Saturday, 18 April 2020

बामसेफ - संविधानाला समाज पातळीवर उध्वस्त करण्यासाठी कार्यरत असलेली संघटना. - मनोज नागोराव काळे.


बामसेफ - संविधानाला समाज पातळीवर उध्वस्त करण्यासाठी कार्यरत असलेली संघटना.
- मनोज नागोराव काळे.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील लोकशाही कशामुळे उध्वस्त होऊ शकते हे ठामपणे मांडले आहे, बंधुत्व किती महत्वाचे आहे हे मांडले आहे, सामाजिक लोकशाही निर्माण झाली नाही तर संविधानातुन मिळालेली राजकीय लोकशाही संपुष्टात येइल असा इशारा बाबासाहेबांनी दिला आहे. आणि लोकशाही टिकवण्यासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय यावर आधारित सामाजिक लोकशाही निर्माण करणे हे सर्वात मोठी देशसेवा आहे असे स्वतः बाबासाहेबांनी सांगीतले आहे.

आता आपन मुुख्य विषयाकडे वळुया, गेली जवळपास ४० वर्षांपासुन भारतात एक संघटना काम करते ती कामगारांची संघटना म्हणुन सुरु झाली, जी संघटना स्वताला सामाजिक, अराजकिय संघटन आहे असा दावा करते व बहुतेक काही अपवाद सोडला तर सर्व सरकारी कर्मचारी या संघटनेसाठी काम करत होते कालांतराने या संघटनांमधे नेतृत्व, पद प्रतिष्ठेच्या लालसेपोटी फुट पडल्या व आज अनेक शकले झालेले आपन पहात आहोत ती संघटना आहे बामसेफ.

बामसेफ ही संघटना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाला मुळातुनच उपटुन टाकण्यासाठी कार्यरत आहे असे माझे निरिक्षण आहे व ते मी आपणासमोर मांडतो आहे, आपन बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा सरनामा व बाबासाहेबांचे भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आगोदर भारतातील लोकशाहीच्या भवितव्या बद्दल दिलेले २५ नोव्हेंबर १९५० चे संविधान सभेतले शेवटचे भाषण वाचले असेलच, आता आपन संविधानाचा सरनामा, बाबासाहेबांनी लोकशाही संपण्यासाठी कारणीभुत ठरण्यासाठी वर्तवलेले धोके यांच्या अनुशंगाने बामसेफची थोडी उलटतपासनी करुयात. व त्यानंतर तुम्ही स्वतःच तुमच्या निष्कर्षाला पोचाल असा मला तुमच्या बुद्धीमत्तेवर विश्वास आहे.

1) आम्ही भारताचे लोक - म्हणुन बाबासाहेबांनी संविधानाची सुरवात केली आहे, त्यात सर्व 100% भारतीय लोकांना गृहित धरलेले आहे त्यात जात, धर्म, पंथ, लिंग असा कोणताही अपवाद ठेवला गेलेला नाही, त्यातुन कुणालाही कोणत्याही द्वेशापोटी वगळले गेले नाही.
पण गेली जवळपास चाळीस वर्षांपासुन बामसेफ ही संघटना काही जातींना या देशाचे नागरिक नसल्याचा प्रचार करत आहे, ज्या समाजांना खुद्द डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचे नागरिकत्व बहाल केले त्यांचे भारतीय नागरिकत्व जातीय द्वेशातुन नाकारनी हि एकमेव संघटना असावी. त्यासाठी त्यांना संविधाना पेक्षा DNA रिपोर्ट महत्वाचा वाटतो.

2) धर्मनिरपेक्षता - बाबासाहेबांनी या राष्ट्राला कोणत्याही एक विशिष्ट धर्माचे राष्ट्र ठरवण्यास विरोध होता कारण त्यामुळे देशात धार्मिक तेढ कायम राहीली असती, सर्व धर्मांना या देशाने स्विकारले आहे, पण बामसेफ हि संघटना धर्मद्वेश शिकवणारी शिबीरे, कैडर कैम्प आयोजित करते व त्यात उपस्थितांचे ब्रेनवॉशिंग करुन, हजारो वर्षा पुर्वी तुमच्यावर या समाजाने अन्याय केला आहे तुम्ही त्यांना या देशाबाहेर घालवले पाहीजे असा प्रचार करते, त्यासाठी ते स्वताला या देशाचे मुलनिवासी म्हणुन घेतात, हा मुलनिवासी शब्द संविधानात कुठेही सापडत नाही, या देशातील मुळ नागरिकांना आदिवासी म्हणुन ओळखले जाते पन बामसेफ या संघटनेने स्वताला या देशाचे आपण मुलनिवासी आहोत व ब्राह्मन विदेशी आहेत असा प्रचार करुन संविधानातील आम्ही भारताचे लोक या पहिल्या ओळीलाच निकालात काढले आहे.

