Sunday, 30 December 2018

आधुनिक भारताचा पाया - भीमा कोरेगावची लढाई.

आधुनिक भारताचा पाया - भीमा कोरेगावची लढाई.
- मनोज नागोराव काळे, ठाणे.
जगाच्या इतिहासात अनेक लढाया झाल्या, प्रत्येक लढाई ही राजकीय होती, दुसर्या राजाचा पराभव करुन त्याचे राज्यक्षेत्र आपल्या ताब्यात घ्यायचे अशीच चढाओढ असायची, काही ठिकाणी आपापल्या धार्मिक मान्यता लादण्यासाठीही काही लढाया झाल्याचे इतिहीसात नमुद आहेत, अनेक लुटुपुटुच्या लढायांनाही भारतीय इतिहासात गौरवाने सांगितल्या जातात.
मात्र जगाच्या ज्ञात इतिहासातील सर्वात महत्वपुर्ण, विरतेने व स्वाभिमानी बाण्याने ओतप्रोत अशी फक्त ५०० आलुतेदार बलुतेदारांनी २८००० च्या विशाल जालिम पेशव्यांच्या सैन्याला एका रात्रीत कापुन काढुन एका देशाच्या प्रतिगामी इतिहासाला प्रगतीशील पुरोगामी राष्ट्राकडे घेऊन जाणारी कोरेगाव भीमा च्या पात्रात १ जानेवारी १८१८ ची लढाई जाणीवपुर्वक लपवली गेली होती.
हि लढाई दोन राज्यांमधील नव्हती, जमीनीवर ताबा मिळवण्यासाठी नव्हती तर ही लढाई होती "आम्ही माणुस आहोत व आम्हाला माणसा सारखे जगता यावे" या अधिकारा साठी.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या इतिहासाला एका ओळीत मांडताना सांगितले आहे की “भारत देशाचा इतिहास म्हणजे श्रमण संस्कृती विरुद्ध ब्राह्मन संस्कृतीचा झालेला संघर्ष आहे"
१) तथागत गौतम बुद्धांनी ब्राह्मण संस्कृतीवर पुर्ण विजय मिळवला व श्रमन संस्कृती देशात झपाट्याने पसरली, देवनामपिय महान सम्राट अशोकाने पुर्ण जगभरात तथागतांचे विचार पेरले, त्यानंतर प्रतिक्रांती झाली व देशात पुन्हा चातुर्वर्णाची ब्राह्मण संस्कृती जबरदस्तीने लादली गेली.
२) तथागतांची संस्कृती संत परंपरेने कायम जागृत ठेवली, तुकाराम महाराजांच्या सहाय्याने श्रमन / मातृ सत्ताक संस्कृती व स्वाभिमानाचे धडे आऊसाहेब राजमाता जिजाऊंनी शिवरायांना दिले व पुन्हा चातुर्वर्णाच्या शृंखला तोडण्याचे काम शिवरायांनी केले, त्यांनी सप्तबंदी धुडकावली व शुद्र समजल्या गेलेल्या सर्व नागवंशियांच्या हातात शस्त्र दिले व स्वराज्य / लोकशाही / गणराज्य स्थापन केले.
३) शिवशाही विरुद्ध पेशवे या लढाईत पेशव्यांनी शिवशाही संपवली, शिवशक बंद केला व शिवरायांच्या साथिदारांना गुलाम केले.
४) छ. शिवरायांना स्वराज्य स्थापनेत व स्वराज्य चालवण्यात ज्या ज्या जातीच्या लोकांनी मदत केली त्या सर्वांना शुद्र म्हटले गेले, मराठा जातीच्या लोकांनाही पेशव्यांनी शुद्रच समजले याचे ज्वलंत उदाहरण आहे शाहु महाराज व सयाजीराव गायकवाड या दोन महाराजांचे वेदोक्त प्रकरण.
५) पेशव्यांनी संभाजी महाराजांना कापुन टाकण्यात सहाय्य केले व ज्या महार गोविंद गायकवाड ने संभाजी महाराजांचे अंतिम संस्कार करुन पेशव्यांच्या धार्मिक फतव्याचा धुव्वा उडवला त्यामुळे पेशव्यांनी संपुर्ण महार जातीलाच बहिष्कृत केले, महार समाजावर अनेक अनिष्ट नियम लागु केले.
६) महारांनी बाजीराव पेशव्याकडे सर्व जुलमी नियम बंद करुन आम्हाला माणसासारखे जगण्याचा अधिकार द्यावा अशी मागणी केली पन माजोरी सत्तेच्या मस्तीत धुंद असलेल्या बाजीरावाने ती मागणी धुडकावली, तेव्हा महार समाजाला या गुलामितुन मुक्त होण्याची संधी ब्रिटीश अधिकार्याने दिली. व जिवाची पर्वा न करता छ. संभाजी राजांचे अंत्यसंस्कार केले म्हणुन पेशव्यांनी लादलेली गुलामी संपवण्यासाठी महारांनी निश्चय केला व कोरेगाव भीमा ची लढाई लढली गेली, २८००० सैन्यांना फक्त ५०० लोकांनी पुर्णतः कापुन काढले व छ. संभाजी राजांच्या हत्येचा बदला घेतला, शिवशाही संपवणार्या पेशव्यांचा खात्मा केला.
७) त्यानंतर ब्रिटीशांनी तेथे हा क्रांती स्तंभ बांधला,ब्रिटीशांनी पुन्हा या क्रांतीला मोठ्या क्रांतीत रुपांतरीत केले, ब्राह्मणी वर्चस्वाला ब्रिटीशांनी धक्का दिला व सर्व जाचक रुढी परंपरा बंद केल्या, सर्व शुद्रांना शिक्षण दिले पाहीजे अशी पुरोगामी भुमिका ब्रिटीशांनी घेतली, क्रांतीबा फुले, शाहु महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण प्रसारासाठी ब्रिटीशांनी सहाय्य केले व या देशाला आज ज्या पुरोगामित्व व प्रगतीशिलतेचा गर्व वाटतो ते सर्व काही ब्रिटीशांनी या देशाला दिले.
जर १ जानेवारी १८१८ चे ते युद्ध महार सैनिक हरले असते तर या देशातील स्त्री कधीच मुक्त झाली नसती, या देशात समता, स्वातंत्र्य, बंधुता,न्याय, शिक्षण या विषयावर समाजसुधारक निर्माण झाले नसते, या देशात आजही मनुस्मृती चे राज्य असते.
त्यामुळे क्रांतीबा फुलेंनी पहीली शाळा १ जानेवारी लाच सुरु केली, क्रांतीबांनी शिवरायांची समाधी शोधली, शाहु महाराजांनी मराठा समाजासह इतर समाजाला आरक्षण दिले, पेशव्यांनी बंद केलेला शिवशक पुन्हा सुरु केला, 
छ.शाहु महाराजांनी व सयाजी गायकवाड या ब्राह्मणी जुलमाचे शिकार झालेल्या महाराजांनी एका महाराच्या पोराला ( विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर)  शिक्षणासाठी मदत केली व त्याच महाराच्या पोराने या देशाला प्रबुद्ध भारताची वाट दाखवली,या देशाची सत्ता राजाच्या हातची काढुन लोकांच्या हातात दिली व देशातील प्रत्येक नागरिकाला राजा बनवले,
राज्याचा शेअर सर्वांना समान वाटला,
प्रज्ञासुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भिमा कोरेगाव लढाईच्या मजबुत पायावर फुले - शाहुंनी उभ्या केलेल्या समतेच्या मंदिरावर लोकशाहीचा कळस रचला व भारतातुन मनुस्मृतीचा कायदा संपवुन संविधान दिले.
५०० आलुतेदार बलुतेदार सैनिकांनी ( प्रामुख्याने महार जात  )
सुरु केलेला समतेच्या आधुनिक लढ्याला कायदेशिर स्वरुप देऊन बाबासाहेबांनी कोरेगाव भिमा च्या पायावर एक अधुनिक भारत निर्माण केला व आज आपन पहातोय भारत देश किती झपाट्याने प्रगती करुन जगात नावाजला गेला.
भिमा कोरेगाव चा तो  विजय स्तंभ छ. शिवराय, छ.संभाजी राजे यांच्या शुर व निष्ठावान मावळ्यांनी  लढलेल्या समतेच्या लढ्याचे प्रतिक आहे हे आता जगानेही मान्य केले आहे.
आजच्या आधुनिक भारताचा कळस जर भारतीय संविधान असेल तर याचा पाया निर्विवादपने ती कोरेगाव भिमाची लढाईच आहे, त्यामुळे २०१४ ला नवपेशवे सत्तेवर येताच पहिला हल्ला त्यांनी या स्तंभाला वंदन करायला आलेल्या आलुतेदार बलुतेदारांवरच केला. पन यावेळीही डॉ बाबासाहेबांचे रक्तच ( आद.प्रकाश आंबेडकर)  या पेशव्यांसमोर खंबीरपने उभे राहीले व पेशव्यांची पळता भुई थोडी केली आहे, ते राजकीय मार्गाने पुन्हा या देशाला ब्राह्मण संस्कृतीकडे लोटायचा प्रयत्न करत आहेत व बाळासाहेब आंबेडकर सर्व आलुतेदार बलुतेदारांना एकत्र करुन त्याच राजकीय मार्गाने पेशव्यांना जेरीस आनत आहेत व सर्व बहुजन समाज आज त्यांच्यामागे एकमताने उभा ठाकुन पुन्हा प्रतिक्रांती होणार नाही, पुन्हा आम्ही गुलाम होणार नाही असा एल्गार केला जात आहे.
त्यावेळी ते सैनिक तलवारी च्या सहाय्याने लढले व जिंकले पन लोकशाहीत आपल्याला हिच आधुनिक पेशवाई विरुद्ध शिवशाही / लोकशाही हि लढाई मता च्या सहाय्याने जिंकायची आहे, आपले हत्यार आपले " मतदान " असणार आहे. त्यामुळे नवपेशवाई संपवण्यासाठी आपला मताधिकार आपल्या अस्तित्वावर उठलेल्या मनुवाद्यांना न विकता तो मताधिकार वापरुन पेशव्यांना सत्तेपासुन कायमचे दुर करा व त्या ५०० विरांना खरी आदरांजली वहा असे अवाहन करतो.
जय भीम, जय शिवराय
जय संविधान
- मनोज नागोराव काळे, 8169291009

