Monday, 21 January 2019

राजकारणातील नैतिकता आणि लाचारी....!

राजकारणातील नैतिकता आणि लाचारी....!
: भास्कर भोजने.
       डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांसदीय लोकशाही ही कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडली आहे...!
   कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेत जे जे उपेक्षित आहेत,संधीवंचित आहेत,त्यांना संधी निर्माण करुन देऊन समग्र समाजाचा " समतेने " विकास साधणे ही भुमिका घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली आणि आपली सांसदीय लोकशाही ऊभी केली...!
    आपल्या देशातील वर्णवर्चस्ववादी मंडळीने या समतेच्या तत्वाला छेद देण्यासाठी ज्यांना संधी द्यायची आहे,ज्यांना आरक्षण द्यायचे आहे असे उपेक्षित घटकामध्ये लाचार व्यक्ती शोधून त्यांना उपेक्षित घटकांचे नेते म्हणून प्रपोज केले आणि उपेक्षितांच्या हक्क आणि अधिकाराला शह दिला ...!
    उपेक्षित समाज हा उपेक्षितचं राहिलं,त्याचा प्रतिनिधी हा आपला " गुलाम " किंवा सांगकाम्या किंवा पदाचा लालची किंवा " दलाल "प्रवृत्तीचा असेल अशी भुमिका घेऊन मनुवादी पक्षांनी गेली सत्तर वर्षे आपले राजकारण आणि पक्षीय धोरण राबविले आहे...!
    भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या सत्ताधारी पक्षाच्या तिकिटावर निवडून येणारे राखीव जागेवरील खासदार बघा त्यांचे काम आणि विचार बघा चटकण लक्षात येते त्यांनी एस.सी.,एस.टी, ओबीसी बांधवांसाठी काय केले त्याचा आराखडा बघा...!
    त्यांची लायकी बघा,पुर्वी बुलढाणा मतदारसंघ राखीव होता तेव्हा भाजप, शिवसेना आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जे होते तेच उमेदवार आज बुलढाणा मतदारसंघ खुला झाला तेव्हा नाहीत,तर त्या राखीव जागेवरुन निवडून येणारे, आनंदराव अडसूळ, मुकुल वासनिक, किंवा शिवसेनेचे काळे आता कुठे आहेत...??
   त्यांची लायकी केवळ राखीव जागेवर उभे राहण्याऐवढी आणि गुलामी करण्याऐवढीचं आहे.ते नेते होऊ शकत नाहीत...!
   अंगी कुठलीही लायकी नसतांना इथल्या प्रस्थापित पक्षांनी काही बुजगावण्यांना आंबेडकरी नेते म्हणून प्रपोज केले आहे त्यांची लाचारी आणि दलाली आता उघडं होऊ लागली आहे...!
    आजचा काळ हा अतिशय टोकदार आणि कठीण काळ म्हणून इथला विचारवंत मांडतं आला आहे...!
आजचा काळ हा आणिबाणीचा काळ आहे अशी जनभावना तयार झाली आहे,त्याचे कारण देशात घडणाऱ्या घडामोडी जनता ऊघड्या डोळ्याने बघते आहे...!
   अशा आणिबाणीच्या काळात लोकशाही आणि राज्यघटना धोक्यात आली असतांना,कोणताही नेता हा राजकारण करतांना अतिशय दक्षतेने आणि नैतिक मुल्यांवर आधारीत राजकारण करेल,तरच तो नेता काळाच्या कसोटीवर तगेल अन्यथा जनता आता लबाडांना हद्दपार करील यात शंकाच नाही...!
    अशा टोकदार वळणावर ए आय एम आय एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जनाब असोद्ऊद्दीन ओवेशी साहेब यांनी युतीच्या संदर्भात एक निवेदन नांदेड येथील जाहीर सभेत केले की,जर एम आय एम पक्षाची कॉंग्रेस पक्षाला अडचड वाटतं असेल तर, कॉंग्रेस पक्षाने अॅड बाळासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या मानसन्मानातील जागा द्याव्यात मला एकाही जागेची गरज नाही,मी कोणतीही जागा लढविणार नाही मात्र, दलित बहुजन समाजाला सत्तेतील वाटा मिळावा म्हणून तुमच्या सोबतं राहिलं...!
    ही भाषा,हा त्याग,हा दिलेरपणा आणि ही राजकीय नैतिकता एका पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी वापरली आहे...!
  ए आय एम आय एम पक्षाचे तेलंगणा मध्ये खासदार, सात आमदार आणि महाराष्ट्रात दोन आमदार आहेत, त्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष ही नैतिकता दाखवितो आहे त्याचे कारण आहे आजची देशातील परिस्थिती...!
    परंतु ज्यांना मनुवादी पक्षाच्या मंडळीने नेते म्हणून प्रपोज केले आहे आणि जे स्वत:ला रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणवून घेतात, परंतु त्यांचा कोणता मतदारसंघ आहे हे त्यांनाही माहित नाही त्या नेत्यांना नैतिकता म्हणजे काय हे माहितच नाही...!
त्यांना त्याग कशासोबतं खातात तेही माहित नाही...!
   आजही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नांवाने राजकीय दुकानदारी चालविणारे आंबेडकरी जनतेला फसवू पाहतं आहेत, परंतु आता ही लबाडी किंवा दलाली तुमची तुम्हाला लखलाभ ,जनता तुम्हाला भिकं घालणार नाही...!
  तुमची लाचारी जनतेच्या लक्षात आली आहे...!
     आता जनता कॉंग्रेस पक्षाला सेक्युलर पक्ष म्हणून जाब विचारल्याशिवाय मतं देणारं नाही, कॉंग्रेस पक्षाने आपलं सेक्युलॅरिझम सिद्ध केले पाहिजे...!
   वंचितांसाठी काय देता ते कॉंग्रेस पक्षाने सांगितले पाहिजे,तुमची घराणेशाही आता कुणीही डोक्यावर घेऊन नाचणारं नाही...!
   बुरखाधारी आंबेडकरी नेते, किंवा लाचार,दलाल नेते जनता सहन करणार नाही हेही बुजगावण्यांनी लक्षात घ्यावे,नाहिपेक्षा या वंचितांच्या लाटेत तुम्ही कालबाह्य होऊन, संपणार हे लक्षात घ्या...!
जयभीम.
@.भास्कर भोजने.

No comments:

Post a Comment

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...