आधुनिक भारताचा पाया - भीमा कोरेगावची लढाई.
- मनोज नागोराव काळे, ठाणे.
जगाच्या इतिहासात अनेक लढाया झाल्या, प्रत्येक लढाई ही राजकीय होती, दुसर्या राजाचा पराभव करुन त्याचे राज्यक्षेत्र आपल्या ताब्यात घ्यायचे अशीच चढाओढ असायची, काही ठिकाणी आपापल्या धार्मिक मान्यता लादण्यासाठीही काही लढाया झाल्याचे इतिहीसात नमुद आहेत, अनेक लुटुपुटुच्या लढायांनाही भारतीय इतिहासात गौरवाने सांगितल्या जातात.
मात्र जगाच्या ज्ञात इतिहासातील सर्वात महत्वपुर्ण, विरतेने व स्वाभिमानी बाण्याने ओतप्रोत अशी फक्त ५०० आलुतेदार बलुतेदारांनी २८००० च्या विशाल जालिम पेशव्यांच्या सैन्याला एका रात्रीत कापुन काढुन एका देशाच्या प्रतिगामी इतिहासाला प्रगतीशील पुरोगामी राष्ट्राकडे घेऊन जाणारी कोरेगाव भीमा च्या पात्रात १ जानेवारी १८१८ ची लढाई जाणीवपुर्वक लपवली गेली होती.
हि लढाई दोन राज्यांमधील नव्हती, जमीनीवर ताबा मिळवण्यासाठी नव्हती तर ही लढाई होती "आम्ही माणुस आहोत व आम्हाला माणसा सारखे जगता यावे" या अधिकारा साठी.
मात्र जगाच्या ज्ञात इतिहासातील सर्वात महत्वपुर्ण, विरतेने व स्वाभिमानी बाण्याने ओतप्रोत अशी फक्त ५०० आलुतेदार बलुतेदारांनी २८००० च्या विशाल जालिम पेशव्यांच्या सैन्याला एका रात्रीत कापुन काढुन एका देशाच्या प्रतिगामी इतिहासाला प्रगतीशील पुरोगामी राष्ट्राकडे घेऊन जाणारी कोरेगाव भीमा च्या पात्रात १ जानेवारी १८१८ ची लढाई जाणीवपुर्वक लपवली गेली होती.
हि लढाई दोन राज्यांमधील नव्हती, जमीनीवर ताबा मिळवण्यासाठी नव्हती तर ही लढाई होती "आम्ही माणुस आहोत व आम्हाला माणसा सारखे जगता यावे" या अधिकारा साठी.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या इतिहासाला एका ओळीत मांडताना सांगितले आहे की “भारत देशाचा इतिहास म्हणजे श्रमण संस्कृती विरुद्ध ब्राह्मन संस्कृतीचा झालेला संघर्ष आहे"
१) तथागत गौतम बुद्धांनी ब्राह्मण संस्कृतीवर पुर्ण विजय मिळवला व श्रमन संस्कृती देशात झपाट्याने पसरली, देवनामपिय महान सम्राट अशोकाने पुर्ण जगभरात तथागतांचे विचार पेरले, त्यानंतर प्रतिक्रांती झाली व देशात पुन्हा चातुर्वर्णाची ब्राह्मण संस्कृती जबरदस्तीने लादली गेली.
२) तथागतांची संस्कृती संत परंपरेने कायम जागृत ठेवली, तुकाराम महाराजांच्या सहाय्याने श्रमन / मातृ सत्ताक संस्कृती व स्वाभिमानाचे धडे आऊसाहेब राजमाता जिजाऊंनी शिवरायांना दिले व पुन्हा चातुर्वर्णाच्या शृंखला तोडण्याचे काम शिवरायांनी केले, त्यांनी सप्तबंदी धुडकावली व शुद्र समजल्या गेलेल्या सर्व नागवंशियांच्या हातात शस्त्र दिले व स्वराज्य / लोकशाही / गणराज्य स्थापन केले.
३) शिवशाही विरुद्ध पेशवे या लढाईत पेशव्यांनी शिवशाही संपवली, शिवशक बंद केला व शिवरायांच्या साथिदारांना गुलाम केले.