______________________________

१ जानेवारी च्या निमित्ताने समाजबांधवांसाठी..भिमा कोरेगाव म्हणजे शौर्याचा तथा स्वाभिमानाचा इतिहास..

१ जानेवारी च्या निमित्ताने समाजबांधवांसाठी..
भिमा कोरेगाव म्हणजे शौर्याचा तथा स्वाभिमानाचा इतिहास..
----------------------------------------
भिमा कोरेगांव येथील उभा असलेला  *विजयस्तंभ* हा पेरणे ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असुन मोठया दिमाखानं भिमानदीच्या काठावर उभा असुन आपल्या महार समजल्या जाणा-या पुर्वजांच्या शौर्याचं तथा स्वाभिमानाचं प्रतिक आहे,जेव्हा हुकूमशहा पेशव्यांनी आक्रमण केलं तेव्हा पिढ्यान् पिढ्या गुलामीच्या बंधनात अडकलेल्या गुलामांचा स्वाभिमान जागा झाला,आम्हाला माणुस म्हणुन जगण्याचा हक्क नाकारणा-या पेशवाईचा खात्मा झाला पाहीजे अशी खुणगाठच जणु या पुर्वजांनी बांधली होती असे या इतिहासातून दिसते,असे असले तरी ही आपल्या पुर्वजांकडून द्वेषातून तथा गनीमी काव्यातून झालेली नाही तर ती समजुन उमजुन आणि ठरवुन झालेली ही लढाई होती,आपले हक्क जर मागुन मिळत नसतील तर ते हिसकावुन घ्यावे लागतील,माणुस म्हणुन जगता येत नसेल तर जगण्यात काय अर्थ,याची जाणिव आपल्या पुर्वजांना झाली असावी,पेशवाईने जरी अचानक व द्वेषातुन हे आक्रमण केले असले तरी आपल्या पुर्वजांकडून द्वेषातून झाली नाही हेही तितकेच सत्य आहे, *उद्देश स्पष्ट ठेवुन हक्कासाठी लढणारांचा विजय नक्की होतो,* आणि तसेच आपल्या पुर्वजांनी पेशवाई विरूध्द आपल्या हक्काची लढाई लढुन नेत्रदिपक असं यश मिळवलं,आणि आपल्या शौर्याचा तथा स्वाभिमानाचा विजयी इतिहास रचला,हे यश आपल्याला असे मिळाले की पिढ्यान् पिढ्या त्याची नोंद इतिहास घेतच राहील,त्यामुळे
*येतील किती अन् जातील किती त्याची न आम्हाला भिती*
आता भिती आहे ती आपल्याच्यांचीच आपल्याला,कारण गाडलेली पेशवाई आता नवपेशवाईत पुन्हा जन्माला आलेली आहे,आणि ही नवपेशवाई आपल्याशी कुठल्याही प्रकारे लढत नाही तर ती आपल्या आपल्यात लढत ठेवुन आपल्या पुर्वजांच्या शौर्याचा बदला घ्यायला निघाली आहे,हे जर आपल्याला वेळीच कळलं नाही तर मोठा अनर्थ होऊ शकतो,म्हणुन आता पुर्वजांच्या शौर्याचा अभिमान असणा-या वारसदारांनी आता वेळीच सावध झालं पाहीजे,आपल्याला शौर्याच्या इतिहासाबरोबर विचारांचा वारसासुध्दा आहे,म्हणुन आपली कृती ही विचारांच्या आधारावर असली पाहीजे असे मला वाटते.ज्या अहंकारामुळे पेशवाई संपली तीच अहंकाराची बाधा जर आपल्याला होत असेल तर आपणच आपल्याला संपवायला निघालेलो आहोत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.त्यामुळे माझ्या तमाम समाज बांधवानो तथा बाबासाहेबांची विचारधारा मान्य असलेल्या बहुजन बांधवांनो आपण आता आपल्याला वेळीच सावरायला हवं, *युध्दाला नव्हे तर बुध्दालाच स्विकारायला हवं* हीच खरी समाज व देशाच्या सुरक्षिततेची हमी असेल,आणि यामुळेच भिमा कोरेगाव येथे झालेल्या घनघोर लढाईची आपल्या पुर्वजांची शौर्य गाथा येणा-या पिढ्यान् पिढ्यांच्या काळजावर कोरली भिमा कोरेगावचा हाच शौर्याचा तथा स्वाभिमानाचा इतिहास अजरामर राहील..
मी तमाम समाज बांधवांना या निमित्ताने विनंती करेन आपण बुध्द व बाबासाहेब यांच्या विचारधारेवर चालणारे अनुयायी आहोत,आपल्या हातुन कोणताही अनुचित कृत्य घडणार नाही याची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे,त्यामुळे कोणतीही अफवा पसरवु नका व अफवांना बळी पडु नका,भिमा कोरेगाव येथे येणा-या प्रत्येक व्यक्तींनी या पवित्र भुमिला व पराक्रमी पुर्वजांना सन्मानाची सलाम द्या व विजयत्सोव साजरा करा,कुणालाही व कुठेही वाईट बोलुन चिडवु नका किंवा घोषणाबाजी करू नका..
येणा-या प्रत्येकाचा प्रवास सुखाचा होवो व येणारे नवीन वर्ष सुखासमाधानाचे जावे ही मनोकामना..
भिमाकोरेगाव विजय दिनाच्या सर्वांना सदिच्छा.
आपला,
विकास साळवे,पुणे
+919822559924...✍

