Monday, 24 December 2018

..पन का ? हा विचार करुन पहा.

..पन का ? हा विचार करुन पहा.

प्रज्ञासुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जगात ओळख आहे ती पुस्तकप्रेमी_बाबासाहेब म्हणुनच....
पुस्तकांसाठी घर बांधणारा सृष्टीच्या इतिहासातील एकमेव महामानव, घरात राशन नसले तरी चालेल पन घरात नविन पुस्तके आणली पाहीजेत असेच त्यांचे पुर्ण जिवन गेले, पुस्तके गोळा करणे, वाचणे, नविन विषयांवर पुस्तके लिहीणे यातच जीवन गेले..

पन याच पुस्तकप्रेमी बाबासाहेबांनी एक पुस्तक अक्षरशः जाळुन खाक केले...ते पुस्तक म्हणजेच #मनुस्मृती.
आज आपन ज्या ज्या गोष्टींना वाईट, नालायकपनाचे, अन्यायकारक समजतो त्या सर्व गोष्टींना मनुस्मृतीत कायद्याचे रुप दिले होते व सारा देशाने त्यानुसार जगायची सवय लावुन घेतली होती.
त्या जुलमी कायद्यापासुन भारतीयांची सुटका करायला व ते पुस्तक जाळायला बाबासाहेबांसारखा पुस्तकप्रेमीलाही ते पुस्तक जाळावे लागले.

- मनोज काळे

वंचीत बहुजन आघाडी,एक्सप्रेस सुसाट धावणार आहे

वंचीत बहुजन आघाडी,एक्सप्रेस सुसाट धावणार आहे
-------------------------------------------------------------
विधानसभेत आणि लोकसभेत जाणाऱ्या प्रस्तापितांच्या राजकीय बुलेट ट्रेना मध्ये फक्त प्रस्तापित लोकांच्या पाहुणे-राहुन्याचेच टिकट बुक असतात. प्रस्तापितांच्या राजकीय बुलेट ट्रेन या खालील प्रमाणे आहेत.
१) काँग्रेस राजकीय बुलेट ट्रेन
२) भाजपा राजकीय बुलेट ट्रेन
३) राष्ट्रवादी राजकीय बुलेट ट्रेन
४) शिवसेना राजकीय बुलेट ट्रेन
           ह्या बुलेट ट्रेंन मधून इतरांना म्हणजेच मराठा समाज १६९ घरांणे सोडून,मुस्लिम,धनगर,बोद्ध, ख्रिचंन,माळी, तेली,साळी, कोळी,मांग,चांभार,ढोर,होलार, घिसडी,कुंभार,कैकाडी,पारधी,भिल,आदिवासी,लिंगायत,सिंपी इत्यादी  घटकांना प्रवास करून विधानसभेत व लोकसभेत न जाण्याची भरदार अशी मजबूत आपल्या, आपल्या पाहुण्या-राहुण्याच्या, धनदांडग्याच्या व एखांद्या आपल्या पाळलेल्या कुत्र्याच्या हिताची व्यवस्था करून ठेवली आहे. म्हणून तर या राजकीय बुलेट ट्रेनच्या माध्यमातून विधानसभेत व लोकसभेत फक्त हे प्रस्तापित लोकं जाऊन बसतात.आणि या राजकीय बुलेट ट्रँनच्या माध्यमातून सत्ते मध्ये आपणच कशे येऊन बसू याची पुरेपूर काळजी घेतली जाते.
         या बुलेट ट्रेनला धुनं, रिपेरिंग करणं, डाग-डुग करणं, ग्रीसिंग करणं , नट बोल्ट टाईट करणं, झाड-झुड करणं, लाईट,as, कलर,राजकीय बुलेट ट्रेन च्या पट्रीची देख-रेख करणं असे असंख्य तडक्लास ची कामं हे वर दिलेल्या वंचीत घटकांच्या वाटेला दिले जातात. ( पक्ष वाढीचं काम हे वरील दिलेल्या वंचीत घटका कडून भावनिकतेच्या आधारावर करून घेतलं जातं जसे की राम मंदिर,हिंदू,गोमाता, खोटारडा पुरोगामी पणा ) यांनी फक्त दिलेत तेवढेच कामं करायचे , यांना या राजकीय बुलेट ट्रेन मध्ये बसून थेट विधानसभा,लोकसभा मध्ये जाण्याची मुभा नाही. जर यांना या राजकीय बुलेट ट्रेन मध्ये बसवलच तर फार-फार  ग्रामपंचायत,पंच्यात समिती किंवा लैच-लैच झालं तर जिल्हा परिषद मध्ये नेऊन सोडल्या जाते. पुढे विधानसभा व लोकसभा सोडून बोलो.
       याच वंचीत घटकांना विधानसभेत व लोकसभेत नेण्याण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी अशी  एक राजजकीय एक्सप्रेस तयार केली आहे. कि, ती प्रस्थापितांच्या राजकीय बुलेट ट्रेनला टक्कर देऊन पुढे जाणारी आहे. ती वंचितांना थेट विधानसभेत व लोकसभेत घेऊन जाणारी आहे. आता फक्त निर्यय घ्यायचा आहे तो इथल्या वंचीत घटकांना. तो असा, प्रस्थापितांच्या राजकीय बुलेट ट्रेनचे काम करून प्रस्थापितांनाच त्या राजकीय बुलेट ट्रेन मध्ये बसून विधानसभेत व लोकसभेत पाठवायचं? कि बाळासाहेबांनी तयार केल्येल्या वंचीत बहुजन आघाडी एक्सप्रेसचे काम (ज्यात आपलं हित आहे.)करून  ईच्यातच बसून आपण स्वतः विधान सभेत व लोकसभेत जायचं?  ज्या-ज्या वंचीत घटकांचं प्रतींनिधित्व विधानसभेत व लोक सभेत पाठवायचं आहे त्या-त्या सर्व वंचीत घटकाणे २०१९ डोळ्या समोर लक्ष ठेऊन ,वंचीत बहुजन आघाडीचे काम तन, मन,धनाने करावं. कारण आता विधानसभा मतदारसंघ-लोकसभा मतदारसंघ to विधानभवन-संसदभवन "वंचीत बहुजन आघाडी एक्सप्रेस" सुसाट धावणार आहे.

