Wednesday, 19 December 2018

अपप्रचारापासुन सावध रहा - सुमित वासनिक

अपप्रचारापासुन सावध रहा - सुमित वासनिक
मित्रांनो कृपया लक्षपूर्वक वाचा आणि इतरांना कॉपी पेस्ट करून , जस होईल तस पाठवा.. शेअर करा
येणाऱ्या काळात काँग्रेसच्या अपप्रचारा पासुन सावध रहा*
अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांना रोखण्यासाठी काँग्रेसने नेहमि प्रमाणे अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न सुरु केला आहे. यासाठि काँग्रेस तर्फे बाळासाहेबांच्या विरोधात टप्प्या टप्प्याने अपप्रचाराचि मोहीम राबविलि जाईल.  अपप्रचाराच्या या कारस्थानातिल एक एक टप्पा आपण समजुन घेतला पाहिजे.
पहिला टप्पा
काँग्रेस कडून भारिप, वंचित बहुजन आघाडि आणि एमआयएमचि युति भाजपचि बि टिम असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या युतिच्या माध्यमातून अॅड.बाळासाहेब आंबेडकर   भाजपला मदत करण्याचे राजकारण करित आहेत असा अपप्रचार काँग्रेस काहि नेते, कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या मार्फत करित आहे.
दुसरा टप्पा
अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसला अडचणीत आणल्याचे किस्से सांगुन या घटनांमधुन बाळासाहेबांनी भाजपला मदत केलि होति असा अपप्रचार करण्यात येईल.
उदा.
1. अॅड.बाळासाहेब आंबेडकर काँग्रेसच्या विरोधात उमेदवार उभे करतात.
2. 12 जागांचि मागणि खुप मोठि आहे हि मागणि काँग्रेसला अडचणीत आणणारि आहे.
3. अॅड.बाळासाहेब आंबेडकर काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप करून भाजपला मदत करतात.
तिसरा टप्पा
देशातील जातिवादा विरोधात काँग्रेसच अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या पेक्षा  चांगल्याप्रकारे लढत आहे असे सांगण्याचा प्रयत्न काँग्रेस कडुन होईल. यासाठी काँग्रेस कडे असलेल्या राखीव कोट्यातिल उत्तम खोब्रागडे, नितिन राऊत, चंद्रकांत हंडोरे सारख्यांचा उपयोग करण्यात येईल.
चौथा टप्पा
अपप्रचाराच्या चौथ्या टप्प्यात काँग्रेस डाव्या आणि ईतर पुरोगामी संघटनांना एकत्र करुन त्याच्याकरवि अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या भुमिका कश्या अविश्वसनिय आहेत, अॅड.बाळासाहेब आंबेडकर कसे बेभरवशि आहेत हे पसरविण्याचा प्रयत्न केल्या जाईल.
उदा.
1. अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी डाव्यासोबतचि युति तोडलि.
2. काँग्रेस तयार असुनहि अॅड.बाळासाहेब आंबेडकर युतिसाठि तयार नाहीत.
3. एमआयएम सोबत युति करुन अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी धर्मनिरपेक्षते विरोधि भुमिका घेतलि आहे.
पाचवा टप्पा
सर्वात शेवटि अॅड.बाळासाहेब आंबेडकर आता पुर्णपणे भाजप समर्थनाचे राजकारण करत आहेत असे काँग्रेसच्या गोटातुन जाहीर केले जाईल. त्यामुळे आता भाजप प्रमाणेच अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांना सुद्धा निवडणुकीत पराभूत करणे बौध्दांच्या हिताचे आहे, धर्मनिरपेक्षता वाचविण्यासाठि गरजेचे आहे असे जनतेवर बिंबविण्याचा प्रयत्न होईल. काँग्रेसच्या या प्रचाराला बळ देण्यासाठी गवई, कवाडे व ईतर रिपब्लिकन गट धर्मनिरपेक्षतेच्या संरक्षणासाठि ज्याप्रमाणे काँग्रेसला साथ देत आहेत त्याप्रमाणे समस्त बौध्दांनि सुध्दा काँग्रेसला साथ दिलि पाहिजे असा अपप्रचार काँग्रेस कडुन केल्या जाईल. सोबतच काही काँग्रेस समर्थक पुरोगामी, बौद्ध नेते यांच्या कडून ५ वर्ष लाचारपणे भाजप सोबत मंत्रिपद भोगलेले आठवले आणि पासवान हे दोघेहि धर्मनिरपेक्ष आहेत, खरे आंबेडकरवादी आहेत असा प्रचार करून त्यांनी मोदींना पराभूत करण्यासाठी महाआघाडीत आले पाहिजे असे आवाहन केले जाईल. सद्यपरिस्थितीत आंबेडकरवादा  पेक्षाही भाजपला रोखणे देशासाठी किती महत्वाचे आहे याचे पाढे वाचले जातील. यातून ऍड.बाबासाहेब आंबेडकर यांनी आतापर्यंत आरएसएस सोबत केलेल्या लढाईस, त्यांनी उभ्या केलेल्या आंदोलनास,  त्यांनी बौद्ध,ओबीसी आणि मुस्लिमांना प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी घेतलेल्या मेहनतीस बौद्धांच्या डोक्यातून काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल. अपप्रचाराच्या या शेवटच्या टप्प्यात काँग्रेस सर्वच माध्यमांचा उपयोग करून अपप्रचाराचे रान उठवेल, या अपप्रचारात बौद्धांना घेरून त्यांची राजकीय शिकार करण्याचे कारस्थान अमलात आणले जाईल.           
काँग्रेसच्या अपप्रचाराचे हे टप्पे येणाऱ्या काळात एका पाठोपाठ राबविले जातिल. अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातिल अपप्रचाराच्या या कारस्थानास ओळखुन सर्वांनि बाळासाहेबांच्या नेतृत्वात आपले प्रतिनिधित्व मिळविण्यासाठी शेवट पर्यंत भारिप बहुजन महासंघाच्या मागे ठाम पणे उभे राहिले पाहिजे. आपल्याकडे हीच शेवटची संधी आहे, यावेळी जर आपण चुकलोतर आपले भविष्य अंधकारमय होईल याचे भान ठेवुन २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये फक्त वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनाच मतदान केले पाहिजे.
- सुमित वासनिक

No comments:

Post a Comment

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...