कॉंग्रेस पक्षाने आपली ताकद जोखावी...!
- भास्कर भोजने.
कॉंग्रेस पक्षाला आम्ही सत्ताधारी आहोत,प्रस्थापित आहोत या प्रतिमेच्या बाहेर अजून निघता आले नाही...!
कॉंग्रेस पक्ष अजुनही स्वत:ला देशातील सर्वात मोठा आणि प्रस्थापित पक्ष समजतं आहे...!
कॉंग्रेस पक्षाने या भ्रमातुन लवकर बाहेर पडावे,नाहीतर कॉंग्रेस पक्ष हा लवकरच संपेल यात तिळमात्र शंका नाही...!
कॉंग्रेस पक्षाचा जो मुळ जनाधार होता,तो या देशातील दलित आणि मुस्लिम...!
दलितांची १३ टक्के आणि मुस्लिम समाजाची १६ टक्के मिळून एकूण २९ टक्के बेस तयार असायचा त्या २९ टक्के मतांना प्रत्येक मोठ्या जातीच्या उमेदवारा सोबतं जोडून कॉंग्रेस पक्ष सत्तेत जायचा...!
मोठ्या जातीतील काही घराणे तयार करुन कॉंग्रेस पक्षाने जातियवाद आणि घराणेशाही दोन्ही पोसले आणि आपल्या सत्तेची गणितं मांडली...!
गेली ६८ वर्षे भारतीय जनतेने कॉंग्रेस पक्षाच्या या नितीचा अनुभव घेतला आणि दलित, मुस्लिम हा मुळ जनाधार कॉंग्रेस पक्षाकडुन निघून गेला हे वास्तव आहे...!
गरीबी हटाव या ना-यावर दलितांना फसविले गेले हे दलित समुहाला कळुन चुकले आहे...!
बाबरी मशीद प्रकरणात आणि सच्चर समितीचा अहवाल यांनी मुस्लिम समाजाचे डोळे उघडले आणि त्यांनीही कॉंग्रेस पक्षाकडे पाठ फिरविली हे वास्तव आहे...!
कॉंग्रेस पक्षांकडील दलित, मुस्लिम हा मुळ जनाधार संपला...!
ज्या मोठ्या जातीच्या आधारावर घराणेशाही पोसली होती,तोच प्रयोग इतर पक्षांनी सुरू केला आहे,उदा.. शिवसेना आणि भाजप मध्येही घराणेशाही निर्माण झाली आहे...!
त्यामुळे राजकीय प्लॅटफाॅर्म वर नवी प्रस्थापित घराणी तयारी झाली आहेत, म्हणूनच कॉंग्रेस पक्षाचा जनाधार आता प्रस्थापित मोठ्या जातीतही राहिला नाही...!
एकंदरीत त्याचाच परिणाम म्हणून देशात ५४५ पैकी कॉंग्रेस पक्ष केवळ ४४ या सर्वात निच्चांकी सदस्य संख्येवर पोहचला आहे...!
कॉंग्रेस पक्ष देशात विरोधी पक्ष म्हणूनही आपली पतं कायम राखू शकला नाही हे वास्तव आहे...!
महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षाचे ४८ पैकी केवळ २खासदार आहेत...!
म्हणजे कॉंग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील आपला जनाधार गमावलेला आहे,तरीही कॉंग्रेस पक्ष इतर सेक्युलर किंवा समविचारी पक्षांशी युती किंवा आघाडी करतांना इतरांना कमी लेखुन एक जागा देतो,दोन जागा देतो अशी मग्रुरीची भाषा वापरतो आहे हा कॉंग्रेसचा अहंकार कॉंग्रेस पक्षाला संपवणारं यात शंकाच नाही...!
मित्र पक्षांना विश्वासात न घेता केवळ कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपसात बसुन जागा वाटप करतात आणि ,राजू शेट्टी यांना एक जागा सोडली,शेकाप ला एक जागा दिली,अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी सोडली अशी सरंजामी भाषा बोलतं आहेत,ही नशा,हा तोरा,हा अहंकार कॉंग्रेस पक्षाने त्यागला पाहिजे,नाहीतर जनता शिक्षित झाली आहे,तुमची घराणेशाही आता सामान्य माणसाला पसंत नाही...!
तुमचे जातदांडगे उमेदवार छोटया छोटया जातीच्या ओबीसी बांधवांना मान्य नाहीत, तुमचं फसवं धोरण पुन्हा पुन्हा जनता स्विकारायला तयार नाही...!
जो हौद से गयी ,वो बुंद से आनेवाली नहीं....!
कॉंग्रेस पक्षाने आपली सेक्युलर ही इमेज राखायची असेल तर इतर समविचारी पक्षांना सन्मानाने सोबतं घेऊन धर्मवादी, असहिष्णू आणि मनुवादी पक्षांना रोखण्यासाठी आता समंजस भुमिका घेऊन आघाडी करावी,भ्रमातुन बाहेर यावे.नाहीतर तुमचा जनाधार संपलेला आहेचं,२०१९ मध्ये कॉंग्रेस मुक्त भारत होईल आणि त्यासाठी कॉंग्रेस पक्षाचं धोरणचं कारणीभूत असेल...!
कॉंग्रेस पक्षाला पर्याय म्हणून भाजप आणि भाजप पक्षाला पर्याय म्हणून कॉंग्रेस ही द्विपक्षीय देवाणघेवाण सुरु राहिलं या भ्रमातुन कॉंग्रेस पक्षाने बाहेर पडले पाहिजे...!
कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाचं धोरण एकचं किंवा सारखेचं आहे अशी धारणा असलेली नवी पिढी तयार झाली आहे, त्यामुळे भाजपला घालवण्यासाठी म्हणून जनता आता आम्हालाचं निवडून देईल या भ्रमातून कॉंग्रेस पक्षाने बाहेर पडावे,नाहीतर जनता कॉंग्रेस पक्षाला आता पुर्णविराम देण्याच्या मनस्थितीत आली आहे हेही लक्षात घेतले पाहिजे...!
जयभीम.
@.. भास्कर भोजने.
No comments:
Post a Comment