Saturday, 29 December 2018

अहमदनगर निवडणूक आणि बसपा

अहमदनगर निवडणूक आणि बसपा

- सुमित वासनिक

अहमदनगर मध्ये बीएसपीच्या 4 नगरसेवकांनी भाजपला मतदान करून भाजपचा महापौर निवडून आणला आहे. बीएसपीच्या या चार नगरसेवकांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. या चार नगरसेवकांना निलंबित करून निवडणुकि आधी त्यांच्या सोबत झालेला सौदा बीएसपीने पुर्ण केला आहे.
अहमदनगर मधील महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रस्थापित पक्षांचे नगरसेवक असलेल्या चौघांना महानगरपालिकेतील 4 सदस्यांचा एक प्रभाग या निवडणूक पद्धतीत एकत्र निवडणूक लढवायची होती. या चौघांना एकच चिन्ह हवे होते त्यासाठी या सर्वांनी सर्वच प्रस्थापित पक्षांसोबत संपर्क साधला होता. इतर कोणत्याही प्रस्थापित पक्षाने चारही जागा देण्याचे मान्य केले नाही म्हणून बीएसपीची उमेदवारी घेऊन हे चौघेही लढले. बिएसपि तर्फे लढतांना प्रभागातील आंबेडकरी मतदानावरही या चौघांचा डोळा होता. याशिवाय निवडून आल्यावर पक्षाच कुठलेही बंधन राहणार नाही याची शाश्वती सुद्धा यांना बिएसपि नेतृत्वाकडून मिळाली होती. नगर मध्ये झालेल्या या सौदेबाजीत मोठी आर्थिक उलाढाल झाली असल्याचे निवडणुकि वेळी बोलल्या जात होते.
निवडणुकीत हे चारही उमेदवार निवडून आले , निवडून आल्यावर या चौघांनी भाजपचा महापौर पदाचा उमेदवार जाहीर व्हायच्या आधीच भाजपला मतदान करण्यासाठी व्हीप काढला होता. पण तिकीट वाटपावेळी कोणतेही बंधन राहणार नाही या अटीला पूर्ण करण्यासाठी बिएसपि नेतृत्वाने या चौघांवर कोणतीही कार्यवाही केली नाही. महापौर पदाच्या निवडणुकीत या चौघांनी भाजपला मतदान केले आणि आंबेडकरि मतदारांचा बाजार मांडला.
नगर मधील महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला मतदान करणाऱ्या या सदस्यांना आता बीएसपीने निलंबित केले आहे. या निलंबनामूळे हे चारही नगरसेवक पक्षाच्या बंधनातून पुर्णपणे मुक्त झाले आहेत. हे निलंबन, निलंबन नसून या चौघांसोबत झालेल्या सौंद्याचा शेवटचा भाग आहे, पुढिल 5 वर्ष हे चारही नगरसेवक आपल्या मनाने कोणालाही मतदान द्यायला मोकळे झाले आहेत.
निवडणूकांमध्ये आपल्या पक्षाची आकडेवारी इतर पक्षांपेक्षा कशी जास्त आहे हे दाखवण्यासाठी, पार्टीसाठी  फंड मिळविण्यासाठी आंबेडकरी मतांचा बाजार कसा मांडण्यात येतो हे या घटनेतून जनतेने समजून घेतले पाहिजे.

Thursday, 27 December 2018

राजकीय लबाड्या आणि समाज मनं...!