४) छ. शिवरायांना स्वराज्य स्थापनेत व स्वराज्य चालवण्यात ज्या ज्या जातीच्या लोकांनी मदत केली त्या सर्वांना शुद्र म्हटले गेले, मराठा जातीच्या लोकांनाही पेशव्यांनी शुद्रच समजले याचे ज्वलंत उदाहरण आहे शाहु महाराज व सयाजीराव गायकवाड या दोन महाराजांचे वेदोक्त प्रकरण.
५) पेशव्यांनी संभाजी महाराजांना कापुन टाकण्यात सहाय्य केले व ज्या महार गोविंद गायकवाड ने संभाजी महाराजांचे अंतिम संस्कार करुन पेशव्यांच्या धार्मिक फतव्याचा धुव्वा उडवला त्यामुळे पेशव्यांनी संपुर्ण महार जातीलाच बहिष्कृत केले, महार समाजावर अनेक अनिष्ट नियम लागु केले.
६) महारांनी बाजीराव पेशव्याकडे सर्व जुलमी नियम बंद करुन आम्हाला माणसासारखे जगण्याचा अधिकार द्यावा अशी मागणी केली पन माजोरी सत्तेच्या मस्तीत धुंद असलेल्या बाजीरावाने ती मागणी धुडकावली, तेव्हा महार समाजाला या गुलामितुन मुक्त होण्याची संधी ब्रिटीश अधिकार्याने दिली. व जिवाची पर्वा न करता छ. संभाजी राजांचे अंत्यसंस्कार केले म्हणुन पेशव्यांनी लादलेली गुलामी संपवण्यासाठी महारांनी निश्चय केला व कोरेगाव भीमा ची लढाई लढली गेली, २८००० सैन्यांना फक्त ५०० लोकांनी पुर्णतः कापुन काढले व छ. संभाजी राजांच्या हत्येचा बदला घेतला, शिवशाही संपवणार्या पेशव्यांचा खात्मा केला.
७) त्यानंतर ब्रिटीशांनी तेथे हा क्रांती स्तंभ बांधला,ब्रिटीशांनी पुन्हा या क्रांतीला मोठ्या क्रांतीत रुपांतरीत केले, ब्राह्मणी वर्चस्वाला ब्रिटीशांनी धक्का दिला व सर्व जाचक रुढी परंपरा बंद केल्या, सर्व शुद्रांना शिक्षण दिले पाहीजे अशी पुरोगामी भुमिका ब्रिटीशांनी घेतली, क्रांतीबा फुले, शाहु महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण प्रसारासाठी ब्रिटीशांनी सहाय्य केले व या देशाला आज ज्या पुरोगामित्व व प्रगतीशिलतेचा गर्व वाटतो ते सर्व काही ब्रिटीशांनी या देशाला दिले.
जर १ जानेवारी १८१८ चे ते युद्ध महार सैनिक हरले असते तर या देशातील स्त्री कधीच मुक्त झाली नसती, या देशात समता, स्वातंत्र्य, बंधुता,न्याय, शिक्षण या विषयावर समाजसुधारक निर्माण झाले नसते, या देशात आजही मनुस्मृती चे राज्य असते.
