लोकशाहीचे सामाजिकरण होतं आहे....!
: भास्कर भोजने
गेल्या सत्तर वर्षात इथल्या प्रस्थापित, सत्ताधारी पक्षांनी छोट्या छोट्या जातींची मते घेतलीत मात्र या समाजातील सामान्य आणि गुणवंत माणसाला संसदेत पोहचू दिले नाही...!
इथल्या कॉंग्रेस पक्षाने घराणेशाही पोसली आणि मोठ्या जातीतील जातदांडगे उमेदवार बनवून राजकारणात जातीयवाद मजबूत केला...!
ज्यांना ज्यांना सत्ता हवी होती त्यांनी तोच पायंडा कायम ठेवतं जातीयवाद आणि घराणेशाही अधिक मजबूत केली...!
त्याचा परिणाम असा झाला की, छोट्या छोट्या जातींची माणसे कितीही लायक असली तरीही सत्तर वर्षात अद्याप संसदेत पोहचले नाहीत...!
ही लोकशाहीची थट्टा नव्हे काय..??
आता लोकशाहीचे सामाजिकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे...!
लहानातील लहान जातीचा प्रतिनिधी हा, संसदेत आणि विधानभवनात पोहचला पाहिजे ही भुमिका वंचित बहूजन आघाडीचे संयोजक अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली आहे...!
लोकसभा २०१९ साठी वंचित बहूजन आघाडीचे आता पर्यंत १५ उमेदवार जाहीर केले आहेत,त्यांची वर्गवारी बघा...!
आजपर्यंत अशा छोट्या छोट्या जातींचे आणि सामान्य कुटुंबातील व्यक्तींना कोणत्याच पक्षाने उमेदवारी दिली नाही...!
१) बुलढाणा:-श्री.बळीराम सिरस्कार ...... (माळी.)
२) अमरावती:- श्री.गुणवंत देवपारे.
(बौद्ध.)
३) नांदेड:-डाॅ.यशपाल भिंगे.
( धनगर.)
४) यवतमाळ वाशीम:-डाॅ.प्रविण पवार ..... ( बंजारा.)
५) लातूर:- श्री.रामभाऊ गारकर.
(मातंग.)
६) माढा:-अॅड.विजयराव मोरे.
(धनगर)
७) सातारा:-श्री.सहदेव अप्पा अहिवळे... (होलार.)
८) सांगली:-जयसिंग ऊर्फ तात्या शेंडगे. (धनगर.)
९) पुणे:- श्री.विठ्ठल लक्ष्मण सातव.
(माळी.)
१०) बारामती:-श्री.नवनाथ पडवळकर. (धनगर.)
११) हातकणंगले:-श्री.ओलेमा.
(मुस्लिम.)
१२) रावेर:- श्री.नितीन कांडेलकर.
(कोळी.)
१३) धुळे, मालेगाव:-इंजि.काश्मी मो.हाशमी. (मुस्लिम.)
१४) चिमुर:- डॉ रमेश गजबे.
(माना,गोवारी,)
१५) वर्धा:- अॅड धनराज वंजारी.
(तेली.)
असे उमेदवार सामान्य कुटुंबातील परंतु ऊच्चविद्या विभुषीत आणि कुठलीही घराणेशाहीची पार्श्र्वभूमी नसलेले,इतर पक्ष देणार नाहीत...!
ही लोकशाहीच्या सामाजिकरणाची सुरुवात आहे...!
जयभीम.
Friday, 15 February 2019
लोकशाहीचे सामाजिकरण होतं आहे....!
Subscribe to:
Post Comments (Atom)
संदर्भासह स्पष्टीकरण...!
** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...
No comments:
Post a Comment