- राजेंद्र पातोडे.
आदित्यनाथ याचे नंतर तर हनुमान कुठल्या जातीचे ही सांगण्याची चढाओढ सुरु झाली. त्यात पहिली हनुमान उडी घेतली, ती राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे (एनसीएसटी) अध्यक्ष नंद कुमार साय आणि भाजप खासदार उदित राज यांनी.‘हनुमान हे आदिवासी असल्याचे’ त्यांनी जाहीर केले.पतंजलीचे प्रसिद्ध व्यापारी बाबा रामदेवसेठ यांनी हनुमान अष्ट सिद्धिचे ज्ञाता असून ते क्षत्रिय होते हा दिव्य शोध लावला.केंद्रीय मंत्री सत्यपाल सोंघ यांनी हनुमान हे दलित नव्हे आर्य असल्याचे विधान केले.शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी हनुमान हे ब्राम्हण असल्याचे जाहीर केले. भाजप नेता व राज्यसभा सदस्य गोपाल नारायण सिंह ह्यांनी तर कहरच केला "हनुमान हे वानर होते आणि वानर हा पशु असल्याने त्याचा दर्जा दलिता पेक्षा पेक्षा खालचा असून श्रीरामानी त्यांना दैवत्व बहाल केले आहे”.हे सांगून जातपुराणात अधिकच गोंधळ निर्माण केला.
सर्वात मोठा कहर केला तो भाजप आमदार बुक्कल नवाब ह्यांनी.हनुमान हा मुसलीम होता असे धक्कादायक विधानच आमदार बुक्कल नवाब ह्यांनी केले.हनुमान मुस्लिम होता हे सांगताना मुसलमानाची नावे रहमान, रमजान, फरहान, सुलेमान, सलमान, जिशान, कुर्बान अशी ठेवली जातात.सबब हनुमान हे नाव देखील मुसलीम आहे,असा दावाच त्यांनी केला.हनुमान दलित असल्याचे वादावर बोलताना आमदार बुक्कल नवाब ह्यांनी "हनुमानाची जात कंची" ह्या वर चर्चा करताना हनुमानाचा धर्म देखील चर्चीला पाहिजे असा आग्रह केला." माझ्या मते हनुमान मुसलीम असल्याने मुसलीम सधर्मिय नावांशी मिळते जुळते नाव हनुमान असल्याचे," त्यांनी निक्षून सांगितले.
प्रसिद्ध माजी क्रिकेटर चेतन चव्हाण ह्यांनी त्या पुढचा टप्पा गाठला.उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील एका क्रीडा कार्यक्रमात बोलताना त्यांनी, 'हनुमानजी कुश्ती लड़ते थे, वह खिलाड़ी भी थे' हे सांगून उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच दिला. उत्तर प्रदेश सरकार चे मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी ने विधान परिषद प्रश्नोत्तराच्या वेळी "हनुमान जाट असल्याचा शोध लावला".चौधरींनी ह्या साठी दिलेला तर्क अत्यंत चमत्कारी आहे. ‘दूसरों के फटे में जो टांग अड़ाता है, वही जाट हो सकता है। हनुमान मेरी जाति के थे।’ लक्ष्मी नारायण चौधरी हे स्वतः जाट समुदायाचे आहेत. त्यांचे ह्या वक्तव्यावर विरोधकांनी अख्ख सभागृह डोक्यावर घेतले नसते तर नवलच होते.
ह्या विवादात कुठलाही राजकीय पक्ष मागे राहायला तयार नव्हता.हिंदुस्तान टाइम्स सोबत बोलताना सपा राष्ट्रीय महासचिव राम शंकर विद्यार्थी यांनी आरोप केला कि ‘भाजपा नेता भगवान हनुमान को दलित या मुस्लिम बताकर उन्हें नीचा दिखाने की कोशिश कर रहे हैं "हे सांगताना सपा नेता राम शंकर विद्यार्थी यांनी हनुमान याच क्षेत्राचा राजा असल्याने ते 'गोंड' राजा होते, असा दावा केला.धार्मिक ग्रंथात देखील 'हनुमान गोंड राजा असल्याचा उल्लेख आलेला आहे, हे देखील आवर्जून नमूद केले.