3) बाबासाहेबांनी सांगीतले आहे की बंधुत्वाशिवाय स्वांतंत्र्य किंवा समता अस्तित्वात रहाणार नाही - बामसेफ या संघटनेचा बंधुत्वाशी दुरदुर पर्यंत काही संबंध दिसत नाही, हि संघटना देशात लोकशाही अासतानाही टोकाचा जातीवाद करते व जे कुनी परिवर्तनवादी यांच्या विचारांशी सहमत नसते त्यांना हे दलाल, गद्दार म्हणुन हिणवतात त्यामुळे काही लोक मजबुरी ने यांच्या जातीवादी भुमिकेला बळी पडलेले दिसतात.

4) श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य - हा अधिकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील प्रत्येक नागरिकाला संविधानातुन दिलेला अधिकार आहे पन बामसेफ संघटनेचे सर्व कार्यकर्ते हे प्रचंड कर्मठपने त्यांची विचारधारा मानण्यासाठी समाजाला जबरदस्ती करताना दिसते, एससी एसटी एन टी, ओबीसी या समाजातील हिंदु व्यक्तींनी त्यांच्या घरात हिंदु देव देवतांची उपासना केलेली यांना पटत नाही, हे लोक त्या लोकांना आंबेडकरद्रोही समजतात, ज्या आंबेडकरांनी श्रद्धा व उपासनेचा घटनेतुन अधिकार दिला त्याच आंबेडकरांचे नाव वापरुन सदर दलित बहुजनांवर विचार थोपवण्याचा प्रयत्न केला जातो. अन्यथा त्यांच्यावर बहिष्कार टाका असा उपाय सुचवतात, बहिष्कार हा मनुवादी संस्कृतीचा भाग आहे हे नोट केले जावे.

5) एकात्मता - भारतीय समाजात एकात्मता रहाणार नाही यासाठी हे संघटन त्यांच्या कार्यकर्त्यांकडुन जे लोक हिंदुंच्या सार्वजनिक सण उत्सवात सामिल होतात त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचे फतवे काढतात, त्यांना गद्दार म्हणुन हिनवतात, बाबासाहेबांनी सांगीतले होते की धर्म ही प्रत्येकाची आवश्यक व खाजगी बाब आहे तरीही त्यात हि संघटना हस्तक्षेप करताना दिसते.
धर्म हा वैयक्तिक आहे, आपल्या घरात आपन आपल्या धर्माचे हवे तसे पालन केले पाहीजे पन दरवाज्याची चौकट ओलांडुन जेव्हा आपन समाजात जातो तेव्हा आपले धर्म नियम न मानता आपन भारताचे नागरिक म्हणुन आपन संविधाााच्या सरनाम्यानुसार समानता व बंधुभावाने वागले पाहीजे या गोष्टीचा या संघटनेला काहीच गंध नाही.

6) विभुतीपुजा - व्यक्तीपुजा हा लोकशाहीतील सर्वात मोठा अडसर आहे असे बाबासाहेबांनी सांगुनही बामसेफने बाबासाहेबांच्या नावानेच हा सर्व खेळ मांडला आहे, बाबासाहेबांच्या नावाने हि संघटना बाबासाहेबांचेच विचारांची मोडतोड करताना दिसते.

7) डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या सर्व संघटनांची बदनामी करणे, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबियांची बदनामी करने हा एककलमी कार्यक्रम गेली चाळीस वर्ष हि संघटना करत आली आहे.

8) डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा उद्देश्य होता, या देशातील जातीव्यवस्था संपवने व जातीविहीन, वर्गविहीन समाजाची निर्मिती करणे. संविधानातुन बर्याच प्रमाणात ते झालेही पन बामसेफने बाबासाहेबांच्या जाती तोडो आंदोलनाला जाती जोडो आंदोलनाने रिप्लेस केले, जाती संपवण्याचे सोडुन प्रत्येक जातीची अस्मिता जागी करुन त्यांना त्यांच्या जातीचा अभिमान बाळगायला या संघटनेने शिकवले त्यासाठी यांनी प्रत्येक जातीतील एक महापुरुष शोधुन दिला व सर्व जातींमध्ये चढाओढीची स्पर्धा लावण्यात या संघटनेला यश आले.
आज मातंग फक्त जय लहुजी बोलतो, जय आण्णा बोलतो, माळी फक्त जय सावता, जय ज्योती बोलतो, चांभार जय रविदास बोलतो, वाल्मिकी समाज जय वाल्मिकी बोलतो...अन्यायाच्या प्रतिकारासाठी तयार झालेला जय भीम शब्द फक्त बौद्धांपुरता राहीला, त्याला तेथेही जय मुलनिवासीने बदलण्याचा डाव यांनी आखला होता पन तो फारसा यशस्वी झाला नाही.
उदा. मातंगाला बौद्धाने जय भीम केला तर तो उत्तरात थोड्या चढ्या आवाजात जय आण्णा किंवा जय लहुजी बोलतो,यामुळे समाजात दुरावा होत गेलाय हे आपन पहात आहोत. समाजाची एकात्मता तोडण्यासाठी असे अनेक हातखंडे बामसेफने तयार केलेत.

