Monday, 2 December 2019

महामानवाचे बोल - एकीचे महत्व

महामानवाचे बोल..."एकीचे महत्व".
- शब्दांकन - मनोज काळे.
दि. ९ मार्च १९२४ ला मुंबईमधील दामोदर हॉल या ठिकाणी
डॉ बाबाााहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात 'बहिष्कृत हितकारीनी सभा' या संघटनेची स्थापना करण्यात आली होती, आपल्या समजाला शिकवा, चेतवा व संघटना निर्माण करा या ब्रीदवाक्यासह संघटनेचे काम सुरु झाले, समाजबांधवांना सुशिक्षित करणे, त्यांना गुलाम अवस्थेची जाणीव करुन देऊन त्या गुलामगीरीतुन बाहेर पडण्यासाठी प्रेरीत केले जाऊ लागले, प्रत्येक शनिवार रविवारी विविध ठिकाणी सभा घेऊन सभासद वाढवण्याचे काम उत्साहात होत होते, ब.हि. सभेचे बहुतेक जबाबदार्या शिवतरकरांकडे असायच्या, ते सर्व जबाबदार्या चोख पार पाडतही असत, पण त्यावेळी बाबासाहेबांचे समर्थक असलेल्या अनेक प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवतरकरांवर खुप राग असायचा, ते नेहमी बाबासाहेबांकडे तशा तक्रारी करत असत, बाबासाहेबांना आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांमधील हि धुसफुस आवडली नाही, त्यांनी एके दिवशी कार्यालयात शिवतरकरांना विरोध करणारांना समजावुन सांगताना म्हटले " शिवतरकर हे नेहमी माझ्या सहवासात रहातात, पडेल ते संस्थेचे काम करतात, तुम्ही त्यांना विरोध का करता? मी आपल्या समाजाची सर्वांगीन प्रगती व्हावी म्हणुन कसोशीने व प्रामाणिकपने काम करनार आहे, त्यासाठी मी इतका विद्याभ्यास केलेला आहे, मी मिळवलेल्या ज्ञानशक्तीचा उपयोग मी केवळ माझे कुटुंब व माझी जात यांच्यासाठी करणार नाही, मी सर्व अस्पृश्य समाजाच्या चळवळीसाठी तिचा उपयोग करणार आहे, त्यासाठी मी अनेक योजना आखल्या आहेत, त्या सफल झाल्या तर अस्पृश्य समाज व स्पृश्य समाज यांचा फायदा होईल. अस्पृश्यांचे प्रश्न फार बिकट आहेत, अस्पृश्यांच्या समस्या म्हणजे प्रचंड हिमालय आहे, या हिमालयाशी टकरा मारुन मी माझे डोक फोडुन घेणार आहे, हिमालय कोसळला नाही तरी माझं रक्तबंबाळ डोके पाहुन सात कोटी अस्पृश्य लोक तो हिमालय जमिनदोस्त करण्यास एका पायावर तयार होतील व त्यासाठी प्राणार्पन करतील. हे तुम्ही पक्के ध्यानात ठेवा.
आपसात जर अशी तेढ पिकवत राहीलात तर मलाच काय प्रत्यक्ष परमेश्वरालाकी याबाबत काहीही करता येणार नाही"

बाबासाहेबांच्या या भाषनाचा सर्वांवर चांगला परिणाम झाला व त्यानंतर सर्वजन शिवतरकरांशी सहकार्याने वागु लागले.

टिप - डॉ बाबासाहेब आंबेडकरांना समाजावर किती विश्वास होता हे यातुन दिसते, व आपन बेकीने राहुन बाबासाहेबांचा विश्वास मातीत मिसळत आहोत?  आपल्या समस्या वाढत आहेत पण आपन आपसातील तेढ सोडुन एक व्हायला तयार नाहीत. यावर प्रत्येकाने आत्मचिंतन करावे लागेल

क्रमशः

- शब्दांकन - मनोज काळे, ठाणे 8169291009

_____________________________________

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...