ज्यांना बेईमान व्हायचे आहे त्यांना होऊ द्या - सुमित वासनिक.
जिग्नेश मेवानी आणि चंद्रशेखर रावण हे महाराष्ट्रा बाहेरील युवक जेंव्हा भाजपच्या मोदि सरकार विरोधात उभे झाले तेंव्हा ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांना साथ दिली. जिग्नेशला निवडुन आणण्यासाठी बाळासाहेबांनी स्वतः जाऊन प्रचार केला, गुजरात मधील अनेक आंबेडकरी, दलित कार्यकर्त्यांनाही त्याचा प्रचार करायला लावला. जिग्नेशच्या प्रचारनिमित्त बाळासाहेबांनी 26 नोव्हेंबर 2017 ते 6 डिसेंबर 2017, अशी तब्बल 10 दिवस त्याच्या मतदारसंघात संविधान जागर यात्रा काढली होती, तेंव्हाकुठं जिग्नेश निवडून आला. तसाच चंद्रशेखर रावण, सहरनपुर दंगलीनंतर पोलीस अटकेत असतांना रावणच्या सुटकेसाठी बाळासाहेबांनी प्रयत्न केले. 16 सप्टेंबर 2017 ला रावण जेलमध्ये असतांना बाळासाहेब स्वतः त्याला भेटायला गेले होते, त्याच्या वकिलांच्या टिमला मार्गदर्शन केले. दिल्ली मध्ये मोठा मोर्चा काढून रावणच्या सुटकेसाठी आंदोलन केले. महाराष्ट्रात आल्यावर रावणला जेंव्हा नजरकैदेत ठेवण्यात आले त्याविरोधातही बाळासाहेबच बोलले ज्यामुळे रावणची नजरकैदेतुन सुटका झाली.
जिग्नेश आणि रावण या दोघांना बाळासाहेबांनी मदत केली आता हे दोघेही बाळासाहेबांच्या विरोधात महाराष्ट्रात फिरत आहेत. ज्या राष्ट्रवादिने दलित, आदिवासींवर अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घातले आज जिग्नेश मेवानी त्याच राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर बाळासाहेबांच्या विरोधात फिरतो आहे. तर चंद्रशेखर रावण बाळासाहेबांची चळवळी प्रति असलेली इमानदारी पाहून नंतरच समर्थन देऊ अशी व्यक्तव्ये करीत आहे. या दोघांच्या या बेईमानी वागणुकी मूळे महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेमध्ये या दोघांबद्दल संतापाची लाट उसळली आहे. हे दोघे कोणाच्यातरी इशाऱ्यावर बाळासाहेबांना विरोधासाठी फीरतायत अशी भावना आंबेडकरवाद्यांमध्ये तयार झाली आहे. या दोघांना ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी मदत करायलाच नको होती असे सर्व बोलत आहेत.
मित्रांनो एक लक्षात घ्या ब्राह्मणवादी व्यवस्थे सोबत लढणाऱ्या प्रत्येकाला बाळासाहेब मदत करीत आले आहेत. यातील जिग्नेश आणि रावण सारखे काही बाळासाहेबांच्या विरोधात जातीयवाद्यांनाच साथ देत आहेत तर काही आजही बाळासाहेबांच्या सोबत प्रामाणिक पणे काम करीत आहेत. जे आपल्याला सोडून गेले , बेईमान झाले त्यांना सोडून आणि जे आपल्या सोबत आहेत त्यांना घेऊन बाळासाहेब आंदोलन चालविणारच आहेत. पुढे अजूनही ज्या युवकांना मनुवादी सरकार त्रास देईल बाळासाहेब त्यांच्या समर्थनातही उभे राहतील त्यांना मदत करतील. काही बेईमानांमुळे बाळासाहेब चळवळीत येत असलेल्या नव्या नेतृत्वास मिळेल त्याप्रकारे मदत करण्याचे थांबवणार नाहीत. पुढे चालून हे युवक आपल्यालाच आव्हान उभे करतील असे म्हणून बाळासाहेब मदत करण्यापासून थांबणार नाहीत. भविष्यात त्यांना कोणता मार्ग निवडायचा आहे हे ते युवक ठरवतील, यावरूनच त्यांची चळ्वळीप्रतीची बांधिलकी कळेल. बाळासाहेबांचा मार्ग ठरलेला आहे ते मनुवाद्यांविरोधात लढणाऱ्या प्रत्येकाला साथ देतील.
ऍड.बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित आघाडीच्या माध्यमातून प्रस्थापितांना आव्हान उभे केले आहे. त्यामुळे प्रस्थापित अशी अनेक लोक उभी करून त्यांना बाळासाहेबांना विरोध करायला लावले जाईल. पण आंबेडकरी जनता आता जागृत आहे ती , ती कशालाच भुलणार नाही , ही जनता बाळासाहेबांच्याच सोबत राहील हे येणार काळ पहिलच.