Friday, 18 September 2020

बोधिसत्व बाबासाहेबांचे सर्वसमावेशक राजकारण म्हणजे सॉफ्ट हिंदुत्वच होते का?

 बोधिसत्व बाबासाहेबांचे सर्वसमावेशक राजकारण म्हणजे सॉफ्ट हिंदुत्वच होते का? -  मनोज काळे, ठाणे.


बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय भुमिकांना अजिबात समजुन न घेणारांनी वंचित बहुजन आघाडी व अॅड बाळासाहेब आंबेडकर यांची बदनामी करण्याचे अभियान आरंभले आहे, ते पाहुन त्या सर्व अज्ञानी विद्वानांबद्दल मी प्रथम करुणा व्यक्त करतो. ज्या प्रमाने एका राजकीय पक्षाने छ.शिवरायांना मुस्लिमांचा शत्रु ठरवु स्वताच्या राजकीय पोळ्या भाजल्या त्याच प्रमाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वसमावेशक, पितृतुल्य राजकारनाला हिंदु विरोधी राजकारन म्हणुन सतत प्रचार करुन प्रज्ञासुर्याला एका राज्याच्या एका जातीपुरतेच मर्यादित करण्याच्या मनुवादी डावपेचाला बळी पडलेल्या अज्ञानी विद्वांनांसाठी बाबासाहेबांच्या सर्वसमावेशक राजकीय भुमिकांतुन काही निवडक मुद्दे संदर्भासह या लेखात चर्चेला घेतले आहे.

दि. ३१ ऑगस्ट २०२०, भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहीला जाईल असा दिवस, काही वर्षानंतर या दिवसाचे महात्म्य गायले जाईल व यावर पोवाडे लिहीले जातील यात तिळमात्र शंका नाही, कारण या दिवशी अॅड प्रकाश आंबेडकर यांनी विश्व वारकरी सेनेच्या लॉकडाऊन तोडुन मंदिर प्रवेश मिळावा या आंदोलनाला यशस्वी केले. इतिहासाचा मानबिंदु ठरावा अशी हि घटना पन या घटनेमुळे देशभरात एक वैचारिक घुसळन सुद्धा घडली, वैचारिक मतभेदामुळे अनेक चर्चांना उधान आले, प्रत्येकानेच या घटनेला आपापल्या बौद्धिक कुवतीनुसार,आपापल्या मानसिकतेनुसार मुल्यमापन केले व प्रत्येकजनच या घटनेवर व्यक्त होताना दिसला, या घटनेमुळे पुरोगामी व प्रतिगामी यामधील पुसट रेषा स्पष्ट झालेली आढळली, कसे ते मी पुढे सविस्तर चर्चेला घेत आहे. या आंदोलनाला काहींनी समर्थन केले तर काहींनी कडवा विरोधही केला व विशेष म्हणजे विरोधक व समर्थक दोन्ही बाजुकडुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे दाखले दिले जात होते.

यामुळे आंबेडकरी समाज डॉ बाबासाहेब आंबेडकरांना ,त्यांच्या विचारांना किती आत्मसात करु शकला आहे, किती समजु शकला आहे हे स्पष्टपने जानवले,

मी हा लेख लिहीतोय कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने काही लोक समाज माध्यमावर  स्वतःच्या डोक्यातील विचार मांडताना मला अनेक फेसबुक वाचाळ विर दिसले, त्यांनी कोणते बाबासाहेब वाचले असतील याचा मला प्रश्न पडला, ते "बाबासाहेब" असे नाव तर घेत होते पन ते आंबेडकर की पुरंदरे? नक्की कोणत्या बाबासाहेबाचे ते अनुयायी होते असा प्रश्न मला पडला. कारण हे दोन बाबासाहेब आहेत पण एक समतेचे पुरस्कर्ते तर दुसरे विषमतेचे वाहक आहेत. मी या लेखात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुयायी म्हणुन लिहीत आहे. त्यामुळे बाबासाहेबांचे राजकीय जीवन न अभ्यासल्यामुळे आपन अज्ञानातुन बाबासाहेबांच्या आंदोलनात कसे अडथळे आनतोय याची किमान जान वंचित बहुजन आघाडी च्या विरोधकांना व्हावी ही माफक अपेक्षा आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन हा पक्ष चालवला, भारतीय राजकारणातला तो पहिला सक्षम विरोधी पक्ष होता, त्यामुळे तत्कालिक एकमेव प्रस्थापित पक्ष कॉंग्रेस ने बाबासाहेबांचे राजकीय खच्चीकरन करण्यासाठी अनेक हतखंडे वापरले, बाबासाहेबांच्या विरुद्ध हरिजनांना भडकावुन वापरुन घेतले, बाबासाहेब हे त्याकाळचे देशाचे शत्रु समजल्या जाणार्या ब्रिटीशांचे हस्तक आहेत असा प्रचार रुढ केला होता पन बाबासाहेबांनी त्यांचे देशहिताचे, लोकहिताचे कार्य सतत सुरु ठेवले, त्यांनी कॉंग्रेसींना आपन कसे देशभक्त आहोत हे सिद्ध करण्यात वेळ घालवला नाही, बाबासाहेब कॉंग्रेसींना एका ओळीत म्हणाले होते...Time will tell.