                  --संदीप साळवे,जालना.
                  मो.नं.८६९१९५५२०२

सत्तेचा वापर जनहितासाठी

सत्तेचा वापर जनहितासाठी
- भास्कर भोजने
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नांव घेऊन राजकारण करणारे अनेक नेते झाले. त्यांनी ऊपेक्षित समाज समुहाला हाक देऊन मते मिळविली ,कुणी आघाडी, युतीचा पर्याय निवडला तर कुणी सत्ताधा-यांच्या कळपातचं सामील झाले.
            मिळालेल्या सत्तेचा वापर जनहितासाठी करण्याऐवजी नेत्यांनी स्वतः चे कल्याण करुन घेण्यातचं धन्यता मानली.
म्हणून लोकशाहीला अभिप्रेत असलेली सामाजिक समता प्रस्थापित करता आली नाही हे वास्तव आहे.
दलितांचे नेते जगजिवनराम ऊपपंतप्रधान पदापर्यंत पोहोचले परंतु स्वहिता पलीकडे त्यांना काही करता आले नाही.
मा.बुटासिंग देशाचे गृहमंत्री झाले मात्र दलितांवरील अन्यायाचे परिमार्जन करु शकले नाही.
तीच गत काँग्रेस मधील बाळकृष्ण वासनिक, नाशिकराव तिरपुडे, दादासाहेब रुपवते,मुकुल वासनिक, नितीन राऊत व चंद्रकांत हंडोरे यांची आहे.
रिपब्लीकन पक्षाचं नांव धारणं करून राजकारण करणारे परंतु काँग्रेसच्या मर्जीने राजकारणं करणारे रा.सू.गवई राज्यपाल पदापर्यंत पोहोचले परंतु त्यांच्या सत्तेचा लाभ केवळ त्यांच्या कुटुंबा पर्यंत चं सिमित राहिला.
समाजाला त्याचा कुठलाचं फायदा पोहोचला नाही.
रा.सू.गवईचा कित्ता गिरवितचं रामदास आठवले चा राजकीय प्रवास सुरु झाला. काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना आणि भाजप. मिळेल तिथून सत्तेच्या पदाचा लाभ घ्यायचा हा एकचं अजेंडा आणि एकचं ध्येय.
समाजाशी काही देणेघेणे नाही. "समाज कल्याण "हे नांव धारणं करुन स्वकल्याण करण्यातचं त्यांची संपूर्ण कारकीर्द गेली.
रिपब्लीकन पक्षाचे नेते "नालायक "आहेत असे म्हणून राजकारण करणारे मा.कांशिराम आणि मायावती यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन मते मिळविली .आणि सत्तेसाठी मनूवादी विचारधारेशी घरोबा केला.
एक वेळ नाही चार वेळा देशातील सर्वात मोठ्या राज्याची सत्ता संपादन केली .परंतु त्या सत्तेचा वापर जनहितासाठी करण्याऐवजी स्वतः चे पुतळे ऊभारण्यासाठी केला.
विभुती पुजेचा मार्ग चोखाळला आणि आंबेडकरवादाला तिलांजली दिली.
ऊत्तर प्रदेशात भाजप सारख्या विषारी सापाला दूध पाजून मोठे केले.
           आंबेडकरवादी समाज समुहाला अभिप्रेत राजकारण केल्या गेलं नाही हे वास्तव कुणीही नाकारु शकतं नाही. !
अँड. बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ३५-३६ वर्षाच्या राजकीय जिवनात कधीच सत्ताधार्यांशी साटंलोटं करून पदाची अभिलाषा बाळगली नाही.
ऊलटं व्ही.पी.सिंग आणि राजीव गांधी यांनी दिलेली मंत्रीपदाची संधी नाकारली. सत्तेचा मोह टाळला.आणि त्यागाचा मार्ग अनूसरला .आणि समाज हिताचा सातत्याने पाठपुरावा केला.
१९८९ मध्ये व्ही.पी.सिंग सोबतं युती करून. आंबेडकरी चळवळीचे  ४० वर्षापासून भिजतं पडलेले प्रश्न सोडवून घेतले .
बौद्धांना केंद्रात सवलती, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संसदेत तैलचित्र लावणे.,डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न किताब देणे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जन्म शताब्दी शासकीय खर्चाने साजरी करणे.मंडल आयोगाची अमलबजावणी करणे.,आणि एस.सी.एस.टी.कर्मचाऱ्यांसाठी कमीशनची नेमणूक करून घेणे.
ही सर्व समाजहिताची ,जनकल्याणाची कामे करून घेतली.
अँड. बाळासाहेब आंबेडकर केवळ खासदार राहिले आहेत. एक खासदार काय करु शकतो.?
जे ऊपपंतप्रधान, गृहमंत्री, राज्यपाल, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि मंत्री राहुनही त्यांना जे करता आले नाही ते एका खासदाराने करून दाखवले.!
सन १९९२-९३ मध्ये अँड. बाळासाहेब आंबेडकर राज्यसभेचे खासदार होते. त्यावेळी बिशप अझरैया,हेनरी त्यागराज ,आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या (युनो.)जिनेव्हा कार्यालयामध्ये दलित स्त्रिया आणि दलितावरील अत्याचाराच्या संदर्भात भारताच्या लोकसभेत सादर केलेले अहवाल सादर केले. आणि मागणी केली की, भारतात दलित स्त्रिया आणि दलितांचा होणारा छळ थांबला पाहिजे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. !
या अहवालाच्या आधारे त्यावेळी युनोने भारत सरकारकडे विचारणा केली. परंतु भारत सरकारने युनोला ऊडवाऊडवीची ऊत्तरे दिली.
अँड. बाळासाहेब आंबेडकरांनी त्या विषयाचा पाठपुरावा केला म्हणून यूनोने श्रीलंकेचे अँटर्नी जनरल श्री.गुरुशिंगे यांच्या अध्यक्षतेखाली ऊपसमिती नेमली. त्या ऊपसमितीचा अहवाल सप्टेंबर १९९६ ला आला.
संयुक्त राष्ट्र संघात (युनो.)हा प्रश्न ऊठविल्यामुळे दलित आणि दलितांचे प्रश्न यांची जाणीव जगभर झाली.
दलितांचे प्रश्न जगाच्या वेशीवर टांगणारे पहिले डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे अँड. बाळासाहेब आंबेडकर..!

कार्यकर्ता कसा असवा?

स्वतःला कार्यकर्ता समजत असाल तर जरूर वाचा...

