......सेम बाबासाहेबच
- मनोज काळे, ठाणे
फुरोगामी पनाचा बुरखा पांघरलेले नकली लोकशाहीवादी लोक गोपिचंद पडळकरांच्या वंचित बहुजन आघाडीतील सहभागाबद्दल जराही तारतम्य न बाळगता, जराही विचार न करता द्वेश, राग व तिरस्कार व्यक्त करताना दिसले, तेव्हा याचा मी विचार केला व मला काय जानवले ते वाचा,
काही काळ भाजपा पक्षात काम केलेल्या गोपीचंद पडळकर या धनगर समाजाच्या एक अतिषय लोकप्रिय, हुशार नेत्याने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला, वंचित बहुजन आघाडी चा कणा बनलेल्या धनगर समाजाचे ते एक अतिषय भक्कम नेते आहेत, धनगर आरक्षणावरुन त्यांचा भाजपाशी वाद झाला व त्यांनी वैचारिक मतभेदातुन भाजपा सोडली व इतर धनगर नेत्यांप्रमाणे बाळासाहेबांचे नेतृत्व स्विकारले. आता असे भरकटलेले तरुन जर मनुवादी संस्कृती व घरानेशाहीची मुजोरी लक्षात आल्यास त्यापासुन दुर जाऊन आंबेडकरी चळवळीत येऊन मनुवादी संस्कृतीशी लढुन त्यांच्या भुतकाळातील चुकांचे प्रायश्चित करणार असतील तर आपण त्यांना का स्विकारु नये? त्यासाठी आपन बाबासाहेबांच्या जीवनातील एक प्रसंग आठवुन पाहु.
बाळासाहेबांंना पाहुन ग भीम परतुन आल्यासारख वाटतय...हे गीत आपन रोज ऐकतोय पन बाळासाहेब खरोखरच बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकुन हा चळवळीचा रथ पुढे चालवत आहेत हे आपनास पटेल.
ज्यावेळी बाबासाहेबांना भारतातील अस्पृश्यांना ब्राह्मणी धर्माच्या जाचातुन मुक्त करण्याचे पहीले चवदार तळ्याचे आंदोलन छेडले होते त्यावेळी काही ब्राह्मणांच्या विरोधात काम करणारे लोकही त्यांचे काम करत होते, त्यांच्या संघटना कार्यरत होत्या त्यापैकि एक होते प्रसिद्ध *जेधे जवळकर ,या दोघांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहुन सुचना केली होती की "आंबेडकर साहेब, तुम्ही जे अस्पृश्यता निवारनाचे काम करत आहात ते अतिषय मोलाचे आहे, आम्ही पन तुमच्या कार्यात सहभाग घेऊ इच्छितो पन अट आहे की आपल्या संघटनेत एकाही ब्राह्मणाला घेऊ नये"*
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे प्रचंड लोकशाहीवादी होते, *बाबासाहेबांनी जेधे जवळकरांची ती कट्टरवादी मागणी फेटाळुन लावली इतकेच नव्हे तर चवदार तळे मुक्तीच्या त्या आंदोलनात चित्रे, टिपनीस, सहस्त्रबुद्धे यांना बाबासाहेबांनी पुढाकार दिला, त्यांच्याच हातुन मनुस्मृतीचे दहन करुन घेतले*
आता आपन बाळासाहेबांनी सुरु केलेल्या वंचित बहुजन आघाडी या लोकचळवळीकडे पाहुयात, आज संविधान विरोधी विरुद्ध संविधान समर्थक अशी राजकीय लढाई होत आहे, त्या चळवळीचे नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर करत आहेत, त्यामुळे संविधानाच्या रक्षणाचा मुद्दा आजवर ज्या ज्या लोकांना महत्वाचा, जिव्हाळ्याचा वाटतो त्यांनी बाळासाहेबांचे नेतृत्व माणुन काम करण्याची तयारी दाखवली आहे, ही मोठी क्रांतीकारी घटना आहे, आपनही अशा *भरकटलेल्या पण आता आंबेडकरी वादळ पाहुन जागृत झालेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्यात सामावुन घेऊन आपली संविधान रक्षणाची लढाई लढले पाहीजे.*
राजगृहाकडे चला चा नारा देत असताना जे लोक राजगृहाकडे येत आहेत त्यांचे खुल्या दिलाने स्वागत केले पाहीजे, बाबासाहेबांनी जी लोकशाही आपनास दिली ती तशीच आपन ती जपायची आहे व ती वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातुन तळागाळापर्यंत पोचवायची आहे,
बाबासाहेबांच्या चवदार तळ्याच्या आंदोलनातुन आपल्या अस्पृश्यतेला वाचा फुटली व त्या अस्पृश्यतेला संविधानाने कायद्याने समाप्तच केले.
संविधानाने आपल्याला उन्नतीसाठी लोकशाही दिली, पन लोकशाही घरानेशाहीने कैद केली, त्या कैदेतुन लोकशाहीला मुक्त करण्यासाठी मोठ्या व्यापक भावनेतुन वंचित बहुजन आघाडी निर्माण झाली आहे, चवदार तळ्याच्या आंदोलना प्रमाणेच 2019 ची वंचित बहुजन आघाडीची ही लोकचळवळ महत्वपुर्ण आहे, आपन त्या वेळी नव्हतो पन आज आपन या आंदोलनात सहभाग घ्यावा, बाबासाहेबांना आपन साथ द्यायला नव्हतो, आपन बाळासाहेबांना साथ देऊयात, बाळासाहेब हे प्रति बाबासाहेबच आहेत, त्यांची प्रत्येक कृती ही लोकशाही व आंबेडकरी चळवळ यासाठी मैलाचा दगड आहे.
ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी चवदार तळ्याच्या हजारो वर्षांचा बामनवादाशी लढा देताना काही परिवर्तनवादी ब्राह्मणांना सोबत घ्यायला संकोच केला नाही, सेम तसेच आज बाळासाहेब आंबेडकरांनीही सत्तर वर्षांची घरानेशाही मोडण्याच्या या लढ्यात गोपीचंद पडळकर सारखा विरोधी गोटात राहुन, तिकडची कार्यप्रणाली,तिकडचे मनुवादी वातावरन, जातीवादी धोरने पाहुन त्यांना लाथाडुन आज जागृत होऊन वंचित आघाडीला साथ द्यायला तयार झाले त्यांचे कौतुक करीवे ते कमीच आहे, पण त्यांना स्विकारुन श्रद्धेय बाळासाहेबांनी जो लोकशाहीवादी निर्णय घेतला ते पाहिल्यास मनात आपसुकच शब्द आले....
सेम बाबासाहेबच
- मनोज नागोराव काळे, 8169291009
No comments:
Post a Comment