भीमजयंतीचे स्वरुप - महामानवाचा सन्मान की ..........?
( आत्मचिंतन)
- मनोज नागोराव काळे.
मित्रांनो, सदर लेखाचे शीर्षक कदाचित तुम्हाला खटकण्याची शक्यता आहे, पन वास्तवाचे भान व डॉ बाबासाहेब यांच्या विचारांप्रती तुम्ही प्रामाणिक राहुन थोडासा विचार केलात तर तुम्ही या शीर्षकास व या पारंपारिक चालत आलेल्या जयंती स्वरुपावरील लेखास दुजोरा द्याल यात मला शंका वाटत नाही.
वरवर पाहिले तर भारतभरात किंवा आपल्या महाराष्ट्रात भीमजयंती म्हणजे मोठा उत्सव, भीमजयंती म्हणजे आमचा एकमेव सण, भीमजयंती म्हणजे आमचा बाप येतोय, भीम जयंंती म्हणजे फक्त जल्लोष अशा प्रकारचे एक स्वरुप दिसते, प्रत्येकजन या दिवसाची वर्षभर वाट पहाताना दिसतो.
आणि सर्वांच्या प्रतिक्षा संपवत १४ एप्रिल चा दिवस येतो व सर्वांचा जल्लोष एकदाचा घडुन येतो, महाराष्ट्रात तर भीम जयंती पासुन बुद्ध जयंती या दरम्यान साधारन एक महिनाभर हा कार्यक्रम वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो, मी मराठवाड्याचा असल्यामुळे मी या सर्व जयंत्या स्वतः पाहिल्या आहेत व ते उघड्या डोळ्यांनी पाहुन, बाबासाहेबांचे लिखान वाचल्यानंतर मला एक गोष्ट ध्यानात आली आहे की भीम जयंती दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचा गौरव होत नसुन त्या दिवशीच या महामानवाची त्यांच्याच भक्तांकडुन जाहिररित्या वाजत गाजत विटंबना केली जाते. हे सत्य मला नाईलाजाने मांडावे लागत आहे.
भिमजयंती ला आता आलेले स्वरुप म्हणजे एखाद्या संत माणसाने आयुष्यभर दारुबंदी साठी झटावे व नंतर त्यांच्याच भक्तांनी त्या संताच्या नावाने मोठे दारुचे दुकान लावण्यासारखेच आहे किंवा एखाद्या महापुरुषाने जीवनभर अहिंसा तत्वासाठी खर्ची घातले असतील त्याच महापुरुषाच्या नावाने कत्तलखाना सुरु करुन आम्ही त्या महापुरुषाचे अनुयायी आहोत व आम्ही त्या महापुरुषाचा हे दारु दुकान किंवा कत्तलखाना त्यांच्या नावाने सुरु करुन त्यांचा गौरव करत आहोत असे बोलण्यासारखेच आहे.
विषय खुप गंभीर आहे, विषय अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे त्यावर प्रत्येकाने वैयक्तिक आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
हे सत्य मांडुन आपल्यातीलच काही अज्ञानी किंवा अति बुद्धीजीवींच्या रोषाला मला सामोरे जावे लागेल याची कल्पना असुनही मी हे सत्य मांडायचे ठरवले आहे याला कारणही तसेच आहे, क्रांतीबा ज्योतीबा फुलेंनी लिहीलेला शेतकर्यांचा आसुड वाचत असताना जानवत होते की ब्राह्मनांनी हिंदु समाजाला लुबाडण्यासाठी अनेक सण, कर्मकांड व व्रत वैकल्यांना जन्म दिला आहे, त्यांना संस्कृतीचे नाव देऊन ब्राह्मन लोक बहुजनांनी स्वकष्टाने कमावलेला घामाचा