1) संघटनेची तत्वप्रणाली-
त्याला मान्य असावी. संघटनेचे अंतीम ध्येय, उद्धीष्ट्य त्याला माहित असावे.
2)समाजाबद्दल आपुलकी असावी.
संघटनेच्या कार्कर्त्यांबध्दल त्याच्या मनात सद्भावना, प्रेम, आदरभाव असावा.
3)स्वत:च्या समाजाचा पूर्वेतिहास त्याला माहित असावा. कारण जो इतिहास विसरतो तो इतिहास घडऊ शकत नाही असे म्हटले जाते.
4)कार्यकर्ता हलक्या कानाचा नसावा. संघटनेचा नेता आणि उध्दीष्ठ यावर त्याचा ठाम विश्वास असायला हवा.
5) कार्यकर्त्याच्या ठायी अहंभाव नसावा. दुसरया कार्यकर्त्याचा व त्याच्या कामाचा सन्मान/आदर करणारा असावा.
6) पदलोभी नसावा-
पदाची लालसा असलेले कार्यकर्ते शत्रुंपेक्षाही घातक असतात. ते स्वतःही संघटन वाढवीत नाहीत आणि इतरांनाही वाढवू देत नाहीत. संघटन फक्त लेटरपॅडवर शिल्लक राहते.
7) आकलनशक्ती-
नेत्याच्या 'सूचक' शब्दांचा अर्थ समजला पाहिजे. Read between the lines दर्जाची आकलन क्षमता असावी.
8) सूक्ष्म निरीक्षण-
कार्यकर्त्याकडे सूक्ष्म निरीक्षण शक्ति असावी. सर्वच समाजात घडणा-या लहानमोठ्या घटनांची त्याने नोंद घ्यायला हवी.
9) भाषण व संभाषण चातुर्य- आपल्या मधुर वाणीने मुद्दा पटवून देण्याचे चातुर्य कार्यकर्त्याने अवगत करावे.
10) आत्मविश्वास-
निराश मनोवृत्ती नको.अपयशाचे यशात रूपांतर करतो, तोच खरा लढवय्या, नाहीतर 'रडवय्या'.
कार्यकर्त्याच्या डिक्शनरीत 'निराशा' हा शब्दच नसतो. दुर्बल परिस्थितीशी जुळवून घेतात. पराक्रमी परिस्थिती हवी तशी बनवण्यासाठी लढा देतात.
11) परिश्रम, चिकाटी आणि सातत्य-
ध्येय गाठण्यासाठी इतरांपेक्षा जास्त परिश्रम करण्याची तयारी हवी. प्रयत्नांत सातत्य हवे.धरसोड नको.
12) कार्यकर्ते जोडणारा-
कार्यकर्ते जोडणारा असावा. तोडणारा नको. प्रभावी संघटन हिच संघटनेची शक्ति असते.
13) कार्यकर्ते हेरणारा व व्यक्तीपरीक्षक-
कर्तृत्वशाली, सदाचारी आणि प्रभावी व्यक्तींना हेरून त्यांना संघटनेत सामील करण्याचे कौशल्य कार्यकर्त्याकडे हवे.
चांगले काम करणारा कार्यकर्ता पुढे जात असेल तर त्यावर खोटे आरोप करुन त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न कदापी करु नका...
14) शिस्त व वेळ पाळणारा पाहिजे.
15) त्याला उपलब्ध साधनांचा काटकसरीने व कौशल्याने वापर करता यावा.
16) श्रेय लाटण्याची मनोवृत्तीचा नसावा. धोकेबाज नसावा.
17) कार्यक्रमाचे आयोजन करता यावे. संघटनेचे विविध उपक्रम राबविण्याची जबाबदारी स्वीकारावी. पुढाकार घ्यावा. किमान संघटनेच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये त्याचा सक्रीय सहभाग असावा.
18) समताप्रेमी व समर्पित मनोवृत्तीचा असावा. श्रमाची लाज वाटू नये.
19) अभ्यासू, चिकित्सक व संशोधक वृत्तीचा असावा.
20) गुप्तता-
संघटनेतील काही गुप्त गोष्टी गुप्तच ठेवणारा असावा.
21) कार्यकर्त्याला संघटनेचा व स्वतःचा विचार दुस-यांस पटवून देता यायला हवा.
22)प्रसिद्धी व प्रतिष्ठा यांस हपापलेला नसावा.
23) अंधश्रद्धाळू नसावा.
24)संघटनेसाठी वेळ, बुद्धी, श्रम, कौशल्य आणि पैसा हे 'पंचदान' देणारा असावा.
25)संघटना समाजातील सर्वांच्या भल्यासाठी आहे.स्वत:च्या भल्यासाठी नाही...
त्यामुळे संघटनेसाठी सातत्याने पंचगुणांचे योगदान करणारा असावा.
👉 ज्या संघटनेकडे वरील गुणधर्म असलेले कार्यकर्ते असतात; त्या संघटनेला जगात तोड नसते.
👉 आपल्यालाही आपलं संघटन मजबूत बनवायचं असेल तर वरील गुणधर्म कार्यकर्ता म्हणून अंगी बाणवणं अत्यावश्यक आहे.

संकलित

क्रांती विचार

बोधिसत्व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात...

“लोक अध्यक्ष कोणी व्हावे, सेक्रेटरी कोणी व्हावे, खजिनदार कोणी व्हावे याबद्दलच एकमेकांचा द्वेष करु लागले आहेत.
हिच परिस्थीती जर कायम राहीली तर आपन जो ही एवढा मोठा खटाटोप करुन अधिकार मिळविले ते सर्व फुकट जातील.
शहाणा कोण व वेडा कोण याचा विचार करा, पण मानाला हापापलेल्या मुर्खाच्या नादी लागु नका, कोणाच्याही हातुन दिवा लागो पन आपापसातील दुही मोडा, आणि तुमच्या अडचनणी नाहीशा करण्याचे ज्ञान प्राप्त करुन घ्या“

संदर्भ - दि.४ नोव्हेंबर, १९३२, वालपाखडी येथे दिलेल्या भाषनातुन.....जनता २५ फेब्रुवारी १९३३.

टिप - आज २०१८ मध्ये सुद्धा आपनास असे फक्त मानापानासाठी हपापलेले लोकच संघटनेत दुही माजवुन संघटना कमकुवत करत असल्याचे सगळीकडेच पहायला मिळत आहे. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी अशांना मुर्ख संबोधले आहे.व अशांच्या नादी लागु नका असा आदेशही दिला आहे.

श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर दिवस रात्र एक करुन प्रतिगामी शक्तींना रोखण्यासाठी देशभर फिरत आहेत,जनजागृती करत आहेत त्यांच्या या झंझावाताने पुरोगामी जनतेत नवचैतन्य निर्माण झाले आहे,  प्रत्येकाला क्रांती होणार असा विश्वास वाटतो आहे, पण त्यासाठी कार्यकर्त्यांनीही दिवस रात्र एक करुन, पद, मानपान याचा विचार न करता आपल्या जिल्हा, तालुका, वार्डात फक्त बाळासाहेबांचे विचार घराघरात पोचवण्यासाठी जास्तीत जास्त वेळ दिला पाहीजे.

संकलन व पुणर्लेखन,संपादन
विचार वाहक- मनोजकाळे-ठाणे.

