Friday, 23 October 2020

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!!

" #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत".

त्याचे स्पष्टीकरण असे...!!


     लॉकडाऊनमध्ये देश ठप्प झाला होता,गरीब माणूस एका सांजेचं जेवन मिळविण्यात असहाय्य झाला होता तेव्हा आंबेडकरवादी म्हणवून घेणारे कुठे होते...??

   देशातील मजुर हजारो किलोमीटर पायी चालत गेला तेव्हा आंबेडकरवादी म्हणवून घेणारे आणि सत्तेत असणारे कुठे होते...??

       गरीब माणूस आपला व्यवसाय बसला म्हणून भिकेला लागला होता तेव्हा सत्तेतील ठेकेदार , कारखानदार, घराणेशाही वाले, हातावर २८ लाखाचं घड्याळं बांधणारे,बीएमडब्लू गाड्यात ऊंडारणारे आणि बेगडी आंबेडकरवादी कुठे होते...??


   असे अनेक प्रश्न समाजासमोर कोरोनाच्या काळात ऊभे राहिले तेव्हा सगळे राजकीय पुढारी घरात बसून मजा बघत होते हे वास्तव आता कुणालाही सांगायची गरजच नाही...!!

       महाराष्ट्रात एकमेव वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर हे दौरे करीत होते आणि आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आदेश देऊन,कोरोना काळात धान्य वाटप करणे, रस्त्यावरच्या पायी चालणाऱ्या मजुराला जेवण आणि पाणी पुरविणे तथा गरीब वस्तीत राशन वाटप करीत होते हा इतिहास काही जुना नाही...!!


    बंद असलेला महाराष्ट्र सुरु करण्याचे श्रेय कुणाचे...??


  बंद महाराष्ट्र सुरु करण्याचे श्रेय केवळ आणि केवळ एकट्या बाळासाहेब आंबेडकर यांना जाते...!!

  त्याचे कारण असे की, सलून दुकाने उघडण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांनी पुढाकार घेतला आणि सलूनची दुकाने सुरू केली...!!

    छोट्या व्यवसाईकांची रोजीरोटी सुरू करण्यासाठी वंचित बहूजन आघाडीने आंदोलन केले आणि छोटे छोटे व्यवसाय सुरू झाले...!!

 अलूतेदार बलूतेदार वर्गाच्या रोजीरोटीचा प्रश्न बाळासाहेब आंबेडकर यांनी ऐरणीवर घेतला...!!

   संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी आणि एकाच वेळी डफली बजाव आंदोलन केले, बाळासाहेब आंबेडकरांनी नागपुरात डफली वाजविली आणि महाराष्ट्रातील एस टी बसेस सुरू झाल्या...!!

   मंदिर उघडण्यासाठी आंदोलन केले ते महाराष्ट्रात गाजले पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वारक-यांना परवानगी मिळाली आणि एसओपी तयार करून मंदिरे ऊघडू ही भाषा मुख्यमंत्री बोलले...!!


   एकंदरित भयग्रस्त समाजाला हिम्मत देण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांनी कार्यकर्ते घराबाहेर काढले लोकांना आंदोलने दिसु लागली आणि जनमाणसं भयमुक्त होण्यास मदत झाली म्हणूनच तर पंढरपूरला लाखों जनता रस्त्यावर उतरली...!!

   महाराष्ट्रातील मुख्यमंत्री महाराष्ट्र सुरु करण्यासाठी अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आंदोलनाला प्रतिसाद देतो आहे हे पाहून जुने जाणते काडीबाज आणि सरकारचे शिल्पकार म्हणवून घेणारे बुजुर्ग नेते कमालीचे अस्वस्थ झाले...!!

  आम्ही सत्तेत असुनही आमचे नाव कुणी घेतं नाही आणि संपूर्ण महाराष्ट्र आंबेडकर सुरू करीत आहेत, ही आंतरीक जळफळाट मनात खदखदत राहिली...!!


   वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर हे कोरोनाच्या संकट काळात जात आणि धर्माच्या पलिकडे जाऊन मानवतावादी भुमिका घेऊन सामाजिक मशागत करीत राहिले,त्याचा परिणाम असा झाला की, जनतेच्या लक्षात आले आहे...!!