पैसा अलगदपने त्यांच्यापासुन काढुन घेत असतो, हि संस्कृतीच्या नावाने बहुजनांची होणारी आर्थिक लुट आपन हिंदु धर्म सोडुन बौद्ध धम्म स्विकारल्या नंतर कमी होत गेली, तेव्हा भटांनी त्यांचा रोजगार हमी योजनेचा कार्यक्रम असलेला सत्यनारायण घरा घरात पोचवुन त्याच्या आडुन पैसे लाटायचा धंदा वाढवला पन तरीही काही बौद्ध व आंबेडकरी समाज सत्यनारायणाला स्विकारयला तयार नव्हता. त्यानंतर हळुहळु भीमजयंतीलाच वाढती लोकप्रियता पाहुन भांडवलदारांनी या दिवसाला मार्केट बनवले.
काही लोक भीमजयंतीचे आजचे आलेले विकृत स्वरुप पाहुन त्या कार्यक्रमाला "निळ्या कोटातला गणपती" म्हणतात, त्यात मलाही थोडा विचार केल्यास तथ्य आढळले. मागच्या विस वर्षात भिमजयंती व सार्वजनिक गणेशोत्सव यात फक्त मुर्तीचाच फरक उरला आहे, ते लोक गुलाल उधळतात तर आपन निळ उधळतो, ते लोक धांगडधिंगाना करुन विचित्र नाचतात तेच आपन डिजे भिमगितांवर करताना दिसत आहे, ते लोक गल्ली गल्लीतुन मिरवणुका काढुन चढाओढ करतात तसीच चढाओढ व मिरवणुकात स्पर्धा आपल्यातही असते. ते लोक जशी दादागीरी करुन वर्गनी गोळा करतात तसेच काही अपवादात्मक का असेना घडताना दिसतेच, ते लोक ऑर्केष्ट्रा ठेवतात, पत्ते खेळतात तर आपलेही लोक ऑर्केष्ट्रा ठेवतात, व त्याच भिम विचारांची विटंबना करणारे गाणे लावुन बिनधास्त नाचतात, भिम के लक्ते जीगर आधे इधर आधे उधर या गाण्याचे डिजे स्वरुपात लावुन नाचताना मी पाहीले आहे, जे गीत समाजाच कशी दुफळ्या पडल्यात हे सांगते त्याची लाज वाटायची सोडुन बुद्धीजीवी नाचताना दिसतात,
एक नविनच गीत आहे उडतो धुरुळा, ज्याचे प्रत्येक कडवे बाबासाहेबांच्या उच्च विचारांची विटंबना करणारे आहे ते गाणे लावुन बिनधास्त नाच केला जातो,
भिमगीत कशाला म्हणावे हे सुद्धा आजकालच्या गायक मंडळींना भान राहीले नाही, व ते लावुन नाचणारांना शुद्ध नाही.
निळा झेंडा हा बहुजन अस्मिता व विशालतेचे प्रतिक होता तो आता फक्त धुरुळा उडवायच्या कामाचा राहीलाय का?
या गीतामध्ये मांडले आहे की आमच्या नादी लागनारांचे डोळे काढु, हात लुळा करु अशी भाषा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संपुर्ण जीवनात कधीतरी केली होती का?
बाबासाहेबांच्या नावावर बाबासाहेबांच्या विचारांची मोडतोड करणार्या गीतांना आपन भीमगीत का बोलतो? हे आणि असे अनेक गीते आता बाजारात आलेत जी बाबासाहेबांच्या पुर्ण जीवन संघर्षाचा अपमान करणारी आहेत. मी एक उदाहरना पुरते दिले आहे बाकी आपन सुज्ञ आहात, यापुढे गीतांचा अर्थ समजुन घ्याल अशी अपेक्षा करतो.
हिंदु लोक गणेश मुर्तीचे विसर्जन करतात पन आपन मात्र बाबासाहेबांच्या विचारांची विटंबना करतो हाच तो काय या दोन उत्सवात फरक दिसतो.

बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला त्याच्या फोटो किंवा मुर्तीसमोर दारु पिऊन बिभत्स नाचनारेही कमी नसतात, ही बाबासाहेबांची विटंबना नव्हे का?
ज्या महामानवाने एकीचे महत्व सांगताना जीवन खर्चले त्यांच्या जन्मदिनी आपापल्या गल्ली मोहल्ल्याच्या वेगवेगळ्या मिरवणुका काढुन, त्याची स्पर्धा करणे ही महामानवाच्या विचारांची विटंबना नव्हे का?

बाबासाहेब सुद्धा तथागत बुद्ध, क्रांतीबा फुले व कबीरांना आपल्या गुरुस्थानी मानत होते, पन त्यांनी या तीन महामानवांची जयंती अशा रितीने कधी साजरी केली असे आपनास दिसले का? कि आपन बाबासाहेबांना मानतो त्यापेक्षा बाबासाहेब त्या गुरुंना कमी प्रमानात मानत होते का?
बाबासाहेबांचे जीवन हाच आपल्यासाठी संदेश आहे असे आपन बोलतो मग आपन बाबासाहेबांच्या जन्मदिवशीच त्यांच्या विचारांना सर्वाधिक पायदळी का तुडवतो?
बाबासाहेबांनी त्यांचे आदर्श असलेल्या महामानवांना कशा स्वरुपात स्विकारले हे आपन का समजु शकत नाही?
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कबीरांच्या, फुलेंच्या, तथागत बुद्धांच्या विचांराना स्थापित करने महत्वाचे वाटले की त्यांच्या मुर्ती बसवने , स्मारके बांधने व जयंत्या करने जास्त मोलाचे वाटले?
बाबासाहेब पुतळावादी असते पुस्तकवादी नसते तर आपला उद्धार झाला असता का? मग आपन का पुतळा, स्मारक यात अडकुन पुस्तकांपासुन, विचारांपासुन दुर झालोय?
आपन मार्ग भटकलोय, आपन ध्येयापासुन विरुद्ध दिशेने जातोय, आपन चळवळीच्या नावावर चळवळीचाच घात करतोय हे आपल्या लक्षात आलेले नाही पन हे चळवळीच्या शत्रुंना मात्र स्पष्टपने समजले आहे त्यामुळे तुम्हाला भाजपा, कॉंग्रेस, सेना, राष्ट्रवादी किंवा इतर मनुवादी राजकीय पक्षांचे पुढारी जयंती च्या वेळी भरघोस मदत करतात, हवी ती मदत पुरवतात कारण आपन जितके गाफिल राहु, आपन जितके ध्येया च्या विरुद्ध दिशेने चालु तितके त्यांच्या हिताचे रहाणार आहे, हे आपल्या लक्षातही येत नाही,
एखाद्या जयंती मंडळाने जर पुस्तकवादी, विचारांची देवानघेवान करणारी, चळवळीला योग्य मार्गावर नेणारी जयंती करायचे ठरवले तर पहा किती बौद्धेतर लोक त्याला मदत करतील.
जागृतीचा विस्तव तेवत ठेवा असे बाबासाहेबांनी सांगीतले होते पन असा जागृती करणारांना हे चाणाक्ष जातीवादि एकटे पाडतात व चंगळवादी चळवळ्या वळवळ्यांना भरघोस मदत करुन चळवळीला दिशाहीन कसे ठेवता येईल याचा प्रयत्न करतात.त्यामुळे भीमजयंती ला आलेले जत्रेचे स्वरुपच चळवळीला कमकुवत करण्यासाठी भीमद्रोही लोकांना सोयिस्कर व सोपा मार्ग सापडलेला दिसतो आहे.

भीमजयंती हे एक खुप मोठे मार्केट झाले आहे, झेंडे, निळ, पताका, फटाके व आतिषबाजी, इलेक्ट्रिक रोषनाई, डिजे, बैन्जो किंवा बैंड, आकाश कंदिले या गोष्टींची कोट्यावधींची उलाढाल होते व हा सर्व धंदा करणारे भांडवलदार हे उच्चवर्णिय, मारवाडी गुजरातीच प्रामुख्याने आढळतील.
ज्या आर्थिक लुटी पासुन आपले रक्षण व्हावे या हेतुने आपले कर्मकांड, जत्रा, देव देव , हिंदु धर्म यापासुन बाबासाहेबांनी आपणास सोडवले आपन बाबासाहेबांच्याच नावाने तो धांगडधिंगा पुन्हा आनला आहे व त्याला समाजमान्यताही मिळत आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांसमोर वेडेवाकडे नाचताना आपणास शरमही कशी वाटत नाही? त्यांनी एकट्याच्या बुद्धीच्या, नितीमत्ता व शीलाच्या जोरावर हजारो वर्षाचा इतिहास फक्त ३६ वर्षात बदलला आहे पन आपन लाखो लोख शिकुनही चळवळीला तसुभरही पुढे नेऊ शकलेलो नाहीत मग आपनास बाबासाहेबा समोर त्यांच्या जन्मदिनीच नाचने शोभते का?
बाबासाहेबांच्या जयंतीत लाखो रुपयांचा चुराडा करुन आपन बाबासाहेबांच्या विचारांचा अपमान करतोय याचे भान कधी येणार आहे की नाही?

