Monday, 25 May 2020

कोरोना व्हायरस ,आयोध्या वाद व एक मोठे षडयंत्र - मनोज नागोराव काळे, ठाणे

कोरोना व्हायरस ,आयोध्या वाद व एक मोठे षडयंत्र
- मनोज नागोराव काळे, ठाणे


आयोध्या येथील राम मंदिर ( पुर्वीची बाबरी मज्जीद)  हे प्राचिन बौद्ध स्थळ आहे व ते बौद्धांच्या ताब्यात दिले पाहीजे असा या आठवड्यात अचानक एकदम उद्रेक झाला, सोशल मिडीयावर सगळीकडे तीच चर्चा सुरु झालेली दिसली, जो तो सर्व मुद्दे विसरुन फक्त आयोध्या मंदिर आता बौद्धांनी मिळवले पाहीजेच असा सुर उमटायला सुरवात झालेले दिसले, यात भाजपात असलेले रामदास आठवले व इतर संघाचे गुलाम असलेले बहुजन नेते प्रामुख्याने ही मागनी करताना दिसले या गोष्टीला अधोरेखित केले पाहीजे.

★आयोध्या हे बौद्ध क्षेत्र आहे यासाठी जे कोर्टात केस लढत आहेत त्या वीनीतभाई मौर्य यांच्याशी स्वतः फोनवर बोललो आहे, ते म्हणाले की सोशल मीडियावर जी कोर्टाने बौद्धांच्या बाजुने निकाल दिला आहे अशी बातमी व्हायरल होत आहे ती फेक आहे ,कोर्ट त्यांचे काही ऐकुनही घेत नाही, मागच्या तारखेला तर यांना बोलुही दिले नव्हते,तरी या बद्दल खोट्या बातम्या पसरवुन समाजात संभ्रम व अस्थिरता निर्माण केली जात आहे, आद विनीत मौर्य यांनी खंत व्यक्त केली की त्यांच्याकडे केस लढायला पैसेही कमी पडत आहे, सोबत त्यांचा नंबर देतो ज्यांना सविस्तर माहीती हवी असेल त्यांनी विनीत मौर्य स्वता कॉल करुन मिळवावी हि विनंती ( 9919519333 )

कोरोना ने जगात थैमान घातले, भारतातही मार्च महिण्यापासुन लॉकडाऊन लावला गेला,
कोणत्याही नियोजनाशिवाय देशात लॉकडाऊन लावला गेला, भारतीय मजुर, कामगार, हातावर पोट असणारा प्रत्येक नागरिक उद्धस्त झाला, देशातील जवळपास शंभर कोटी पेक्षा जास्त नागरिकांचे जीवन उध्वस्त झाले,पन मीडिया मधुन मात्र ईतर देशांपेक्षा भारत किती चांगल्या स्थितीत आहे असाच प्रचार लावुन धरला, हजारो किलोमिटर चालुन घरी पोचलेला कानगार किंवा गावाबाहेर अस्पृश्यासारखे जगत असलेला क्वारंटाईन मजुर याची व्यथा मिडीयाने लपवली, नियोजन शुन्यता किंवा जानीवपुर्वक केले असेल पन आज देश उद्धस्त झालेला आहे, या सर्वांचा रोष मीडिया व आरएसएस भाजपाच्या आयटी सेलने चायना कडे वळवण्याचा प्रयत्न केला, पन हा रोग चायना ने भारतात आणुन सोडलेला नाही तर जे भारतीय कामगार विदेशात कामाला होते त्यांच्याकडुन नकळत हा आजार भारतात आलेला आहे हे सर्वांना मान्य असेल,

जगभरातुन भारतात आलेल्या प्रत्येक प्रवाशांचा विजा नंबर, पासपोर्ट नंबर व पत्ता सरकार कडे असतो तरीही या सर्वांना न तपासता त्यांना आपापल्या घरी जाऊ दिले गेले,
त्यांच्यापैकी ज्यांना या वायरस ची लागन झालेली त्यांनी तो व्हायरस देशात पसरवला व आज संपुर्ण देश मरन संकटात आलाय,

सरकारने सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळे लॉक करुन तेथे सर्व प्रवाशांची तपासनि केली असती,विदेशातुन आलेल्या फक्त लाखभर प्रवाशांची तपासनी करुन त्यांना घरी सोडले असते तर 130 कोटी नागरिक उद्धस्त झाले नसते, त्यामुळे याला मी पुर्वनियोजित कट म्हणतोय.

