पवार साहेब कुठे आहेत वंचित बहुजन?
- सुमित वासनिक
2014 मधे लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रातुन 19 जागि आपले उमेदवार उभे केले होते. या एकोणविस जागांपैकी एकही जागी शरद पवारांनी धनगर, भटके विमुक्त, बौद्ध, मातंग, चांभार आणि मुस्लिम यापैकी एकाही समूहातील उमेदवार दिला नव्हता. 19 उमेदवारांपैकि 10 उमेदवार मराठा जातीतून देण्यात आले होते, यामध्ये एकही सामान्य मराठा नव्हता सर्वच बँक,शिक्षण संस्था आणि कारखाने चालवणारे संस्थाचालकच होते. राष्ट्रवादीने ब्राह्मण, मराठा, जैन आणि पाटीदार अश्या सर्वच प्रस्थापित समूहांमधील लोकांना उमेदवारी दिलि पण वंचितांना डावलून त्यांना उपेक्षितच ठेवले. महाराष्ट्रातिल बौध्द, मातंग आणि चांभार यापैकि एकाहि अनुसुचित जातिंंमधिल व्यक्तिस उमेदवारी दिलि नाही, SC आरक्षित जागेवर बडनेराचे आमदार रवि राणा यांच्या पंजाबी दलित असलेल्या पत्निस उमेदवारी देण्यात आलि होति. एकच आदिवासी उमेदवार ते सुध्दा आरक्षित जागेवरच उभा करण्यात आला होता. ओबीसी मधिल कुणबि, धनगर अश्या सर्वच जातिंना एकहि जागा देण्यात आलि नाही. ज्या दोन जागि माळि उमेदवार (कृष्णराव इंगळे, छगन भुजबळ) देण्यात आले तेथे राष्ट्रवादिच्याच नेत्या, कार्यकर्त्यांनी आपल्याच उमेदवारांविरोधात अत्यंत कडवट जातीय प्रचार करून त्यांना पाडण्यात मुख्य भुमिका बजावलि होती. पवार ज्या मुस्लिमांचे कैवार घेण्याचा देखावा करतात त्या मुस्लिमांमधून एकहि उमेदवार उभा करण्यात आलेला नव्हता. भटक्यांच्या तोंडालाहि पानेच पुसण्यात आलि होती.
शरद पवारांनी बौद्ध, धनगर, भटके विमुक्त , माळि, साळी, कोळी, मातंग, चांभार आणि मुस्लिम अश्या सर्वच समूहांमधील लोकांना राजकीय प्रतिनिधित्व देण्याचे टाळले आहे. ज्या समूहांच्या भरवश्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता भोगली, आपले उमेदवार निवडून आणले त्या वंचित समूहांनी आता भारिप बहुजन महासंघाचे नेते ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात एकत्र होऊन वंचित बहुजन आघाडी तयार केली आहे. या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वंचित समूहांना सत्तेत पोहचविण्यासाठी सर्वच वंचितांनि कंबर कसलेली आहे. त्यामुळे येत्या काळात पवारांनी वंचित समूहांना वंचित ठेवायचा कार्यक्रम बंद न केल्यास या वंचित समूहांनी शरद पवारांनाच राजकीय वंचित बनविल्यास कोणालाही नवल वाटू नये.
No comments:
Post a Comment