Monday, 24 December 2018

समान नागरी कायदा , बौद्ध विवाह कायदा आणि आंबेडकरी चळवळ

समान नागरी कायदा , बौद्ध विवाह कायदा आणि आंबेडकरी चळवळ
- सुमित वासनिक
समान नागरी कायदा लग्न, घटस्फोट, पोटगी, वारसा हक्क, दत्तक विधान या मोजक्या विषयांवरील कायद्यांसाठीच आहे. पण आरएसएस ने समान नागरी कायदा हा प्रत्येक क्षेत्रात लागू असणारा कायदा आहे असा अपप्रचार केला आहे. विशेषतः या कायद्यामुळे आरक्षण संपुष्टात येईल असा संघाचा प्रचार आहे. या कायद्यामुळे आरक्षण संपेल अशी भीती आरक्षण समर्थकांना दाखवल्यामुळे ते या कायद्याला विरोध करतील , ही संघाची रणनीती आहे. संघाचा हा खोडसाळ प्रचार देशात समान नागरी कायदा लागू होऊ नये यासाठीच आहे. समान नागरी कायदा धार्मिक कायद्यांचि जागा घेणारा कायदा आहे. हा कायदा संघाच्या हिंदू राष्ट्राच्या नावाने सवर्णांचे हित जपणारे वैदिक राज्य निर्माण करण्यातील मोठा अडसर आहे, कारण या कायद्याने देशातील स्त्रियांना मुक्ती मिळेल. स्त्री गुलाम असल्याशिवाय हिन्दु राष्ट्र निर्माण होणार नाही. म्हणूनच हा कायदा होऊ नये अशी संघाची इच्छा आहे. याच कारणाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या हिंदू कोड बिलास संघाने कडाडून विरोध केला होता. समान नागरी कायदा अस्तित्वात यावा ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचीही इच्छा होती. या कायद्याच्या समर्थनात ते संविधान सभेतही बोलले होते. ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांचीही हीच इच्छा आहे. सत्तेत असूनही भाजप समान नागरी कायदा लागू का करीत नाही ? हा प्रश्न विचारून त्यांनी या विषयावरील संघाची दुटप्पी भूमिका सर्वांसमोर आणलि आहे. संघ समान नागरी कायदा होऊ नये यासाठी इतर सर्व धर्मांचे वेगवेगळे कायदे तयार करण्याच्या कामाला लागला आहे. शीख समाजाचे कायदे पास करण्यात आले आहेत. आता बौद्ध विवाह कायदा बनविण्याचे कारस्थान संघाने रचले आहे. जेवढ्या जास्त धर्मांचे स्वतःचे कायदा अस्तित्वात येतील तेवढा समान नागरी कायद्याला विरोध होईल हे बौध्द विवाह कायदा तयार करण्यामागील षडयंत्र आहे. ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी संघाची ही चाल ओळखूनच बौद्ध विवाह कायद्याला कडाडून विरोध केला आहे.  हिंदू विवाह कायदा मान्य नाही त्यांना स्पेशल मॅरेज ऍक्ट ने लग्न नोंदविण्याचा उपाय असतांना बौद्ध विवाह कायद्याची आणि इतर धर्मांचे वेगळे कायदे बनविण्याची गरज काय? असा सवाल ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. 
समान नागरी कायदा तयार करण्यासाठी मुस्लिमांचाही  विरोध आहे यावरही ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी उपाय सुचविलेला आहे.  मुस्लिमांमधील मौलवींशी चर्चा करून मुस्लिमांनाही अडचण होणार नाही अश्याप्रकारचा मध्यम मार्ग काढायचा प्रयत्न करावा आणि जोपर्यंत यावर एकमत होत नाही तोपर्यंत मुस्लिम सोडून जे धर्म समान नागरी कायद्यास तयार आहे त्यांच्यासाठी समान नागरी कायदा बनवून अमलात आणावा असे ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांचे म्हणने आहे. पण भाजप सरकार यापैकी काहीही करत नाही आहे, ते फक्त समान नागरी कायद्याच्या आडून देशात आरक्षण मिळत असलेल्या वर्गाविरोधात आणि मुस्लिमांच्या विरोधात देशात वातावरण तयार करायचा प्रयत्न करीत आहेत.
समान नागरी कायदा आणि बौद्ध विवाह कायदा याविषयी ऍड.बाळासाहेब आंबेडकर हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावरच चालत आहेत. पण बिएसपि आणि बामसेफ या संघटना समान नागरी कायदा आणि बौद्ध विवाह कायदा या विषयांवरून ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात अपप्रचार करीत आहेत. ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांना रोखण्याच्या प्रयत्नात हे लोक बाबासाहेबांच्या विचारांना आणि कार्याला विरोध करायला लागले आहेत. मागे राष्ट्रवादी काँग्रेसने सोशल मीडियावरून  बाळासाहेबांना विरोध केला तेंव्हा आंबेडकरी समाजाने राष्ट्रवादीला चांगलाच धडा शिकवला होता. त्यामुळे सावध झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने बिएसपि , बामसेफला पुढे करून बाळासाहेबांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. शरद पवार प्रायोजित अपप्रचाराच्या या मोहिमेत बिएसपि आणि बामसेफ या संघटनांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनाच विरोध करणे सुरू केले आहे. ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांना विरोध केला की प्रसिद्धी मिळते हे एक दुसरे कारणही आहेच बाळासाहेबांना विरोध करण्याचे. या संघटनांचा ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रति असलेला द्वेष सर्वांनाच माहिती आहे. पण आंबेडकरी जनता खंबीर पणे ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहे त्यामुळे बीएसपी,बामसेफच्या या अपप्रचारा त्यांना काहीही फायदा होणार नाही, उलट आंबेडकरी जनता यांना घरभेदी म्हणूनच ओळखेल. 
भारिपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी प्रायोजित बिएसपि आणि बामसेफच्या अपप्रचारावर लक्ष देऊ नये भारिपला या संघटनांचा विरोध करण्यात गुंतवून आपल्यासाठी मोकळे रान मिळविणे हा राष्ट्रवादी कॉग्रेसचा कट आहे. या संघटनांकडे दुर्लक्ष करा , आपले लक्ष वंचितांना प्रतिनिधित्व , सत्ता मिळवून देणे हे आहे आपण त्यावरच लक्ष केंद्रित केले पाहिजे हे लक्षात ठेवा.
जयभीम,
सुमित वासनिक...

No comments:

Post a Comment

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...