Tuesday, 15 January 2019

लोकशाही रस्त्यावर सांडत आहे..- विकास साळवे.

लोकशाही रस्त्यावर सांडत आहे..
- विकास साळवे.
जात्यांधाच्या भयान काळोखाला टार टार फाडुन अंधारात खितपत पडलेल्या मुर्दाड देहाला एक नवा उजेड दिलास तु,
उजेडाचा स्पर्श होताच हत्तीचं बळ एकवटून ताडकन उठलेली मुर्दाड देह आज सुर्यावर स्वार व्हायला निघालीत बघ..
पण खंत एकाच गोष्टीची आहे,
एकमेकांच्या उरावर बसुन कुरघोडीचा खेळ खेळणारी ही तुझीच लेकरे आपआपसांत भांडत आहे,
आणि पदरात पडलेली लोकशाहीची शिदोरी मात्र रस्त्यावर सांडत आहे..
तुझ्या लेकरांच्या भांडणात इथे वैरीच फायदा उचलत लोकशाही पायदळी तुडवत आहे,
आम्ही मात्र आमच्याच आईची अब्रु वेशीवर टांगुन स्वत:चाच ऊर बडवत आहे..
अाम्ही अामच्याच भावंडांना स्वत:चे वैरी समजुन भर चौका चौकात जेव्हा लाथाडु लागलो,
तेव्हा तोच तु टराटरा फाडलेला भयान काळोख पुन्हा नजरेसमोर फडफडू लागतोय बघ..
म्हणुन अस्वस्थ होतो कधी कधी,
कारण अविचारी भुसभुशीत बुरूजं आता ढासळु लागली आहेत,
अज्ञानी लेकरं काही,
नको तिथे उगीचच अक्कल पाजळु लागली आहेत..
बा भिमा,
तु आम्हाला बुध्दांचा धम्म दिला,
वै-याविरूध्द विचारांनी लढुन जिंकण्याचं बळ दिलं,
जग अंधारात बुडेल कदाचित पण आम्ही उजेडातच असु अशा प्रकाशित विचारांच्या शिखरावर बसवलं,
म्हणुन आज आम्ही निर्धास्त व सज्ज आहोत येणा-या संकटावर मात कराया..
तुझ्या लेखणीला पेलवण्याचं बळ नाही माझ्या मनगटात,
तरीही प्रयत्न करतोय मी ती  उचलण्याची,
कारण,
तुझ्या दिलेल्या संविधानाचं रक्षण करायचंय मला,
वाचवायचंय या देशाला जात्यांधाच्या विषारी विषापासुन,
अन् सुरक्षित ठेवायचंय तुझ्या ध्येयातला भारताला..
विकास साळवे,पुणे
+919822559924..

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...