9) या संघटनेत सामिल होण्याची एकच अट असते तुम्ही ब्राह्मनाचा टोकाचा द्वेश केला पाहीजे, तुम्ही शीलवान नसाल, तुम्ही चारित्र्यवान नसाल तरी चालते पन तुम्ही बामनाला चोविस तास शिव्या देऊ शकत असाल तरच या संघटनेत तुम्हाला प्रवेश आहे. यामुळे 3% वाल्यांना नको तेवढे महत्व प्राप्त झाले आहे, चाळीस वर्ष हि संघटना बामनांना शिव्या देत राहीली व बामन हळुहळु गल्ली ते दिल्ली पर्यंतची सत्ता काबीज करुन बसला, बामसेफच्या चाळीस वर्षांच्या संघटनात्मक कार्याचे हे फळ आहे. निगेटिव पब्लिसीटीचा सिद्धांत बामनांनी योग्य रित्या वापरुन घेतला.
बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या संघटनेत ब्राह्मनांना येण्यास कधीच विरोध केला नाही, त्यांचा विरोध प्रवृत्तीला होता मानसाला नव्हता ( जेधे जवळकरांची ब्राह्मनांना चळवळीत सामिल करुन घेऊ नये हि सुचना बाबासाहेबांना धुडकावुन लावली होती)

बाबासाहेब आयुष्यभर सांगत राहीले की जन्माने कुणी ब्राह्मन होत नाही कुनी दलित होत नाही तर कर्माने दलित किंवा ब्राह्मन होतो.
पन बाबासाहेबांच्या या विचारांना पायदळी तुडवत बामसेफ सर्वच्या सर्व ब्राह्मनांचा सारखा द्वेश करते व तसा प्रचारही करते यामुळे आगरकर, दाभोळकर सारखा परत कुनी एखादा ब्राह्मन समाजसुधारक देशात तयारच होणार नाही याची पुर्ण खबरदारी बामसेफ घेते.

10) धर्मांतर चळवळ - डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी Anhilation of caste जातीसंस्थेचे उच्चाटन या ग्रंथात जाती च्या निर्मुलनाचे दोन मार्ग सुचवलेत धर्मांतर व अंतरजातीय विवाह. बाबासाहेबांनी या दोन्ही मार्गांचा स्वतः अवलंब केला आहे. बाबासाहेबांनी धर्मांतर केले व हिंदु धर्म सोडुन तथागतांचा धम्म स्विकारला व बाबासाहेबांनंतर आद भैयासाहेब आंबेडकरांनीही देशभरात धर्मांतर सोहळे घेतले पन या धर्मांतर चळवळीला रोखण्यासाठी बामसेफने मुलनिवासीची संकल्पना निर्माण केली, आपन आहोत त्या जातीत राहुन फक्त ब्राह्मनांना शिव्या देऊन क्रांती करु शकतो असा भ्रम तयार केला. बामसेफ ने तथागत बुद्ध सोडुन इतर सर्व महापुरुषांना त्यांच्या बैनर व हैंडबिलावर स्थान दिले, धर्मांतर चळवळीसाठी बामसेफने कधीही कसलेही कार्य केले नाही.

11) अंतरजातिय विवाह - जातीसंस्था मोडण्याचा दुसरा जालिम उपाय हा अंतरजातीय विवाह करने हाच आहे असा विश्वास बाबासाहेबांना होता, वंशशुद्धी राहीलेली नाही व ती नसेल तर जातीनिर्मुलन सोपे जाईल असा विश्वास बाबासाहेबांना होता म्हणुन त्यांनी स्वता दुसरा विवाह ब्राह्मन मुलीशी केला व समाजाला तसे करण्यासाठी मार्ग शोधुन दिला.
बामसेफने आरएसएसच्या विवाह न करताच कार्यकरण्याचे तत्व स्विकारले व बाबासाहेबांच्या अंतरजातीय विवाहाचा फॉर्म्युला कसा फेल करता येयील यासाठी सतत प्रयत्न केले.
ब्राह्मणांच्या मुली विषकण्या असतात असा प्रचार बामसेफने केला. यांच्या सर्व प्रमुख नेत्यांनी आरएसएस चे ब्रम्हचर्य स्विकारले व बाबासाहेबांसह सर्वच आंतरजातीय विवाह करणारांची बामसेफने अत्यंत खालच्या पातळीवर बदनामी केली.

