Saturday, 29 December 2018

अहमदनगर निवडणूक आणि बसपा

अहमदनगर निवडणूक आणि बसपा

- सुमित वासनिक

अहमदनगर मध्ये बीएसपीच्या 4 नगरसेवकांनी भाजपला मतदान करून भाजपचा महापौर निवडून आणला आहे. बीएसपीच्या या चार नगरसेवकांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. या चार नगरसेवकांना निलंबित करून निवडणुकि आधी त्यांच्या सोबत झालेला सौदा बीएसपीने पुर्ण केला आहे.
अहमदनगर मधील महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रस्थापित पक्षांचे नगरसेवक असलेल्या चौघांना महानगरपालिकेतील 4 सदस्यांचा एक प्रभाग या निवडणूक पद्धतीत एकत्र निवडणूक लढवायची होती. या चौघांना एकच चिन्ह हवे होते त्यासाठी या सर्वांनी सर्वच प्रस्थापित पक्षांसोबत संपर्क साधला होता. इतर कोणत्याही प्रस्थापित पक्षाने चारही जागा देण्याचे मान्य केले नाही म्हणून बीएसपीची उमेदवारी घेऊन हे चौघेही लढले. बिएसपि तर्फे लढतांना प्रभागातील आंबेडकरी मतदानावरही या चौघांचा डोळा होता. याशिवाय निवडून आल्यावर पक्षाच कुठलेही बंधन राहणार नाही याची शाश्वती सुद्धा यांना बिएसपि नेतृत्वाकडून मिळाली होती. नगर मध्ये झालेल्या या सौदेबाजीत मोठी आर्थिक उलाढाल झाली असल्याचे निवडणुकि वेळी बोलल्या जात होते.
निवडणुकीत हे चारही उमेदवार निवडून आले , निवडून आल्यावर या चौघांनी भाजपचा महापौर पदाचा उमेदवार जाहीर व्हायच्या आधीच भाजपला मतदान करण्यासाठी व्हीप काढला होता. पण तिकीट वाटपावेळी कोणतेही बंधन राहणार नाही या अटीला पूर्ण करण्यासाठी बिएसपि नेतृत्वाने या चौघांवर कोणतीही कार्यवाही केली नाही. महापौर पदाच्या निवडणुकीत या चौघांनी भाजपला मतदान केले आणि आंबेडकरि मतदारांचा बाजार मांडला.
नगर मधील महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला मतदान करणाऱ्या या सदस्यांना आता बीएसपीने निलंबित केले आहे. या निलंबनामूळे हे चारही नगरसेवक पक्षाच्या बंधनातून पुर्णपणे मुक्त झाले आहेत. हे निलंबन, निलंबन नसून या चौघांसोबत झालेल्या सौंद्याचा शेवटचा भाग आहे, पुढिल 5 वर्ष हे चारही नगरसेवक आपल्या मनाने कोणालाही मतदान द्यायला मोकळे झाले आहेत.
निवडणूकांमध्ये आपल्या पक्षाची आकडेवारी इतर पक्षांपेक्षा कशी जास्त आहे हे दाखवण्यासाठी, पार्टीसाठी  फंड मिळविण्यासाठी आंबेडकरी मतांचा बाजार कसा मांडण्यात येतो हे या घटनेतून जनतेने समजून घेतले पाहिजे.

No comments:

Post a Comment

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...