अराजकीय आंबेडकरी लोकांपासून सावध व्हा
– डॉ. संदिप नंदेश्वर
कायम स्वतःला अ-राजकीय म्हणवून घेणार्या आंबेडकरवाद्यांनी या समाजाला व पर्यायाने आंबेडकरी चळवळीला रसातळाला नेले आहे व निवडणुकीच्या काळात याच अ-राजकीय समाजद्रोह्यांनी (व्यक्ती, संस्था, संघटना, मंडळे) इतर राजकीय पक्षांशी सौदेबाजी केली. काहींनी केली नसेल, तर राजकीय भूमिकेअभावी व राजकीय भूमिका न घेता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रस्थापित राजकीय पक्षांनाच (काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा, मनसे) मदत केली आहे. व समाजाची एकगठ्ठा मते विखुरल्या गेली. त्यामुळे समाज व चळवळ रसातळाला जाऊन राजकीय प्रभावशून्य बनली. अशा सर्व अ-राजकीयांना आंबेडकरी समाजद्रोही म्हटले तर तीर काळजात खूपसल्यागत रक्तबंबाळ अवस्था होणे साहजिक आहे. हे वाचून व ऐकून समाजही तडपेल. माझ्यावर टीका करेल. आम्ही समाजद्रोही कसे? अशा प्रश्नांची सरबत्ती होईल. परंतु सत्य मांडणे व लिहिणे गरजेचे आहे. असत्याला कवटाळून वाटचाल करीत राहणे मी समाजद्रोह समजतो. त्यामुळे अशा सर्वांना उत्तर देऊन येणार्या पिढीला अ-राजकीय समाजद्रोही होण्यापासून वाचविणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.
समाजद्रोही ही संकल्पना सामाजिक द्रोह व समाजविरोधी कृत्य करणारा, सामाजिक अस्थिरता या संबंधाने समकक्ष वापरली जाते. कुणाला हे अभिप्रेत नसेल, तरी मी त्या अनुषंगाने ती संकल्पना वापरतोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक लोकशाही अभिप्रेत होती. परंतु राजकीय लोकशाही संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेबांच्या अथक प्रयत्नाने संविधान सभेने स्वीकारली व या देशातील जनतेने अंगिकृत केली. त्यामुळे देशात राजकीय लोकशाही प्रस्थापित झाली. परंतु सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी राजकीय लोकशाहीचा योग्य वापर झाला, तरच सामाजिक लोकशाही प्रस्थापित होईल ही डॉ. बाबासाहेबांसोबतच संविधानकारांचीही अपेक्षा होती. पर्यायाने राजकीय लोकशाहीतूनच सामाजिक लोकशाहीचा मार्ग प्रशस्त करता येईल. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणवून घेणार्यांनीच राजकीय अभावशून्यतेने राजकीय लोकशाही स्वीकारली नाही असेच म्हणावे लागेल. त्यामुळे आंबेडकरी समाजाचा राजकीय प्रभाव 1970पासून संपुष्टात आल्यागत झाला आहे.
राजकीय लोकशाही म्हणजे काय हेसुद्धा स्पष्ट होणे गरजेचे आहे. त्याची काही मूलभूत अंगे आहे. ती पुढीलप्रमाणे –
1) प्रौढ मताधिकार (मतदानाचा अधिकार) : वयाची 18 वर्षे पूर्ण करणार्या सर्व नागरिकांना मतदानाचा संविधानिक अधिकार.
2) राजकीय पक्ष : विशिष्ट विचारधारा व विचारसरणी अंगिकृत करून समान हितसंबंध जोपासणार्या लोकांचा समूह जो न्याय हक्कासाठी स्वतःचे राजकीय प्रतिनिधित्व करू इच्छितो व एक विशिष्ट विचारधारा विचारसरणी हा त्यांच्या राजकीय वाटचालीचा व लढ्याचा स्थायिभाव असतो. सत्तेत प्रतिनिधित्व मिळविणे हा उद्देश सोबत घेऊन सत्ताधार्यांवर राजकीय दबावगट निर्माण करून राजकीय प्रभाव पाडीत असतो.
3) राजकीय नेतृत्व : विशिष्ट विचारधारा व विचारसरणीने वाटचाल करणार्या राजकीय पक्षाला राजकीय नेतृत्व लागते. जे नेतृत्व त्या पक्षाच्या विचारधारेला अनुसरून समाजाच्या न्याय व हक्कासाठी सत्ताधार्यांशी लढत असते. हे नेतृत्व तत्कालीन काळातील जिवंत व्यक्तीच करीत असतो. भूतकाळात होऊन गेलेला नेता नाही.
4) राजकीय सहभागित्व : देशातला प्रत्येक नागरिक ज्याने वयाची 18 वर्षे पूर्ण केलीत व कायदेशीर मतदार बनला आहे. अशा प्रत्येकच नागरिकांचे राजकीय सहभागीत्व. निवडणुकांच्या काळात त्यांची राजकीय सक्रियता, राजकीय भूमिका व राजकीय इच्छाशक्ती राजकीय लोकशाहीत महत्त्वपूर्ण असते.