एक दिवस नाचनार बाकी दिवस वाचनार असे बोलणा-यांनी मागील ३६४ दिवसात काय वाचले आहे व त्या वाचनाचा समाजाच्या प्रगतीसाठी कसा उपयोग करणार?
बाबासाहेबांनी जर त्यांच्या आदर्शांची जयंती साजरी करताना फक्त त्या महापुरुषांच्या विचारांना आचरणात आणणारी पिढी निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले होते मग आपन बाबासाहेबांना गणपती सारखे स्वरुप देऊन काय साध्य करत आहोत याचे चिंतन व्हायला हवे.
बाबासाहेबांच्या जयंतीला आपन आजवर काय केले व येत्या वर्षभरात काय करायला हवे यावर विचारमंथन होण्याची प्रथा आपल्याकडे असती तर गेल्या साठ वर्षात आपन साठ वेळा आपन आपले स्वताचे मुल्यमापन केले असते व साठ वेळा एक एक वर्षाचे ध्येय धोरने आखुन बराच मार्गक्रमन केले असते, पण माझा जन्म १९८४ ला झाला तेव्हा पासुन आतापर्यंत भीमजयंती म्हणजे काय असते हे दरवर्षी पाहुन आज मला खरच स्वतःची शरम वाटते,
कि आपल्याला ज्ञानसुर्याने जन्म दिला पन आपन त्या सुर्यालाच बैटरी लावुन चमकण्याचा प्रयत्न करत राहीलो जो स्वतःच तेजोमय व स्वयंप्रकाशीत आहे, त्या सुर्यप्रकाशाने आपन आपले काही चांगले करुन घेण्यास असमर्थ ठरलोय.
सत्तर वर्ष झाले स्मारक, पुतळा, चोकाला नाव, समाज मंदिर याच विवंचनेत आपन दिसतोय, मनुवादी विचारांचे, घरानेशाहीचे राजकारन करणारे असाच एक मुद्दा आपल्या तोंडावर मारुन आपल्यावर बिनदिक्कतपने राज्य करत आलेत,
आपन महामानवाला आपला बाप मानतो तर मग आपन महामनवाच्या विचारांशीच इमान राखले पाहीजे, महामानवा समोर नाचने कुणालाही अशोभनियच आहे, गल्ली ते दिल्ली पर्यंत आरएसएस ने सत्ता हस्तगत केली आहे, जम्मु कश्मिर व आसाम हे दोन राज्य या हिटलरवाद्यांनी गिळंकृत केली आहेत, आता दिल्ली ला आर्धे गिळले आहे, एकदाच पुर्ण भारत गिळने यांना परवडनारे नाही म्हणुन एक एक राज्य ते हस्तगत करत आहेत, संविधान कुठेही लागु नाही, फक्त ते जिवंत असल्याचा भास जागा ठेवला गेलाय, लोकशाहीचे चारही खांब त्यांची बटिक बनले आहे अशा परिस्थितीत कोणत्या तोंडाने बाबासाहेबांच्या फोटोसमोर नाचणार आहात?

आपन लाखो रुपयांची उधळन करुन त्या महामानवाच्या त्याग बलिदानाची थट्टा करतोय, कारण आपन आजही राजकीय वाटा, बेरोजगारी, दारिद्र्य, गरीबी, जातीभेद या समस्यांना सोडवु शकलेलो नाही,दररोज एका बहिनीवर बलात्कार होतोय, रोज एकाची धिंड निघते, आपन कोणत्या गोष्टिचा जल्लोष करतोय? आपली संवेदनशीलता आपल्या जोश व जल्लोषा समोर थिटी पडतेय का?
कि डॉ बाबासाहेब आंबेडतर यांची व्यापक अर्थाची चळवळ काय आहे हे आपणास समजलेले नाही?

मी कोणावर वैयक्तिक टिका करत नाही, मी जे वास्तव स्वतः पाहिले आहे ते शब्दशः मांडतोय, तुम्ही सुद्धा यापेक्षा वेगळा काही अनुभव घेतला असेल असे मला वाटत नाही,
आता आपन गाफिल रहायची वेळ नक्कीच नाही उरली, आता हुकुमशहाने त्याची मुठ घट्ट आवळली आहे, मागील सहा वर्षात विद्यार्थी, महाविद्यालये यावर होणारे हल्ले आपन पहातोच आहोत त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांना वाढवने हे मोलाचे आहे, आपन श्रीमंत आहोत अशा अविर्भावात आपन बाबासाहेबांच्या गरीबी व त्यागाचा अपमान होईल असे वागने टाळायला हवे, बाबासाहेबांची जाती अंताची चळवळ लोकशाही मार्गाने चालवावी लागेल, त्यासाठी लोकशाही टिकवावी लागेेल. तुम्ही तुमच्या जन्मभरात कोणत्या वर्षी वैचारिक जयंती साजरी केली आहे का? याचा स्वतःच विचार केलेला बरा राहिल.