अराजकीय आंबेडकरी लोकांपासून सावध व्हा

अराजकीय आंबेडकरी लोकांपासून सावध व्हा
– डॉ. संदिप नंदेश्वर
    कायम स्वतःला अ-राजकीय म्हणवून घेणार्‍या आंबेडकरवाद्यांनी या समाजाला व पर्यायाने आंबेडकरी चळवळीला रसातळाला नेले आहे व निवडणुकीच्या काळात याच अ-राजकीय समाजद्रोह्यांनी (व्यक्ती, संस्था, संघटना, मंडळे) इतर राजकीय पक्षांशी सौदेबाजी केली. काहींनी केली नसेल, तर राजकीय भूमिकेअभावी व राजकीय भूमिका न घेता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रस्थापित राजकीय पक्षांनाच (काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा, मनसे) मदत केली आहे. व समाजाची एकगठ्ठा मते विखुरल्या गेली. त्यामुळे समाज व चळवळ रसातळाला जाऊन राजकीय प्रभावशून्य बनली. अशा सर्व अ-राजकीयांना आंबेडकरी समाजद्रोही म्हटले तर तीर काळजात खूपसल्यागत रक्तबंबाळ अवस्था होणे साहजिक आहे. हे वाचून व ऐकून समाजही तडपेल. माझ्यावर टीका करेल. आम्ही समाजद्रोही कसे? अशा प्रश्‍नांची सरबत्ती होईल. परंतु सत्य मांडणे व लिहिणे गरजेचे आहे. असत्याला कवटाळून वाटचाल करीत राहणे मी समाजद्रोह समजतो. त्यामुळे अशा सर्वांना उत्तर देऊन येणार्‍या पिढीला अ-राजकीय समाजद्रोही होण्यापासून वाचविणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.
     समाजद्रोही ही संकल्पना सामाजिक द्रोह व समाजविरोधी कृत्य करणारा, सामाजिक अस्थिरता या संबंधाने समकक्ष वापरली जाते. कुणाला हे अभिप्रेत नसेल, तरी मी त्या अनुषंगाने ती संकल्पना वापरतोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक लोकशाही अभिप्रेत होती. परंतु राजकीय लोकशाही संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेबांच्या अथक प्रयत्नाने संविधान सभेने स्वीकारली व या देशातील जनतेने अंगिकृत केली. त्यामुळे देशात राजकीय लोकशाही प्रस्थापित झाली. परंतु सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी राजकीय लोकशाहीचा योग्य वापर झाला, तरच सामाजिक लोकशाही प्रस्थापित होईल ही डॉ. बाबासाहेबांसोबतच संविधानकारांचीही अपेक्षा होती. पर्यायाने राजकीय लोकशाहीतूनच सामाजिक लोकशाहीचा मार्ग प्रशस्त करता येईल. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणवून घेणार्‍यांनीच राजकीय अभावशून्यतेने राजकीय लोकशाही स्वीकारली नाही असेच म्हणावे लागेल. त्यामुळे आंबेडकरी समाजाचा राजकीय प्रभाव 1970पासून संपुष्टात आल्यागत झाला आहे.
राजकीय लोकशाही म्हणजे काय हेसुद्धा स्पष्ट होणे गरजेचे आहे. त्याची काही मूलभूत अंगे आहे. ती पुढीलप्रमाणे –
1) प्रौढ मताधिकार (मतदानाचा अधिकार) : वयाची 18 वर्षे पूर्ण करणार्‍या सर्व नागरिकांना मतदानाचा संविधानिक अधिकार.
2) राजकीय पक्ष : विशिष्ट विचारधारा व विचारसरणी अंगिकृत करून समान हितसंबंध जोपासणार्‍या लोकांचा समूह जो न्याय हक्कासाठी स्वतःचे राजकीय प्रतिनिधित्व करू इच्छितो व एक विशिष्ट विचारधारा विचारसरणी हा त्यांच्या राजकीय वाटचालीचा व लढ्याचा स्थायिभाव असतो. सत्तेत प्रतिनिधित्व मिळविणे हा उद्देश सोबत घेऊन सत्ताधार्‍यांवर राजकीय दबावगट निर्माण करून राजकीय प्रभाव पाडीत असतो.
3) राजकीय नेतृत्व : विशिष्ट विचारधारा व विचारसरणीने वाटचाल करणार्‍या राजकीय पक्षाला राजकीय नेतृत्व लागते. जे नेतृत्व त्या पक्षाच्या विचारधारेला अनुसरून समाजाच्या न्याय व हक्कासाठी सत्ताधार्‍यांशी लढत असते. हे नेतृत्व तत्कालीन काळातील जिवंत व्यक्तीच करीत असतो. भूतकाळात होऊन गेलेला नेता नाही.
4) राजकीय सहभागित्व : देशातला प्रत्येक नागरिक ज्याने वयाची 18 वर्षे पूर्ण केलीत व कायदेशीर मतदार बनला आहे. अशा प्रत्येकच नागरिकांचे राजकीय सहभागीत्व. निवडणुकांच्या काळात त्यांची राजकीय सक्रियता, राजकीय भूमिका व राजकीय इच्छाशक्ती राजकीय लोकशाहीत महत्त्वपूर्ण असते.
मतदानाला जाताना त्याचे हितसंबंध जोपासणारा विचार, त्या विचारांवर चालणारा, असणारा व निर्माण झालेला पक्ष, व त्या पक्षाचे नेतृत्व करणारा नेता व त्या पक्ष नेतृत्वाने दिलेला उमेदवार हा विचार त्याच्या मनात असतो. राजकीय लोकशाहीत बिनडोक, अविवेकी, अविचारी मतदार हा कधीही धोकादायकच असतो. कारण लोकशाहीत सत्ता व सत्तेची ध्येयधोरणे व्यक्तीच्या हातात राहत नसून, पक्षाच्या हातात असतात. पर्यायाने त्या पक्षाच्या मुळाशी असणारी विचारधारा सत्ता व सत्तेच्या ध्येयधोरणाला प्रभावित करीत असतात. (उदा. 2014ला भारतात स्थापन झालेली मोदी, भाजप, संघ, हिंदुत्ववादी सत्ता)
या किमान राजकीय लोकशाहीच्या परिमाणाच्या चौकटीत आंबेडकरी विचार, आंबेडकरी संस्था, संघटना, मंडळे व आंबेडकरी समाज यांच्या राजकीय सहभागित्वाचा विचार करून आपल्याला उत्तरे मिळू शकतील. संसदीय लोकशाहीत देशातील नागरिक हा अ-राजकीय राहू शकतो का? तो अ-राजकीय भूमिका घेऊ शकतो का? याचे उत्तर आम्हाला शोधावे लागेल. अ-राजकीयत्व हे लोकशाहीला लागलेली कीड आहे. नव्हे तो लोकशाहीत केलेला द्रोह आहे. असेच म्हणावे लागेल. फार काळ समाजाला राजकीय अंधारात ठेऊन चळवळीचे ध्येय गाठता येणे शक्य नाही. अ-राजकीयत्व म्हणजे संविधानद्रोह नव्हे का ? याच्या स्पष्टीकरणातूनच पुढे आंबेडकरी अ-राजकीय समाजद्रोही समोर येतील. स्पष्टही होतील.  