Sunday, 13 January 2019

झुटनीती, कपटनीती म्हणजेच पवारनीती- सुमित वासनिक.

झुटनीती, कपटनीती म्हणजेच पवारनीती
- सुमित वासनिक.
अहमदनगर महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांनी भाजपला मतदान करून भाजपचा महापौर बनविला. एकीकडे राष्ट्रवादी धर्मनिरपेक्षतेच्या गोष्टी करून भाजपला विरोध करत असल्याचे दर्शविते आणि दुसरीकडे स्वतःच्या नगरसेवकांना भाजपला समर्थन द्यायलाही लावते. राष्ट्रवादीच्या या दुटप्पी भूमिकेचा पूर्ण महाराष्ट्रातिल जनतेकडून कडाडून विरोध करण्यात आला तेंव्हा लगेच महापौर निवडीच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादि काँग्रेस कडुन सर्वाच्या सर्व 18 नगरसेवकांना पक्षातून काढण्यात आल्याच्या बातम्या राष्ट्रवादी कडुन पसरविण्यात आल्या होत्या सोबतच भाजपला समर्थन देऊ नका असा पक्षाचा आदेश झुगारून स्थानिक नेत्यांनी भाजपला समर्थन करण्याचा निर्णय घेतला असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले होते. पण राष्ट्रवादी काँग्रेस कडुन करण्यात आलेले हे दोन्ही दावे लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी केल्या गेले होते, हे आता समोर आले आहे.
अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक 28 डिसेंम्बर या तारखेला झाली होती. राष्ट्रवादीने भाजपला मतदान करणाऱ्या सर्वच्या सर्व 18 नगरसेवकांना निष्कासित केल्याच्या बातम्या 29 डिसेंम्बरला पसरविण्यात आल्या होत्या. पण सत्यपरिस्थितीत या 18 नगरसेवकांना आणि यांच्या सोबत शहर जिल्हाध्यक्ष असलेल्या विधाते यांना काल म्हणजे 12 जानेवारीला पक्षातून अधिकारीक पणे काढण्यात आले आहे. निवडणुकीच्या नंतर लोकांकडुन होत असलेल्या विरोधाला थांबवण्यासाठी राष्ट्रवादीने या बातम्या पसरविल्या होत्या पण लोकं काही केल्यास आपली ही दुटप्पी आणि धर्मनिरपेक्षते विरोधी भूमिका विसरायला तयार नसल्याचे पाहून 12 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसने या नगरसेवकांना नाईलाजाने पक्षातून बडतर्फ केले आहे. जनता विसरली असतीतर कोणावरही कार्यवाही झाली नसती.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले होते की पक्षाने भाजप सोबत जाऊ नका असे आदेश दिल्यावरही स्थानिक नेत्यांनी भाजपला समर्थन दिले आहे. ही सुध्दा राष्ट्रवादी काँग्रेस कडुन मारण्यात आलेली एक शुद्ध थाप आहे.  'भाजपला पाठिंबा देऊ नका, असा निरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिलाच नाही' असे जाहीरपणे सांगून अहमदनगर महानगरपालिकेतील भाजप-राष्ट्रवादी युतीचे शिल्पकार आ.विक्रम जगताप यांनीच स्वतः जयंत पाटलांचा खोटारडेपणा उघड केला आहे. अहमदनगर महानगरपालिकेत आपल्या चुकीच्या भूमिकेवर पांघरूण घालण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पसरविण्यात आलेली ही दुसरी खोटी बातमी होय.
राष्ट्रवादी काँग्रेसचा हा दुटप्पीपणा अश्या खोट्या बातम्या पसरविण्यावरच थांबलेला नाही. 12 जानेवारीला भाजपला मतदान करणाऱ्या 18 नगरसेवकांना आणि शहर जिल्हाध्यक्ष असलेल्या विधाते यांना पक्षातून बडतर्फ केले पण त्याच वेळी ही युति ज्यांनी घडविली त्या आ.संग्राम जगताप यांच्यावर कोणतीच कार्यवाही राष्ट्रवादीने केलेली नाही. ज्या व्यक्तीने ही अभद्र युति घडविली आहे त्या व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठीशी घातले आहे, म्हणजे राष्ट्रवादीची या युतिला संमती आहेच हे स्पष्ट आहे. जनतेकडुन पक्षाला होत असलेल्या विरोधाला पाहून जगताप यांच्या शब्दाबाहेर नसलेल्या नगरसेवकांना राष्ट्रवादीने बडतर्फ केले पण जगताप यांना पक्षात ठेवले. 'साप भी मारो और लाठी भि ना टुटे' या म्हणी प्रमाणे राष्ट्रवादीचा हा निर्णय आहे.
अहमदनगर मध्ये भाजपला पाठिंबा देऊन राष्ट्रवादिने आपला खरा चेहरा सर्वांना दाखविला आहे. पण लोकांचा होत असलेला विरोध पाहता आपला हा सत्तापिपासू चेहरा लपविण्यासाठी राष्ट्रवादी कडुन सतत खोट्या गोष्टी पसरविण्यात येत आहेत. ज्याने युति घडविली त्याला पाठीशी घातले जात आहे. मित्रांनो सत्तेसाठी कोणत्याही पातळीवर जाणे हीच राष्ट्रवादी काँग्रेसची खरी विचारधारा आहे. राष्ट्रवादीची ही झुठनीती, कपटनिती म्हणजेच पवारनीती आहे हे महाराष्ट्रातील जनतेने अहमदनगर प्रकरणी चांगल्या प्रकारे ओळखले आहे.
सुमीत वासनिक


No comments:

Post a Comment

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...