मतदानाला जाताना त्याचे हितसंबंध जोपासणारा विचार, त्या विचारांवर चालणारा, असणारा व निर्माण झालेला पक्ष, व त्या पक्षाचे नेतृत्व करणारा नेता व त्या पक्ष नेतृत्वाने दिलेला उमेदवार हा विचार त्याच्या मनात असतो. राजकीय लोकशाहीत बिनडोक, अविवेकी, अविचारी मतदार हा कधीही धोकादायकच असतो. कारण लोकशाहीत सत्ता व सत्तेची ध्येयधोरणे व्यक्तीच्या हातात राहत नसून, पक्षाच्या हातात असतात. पर्यायाने त्या पक्षाच्या मुळाशी असणारी विचारधारा सत्ता व सत्तेच्या ध्येयधोरणाला प्रभावित करीत असतात. (उदा. 2014ला भारतात स्थापन झालेली मोदी, भाजप, संघ, हिंदुत्ववादी सत्ता)
या किमान राजकीय लोकशाहीच्या परिमाणाच्या चौकटीत आंबेडकरी विचार, आंबेडकरी संस्था, संघटना, मंडळे व आंबेडकरी समाज यांच्या राजकीय सहभागित्वाचा विचार करून आपल्याला उत्तरे मिळू शकतील. संसदीय लोकशाहीत देशातील नागरिक हा अ-राजकीय राहू शकतो का? तो अ-राजकीय भूमिका घेऊ शकतो का? याचे उत्तर आम्हाला शोधावे लागेल. अ-राजकीयत्व हे लोकशाहीला लागलेली कीड आहे. नव्हे तो लोकशाहीत केलेला द्रोह आहे. असेच म्हणावे लागेल. फार काळ समाजाला राजकीय अंधारात ठेऊन चळवळीचे ध्येय गाठता येणे शक्य नाही. अ-राजकीयत्व म्हणजे संविधानद्रोह नव्हे का ? याच्या स्पष्टीकरणातूनच पुढे आंबेडकरी अ-राजकीय समाजद्रोही समोर येतील. स्पष्टही होतील. हल्ली आंबेडकरी समाजात अ-राजकीय म्हणवून घेणे भूषणावह बनले आहे. नव्हे अ-राजकीय असणे एखाद्या पुरस्कार स्वरूप बिरूद बनले आहे. ‘आम्ही अ-राजकीय’, ‘आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही’, ‘आम्ही कुठल्याही गटाचे नाही’, आम्ही राजकीय नाही’, अमके-तमके काम राजकीय नाही; सामाजिक आहे. म्हणून तुम्ही आमच्या सोबत या, सहकार्य करा, मदत करा. हे हल्ली मोठ्या गर्वाने सांगितले जाते. इतकेच नाही, तर अशा लोकांना निष्ठावंत, सच्चे व हाडाचे आंबेडकरी समजले जाते. इतकेच नव्हे, तर समाजात अशा अ-राजकीय माणसांना राजकीय माणसांपेक्षा मान, सन्मानही जास्त मिळतो. व समाज राजकीय प्रवाहापासून दूर फेकला जातो. ज्याचा प्रत्यक्ष लाभ प्रस्थापित राजकीय पक्ष घेताना दिसून येतात. या देशातला ऊर्जावान आंबेडकरी समाज अतिशय महत्त्वाच्या राजकीय लक्ष्यापासून दूर जाणे; हेच सत्तेवर येण्याचे सूत्र इतर राजकीय पक्षांनी तयार केले आहे. हे इतर पक्ष या अ-राजकीयांना ऊर्जा (पैसा) पुरवितात. इतकेच काय, तर या स्वतःला अ-राजकीय म्हणविणार्या आंबेडकरी लोकांना सामाजिक कार्याच्या नावाखाली कार्यक्रम घ्यायला पैसाही सत्ताधारी व प्रस्थापित पक्ष पुरवित असतात. जितका अ-राजकीय आंबेडकरी व्यक्ती, संघटन, संस्था, मंडळ इ. तितका इतर राजकीय पक्षांत त्याचा भाव (किंमत = चळवळीला व समाजाला विकण्याची) जास्त. हे जणू वास्तवागत चित्र कोरलेले आहे. आमचे अनुभव तर असे की, कुठल्याच अ-राजकीय संस्था, संघटना व मंडळाचा किंवा व्यक्तीचा सो-कॉल्ड सामाजिक कार्यक्रम इतर पक्षांच्या पैशाशिवाय होतच नाही. किंवा इतर प्रस्थापित पक्षांच्या नेत्यांना आपल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून (पैसे घेऊन) बोलाविल्याशिवाय कार्यक्रमच होत नाही. इतर पक्षांकडून तो पैसा घेता यावा म्हणूनच हे सामाजिक कार्यक्रम होतात, अन्यथा एकही कार्यक्रम होताना दिसला नसता. बरं, याची परतफेड काय, तर निवडणूक आली की, ‘‘भाऊ, दादा, साहेब आमची मतं तुम्हालाच’’. मत देतात की, देत नाही? हा भाग वेगळाच. कारण पैसा सगळ्यांकडून घ्यायचा असतो.