हल्ली आंबेडकरी समाजात अ-राजकीय म्हणवून घेणे भूषणावह बनले आहे. नव्हे अ-राजकीय असणे एखाद्या पुरस्कार स्वरूप बिरूद बनले आहे. ‘आम्ही अ-राजकीय’, ‘आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही’, ‘आम्ही कुठल्याही गटाचे नाही’, आम्ही राजकीय नाही’, अमके-तमके काम राजकीय नाही; सामाजिक आहे. म्हणून तुम्ही आमच्या सोबत या, सहकार्य करा, मदत करा. हे हल्ली मोठ्या गर्वाने सांगितले जाते. इतकेच नाही, तर अशा लोकांना निष्ठावंत, सच्चे व हाडाचे आंबेडकरी समजले जाते. इतकेच नव्हे, तर समाजात अशा अ-राजकीय माणसांना राजकीय माणसांपेक्षा मान, सन्मानही जास्त मिळतो. व समाज राजकीय प्रवाहापासून दूर फेकला जातो. ज्याचा प्रत्यक्ष लाभ प्रस्थापित राजकीय पक्ष घेताना दिसून येतात. या देशातला ऊर्जावान आंबेडकरी समाज अतिशय महत्त्वाच्या राजकीय लक्ष्यापासून दूर जाणे; हेच सत्तेवर येण्याचे सूत्र इतर राजकीय पक्षांनी तयार केले आहे. हे इतर पक्ष या अ-राजकीयांना ऊर्जा (पैसा) पुरवितात. इतकेच काय, तर या स्वतःला अ-राजकीय म्हणविणार्‍या आंबेडकरी लोकांना सामाजिक कार्याच्या नावाखाली कार्यक्रम घ्यायला पैसाही सत्ताधारी व प्रस्थापित पक्ष पुरवित असतात. जितका अ-राजकीय आंबेडकरी व्यक्ती, संघटन, संस्था, मंडळ इ. तितका इतर राजकीय पक्षांत त्याचा भाव (किंमत = चळवळीला व समाजाला विकण्याची) जास्त. हे जणू वास्तवागत चित्र कोरलेले आहे. आमचे अनुभव तर असे की, कुठल्याच अ-राजकीय संस्था, संघटना व मंडळाचा किंवा व्यक्तीचा सो-कॉल्ड सामाजिक कार्यक्रम इतर पक्षांच्या पैशाशिवाय होतच नाही. किंवा इतर प्रस्थापित पक्षांच्या नेत्यांना आपल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून (पैसे घेऊन) बोलाविल्याशिवाय कार्यक्रमच होत नाही. इतर पक्षांकडून तो पैसा घेता यावा म्हणूनच हे सामाजिक कार्यक्रम होतात, अन्यथा एकही कार्यक्रम होताना दिसला नसता. बरं, याची परतफेड काय, तर निवडणूक आली की, ‘‘भाऊ, दादा, साहेब आमची मतं तुम्हालाच’’. मत देतात की, देत नाही? हा भाग वेगळाच. कारण पैसा सगळ्यांकडून घ्यायचा असतो.
      दुसरे असे की, या सर्व अ-राजकीय माणसांची, संस्था, संघटना, मंडळांची आर्थिक परिस्थिती जेमतेमच. पण समाजकार्याचा आव इतका की, यांनी यांची अख्खी संपत्तीच समाजाच्या उत्थानासाठी घालविली. वास्तवात काय, तर साध्या बाजूच्या माणसाचे रेशनकार्ड पण कधी काढून दिलेले नसेल व नाही कधी एखाद्या सरकारी दप्तरामध्ये जाऊन त्याला न्याय मिळवून दिला असेल. समाज तर दूरच राहिला. पण हेच सारे अ-राजकीय लोक प्रबोधनाच्या नावाने बोंबा ठोकून आंबेडकरी राजकीय नेत्यांवर व आंबेडकरी पक्षांवर आगपाखड करतील. नेतृत्वाविषयी व आंबेडकरी पक्षांविषयी तिरस्कार व द्वेष निर्माण करण्यात ही सर्व अ-राजकीय मंडळी पटाईत असतात. आम्हीच तेवढी आंबेडकरी चळवळ (मुळातली वळवळ) चालवतो. आमच्यामुळेच आंबेडकरी चळवळ टिकून आहे. राजकारण्यांनी घात केला. गटातटात विभागले. हा पक्ष असा, तो पक्ष तसा, हा नेता असा, तो नेता तसा. हे यांचे नेहमीचे प्रवचन. मात्र समाजावर किंवा समाजातल्या एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला, तर यांना भाजला पापडही मोडता येत नाही. तेव्हा मात्र राजकीय नेत्यांची आठवण येते. कारण प्रशासनावर व सत्तेवर या अ-राजकीयांचा प्रभाव शून्य. जेमतेम आर्थिक परिस्थिती असणारे हे तमाम अ-राजकीय अल्पावधीतच अ-राजकीय समाजसेवेतून मालदार कसे होतात? याची उदाहरणे तुमच्या आजूबाजूलाच सापडतील. मग समाजाला राजकीय प्रभावशून्य बनविणार्‍या या अशा बेगडी अ-राजकीय आंबेडकरवाद्यांना समाजद्रोही नाही, तर काय म्हणायचे ?
या अ-राजकीय माणसांना आम्ही कधी विचारले आहे का? की त्याने निवडणुकांमध्ये कुणाला मदत केली? कुणाला मतदान केले? कुठली भूमिका वठविली? कुठल्या पक्षाचा प्रचार केला? किमान हे अ-राजकीय माणसे स्वतः चालवित असलेल्या संघटनांच्या सदस्यांना कुठल्या पक्षाला मतदान करायला लावले ? त्यांनी स्वतः हा कोणत्या पक्षाला मतदान केले? ज्या पक्षाला मतदान केले तो पक्ष आंबेडकरी विचारांचा होता का? तो पक्ष आंबेडकरी होता का? याचे उत्तर शंभर टक्के नकारार्थी येतील. मग हे अ-राजकीय माणसे कसले आंबेडकरवादी आहेत असे म्हणता येईल का? शत्रूपक्षांना देशाच्या सत्तेवर येण्यास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारे हे आंबेडकरी असू शकतात का? हे कसले आंबेडकरी? हे तर समाजात अराजकता माजविणारे अ-राजकीय आंबेडकरी समाजद्रोहीच. या अ-राजकीय आतंकवाद्यांपासून आंबेडकरी चळवळीने सावध होणे गरजेचे नव्हे काळाची गरज आहे.
       आज आंबेडकरी चळवळ व्यापक होत चालली आहे. देशातल्या सत्ताधारी विचारसरणीने जी परिस्थिती देशांतर्गत निर्माण केली त्या परिस्थितीला तोंड देत असताना भारतातील लोकशाही व या लोकशाहीने सर्व नागरिकांना दिलेली संविधानिक सुरक्षितता कायम ठेवण्यासाठी देशातला तरुण वर्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना पर्याय म्हणून पाहतो आहे. कन्हैय्या असो की, मार्क्सवादी विद्यार्थी संघटना आपल्या भूतकाळातील अपयशाचे शल्य झुगारून आंबेडकरी विचारांना हाताशी घेऊन सत्ताधारी विचारसरणीच्या (हिंदुत्ववादी) विरुद्ध रस्त्यावर येऊन लढतो आहे. सह्रदयाने त्यांचे स्वागत आंबेडकरी चळवळीने करणे अपेक्षित आहे. मीडिया ट्रायल, आताच का पुळका इ. प्रश्‍नार्थक विसरून विचार करावा लागेल. या आंबेडकरी लढ्याचे व चळवळीचे नेतृत्व शिफ्ट होतेय का? की नाही? ही भिती न बाळगता.
(क्रमशः)
(लेखक-मुंबई उच्च नागपूर खंडपीठात वकील आहेत.)

