श्रीमंत मराठ्यांचा कांगावा...!!
मराठा आरक्षणाच्या निमित्ताने श्रीमंत मराठे विरुद्ध गरीब मराठे असा शब्दप्रयोग करुन वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी विचार मांडले, म्हणून श्रीमंत मराठ्यांचा तिळपापड झाला...!!
म्हणे प्रकाश आंबेडकर मराठ्यांमध्ये भांडणं लावतं आहेत...!!
श्रीमंत मराठे पुढे येऊन रोखठोकपणे बाळासाहेब आंबेडकरांना ऊत्तर मागू शकले नाही म्हणून श्रीमंत मराठ्यांनी आपल्या मर्जीतील लोकांना कामाला लाऊन आरोप करु लागले की,प्रकाश आंबेडकर मराठ्यां मध्ये भांडण लावीत आहेत...!!
टि.व्ही चॅनल वरुन तशी हवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे...!!
श्रीमंत मराठ्यांनो तुम्ही सत्य किती दिवस झाकून ठेऊ शकता...??
महाराष्ट्रात मोजकेच मराठे आहेत की,ज्यांच्याकडे अरबो खरबो रुपयांची संपत्ती आहे...!!
साखर कारखानदार आहेत,सुत गिरणीचे मालक आहेत, दूध डेअरीचे मालक आहेत,शिक्षण महर्षी आहेत,सतत सत्तेत आहेत, हे सत्य तुम्ही नाकारु शकता का..??
परंतु महाराष्ट्रात संख्येने सर्वात मोठ्या असलेल्या मराठा जातीत मोठा वर्ग असा आहे की,तो अल्पभूधारक शेतकरी आहे, शेतमजूर आहे, शेतीशी निगडित अकुशल कामगार आहे, आर्थिकदृष्ट्या कमजोर आहे. हे सत्य तुम्ही नाकारु शकता का...??
मराठा जातीत सरळ सरळ दोन वर्ग आहेत एक श्रीमंताचा आणि दुसरा गरीबांचा, हे सत्य तुम्ही नाकारु शकता का..??
महाराष्ट्राच्या सत्तेत केवळ १६९ घराणेच आलटून पालटून सत्ता ऊपभोगतात हे सत्य तुम्ही नाकारु शकता का..??
आज रोजी जे मराठे श्रीमंत आहेत,त्यांची आर्थिक सुबत्ता कशामुळे...??
या प्रश्नाचे उत्तर शोधले तर सहजच लक्षात येते की, सत्तेतून आणि सहकारातून या वर्गाने आर्थिक संपन्नता मिळविली आणि सत्ता जातीच्या नावावर राजकारण करुन मिळविली हेही सत्य तुम्ही नाकारु शकता का...??
श्रीमंत मराठयांनी इतरांकडे बोट दाखविण्याच्या ऐवजी सरळ सरळ ऊत्तर द्यावे की,ज्या जातीच्या नांवावर तुम्ही गेली साठ वर्षे सत्तेत आहात त्या जातीसाठी तुम्ही काय केले..??
मराठा जातीचा आर्थिकदृष्ट्या विकास झाला असता तर आज आरक्षण मागण्याची वेळ आली असती काय..??
एकटे प्रकाश आंबेडकर यांनी रोखठोक आणि सत्य मांडले म्हणून तुम्ही त्यांना भांडणे लावता का.??
असा प्रश्न विचारता.मात्र मराठा आरक्षणावर विनायक मेटे यांनी सुद्धा शंका उपस्थित केली की, काही मराठ्यांनाच मराठा जातीला आरक्षण मिळू द्यायचे नाही, विनायक मेटे तर स्वत: मराठा आहेत आणि मराठा आरक्षणासाठी झटत आहेत त्यांचेंवरही हाच आरोप करणारं का.??
छत्रपती चे वंशज उदयनराजे भोसले आणि संभाजी राजे यांनी सुद्धा तोच सुर आवळला आहे की, काही मराठ्यांनाच मराठा आरक्षण मिळू द्यायचे नाही,त्यांचेवरही भांडणे लावण्याचा आरोप करणारं आहात का..??
श्रीमंत मराठ्यांच्या दहशतीमुळे गरीब मराठ्यांमधील अनेकजण सत्य मांडण्यास कचरतात हे वास्तव आहे...!!
आपल्या संपत्तीच्या आणि सत्तेच्या माजोरीतुन अनेकांना झुलवत ठेऊन, कित्येकांना बरेच आमिषे देऊन,तर कित्येकांना बर्बाद करुन तुम्ही जी दहशत निर्माण केली आहे त्यामुळे ब-याच जणांना सत्य समजूनही ते तोंड ऊघडतं नाहीत हे जमीनी वास्तव आहे...!!
जातीच्या नांवावर जी सत्ता मिळविली जाते ती जाऊ नये म्हणून श्रीमंत मराठे हा कांगावा करीत आहेत...!!
ज्या सहकारातुन संपन्नता मिळविली त्याच सहकाराच्या आडून किती शेतकऱ्यांना बर्बाद केले त्याचे उत्तर तुमच्याकडे आहे का..??
एका साखर कारखान्याच्या बाजुला तीस पस्तीस छोटे ऊद्योग उभे राहू शकतात ते तुम्ही ऊभे केले नाही याचे समर्पक उत्तर देऊ शकता का..??
रामदास आठवले सारख्या रोडवरच्या तरुणाला डायरेक्ट कॅबिनेट मंत्री बनविले आणि सतत सत्तेत बसविले तसे किती मराठा तरुणांना तुम्ही सत्ताधारी केले..??
या प्रश्नाचे समर्पक उत्तर तुमच्याकडे आहे का..??
प्रश्न अनेक आहेत, श्रीमंत मराठे त्या प्रश्नांची उत्तरे देण्याच्या भानगडीत पडत नाहीत,केवळ आपली आणि आपल्या नातेवाइकांची सत्ता कशी अबाधित राहील यासाठी नेहमीच दक्ष असतात म्हणून ती सत्ता जाऊ नये यासाठी श्रीमंत मराठयांनी कांगावा करायला सुरुवात केली आहे हे समस्त महाराष्ट्रातील जनतेने समजून घ्यावे हीच अपेक्षा...!!
जयभीम.
@.. भास्कर भोजने.
No comments:
Post a Comment