सरकारने नोटबंदी करुन जनतेचे कंबरडे मोडले, नंतर जिएसटी लावुन व्यापार्यांचे कंबरडे मोडले, आता लॉकडाऊन लावुन 100% मजुरांचे जीवन मातीत मिळवले आहे,  इतके सर्व करुनही पुन्हा मिडीयाच्या आधारे हेच लोक देशाचे तारनहार घोषित केले जातील, पन देश म्हणजे जनताच ना, जी आज पुर्नतः उद्धस्त झालेली आहे,

★सरकारच्या मागच्या सात वर्षातील अपयशांना झाकण्यासाठी कोरोनाचा रामबाण म्हणुन उपयोग करुन घेण्यात संघ परिवाला यश आले आहे, सरकाने सहा वर्षात बुडवलेल्या अर्थव्यवस्थेचे खापर आता लॉकडाऊनवरच टाकले जाणार आहे,
 या सर्व पार्श्वभुमीवर भारतातील बौद्ध समाजच फक्त सरकारला धारेवर धरत होते, सरकारच्या प्रत्येक गोष्टीवर बारिक नजर ठेवुन होते,

मागच्या आठवड्यातच अॅड प्रकाश आंबेडकरांनी कोरोना हा रोग मोदीने देशात आनला आहे, व कोरोना मुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या परिवाराने मोदीवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा असे अवाहन जनतेला केले होते व त्याच बरोबर देशातील सर्व मंदिरांची संपत्ती ही सरकारने ताब्यात घेऊन त्याचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी करावी असे सुचवले होते. पन हे सरकार धर्मवेडे व धर्मांध लोकांच्या खांद्यावर तरले आहे, उभे आहे, त्यांनी या बौद्ध समाजाला बदनाम करण्यासाठी किंवा बौद्धांना डायवर्ट करण्यासाठी
नवा मुद्दा चर्चेत आनला आहे की आयोध्या मंदिर हे प्राचिन बौद्ध मंदिर आहे व ते आता बौद्धांनी ताब्यात घेतले पाहीजे...

होय, तेच नाही तर भारतातील सर्वच प्राचीन मंदिले ही बुद्ध विहारे व स्तुपेच आहेत हे आम्हालाही माहीत आहे, तिरुपती बालाजी, पंढरपुरचे विठ्ठल मंदिर, उडीसाचे, केरळे सर्व मंदिरे ही प्राचीन बौद्ध मंदिरेच आहेत, यावर शंभर वर्षांपासुन संशोधन होत आहेत,
महान सम्राट अशोकाने ८४,००० स्तुपे बनवली होती त्यामुळे भारतातील कोणत्याही डोंगरावर टिकाव मारला तर तेथे फक्त बुद्ध सापडतात,  या देशाचा सुवर्ण काळ बौद्ध काळालाच म्हटले जाते.

★ ऐन लॉकडाऊन काळात बौद्धांना राम मंदिर की बुद्ध विहार या वादात गुंतवण्यामागचे कारण काय?

भाजपाचे राजकीय अपयश जनतेसमोर मांडणार्या बौद्ध समाजाला मोदी कडुन एका वेगळ्या विषयाकडे वळवले पाहीजे हा एकच मुद्दा यामागे आहे, सहा दिवसा पासुन बौद्ध लोक मोदीच्या कुकर्मावर चर्चा करने बंद करुन बौद्ध मंदिर की राम मंदिर यावरच अडकुन पडलेले दिसत आहेत यातच संघ परिवाराचा विजय आहे.

 ★ काही बोद्ध म्हणत आहेत की हा मुद्दा अंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायची वेळ आहे.
 मित्रांनो, सार्या जगाला माहीत आहे की भारत ही बुद्धभुमी आहे व येथे सम्राट अशोकाने हजारो विहार स्तुपे बांधली होती व ती सर्व मुस्लिम व हिंदु कर्मठांनी मोडुन तोडुन टाकली होती,

जगाला हे पन माहीत आहे की जगातील प्रत्येक बौद्धाचे श्रद्धास्थान असलेले महाबोधी विहार, बुद्धगया हे ब्राह्मनांच्या ताब्यात आहे व त्यासाठी शंभर वर्ष लढा सुरु आहे.

जगाला हे पन माहीत आहे की या देशात ज्यांनी बौद्ध धम्म संपवला त्या विचारांचे लोक आता सत्तेवर आले आहेत

जगाला हे पन माहीत आहे की २००७ साली बुद्धगया विहारात झालेले बॉम्बस्फोट हे हिंदु अतिरेक्यांनी केले होते.

वरील कोणता मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर निकालात निघाला आहे का? कोणत्या मुद्याला न्याय मिळाला आहे का?  याचे एकच उत्तर आहे .....नाही.