आणि खरोखरच आज वेळ सांगत आहे की बाबासाहेब ब्रिटीशांचे हस्तक नव्हते तर तेच एकमेव या देशाचे व देशवासियांचे मायबाप होते, हे आज कॉंग्रेसी लोकही जाहीरपने कबुल करताना दिसतात, अगदी त्याकाळी बाबासाहेबांचे राजकीय खच्चीकरन करण्यासाठी वापरलेले हतखंडे कॉंग्रेस वाले यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांचे राजकीय खच्चीकरन करण्यासाठी वापरताना दिसतात, आज देशाचा,संविधानाचा, लोकशाहीचा शत्रु असलेल्या आरएसएस चे बाळासाहेब हस्तक आहेत असा खोटा प्रचार कॉंग्रेस करताना दिसते व हरीजन सेवक त्यांच्या मालकांशी इमानदारी दाखवण्यासाठी त्यांना सामिल होताना दिसतात.

अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी हा पक्ष काढला व त्याला गेल्या निवडणुकात तुफान प्रतिसाद मिळाला, हे प्रस्थापित पक्षांना पचले नाही त्यामुळे त्यांनी बाळासाहेबांची यथेच्छ बदनामी सुरु केली व या प्रचाराला स्वताला आंबेडकरवादी म्हणवुन घेणारे काही अज्ञानी हरीजन बळी पडताना दिसले.

ज्यांना बाळासाहेबांच्या राजकीय भुमिका पटत नाहीत त्यांनी एकदा बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय भुमिकांचा अभ्यास करावा अशी मी त्यांना विनंती करतो, कारण अविद्या हे अनर्थाला जबाबदार असते असे क्रांतीबा फुले आपनास सांगुन गेलेत, आपली राजकीय अविद्याच आपल्या राजकीय अनर्थाला कारनीभुत आहे त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय प्रवास, राजकीय दृष्टीकोन, राजकीय सर्वसमावेशक भुमिका याचा अभ्यास केल्याशिवाय राजकीय टिका टिप्पनी करने हे स्वतःच्या अकलीचे जाहिर अपमान केल्यासारखेच ठरत आहे.

बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन हा पक्ष काढला, दोन सार्वत्रिक निवडणुका त्यातुन लढले, माझी वंचित बहुजन आघाडीच्या विरोधकांना विचारने आहे की तुम्ही बाबासाहेब व शेकाफे यांचा अभ्यास केला आहे का?

नसेल केला तर करावा, मी बाबासाहेबांच्या लिखान व भाषनातुन काही महत्वाचे मुद्दे खाली चर्चेला घेत आहे.

ज्या मुद्यांना आज बाळासाहेब वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातुन राजकारन करत आहेत ते सर्व मुळ मुद्दे हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचेच आहे, त्यामुळे बाबासाहेबांचा राजकीय वारस कोण आहे हे समजने सोपे होईल,

मी फक्त काहीच निवडक मुद्दे घेत आहे, बाकी तुम्ही स्वता वाचन कराल व समजुन घ्याल असा मला विश्वास आहे.

या लेखाचे सर्व संदर्भ Dr Babasaheb Ambedkar Writing and speeches Vol 18, Part 3 मधे तुम्हाला पहायला मिळतील.

