RSS ला "वेसण "घालणारा एकमेव नेता...!
- भास्कर भोजने
आरएसएस ही ब्राम्हण्यग्रस्त मानसिकतेच्या टोळक्यांची विकृत टोळी आहे...!
रा.स्व.संघाच्या वरीष्ठ नेतृत्वात केवळ ब्राम्हणचं असतात हा काही योगायोग नाही...!
ब्राम्हण समुहाने आपला छुपा अजेंडा राबविण्यासाठी निर्माण केलेले हे संघटन आहे...!
ब्राम्हण हे संख्येने अल्प असल्यामुळे हिंदू धर्मातील अल्पज्ञानी,धर्मभोळ्या समुहाला धर्माच्या आडुन भरीस पाडतं धर्माचं ढोंग उभं करुन ब्राम्हण्यग्रस्त समुह ऊभा करतात आणि आपले इशिप्त साध्य करतात....!
संघ नेहमी विद्वेषाचे कार्य करीत आला आहे...!
संघ भारतीय लोकशाही, संविधान आणि राष्ट्र ध्वज तिरंगा तथा राष्ट्रीय सण म्हणून स्वातंत्र्य दिवस आणि प्रजासत्ताक दिवस मानतं नाही...!
स्वातंत्र्य लढ्याचे प्रतिक असलेल्या म.गांधीचा खुन याचं मानसिकतेतून केल्या गेला आहे...!
म. गांधी हे ओबीसी हिंदू नेतृत्व होते म्हणून ते संघाला मान्य नव्हते...!
म.गांधीच्या खुनामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांनी संघावर बंदी घातली होती...!
त्यावेळी संघाला राष्ट्र विरोधी (Anti National) ठरवून संघांवर बंदी घालण्यात आली होती...!
१९४९ मध्ये सरकारच्या उदात्त हेतूने जेव्हा आरएसएसवरील बंदी उठविण्यात आली तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल आणि संघामध्ये जो करार झाला त्या करारामध्ये एक अट अशी होती की,संघाने आपल्या कार्यालयावर १५आॅगस्ट आणि २६जानेवारीला तिरंगा ध्वज फडकवला पाहिजे...!
२६जानेवारी १९५० ला संघाने आपल्या कार्यालयावर तिरंगा फडकवला परंतु नंतर सतत ५०वर्षे देशाशी आणि त्या कराराशी द्रोह केला, आपल्या कार्यालयावर तिरंगा ध्वज फडकवला नाही आणि स्वातंत्र दिवस साजरा केला नाही...!
सन २००० ला अॅड बाळासाहेब आंबेडकरांनी संसदेत प्रश्न उपस्थित केला की, संघाच्या कार्यालयावर तिरंगा ध्वज का फडकविला जातं नाही..?
तेव्हा देशात अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार होते,संघ आपल्या कार्यालयावर तिरंगा ध्वज फडकावित नाही म्हणून भारिप बहुजन महासंघाने आंदोलन केले...!मुंबई येथील संघाच्या कार्यालयावर मा.राजा ढाले यांच्या नेतृत्वाखाली १५आॅगस्ट २०००ला तिरंगा ध्वज फडकावित स्वातंत्र दिवस साजरा केला.तर नागपूर येथील संघाच्या मुख्यालयावर मा.रणजित मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली १५आॅगस्ट २०००ला संघाच्या मुख्यालयावर तिरंगा ध्वज फडकावित स्वातंत्र दिवस साजरा केला...!
पन्नास वर्षांपासून सत्ताधारी काँग्रेस किंवा प्रशासनाला न जुमानणा-या संघाला अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रिय ध्वज तिरंगा आणि स्वातंत्र दिवस मान्य करायला भाग पाडले...!
काल नागपूर येथे वंचित बहूजन आघाडीचे चौथे अधिवेशन पार पडले त्या अधिवेशनात अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी संघाच्या मोहन भागवत यांना जेलात डांबण्यात येईल अशी भुमिका मांडली तेव्हा जनतेने लक्षात घ्यावे की,ही पहिलीच वेळ नाही यापुर्वीही अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी संघाला नमविले आहे...!
नरेंद्र मोदी यांचे केंद्रात सरकार आले तेव्हा पासून संघाला जास्त चेव चढला आहे...!
अल्पसंख्याक मुस्लिम, दलित यांना सतत भयग्रस्त ठेवण्याची निती अवलंबून आरएसएस आपले डावपेच आखतं आहे...!
एकीकडे हिंदू अशी बतावणी करीत आहे मात्र नेमकेपणाने ओबीसी चे आरक्षण संपवित आहे.
शेतकरी विरोधी धोरणे राबवून देशाच्या पोशिंद्यालाचं उध्दवस्त करीत आहेत...!
या संघाचे छुपे अस्त्र बोथट करण्याची हिम्मत आणि नैतिक ताकद केवळ अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या ठायी आहे...!
संघाच्या दारात जाऊन त्यांना अंगावर घेण्याची कुणाचीही हिम्मत नाही, हे आजवरच्या वाटचालीत सिद्ध झाले आहे...!
संघाला आणि संघाच्या अधिपत्याखालील सरकारला धडा शिकविण्यासाठी सक्षम नेतृत्व म्हणून एकटे अॅड बाळासाहेब आंबेडकर हेच खमकेपणाने लढतं आहेत...!
या देशातील अल्पसंख्याक मुस्लिम, पिडित दलित आणि, पिडित महिला वर्गाने तसेच ओबीसी बांधवांनी आता येणाऱ्या काळात संघाच्या कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी सक्षम नेतृत्व स्विकारले पाहिजे...!
सेक्युलर असल्याचे ढोंग करणारे पक्ष आणि नेतृत्व जर आम्ही ओळखु शकलो नाही तर पुन्हा आमची फसवणूक होणार आहे हेही लक्षात घेतले पाहिजे...!
कॉंग्रेस पक्षाला पर्याय म्हणून भाजप आणि भाजप ला पर्याय म्हणून कॉंग्रेस पक्ष अशी आपली वाटचाल असेल तर आपली फसवणूक होणार आहे हेही लक्षात घेतले पाहिजे...!
नव्या पर्यायाशिवाय आम्ही ब्राम्हण्याच्या कचाट्यातून सुटणार नाही हे वास्तव आपणं सर्वांनी लक्षात घ्यावे हीच अपेक्षा करतो...!
जयभीम.
-भास्कर भोजने.