Thursday, 11 April 2019

भाजपने केला अकोल्यातील कुणब्यांचा घात- सुमित वासनिक

भाजपने केला अकोल्यातील कुणब्यांचा घात- सुमित वासनिक

अकोला लोकसभा मतदारसंघात कुणबी नेते भाजपचे भाऊसाहेब फुंडकर सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. पण 1998 सालि निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर भाजपने अकोल्यात कुणबी समाजाला हळू हळू राजकारणातुन हद्दपार करण्याचा डाव खेळायला सुरुवात केली. लोकसभेला पराभव झाल्यानंतर 2004 मध्ये पुन्हा भाजप कडुन निवडून यायची संधी होती तेंव्हा भाजपने भाऊसाहेबांचं तिकीट कापलं आणि संजय धोत्रे यांना उभं केलं. भाऊसाहेबांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्यानंतरही भाजपने जाणीवपूर्वक भाऊसाहेबांना उमेदवारी नाकारून संजय धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळेस भाऊसाहेब संसदेत गेले असतेतर केंद्रीय मंत्री झाले असते हे ओळखूनच अकोल्यातील सहकार लॉबीने आपले वजन वापरून भाऊसाहेबांचं तिकीट कापायला लावले होते असे आजही जिल्ह्यातील जुने जाणकार सांगतात. भाऊसाहेब फुंडकरांच्या जागी संजय धोत्रे खासदार झाल्यावर धोत्रेंनि अकोल्यातील कुणबी नेते संपविण्याचा सपाटाच सुरू केला. भाऊसाहेब फुंडकरांच्या नंतर 2004 मध्ये भाजप कडुन आमदार असलेले नारायण गव्हाणकर यांना राजकारणातुन संपविण्याचा नवीन डाव भाजपने आणि खासदार संजय धोत्रेंनि आखला होता.


2004 ते 2009 मध्ये बाळापूर मतदारसंघातून आमदार असलेले भाजपचे नारायणराव गव्हाणकर यांना पाडण्यासाठी 2009 मध्ये त्यांच्या विरोधात मराठा समाजातील अपक्ष उमेदवार उभे करण्यात आले होते. हे अपक्ष उमेदवार संजय धोत्रे यांनीच उभे केले होते हे कोणापासूनही लपलेले नाही. मराठा अपक्ष उमेदवारांचा परीणाम असा झाला की गव्हाणकरांना अपेक्षीत असलेले मतदान मिळालं नाही आणि यामुळे गव्हाणकारांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 2009 मधील निवडणुकि पासूनच नारायण गव्हाणकारांना राजकारणातुन संपवायची कसरत सुरू झाली होती. ज्या पक्षाला कुणबी समाजाने वाढविले त्याच पक्षाने जिल्ह्यातून कुणबी नेतृत्व संपविण्याचे काम केले. भाजप मध्ये खासदार संजय धोत्रें कडुन होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून गव्हाणकारांना भाजप सोडावी लागली होती. भाजप सोडून काँग्रेस मध्ये गेलेल्या गव्हाणकरांना आश्वासन देऊनही 2014 मध्ये लोकसभेचि उमेदवारी नाकारण्यात आली होती. गव्हाणकारांना उमेदवारी नाकारून काँग्रेसनेही कुणब्यांची अवहेलनाच केली होती. गव्हाणकर आता पुन्हा भाजप मध्ये आले आहेत पण खासदार धोत्रें कडुन त्यांना त्रास देणे अजूनही थांबलेले नाही. जिल्ह्यात भाजपमध्ये कोणताही कुणबी नेता मोठा होऊ नये असे संजय धोत्रेंना वाटते म्हणून ते जिल्ह्यात कुणबी नेत्यांचे पंख छाटण्याचे काम विना थांबता करत असतात असे ठाम मत अकोल्यातील कुणबी समाजाचे झाले आहे.


ज्या भाजप पक्षाला जिल्ह्यात आपण उभे केले त्याच पक्षातून आपल्यावरच अन्याय करण्यात येत असल्याची भावना अकोल्यातील कुणबी समाज बांधवांमध्ये वाढीस लागली आहे. ज्याने जिल्ह्यातून आपले नेतृत्व संपविले त्याला यावेळी निवडणुकीत पाडून आपण धडा शिकवला पाहिजे असे कुणबी युवक उघडपणे बोलत आहेत.

एकंदरीत म्हणायचे तर संजय धोत्रे यांनी भाजपमध्ये पूर्ण जिल्ह्यात इतर कोणासही मोठं न होऊ देण्याचा जो कार्यक्रम चालविला त्याचे परिणाम त्यांना या निवडणुकीत भोगावे लागतील असे दिसते आहे.

No comments:

Post a Comment

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...