राजकीय लबाड्या आणि समाज मनं...!
- भास्कर भोजने

        आपणं सांसदीय लोकशाही स्विकारुन ऊणेपुरे सत्तर वर्षे होतं आहेत...!
    सांसदीय लोकशाही मध्यें कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडली आहे...!
   सांसदीय लोकशाही ही शेवटच्या घटकांपर्यंत पोहचायला पाहिजे अशी अपेक्षा आहे...!
   सांसदीय लोकशाही मधील कल्याणकारी राज्याची संकल्पना सत्ताधारी वर्गाने संपूर्ण धुळीस मिळविली आहे...!
   कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेला मूर्त रूप देण्याचा प्रयत्न म्हणजे उपेक्षित वर्गाला आरक्षण देणे होय...!
    ज्यांना सामाजिक कारणाने संधी नाकारल्या जाते त्यांना संधी प्रदान करणे म्हणजे आरक्षण होय...!
   म्हणूनचं त्याला"प्रतिनिधित्व "म्हटले जाते...!
   आरक्षण या विषयाला सत्ताधारी वर्गाने संपूर्णरित्या चेष्टेचा विषय बनविले आहे...!
    राज्यघटनेत तरतूद असुनही ओबीसी वर्गाला आरक्षण मिळविण्यासाठी तब्बल ४० वर्षे संघर्ष करावा लागला...!
  आणि ओबीसी वर्गाला मिळालेल्या आरक्षणातं किर्रीमिलेअरची अट घालुन खोडा घातला गेला...!
    धनगर समाजाचे आरक्षणाच्या संदर्भात केवळ "धनगर "आणि"धनगड "एवढाचं शब्दबदल आहे,तो शब्दभेद गेली पन्नास वर्षे झाली आहेत मिटतं नाही...!
     धोबी समाज हा मध्यप्रदेशात एस.सी.प्रवर्गात आहे आणि महाराष्ट्रात ओबीसी वर्गात आहे...!
धोबी समाजाला एस.सी.चे आरक्षण पाहिजे,हा शहानिशा करण्याचा प्रकार आहे, परंतु ती शहानिशा गेली पन्नास वर्षे झाली आहेत होतं नाही...!
    आदिवासी बांधवांच्या आरक्षणाच्या संदर्भात खरे आदिवासी आणि बोगस आदिवासी असा वाद निर्माण केल्या गेला आहे...!
   या वादात ८२ हजार कर्मचारी वर्गाचा जीव टांगणीला लागला आहे परंतु निवड करण्यात येतं नाही.भिजतं घोंगड ठेवायचं आणि सत्तेची गणिते मांडायची असा खेळ चालला आहे....!
मुस्लिम समाजाला आरक्षण देतो अशी भुल देऊन भरीस पाडलं जातं आहे, तसेच मराठा समाजाला सुद्धा आरक्षणाचं गाजरं दाखवून,झुंजविलं जातं आहे.
   संपुर्ण समाज मनं अस्वस्थ ठेऊन सत्ताधारी आजपर्यंत राज्य करीत आले आहेत...!
  प्रत्येक उपेक्षित घटकाला सत्ताधारी आणि प्रस्थापित वर्गाने झुंजवतं ठेऊन आपली राजकीय पोळी भाजून घेतली आहे...!
   हा खेळ गेली सत्तर वर्षे जनता ऊघड्या डोळ्याने पाहते आहे...!
   सत्ताधारी वर्गाने कल्याणकारी राज्य तर राबविले नाहीचं परंतु लबाडी वर लबाडी करुन समाजाला ठगविले आहे...!
   सांसदीय लोकशाही ही शेवटच्या घटकांपर्यंत पोहचायला पाहिजे होती परंतु याच सत्ताधारी वर्गाने घराणेशाही निर्माण करुन सत्ता काही कुटुंबातंच बंदिस्त केली आहे...!
सत्तेचे विकेंद्रीकरण होऊ दिले नाही...!
महाराष्ट्रात केवळ १६९ घराणे गेली सत्तर वर्षे राज्य करीत आहेत..!
आलटुन पालटून सत्ता उपभोगण्याचा फंडा त्यांनी व्यवस्थित राबविला आहे...!
  कॉंग्रेस सत्तेबाहेर गेली की,सेना भाजप आणि सेना भाजप बाहेर गेली की, कॉंग्रेस सत्तेत कशी येईल याची तजविज सत्ताधारी करीत असतात...!
सत्तर वर्षाचा कालखंड हा काही कमी नाही म्हणून तुम्ही सर्वकाळ सर्वांना मुर्ख बनवू शकत नाही...!
   आता जनतेच्या ही लबाडी लक्षात आली आहे...!
  कॉंग्रेस असो की, भाजप हे एकाचं नाण्याच्या दोन बाजू आहेत हे जनतेला कळून चुकले आहे...!
     म्हणून आता समाजात मोठा बदल जाणवतो आहे...!
धनगर समाज आपल्या आरक्षणासाठी कुणावरही अवलंबून राहण्यापेक्षा स्वत: सत्ताधारी होऊ इश्चितो...!
   आदिवासी आपल्या आरक्षणाचा प्रश्न स्वत:च सत्तेत बसुन सोडवू इश्चितो...!
लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता सत्ताधारी झाल्याशिवाय मिळविता येणारं नाही हे कळून चुकले आहे म्हणून लिंगायत सत्ताधारी होण्यासाठी प्रयत्नशिल झाला आहे...!
मराठा समाजातील जो घटक सत्ताधारी आहे तो केवळ मोजक्या घराण्यातील आहे, सामान्य मराठा माणसाला जातीसोबत माती खाण्याची शपथं देऊन थापाड्या घराणेशाहीच्या पोशिंद्यांनी मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे, म्हणून संभाजी ब्रिगेड सारखे संघटन राजकारणात ऊतरुन प्रतिनिधित्व मागते आहे,सकल मराठा नांवाने मराठा समाज प्रतिनिधित्व मागते आहे...!
    महाराष्ट्रातील समाज मनं जे सत्ताधारी वर्गाने अस्वस्थ केले होते तेचं समाजमनं सत्तेसाठी कार्यरत झाले आहे ही मोठी उपलब्धी आहे...!
म्हणून आता महाराष्ट्रात मोठा बदल होणारं आहे...!
सत्ताधारी कॉंग्रेस असो की भाजप यांना आता संधी नाही...!
  घराणेशाही पोसणारे कुणीही असो त्यांनाही संधी नाही...!
    नवा पर्याय समाजाला हवा आहे आणि तोही वंचित असला पाहिजे हा निकष आहे....!
   जयभीम.
-भास्कर भोजने.

Wednesday, 26 December 2018

काव्यबाण - संविधान हाती घ्या रे - विकास साळवे

संविधान हाती घ्या रे
-----------------------------
विषारी नागाचे फणे आता डोलु लागले रे,
चावा घेण्या तोंड आता खोलु लागले रे..
सावधान व्हा गड्यांनो सावधान व्हा रे,
विषारी नागं ठेचण्या हाती संविधान घ्या रे..
लागले गळाला जे जे लाचार जाहले रे,
दलाल समाजाचे तिथे हजार जाहले रे..
सावधान व्हा गड्यांनो सावधान व्हा रे,
विषारी नागं ठेचण्या हाती संविधान घ्या रे..
आपले कोण परके कोण कळेना कुणाला रे,
घात तिथेच करती कसे कळेना मनाला रे..
सावधान व्हा गड्यांनो सावधान व्हा रे,
विषारी नागं ठेचण्या हाती संविधान घ्या रे..
विझवु चला सारे आज स्वार्थाच्या चुली रे,
सुरक्षित ठेवण्या आमुच्याच त्या मुली रे..
सावधान व्हा गड्यांनो सावधान व्हा रे,
विषारी नागं ठेचण्या हाती संविधान घ्या रे..
मनसुभे मनुचे आज इथे सुरक्षित जाहले रे,
लुटण्या अब्रु आईची आरक्षित जाहले रे..
सावधान व्हा गड्यांनो सावधान व्हा रे,
विषारी नागं ठेचण्या हाती संविधान घ्या रे..
उध्वस्त करण्या आयुष्य हे काळ डागलाय रे,
लढण्या अंधा-या आयुष्याशी सुर्य जागलाय रे..
सावधान व्हा गड्यांनो सावधान व्हा रे,
विषारी नागं ठेचण्या हाती संविधान घ्या रे..
विकृत धर्माधांने काल मेंदुच चोरला रे,
त्यासाठीच बुध्द भिमाने काळजात कोरला रे..
सावधान व्हा गड्यांनो सावधान व्हा रे,
विषारी नागं ठेचण्या हाती संविधान घ्या रे..
*विकास साळवे,पुणे*
*+919822559924...✍*

Tuesday, 25 December 2018

अशोक चव्हाणांचा वैयक्तिक स्वार्थ व कॉंग्रेसची अडचन.

