Saturday, 26 September 2020

गरीब मराठ्यांनो...!!

गरीब मराठ्यांनो...!!

      गरीब मराठा बांधवांनो, एकेकाळी संपन्न असलेल्या मराठा समाजाला आरक्षण मागायची वेळ का आली.?? या प्रश्नाचे उत्तर मिळवावे लागेल...!!
      झालेल्या चुका टाळल्या शिवाय,प्रगती साधता येणार नाही, आरक्षण हा एकच पर्याय डोळ्यासमोर ठेवून पुढिल वाटचाल केली तर पुन्हा फसगत होण्याची दाट शक्यता आहे...!!
 आरक्षणामुळे विकास साधता येतो हा समज निर्माण झाला आहे...!!
   आरक्षणामुळेच आंबेडकरी समुहाचा विकास झाला असाही समज निर्माण झाला आहे...!!
  आणि म्हणूनच मग
   आरक्षण संपवण्यासाठी मनुवादी गिधाडे संपूर्ण सरकारी खात्यांच खाजगीकरण करीत आहेत...!!
   खाजगीकरणातून आरक्षण संपले तर मग आरक्षण मिळूनही समस्त समाजाचा विकास साधता येईल का...??
   आरक्षणामुळे नोकरी मिळेल मात्र नोकरीचे क्षेत्र किती टक्के आहे.२% नोकरीत संपुर्ण समाजाला न्याय देता येईल का...??
    सारासार विचार करता आरक्षणा सोबतंच काही मुलभूत बाबींचा विचार सुद्धा करावा लागेल...!!
  ज्या महाराष्ट्रात मराठा जात ही प्रबळ असतांनाच आणि गेल्या साठ वर्षात महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मराठा नेतृत्व असतांना मराठा समाजचं कसा रसातळाला गेला याचाही विचार व्हायला हवा की, नको...??
   ज्यांनी जातीच्या नावावर मते मागितली आणि सत्तेत बसले त्यांनी जातीचा विकास केला का..??
ऊत्तर नकारार्थी आहे...!!
  ज्यांनी जातीच्या नावावर मते मागितली त्यांनीच जातीच्या ऐवजी आपली घराणेशाही मजबुत केली, हेही समजून घ्यावे लागेल...!!
   केवळ सत्ताच उपभोगली नाही तर प्रचंड आर्थिक सुबत्ता हस्तगत केली हेही समजून घ्यावे लागेल...!!
    काही मोजक्या लोकांचे वारसदार परंपरागत पद्धतीने सत्तेचे ठेकेदार झाले आहेत आणि सत्तेतून संपत्ती वान बनले आहेत...!!
   पहिल्या पिढीतील शरद पवार साहेब...!
 दुसऱ्या पिढीतील अजित पवार साहेब आणि सुप्रिया ताई सुळे...!!
 तिसऱ्या पिढीतील पार्थ पवार आणि रोहित पवार ही घराणेशाही कुणाच्या वाट्याची सत्ता ऊपभोगतं आहेत,? याचाही विचार करावा लागेल...!!

 जसे पवार घराणे तसेच नांदेडचे चव्हाण घराणे,तसेच विखे पाटलांचे घराणे एक नाही अनेक घराणे प्रस्थापित झाले,सतत सत्तेत राहिले मात्र आपलेच भाऊबंद आर्थिकदृष्ट्या मागे पडतं आहेत याचा कधीच विचार केला नाही आणि सत्तेचा त्यासाठी वापरही केला नाही...!!
 ज्यांच्या मतांवर सत्तेत बसलो त्यांच्यासाठी सत्तेचा योग्य वापर केला असता तर कदाचित आज मराठा समाजाला आरक्षण मागायची वेळ आली नसती.हा विचार कधीतरी सत्ताधारी मराठा नेत्यांनी केला आहे का..?? किंवा तशा प्रकारची खंत कधीतरी व्यक्त केली आहे का..??

  सत्तेशिवाय सहकाराचे मोठे क्षेत्र मराठा समाजाच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्राने विकसित केले,देशाला दिलेली ती महाराष्ट्राची देणगी आहे एवढं महत्त्वाचं आणि पुढचं पाऊल टाकणार काम महाराष्ट्राने केले आहे...!!
 सहकार क्षेत्राचं खोबरं कुणी केलं...??
 कारखान्याच्या नांवावर किती सरकारी निधी मिळविला आणि तरीही कारखाना अवसायनात कसा गेला,?? हेही समजून घ्यावे लागेल...!!
  सहकारी कारखाना घाट्यात आणि तोच कारखाना खाजगी झाला की,नफ्यात चालतो हे गौडबंगाल सुद्धा समजुन घ्यावे लागेल...!!
     एका साखर कारखान्याच्या बाजुला तीस पस्तीस छोटे छोटे ऊद्योग उभे राहू शकतात अशी रोजगार निर्मिती आणि समाज विकासाची संधी असुनही ते छोटे ऊद्योग महाराष्ट्रातील साखर कारखान्याच्या बाजुला उभे का राहिले नाही.?? याच्या पाठिमागचे कारण काय..??
साखर कारखानदारांना विकासाची बुद्धी नाही का..??
 साखर सम्राटांना विकासाची दृष्टी आहे मात्र स्वत:पुरती मर्यादित आहे, समाजासाठी नाही...!!
  त्यांना कुणीही प्रतिस्पर्धी तयार होऊ द्यायचा नव्हता म्हणूनचं तर छोटे ऊद्योग उभे राहू दिले नाही...!!
  आणखी एक बाब समजून घेतली पाहिजे, राजकीय पटलावर रामदास आठवले सारखा रोडवरचा तरुण उचलून गरीब घरचा पोरगा ऊचलला आणि कॅबिनेट मंत्री बनविला,त्याला कायम सत्तेतच बसविले तसे किती गरीब मराठा तरुणांना संधी दिल्या गेली याही दिशेने गरीब मराठा बांधवांनी विचार केला पाहिजे...!!
  अनेक अर्थाने आणि चौफेर विचार करून गरीब मराठा बांधवांनी आपल्या विकासासाठी आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे हे लक्षात घ्यावे...!!
 कु-हाडीचा दांडा गोतास काळ...!!
 घरका भेदी लंका ढाये....!!
 या बोध वाचनातून काही बोध घेता येईल का...??
  जयभीम.
@.. भास्कर भोजने.

No comments:

Post a Comment

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...