समान नागरी कायदा , बौद्ध विवाह कायदा आणि आंबेडकरी चळवळ

समान नागरी कायदा , बौद्ध विवाह कायदा आणि आंबेडकरी चळवळ
- सुमित वासनिक
समान नागरी कायदा लग्न, घटस्फोट, पोटगी, वारसा हक्क, दत्तक विधान या मोजक्या विषयांवरील कायद्यांसाठीच आहे. पण आरएसएस ने समान नागरी कायदा हा प्रत्येक क्षेत्रात लागू असणारा कायदा आहे असा अपप्रचार केला आहे. विशेषतः या कायद्यामुळे आरक्षण संपुष्टात येईल असा संघाचा प्रचार आहे. या कायद्यामुळे आरक्षण संपेल अशी भीती आरक्षण समर्थकांना दाखवल्यामुळे ते या कायद्याला विरोध करतील , ही संघाची रणनीती आहे. संघाचा हा खोडसाळ प्रचार देशात समान नागरी कायदा लागू होऊ नये यासाठीच आहे. समान नागरी कायदा धार्मिक कायद्यांचि जागा घेणारा कायदा आहे. हा कायदा संघाच्या हिंदू राष्ट्राच्या नावाने सवर्णांचे हित जपणारे वैदिक राज्य निर्माण करण्यातील मोठा अडसर आहे, कारण या कायद्याने देशातील स्त्रियांना मुक्ती मिळेल. स्त्री गुलाम असल्याशिवाय हिन्दु राष्ट्र निर्माण होणार नाही. म्हणूनच हा कायदा होऊ नये अशी संघाची इच्छा आहे. याच कारणाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या हिंदू कोड बिलास संघाने कडाडून विरोध केला होता. समान नागरी कायदा अस्तित्वात यावा ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचीही इच्छा होती. या कायद्याच्या समर्थनात ते संविधान सभेतही बोलले होते. ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांचीही हीच इच्छा आहे. सत्तेत असूनही भाजप समान नागरी कायदा लागू का करीत नाही ? हा प्रश्न विचारून त्यांनी या विषयावरील संघाची दुटप्पी भूमिका सर्वांसमोर आणलि आहे. संघ समान नागरी कायदा होऊ नये यासाठी इतर सर्व धर्मांचे वेगवेगळे कायदे तयार करण्याच्या कामाला लागला आहे. शीख समाजाचे कायदे पास करण्यात आले आहेत. आता बौद्ध विवाह कायदा बनविण्याचे कारस्थान संघाने रचले आहे. जेवढ्या जास्त धर्मांचे स्वतःचे कायदा अस्तित्वात येतील तेवढा समान नागरी कायद्याला विरोध होईल हे बौध्द विवाह कायदा तयार करण्यामागील षडयंत्र आहे. ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी संघाची ही चाल ओळखूनच बौद्ध विवाह कायद्याला कडाडून विरोध केला आहे.  हिंदू विवाह कायदा मान्य नाही त्यांना स्पेशल मॅरेज ऍक्ट ने लग्न नोंदविण्याचा उपाय असतांना बौद्ध विवाह कायद्याची आणि इतर धर्मांचे वेगळे कायदे बनविण्याची गरज काय? असा सवाल ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. 
समान नागरी कायदा तयार करण्यासाठी मुस्लिमांचाही  विरोध आहे यावरही ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी उपाय सुचविलेला आहे.  मुस्लिमांमधील मौलवींशी चर्चा करून मुस्लिमांनाही अडचण होणार नाही अश्याप्रकारचा मध्यम मार्ग काढायचा प्रयत्न करावा आणि जोपर्यंत यावर एकमत होत नाही तोपर्यंत मुस्लिम सोडून जे धर्म समान नागरी कायद्यास तयार आहे त्यांच्यासाठी समान नागरी कायदा बनवून अमलात आणावा असे ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांचे म्हणने आहे. पण भाजप सरकार यापैकी काहीही करत नाही आहे, ते फक्त समान नागरी कायद्याच्या आडून देशात आरक्षण मिळत असलेल्या वर्गाविरोधात आणि मुस्लिमांच्या विरोधात देशात वातावरण तयार करायचा प्रयत्न करीत आहेत.
समान नागरी कायदा आणि बौद्ध विवाह कायदा याविषयी ऍड.बाळासाहेब आंबेडकर हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावरच चालत आहेत. पण बिएसपि आणि बामसेफ या संघटना समान नागरी कायदा आणि बौद्ध विवाह कायदा या विषयांवरून ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात अपप्रचार करीत आहेत. ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांना रोखण्याच्या प्रयत्नात हे लोक बाबासाहेबांच्या विचारांना आणि कार्याला विरोध करायला लागले आहेत. मागे राष्ट्रवादी काँग्रेसने सोशल मीडियावरून  बाळासाहेबांना विरोध केला तेंव्हा आंबेडकरी समाजाने राष्ट्रवादीला चांगलाच धडा शिकवला होता. त्यामुळे सावध झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने बिएसपि , बामसेफला पुढे करून बाळासाहेबांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. शरद पवार प्रायोजित अपप्रचाराच्या या मोहिमेत बिएसपि आणि बामसेफ या संघटनांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनाच विरोध करणे सुरू केले आहे. ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांना विरोध केला की प्रसिद्धी मिळते हे एक दुसरे कारणही आहेच बाळासाहेबांना विरोध करण्याचे. या संघटनांचा ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रति असलेला द्वेष सर्वांनाच माहिती आहे. पण आंबेडकरी जनता खंबीर पणे ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहे त्यामुळे बीएसपी,बामसेफच्या या अपप्रचारा त्यांना काहीही फायदा होणार नाही, उलट आंबेडकरी जनता यांना घरभेदी म्हणूनच ओळखेल. 
भारिपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी प्रायोजित बिएसपि आणि बामसेफच्या अपप्रचारावर लक्ष देऊ नये भारिपला या संघटनांचा विरोध करण्यात गुंतवून आपल्यासाठी मोकळे रान मिळविणे हा राष्ट्रवादी कॉग्रेसचा कट आहे. या संघटनांकडे दुर्लक्ष करा , आपले लक्ष वंचितांना प्रतिनिधित्व , सत्ता मिळवून देणे हे आहे आपण त्यावरच लक्ष केंद्रित केले पाहिजे हे लक्षात ठेवा.
जयभीम,
सुमित वासनिक...

बामसेफ़च्या मुखोट्यात दडलेला संघ .....

बामसेफ़च्या मुखोट्यात दडलेला संघ .....
- राजेंद्र पातोडे
जय मुलनिवासी, ब्राम्हण विदेशी ’ असे सांगत बेंबीच्या देठापासुन ब्राम्हण व आंबेडकरी समुहाला शिव्या घालणारे संघटन म्हणजे बामसेफ़. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श सांगायचे आणि त्यांचा सिद्धांत नाकारायचा, त्यांच्या मानवमुक्तीच्या लढ्याचा धिक्कार करण्यासाठी संघपरिवारानेच जन्माला घातलेले मनुवादी व्यवस्थेचे दुसरे अपत्य आणि हिंदुराष्ट्र निर्मीती करीता कार्यरत कर्मचा-यांचे एक मोठे संघठन म्हणजे बामसेफ़ आहे. त्याची पाळेमुळे आणि कार्यप्रणाली तपासली असता अनेक धक्कादायक बाबी समोर येतील.
बाबासाहेबांच्या जाती निर्मुलानाच्या विरोधात जावुन जाती गोळा करण्याचा हा उद्योग करण्याचा कांशीराम चा उद्देश काय होता ? तर त्याचे उत्तर येते संघपरिवाराच्या इशा-यावर हे सर्व घडविण्यात येत होते.बामसेफ़ च्या स्थापनेच्या वेळी कांशीराम ह्यांच्या डोळ्यासमोर आर एस एस चा आदर्श होता.नोंदणी नसताना आर एस एस चे सुरु असलेले कार्य ह्या बद्दल कांशीराम ह्यांना कौतुक होते.मुळात संघपरिवार हा देखील हिंदुना संघटीत करुन ’हिंदुराष्ट्र’ निर्मिती च्या ध्येयासाठी काम करीत आहे.संघाचे नेतृत्व वरच्या जातीचे लोक करीत असल्याने खालच्या जातीचे लोक त्यांचे नेतृत्व मान्य करीत नाहीत. ही संघासमोरची सर्वात मोठी अडचण होती.त्या साठी बामसेफ़चा वापर करण्यात आला.संघपरिवाराने वरच्या जातीचे संघठन करायचे आणि बामसेफ़ने खालच्या जातीचे असा हा खेळ आहे.आणि हिंदुंना संघटीत करुन ’हिंदुराष्ट्र ’ साकारायचे हा आहे दोन्ही संघटनांचा मुळ अजेंडा ठरविण्यात आला.
त्या साठी बामसेफ़ने "बॅकवर्ड अ‍ॅंड मायनॉरिटी कम्युनिटीज एम्पलॉईज फ़ेडरेशन " अश्या जातीवाचक नावाचा स्विकार केला.या उलट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संघटना, संस्था, नियतकालिका ह्यांना नाव देतांना प्रचलीत धर्मव्यवस्था, सामाजिक व्यवस्था या विरोधातील लोकशाहीपुरक नावांची निवड केली होती.या उलट बामसेफ़ जातीवाचक नाव घेउन कामाला लागली. ही संघटना नेमकी काय आहे ह्याचे थोडक्यात उत्तर असे आहे -
·       जाती विरहीत समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी सहा हजार जातींचेच संघटन करते.
·       ’ जय भिम ’ एवजी ’ जय मुलनिवासी’ जयघोष करते.
·       पुणे कराराच्या निमीत्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्याचा धिक्कार करते.
·       ’ वर्गणी एके वर्गणी ’ वसुली करते.
·       डॉ. बाबासाहेब आंबेडकर,भय्यासाहेब आंबेडकर, दादासाहेब गायकवाडा पासुन बाळासाहेब आंबेडकर आणि पुढे थेट नामांतर शहीदा पर्यंत सर्व विचारवंत, नेते, कार्यकर्त्यांना, समाजातील जनप्रतिनिधींना, दलाल, भडवे संबोधते.
·       बाबासाहेब स्वत:च्या घरी नेहरु करीता दारु ठेवत असत, असा नीच विनोद वामन मेश्राम भाषणात करतो.
·       बामसेफ़ी शिर्ष नेतृत्वच समलैंगिक, पैसा खाणारे, चारित्र्यहीन असल्या्चे आरोपाची भाषणे यु ट्युब वर उपलब्ध असलेले संघटन म्हणजे बामसेफ़.
·       शाहु, फ़ुले, आंबेडकरांसहीत आदर्शांची भली मोठी यादी असणारे परंतु भाषा, भाषणे, वर्तन व प्रवृत्ती प्रचंड विसंगती असणारे संघटन म्हणजे बामसेफ़.
·       जातीय अन्याय, अत्याचार,आरक्षण, शिष्यवृत्ती, जातीय दंगल ह्या साठी एकदाही मोर्चा, आंदोलन, जनहीत याचिका न करणारी संघटना म्हणजे बामसेफ़.
·       आंबेडकरी समुहाला ’धेड’, ’महार ’ संबोधणा-या कांशीरामला युगात्मा मानणारा वर्ग म्हणजे बामसेफ़.

