वंचीत बहुजन आघाडी,एक्सप्रेस सुसाट धावणार आहे
-------------------------------------------------------------
विधानसभेत आणि लोकसभेत जाणाऱ्या प्रस्तापितांच्या राजकीय बुलेट ट्रेना मध्ये फक्त प्रस्तापित लोकांच्या पाहुणे-राहुन्याचेच टिकट बुक असतात. प्रस्तापितांच्या राजकीय बुलेट ट्रेन या खालील प्रमाणे आहेत.
१) काँग्रेस राजकीय बुलेट ट्रेन
२) भाजपा राजकीय बुलेट ट्रेन
३) राष्ट्रवादी राजकीय बुलेट ट्रेन
४) शिवसेना राजकीय बुलेट ट्रेन
ह्या बुलेट ट्रेंन मधून इतरांना म्हणजेच मराठा समाज १६९ घरांणे सोडून,मुस्लिम,धनगर,बोद्ध, ख्रिचंन,माळी, तेली,साळी, कोळी,मांग,चांभार,ढोर,होलार, घिसडी,कुंभार,कैकाडी,पारधी,भिल,आदिवासी,लिंगायत,सिंपी इत्यादी घटकांना प्रवास करून विधानसभेत व लोकसभेत न जाण्याची भरदार अशी मजबूत आपल्या, आपल्या पाहुण्या-राहुण्याच्या, धनदांडग्याच्या व एखांद्या आपल्या पाळलेल्या कुत्र्याच्या हिताची व्यवस्था करून ठेवली आहे. म्हणून तर या राजकीय बुलेट ट्रेनच्या माध्यमातून विधानसभेत व लोकसभेत फक्त हे प्रस्तापित लोकं जाऊन बसतात.आणि या राजकीय बुलेट ट्रँनच्या माध्यमातून सत्ते मध्ये आपणच कशे येऊन बसू याची पुरेपूर काळजी घेतली जाते.
या बुलेट ट्रेनला धुनं, रिपेरिंग करणं, डाग-डुग करणं, ग्रीसिंग करणं , नट बोल्ट टाईट करणं, झाड-झुड करणं, लाईट,as, कलर,राजकीय बुलेट ट्रेन च्या पट्रीची देख-रेख करणं असे असंख्य तडक्लास ची कामं हे वर दिलेल्या वंचीत घटकांच्या वाटेला दिले जातात. ( पक्ष वाढीचं काम हे वरील दिलेल्या वंचीत घटका कडून भावनिकतेच्या आधारावर करून घेतलं जातं जसे की राम मंदिर,हिंदू,गोमाता, खोटारडा पुरोगामी पणा ) यांनी फक्त दिलेत तेवढेच कामं करायचे , यांना या राजकीय बुलेट ट्रेन मध्ये बसून थेट विधानसभा,लोकसभा मध्ये जाण्याची मुभा नाही. जर यांना या राजकीय बुलेट ट्रेन मध्ये बसवलच तर फार-फार ग्रामपंचायत,पंच्यात समिती किंवा लैच-लैच झालं तर जिल्हा परिषद मध्ये नेऊन सोडल्या जाते. पुढे विधानसभा व लोकसभा सोडून बोलो.
याच वंचीत घटकांना विधानसभेत व लोकसभेत नेण्याण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी अशी एक राजजकीय एक्सप्रेस तयार केली आहे. कि, ती प्रस्थापितांच्या राजकीय बुलेट ट्रेनला टक्कर देऊन पुढे जाणारी आहे. ती वंचितांना थेट विधानसभेत व लोकसभेत घेऊन जाणारी आहे. आता फक्त निर्यय घ्यायचा आहे तो इथल्या वंचीत घटकांना. तो असा, प्रस्थापितांच्या राजकीय बुलेट ट्रेनचे काम करून प्रस्थापितांनाच त्या राजकीय बुलेट ट्रेन मध्ये बसून विधानसभेत व लोकसभेत पाठवायचं? कि बाळासाहेबांनी तयार केल्येल्या वंचीत बहुजन आघाडी एक्सप्रेसचे काम (ज्यात आपलं हित आहे.)करून ईच्यातच बसून आपण स्वतः विधान सभेत व लोकसभेत जायचं? ज्या-ज्या वंचीत घटकांचं प्रतींनिधित्व विधानसभेत व लोक सभेत पाठवायचं आहे त्या-त्या सर्व वंचीत घटकाणे २०१९ डोळ्या समोर लक्ष ठेऊन ,वंचीत बहुजन आघाडीचे काम तन, मन,धनाने करावं. कारण आता विधानसभा मतदारसंघ-लोकसभा मतदारसंघ to विधानभवन-संसदभवन "वंचीत बहुजन आघाडी एक्सप्रेस" सुसाट धावणार आहे.
--संदीप साळवे,जालना.
मो.नं.८६९१९५५२०२
No comments:
Post a Comment