Friday, 11 October 2019

भांडवलदारांकडुन होणारी आधुनिक अस्पृश्यता.
- मनोज काळे, ठाणे.

आज २०१९ सालामधेही मनुवाद्यांकडुन अस्पृश्यता पाळली जाते असे विधान कदाचित कुनाला सहज रुचनार नाही, तुम्ही म्हणाल की डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहीले तेव्हाच भारतातुन अस्पृश्यतेला कायदेशीर संपवले आहे, पण मी त्या अस्पृश्यतेबद्दल लिहीत नसुन आजच्या काळात माजलेल्या राजकीय अस्पृष्यतेबद्दल लिहीत आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीने ओतप्रोत असे विशाल संविधान आपल्या देशाला बहाल केले व आपन आता एका विसंगत परिस्थितीला सामोरे जात आहोत, लोकशाही टिकवायची की संपवायची हे सर्वथा या देशील बहुसंख्य लोकांच्या मानसिकतेवर अवलंबुन आहे असा इशारा सुद्धा दिला होता, आणि आज २०१९ ला आपन तो विषय चर्चेला घेत आहोत त्याचे कारण आहे अॅड प्रकाश आंबेडकरांनी सुरु केलेली वंचित बहुजन आघाडी व या लोकचळवळीतुन उभ्या राहिलेल्या सशक्त राजकीय पर्यायाकडे पहाण्याचा उच्चवर्णिय भांडवलदार, राजकीय नेते व जनतेचा दृष्टीकोन.
लोकसभा २०१९ च्या निवडणुकी पुर्वी फक्त ४० दिवस आगोदर या पक्षाचा जन्म झाला व महाराष्ट्रातील जनतेने या पक्षाचे निश्कलंक मुत्सद्दा नेतृत्व, पक्षाची प्रामाणिक भुमिका, पक्षाचा जाहिरनामा या गोष्टीना मोकळ्या मनाने स्विकारले व एक करोड च्या वरती मदतान दिले, इविएम मशीन ने चोरुन शेवटी वंचित च्या वाट्याला फक्त ४३ लाख मते शिल्लक राहीली व तेवढेच अधिकृत मदतान मिळाले असे जाहीर झाले.
*दिडशे वर्ष जुनी राजकीय परंपरा असलेला कॉंग्रेस व जवळपास शंभर वर्षाची आरएसएस चे अपत्य असलेला भाजपा या दोन पक्षांसमोर हा चाळिस दिवसाचा नवखा पक्ष सर्वात जास्त ताकदिने उभा राहु शकला याला कारण आहे कि हा पक्ष लोकचळवळीतुन व लोकनिधीतुन उभा राहिला आहे.*
तरीही फक्त या पक्षाची मनुवाद्यांकडुन बदनामी केली गेली त्याची कारणे वरवर पहाता.

१. हा पक्ष महाराष्ट्रातील जलसाठ्यांचे नियोजन करुन पुरग्रस्त भागाचे पाणी दुष्काळी भागात नेऊन दोघांचे कल्याण करणार आहे.
२. हा पक्ष देशातील सर्व निष्कलंक लोकांनी मिळुन उभा केला आहे.
३.हा पक्ष लोकशाहीला काही कुटुंबांच्या घरानेशाहीतुन मुक्त करण्यासाठी बनला.
४.हा पक्ष लोकशाहीचे सार्वत्रीकरन करणार आहे.
५.हा पक्ष सर्व जाती धर्मातील वंचितांना त्यांची लोकसंख्या न पहाता, त्यांना प्रतिनिधित्व देत आहे.
६. हा पक्ष बलाढ्य धनगर समाजाची अस्मिता जागी करतोय.
७. हा पक्ष मुस्लिमांचे राजकीय सशक्तीकरन करतोय.
८.हा पक्ष भांडवलदारांची गुलामी नाकारुन शेतकर्याच्या बाजुन लढतोय.
९ हा पक्ष केजी ते पिजी शिक्षण मोफत करणार आहे ज्यामुळे शिक्षणाला धंदा करुन बसलेल्यांना धोकादायक वाटतोय.
१०.हा पक्ष पोलिसांना राजकीय गुलामगिरीतुन मुक्त करुन त्यांना इतर नोकरदारा प्रमाणे सुविधा देणार आहे.
११.या पक्षाकडुन शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार या सर्व ज्वलंत प्रश्नाना सोडवण्याची धोरने आखले गेले आहेत.
१२.हा पक्ष बुडत चाललेल्या बैंकाना सावरनार आहे
१३ हा पक्ष अशी लोकहिताची कामे करणार आहे जी आजवर कोणत्याही राजकीय पक्षाने करायची नियत ठेवली नव्हती.