12) महिलांशी गैरवर्तणुक - ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांकडे सर्व जग सर्वश्रेष्ठ शीलवान, चारित्र्यवान, प्रज्ञावान म्हणुन पहाते त्यांच्या नावाने चालणारी ही संघटना स्वतःच्या महिला कार्यकर्त्यांशी अतिषय नीचपनाने वागते, याबद्दल त्या संघटनेत काम केलेल्या महिलांनी तसे जाहीरने सांगीतले आहे, यु ट्युबर बर वामन मेश्राम एक्सपोज टाकले तरी सर्व विडीयो दिसतात ते आपन पाहु शकता, महिलांना,मुलींनी पुर्णवेळ कार्यकर्त्या व्हा असे सांगुन त्यांना परिषदेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी सात सात दिवसासाठी यायला सांगीतले जाते, स्वतः वामन मेश्राम वर तसे अनेक आरोप आहेत. विलास खरात चा तर कल्याण स्टेशनवर महिलांनी चपलांनी सत्कार केल्याचे मी ऐकले आहे.

13) आंबेडकर कुटुंबाची बदनामी - हा बामसेफ च्या कार्यकर्त्यांचा सर्वात आवडता छंद म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. बामसेफ आंबेडकर कुटुंबाची बदनामी कसे करते त्याचे काही ठळक मुद्दे

- बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर नेहरु साठी घरात दारुच्या बाटल्या ठेवायचे असे वामन मेश्राम जाहिर सभेत सांगतात.
- भैयासाहेब आंबेडकर सभेला आल्यास दारु मागायचे
- प्रकाश आंबेडकरांच्या घरात गणपती बसवतात
- सुजात आंबेडकरांची मुंज केली आहे.

पहा बाबासाहेब ते सुजात साहेब, बाबासाहेबांसह सर्व कुटुंबातील प्रत्येकावर वामन मेश्राम ने खोटे आरोप केलेले आहेत,
- भारिप बहुजन महासंघ, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल व आता वंचित बहुजन आघाडी यांची बदनामी करने, यांच्याबद्दल अफवा पसरवने, हा वामन मेश्राम व गैंग चा धंदा आहे.
भिडे विरुद्ध प्रकाश आंबेडकर असा राज्यभर संघर्ष पेटला होता तेव्हा सुद्धा मेश्राम व गैंग प्रकाश आंबेडकरांची बदनामी करत होते,
तेलतुंबडे विरुद्ध आरएसएस असा संघर्ष पेटलाय यावेळी ही बामसेफने तेलतुबंडेची बदनामी सुरु केली.
आंबेडकर भवन पाडले तेव्हा प्रकाश आंबेडकर विरुद्ध रत्नाकर गायकवाड व फडनविस असा संघर्ष होता त्यावेळोही बामसेफ ने प्रकाश आंबेडकरांचीच बदनामी केली होती.

14) राजकीय भुमिका - बामसेफ हे सामाजिक संघटन आहे असे ते बोलतात पन निवडणुकात यांचा पाठींबा नेहमी जातीवादी पक्षांनाच दिला आहे. मागील वर्षी घरानेशाही तुन लोकशाही ला मुक्त करण्यासाठी महाराष्ट्रात एक लोकक्रांती झाली, वंचित बहुजन आघाडीने मोठा तांडव केला, पन वामन मेश्राम नी यावेळी त्यांची राजकीय भुमिका मांडताना वंचित बहुजन आघाडी जो पक्ष बहुजनांची राजकीय गुलामी संपवणारे पर्व घडवत होते तेव्हा वामन मेश्राम ने वंचित आघाडीची बदनामी करत राष्ट्रवादी कॉंग्रेस ला जाहीर पाठींबा जाहीर केला. ज्या राष्ट्रवादी ला महाराष्ट्रातील जातीवादी पक्ष म्हणुन आंबेडकरी समाज त्यापासुन दुर रहातो.
तरीही बामसेफ त्यांनी राजकीय पाठींबा देतो हे विशेष.
15) आर्थिक गैरव्यवहार - बामसेफ या संघटनेकडे देशातील सर्वात जास्त पैसा जमा होतो, या हि संघटना कामगारांची असली तरी यांचा प्रमुख हा कामगार नाही, हि संघटना आजवर करोडो अरबो रुपये जमा करुन ती खाऊन बसली, कोणाला कोणताही हिशोब दिला गेलेला नाही, दिला जातही नाही.
बाबासाहेबांनी लोकवर्गनीतुन त्याकाळी एकट्याच्या जीवावर कॉलेज, होस्टेल, संस्था उभ्या केल्या पन बामसेफने अनगिनत पैसा गोळा करुन त्यातुन काहीही निर्माण केले नाही, सर्व पैसा खाऊन डकार सुद्धा दिला नाही.
यांच्या बद्दल त्याच संघटनेच्या काही पदाधिकार्यांनी 2015 ला बंड करुन वामन मेश्राम ची बदमाशी जनतेसमोर आनली होती पन बामन मेश्राम चे ब्रेनवॉश कार्यकर्ते मेश्राम समोर बाबासाहेबांचा अपमान सहन करतात तर बाकींचे काय?