१.  "आपले घर सोडून दुसऱ्याच्या हवेलीत शिरणे म्हणजे मोठा मुर्खपणा आहे आपली झोपडी शाबूत राखा तसे न झाल्यास ब्राह्मणेतर पक्षाप्रमाणे आपली स्थिती झाल्याशिवाय राहणार नाही ब्राह्मणेत्तर पक्षाची काय दुर्दशा झाली?

 1932 साल पर्यंत आम्ही संगनमताने काम करीत होतो त्यावेळी काही ब्राह्मणेतर पुढाऱ्यांना वाटले की काँग्रेस बाहेर राहून उपयोग नाही आज शिरून आतून पोखरून काँग्रेसचा किल्ला फोडता येईल बाहेरून किल्ला फोडता येणार नाही या समजुतीने ते काँग्रेसमध्ये शिरले मी त्यांना पुष्कळदा बजावून सांगितले परंतु त्यांनी माझे ऐकले नाही आपण आज श्रुती भयंकर चूक झाली असे आज ब्राम्हणेत्तर पक्षाच्या लोकांना वाटत आहेत आज ब्राह्मणेतर नामशेष झाला आहे ते आपली राहुटी कितपत बांधू शकतील याबद्दल मला शंका आहे"( पान क्र १७६)

वरील आदेशानुसार बाळासाहेबांनी स्वताचा पक्ष कदीच कुणाला विकला नाही, कुनाला कधीच शरन गेले नाहीत त्यामुळे बाळासाहेबांना अहंकारी व घमंडी म्हणुन बदनामी केली जात आहे, बाळासाहेब बाबासाहेबांचा राजकीय आदेश पालन करत आहेत, याउलट बाबासाहेबांनी सुचवलेला धोका सत्य झाला आहे,जे लोक स्वताची झोपडी मोडुन या भाजप,सेना,राष्ट्रवादी व कॉंग्रेस या प्रस्थापित पक्षात सामिल झाले त्यांचे अस्तित्व आज संपले आहे पन ते लोक त्यांच्या संपण्याचा दोष बाळासाहेबांवर टाकुन बदनामी करताना आपल्याला दिसतात. याची नोंद वाचकांनी घ्यावी. मागे आठवले नी लाचारी पत्करुन मंत्रीपद मिळवले व ते पद भोगत असतानाच रिपबल्किन संपले असे वक्तव्यही केले, त्यामुळे ते का संपले हे बाबासाहेबांच्या वरील विधानातुन स्पष्ट होते.

२.  गेली वीस वर्ष पर्यंत माझ्यावर नाना प्रकारचे आरोप करण्यात येत होते मी व माझा पक्ष व  अराष्ट्रीय आहे इंग्रजांचा साथीदार आहे मुसलमानांचा बद्दलच्या आहे अशा प्रकारचे धादांत खोटे आरोप माझ्यावर करण्यात येत होते. 

 त्या लोकांची आता खात्री  पटली ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट झाली वीस वर्षे आमच्या पक्षात जो कलंक लागला होता तो आता साफ धुतला गेला आहे आणि शेड्युल्ड कास्ट फेडरेशन हा एक सुसंघटित मजबूत राजकीय रूप धारण करणारा व राष्ट्रविरोधी कृत्यात कधीही सामील न होणारा पक्ष आहे ही सर्वांची पूर्ण खात्री झाली आजच्या राजकारणात मी आता विशेष जाऊ इच्छित नाही परंतु काही गोष्टी अवश्य सांगाव्या वाटतात 

"पूर्वी आपले राजकारण शत्रुत्वाच्या पायावर चालले होते काँग्रेसवाले आपल्याला व आपल्या काँग्रेसवाल्यांना शत्रूप्रमाणे मानत होतो माझ्या दृष्टीने पूर्वीचे अस्पृश्य वर्गाचे सर्व पुढारी थोड्या संकुचित दृष्टिकोन आणि पाहत होते व तसे वागत होते मी ह्या दोशाला थोडाबहुत पात्र होतोच आमचे काय होईल हिंदूंच्या हाती राज्य सत्ता आली तर काय होईल असे आम्हाला वाटत होते पण हा राजकारणाचा रोख आता बदलला पाहिजे आता आपण एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवली पाहिजे की आपण आपल्या लोकांचे आपल्या समाजाचे हित पाहत होतो ते तर पुढे चालू ठेवले पाहिजे परंतु त्याचबरोबर आपल्या देशाला मिळालेले स्वातंत्र्य कसे राखून ठेवता येईल त्याचाही विचार केला पाहिजे."

