समाजाचे नेतृत्व आणि पितृत्वही स्विकारणारे "आंबेडकर“
भाग १
- मनोज नागोराव काळे, ठाणे
भारताला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही प्रदान केली व या देशातील रहीवाशांना सृष्टी निर्माण झाल्यापासुन पहिल्यांदाच देशाचे अधिकृत नागरिकत्व प्रदान केले. व त्याच लोकशाहीचे जतन व्हावे ती लोकशाही म्हणजेच प्रजासत्ताक संस्कृती या देशातील तळागाळापर्यंत झिरपावी यासाठी अत्यंत व्यापक दुरदृष्टी ठेवुन "भारतीय प्रजासत्ताक पक्षा" ची मांडनी केली.
बाबासाहेबांचे अचानक महापरिनिर्वान झाले त्यामुळे बाबासाहेबांनी कल्पना केलेला रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबा नंतर त्यांच्या अनुयायाकडुन स्थापन केला गेला, त्याचे स्थापने पासुन आजवर काय काय शकले झाली हे आपन सर्वजन जानतोच आहोत.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील सर्वच नागरिकांचे पितृत्व स्विकारले व जेव्हा संविधानाच्या माध्यमातुन देशाला घडविण्याची वेळ आली तेव्हा सर्व भारतीयांना समान हक्क अधिकारांनी मालामाल करुन सोडले, ज्या लोकांनी बाबासाहेबांचा जिवनभर छळ केला त्यांनाही बाबासाहेब आंबेडकरांनी करुणा, मैत्री, उपेक्षा भावाने पाहीले व सर्वांनाच मालामाल केले, कोणाबद्दलही द्वेशभावना मनात न ठेवता पितृत्वाच्या भावनेने सर्वांच्या पदरात स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, शिक्षण टाकले.
आपन ज्या समाजाचे नेतृत्व करत आहोत त्या समाजाला कोणत्याही अडचणित न येऊ देता त्या समाजाचे शक्य तितके प्रश्न सोडवित रहान्यातच बाबासाहेबांची संपुर्ण हयात गेली, बाबासाहेबांनी हिंसेला हिंसेने उत्तर कधीच द्यायचे नाही, आपले आंदोलन कायद्याच्या चौकटीत राहुनच करायचे अशी शिस्त आपल्या सर्व कार्यकर्त्यांना लावली होती, त्याच मार्गाला आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर पुढे नेताना दिसत आहेत म्हणुन एका कवीने कविता केली की..बाळासाहेबांना पाहुन ग भिम परतुन आल्यासारख वाटतय...यात जराही अतिशयोक्ती नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीअंत, प्रबुद्ध भारत शासनकर्ती जमात बनने या संकल्पना एकटे बाळासाहेब पुढे नेताना दिसत आहेत, कोणतीही तडजोड नाही की कुणाशी मांडवली नाही, सत्ता असो की नसो समाजाच्या व देशाच्या उन्नतीचा प्रत्येक प्रश्नावर सर्वात पहिला आवाज उठतो तो फक्त बाळासाहेब आंबेडकरांचाच हे आपन रोज पहात आहोत.
शासनकर्ती जमात व्हा असा बाबासाहेबांनी संदेश दिला होता कारण सत्ता मिळवुन समाजाचा स्तर उंचवा असा त्यामागचा उदात्त हेतु होता, पन शासनकर्ती जमात बना या क्रांतीविचाराचा वापर करुन, जनतेला तो विचार सतत सांगुन आपल्या देशात फक्त मुख्यमंत्री,मंत्री,नगरसेवक बना व पैसे कमवा असा धंदा सुरु झाला तो धंदा कुनी राष्ट्रीय पातळीवर केला व कुणी राज्यपातळीवर केला आपना सुज्ञ वाचकांना नक्कीच माहीत असावे त्याला एकच अपवाद म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत, आजवर बाळासाहेबा शिवाय इतर सर्वांनीच फक्त पैसा,पद, यासाठीच सत्तेकडे धाव घेतली आहे हे आपल्याला समजुनच चुकले आहे. समाजाचे नेतृत्व तर स्विकारले पन समाजाचे पितृत्वही स्विकारुन समाजाच्या सुरक्षितते बद्दल सदैव जागरुक राहुन समाजाला वेळोवेळी मोठमोठ्या संकटातुन वाचवले व त्याचे कधीच श्रेय्य घेतले नाही कि कुठे त्याचा राजकीय फायदा व्हावा अशी आशा बाळगली नाही, असे रक्ताचे व विचारांचे, नेतृत्वाचे वारस ठरले आहेत, आणि ते आता सर्वांना समजुन चुकले आहे.