 सत्तेत असणारे केवळ मतदानाच्या वेळी आपल्या दारात येतात मात्र आपल्यावर संकट आले तर ते कामी येतं नाही. या भावनेतून सत्ताधारी वर्गाबद्दल प्रचंड रोष आणि मानवतावादी भुमिका घेणा-या नेतृत्वाबद्दल कमालीचा आदर समाजमनात निर्माण झाला आहे...!!

  समाजातील ही भावना कायम राहिली तर आपली सत्ता जाणार या भितीपोटी सत्तेतील ठेकेदार, घराणेशाही वाले अस्वस्थ झाले आहेत...!!

    अॅड बाळासाहेब आंबेडकर हे नेहमी सडेतोड बोलतात आणि स्पष्ट आरोप करतात हा त्यांचा स्वभाव आहे...!!

    नरेंद्र मोदी यांच्यावर बाळासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा निशाना साधला नाही, यापूर्वी सुद्धा असेच आरोप केले आहेत...!!

   आरएसएस प्रमुख यांच्यावरही सडेतोड टिका बाळासाहेब आंबेडकरांनी केली आहे...!!

आरएसएसचे नागपूर येथील शस्त्रपुजन बाळासाहेब आंबेडकर यांच्या दबावामुळेच बंद झाले आहे...!!

 आरएसएसने संघाच्या मुख्यालयावर तिरंगा ध्वज भारिप बहुजन महासंघाच्या आंदोलनामुळेच लावला आहे हाही इतिहास आहे...!!


   त्यावेळी आंबेडकरवादी रामदास आठवले,तथा सुरेश माने यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या टिकेवर आक्षेप नोंदविला होता काय..??

     तुम्ही आंबेडकरवादी म्हणवून घेता आणि भाषा प्रस्थापितांची बोलता हे कशासाठी...??


   दलालांचे मालक वादग्रस्त विषयावर कधीच बोलतं नाहीत...!!

  ते दलालांना बिदागी देतात आणि बोलायला सांगतात,त्या अनुषंगाने यांची जीभ उचलली जाते...!!

  आंबेडकर महाराष्ट्रात सत्तेचे समीकरण बदलविणार म्हणून मालक सांगतील त्या प्रमाणे दलाल प्रवृत्तीचे लोक बोलतात हा संदर्भ लक्षात घ्यावा...!!

   प्रस्थापित राजकारण्यांच्या पोटातील खदखद बेगडी आंबेडकरवादी म्हणवून घेणारांच्या तोंडातून बाहेर पडते आहे...!!

   अॅड बाळासाहेब आंबेडकर हे चुकीचे बोलले असतील तर त्याचे उत्तर संबंधित राजकीय नेतृत्वाने द्यावे,त्या वक्तव्याचा समाचार दारुड्या नेच घ्यावा, आंबेडकरी म्हणवून घेणाऱ्या बुजगावण्याला कशाला पुढे करता...??

     आपलं अपयश लपविण्यासाठी सत्तेचे ठेकेदार पैशांच्या जोरावर माणसं कामाला लावतात आणि ज्यांना पैसाच सर्व काही वाटतो अशी माणसं पैशासाठी कोणत्याही प्रकारे तोंडाची वाफ घालवितात असा हा प्रकार आहे...!!

       जयभीम.

@.. भास्कर भोजने.

Saturday, 3 October 2020

*कॉंग्रेस कठपुतली बनले आहे*

लॉकडाऊन लाऊन पुर्ण देशाचा संघ व मोदीने सत्यानाश केला, पण आता चर्चा फक्त उत्तर प्रदेश व योगी यांच्यावर आणुन ठेवली, तिकडे कितीही नंगानाच केला तरी पचवता येतो, राम राज्य है ना वहा पे. 
 
आपन एबीपी माझा चे पत्रकार सुधारलोय म्हणुन हुरळुन जातोय पन संघ सर्व गोष्टी थंड डोक्याने व विचारपुर्वक करतो हे आपन विसरतो,
  तिसरी आघाडी स्थान निर्माण करत आहे हे लक्षात येताच राहुल व प्रियांका सारख्या फेल झालेल्या विरोधकांनाच पुन्हा स्थिर करायचा भाजपचा हा डाव आपल्या लक्षात कसा येत नाही?

भाजपकडची नाराज जनता तिसर्या आघाडी कडे न वळता पुन्हा कॉंग्रेस कडे वळावी हा साधा खेळ आहे.