दुसरे असे की, या सर्व अ-राजकीय माणसांची, संस्था, संघटना, मंडळांची आर्थिक परिस्थिती जेमतेमच. पण समाजकार्याचा आव इतका की, यांनी यांची अख्खी संपत्तीच समाजाच्या उत्थानासाठी घालविली. वास्तवात काय, तर साध्या बाजूच्या माणसाचे रेशनकार्ड पण कधी काढून दिलेले नसेल व नाही कधी एखाद्या सरकारी दप्तरामध्ये जाऊन त्याला न्याय मिळवून दिला असेल. समाज तर दूरच राहिला. पण हेच सारे अ-राजकीय लोक प्रबोधनाच्या नावाने बोंबा ठोकून आंबेडकरी राजकीय नेत्यांवर व आंबेडकरी पक्षांवर आगपाखड करतील. नेतृत्वाविषयी व आंबेडकरी पक्षांविषयी तिरस्कार व द्वेष निर्माण करण्यात ही सर्व अ-राजकीय मंडळी पटाईत असतात. आम्हीच तेवढी आंबेडकरी चळवळ (मुळातली वळवळ) चालवतो. आमच्यामुळेच आंबेडकरी चळवळ टिकून आहे. राजकारण्यांनी घात केला. गटातटात विभागले. हा पक्ष असा, तो पक्ष तसा, हा नेता असा, तो नेता तसा. हे यांचे नेहमीचे प्रवचन. मात्र समाजावर किंवा समाजातल्या एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला, तर यांना भाजला पापडही मोडता येत नाही. तेव्हा मात्र राजकीय नेत्यांची आठवण येते. कारण प्रशासनावर व सत्तेवर या अ-राजकीयांचा प्रभाव शून्य. जेमतेम आर्थिक परिस्थिती असणारे हे तमाम अ-राजकीय अल्पावधीतच अ-राजकीय समाजसेवेतून मालदार कसे होतात? याची उदाहरणे तुमच्या आजूबाजूलाच सापडतील. मग समाजाला राजकीय प्रभावशून्य बनविणार्या या अशा बेगडी अ-राजकीय आंबेडकरवाद्यांना समाजद्रोही नाही, तर काय म्हणायचे ?
या अ-राजकीय माणसांना आम्ही कधी विचारले आहे का? की त्याने निवडणुकांमध्ये कुणाला मदत केली? कुणाला मतदान केले? कुठली भूमिका वठविली? कुठल्या पक्षाचा प्रचार केला? किमान हे अ-राजकीय माणसे स्वतः चालवित असलेल्या संघटनांच्या सदस्यांना कुठल्या पक्षाला मतदान करायला लावले ? त्यांनी स्वतः हा कोणत्या पक्षाला मतदान केले? ज्या पक्षाला मतदान केले तो पक्ष आंबेडकरी विचारांचा होता का? तो पक्ष आंबेडकरी होता का? याचे उत्तर शंभर टक्के नकारार्थी येतील. मग हे अ-राजकीय माणसे कसले आंबेडकरवादी आहेत असे म्हणता येईल का? शत्रूपक्षांना देशाच्या सत्तेवर येण्यास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारे हे आंबेडकरी असू शकतात का? हे कसले आंबेडकरी? हे तर समाजात अराजकता माजविणारे अ-राजकीय आंबेडकरी समाजद्रोहीच. या अ-राजकीय आतंकवाद्यांपासून आंबेडकरी चळवळीने सावध होणे गरजेचे नव्हे काळाची गरज आहे.
आज आंबेडकरी चळवळ व्यापक होत चालली आहे. देशातल्या सत्ताधारी विचारसरणीने जी परिस्थिती देशांतर्गत निर्माण केली त्या परिस्थितीला तोंड देत असताना भारतातील लोकशाही व या लोकशाहीने सर्व नागरिकांना दिलेली संविधानिक सुरक्षितता कायम ठेवण्यासाठी देशातला तरुण वर्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना पर्याय म्हणून पाहतो आहे. कन्हैय्या असो की, मार्क्सवादी विद्यार्थी संघटना आपल्या भूतकाळातील अपयशाचे शल्य झुगारून आंबेडकरी विचारांना हाताशी घेऊन सत्ताधारी विचारसरणीच्या (हिंदुत्ववादी) विरुद्ध रस्त्यावर येऊन लढतो आहे. सह्रदयाने त्यांचे स्वागत आंबेडकरी चळवळीने करणे अपेक्षित आहे. मीडिया ट्रायल, आताच का पुळका इ. प्रश्नार्थक विसरून विचार करावा लागेल. या आंबेडकरी लढ्याचे व चळवळीचे नेतृत्व शिफ्ट होतेय का? की नाही? ही भिती न बाळगता.
(क्रमशः)
(लेखक-मुंबई उच्च नागपूर खंडपीठात वकील आहेत.)

No comments:
Post a Comment