त्यामुळे क्रांतीबा फुलेंनी पहीली शाळा १ जानेवारी लाच सुरु केली, क्रांतीबांनी शिवरायांची समाधी शोधली, शाहु महाराजांनी मराठा समाजासह इतर समाजाला आरक्षण दिले, पेशव्यांनी बंद केलेला शिवशक पुन्हा सुरु केला,
छ.शाहु महाराजांनी व सयाजी गायकवाड या ब्राह्मणी जुलमाचे शिकार झालेल्या महाराजांनी एका महाराच्या पोराला ( विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर) शिक्षणासाठी मदत केली व त्याच महाराच्या पोराने या देशाला प्रबुद्ध भारताची वाट दाखवली,या देशाची सत्ता राजाच्या हातची काढुन लोकांच्या हातात दिली व देशातील प्रत्येक नागरिकाला राजा बनवले,
राज्याचा शेअर सर्वांना समान वाटला,
छ.शाहु महाराजांनी व सयाजी गायकवाड या ब्राह्मणी जुलमाचे शिकार झालेल्या महाराजांनी एका महाराच्या पोराला ( विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर) शिक्षणासाठी मदत केली व त्याच महाराच्या पोराने या देशाला प्रबुद्ध भारताची वाट दाखवली,या देशाची सत्ता राजाच्या हातची काढुन लोकांच्या हातात दिली व देशातील प्रत्येक नागरिकाला राजा बनवले,
राज्याचा शेअर सर्वांना समान वाटला,
प्रज्ञासुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भिमा कोरेगाव लढाईच्या मजबुत पायावर फुले - शाहुंनी उभ्या केलेल्या समतेच्या मंदिरावर लोकशाहीचा कळस रचला व भारतातुन मनुस्मृतीचा कायदा संपवुन संविधान दिले.
५०० आलुतेदार बलुतेदार सैनिकांनी ( प्रामुख्याने महार जात )
सुरु केलेला समतेच्या आधुनिक लढ्याला कायदेशिर स्वरुप देऊन बाबासाहेबांनी कोरेगाव भिमा च्या पायावर एक अधुनिक भारत निर्माण केला व आज आपन पहातोय भारत देश किती झपाट्याने प्रगती करुन जगात नावाजला गेला.
सुरु केलेला समतेच्या आधुनिक लढ्याला कायदेशिर स्वरुप देऊन बाबासाहेबांनी कोरेगाव भिमा च्या पायावर एक अधुनिक भारत निर्माण केला व आज आपन पहातोय भारत देश किती झपाट्याने प्रगती करुन जगात नावाजला गेला.
भिमा कोरेगाव चा तो विजय स्तंभ छ. शिवराय, छ.संभाजी राजे यांच्या शुर व निष्ठावान मावळ्यांनी लढलेल्या समतेच्या लढ्याचे प्रतिक आहे हे आता जगानेही मान्य केले आहे.
आजच्या आधुनिक भारताचा कळस जर भारतीय संविधान असेल तर याचा पाया निर्विवादपने ती कोरेगाव भिमाची लढाईच आहे, त्यामुळे २०१४ ला नवपेशवे सत्तेवर येताच पहिला हल्ला त्यांनी या स्तंभाला वंदन करायला आलेल्या आलुतेदार बलुतेदारांवरच केला. पन यावेळीही डॉ बाबासाहेबांचे रक्तच ( आद.प्रकाश आंबेडकर) या पेशव्यांसमोर खंबीरपने उभे राहीले व पेशव्यांची पळता भुई थोडी केली आहे, ते राजकीय मार्गाने पुन्हा या देशाला ब्राह्मण संस्कृतीकडे लोटायचा प्रयत्न करत आहेत व बाळासाहेब आंबेडकर सर्व आलुतेदार बलुतेदारांना एकत्र करुन त्याच राजकीय मार्गाने पेशव्यांना जेरीस आनत आहेत व सर्व बहुजन समाज आज त्यांच्यामागे एकमताने उभा ठाकुन पुन्हा प्रतिक्रांती होणार नाही, पुन्हा आम्ही गुलाम होणार नाही असा एल्गार केला जात आहे.
त्यावेळी ते सैनिक तलवारी च्या सहाय्याने लढले व जिंकले पन लोकशाहीत आपल्याला हिच आधुनिक पेशवाई विरुद्ध शिवशाही / लोकशाही हि लढाई मता च्या सहाय्याने जिंकायची आहे, आपले हत्यार आपले " मतदान " असणार आहे. त्यामुळे नवपेशवाई संपवण्यासाठी आपला मताधिकार आपल्या अस्तित्वावर उठलेल्या मनुवाद्यांना न विकता तो मताधिकार वापरुन पेशव्यांना सत्तेपासुन कायमचे दुर करा व त्या ५०० विरांना खरी आदरांजली वहा असे अवाहन करतो.
जय भीम, जय शिवराय
जय संविधान
जय संविधान
- मनोज नागोराव काळे, 8169291009
______________________________
No comments:
Post a Comment