पाच वर्षात किती दलित अत्याचारा बद्दल गांधी कुटुंब आक्रमक झाले व मनुवादी मीडियाने त्यांना सपोर्ट केला? या वेळीच का सर्व अद्भुत परिवर्तन दिसतय? 

भाजपाला राहुल गांधी सारखा विपक्ष नेता पाहीजे.

*बिहार निवडणुका प्रत्येकवेळी तिव्र विषमता व उघड जातीवादाच्या बेसवरच लढवली जाते, बिहार ला लैब सारखे वापरले जाते, मागच्या निवडणुकात आरक्षण संपवले पाहीजे अशा उघड भुमिका घेऊन भाजप निवडणुकात उतरले होते, यावेळी हाथरस व बाबरी चा जुलुम करुन निवडणुकाला सामोरे जात आहेत.

बिहार हे बुद्धभुमी आहे, तिकडे विकास होवो की न होवो, संघाला देनेघेने नसते, तिकडे ते तिव्र जातीवादाच्या बेसवर निवडणुका लढुन जनमत तपासत असतात.
बहुजनांनी कॉंग्रेस व भाजपा या दोन्ही पासुम सावध रहायला पाहीजे, गेली 65 वर्ष कॉंग्रेसने तेच केले जे आता 7 वर्ष भाजपा करत आहे, हे दोन्ही पक्ष वैदिक जानवेधारी विचारधारेचेच आहे, राहुल गांधी ने लोकसभा निवडणुकात जानवे जाहिर पने दाखवले होते. 

- मनोज काळे.

Thursday, 1 October 2020

कॉंग्रेसचे नरकाश्रू...!!




     काल ऊत्तर प्रदेशातील हाथरस येथे कॉग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांना ऊत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केली असा कांगावा करीत कॉग्रेस पक्ष रस्त्यावर ऊतरला आहे...!!
    दलितांची सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न कॉंग्रेस पक्ष करीत आहे...!!
  खरं म्हणजे कॉग्रेस आणि भाजप मध्ये काहीच फरक नाही, हे आता देशातील दलित आणि मुस्लिम समुहाला कुणीही सांगायची गरजच राहिली नाही,एवढं मोठं अनुभवाच गाठोड जनतेच्या जवळ जमा झालं आहे...!!
  १९७३ मध्ये गरीबी हटाव चा नारा देणारा कॉग्रेस पक्ष किती दगलबाज आहे हे आता पुन्हा पुन्हा सांगायची गरजच नाही...!!
,गरीब अधिक गरीब झाला तथा दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीची टक्केवारी वाढतचं गेली...!!
  कॉंग्रेस पक्षाच्याच सरकारने भांडवली निर्णय घेऊन खाजगीकरण केले देशात भांडवलदारांसाठी नवं दालनं उघडलं आणि नवा भांडवलदार वर्ग निर्माण झाला...!!

 गरीबांच्या नांवानें दलितांची मते घेतली आणि काम मात्र भांडवलदार भावंडासाठी केलं हे आज सिद्ध झालेले आहे.आता कॉग्रेस पक्षाने आणखी नौटंकी करु नये...!!