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी आजवर समाजाला ज्या मोठमोठ्या संकटां पासुन वाचवले त्याचे काही निवडक व महत्वाची उदाहरणे पुढे देत आहे, बाळासाहेबांनी वेळोवेळी घेतलेल्या त्या निर्णयांकडे थोडे प्रगल्भतेने पहा तेव्हा समजेल की बाळासाहेब आंबेडकर समाजाचे नेतृत्व तर करतात पन पितृत्वही जपतात.राजकीय फायद्यापेक्षा सामाजिक सलोखा जपला तरच लोकशाही टिकते व लोकशाहीची मुल्ये वृद्धींगत होतात यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेले काही निर्णय पहा.
१. मराठा क्रांती मोर्चा ला प्रतिमोर्चे काढु नयेत.
- मराठा समाज आर्थिकदृष्ट्या कमजोर झाला आहे, प्रस्थापित काही मराठा घराण्यांनी सर्व सत्तास्थाने बळकावुन मराठ्यांचा फक्त मतदार म्हणुन वापर करुन घेतला व समाजाला काहीही मिळु दिले नाही त्यामुळे मोठा विस्थापित मराठा वर्ग हा आर्थिक संकटात सापडला आहे, तो सरकार कडे आरक्षण मागुन त्या संकटातुन सुटण्याचा प्रयत्न करतोय, मराठा समाजाचे मोर्चे हे सरकार च्या विरोधात आहेत त्यामुळे आपन त्या मोर्चांना विरोध करु नये अशी भक्कम भुमिका बाळासाहेब आंबेडकरांनी घेतली व बौद्ध मराठा असा वाद लावुन आपली राजकीय पोळी भाजु पहाणार्यांचा डाव हानुन पाडला. राज्यात दंगली घडवण्याचा कट उध्वस्त करुन समाजाला संकटापासुन दुर ठेवले.या गोष्टीकडे सनाजाने गांभिर्याने पाहीले पाहीजे.
२. दादर स्टेशन ला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देऊ नये.
- काही नव्या जन्माला आलेल्या संघटना स्वतःच्या संघटनांचे नाव वाढावे व संघटना वाढावी अशा हेतुने डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचे भांडवल करुन काहीतरी नवीन इश्यु तयार करतात व त्यातुन स्वताचे नेतृत्व समाजावर लादायचा प्रयत्न करतात, अशा आंदोलनांमुळे समाजाचा कोनताही मुळ प्रश्न सुटत नसतो, त्यामुळे देशात सगळीकडे शहरांची नावे बदलन्याचे जोरदार राजकारण सुरु असताना बाळासाहेबांनी दादर स्टेशनला बाबासाहेबांचे नाव देऊ नये अशी भुमिका घेऊन समाजाचे मुख्य प्रश्न सोडुन आपन इतर मुद्यावर वेळ व शक्ती खर्च करणार नाही हे सिद्ध केले, भावनिक मुद्यांच्या राजकारणाला फाटा देण्यात बाळासाहेब यशस्वी झाले. भाजपा कडुन होणार्या नामांतर राजकारणावर मात केली आहे व एका भावनिक आंदोलनातुन समाजाची मुक्तता केली आहे. संविधान वाचवने सध्या जास्त महत्वाचे आहे त्यासाठी सर्व संघटनांनी आपापली शक्ती लावावी असा संदेश त्यातुन गेला.