आणखी एक माजी कसोटीपटू कीर्ति आजाद यांचा दावा तर अख्या विश्वाला दिवसा तारे दाखविणारा ठरला, 'हनुमानजी चीनी थे.हर जगह यह अफवाह उड़ रहा है कि चीनी लोग दावा कर रहे हैं कि हनुमान जी चीनी थे.' घ्या आता ! त्यांचे ह्या दाव्या नंतर चीन सरकार शॉक आहे की, हा दावा नेमका कोणत्या चिनी नेत्याने केला आहे? मंकी मास्टर नावाचे सिनेमे चीन मध्ये बनविले जात असतात.त्या मुळे की काय चीन सरकारने मंकी मास्टर्स पात्र असलेल्या सिनेमात हा शोध घेण्या कामी गुप्तहेर लावलेत अशी चर्चा सुरु आहे.
हुनुमानाच्या जात व धर्मावर सुरु झालेली जुमलेबाजी आता केवळ हनुमाना पुरती सीमित राहिली नाही, तर ती आता हनुमानासह रामायणातील इतर पात्रा पर्यंत पोहचली आहे. भाजपा नेता आणि उत्तर प्रदेश अंबेडकरनगरचे खासदार हरिओम पांडे ने दावा केलाय की," हनुमान ‘ब्राह्मण’ थे, वहीं वानर साम्राज्य के राजा सुग्रीव ‘कुर्मी’ जाति से थे। सुग्रीव के भाई बाली ‘यादव’ थे। सीता को रावण से बचाने की कोशिश करने वाला पक्षी जटायु एक ‘मुस्लिम’ था। साथ ही भगवान राम को समुद्र में राम सेतु बनाने में मदद करने वाले नल और नील ‘विश्वकर्मा’ समुदाय के थे." हरिओम प्रसाद पांडे ह्यांनी 'चुलबुल पांडे' टाईप दबंग स्टाईल दंड ठोकत दावा केलाय की, ही सर्व त्यांची 'रिसर्च ' असून ते ह्या सर्व पात्रांच्या जात सिद्ध करू शकतात!
अश्या असंख्य जेम्स बॉण्ड टाइप शोधा नंतरही भाजपला तीन राज्यात सत्ता गमवावी लागली.जातीचे राजकिय तुष्टीकरण कुणाच्याही पचनी पडले नाही.कुणालाच ह्या गोष्टीत रस नव्हता की रामायणातील पात्र कोणत्या जातीचे होते ? तर मागील वर्षभरात मारले गेलेले अनेकजण गौरक्षेच्या नावावर मारण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने अनुसूचित जाती व मुसलीमच होते.शम्भूनाथ रैगर ह्याने धर्माच्या नावावर क्रूर पद्धतीने केलेला खून व पेटविलेला मृतदेह, असंख्य अत्याचाराच्या कहाण्या, रसातळी गेलेली अर्थव्यवस्था,वाढते बेरोजगारांचे जथ्थे, प्रचंड वाढलेली गुन्हेगारी, जनतेच्या आयुष्याचं झालेले वाळवंट."पधारो म्हारो राजस्थान" हे भीतीदायक आवाहन वाटावं इतका आमूलाग्र बदललेला राजस्थान, व्यापम घोटाळा व त्यासाठी मारले गेलेले अनेक जण असे ज्वलंत मुद्दे असल्याने, भाजप राजवटीच्या काळ्या बाजूची चर्चा होऊ नये म्हणून जाणीवपूर्वक हुनुमानची जात, राममंदिर विवाद सुरु करण्यात आले.भाजपवाल्यानी ठरवून जातीचे कार्ड खेळलं होतं.दुर्दैव म्हणजे ह्या देशातील पुरोगामी समजल्या जाणा-या विद्वानांना ह्यात काहीही वावगं वाटलं नाही.हा मोठा धोका देशापुढे आहे.भाजपवाले सत्तेच्या सारीपाटावर पराभूत झाले असले तरी आगामी काळात निवडणुकात ते किती खालची पातळी गाठू शकतात आणि काँग्रेस देखील कशी हिंदुत्व धार्जिणी झालीय हे आता लपून राहिले नाही.
अकोला
९४२२१६०१०१