   कॉंग्रेस का हाथ,गरीबोके साथ...!!
अशी भावनिक साद घालायची मात्र गरीबांना देशोधडीला लावायचं काम कॉग्रेस पक्षाने केले याचा अनुभव देशातील जनतेने घेतला आहे...!!
      दलित, मुस्लिम समाजाची मते घेऊन कॉग्रेस पक्षाने संपूर्ण देशात जातदांडगे नेते निर्माण केले, घराणेशाही मजबुत केली आणि जातियवाद  मजबूत केला,त्याचीच फळे आज दिसतं आहेत...!! 
 दलितांवर इथला मोठ्या जातीचा धनदांडगा हा जातीय अत्याचार आणि अन्याय करतो आहे...!!
   ज्या हाथरस गॅंगरेप प्रकरणाचा निषेध नोंदवायला राहुल गांधी आणि प्रियंका गांधी चालल्या होत्या ते बलात्कारी कोण आहेत,..??
 ऊत्तर प्रदेशातील जातदांडगे "ठाकुर" जातीचे नराधम आहेत...!!
ऊत्तर प्रदेशातील या जातदांडग्यांना आजपर्यंत कॉग्रेस पक्षानेच मोठे केले आहे हे पाप कॉग्रेस पक्षाचेच आहे...!!
      महाराष्ट्रात कॉग्रेस पक्षाचे सरकार असतांनाच खैरलांजी हत्याकांड घडले ते हत्याकांड जगाच्या वेशीवर टांगल्या गेले तरीही त्या हत्याकांडातील आरोपींना शिक्षा झाली नाही कारण उघडं आहे, सत्ताधारी पक्षाने पोलिस प्रशासनाला वापरून पुरावे नष्ट केले,कच्चे दुवे ठेवले आणि वरुन अतिरेक करीत त्याच खैरलांजी गावाला तंटामुक्त पुरस्कार दिला...!!
   महाराष्ट्रातील मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाच्या आडुन दलितांची प्रचंड नाकेबंदी कॉग्रेस पक्षाच्याच सरकारने केली होती हा अनुभव आहे...!!
    एक नाही अनेक घटना आहेत की, देशात दलितांवर अन्याय,अत्याचार हे कॉग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केले आहेत आणि सत्तेच्या माजोरीवर ते दडपून टाकण्यात आले आहेत...!!
     आजही बेशरम कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते राहुल गांधींच्या धक्काबुक्की साठी रस्त्यावर उतरले मात्र ते मनिषा वाल्मीकी या तरुणीला न्याय मिळावा अशी मागणी करीत नाहीत...!!
 त्यांना दलित मुलीवर बलात्कार झाला किंवा दलितांवर अन्याय होतो याच्याशी काही देणंघेणं नाही...!!
   केवळ राहुल गांधी,राहूल गांधी असा टाहो फोडाणारा मिडिया आणि मनुवादी कॉग्रेशी एकाच मानसिकतेचे प्रतिक आहेत,त्यांना दलित मुलीला न्याय मिळाला पाहिजे याच्याशी काही देणंघेणं नाही...!!
  *भाजप आणि काँग्रेस पक्षाचं आर्थिक धोरणं एकच आहे...!!
* भाजप आणि काँग्रेस पक्षाचं निर्गुंतवणीकीचं धोरण एकच आहे...!!
* भाजप आणि काँग्रेस पक्षाचं भांडवलदार धार्जीन धोरणही एकसमान आहे...!!
* भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी वेळोवेळी आरएसएस या वैदिक संघटनेला मदतचं केली आहे...!!
*बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्याचा मनसुबा भाजपाने आखला मात्र त्याला मुर्त रुप कॉग्रेस पक्षाच्या नरसिंहराव सरकारने दिले....!!
* भाजप धर्माच्या नावाने तर कॉग्रेस जातीच्या नावावर राजकारण करतो...!!
 * कॉंग्रेस पक्षाने लोकशाही संपवून आणिबाणीचा प्रयोग केला होता,तोच प्रयोग आजच्या भाजपच्या सरकारनेही सुरू केलेला आहे...!!

मग कॉग्रेस आणि भाजप मध्ये फरक कोणता आहे...??

  दर पाच वर्षांनी जेव्हा जेव्हा निवडणूका येतात तेव्हा तेव्हा भारतीय जनतेला फसविण्यासाठी या दोन्ही पक्षांची नाकटे सुरू होतात...!!
  तु मारल्या सारखे कर...!!
  मी रडल्या सारखे करतो...!!
 हा नाटकाचा प्रयोग सुरू झाला आहे...!!

  म.गांधीच्या हत्येनंतर जर आरएसएस वर कायमची बंदी घातली गेली असती तर आजचा दिवस दिसला नसता, परंतु कॉग्रेस पक्षाने सत्तेसाठी म.गांधीच्या हत्येचाही वापर केला आणि गांधी तत्वज्ञान गुंडाळून ठेवले...!!
 तीच कॉग्रेस दलितांना काय न्याय देऊ शकेल...??
  कॉंग्रेस पक्ष आता सत्तेसाठी नरकाश्रू गाळते आहे हे जनतेला पटलेले आहे...!!
   जयभीम.
@.. भास्कर भोजने.

Saturday, 26 September 2020

गरीब मराठ्यांनो...!!

गरीब मराठ्यांनो...!!

