्मांतर केले व हिंदु धर्म सोडुन तथागतांचा धम्म स्विकारला व बाबासाहेबांनंतर आद भैयासाहेब आंबेडकरांनीही देशभरात धर्मांतर सोहळे घेतले पन या धर्मांतर चळवळीला रोखण्यासाठी बामसेफने मुलनिवासीची संकल्पना निर्माण केली, आपन आहोत त्या जातीत राहुन फक्त ब्राह्मनांना शिव्या देऊन क्रांती करु शकतो असा भ्रम तयार केला. बामसेफ ने तथागत बुद्ध सोडुन इतर सर्व महापुरुषांना त्यांच्या बैनर व हैंडबिलावर स्थान दिले, धर्मांतर चळवळीसाठी बामसेफने कधीही कसलेही कार्य केले नाही.

11) अंतरजातिय विवाह - जातीसंस्था मोडण्याचा दुसरा जालिम उपाय हा अंतरजातीय विवाह करने हाच आहे असा विश्वास बाबासाहेबांना होता, वंशशुद्धी राहीलेली नाही व ती नसेल तर जातीनिर्मुलन सोपे जाईल असा विश्वास बाबासाहेबांना होता म्हणुन त्यांनी स्वता दुसरा विवाह ब्राह्मन मुलीशी केला व समाजाला तसे करण्यासाठी मार्ग शोधुन दिला.
बामसेफने आरएसएसच्या विवाह न करताच कार्यकरण्याचे तत्व स्विकारले व बाबासाहेबांच्या अंतरजातीय विवाहाचा फॉर्म्युला कसा फेल करता येयील यासाठी सतत प्रयत्न केले.
ब्राह्मणांच्या मुली विषकण्या असतात असा प्रचार बामसेफने केला. यांच्या सर्व प्रमुख नेत्यांनी आरएसएस चे ब्रम्हचर्य स्विकारले व बाबासाहेबांसह सर्वच आंतरजातीय विवाह करणारांची बामसेफने अत्यंत खालच्या पातळीवर बदनामी केली.

12) महिलांशी गैरवर्तणुक - ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांकडे सर्व जग सर्वश्रेष्ठ शीलवान, चारित्र्यवान, प्रज्ञावान म्हणुन पहाते त्यांच्या नावाने चालणारी ही संघटना स्वतःच्या महिला कार्यकर्त्यांशी अतिषय नीचपनाने वागते, याबद्दल त्या संघटनेत काम केलेल्या महिलांनी तसे जाहीरने सांगीतले आहे, यु ट्युबर बर वामन मेश्राम एक्सपोज टाकले तरी सर्व विडीयो दिसतात ते आपन पाहु शकता, महिलांना,मुलींनी पुर्णवेळ कार्यकर्त्या व्हा असे सांगुन त्यांना परिषदेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी सात सात दिवसासाठी यायला सांगीतले जाते, स्वतः वामन मेश्राम वर तसे अनेक आरोप आहेत. विलास खरात चा तर कल्याण स्टेशनवर महिलांनी चपलांनी सत्कार केल्याचे मी ऐकले आहे.

13) आंबेडकर कुटुंबाची बदनामी - हा बामसेफ च्या कार्यकर्त्यांचा सर्वात आवडता छंद म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. बामसेफ आंबेडकर कुटुंबाची बदनामी कसे करते त्याचे काही ठळक मुद्दे

- बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर नेहरु साठी घरात दारुच्या बाटल्या ठेवायचे असे वामन मेश्राम जाहिर सभेत सांगतात.
- भैयासाहेब आंबेडकर सभेला आल्यास दारु मागायचे
- प्रकाश आंबेडकरांच्या घरात गणपती बसवतात
- सुजात आंबेडकरांची मुंज केली आहे.

पहा बाबासाहेब ते सुजात साहेब, बाबासाहेबांसह सर्व कुटुंबातील प्रत्येकावर वामन मेश्राम ने खोटे आरोप केलेले आहेत,
- भारिप बहुजन महासंघ, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल व आता वंचित बहुजन आघाडी यांची बदनामी करने, यांच्याबद्दल अफवा पसरवने, हा वामन मेश्राम व गैंग चा धंदा आहे.
भिडे विरुद्ध प्रकाश आंबेडकर असा राज्यभर संघर्ष पेटला होता तेव्हा सुद्धा मेश्राम व गैंग प्रकाश आंबेडकरांची बदनामी करत होते,
तेलतुंबडे विरुद्ध आरएसएस असा संघर्ष पेटलाय यावेळी ही बामसेफने तेलतुबंडेची बदनामी सुरु केली.
आंबेडकर भवन पाडले तेव्हा प्रकाश आंबेडकर विरुद्ध रत्नाकर गायकवाड व फडनविस असा संघर्ष होता त्यावेळोही बामसेफ ने प्रकाश आंबेडकरांचीच बदनामी केली होती.