वरिल सर्व मुद्दे देशातील प्रत्येक जाती धर्माच्या नागरिकाच्या जिवन मरनाचे प्रश्न आहेत, वरील सर्व प्रश्न त्या सर्व मतदारांची आहेत ज्यांनी आजवर कॉंग्रेस व भाजपा व त्यांच्या मित्रपक्षांना फुकट किंवा काही ठिकाणी पाचशे रुपये, दारु मटनावर मतदान दिले गेले आहे,
- आजवर शिक्षणाचे बाजीरीकरन करुन त्यातुन नफा मिळवावा यासाठी राजकीय नेते शिक्षण माफियाचे काम करत होते,
- आजवर पोलिसांना घरातील भाजीपाला आनने, घरातील कुत्र्याला शि सु करायला बाहेर नेने व मुलांना शाळेत सोडने व आनने यासाठी नेत्यांनी वापरले,
- आजवर शिक्षकांना सेवक म्हणुन वापरले गेले
- आजवर अंगनवाडी सेविकांचे शोषन केले गेलेय
- आजवर अनेकांना आर्थिक मंदिच्या नावावर नोकर्या गमवाव्या लागल्या आहेत व उच्च शिक्षित लोक बेकार राहीलेत ( मी सुद्धा)
- आजवर लोकप्रतिनिधी म्हणुन निवडुन येने म्हणजे पुढच्या सात पिढ्यांसाठी रग्गड पैसा कमावने असेच होत राहीले.
- आजवर एकाच जातीच्या माणसाच्या चार पाच पिढ्या लोकसभा, विधानसभेवर गेले व त्यांच्या जिल्हातील जनता चार पाच पिढ्या पासुन त्याच घरान्याला मत देत आले व त्याने लोकशाहीत समांतर हुकुमशाही उभी रहात गेली.
- निवडणुक फॉर्म भरायला होणारी गर्दी दाखवली गेली नाही
- लाखांच्या सभा मीडियातुन पुर्ण दुर्लक्षित केले गेले.
- टिवी चर्चासत्रात ऐंकर भाजपची बाजु मांडु लागलेत व वंचित बहुजन आघाडी बद्दल अफवा टिवी वरुन पेरल्या जात आहेत.
- आजवर सिनेमा, क्रिकेट, सिरीयल यात मतदारांना गुंतवुन त्यांना त्याची सवय लावुन, एक नशा भिनवली गेली, जनतेला राज्यकारभार व राजकीय नेत्यांच्या भानगडी कडे लक्ष द्यायला वेळच शिल्लक ठेवला नाही.

या व अशा अनेक गोष्टी राजकीय पक्षांनी कॉंग्रेस, भाजपा, सेना,  राष्ट्रवादी, मनेसे व इतर उच्चवर्णिय पक्षांनी मिळुन जनतेला आलटुन पालटुन सतत लुट केली, कॉंग्रेस भ्रष्टाचारी म्हणुन भाजपला मतदान करा, भाजप जातावादी म्हणुन कॉंग्रेस ला मतदान करा अशीच एक परंपरा या राज्यात पडली, जनेतेला जातीवाद व भ्रष्टाचार या दोन मुद्यांवर खेळवत ठेवुन या दोन मनुवादी, संघवादी, भांडवलशाही पक्षांनी ७० वर्ष महाराष्ट्राला मुर्खात काढले, आपनही *टिवी, न्युज, मिडीया जसे आपल्या मेंदुचे कंडीशनिंग करेल तसे त्यांच्या तालावर नाचु लागलो* व आपल्याला या असा भास निर्माण करुन दिला गेला की या दोनच पक्षांपैकी एकाला तुम्ही निवडले पाहीजे, तिसरा पर्याय तुमच्याकडे नाहीच, त्यामुळे सतत ७० वर्ष छ.शिवराय,छ शाहु महाराज, क्रांतीबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, अन्नाभाऊ साठे, गाडगे बाबा यांची जन्मभुमी, कर्मभुमी असलेला हा महाराष्ट्र भाजप व कॉंग्रेस या पक्षांनी पुर्णपने पोखुन टाकला आहे, या महामानवांनी या देशाला सावरले होते पन यांचे नाव हे मनामानव ज्या वेगवेगळ्या जातीत जन्मले त्या जातीत वाद पेटवुन मनुवाद्यांनी सत्ता कायम स्वतःच्या हातात ठेवली, कारण सत्ता ही सर्व प्रश्नांची गुरुकिल्ली आहे असे बाबासाहेब म्हणत होते, हि किल्ली मनुवाद्यांनी स्वताकडे कायम ठेवली.
आता २०१९ मधे वंचित बहुजन आघाडी का महाराष्ट्रातील सर्वात मोठा राजकीय पर्याय उभा असुनही जाणिवपुर्वक मीडिया मधुन या पक्षाला बदनाम केले जात आहे, या पक्षाचे अस्तित्व नाहीच अशी प्रतिमा बनवली जात आहे.
१. लोकसभेला सर्व ४८ जागांवर उच्चशिक्षित उमेदवार देणारा एकमेव पक्ष.
२.विधानसभेला सर्व २८८ जागांवर उच्चशिक्षित उमेदवार देणारा एकमेव पक्ष
३.जनता जमेल तेवढा पैसा पक्षाला जाहीर सभांमधे दान देते आहे, असा एकमेव पक्ष
४. एक रुपया न देता लाखो लोक सभांना गर्दी करतात असा एकमेव पक्ष
५.जनतेमधुन प्रत्येकजन स्वतःला जमेल ते योगदान देऊन हा पक्ष सत्तेत यावा असा प्रयत्न होतोय, असा एकमेव पक्ष.

