कॉंग्रेस पक्ष सेक्युलर आहे का?
- भास्कर भोजने
गेल्या सत्तर वर्षात कॉंग्रेस पक्षाने जो बुरखा ओढून ढोंग रचले त्याला भारतीय जनता बळी पडली आणि कॉंग्रेस पक्षाला देशातील संपूर्ण सत्तेचे मालक बनविले...!
देशातील मध्यवत्ती सरकार हे जास्तीत जास्त काळ कॉंग्रेस पक्षाने भोगले आहे....!
जर कॉंग्रेस पक्षाने संविधानाचे पालन करुन शासन चालविले असते तर,आज देशातील ४२टक्के जनतेला दारिद्र्य रेषेखालील जीवन जगावे लागले नसते...!
जर कॉंग्रेस पक्षाने संविधानाचे महत्व ओळखून संविधानाचा जागर केला असता तर जनतेला आज आपले हक्क आणि अधिकार समजले असते, आणि पाचशे, हजार रुपयात कुणीही आपले मतं विकले नसते....!
जर कॉंग्रेस पक्षाने सेक्युलर विचारांचे समर्थन करीत कारभार चालविला असता तर, देशात एवढा प्रचंड जातीयवाद माजला नसता, आणि राजकारण धार्मिक मुद्द्यावर केंद्रीत झाले नसते...!
जर कॉंग्रेसने सेक्युलॅरिझम घेऊन वाटचाल केली असती तर अयोध्येतील बाबरी मशिद आज कायम असती...!
जर कॉंग्रेस पक्ष सेक्युलर असता तर १९८४ ची दंगल व्हायची गरजचं नव्हती...!
शिख समुदायाची कत्तल थांबवता आली असती...!
जर कॉंग्रेस पक्ष सेक्युलर आणि पुरोगामी असता तर औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न सतरा वर्षे चिघळला नसता...!
आंबेडकरी समाजाची अपरिमीत हानी आणि तरुणांचे आयुष्य बर्बाद झाले नसते...!
जर कॉंग्रेस पक्ष सेक्युलर आणि मानवतावादी असता तर ओबीसी समाजाला आरक्षणासाठी ४० वर्षे वाट पहावी लागली नसती...!
ओबीसी तरुणांच्या चार पिढ्या बर्बाद झाल्या नसत्या....!
जर कॉंग्रेस पक्ष सेक्युलर म्हणजे निधर्मी असता तर देशात, कॉंग्रेस पक्षाच्या राजवटीत हिंदू, मुस्लिम दंगली झाल्या नसत्या प्रशासनाला कामाला लाऊन कायदा राबविला असता आणि जनतेला सुरक्षितता प्रदान केली असती...!
मुस्लिम समुदायाचे जिवनमान अधोगतीला गेले , नसते(वाचा सच्चर समितीचा रिपोर्ट.)
जर कॉंग्रेस पक्ष सेक्युलर आणि बहुजनवादी असता तर धनगर समाजाचे आरक्षण जे केवळ धनगर आणि धनगड या एका शाब्दिक चुकीत साठ वर्षे अडकले नसते...!
जर कॉंग्रेस पक्ष सेक्युलर आणि बहुजनवादी असता तर धोबी समाज, आदिवासी, भटके विमुक्त, गोंड,गोवारी, आणि कोळी, महादेव कोळी,टकारी यांच्या सारख्या जातींचे आरक्षणासाठी पायपीट करावी लागली नसती...!
कॉंग्रेस पक्षाने सेक्युलर असल्याचे ढोंग रचुन , विशिष्ट समुहासाठी सत्ता राबविली आणि दलित, मुस्लिम,शिख, बौद्ध आणि ओबीसी बांधवांना पद्धतशीरपणे खेळवले...!
कॉंग्रेस पक्षाच्या सरकारने जी राज्यघटना जगाने सर्वांगसुंदर म्हणून गौरविली त्या राज्यघटनेत १०२ वेळा दुरुस्ती करून त्यांना हवे तसे कायदे बनविले मात्र साधा संविधान दिवस साजरा केला नाही...!
कॉंग्रेस पक्षाने गॅट करारावर सही करुन शेतकऱ्यांना मरणाच्या दारात ढकलले...मात्र भांडवलदारासाठी बॅंकांना एन .पी .ए. करायला मुभा दिली...!
सर्वधर्मसमभाव, समाजवादी, सांसदीय लोकशाहीत नवा भांडवलदार वर्ग तयार झाला त्याला कारणीभूत आहे कॉंग्रेस पक्षाचे धेय्य धोरण...!
ऊद्योगपती लोकांची संसदीय लोकशाहीवर पकड निर्माण झाली आहे,हा विचित्र योग कसा आणि कुणी निर्माण केला याच्या तपशिलात गेलो तर उत्तर मिळते कॉंग्रेस पक्षाचे धोरण...!
मित्रहो,२०१९ च्या निवडणुकीत भाजपला थांबवायचे आहे हे निश्र्चित परंतु, भाजपला थांबविण्यासाठी कॉंग्रेस पक्षाला पुन्हा संधी दिली तर आम्ही सत्तर वर्षात काहीच शिकलो नाही असा त्याचा स्पष्ट अर्थ होईल....!
भाजप आणि काँग्रेस पक्षात काहीच अंतर नाही...!
दोन्ही पक्षांचं परराष्ट्र धोरण एकच आहे...!
दोन्ही पक्षांचं खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण धोरण एकच आहे...!
दोन्ही पक्षांचं भांडवलदारांच्या हिताचं राजकारण सारखंच आहे...!
फरक केवळ एवढाचं आहे की,एक ऊघडं शत्रुत्वाची भुमिका घेऊन वागतो तर दुसरा छुपा अजेंडा घेऊन आम्हाला फसवितो...!
दलित ,मुस्लिम, ओबीसी, शेतकरी, कष्टकरी, बहूजन, आदिवासी आणि तमाम सर्वसाधारण जनतेचं प्रतिनिधित्व करणारे पक्ष म्हणून कॉंग्रेस आणि भाजप होऊच शकत नाहीत हे वास्तव जनतेने लक्षात घ्यावे म्हणजे फसवणूक होणार नाही...!
एक सापनाथ तर दुसरा नागनाथ आहे...!
भाजप आणि काँग्रेस वगळून नवा पर्याय शोधल्या शिवाय संविधान सुरक्षित नाही हेही लक्षात घेतले पाहिजे...!
२०१९ साठी नवा पर्याय निवडा ही नम्र विनंती.... जयभीम.
-भास्कर भोजने.
No comments:
Post a Comment