या ठिकाणी बाबासाहेबांनी शत्रुत्वाच्या वृत्तीने केलेल्या राजकारनाचा धिक्कार केला आहे व त्यांनी स्वता ती चुक काही प्रमाणात केली हे कबुल केले व स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर पुढे तसे होऊ नये असा संदेश दिला आहे.

३. २४ जानेवारी १९५४ रोजी मुंबई येथील अखिल भारतीय साईभक्त संम्मेलनाचे उद्धाटन हे स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते.( पान ३१३) हे बहुतेक विचारवंतांना माहीत नसावे, नाहीतर आजपर्यंत या राजकिय निरक्षरांनी बाबासाहेबांनाही सॉफ्ट हिंदुत्ववादी किंवा साईभक्त म्हणुन हिनवले असते. सदर साईभक्त संमेलनात बाबासाहेब म्हणाले होते की "साईबाबांना प्रत्यक्ष भेटण्याचे किंवा पहाण्याचे भाग्य मला लाभले नाही,त्यांच्याबद्दल मी थोडेफार ऐकुन आहे एवढेच. ...

बाबासाहेबांच्या या भुमिकेला राजकीय म्हणुन पहाणार की धार्मिक?  हे आताच्या उथळ बुद्दिच्या विद्वानांना माझा प्रश्म आहे.

४. दिनांक 20 एप्रिल 1954 रोजी फेडरेशनच्या कार्यकर्त्यांना हितोपदेश करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले गेल्या निवडणूकीत शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या झालेल्या पराभवामुळे माझे सहकारी हाताश झाले असावेत आणि काहींना या निवडणुकाच नको असेही वाटत असावे परंतु त्यांनी असे हतबल होण्याचे काही कारण नाही राजकारण हे पायरी पायरीने चढत जाते, मी तरी  अपयशाची कधीच पर्वा केली नाही करीत नाही आणि यापुढेही करणार नाही केवळ निवडणुकीत जागा मिळवणे हे फेडरेशनचे ध्येय नाही निवडणुकीद्वारे जागा मिळवणे हे एक साधन आहे साध्य नव्हे फेडरेशनचे साध्य- ध्येय अस्पृश्य जनतेचा उद्धार करणे हे आहे आणि जोपर्यंत अस्पृश्य समाजाची सर्वांगीण उन्नती होत नाही तोपर्यंत शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्षाची जरुरी आहे,नव्हे अत्यंत निकड आहे आणि फेडरेशन तोपर्यंत जिवंत राहील असे मी निक्षून सांगत आहे ज्या काही फुटीवर वावटळी उठले असतील त्या वारा संपल्यावर नाहीशा होतील त्याची खंत बाळगू नका फेडरेशन फक्त पक्ष नसेल तर अस्पृश्यांना भारताच्या राजकारणात स्वाभिमानाचे स्थान उरणार नाही फेडरेशनला अपयश आल्यामुळेच दिवसेंदिवस आपण आपल्या उद्धारासाठी नवनव्या कार्यक्रमाची आखणी करीत आहोत जे फेडरेशनचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे त्या सर्वांना असे सांगणे आहे की फेडरेशनला अपयश येणे हे वाऱ्याने झोडलेल्या झाडासारखे आहे परंतु त्यामुळे त्या फेडरेशन रुपी झाडाचे मूळ मरून गेले असा अर्थ लावणे चुकीचे ठरेल तेव्हा डोळे उघडून सत्कार्य करीत रहा (जनता 24 एप्रिल 1954)

वरील आदेशाचे पालन करुन स्वाभिमानाचे राजकारन करणारा भारतात आज फक्त बाळासाहेब आंबेडकरच आहेत, त्यांनी निवडणुकांच्या निकालांचा चळवळीवर परिणाम होऊ दिला नाही, स्वताचे राजकीय अस्तित्व उभे करताना स्वाभिमान गहान टाकला नाही, 