अशोक चव्हाणांचा वैयक्तिक स्वार्थ व कॉंग्रेसची अडचन.
- मनोज काळे, ठाणे.
मित्रांनों, भाजपा व आरएसएस विरुद्ध देशभरात मागील साडेचार वर्ष एकमेव बाळासाहेब आंबेडकरांनी रान उठवले आहे, बाकी कॉंग्रेससह सर्वच विरोधक शांतपने पहात बसले होते, बाळासाहेबांनी अखंडपने अविरत भाजप च्या सर्व हलचालींवर लक्ष ठेवुन त्यावर नियंत्रन मिळवण्यासाठी आवाज बुलंद केला आहे हे सर्वांनाच माहीत आहे, निवडणुका जवळ आल्यावरच जनतेचे प्रश्न रेटण्याचा भंपकपना आंबेडकरांमध्ये नाही हे सर्व भारत देशाने पाहीले. इव्हिएम बंदीसाठी मोर्चा, इव्हिएम चे प्रतिकात्मक दहन, नोटबंदी घोटाळा, राफेल घोटाळा, रोहीत वेमुला हत्या, झुंडशाही या सर्व प्रश्नांवर परखड मत मांडणारे एकमेव बाळासाहेबच होते, आर एस एस कडील अवैध शस्त्रसाठा जप्त करावा व होऊ घातलेल्या दंगली रोखाव्या यासाठी जनतेचा रेटा वाढवुन या देशावर उपकार करणारेही एकमेव बाळासाहेब आंबेडकरच आहेत, सत्तर वर्ष ज्या भारतीय नागरिकांना किंवा समाजांना राजकीय प्रतिनिधित्व मिळाले नाही त्यांना सत्तेत बसवण्याचे, लोकशाही तळागाळापर्यंत पोचऊन लोकशाहीला यशस्वी करण्यासाठी झटणारे एकमेव बाळासाहेबच...
हे सर्व पाहुन, बाळासाहेबांची स्वच्छ व निस्वार्थी भुमिका हेरुन सर्व आदिवासी, भटके विमुक्त, छोटे ओबीसी, आलुतेदार बलुतेदार, मातंग, मुस्लिम, धनगर व इतर वंचित घटकांनी समाजांचे नेतृत्व बाळासाहेबांवर सोपवले आहे, कॉंग्रेस पेक्षा जास्त ताकद आज वंचित बहुजन आघाडी कडे आहे. तरीही फक्त हिटलरवादी हुकुमशाही व संविधानाच्या शत्रुंना सत्तेपासुन रोखण्यासाठी बाळासाहॆबांनी कॉंग्रेस सोबत युती करुन राजकीय लढा द्यायचा निर्णय केला व कॉंग्रेस कडे त्या बारा जागा मागितल्या ज्या जागा कॉंग्रेस मागील तीन निवडणुकात सतत हरत आले आहेत, त्या जागा देऩे कॉंग्रेस ला का कठीन जात आहे?
कॉंग्रेस ज्या जागा निवडुण आणु शकत नाही त्या जागा वंचित बहुजन आघाडी निश्चितपने जिंकेल हे कॉंग्रेसलाही माहीत आहे पन त्यांना तिसरा पर्याय नको आहे, त्यांना आंबेडकरी नेतृत्वाची ताकद वाढलेले नको आहे, गांधी घराण्यापुढे लोटांगन घालणार्यांना आंबेडकर नावाचा नेता नको आहे हे यातुन अधोरेखित होते.
एमआयएम ला अशोक चव्हाणांकडुन इतका कट्टर विरोध म्हणजे स्वतःची नांदेड ची राजकीय हुकुमत जपण्याच्या स्वार्था पलिकडे काहीही नाही, एमआयएम व भारिप बहुजन महासंघ एकजिवाने एकत्र आले तर नांदेड मधुन अशोक चव्हाणांचे दुकान कायमचे बंद होइल व त्यांना महाराष्ट्रात दुसरे कुठुन निवडणुक लढुन जिंकुन येणे अशक्याहुन अशक्य आहे, फक्त या एका स्वार्थासाठी अशोक चव्हाण कॉंग्रेस पक्षालाच आज अडचनित आनत आहेत, महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे असतानाही अशोक चव्हाणांची लुडबुड व एमआयएम ला भारिप ने सोडावे हा हट्ट त्यांच्या वैयक्तिक राजकिय अस्तित्व टिकवण्यासाठीचा केविलवाना प्रयत्न आहे हे स्पष्टपने दिसते.
अशोकराव कॉंग्रेसपेक्षा मोठे बनायचा तुमचा प्रयत्न भाजप चा पथ्यावर पडेल असे तुम्हाला वाटत नाही का?
आदर्श घोटाळ्यातुन सुटलात पन जनतेच्या रेट्यापुढे तुमचा हा रडीचा डाव चालनार नाही, आज तुमच्या कॉंग्रेस पेक्षा वंचित बहुजन आघाडी मोठी ताकद आहे हे सत्य मान्य करा व बाळासाहेबांना शरन जा.
काल एका चर्चेत कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे प्रवक्ते ( वाघमारे व गजभिये)  बाळासाहेबांना वारंवार "प्रकाश आंबेडकर आमचे दैवत आहेत“ असा उल्लेख करताना पाहीले, आता बाळासाहेबांना दैवत म्हणता तर त्यांना शरन यायची लाज बाळगु नका.
आजवर बाळासाहेबांशी किंवा इतर रिपाई नेत्यांशी जसे वागत आलात तसे आता वागायची घोडचुक करु नका, तोंडघुशी पडाल, आता तुम्ही पैशाने वंचितांचे मत विकत घेऊ शकनार नाहीत, आमचे मतदार तुमचे पैसे तर घेतील पन मतदान वंचित बहुजन आघाडीलाच करतील हे लक्षात ठेवा.
भाजपाला हरवायचे आहे, भाजप संविधान विरोधी आहे,  हे सर्व मुद्दे बाळासाहेबांचेच कॉपी मारताय तसे त्यांच्याशी सन्मानाने चर्चा करा व राजकीय अस्तित्व जपा. पुर्वीची परंपरागत मग्रुरी आता वंचित समाज कदापी सहन करणार नाही, वैयक्तिक स्वार्थ सोडा अन्यथा तेलंगना प्रमाणे कॉंग्रेस व भाजपा दोघांना लाथाडुन येथे वंचित सत्तेवर बसतील, आता हे वंचित समुहांचे पक्के ठरलेले आहे. तुम्ही स्वतःचा मतदार संघातील हुकुमत महत्वाची वाटत असेल पन आम्हाला या सर्व देशावर प्रेम आहे व आम्ही सर्व देशासाठी, देशातील वंचितांसाठी प्राण पनाला लावुन ही निवडणुक अस्तित्वाची लढाई म्हणुन लढणार आहोत हे लक्षात राहु द्या.
जय भिम जय संविधान
- मनोज काळे, ठाणे,  8169291009

----------------------------------------

काँग्रेसच्या नेत्यांनो दलित/बौद्ध/ वंचित बहुजनांना इमोशनल ब्लॅकमेलिंग करणे सोडा।

काँग्रेसच्या नेत्यांनो दलित/बौद्ध/ वंचित बहुजनांना इमोशनल ब्लॅकमेलिंग करणे सोडा।

-
विश्वजीत गजभिये।

नुकत्याच आलेल्या बातमीनुसार अशोक चव्हाणांनी जाहीर केले की वंचित बहूजन आघाडीशी जर युती झाली नाही तरी अकोला लोकसभेची जागा प्रकाश आंबेडकर यांना सोडू।

मी सर्वप्रथम महाराष्ट्राच्या तमाम जनतेस लक्षात आणून देऊ इच्छितो की महाराष्ट्र राज्याचे लोकसभा प्रभारी मा.मल्लिकार्जुन खरगे असल्यामुळे, जागा वाटापासंदर्भात सर्व निर्णय मा.खरगेजी व दिल्लीतील हाय कमांड घेत असते त्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्याही काँग्रेस नेत्याला हा अधिकार नाही.सबब मेन स्ट्रीम मिडियामध्ये अशोक चव्हाण वा इतर कुणी नेते वंचित बहुजन आघाडीच्या युतीसंबंधी बोलत असतील तर तो शुद्ध कावेबाजपणा आहे,

ज्याअर्थी निर्णय घेणारे खरगेजी व दिल्लीतील हाय कमांड असल्यामुळे राज्यातील नेत्यांना युतीवर बोलण्याचा नैतिक अधिकार राहत नाही।

तर,

आपण मूळ विषयाकडे वळूयात, अशोक चव्हाणांनी वक्तव्य केलं की वंचित बहुजन आघाडीशी युती झाली नाही तरी अकोला लोकसभा सिट प्रकाश आंबेडकरांसाठी सोडू।

वरील वक्तव्यावरून अशोक चव्हाणांचा भंपकपणा उघडकीस येतो।

माझा चव्हाणांना थेट सवाल हा आहे की आत्ताच म्हणजे 2019 लाच बाळासाहेब आंबेडकरांवर एवढे प्रेम उतू का येतंय.???

तर याला दोन कारणे असावीत एक म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा झंझावात बघून तमाम काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे।
आणि दुसरे म्हणजे बाळासाहेबांबद्दल इमोशनल करून इथल्या दलित/वंचित समूहाच्या संपूर्ण मतांवर डल्ला मारायचा आहे।

असेच प्रेम 2004, 2009, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत का उतू गेले नाही.???