पार्श्वभुमी :-

बामसेफ़ची स्थापना कांशीराम ह्यानी केली आहे.बामसेफ़ स्थापने बाबत त्याचे संस्थापक सदस्यात कमालीचे मतभेद आहे. डी.के. खापर्डे हे १९७३ ला पुण्यात तर सी.पी. थोरात हे १९७३ ला दिल्लीत स्थापना झाल्याचे सांगतात.बामसेफ़चे प्रवर्तक कांशीराम हे ६ डिसेंबर १९७८ ला बोट क्लब दिल्ली ला स्थापना झाल्याचे सांगतात.कांशीराम ह्यांनी ६ डिसेंबर हाच दिवस का निवडला ? जगातील शोषित,पिडीत व सर्वहारा समुहाच्या जिवनातील अत्यंत दु:खाचा दिवस.त्याच महापरिनिर्वाण दिनाला डी एस फ़ोर अर्थात जातीअधिष्ठीत संघटनेच्या स्थापना दिवस संस्थापक आणि संघटनेचा हेतु स्पष्ट करणारा आहे.दुसरे महत्वाचे म्हणजे सहा हजार जातीचे संघठन करताना बामसेफ़ हिंदु धर्माचे विरोधात भुमिका घेत नाही.ब्राम्हण, वैश्य व क्षेत्रीय यांना लक्ष करताना त्यांचे समाज व्यवस्थेतील स्थान कायम राखते.मनुचा धर्म व हिदुत्व ह्याचा त्याग करणे हे खरे समता, स्वातंत्र्य, बंधुता स्विकारण्या सारखे होते.परंतु बामसेफ़ ही जातींची संघटना असल्याने हिंदु धर्मातील सहा हजार जातींचे संघटन हे त्यांचे प्रमुख कार्य आहे. एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगतात की, " जात ही केवळ संघठन विरोधी आहे, असे नव्हे तर सुधारणा विरोधी देखील आहे.जातीच्या आधारावर कोणत्याही योजनेची इमारत उभारता येत नाही.तुम्ही राष्ट्र निर्मीती करु शकत नाही.तुम्ही जातीच्या आधारावर काहीही करायला जाल तर ते कोसळुन पडल्याशिवाय राहणार नाही."
महाराष्ट्रातील हरिजनवादी डी. के. खापर्डे यांनी बहुजनवाद किंवा मुलनिवासीवादाचे विष आंबेडकरी समाजात पेरले आहे. " आर्य ब्राम्हण विदेशी होत व इथले संपुर्ण अनुसुचीत जाती, अनुसुचित जमाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्यांक लोक या आर्यब्राम्हणा व्यतिरिक्त आहेत असल्या मुळे मुलनिवासी ठरतात," असा शोध लावण्यात आला.तोच मुलनिवासी सिद्धांत अनुसुचीत जाती, अनुसुचित जमाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्यांक गळी उतरविला जात आहे. बामसेफ़च्या आदर्शांची यादी पाहील्यास लक्षात येते की त्या मध्ये बुद्ध, कबीर किंवा सम्राट अशोक नाहीत.त्याचे कारण संघपरिवार व बौद्ध संस्कृती च्या पारंपारिक संघर्षाला लक्षात घेवुन बामसेफ़ने बाबासाहेबांचे गुरु व आदर्श नाकारले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजव्यवस्थेची, संस्कृतीची, धर्मग्रंथांची कठोर चिकित्सा केली आहे. मानववंशशास्त्राच्या आधाराने त्यांनी जातीय व्यवस्थेचे सैद्धांतिक विश्लेषण केले आहे. आर्य बाहेरून आले व त्यांनी मूळच्या अनार्याना जिंकून दास्य किंवा गुलाम बनविले. आर्य म्हणजे ब्राह्मण आणि बाकीचे अनार्य म्हणे शूद्र वा बहुजन अशा आजवरच्या तकलादू इतिहासाला आंबेडकरांनी शूद्र पूर्वी कोण होते आणि अस्पृश्य मूळचे कोण होते, या दोन शोधप्रबंधांत छेद देणारे नवे निष्कर्ष काढले आहेत. शूद्र हे पूर्वी आर्यच होते, शूद्रांचे हिंदू-आर्य समाजात मूळचे स्थान दुसऱ्या म्हणजे क्षत्रिय वर्णात होते. ब्राह्मण व क्षत्रिय यांच्यातील वर्चस्ववादातून शूद्रांना चौथ्या वर्णात टाकून त्यांना खालचा दर्जा देण्यात आला, असे बाबासाहेब सांगतात.आर्य परकीय असतील तर मग पूर्वाश्रमीच्या शूद्रांना आणि आताच्या बहुजनांना परके ठरविण्यासारखे आहे. त्यानंतर अस्पृश्य मूळचे कोण, याचाही बाबासाहेबांनी शोध घेतला आहे. ते म्हणतात, विभिन्न वंशांचा निर्णय करण्याचे वांशिक शरीररचनाशास्त्र हेच खरे शास्त्र असेल, तर हिंदू समाजातील विभिन्न जातींना या शास्त्राची कसोटी लावून पाहिल्यास अस्पृश्य हे आर्य आणि द्रविड वंशापेक्षा भिन्न वंशाचे लोक आहेत, हा सिद्धांत कोलमडून पडतो. या मोजमापावरून हे सिद्ध होत आहे की, ब्राह्मण व अस्पृश्य हे एकाच वंशाचे लोक आहेत. जर ब्राह्मण आर्य असतील तर अस्पृश्यही आर्यच आहेत. ब्राह्मण जर द्रविड असतील तर अस्पृश्यही द्रविडच आहेत. ब्राह्मण नाग वंशाचे असतील तर अस्पृश्यही नाग वंशाचे आहेत. त्या आधारावर अस्पृश्यतेला वंशभेदाचा आधार नाही, असा निष्कर्ष बाबासाहेबांनी काढला आहे. चातुवर्ण व्यवस्थेत अस्पृश्य या अवर्णाची उपपत्ती कशी झाली, त्यालाही कोणता संघर्ष कारणीभूत आहे, हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. परंतु बाबासाहेबांनी येथील सर्व समाजव्यवस्थेचे मूळ शोधून काढले आहे, शूद्र पूर्वी कोण होते हे सांगितले, अस्पृश्य मूळचे कोण होते, याचीही सैद्धांतिक उकल करून दाखविली आहे. मुलनिवासीवादाचे प्रचारक ब्राम्हण किंवा आर्य बाहेरुन आले असे मानतात, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र शूद्र पूर्वी कोण होते आणि अस्पृश्य मूळचे कोण होते, या ग्रंथात आर्य हे बाहेरुन आल्याचे नाकारले आहे.बामसेफ़ी बाबासाहेबांचा हा सिद्धांत नाकारतात.