जसे बाबासाहेबांनी सुरवातीला बहिष्कृत समाजाचे नेतृत्व केले म्हणुन बहिष्कृत हितकारीनी सभा सुरु केली, त्या बहिष्कृतांना समता मिळावी म्हणुन "समाज समता संघ" संघटना सुरु केली,नंतर मजुरांचे नेतृत्व करताना स्वतंत्र मजुर पक्ष असे संघटना केली, त्यानंतर राज्यघटनेत शेड्युल्ड कास्ट हि संकल्पना आनली व त्यानुसार शेड्युल्ड कास्ट फेडरेशन असा पक्ष उभा केला, पण बाबासाहेबांना दोन वेळा हरिजन उमेदवारांसमोर निवडणुकात पराजयाला सामोरे जावे लागले, तेव्हा एका जातीचे किंवा एका वर्गाचे राजकारण लोकशाहीत यशस्वी होऊ शकत नाही त्यासाठी संविधानाच्या सरनाम्याला प्रमाण माणुन सर्वसमावेशक पक्ष काढावा असे बाबासाहेबांनी ठरवले, ती संकल्पना होती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया पन त्या आगोदरच बाबासाहेबांचे महापरिनिर्वान झाले, बाबासासाहेबांच्या खुल्या पत्रानुसार नंतर तो पक्ष काढला गेला व ७० वर्षात भाजप, कॉग्रेसच्या प्रस्थापित राजकारना समोर कमकुवत,संधिसाधु राजकीय नेतृत्व व राजकीय निरक्षर जनता यांच्या संयुक्त विद्यमाने रिपब्लिकन पक्ष हे प्रस्थापितांचे पाळीव बनुन राहीले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत लोकशाही रुजु शकली नाही, बाबासाहेबांनी दिलेले राजकीय, सामाजिक,शैक्षणिक व आर्थिक हक्क तळागाळा पर्यंत पोचली नाहीत, अशा सर्व समाजांमधील संविधानातील हक्क अधिकारा पासुन वंचित राहिलेला एक मोठा वर्ग या देशात निर्माण झाला, हे वंचित सर्व जाती सर्व धर्मात आहेत, प्रत्येक जात धर्मातील प्रस्थापितांनी वंचित ठेवलेल्या समाजाचे पितृत्व पुन्हा अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी स्विकारले व या सर्व वंचितांना संविधानिक हक्कांसाठी जागृत करुन सर्वांचे प्रश्न सुटावेत यासाठी मोठी राजकीय ताकद निर्माण करण्यात बाळासाहेब आज यशस्वी झाले आहेत हे आपन पहात आहोत.

पन बाबासाहेबांच्या आदेशानुसार काम करणार्या या एकमेव शिलेदारालाच बाबासाहेबांच्या विचाराचा मारेकरी म्हणुन प्रचार सुरु करुन आपला राजकीय सत्यानाश करण्यासाठी काही अतिहुशार हरिजनांना कामाला जुंपले आहे.

५. " माझे शेड्युल्ड कास्ट फेडरेशन कडे गेले दहा वर्ष दुर्लक्ष झाले. या दहा वर्षाच्या गैरहजेरीत  शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन मध्ये पुष्कळ मतभेद निर्माण झाले आहेत यापूर्वी असले मतभेद नव्हते, प्रत्येक माणसाने फेडरेशन मध्ये गटबाजी सुरू केली आहे प्रत्येकाने आपापले लहान लहान गट निर्माण केले आहेत एकाचे वर्चस्व दुसऱ्यास नको आहे त्यामुळे आपले लोक अजून तरी राजकारणात पक्के मुरले नाहीत, राजकारण म्हणजे काय याची त्यास पूर्णपणे जाणीव नाही. आपल्या समाजात आपापसात फार मतभेद असतात ते मतभेद ताबडतोब नष्ट होत नसतात त्या मतभेदाची झाडे त्यांच्या पोटात वाढू लागतात त्यांचे मते त्यांच्या मुलांच्या पोटात वाढतात अशा रीतीने मतभेद हे वाढत जातात हा गुणधर्म आपल्या लोकांत जास्त प्रमाणात आहे काँग्रेससारख्या पक्षात सुद्धा मतभेद आहेत त्याचबरोबर त्यांच्या जवळ काही सद्गुणही आहेत असे अनुभवाने म्हणावे लागेल त्यांचा एक गुण फार महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे बहुमताने ठेवलेले ते सर्व मान्य करतात.

 मग त्या गोष्टीचे विरोधक सुद्धा खोटे समर्थन करु लागतात ही कृती राजकारणात फार आवश्यक आहे "माझ्या मता प्रमाणे जर कारभार चालला तरच मी संस्थेत राहील अशी वृत्ती फार वाईट आहे हम करे सो कायदा नको". ( पान ३९५)

या ठिकाणी बाबासाहेबांनी ज्या राजकीय पक्व नसलेल्या लोकांबद्दल खंत व्यक्त केली तेच लोक आज वंचित बहुजन आघाडी ची बदनामी करताना आपणास दिसतील.

