वचितांचा नविन 'ट्रेंड सेट' झालाय..
-राजेंद्र पातोडे
वंचीत हा शब्द तसा लौकिकार्थाने "डिप्रेस क्लास" चे मराठी भाषांतर.डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी हाच शब्द इथल्या शोषित पिडीत सर्वहारा समुहासाठी वापरला होता.मात्र कालांतराने त्याला 'दलित' किंवा 'पददलित' ठरवुन त्याची लढण्याची उर्मी घालविण्यात आली.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कालानुरूप त्यांच्या संस्था संघटना आणि पक्षाचे नाव बदलविताना काळाची मुस बदलून टाकली होती.
अगदी तोच ट्रेंड आता एड बाळासाहेब आंबेडकर ह्यांनी सेट केला आहे.वंचित म्हणजे सत्ता आणि संधी वंचित असलेल्या अठरा पगड जाती ,अलुतेदार बलुतेदार,आदिवासी, अल्पसंख्याक अश्या सर्व बहुजनांच्या वर्जमुठीला एक व्यापक आकार दिला आहे.त्याला महाराष्ट्रभर मिळणारा प्रतिसाद हा चर्चेचा विषय न ठरता तर नवलच होते.
वंचितच्या सभांना अभूतपूर्व गर्दी असली तरी ती मतदानात रूपांतर होईल का असा एक बुरसटलेला सवाल सोयीने चर्चेत आणला गेला.परन्तु ही गर्दी नुसते भाषणं ऐकायला आलेली नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. भरउन्हात दुपारी १ पासून रात्री १० वाजेपर्यंत तप्त मैदानावर बसलेला हा समूह पहिल्यांदा काही तरी ठरवून आलेला आहे.नाही तर नुसते भाषण ऐकायचे असते तर लाईव्ह होणाऱ्या सभा चॅनेल वर आणि मोबाईलवर अधिक चांगल्या पद्धतीने पाहता येतात.हा नवा बदल कुणी समजून घेत असेल तर तो फक्त वंचित समूह आहे.
त्या नंतर नवा ट्रेंड साहेबांनी सेट केलाय, तो म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या मुजोर आणि आश्रित बनविणाऱ्या राजकीय समझोता आम्हाला मान्य नसेल हे ठणकावून सांगितले गेले. एक जागा घ्या आणि बदल्यात सर्व आंबेडकरी बहुजन मतदान काँग्रेसचे ही सौदेबाजी मोडीत काढली.तुम्ही आम्हाला जागा देणारे कोण हा प्रश्न विचारला गेला.
आघाडी करायची असेल तर ती 'रामदासी अग्रीमेंट' नसेल. स्वाभिमान आणि समान वागणूक दिली पाहिजे हे ठासून सांगितले गेले.त्यासाठी सहा महिन्याआधी आघाडी साठी काँग्रेस कडे प्रस्ताव पाठविला गेला.
शेवटच्या क्षणापर्यंत आघाडीसाठी झुलवायचे आणि शेवटच्या क्षणी बाद करायचं हा काँग्रेसी खेळ ह्या वेळी मोडून काढला गेला.
तिसरा ट्रेंड सेट झाला तो मीडिया बाबत.ह्या आधी निवडणूक जाहीर झाल्या झाल्या आंबेडकरी पक्ष हे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडीया मधून बेदखल असायचे.त्यांचे अस्तित्वच नसल्या प्रमाणे निवडणूक काळात सैराट झालेला मीडिया वागत असे.जाहिराती आणि पेडन्यूज असतील तर कव्हरेज मिळेल. हा ट्रेंड देखील ह्या वेळी मोडीत निघाला आहे.
वंचित आघाडीचे प्रणेते एड बाळासाहेब आंबेडकर काय बोलतात, कुठली भूमिका घेतात ही मिडीया मध्ये लीड न्यूज असते. किंवा ब्रेकिंग न्यूज असते.सलग तीन दिवसांत तीन पत्रकार परिषद घेतल्या तरी त्या प्रेस साठी पत्रकार मंडळी गर्दी करतात हे दुर्मिळ चित्र आज बाळासाहेबांनी बदलेले आहे.
अधिक एक महत्त्वाचा ट्रेंड जो सेट होणार आहे तो म्हणजे येतील वंचीत समुहाला प्रथमच आपल्या अल्पसंख्या प्लस केली की विजय हमखास आहे हे पटणार आहे.सत्ता आणि संधी वंचित असलेल्या अठरा पगड जाती ,अलुतेदार बलुतेदार,आदिवासी, अल्पसंख्याक लहान लहान समूहाची बेरीज ही ४०% होते.आणि एकमेकाला मदत आणि मतदान केले की तेच विंनिंग कॉम्बिनेशन ठरते.२९% मतावर भाजप देशाची सत्ता मिळवते तर ४०% वंचित सहज सत्ताधीश होऊ शकतात.हा नवा फंडा ह्या वेळी असणार आहे.
हे सर्व ट्रेंड सर्वात आधी थोरल्या पवारांनी ओळ्खले आणि निवडणुकीतून माघार घेतली आहे.
काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेकांना हे उमगले आहे त्या मुळे वंचित सुनामीत आपल्या राजकीय कारकिर्दीची वाट लागणार हे ओळखून अनेकांनी लढायलाच नकार दिला आहे. किंवा आपल्या चिल्यापिल्याना भाजप सेनेच्या सेवेत रुजू केले आहे. ही राजकीय दहशत ह्या पूर्वी फक्त शेड्युल्ड कास्ट फेडरेशन मध्ये होती ती बाळासाहेब आंबेडकर ह्यांनी परत आणली आहे.
२०१९ ची निवडणूक त्या अर्थाने "डिप्रेस क्लासेस" अर्थात "वंचित बहुजनांच्या" राजकीय शक्तीच्या उदयाने अनेक प्रस्थापित राजकीय पक्षाचे भवितव्य बिघडविल्या शिवाय राहणार नाही ह्यात शंकाच नाही
राजेंद्र पातोडे
प्रदेश प्रवक्ता
भारिप बहुजन महासंघ
वंचित बहूजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश
9422160101