14) राजकीय भुमिका - बामसेफ हे सामाजिक संघटन आहे असे ते बोलतात पन निवडणुकात यांचा पाठींबा नेहमी जातीवादी पक्षांनाच दिला आहे. मागील वर्षी घरानेशाही तुन लोकशाही ला मुक्त करण्यासाठी महाराष्ट्रात एक लोकक्रांती झाली, वंचित बहुजन आघाडीने मोठा तांडव केला, पन वामन मेश्राम नी यावेळी त्यांची राजकीय भुमिका मांडताना वंचित बहुजन आघाडी जो पक्ष बहुजनांची राजकीय गुलामी संपवणारे पर्व घडवत होते तेव्हा वामन मेश्राम ने वंचित आघाडीची बदनामी करत राष्ट्रवादी कॉंग्रेस ला जाहीर पाठींबा जाहीर केला. ज्या राष्ट्रवादी ला महाराष्ट्रातील जातीवादी पक्ष म्हणुन आंबेडकरी समाज त्यापासुन दुर रहातो.
तरीही बामसेफ त्यांनी राजकीय पाठींबा देतो हे विशेष.
15) आर्थिक गैरव्यवहार - बामसेफ या संघटनेकडे देशातील सर्वात जास्त पैसा जमा होतो, या हि संघटना कामगारांची असली तरी यांचा प्रमुख हा कामगार नाही, हि संघटना आजवर करोडो अरबो रुपये जमा करुन ती खाऊन बसली, कोणाला कोणताही हिशोब दिला गेलेला नाही, दिला जातही नाही.
बाबासाहेबांनी लोकवर्गनीतुन त्याकाळी एकट्याच्या जीवावर कॉलेज, होस्टेल, संस्था उभ्या केल्या पन बामसेफने अनगिनत पैसा गोळा करुन त्यातुन काहीही निर्माण केले नाही, सर्व पैसा खाऊन डकार सुद्धा दिला नाही.
यांच्या बद्दल त्याच संघटनेच्या काही पदाधिकार्यांनी 2015 ला बंड करुन वामन मेश्राम ची बदमाशी जनतेसमोर आनली होती पन बामन मेश्राम चे ब्रेनवॉश कार्यकर्ते मेश्राम समोर बाबासाहेबांचा अपमान सहन करतात तर बाकींचे काय?

16) सक्रिय आंबेडकरी कार्यकर्त्यांना डायवर्ट करने -
हा या संघटनेचा ठरलेला कार्यक्रम आहे, काही दिवस लक्ष ठेवले तरी कुनालाही याची प्रचिती येऊ शकते, ज्या ज्या वेळी आंबेडकरी कार्यकर्ते संघ भाजपाला एखाद्या मुद्दायवरुन घेरतात त्या त्या वेळी बामसेफ कडुन एखादा नविन मुद्दा चर्चेला आणुन सर्व कार्यकर्त्यांना संघ भाजपा च्या विरोधापासुन स्वताकडे डायवर्ट केले जाते, सक्रीय कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या बिनकामाच्या चर्चांमधे गुंतवुन ठेवुन संघ भाजपाचा रस्ता मोकळे करणे हाच एकमेव उद्देश्य असतो.

17) भारतीय लोकप्रतिनिधींसाठी बाबासाहेबांनी २२ प्रतिज्ञा दिलेल्या नाहीत, त्या प्रतिज्ञा धर्मांतरीत बौद्धांसाठी 1956 ला बाबासाहेबांनी दिल्या होत्या, त्या बौद्धांसाठी वैयक्तिक संविधानच आहेत पन प्रजासत्ताक भारताचा लोकप्रतिनिधी म्हणुन समाजात काम करत असताना संविधान हे त्यांच्यासाठी अनिवार्य असते, लोकप्रतिनिधी हा सर्व धर्म, पंथांचा सन्मान करणारा असावा असे बाबासाहेबांनी म्हटले आहे पण जर एखादा बहुजन लोकप्रतिनिधी सार्वजनिक धार्मिक सोहळ्यात, मंदिरात, एखाद्या सार्वजनिक समारंभात गेला तर बामसेफ चे कार्यकर्ते त्या नेत्याला गद्दार, आंबेडकर द्रोही ठरवतात, खरे पाहीले तर लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक जिवनात धार्मिक कट्टरवाद जोपासने हा आंबेडकरद्रोह आहे पण बामसेफ संविधानाच्या मोडमोडीची एकही संधी सोडत नाही. वरुन स्वताला बुद्धीजीवी असे बिरुद यांनी स्वता लावुन घेतलेले आहे.

मित्रांनो, भारतीय संविधान राजकिय पातळीवर भाजपा व आरएसएस संपवत आहे तर सामाजिक पातळीवर ते संपवायचे कठीन कार्य करण्यासाठी त्यांनी बामसेफ सारखी उपशाखा तयार करुन सोडलेली आहे हेच यातुन सिद्ध होते.
बाबासाहेबांचा धम्म, बाबासाहेबांचे संविधान, बाबासाहेबांची जाती अंताची चळवळ अपयशी करण्याचे सर्व प्रयत्न आंबेडकरी चळवळीचा बुरखा पांघरुन केले जात आहे,
हिरव्या गवतात हा हिरवा साप सोडला आहे, त्याला ओळखा व यांच्यापासुन सावध रहा.

बामसेफ नेहमी डॉ बाबासाहेबांचे रक्ताचे नाही तर आम्ही विचाराचे वारस आहोत असा प्रचार करत असते पन त्यांचे सर्व कार्य आंबेडकरांचे विचार गाडण्यासाठीच आहे हे सुर्यस्त्य आपणास दिसत नसले तर याच्यासारखे दुसरे दुर्दैव नाही.

- मनोज काळे,ठाणे 8169291009
____________________________

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...