एखादा मुद्दा मनाप्रमाने घडला नाही तर संघटना सोडणारे किंवा नेत्यावर टिका करणारे अनेक आहेत. बाबासाहेबांना सुद्धा समाजाच्या गटबाज संधीसाधुंनी त्यावेळी किती छळले होते हे वरील बाबासाहेबांच्या विधानांवरुन लक्षात येते. ज्या कॉंग्रेसचा बाबासाहेबांना चिड होती त्यांच्यातलाही एक सद्गुण आपल्या कार्यकर्त्यांनी घ्यावा असा सल्ला देणारे बाबासाहेब आपणास कधी कळतील?

६. राखीव जागा नकोत म्हणून फेडरेशनने ठराव केला आहे त्या ठरावास मी चिकटुन  राहू इच्छितो या ठरावा पासून ढळण्याची माझी इच्छा नाही, राखीव जागा दहा वर्षांसाठी आहेत त्या जागा आता या निवडणुकीनंतर राहणार नाहीत आपल्या समाजाचे ऐक्य ही कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट आहे या राखीव जागा गौण आहेत आपल्या आजपर्यंतच्या फेडरेशनच्या चळवळीने स्वाभिमान आवश्य निर्माण केला आहे ही गोष्ट फेडरेशनला भूषणावह आहे त्यामुळे संघटना झाली तथापि त्यामुळे एक प्रकारची तटबंदीही निर्माण झाली दुसरे लोक आम्हाला मत देत नाही आणि आपण लोकांना मत देत नाही ही एक प्रकारची तटबंदी होईल , 

दुर्दैवाने आपली लोकसंख्या कमी आहे आपण केवळ अल्पसंख्यांक आहोत अशा परिस्थितीत फेडरेशन आहे त्या स्थितीत ठेवणे कठीण आहे त्यासाठी इतर समाजातील आमचे दुःख जाणारे लोक कोण आहेत हे पाहिले पाहिजे अशा सर्वांना आपण एकत्र करून त्यांच्या सह जगण्याची आपली सिद्धता पाहिजे अशा लोकांना एकत्रित करण्याचा मी प्रयत्न करीत आहे तो प्रयत्न यशस्वी झाल्यास आपल्याला नवीन पक्ष स्थापावा लागेल व त्या पक्षात आपल्याशिवाय इतरांनाही दार मोकळे राहतील,

 तुमच्यातच नव्हे तर या देशात एक विचित्र विकृती दिसून येते ती ही की आज झाड लावले की त्याचे दुसऱ्याच दिवशी फळ खावयास पाहिजे असे लोकांना वाटते राजकारणात की अशी अपेक्षा करणे चूक आहे"  ( पान ५६८)

बाबासाहेब म्हणतात आपन स्वाभिमानी पक्ष बनवला परंतु तो एकजातिय पक्ष बनु लागलाय, आपन समविचारी लोकांना एकत्र घेऊन त्यांच्याह जगण्याची सिद्धता ठेवली पाहीजे, त्यासाठी मी नविन पक्ष काढणार आहे, तो संकल्पित नविन पक्ष होता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया, व सर्वांनी सोबत येऊन काम करण्यासाठी भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेला बाबासाहेबांनी पक्षाचा जाहिरनामा केला होता व आज वंचित बहुजन आघाडीनेही संविधानाचा सरनामा हा आमचा जाहिरनामा आहे असे ठरवुनच पक्ष काढला आहे , बाबासाहेबांनी नाकारलेले राजकीय आरक्षण संपवावे ही भुमिका एकटे बाळासाहेब मांडत आहेत कारण त्यांना स्वाभिमानी राजकारनावर विश्वास आहे, प्रस्थापितांचे पाळीव असणारांनी यावेळीही बाबासाहेब व बाळासाहेब यांच्या राजकीय आरक्षणाच्या विरोधाला चुकिच्या पद्धतीने समाजासमोर मांडले,आजच्या राजकीय निरक्षरांनी बाळासाहेबांची याबाबतीतही बदनामीच करण्याचा प्रयत्न केला.

बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले सर्वसमावेशक राजकारण काही लोकांना का नको आहे याचा अभ्यास होणे आवश्यक आहे.