16) सक्रिय आंबेडकरी कार्यकर्त्यांना डायवर्ट करने -
हा या संघटनेचा ठरलेला कार्यक्रम आहे, काही दिवस लक्ष ठेवले तरी कुनालाही याची प्रचिती येऊ शकते, ज्या ज्या वेळी आंबेडकरी कार्यकर्ते संघ भाजपाला एखाद्या मुद्दायवरुन घेरतात त्या त्या वेळी बामसेफ कडुन एखादा नविन मुद्दा चर्चेला आणुन सर्व कार्यकर्त्यांना संघ भाजपा च्या विरोधापासुन स्वताकडे डायवर्ट केले जाते, सक्रीय कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या बिनकामाच्या चर्चांमधे गुंतवुन ठेवुन संघ भाजपाचा रस्ता मोकळे करणे हाच एकमेव उद्देश्य असतो.

17) भारतीय लोकप्रतिनिधींसाठी बाबासाहेबांनी २२ प्रतिज्ञा दिलेल्या नाहीत, त्या प्रतिज्ञा धर्मांतरीत बौद्धांसाठी 1956 ला बाबासाहेबांनी दिल्या होत्या, त्या बौद्धांसाठी वैयक्तिक संविधानच आहेत पन प्रजासत्ताक भारताचा लोकप्रतिनिधी म्हणुन समाजात काम करत असताना संविधान हे त्यांच्यासाठी अनिवार्य असते, लोकप्रतिनिधी हा सर्व धर्म, पंथांचा सन्मान करणारा असावा असे बाबासाहेबांनी म्हटले आहे पण जर एखादा बहुजन लोकप्रतिनिधी सार्वजनिक धार्मिक सोहळ्यात, मंदिरात, एखाद्या सार्वजनिक समारंभात गेला तर बामसेफ चे कार्यकर्ते त्या नेत्याला गद्दार, आंबेडकर द्रोही ठरवतात, खरे पाहीले तर लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक जिवनात धार्मिक कट्टरवाद जोपासने हा आंबेडकरद्रोह आहे पण बामसेफ संविधानाच्या मोडमोडीची एकही संधी सोडत नाही. वरुन स्वताला बुद्धीजीवी असे बिरुद यांनी स्वता लावुन घेतलेले आहे.

मित्रांनो, भारतीय संविधान राजकिय पातळीवर भाजपा व आरएसएस संपवत आहे तर सामाजिक पातळीवर ते संपवायचे कठीन कार्य करण्यासाठी त्यांनी बामसेफ सारखी उपशाखा तयार करुन सोडलेली आहे हेच यातुन सिद्ध होते.
बाबासाहेबांचा धम्म, बाबासाहेबांचे संविधान, बाबासाहेबांची जाती अंताची चळवळ अपयशी करण्याचे सर्व प्रयत्न आंबेडकरी चळवळीचा बुरखा पांघरुन केले जात आहे,
हिरव्या गवतात हा हिरवा साप सोडला आहे, त्याला ओळखा व यांच्यापासुन सावध रहा.

बामसेफ नेहमी डॉ बाबासाहेबांचे रक्ताचे नाही तर आम्ही विचाराचे वारस आहोत असा प्रचार करत असते पन त्यांचे सर्व कार्य आंबेडकरांचे विचार गाडण्यासाठीच आहे हे सुर्यस्त्य आपणास दिसत नसले तर याच्यासारखे दुसरे दुर्दैव नाही.

- मनोज काळे,ठाणे 8169291009
____________________________

No comments:

Post a Comment

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...