तरीही या देशातील  (१००% )५०० इलेक्ट्रॉनिक न्युज चैनल, सर्वच्या सर्व वर्तमानपत्रे मात्र या सर्वात मोठ्या पक्षाची एकही खरी बातमी चैनल वर दाखवत नाही किंवा वर्तनान पत्र बातमी छापत नाही, ही आहे राजकीय अस्पृश्यता.
या पक्षातील नेत्यांचे वक्तव्ये मोडुन तोडुन चुकीच्या अर्थाने लोकांपर्यंत पोचवली जातात व पक्षाची बदनामी केली जात आहे.
वंचित बहुजन आघाडी या पक्षाला मदत करने म्हणजे हा पक्ष ज्या पक्षांशी लढतोय त्यांचीच मदत केल्यासारखे आहे त्यामुळे तुमचे मतदान वाया घालवु नका असा भ्रम पसरवला जात आहे.

मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही ७० वर्ष कॉंग्रेस, भाजपा,सेना ला पोसले आहे, आता तुमच्या प्रश्नासाठी लढत असलेल्या एका प्रामाणिक पक्षाची ताकद वाढत आहे ती आणखी वाढवा, मीडीया ही भांडवलदारांच्या मालकिची आहे त्यामुळे ते लोक तुमच्या हिताच्या गोष्टी कधीच तुमच्या पर्यंत पोचु देणार नाही, त्यामुळे आपन *अशा झाडांना खत पाणी देऊन वाढवु नका ज्याच्या फांदीवर तुमच्या गळ्यातील गळफासाची दोरी बांधली गेली आहे, ते झाड ( भाजपा/ कॉंग्रेस/ सेना / राष्ट्रवादी)  जर वाढले तर तुमच्याच गळ्याचा फास आवळला जाणार आहे.* त्यामुळे आपल्या जातीचाच उमेदवार असावा असा संकुचित विचार करुन आपल्याच पुढच्या पिढ्यांना हुकुमशाहीत ढकलु नका, विचार करा,

*या देशाला लोकशाही व सर्व नागरिकांना स्वातंत्र्य, बंधुता,समता, न्याय, शिक्षण देण्यासाठी हजारो वर्षानंतर एक आंबेडकरांना जन्म घ्यावा लागला होता,* त्यांनी सर्व काही कायदेशीर मिळवुन दिले पण घरानेशाहीने त्यावर मात करत ती लोकशाही बंदिस्त करुन ठेवली होती, *आता पुन्हा एक आंबेडकर आपल्याला लाभले आहेत, कृपया यावेळी आंबेडकरांची ताकद बना, आपल्या दोशाला मोठ्या अनर्थापासुन वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ला यशस्वी करा.*
भांडवलदारांकडुन होत असलेली राजकीय अस्पृश्यता आता मतदार जनतेने हानुन पाडली पाहीजे व आम्हाला टिवी मीडिया पेक्षा सोशल मिडीयावर सतत सक्रिय राहुन जागृतीचा हा वणवा घराघरात पोचवावा लागेल. सोशल मीडियाच या मनुवादी व भांडवलदारांच्या निर्मित राजकिय अस्पृश्यतेवरचा तोडगा आहे व आपन त्याचा पुरेपुर वापर करुन वंचित बहुजन आघाडी लहानात लहान बातमी, फोटो, प्रचारगीत एकुन एक मतदारापर्यंत कसे पोचवता येईल यासाठी प्रयत्न करुयात.
*आपला विजय निश्चित आहे, आपन प्रामाणिक लोक आहोत.*
- मनोज नागोराव काळे, ठाणे 8169291009

_________________________

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...