वर नमूद केलेल्या वर्षी भाजपा वर्सेस बाळासाहेब आंबेडकर अशी सरळ लढत असतांना तिनही वेळेस काँग्रेसने माती खाल्ली आहे।

सण 2004 ची आकडेवारी अभ्यासली असता असे दिसून येते की भाजपाचे  संजय धोत्रे 313324 मते मिळवून विजयी झाले होते त्यावेळी बाळासाहेबांना 170000 च्या आसपास मते होती, केवळ बाळासाहेबांना पाडण्यासाठी काँग्रेसकडून लक्ष्मणराव तायडे यांना उमेदवारी देण्यात आली होती व त्यांनी 206912 मते मिळवली होती,

जर काँग्रेस पक्षाने तायडेंच्या रुपात बौद्धांची मते खाण्यासाठी डमी उमेदवार दिला  नसता तर बाळासाहेब सहज निवडून आले असते।

सण 2009 ची आकडेवारी अभ्यासली असता असे दिसून येते की भाजपाचे विजयी उमेदवार धोत्रे यांना 2,87,526 मते पडली तर बाळासाहेब आंबेडकर यांना 2,22,678 मते पडली म्हणजे बाळासाहेबांचा केवळ 64,858 इतक्या कमी मतांनी पराभव झाला होता।
यावेळी सुद्धा काँग्रेसने बाबासाहेब धाबेकर यांना उमेदवारी देऊन दलित/ बहुजनांची 1,82,787 मते फोडली होती।

यावेळी काँग्रेसचे बाळासाहेब आंबेडकरांवर प्रेम का नव्हते.???
सांगा ना चव्हाण साहेब,  ....सांगा।

सण 2014 ची आकडेवारी अभ्यासली असता असे दिसून येते की भाजपाचे विजयी उमेदवार धोत्रे यांना 456472 मते मिळाली होती तर बाळासाहेब आंबेडकर यांना 238776 मते मिळाली होती।

यावेळी काँग्रेसने केवळ बाळासाहेबांचा पराभव करण्यासाठी बौद्ध वर्सेस मुस्लिम अशी कावेबाज व धूर्त खेळी खेळून हिदायतउल्ला पटेल या मुस्लिम उमेदवाराला मुस्लिमांची मते खाण्यासाठी उमेदवारी दिली होती। यात त्यांनी 2,53,356 मते मिळवली।

बाळासाहेबांच्या मतांची व पटेलांच्या मतांची बेरीज केली असता बाळासाहेब सहज निवडून आले असते मग त्यावेळी काँग्रेसचे त्यांच्यावर प्रेम का नव्हते.???

केवळ बाळासाहेब आंबेडकरांना पाडायचे म्हणून मुस्लिम उमेदवार देण्यात आला होता काय.??

सांगा ना चव्हाण साहेब,,,.......सांगा।

आता 2019लाच बाळासाहेबांवर इतके प्रेम का.????

केवळ एक जागा सोडून संपूर्ण दलित/मुस्लिम/वंचित बहुजनांच्या मतांवर डल्ला मारायचा आहे काय.???

तुम्ही आम्हाला मूर्ख समजता काय.???

आकडेवारीचा खेळ/ सामाजिक ध्रुवीकरनाचा खेळ आम्हाला कळत नाही काय.????

सांगा ना चव्हाण साहेब,,,.... सांगा।

मला व माझ्यासारख्या कित्येक तरुणांना आज काँग्रेस जे दलितांसोबत  80/90 च्या दशकातील राजकारण करीत आहे त्यावर प्रचंड हसू येत आहे, अरे बाबांनो 2 खासदारकी, 3/4 आमदार, 2/3 महामंडळे, 3/4शासकीय समित्याच्या बदल्यात संपूर्ण राज्यातील तमाम दलित/बौद्ध/मुस्लिम/वंचित बहुजनांचे मतांवर डल्ला मारण्याचे दिवस गेलेत।

इतके वर्ष आम्हाला मूर्ख  बनवलात, आमची फसवणूक केलीत ते आम्ही विसरतो मात्र आता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर म्हणतील तेच होणार। आमचा राजकीय वाटा आम्हाला द्या,

चव्हाण साहेब तुमच्या कुठलेही इमोशनल ब्लॅकमेलिंगला आता आम्ही बळी पडणार नाही म्हणून तुमच्या अधिकारात नसलेले व  बालिशपणाचे  वक्तव्य करू नका। आता या वंचित बहुजन समाजाला मूर्ख बनवणे तुम्हास जमणार नाही।

विश्वजीत गजभिये।
25/12/2018

Monday, 24 December 2018

..पन का ? हा विचार करुन पहा.

..पन का ? हा विचार करुन पहा.

प्रज्ञासुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जगात ओळख आहे ती पुस्तकप्रेमी_बाबासाहेब म्हणुनच....
पुस्तकांसाठी घर बांधणारा सृष्टीच्या इतिहासातील एकमेव महामानव, घरात राशन नसले तरी चालेल पन घरात नविन पुस्तके आणली पाहीजेत असेच त्यांचे पुर्ण जिवन गेले, पुस्तके गोळा करणे, वाचणे, नविन विषयांवर पुस्तके लिहीणे यातच जीवन गेले..

पन याच पुस्तकप्रेमी बाबासाहेबांनी एक पुस्तक अक्षरशः जाळुन खाक केले...ते पुस्तक म्हणजेच #मनुस्मृती.
आज आपन ज्या ज्या गोष्टींना वाईट, नालायकपनाचे, अन्यायकारक समजतो त्या सर्व गोष्टींना मनुस्मृतीत कायद्याचे रुप दिले होते व सारा देशाने त्यानुसार जगायची सवय लावुन घेतली होती.
त्या जुलमी कायद्यापासुन भारतीयांची सुटका करायला व ते पुस्तक जाळायला बाबासाहेबांसारखा पुस्तकप्रेमीलाही ते पुस्तक जाळावे लागले.