७.  इतर समाजाच्या सर्व लोकांबरोबर काम करावयास तुम्ही शिकले पाहिजे तुमच्या तुम्ही फोन ठेवून चालणार नाही माझ्या दबावामुळे अजून काही वेडेवाकडे करत नाही पण मी तुम्हा साठी कुठपर्यंत राहणार?

 आता उमेदवार निवडण्याचे काम लोकांनी केले पाहिजे, लोकांमध्ये तुम्ही काम केले पाहिजे त्यांच्या अडीअडचणींना तुमच्या ताकदीप्रमाणे वाचा फोडली पाहिजे त्यांच्या सुखदुःखाची समरस होण्याची तुम्ही प्रयत्न केला पाहिजे मी भंडाऱ्यातील निवडणुकीत पडलो त्याचे मला कधीच वाईट वाटले नाही तरी या निवडणुकीत मला बरीच मते पडली आपली मते सोडली तर इतर समाजाने देखील मला मते दिलेली आहेत ही गोष्ट माझ्यासाठी समाधानाची आहे ,मी पडलो की निवडून आलो हा प्रश्न विचारात घेत नाही तुम्ही अशा प्रकारचे कर्तबगार होण्याचा प्रयत्न करून इतर समाजास देखील तुम्हास मते द्यावीत असे वाटले पाहिजे माझी खात्री आहे की या गोष्टीचा विचार करून तुम्ही तुमचे राजकीय जीवन व कार्यक्रम चालवाल यापेक्षा अधिक काही मी सांगत नाही

 ( पान ५२९)

राजकीय अपयश पचवण्याला बाबासाहेब "कर्तबगारी" म्हणतात, व तसे कर्तबगार सर्वांनी व्हावे असे अपेक्षा करतात, सोबत आपन इतर समाजांच्या सुखदुखात त्यांच्या अडी अडचनीत धावुन जा असा आदेश देतात, याची नोंद घ्यावी. आता बाबासाहेबांनाही सॉफ्ट हिंदुवादी म्हणायचे का हे प्रत्येकाने ठरवावे.

८. हिंदु कोड बिलासाठी राजीनामा -

       डॉ बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते, फक्त नावापुरते मंत्रीपद मिळावे म्हणुन आज समाजाला,निळ्या झेंड्याला मनुवादी आरएसएस कडे गहान ठेवनारे लोक आता आहेत, काही लोक पद, पैसा यासाठी जातीवाद्यांशी घरोबा करुन बसलेत तरी समाज त्यावर व्यक्त होत नाही पण बाळासाहेब आंबेडकर एक लोकनेता म्हणुन वारकर्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी एक ऐतिहासिक आंदोलन करतात तेव्हा शिकलेला पन बाबासाहेबांना न समजलेला वर्ग बाळासाहेबांना सॉफ्ट हिंदुत्ववादी ठरवुन मोकळा झाला त्यांना सागु इच्छितो की बाळासाहेबांनी तर फक्त वैदिक धर्माचे विरोधक असलेल्या वारकरी लोकांसाठी धावुन जाऊन बाबासाहेबांचा आदेशच पाळला आहे, त्यांना आपन हिंदुत्ववादी ठरवले, मग आपन लोक बाबासाहेब आंबेडकरांना हार्ड हिंदुत्ववादी ठरवाल का?  

कारण बाबासाहेबांनी हिंदु महिलांच्या प्रश्नासाठी शासनाशी भांडताना मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता, हिंदु कोड बिल हे हिंदुंच्या महिलांसाठी होते मग हिंदुंच्या प्रश्नासाठी राजीनामै देणार्या बाबासाहेबांनाही तुम्ही हिंदुत्ववादी म्हणणार आहात का? याचे चिंतन करावे लागेल.

९. भारतीय संविधानामध्ये फक्त वंचित बहुजन आघाडीची बदनामी करण्यासाठी पाळुन ठेवलेल्या हरीजनांसाठीच बाबासाहेबांनी  कलमे लिहीली आहेत का? बाबासाहेबांनी संविधान लिहीताना पुर्ण देशाचे पितृत्व स्विकारुन सर्वांनाच समान हक्क अधिकार दिलेत. व या देशात हिंदुंची संख्या 85% आहे, मग आपन बाबासाहेबांना हिंदुत्ववादी म्हणायचे का?