      गरीब मराठा बांधवांनो, एकेकाळी संपन्न असलेल्या मराठा समाजाला आरक्षण मागायची वेळ का आली.?? या प्रश्नाचे उत्तर मिळवावे लागेल...!!
      झालेल्या चुका टाळल्या शिवाय,प्रगती साधता येणार नाही, आरक्षण हा एकच पर्याय डोळ्यासमोर ठेवून पुढिल वाटचाल केली तर पुन्हा फसगत होण्याची दाट शक्यता आहे...!!
 आरक्षणामुळे विकास साधता येतो हा समज निर्माण झाला आहे...!!
   आरक्षणामुळेच आंबेडकरी समुहाचा विकास झाला असाही समज निर्माण झाला आहे...!!
  आणि म्हणूनच मग
   आरक्षण संपवण्यासाठी मनुवादी गिधाडे संपूर्ण सरकारी खात्यांच खाजगीकरण करीत आहेत...!!
   खाजगीकरणातून आरक्षण संपले तर मग आरक्षण मिळूनही समस्त समाजाचा विकास साधता येईल का...??
   आरक्षणामुळे नोकरी मिळेल मात्र नोकरीचे क्षेत्र किती टक्के आहे.२% नोकरीत संपुर्ण समाजाला न्याय देता येईल का...??
    सारासार विचार करता आरक्षणा सोबतंच काही मुलभूत बाबींचा विचार सुद्धा करावा लागेल...!!
  ज्या महाराष्ट्रात मराठा जात ही प्रबळ असतांनाच आणि गेल्या साठ वर्षात महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मराठा नेतृत्व असतांना मराठा समाजचं कसा रसातळाला गेला याचाही विचार व्हायला हवा की, नको...??
   ज्यांनी जातीच्या नावावर मते मागितली आणि सत्तेत बसले त्यांनी जातीचा विकास केला का..??
ऊत्तर नकारार्थी आहे...!!
  ज्यांनी जातीच्या नावावर मते मागितली त्यांनीच जातीच्या ऐवजी आपली घराणेशाही मजबुत केली, हेही समजून घ्यावे लागेल...!!
   केवळ सत्ताच उपभोगली नाही तर प्रचंड आर्थिक सुबत्ता हस्तगत केली हेही समजून घ्यावे लागेल...!!
    काही मोजक्या लोकांचे वारसदार परंपरागत पद्धतीने सत्तेचे ठेकेदार झाले आहेत आणि सत्तेतून संपत्ती वान बनले आहेत...!!
   पहिल्या पिढीतील शरद पवार साहेब...!
 दुसऱ्या पिढीतील अजित पवार साहेब आणि सुप्रिया ताई सुळे...!!
 तिसऱ्या पिढीतील पार्थ पवार आणि रोहित पवार ही घराणेशाही कुणाच्या वाट्याची सत्ता ऊपभोगतं आहेत,? याचाही विचार करावा लागेल...!!

 जसे पवार घराणे तसेच नांदेडचे चव्हाण घराणे,तसेच विखे पाटलांचे घराणे एक नाही अनेक घराणे प्रस्थापित झाले,सतत सत्तेत राहिले मात्र आपलेच भाऊबंद आर्थिकदृष्ट्या मागे पडतं आहेत याचा कधीच विचार केला नाही आणि सत्तेचा त्यासाठी वापरही केला नाही...!!
 ज्यांच्या मतांवर सत्तेत बसलो त्यांच्यासाठी सत्तेचा योग्य वापर केला असता तर कदाचित आज मराठा समाजाला आरक्षण मागायची वेळ आली नसती.हा विचार कधीतरी सत्ताधारी मराठा नेत्यांनी केला आहे का..?? किंवा तशा प्रकारची खंत कधीतरी व्यक्त केली आहे का..??

