मालेगाव बॉंबस्फोटातील मुख्य आरोपी साध्वी प्रद्न्यासिंग ठाकुर ला खासदारकीचं तिकिट देऊन RSS आणि भाजपाने हे सिद्ध केलय कि भाजपा हा पक्ष आपल्या देशा साठी किती घातक आहे . ही सामान्य बाब अजिबात नाही . हा शहिद हेमंत करकरे आणि त्यांच्या संपुर्ण टीमचा अपमान आहे असे म्हणायला हरकत नाही .
विचार करण्यासारखी गोष्ट आहे कि , मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणी तब्बेतीच कारण दाखऊन जामिनावर बाहेर असलेली आणि आतंकवादी कृत्यात प्रत्यक्ष सहभाग असलेली व्यक्ती खासदारकीच्या निवडणुकीला उभी राहते . ही बाबच मुळी भयंकर आहे . इतक्या मोठ्या हत्याकांडाची आरोपी आणि इतके वर्षे जेलमध्ये राहिलेल्या व्यक्तिच समर्थन करणारा भाजप पक्षाची काय विचारधारा असु शकते हे वेगळ सांगायला नकोय . नथुराम ज्यांचे वंशज आहेत , त्यांच्याकडुन वेगळ्या काय अपेक्षा करणार . उद्या आसाराम बापु सारखे लिंगपिसाट आणि दळभद्री लोक तुरुंगातुन जामिनावार बाहेर आल्यावर निवडणुकीला उभे राहिले व अश्यांच्या समर्थनार्थ जनता रस्त्यावर उतरली तर आश्चर्य वाटण्याचं अजिबात कारण नाही .
मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणाचा सत्य खुलासा असलेले " हु किल्ड करकरे ? " आणि शहीद करकरेंच्या सुविद्य पत्नी स्मृतीशेष करकरे मॅड्म ह्यांनी लिहिलेले " द लास्ट बुलेट " हे पुस्तक वाचल्यावर डोक ठिकाणावर राहात नाही. किती अमानवीय पद्धतीने कट करुन हा हमला केला गेला .. आणि नियोजनबद्ध रित्या करकरे, कामठे आणी साळसकर ह्याना मारण्यात आले . ह्याचे हसन मुश्रीफ ह्या तत्कालिन पोलीस अधिकार्याने केलेल भाष्य अगदी जबरदस्त आहे . कॉ. गोविंद पानसरे ह्यान्नी कोल्हापुरमध्ये ह्याच विषयावर जेव्हा मुश्रीफांचा कार्यक्रम आयोजीत केला .. त्यांच्या नंतर त्याना खुनाच्या धमक्या RSS वाल्यांकडुन आल्या आणि नंतर त्यांची नियोजनबद्ध हत्या झाली .
हार्दिक पटेल सारख्या ओबीसी कुणबी पाटीलला कोर्ट निवडणुकीत अर्ज भरु देत नाही .. ज्याच्यावर कोणताही मनुष्यवधाचा गुन्हा नाही आणि ज्यांच्यावर गुन्हा आहे .. त्यांना परवानगी दिली जाते . हे अगदी अकल्पित आहे . आम्ही नेमके कुठ जात आहोत ह्याच भान सुद्धा आम्हाला नाहीये . जनता जनार्दन १००-५०० रुपयाच्या आहारी जाऊन, खोट्या राष्ट्रप्रेमवर विश्वास ठेउन तोंडाला कुलुप लावुन बसली आहे .
करकरे हे संपुर्ण टिमसह मालेगाव बॉंबस्फोटातील ह्या हिंदुआतंकवाद्यांना लॅपटॉपसहित अटक करुन त्यांच्यावर आरोप सिद्ध करणार होते व शिक्षा होणार होती . मात्र ह्या अगोदरच त्यांचा गेम केला गेला . नासिकच्या तुरुंगात असताना RSS चा भागवत करकरेंना भेटायला गेला . मात्र करकरे खरा देशभक्त होता . जिवाशी गेला .
साध्वी बोलत आहे की करकरेला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली . साध्वी जे बोलतेय .. ती तीची विचारधारा आहे . करकरे हे बहुजन होते . साध्वी ही RSS ची कट्टर कार्यकर्ता अर्थात मनुवादाची आणि हिंदुराष्ट्र संकल्पनेची सक्रिय समर्थक ! ह्यांना देश्यात हिंदुराष्ट्राच्या नावाखाली ब्राह्मणांची संपुर्ण सत्ता व्यवस्था आणायची आहे . त्यात ते जवळ जवळ ९५% यशस्वी झालेले आहेत. संविधान संपऊन मनुस्मृतीवर आधारीत ब्राह्मणराष्ट्र अर्थात हिंदुराष्ट्र ! ह्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे कालपरवाला कोणतीही परिक्षा न देता केंद्रात सचिव पदावर झालेल्या नऊ ब्राह्मणवाद्यांची एकजात निवड होय .
ब्राह्मणादी सवर्णान्ना शिक्षा देण्याचा अधिकार ओबीसी , एससी , एसटी ला नाही .. म्हणुन सुप्रिम कोर्टात आजही सगळेच एकजात ब्राह्मण आहे . हे आहे हिंदुराष्ट्र ! ब्राह्मणराष्ट्र म्हटल्यास ह्यांना कुत्र पण विचाराणार नाही , म्हणुन हिंदुच्या आड आम्हाला अधिकारवंचित ठेवण्याच ब्राह्मणांच खुप मोठ षडयंत्र यशस्वी होताना दिसत आहे .
जो ब्राह्मणाला शिक्षा देईल .. त्याला मृत्युदंडाची शिक्षा मनुस्मृतीत आहे. हाच प्रकार छत्रपती संभाजी महाराजांबरोबर ब्राह्मणांनी घडवला होता .. कारण त्यांनी मोरोपंत पिंगळे .. आण्णाजी दत्तो आणि राहुजी सोमनाथ ह्या तिघा ब्राह्मणान्ना शिवरायांच्या हत्येच्या गुन्ह्यात रायगडावर हत्तीच्या पायी देऊन देहदंडाची शिक्षा दिली होती . संभाजी महाराज शुद्र होते आणि मनुस्मृतीत शुद्राला ब्राह्मणाला शिक्षा देण्याचा अधिकार सपशेल नाकारते . हा इतिहास आहे .
ब्राह्मण फक्त आमच्यावर अन्याय करण्याची फक्त पद्धत बदलतो .. मुळ विचारधारा कधीच बदलत नाही . त्यांना मनुस्मृतीवर आधारीत व्यवस्था आजही निर्माण करायची आहे . म्हणुन हा सर्व EVM चा घोटाळा सुरु आहे . साध्वी तीची मुळ ब्राह्मणी विचारधारा बोलत आहे आणि आमचे उपटसुंभ अंधभक्त त्याचे समर्थन करत आहे . ह्याचा अर्थ आम्हीच आमच्या हातानी आमच्या पायावर कुऱ्हाड मारुन घेत आहोत.
प्रतिक्रांतीसाठी तयार रहा !