त्या करीता हे मुलनिवासी बामसेफ़ी आर्य संस्कृती व सिंधु संस्कृती वेगवेगळ्या आहेत म्हणुन आर्य बाहेरुन आले होते असे ठोकुन देतात.त्यांना माहीतच नाही की, सिंधु संस्कृतीतुन  मिळालेल्या अवशेषात मुळ गोष्टी सिद्ध करणारी लिपीच अजुन वाचता आलेली नाही.त्याही पुढे जाउन बाबासाहेबांचा सिद्धांत खोटा ठरविण्यासाठी हे महाभाग ’ डी एन ए चाचणी’ मधुन ब्राम्हण किंवा आर्य हे बाहेरुन आल्याचे सिध्द झाले असे बरळतात.बाबासाहेबांच्या काळात ही चाचणी करण्याची सोय नव्हती म्हनुन बाबासाहेबांनी आर्य बाहेरुन आले असे सिध्द करता आले नाही. हे सांगण्याचे धाडस देखील बामसेफ़ी करतात ! मुळात " डी एन ए चाचणी व्दारे " जन्मलेल्या किंवा गर्भातील बालकाचे आई वडील कोणते एवढेच निश्चित करता येते.डी एन ए चाचणी व्दारे भारतातील सर्व जाती धर्म व त्यांचा वंश कोणता हे ठरविता येत नाही.हे सॅम्पल घेताना उच्च, मध्यम आणि निम्न जातीतील केवळ आठ जाती समुहातील केवळ दहा व्यक्तीची निवड करण्यात आली होती व ते देखील आंध्र प्रदेशातुन घेण्यात आले आहेत.जेंव्हा की या देशातील एका राज्यातच हजारो जाती आढळुन येतात. ह्या डी एन ए चाचणीतील दुसरी त्रुटी अशी आहे की, त्या मध्ये केवळ ब्राम्हण, क्षेत्रीय आणि वैश्यांचाच उल्लेख आहे.शुद्र, अतिशुद्र व आदिम जातींच्या सॅम्पलचा उल्लेख नाही किंवा त्यांचे तुलनात्मक विश्लेषण केले गेले नाही. तरीही अनुवांशिक संशोधनाचे विश्लेषण केले असता भारतीय ब्राम्हण जाती युरोशियन लोकांशी आनुवांशिक दृष्टीने निकटचे ठरत असले तरी ब्राम्हण जाती युरोशियन लोकांपेक्षा जास्त क्षेत्रिय व वैश्य जातीच्या जवळचे ठरतात.त्या मुळे क्षेत्रिय व वैश्य आणि ब्राम्हण हे भारतातील रहीवाशी ठरतात.त्यायोगे बाबासाहेबांनी ’हु वेअर शुद्राज’ मध्ये केलेले संशोधन खरे ठरते.तरी देखील मुलनिवासीवादाचे पुरस्कर्ते जाणिवपुर्वक खोटा आणि भ्रामक प्रचार करत आहेत.
ब्राम्हण, क्षेत्रीय व वैश्य हे मुलनिवासी नसतील तर मग छत्रपती शिवाजी महाराज, शाहु महाराज हे क्षेत्रीय राजे बामसेफ़च्या आदर्श्यांच्या यादीत कसे ह्याचे उत्तर बामसेफ़ देत नाही.त्याचे कारण बामसेफ़ला केवळ सत्ता हवी आहे.संघपरिवार व बामसेफ़ ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत.खालच्या जातीचे संघटन करण्यासाठी वरच्या जातींना शिव्या घालायच्या.आणि गोळा केलेल्या सहा हजार जाती हिंदुत्वाशी जोडुन बाबासाहेबांच्या जाती तोडण्याच्या लढ्याला शह द्यायचा हा डाव आहे.
त्या करीता आंबेडकरी नेतृत्व उभे होवु नये म्हणुन आंबेडकरी चळवळीतील नेत्यांच्या बदनामीची, खालच्या स्तरावर जावुन शिव्या घालण्याची मोहीम सुरु केली आहे.समदुखी: असणा-या लहान जाती समुहांनी आंबेडकरी नेते, पक्ष ह्यांना मते देउ नये ह्यासाठी त्यांना दलाल, भड्वे सांगितले जाते.संघाला पुरक असाच हा सर्व प्लान आहे.कांशीराम, मायावतींनी देखील उत्तर प्रदेशात सत्ता मिळविण्यासाठी तिनदा भाजपा आणि संघाचा पाठिंबा घेतला होताच.त्यामुळे आज उत्तर प्रदेशात भाजपाला अभुतपुर्व यश प्राप्त झाले आहे.बसपा आणि मायावतींच्या बॅंकखात्याचा तपशील ह्या सर्व बाबींची साक्ष देण्यास पुरेसा आहे.तोच आदर्श घेवुन बामसेफ़ कार्यरत आहे.बामसेफ़ला अपेक्षित व्यवस्था परिवर्तन हे समाजव्यवस्थेशी संबंधित नसुन सत्तेशी संबंधित आहे.म्हणुनच बामसेफ़ कधीच जातीय अन्याय, अत्याचार,आरक्षण, शिष्यवृत्ती, जातीय दंगल, अ‍ॅट्रोसिटी कायदा, एस सी एस टी बजेट  साठी एकदाही मोर्चा, आंदोलन, जनहीत याचिका दाखल करत नाही.रस्त्यावर उतरत नाही. तर ई व्ही एम मशिन साठी मात्र मोर्चे काढते. सर्वोच्च न्यायालयात जाण्याची भाषा करते पण याचिका दाखल करत नाही.
हल्ली तर सोशल मिडीयावर वामन भक्तांनी बाबासाहेबां पेक्षा वामन मेश्राम ह्यांची भिती मनुवाद्यांना असल्याचा प्रचार सुरु केला आहे.हे खरे आहे का ? तर अजिबात नाही. कारण देशात भारत मुक्ती मोर्चा, बामसेफ़ मनुवादाला आव्हान ठरल्या असत्या तर दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी व गौरी लंकेश आधी वामन मेश्राम आणि विलास खरात ठार केले गेले असते.तब्बल २५ वर्षे ब्राम्हन, हिंदु देवी देवता ह्यांना जाहीररित्या शिव्यांची लाखोली वाहणारे मेश्राम व खरात हे पहीले लक्ष्य बनले असते.संघाला पुरक असेच कार्य करत असल्यानेच त्यांना मोकळे रान आहे.आणि गेली अनेक वर्षे शिव्या घालुन ब्राम्हण किंवा मनुवादी व्यवस्थेचे एक केसही वाकडे झालेले नाही.उलट देशातील अनेक राज्यात सत्ता व देशातील राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानासहीत एकहाती सत्ता स्थापन करता आलेली आहे.त्याचे कारण म्हणजे बामसेफ़च्या मुखवट्यात दडलेल्या संघपरिवाराच्या अजेंड्याला जाते.

राजेंद्र पातोडे
अकोला.
९४२२१६०१०१

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...