Sunday, 14 April 2019

रोग, रोगी आणि डॉक्टर - मनोज काळे,ठाणे.

रोग, रोगी आणि डॉक्टर - मनोज काळे,ठाणे.


एखाद्याच्या रोगाचे जोवर निदान होत नाही तोवर त्यावर इलाज करणे कोणत्याही डॉक्टराला शक्य नसते, त्यामुळे सर्वात पहिला टप्पा असतो रोग काय आहे हे शोधण्याचा, त्यानंतर त्या रोगाची कारणे तपासुन त्यानुसार त्यावर औषध दिले की तो रोग निश्चितपने बरा होतो, हे झाले आजच्या व्यवहारातील सत्य.


1) या सत्याचा शोध अडीच हजार वर्षांपुर्वी तथागत सम्यक संबुद्धांनी घेतला होता, मानव प्राणी दुःखी आहे हे तथागतांनी जानले, दुखाचे अस्तित्व मान्य केले व त्याची कारणे शोधली ( चार आर्य सत्य)  त्यातुन कायमची मुक्ती मिळवण्याचा मार्गही सांगीतला ( आर्य आष्टांगिक मार्ग) . व त्या मार्गाने जाऊन आजपर्यंत हजारो वर्षापासुन लोक दुखमुक्त होत आहेत.


2) त्यानंतर छ.शिवाजी महाराजांनी तोच फॉर्मुला वापरला, आपन बहुसंख्य असुन मोगलांचे गुलाम का आहोत याचा महाराजांनी शोध घेतला, त्यांच्या लक्षात आले की चातुर्वर्णामुळे या देशाचे करे रक्षक असलेल्या सर्व लढाऊ जातीच्या लोकांच्या हातातुन धार्मिक बंधने घालुन शस्र काढुन घेतली गेली आहेत व त्यांना जाती पातीत विभागुन त्यांच्यात फुट पाडुन त्यांच्यावर राज्य केले जात आहे, या मनुवादी काव्याला ओळखुन महाराजांनी यावर उपाय केला की सर्व बारा बलुतेदार व अठरा अलुतेदारांना एकत्र करुन, त्यांच्यावर ब्राह्मनी व्यवस्थेने लादलेली गुलामी हटवु  सर्वांना स्वराज्याचे सैनिक बनवले व मुठभर सैन्याने मोघलांना जेरीस आनत स्वराज्य मिळवले. पुढे शिवशाही ला घातपाताने संपवणार्या पेशव्यांनाही भिमा कोरेगावात यात स्वाभिमानी लढाऊ अलुतेदार बलुतेदारांनी संपवले हा जाज्वल्य इतिहास आहे.


3) डॉ बाबासाहेब आंबेडकरांनीही अलुतेदार बलुतेदार समाज हा येथील व्यवस्थेने बहिष्कृत ठरवला आहे हे मान्य केले व त्या बहिष्कृत रोगापासुन मुक्ती मिळवण्यासाठी बहिष्कृत भारत नावाचे पाक्षिक सुरु केले, नंतर सामाजिक संघटना स्थापन केली त्याचे नावही 'बहिष्कृत हितकारीनी सभा' ठेवल्याचे आपनास माहीत असेल. त्याअंतर्गत लढा दिला गेला.


4) आता 2019 ला आपन स्वतंत्र आहोत, आपन लोकशाही असलेल्या देशात जगतोय पन 70 वर्ष लोकशाही येऊनही या देशातील तळागाळापर्यंत ती पोचु दिली गेली नाही, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील प्रत्येक नागरिकाला हक्क, अधिकार दिले पन त्यापासुन आज 85% लोक वंचित ठेवले गेले, त्यामुळे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी या काळातील रोगाचे निदान अगदी अचुक केले व वंचित हा शब्द अधोरेखित करत त्याची कारणे शोधली, आज प्रजासत्ताक भारतात लोकशाहीचे सामाजिकीकरन न होऊ देण्यात 169 घराणे जबाबदार आहेत हे त्यांच्या निदर्शनास आले, व या घराण्यांनी कैद करुन ठेवलेल्या लोकशाही ला मुक्त करण्यासाठी अठरा अलुतेदार व बारा बलुतेदारांना एकत्र करुन "पुन्हा स्वराज्य" म्हणत वंचित बहुजन आघाडी या लोकचळवळीला जन्म दिला. 


आज आपन पहात आहोत की वंचित बहुजन आघाडी ला जनतेने स्विकारले, लहान मुलांनी खाऊच्या पैशापासुन काही बापांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी ठेवलेला पैसा दान दिला, काहीं बायांनी गळ्यातील मंगळसुत्र दान केले. सर्व जनतेने या आघाडी च्या प्रामाणिक भुमिकेला डोक्यावर घेतले व आज सारा महाराष्ट्र संविधानाच्या रक्षणासाठी एकवटला आहे, सर्व 169 घराण्यांचा देशाला लागलेला रोग संपलाच पाहीजे यासाठी जो तो आपापल्या परीने कष्ट घेत आहे, कुनी लेख लिहीत आहे, कुनी पोस्टर बनवत आहे, कुनी दारोदार फिरुन लोकांना समजावत आहे तर कोन गाडी घर दारावर स्टिकर्स लावुन हे औषध समाजाला वाटत आहे.


"गुलामाला त्याच्या गुलामीची जानीव करुन द्या तो आपोआप बंड करुन उठेल" असे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, त्यांनी ते औषध देऊन एका मोठ्या समाजा बहिष्कृतातुन स्विकृत करुन घेतले, तेच महान कार्य आज आद. बाळासाहेब आंबेडकर करत आहेत, त्यांनीही धनगर, ओबीसी,भटके विमुक्त, मुस्लिम, होलार, चांभार, मातंग व इतर सर्वच्या सर्व जातींना गुलामीची जानीव करुन देण्यात यश मिळवले आहे, प्रत्येकजन आता या लोकचळवळीच्या ऐतिहासिक कार्यात आपापले योगदान देताना दिसत आहे. कुनीही आता बघ्याची भुमिका घेत नाही, प्रत्येक जन काही ना काही योगदान द्यायचा प्रयत्न करत आहे हे अतिषय क्रांतीकारी काम आहे. आपल्या समाजाचे एकमेव डॉक्टर  बाळासाहेब पुर्ण प्रयत्न करत आहेत चला आपनही त्यांना समाजाचा इलाज करुन लोकशाही ला घराणेशाहीच्या रोगातुन मुक्त करुन एक सशक्त लोकशाही निर्माण करण्यात मदत करुयात.


भिक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची.

माझ्या खाली कुनी नाही, माझ्या वरती कुनी नाही, आम्ही सर्व समान आहोत.


- मनोज नागोराव काळे, 8169291009

No comments:

Post a Comment

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...