- मनोज काळे

वंचीत बहुजन आघाडी,एक्सप्रेस सुसाट धावणार आहे

वंचीत बहुजन आघाडी,एक्सप्रेस सुसाट धावणार आहे
-------------------------------------------------------------
विधानसभेत आणि लोकसभेत जाणाऱ्या प्रस्तापितांच्या राजकीय बुलेट ट्रेना मध्ये फक्त प्रस्तापित लोकांच्या पाहुणे-राहुन्याचेच टिकट बुक असतात. प्रस्तापितांच्या राजकीय बुलेट ट्रेन या खालील प्रमाणे आहेत.
१) काँग्रेस राजकीय बुलेट ट्रेन
२) भाजपा राजकीय बुलेट ट्रेन
३) राष्ट्रवादी राजकीय बुलेट ट्रेन
४) शिवसेना राजकीय बुलेट ट्रेन
           ह्या बुलेट ट्रेंन मधून इतरांना म्हणजेच मराठा समाज १६९ घरांणे सोडून,मुस्लिम,धनगर,बोद्ध, ख्रिचंन,माळी, तेली,साळी, कोळी,मांग,चांभार,ढोर,होलार, घिसडी,कुंभार,कैकाडी,पारधी,भिल,आदिवासी,लिंगायत,सिंपी इत्यादी  घटकांना प्रवास करून विधानसभेत व लोकसभेत न जाण्याची भरदार अशी मजबूत आपल्या, आपल्या पाहुण्या-राहुण्याच्या, धनदांडग्याच्या व एखांद्या आपल्या पाळलेल्या कुत्र्याच्या हिताची व्यवस्था करून ठेवली आहे. म्हणून तर या राजकीय बुलेट ट्रेनच्या माध्यमातून विधानसभेत व लोकसभेत फक्त हे प्रस्तापित लोकं जाऊन बसतात.आणि या राजकीय बुलेट ट्रँनच्या माध्यमातून सत्ते मध्ये आपणच कशे येऊन बसू याची पुरेपूर काळजी घेतली जाते.
         या बुलेट ट्रेनला धुनं, रिपेरिंग करणं, डाग-डुग करणं, ग्रीसिंग करणं , नट बोल्ट टाईट करणं, झाड-झुड करणं, लाईट,as, कलर,राजकीय बुलेट ट्रेन च्या पट्रीची देख-रेख करणं असे असंख्य तडक्लास ची कामं हे वर दिलेल्या वंचीत घटकांच्या वाटेला दिले जातात. ( पक्ष वाढीचं काम हे वरील दिलेल्या वंचीत घटका कडून भावनिकतेच्या आधारावर करून घेतलं जातं जसे की राम मंदिर,हिंदू,गोमाता, खोटारडा पुरोगामी पणा ) यांनी फक्त दिलेत तेवढेच कामं करायचे , यांना या राजकीय बुलेट ट्रेन मध्ये बसून थेट विधानसभा,लोकसभा मध्ये जाण्याची मुभा नाही. जर यांना या राजकीय बुलेट ट्रेन मध्ये बसवलच तर फार-फार  ग्रामपंचायत,पंच्यात समिती किंवा लैच-लैच झालं तर जिल्हा परिषद मध्ये नेऊन सोडल्या जाते. पुढे विधानसभा व लोकसभा सोडून बोलो.
       याच वंचीत घटकांना विधानसभेत व लोकसभेत नेण्याण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी अशी  एक राजजकीय एक्सप्रेस तयार केली आहे. कि, ती प्रस्थापितांच्या राजकीय बुलेट ट्रेनला टक्कर देऊन पुढे जाणारी आहे. ती वंचितांना थेट विधानसभेत व लोकसभेत घेऊन जाणारी आहे. आता फक्त निर्यय घ्यायचा आहे तो इथल्या वंचीत घटकांना. तो असा, प्रस्थापितांच्या राजकीय बुलेट ट्रेनचे काम करून प्रस्थापितांनाच त्या राजकीय बुलेट ट्रेन मध्ये बसून विधानसभेत व लोकसभेत पाठवायचं? कि बाळासाहेबांनी तयार केल्येल्या वंचीत बहुजन आघाडी एक्सप्रेसचे काम (ज्यात आपलं हित आहे.)करून  ईच्यातच बसून आपण स्वतः विधान सभेत व लोकसभेत जायचं?  ज्या-ज्या वंचीत घटकांचं प्रतींनिधित्व विधानसभेत व लोक सभेत पाठवायचं आहे त्या-त्या सर्व वंचीत घटकाणे २०१९ डोळ्या समोर लक्ष ठेऊन ,वंचीत बहुजन आघाडीचे काम तन, मन,धनाने करावं. कारण आता विधानसभा मतदारसंघ-लोकसभा मतदारसंघ to विधानभवन-संसदभवन "वंचीत बहुजन आघाडी एक्सप्रेस" सुसाट धावणार आहे.

                  --संदीप साळवे,जालना.
                  मो.नं.८६९१९५५२०२

सत्तेचा वापर जनहितासाठी

सत्तेचा वापर जनहितासाठी
- भास्कर भोजने
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नांव घेऊन राजकारण करणारे अनेक नेते झाले. त्यांनी ऊपेक्षित समाज समुहाला हाक देऊन मते मिळविली ,कुणी आघाडी, युतीचा पर्याय निवडला तर कुणी सत्ताधा-यांच्या कळपातचं सामील झाले.
            मिळालेल्या सत्तेचा वापर जनहितासाठी करण्याऐवजी नेत्यांनी स्वतः चे कल्याण करुन घेण्यातचं धन्यता मानली.
म्हणून लोकशाहीला अभिप्रेत असलेली सामाजिक समता प्रस्थापित करता आली नाही हे वास्तव आहे.
दलितांचे नेते जगजिवनराम ऊपपंतप्रधान पदापर्यंत पोहोचले परंतु स्वहिता पलीकडे त्यांना काही करता आले नाही.
मा.बुटासिंग देशाचे गृहमंत्री झाले मात्र दलितांवरील अन्यायाचे परिमार्जन करु शकले नाही.
तीच गत काँग्रेस मधील बाळकृष्ण वासनिक, नाशिकराव तिरपुडे, दादासाहेब रुपवते,मुकुल वासनिक, नितीन राऊत व चंद्रकांत हंडोरे यांची आहे.
रिपब्लीकन पक्षाचं नांव धारणं करून राजकारण करणारे परंतु काँग्रेसच्या मर्जीने राजकारणं करणारे रा.सू.गवई राज्यपाल पदापर्यंत पोहोचले परंतु त्यांच्या सत्तेचा लाभ केवळ त्यांच्या कुटुंबा पर्यंत चं सिमित राहिला.
समाजाला त्याचा कुठलाचं फायदा पोहोचला नाही.
रा.सू.गवईचा कित्ता गिरवितचं रामदास आठवले चा राजकीय प्रवास सुरु झाला. काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना आणि भाजप. मिळेल तिथून सत्तेच्या पदाचा लाभ घ्यायचा हा एकचं अजेंडा आणि एकचं ध्येय.
समाजाशी काही देणेघेणे नाही. "समाज कल्याण "हे नांव धारणं करुन स्वकल्याण करण्यातचं त्यांची संपूर्ण कारकीर्द गेली.
रिपब्लीकन पक्षाचे नेते "नालायक "आहेत असे म्हणून राजकारण करणारे मा.कांशिराम आणि मायावती यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन मते मिळविली .आणि सत्तेसाठी मनूवादी विचारधारेशी घरोबा केला.
एक वेळ नाही चार वेळा देशातील सर्वात मोठ्या राज्याची सत्ता संपादन केली .परंतु त्या सत्तेचा वापर जनहितासाठी करण्याऐवजी स्वतः चे पुतळे ऊभारण्यासाठी केला.
विभुती पुजेचा मार्ग चोखाळला आणि आंबेडकरवादाला तिलांजली दिली.
ऊत्तर प्रदेशात भाजप सारख्या विषारी सापाला दूध पाजून मोठे केले.
           आंबेडकरवादी समाज समुहाला अभिप्रेत राजकारण केल्या गेलं नाही हे वास्तव कुणीही नाकारु शकतं नाही. !
अँड. बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ३५-३६ वर्षाच्या राजकीय जिवनात कधीच सत्ताधार्यांशी साटंलोटं करून पदाची अभिलाषा बाळगली नाही.
ऊलटं व्ही.पी.सिंग आणि राजीव गांधी यांनी दिलेली मंत्रीपदाची संधी नाकारली. सत्तेचा मोह टाळला.आणि त्यागाचा मार्ग अनूसरला .आणि समाज हिताचा सातत्याने पाठपुरावा केला.
१९८९ मध्ये व्ही.पी.सिंग सोबतं युती करून. आंबेडकरी चळवळीचे  ४० वर्षापासून भिजतं पडलेले प्रश्न सोडवून घेतले .
बौद्धांना केंद्रात सवलती, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संसदेत तैलचित्र लावणे.,डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न किताब देणे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जन्म शताब्दी शासकीय खर्चाने साजरी करणे.मंडल आयोगाची अमलबजावणी करणे.,आणि एस.सी.एस.टी.कर्मचाऱ्यांसाठी कमीशनची नेमणूक करून घेणे.
ही सर्व समाजहिताची ,जनकल्याणाची कामे करून घेतली.
अँड. बाळासाहेब आंबेडकर केवळ खासदार राहिले आहेत. एक खासदार काय करु शकतो.?
जे ऊपपंतप्रधान, गृहमंत्री, राज्यपाल, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि मंत्री राहुनही त्यांना जे करता आले नाही ते एका खासदाराने करून दाखवले.!
सन १९९२-९३ मध्ये अँड. बाळासाहेब आंबेडकर राज्यसभेचे खासदार होते. त्यावेळी बिशप अझरैया,हेनरी त्यागराज ,आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या (युनो.)जिनेव्हा कार्यालयामध्ये दलित स्त्रिया आणि दलितावरील अत्याचाराच्या संदर्भात भारताच्या लोकसभेत सादर केलेले अहवाल सादर केले. आणि मागणी केली की, भारतात दलित स्त्रिया आणि दलितांचा होणारा छळ थांबला पाहिजे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. !
या अहवालाच्या आधारे त्यावेळी युनोने भारत सरकारकडे विचारणा केली. परंतु भारत सरकारने युनोला ऊडवाऊडवीची ऊत्तरे दिली.
अँड. बाळासाहेब आंबेडकरांनी त्या विषयाचा पाठपुरावा केला म्हणून यूनोने श्रीलंकेचे अँटर्नी जनरल श्री.गुरुशिंगे यांच्या अध्यक्षतेखाली ऊपसमिती नेमली. त्या ऊपसमितीचा अहवाल सप्टेंबर १९९६ ला आला.
संयुक्त राष्ट्र संघात (युनो.)हा प्रश्न ऊठविल्यामुळे दलित आणि दलितांचे प्रश्न यांची जाणीव जगभर झाली.
दलितांचे प्रश्न जगाच्या वेशीवर टांगणारे पहिले डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे अँड. बाळासाहेब आंबेडकर..!