आपला उद्धार हा बाबासाहेबांच्या पुतळा स्मारकाने केलेला नसुन बाबासाहेबांच्या उच्च व सच्च्या विचारांनी केला आहे त्यामुळे विचार जपने आपले कर्तव्य आहे, या भारतात मनुचा फक्त एकच पुतळा आहे पन केंद्रात बहुमताने सत्तेवर बसलेले कट्टर मनुवादी संघ भाजपवाले मनु, गोळवळकर, हेगडेवार यांचे कुठेच पुतळे उभारताना आपनास दिसनार नाहीत तर ते लोक गोळवळकर व मनुचा विचार मानसा मानसात रुजवण्यासाठी दिवसाात्र एक करुन झटताना दिसतील व ते त्यामुळे यशस्वी होतात. एकही ऑक्रेष्ट्रा, कव्वाली, सामना न करता मनुवाद पेरण्यात त्यांना यश कसे काय मिळाले याचे चिंतन होमे आवश्यक आहे.
आपन बाबासाहेबांचे फक्त गुनगान करतो, बाबासाहेबांच्या कार्य, त्यागाची आठवन करतो व जयंती चा दिवस आमच्या मुक्तीदात्याने आम्हाला गुलामीतुन सोडवले असे म्हणुन साजरा करतो पन आपली आताची कृती ही पुन्हा गुलामीकडे नेनारी आहे, आपल्या कृतीतुन महामानवाला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणुन करत असलो तरी तिचे स्वरुप महामानवाच्या पुर्ण जीवनाचा घोर अपमान करणारी आहे याचे भान मात्र आपनास नसते,
खुप लिहीले, क्षमा करावी, पन मनु आपल्या छाताडावर बसुन थयथयाट करत असताना जर आपन बाबासाहेबांना शुद्ध वैचारिक स्वरुपात स्विकारले नाही तर मात्र आपल्यासारखे करंटे आपनच.....
भीमजयंती ला निळ्या कोटातला गणपती करायचा कि "बोधिसत्व बाबासाहेब" करायचे सर्वस्वी तुम्हा बुद्धीजिवींवर सोपवतो.
( आपन किती अंतर चाललो यापेक्षा आपन कोणत्या दिशेने चाललो याला महत्व असते)

टिप - हा लेख देशात लॉकडाऊन लागण्यापुर्वी परंपरागत होत असलेल्या जयंती सोहळ्याच्या स्वरुपाबद्दल आत्मचिंतन म्हणुन लिहीला होता.
जगभरात कोरोना व्हायरस ने दहशतीचे वातावरन तयार केले आहे, भारतात फिजीकल डिस्टंसिंग लागु केले आहे त्यामुळे यावर्षी जयंती तसेही आपनास सार्वजनिक रित्या साजरी करायची नाही, असे अवाहन देशातील एकमेव जागृत नेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी केले आहे, त्यांचे मी मनःपुर्वक आभार, मानतो, बाळासाहेबांनी आवाहन केल्यामुळे या वर्षी भिमजयंती सर्वांनी आपापल्या घरातच साजरी करायची आहे व ते कसे केले याचे फोटो व विडीयो सोशल मिडीयावरुन प्रसारित करायचे आहेत, लॉकडाऊन परिस्थितीमुळे "प्रबुद्ध भारत" चैनलच्या माध्यमातुन बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जगातली पहिली ऑनलाईन डिजीटल जयंती करण्याचा उपक्रम सुद्धा केला आहे, आपल्यापर्यंत आपल्या आवडीचे वक्ते, गायक, कवी, कार्यकर्ते यांचे विचार घरपोच मिळतील हा सुद्धा एक नवा विक्रम आपन करत आहोतच.
१३ तारखेला रात्री कदाचित लॉकडाऊन उठवले गेले तरी कुनीही १४ तारखेला एकत्र जमायचे नाही कारन या व्हायरसला तुमची निष्ठा, तुमची चळवळ, तुमचा जोश हे काहीही कळत नाही हा व्हायरस जिवघेना आहे त्यामुळे हा व्हायरस संपला आहे असे WHO जोपर्यंत जाहिर करत नाही तोवर आपन आपल्या लोकांची, आपल्या परिवाराची काळजी घ्यायची आहे. आपल्यातील जे लोक बाबासाहेबांचे अनुयायी नसतील ,ज्यांना समाजाला धोक्यात घालावे वाटत असेल तेच निर्बुद्ध लोक बाहेर पडतील व पोलिस कारवाईला बळी पडतील, सुज्ञानी लोकांनी हि जयंती आपल्या परिवारा सोबत साजरी करायची आहे अशी हात जोडुन विनंती करतो.
- मनोज नागोराव काळे, 8169291009

____________________________________