  सत्तेशिवाय सहकाराचे मोठे क्षेत्र मराठा समाजाच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्राने विकसित केले,देशाला दिलेली ती महाराष्ट्राची देणगी आहे एवढं महत्त्वाचं आणि पुढचं पाऊल टाकणार काम महाराष्ट्राने केले आहे...!!
 सहकार क्षेत्राचं खोबरं कुणी केलं...??
 कारखान्याच्या नांवावर किती सरकारी निधी मिळविला आणि तरीही कारखाना अवसायनात कसा गेला,?? हेही समजून घ्यावे लागेल...!!
  सहकारी कारखाना घाट्यात आणि तोच कारखाना खाजगी झाला की,नफ्यात चालतो हे गौडबंगाल सुद्धा समजुन घ्यावे लागेल...!!
     एका साखर कारखान्याच्या बाजुला तीस पस्तीस छोटे छोटे ऊद्योग उभे राहू शकतात अशी रोजगार निर्मिती आणि समाज विकासाची संधी असुनही ते छोटे ऊद्योग महाराष्ट्रातील साखर कारखान्याच्या बाजुला उभे का राहिले नाही.?? याच्या पाठिमागचे कारण काय..??
साखर कारखानदारांना विकासाची बुद्धी नाही का..??
 साखर सम्राटांना विकासाची दृष्टी आहे मात्र स्वत:पुरती मर्यादित आहे, समाजासाठी नाही...!!
  त्यांना कुणीही प्रतिस्पर्धी तयार होऊ द्यायचा नव्हता म्हणूनचं तर छोटे ऊद्योग उभे राहू दिले नाही...!!
  आणखी एक बाब समजून घेतली पाहिजे, राजकीय पटलावर रामदास आठवले सारखा रोडवरचा तरुण उचलून गरीब घरचा पोरगा ऊचलला आणि कॅबिनेट मंत्री बनविला,त्याला कायम सत्तेतच बसविले तसे किती गरीब मराठा तरुणांना संधी दिल्या गेली याही दिशेने गरीब मराठा बांधवांनी विचार केला पाहिजे...!!
  अनेक अर्थाने आणि चौफेर विचार करून गरीब मराठा बांधवांनी आपल्या विकासासाठी आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे हे लक्षात घ्यावे...!!
 कु-हाडीचा दांडा गोतास काळ...!!
 घरका भेदी लंका ढाये....!!
 या बोध वाचनातून काही बोध घेता येईल का...??
  जयभीम.
@.. भास्कर भोजने.

Thursday, 24 September 2020

वंचित बहूजन आघाडीची राष्ट्रीय पक्षाच्या दिशेने वाटचाल...!!




       देश पातळीवर आंबेडकरवादी विचाराचा पक्ष ऊरला नाही, जी अपेक्षा बसपा कडुन जनतेला होती त्या अपेक्षेला छेदून बसपाने राजकीय डावपेच खेळले...!!
   बसपा भाजपच्या मांडीवर जाऊन बसली सत्तेची फळे चाखली आणि जनतेच्या मनातून बसपा हद्दपार झाली...!!
   त्याचाच परिणाम म्हणजे उत्तरेकडील राज्यांत पंजाब हरियाणा बिहार आणि दिल्ली मधील बसपाचा जनाधार संपला , आणि बसपा केवळ ऊत्तरप्रदेशा पुरती सीमित झाली...!!
  एवढेंच नाही तर बसपाचा उत्तर प्रदेशातील जनाधार सुद्धा घसरला आहे, हे २०१४ आणि २०१९ च्या निवडणूकीत सिद्ध झाले आहे...!!
   म्हणून देश पातळीवर आंबेडकरवादी विचाराचा पक्षाची नितांत गरज लक्षात घेऊन वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी, वंचित बहूजन आघाडीचा परिघ विस्तारायला सुरुवात केली आहे...!!
  मध्यप्रदेशातील पोटनिवडणुकीच्या २७ जागा वंचित बहूजन आघाडी लढवित असुन,आता बिहार विधानसभेत सुद्धा बहूजन आघाडी ऊतरली आहे...!!
   यापुर्वीही वंचित बहूजन आघाडीने कर्नाटक विधानसभेच्या आठ जागांवर उमेदवार ऊभे करुन जनतेचा कौल घेतला होता...!!
     आज रोजी देशात फॅसिस्ट शक्ती विरोधात लढण्यासाठी आंबेडकरवादी विचारधारेची नितांत गरज निर्माण झाली आहे...!!
   वंचित बहूजन आघाडीचा विस्तारलेला परिघ देशातील वंचित समुहाला निश्र्चितच न्याय देऊ शकेल याची शाश्वती वाटते...!!
 कारण गेल्या ४० वर्षाच्या राजकीय जीवनात वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी कधीही विचारांशी तडजोड केली नाही हेचं त्यांच साफसुथर चारित्र्य उद्याच्या जनसामान्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणू शकते हा विश्वास वाटतोय...!!
      जयभीम.
@.. भास्कर भोजने.

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...