कार्यकर्ता कसा असवा?

स्वतःला कार्यकर्ता समजत असाल तर जरूर वाचा...

1) संघटनेची तत्वप्रणाली-
त्याला मान्य असावी. संघटनेचे अंतीम ध्येय, उद्धीष्ट्य त्याला माहित असावे.
2)समाजाबद्दल आपुलकी असावी.
संघटनेच्या कार्कर्त्यांबध्दल त्याच्या मनात सद्भावना, प्रेम, आदरभाव असावा.
3)स्वत:च्या समाजाचा पूर्वेतिहास त्याला माहित असावा. कारण जो इतिहास विसरतो तो इतिहास घडऊ शकत नाही असे म्हटले जाते.
4)कार्यकर्ता हलक्या कानाचा नसावा. संघटनेचा नेता आणि उध्दीष्ठ यावर त्याचा ठाम विश्वास असायला हवा.
5) कार्यकर्त्याच्या ठायी अहंभाव नसावा. दुसरया कार्यकर्त्याचा व त्याच्या कामाचा सन्मान/आदर करणारा असावा.
6) पदलोभी नसावा-
पदाची लालसा असलेले कार्यकर्ते शत्रुंपेक्षाही घातक असतात. ते स्वतःही संघटन वाढवीत नाहीत आणि इतरांनाही वाढवू देत नाहीत. संघटन फक्त लेटरपॅडवर शिल्लक राहते.
7) आकलनशक्ती-
नेत्याच्या 'सूचक' शब्दांचा अर्थ समजला पाहिजे. Read between the lines दर्जाची आकलन क्षमता असावी.
8) सूक्ष्म निरीक्षण-
कार्यकर्त्याकडे सूक्ष्म निरीक्षण शक्ति असावी. सर्वच समाजात घडणा-या लहानमोठ्या घटनांची त्याने नोंद घ्यायला हवी.
9) भाषण व संभाषण चातुर्य- आपल्या मधुर वाणीने मुद्दा पटवून देण्याचे चातुर्य कार्यकर्त्याने अवगत करावे.
10) आत्मविश्वास-
निराश मनोवृत्ती नको.अपयशाचे यशात रूपांतर करतो, तोच खरा लढवय्या, नाहीतर 'रडवय्या'.
कार्यकर्त्याच्या डिक्शनरीत 'निराशा' हा शब्दच नसतो. दुर्बल परिस्थितीशी जुळवून घेतात. पराक्रमी परिस्थिती हवी तशी बनवण्यासाठी लढा देतात.
11) परिश्रम, चिकाटी आणि सातत्य-
ध्येय गाठण्यासाठी इतरांपेक्षा जास्त परिश्रम करण्याची तयारी हवी. प्रयत्नांत सातत्य हवे.धरसोड नको.
12) कार्यकर्ते जोडणारा-
कार्यकर्ते जोडणारा असावा. तोडणारा नको. प्रभावी संघटन हिच संघटनेची शक्ति असते.
13) कार्यकर्ते हेरणारा व व्यक्तीपरीक्षक-
कर्तृत्वशाली, सदाचारी आणि प्रभावी व्यक्तींना हेरून त्यांना संघटनेत सामील करण्याचे कौशल्य कार्यकर्त्याकडे हवे.
चांगले काम करणारा कार्यकर्ता पुढे जात असेल तर त्यावर खोटे आरोप करुन त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न कदापी करु नका...
14) शिस्त व वेळ पाळणारा पाहिजे.
15) त्याला उपलब्ध साधनांचा काटकसरीने व कौशल्याने वापर करता यावा.
16) श्रेय लाटण्याची मनोवृत्तीचा नसावा. धोकेबाज नसावा.
17) कार्यक्रमाचे आयोजन करता यावे. संघटनेचे विविध उपक्रम राबविण्याची जबाबदारी स्वीकारावी. पुढाकार घ्यावा. किमान संघटनेच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये त्याचा सक्रीय सहभाग असावा.
18) समताप्रेमी व समर्पित मनोवृत्तीचा असावा. श्रमाची लाज वाटू नये.
19) अभ्यासू, चिकित्सक व संशोधक वृत्तीचा असावा.
20) गुप्तता-
संघटनेतील काही गुप्त गोष्टी गुप्तच ठेवणारा असावा.
21) कार्यकर्त्याला संघटनेचा व स्वतःचा विचार दुस-यांस पटवून देता यायला हवा.
22)प्रसिद्धी व प्रतिष्ठा यांस हपापलेला नसावा.
23) अंधश्रद्धाळू नसावा.
24)संघटनेसाठी वेळ, बुद्धी, श्रम, कौशल्य आणि पैसा हे 'पंचदान' देणारा असावा.
25)संघटना समाजातील सर्वांच्या भल्यासाठी आहे.स्वत:च्या भल्यासाठी नाही...
त्यामुळे संघटनेसाठी सातत्याने पंचगुणांचे योगदान करणारा असावा.
👉 ज्या संघटनेकडे वरील गुणधर्म असलेले कार्यकर्ते असतात; त्या संघटनेला जगात तोड नसते.
👉 आपल्यालाही आपलं संघटन मजबूत बनवायचं असेल तर वरील गुणधर्म कार्यकर्ता म्हणून अंगी बाणवणं अत्यावश्यक आहे.

संकलित

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...