नेता काय करु शकतो...!
: भास्कर भोजने
गेल्या तीन वर्षापासून देशात जे सरकार आहे, त्या सरकारला हे हिंदु राष्ट्र म्हणून निर्माण करायचे आहे...!
हिंदू राष्ट्र निर्माण करण्यात संविधान हा सर्वात मोठा अडथळा आहे...!
संविधान बदलणे हा मुख्य हेतू घेऊन आरएसएस आणि मनुवादी कार्यरत आहेत.
संविधान बदलण्यासाठी जे बहुमत पाहिजे त्या साठी धार्मिक धृवीकरण करुन पाशवी बहुमताचे गणित मांडले जात आहे...!
त्याचाच भाग म्हणून इथल्या अल्पसंख्याक समुहाला टारगेट केल्या जात आहे....!
म्हणून गेली तीन वर्षे झालीत सर्वात मोठा अल्पसंख्याक समुह मुस्लिम यांना हेरुन हेरुन त्यांच्या वर अन्याय अत्याचार केले जात आहेत...!
जिथं जिथं शक्य आहे तिथं मुस्लिम बांधवावर अन्याय केला जात आहे. परंतु हा सर्वात मोठा समुदाय निमुटपणे हे सर्व सहन करीत आहे. कारण मुस्लिम समुदायाकडे नेतृत्व नाही. जे जे नेते म्हणवून घेतात ते नेते नसुन ते प्यादे आहेत...!
कुणी काँग्रेस चं ,कुणी भाजपचं तर कुणी समाजवादी, बसपाचं प्याद आहे, नेता नाही.
दलित समुदाय हा १२ % अल्पसंख्याक समुदाय आहे. या घटकावरही गेल्या तीन वर्षात अन्याय अत्याचार वाढलेतं परंतु दलित समुह अन्याय, अत्याचार निमुटपणे सहन करीत नाही तर प्रतिकार करतो आहे...!
गुजरात मधील ऊना कांड झाले. दलितांनी प्रतिकार केला. अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी ऊना ला जाऊन दलितांना ऊपदेश केला, हिंदू धर्म सोडा धर्मांतर करा...!
दलित स्काँलर रोहित वेमुला वर अन्याय झाला अँड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिल्लीत मोर्चाकाढला आणि मनुवादी सरकारला जबाब विचारला...!
भिमाकोरेगांव ला दलित समुहावर दगडफेक केली अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंद ची हाक दिली आणि मनुवादी भिडे आणि एकबोटे ला आरोपी म्हणून सरकारला कार्यवाही करायला भाग पाडले...!
दिल्ली पर्यंत सर्वांना जबाब विचारला.दलित अत्याचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविला...!
समाजाला नेता असेल तर त्या समाजाचं दु:ख निवारणासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात .परंतु समाजाला नेताचं नसेल तर दाद कशी मागणारं....!
नेता म्हणजे मंत्री, मुख्यमंत्री, खासदार आमदार नव्हे....!
नेता म्हणजे व्यवस्थेला जबाब विचारणारं आणि शासन संस्थेला कायदा राबविण्यासाठी बाध्य करणारं व्यक्तीमत्व...!
No comments:
Post a Comment