१०. ज्यावेळी एका सामाजिक आंदोलन प्रकरनी काही कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना कॉंग्रेसचे कार्यकर्ते म्हणुन   पहाता त्यांच्यावर झालेला अन्याय पाहिला व त्यांना स्वता त्यांचे वकिलपत्र घेऊन कोर्टातुन न्याय मिळवुन दिला. या घटनेतुन समाज काय शिकणार आहे की नाही?

बाबासाहेब हे बोधिसत्व होते, ते कोणालाही फक्त जाती धर्माच्या नजरेने पहात नव्हते व समाजानेही तसे पाहु नये अशासाठीच पुर्ण जीवनभर प्रयत्न केलेत, पन आज काही स्वताला आंबेडकरी समजणारे  वामनसेनेचे लोक समाजातील सलोखा टिकु नये, समाजात जातीवाद टिकावा, जातीजातीने आपापल्या जातींचा गर्व करावा यासाठी सतत प्रयत्न करताना दिसतात, एकटे बाळासाहेब बाबासाहेबांचा राजकीय व सामाजिक रथ खेचत आहेत पन हे काही दिडशहाणे कैडर लोक बाळासाहेबांच्या प्रत्येक भुमिकांना पातळी सोडुन विरोध करतात व बदनामी करतात, अफवा पसरवतात.

मनुवादी विचारधारेला विरोध करणारांना इतर बिनकामाच्या वादात गुंतवुन ठेवुन त्यांची शक्ती वाया घालवतात.

वरील १० मुद्दे हे सर्वांनी स्वता अभ्यासावित, बाबासाहेबांनी असे लाखो विचार मांडलेत जे आजच्या कैडर बेस राजकीय निरक्षरांना माहीतही नाहीत. समाजाने स्वता बाबासाहेब आंबेडकरांनी लिहुन ठेवलेले लिखान व भाषने वाचावित.

जे लोक स्वता वाचतात ते बाळासाहेब आंबेडकरांसाठी प्राण तळहातावर घेऊन काम करतात हे मी गेली १० वर्ष स्वता काम करताना पहातोय.

कोणत्याही राजकीय पक्षासाठी व लोकप्रतिनिधी साठी संविधान हे प्रथमस्थानी असले पाहीजे, लोकप्रतिनिधींनी संविधाना पेक्षा आपापल्या धर्माला प्राथमिकता दिली तर लोकशाही काही दिवसात संपुष्टात येईल, हे माहीती असुन स्वताला आंबेडकरी म्हणवुन घेणार्या कार्यकर्त्यांनी "आपल्या नेत्याने सार्वजनिक जिवनात संविधान न मानता धार्मिक कट्टरवाद जोपासावा" असे म्हणने म्हणजे बुद्धा पासुन बाबासाहेबा पर्यंत च्या संघर्षाला मातीत घालण्यासारखेच ठरेल. कोणताही धर्म देशा पेक्षा मोठा नाही याचे भान किमान आंबेडकरी लोकांनी तरी ठेवावे. लोकप्रतिनिधींसाठी संविधान हाच धर्मग्रंथ असला पाहीजे, वैयक्तिक जिवनात आपापल्या घरी धर्माचे पालन केले पाहीजे पन सार्वजनिक जिवनात कुनीही आपला धर्म आणु नये. 

मी समाजातील प्रत्येक नागरिकाला विनंती करतो की *बाबासाहेबांना एका जातीतुन मुक्त करा, ज्यांनी आमच्या हजारो पिढ्यांना मुक्त केले त्यांना आता समाजानेही मुक्त केले पाहीजे, बाबासाहेब हे सर्व समाजांचे, देशाचे उद्धारकर्ते होते ही सत्य मांडनी केली पाहीजे* .त्यासाठी बाबासाहेब नक्की काय होते हे स्वता वाचुनच समजुन घेतले पाहीजे, स्वताला बाबासाहेबा पेक्षाही विद्वान समजणार्या बोलक्या पोपटांनी मांडलेले बाबासाहेब हे शिवसेना व आरएसएस ने मांडलेल्या शिवाजी महाराजासारखे एकतर्फी वाटतील, पण स्वता वाचले तर बाबासाहेब महाकारुणिक बुद्धांचे खरे अनुयायी आहेत हे पटेल.

- मनोज नागोराव काळे, 8169291009



_________________________

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...