म्हणुन आपन थोडा वेळ संयंम पाळावा लागेल,
जग कोरोनाशी लढत असताना बौद्ध लोक मात्र एका मंदिरासाठी झगडत होते असा आपल्यावर कंलंक लावला जाईल, जो बौद्ध समाज आज मोदीच्या कोरोना आडुन होत असलेल्या षडयंत्रांना उघडे पाडतोय तोच समाज देश संकटात असताना मंदिर विहार वाद करत होता असा डाग आपल्यावर लावला जाणार आहे त्यामुळे आपन लॉकडाऊन संपेपर्यंत तरी संयम ठेवायला हवा.

आयोध्या बुद्धकालीन साकेत या पुस्तकात सविस्तर सिद्ध केले आहे की तेथे बुद्ध विहारच होते, व असे अनेक संशोधने आहेतच, आपल्यासाठी हा मुद्दा खुप महत्वाचा आहे पन त्या मुद्यावर आपन कोरोना संकट व लॉकडाऊन अासताना अडुन बसलो तर आपले तिहेरी नुकसान होणार आहे ते असे
१. बौद्ध लोक मोदीला घेरत आहेत ते काम मागे पडेल
२. बोद्धांना पुन्हा आयसोलेट करने त्यांना सोपे जाईल
३.बौद्ध लोक देशापेक्षा धर्माला महत्व देतात असा प्रचाल होईल..

संघ परिवाराचे हे हातखंडे नविन नाहीत त्यांनी मुस्लिमांसोबतही हेच खेळ खेळुन मुस्लिमांना आज अविश्वसनीय ठरवले आहे, मुस्लिमां विरुद्ध सर्व ओबीसी, बहुजनांना कंडीशनिंग केले गेले आहे तसेच आता बौद्धांबद्दल करण्याचे संघाचे मनसुबे आहेत.

त्यामुळे लॉकडाऊन संपेपर्यंत तरी आयोध्या राम मंदिर की बुद्ध विहार ही चर्चा थांबवावी असे मला वाटते आहे, आपन या देशाचे सच्चे नागरिक आहोत, भाजपाचा राजकीय नालायकपना झाकण्यासाठी आपला हातभार लागु नये साठी सतर्क राहीले पाहीजे, त्यांच्या जाळ्यात आपन अडकले नाही पाहीजे, नंतर आपन आपले सर्व मुद्दे घेऊन लढायचेच आहे.
भाजपाला तारक ठरेल अशा मुद्यांना आपन तुल दिली नाही पाहीजे. आपन त्यांचे काम सोपे करु नये.

★ या वादाला हवा देणारे नेते मंडळी आहेत रामदास आठवले, वामन मेश्राम, राजरत्न आंबेडकर व इतर भाजप धार्जिन नेते...माझे या महान नेत्यांना माझे खुले अवाहन आहे की जर तुम्हाला लॉकडाऊन काळात भाजपाने या मुद्याला समाजात पेरुन समाजाला व लोकशाहीला अडचनीत टाकण्याचे काही कारस्थान केले असेल असे वाटत नसेल किंवा तुम्हाला ते कळत नसेल तर

१. रामदास आठवले केंद्रात मंत्री आहेत त्यांनी राम मंदिर बद्दल सुप्रिम कोर्टात ती वादग्रस्त जागा राम लल्लाची आहे असा निर्णय दिला तो बदलण्यासाठी लोकसभेत कायदा करुन घ्यावा कारण त्याशिवाय सुप्रिम कोर्टाचा निर्णय बदलता येत नाही,

२ वामन मेश्राम - यांच्या संघटनेकडे समाजाचे अनगिनत रुपये जमा आहेत त्यातुन त्यांनी राममंदिर विरुद्ध केस लढणार्या विनीत बौद्ध यांची आर्थिक मदत करावी, कारण त्यांची आर्थिक अडचन आहे असे त्यांनी सांगीतले आहे.

३.राजरत्न आंबेडकर यांनी या लढाईचे स्वता नेतृत्व करावे,

नुसते सोशल मीडियावर मोठमोठे बोलुन काही होणार नाही, या तीन नेत्यांनी आयोध्या मंदिर की बौद्ध विहार याबद्दल नेतृत्व केले पाहीजे.जे लोक कायदेशीर लढत आहेत त्यांची मदत केली पाहीजे,
फेक बातम्या वाचुन कोर्टात प्रलंबित वादग्रस्त व अतिसंवेदनशील मुद्यांना पेटवुन संपुर्ण समाज अडचनीत येईल अशी भुमिका घेणे आता तरी टाळावे.

हे माझे वैयक्तिक विश्लेषन आहे, याच्याशी कुनी सहमत असावे असा अग्रह नाही. फक्त डोकं वापरावे व विचार करावा एवढी माफक अपेक्षा ठेवतो.

- मनोज नागोराव काळे, ठाणे
__________________________________

No comments:

Post a Comment

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...