३. वंचित बहुजन आघाडी व एमआयएम युती
- डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दुसर्या गोलमेज परिषदेच्या वेळी बैरिस्टर जिनांना एक ऑफर केली होती की कशाला एक छोटासा पाकिस्तान चा तुकडा घऊन वेगळे होत आहात, आपन एकत्र येऊ तुम्ही व आम्ही एकत्र आलो तर आपन या अखंड देशावर राज्य करु शकतो, त्यावेळी जिंनांनी ते स्विकारले नाही मात्र दलित बहुजन व मुस्लिम एकत्र येऊन सत्ता मिळवण्याचे बाबासाहेबांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी बाळासाहेबांनी एम आय एम शी वंचित बहुजन आघाडी सोबत युती घडवुन आणली आहे.
या देशात बौद्ध व मुस्लिमांना कट्टरवादी आरएसएस नेहमी टारगेट करत असते, सतत या दोन समुहांना आयसोलेट करुन त्यांच्यावर अत्याचार केले जातात व त्यांच्यात भय निर्माण करुन ठेवले जाते पन यावेळी मुस्लिम व बहुजन एकत्र आल्याने आरएसएस व त्यांच्या संलग्न संघटनांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, त्यांचे दोन शत्रु एकाच नेतृत्वात एकत्र आल्याने संघवाले थोडे बिथरले आहेत, हे त्यांच्याकडुन होणार्या कुत्सित टिकांवरुन समजते, दोन शक्तिशाली विरोधक एकत्र आल्याने मनुवादी बैकफुटवर आलेत.
४. आरएसएस कडील शस्त्रसाठा जप्त करावा ही मागणी.
- आरएसएस ने आजवर देशात ज्या दंगली केल्या आहेत त्या प्रामुख्याने मुस्लिम किंवा ( आंबेडकरी जनता) बौद्धांविरुद्ध केल्या आहेत, आता हे दोन समाज पुर्ण ताकतीने एकत्र आलेत, त्यांच्या विरुद्ध आरएसएस दंगली करेल व त्यांनी ( संघाने) साठवलेला शस्त्रसाठा आमच्या विरुद्ध वापरला जाईल त्यामुळे पोलिसांनी संघाकडे असणारा अवैध शस्त्रसाठा जप्त करावा अशी मागनी करणारे देशातील बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव नेते आहेत, त्यासाठी बाळासाहेबांनी राज्यातील सर्व कलेक्टर ऑफिस समोर निदर्शने करुन घेतली व मुंबई छ.शिवाजी टर्मिनस समोर मोठे आंदोलन केले त्यामुळे यावर्षी सालाबाद प्रमाने आरएसएस ने दसर्याला शस्त्रपुजा केली नाही, पन आजवर पोलिसांना त्यांच्याजवळील शस्त्रे त्यांनी दिलेली नाहीत, यावर बाळासाहेब अजुनही कायदेशीर लढा देत आहेत.
जी संघटना कायदेशीर रेजीस्टर नाही त्यांच्याकडे हे अद्यावत हत्यारे कशी आली? त्याना ती कोनी पुरवले? त्यांना या हत्यारांची गरज का आहे? कोणाविरुद्ध हे हत्यारे वापरली जाणार आहेत?
हे प्रश्न बाळासाहेबांनी जाहीरपने उपस्थित केले आहेत. भारतातील सर्व दिडशे कोटी जनता, सर्व सत्ताधारी व सर्व विरोधी पक्ष आर एस एस च्या या दहशतवादा विरुद्ध चिडीचुप शांत असताना या भारतभुमीवर एकमेव व्यक्ती संघाविरुद्ध असे बोलन्याची सातत्याने हिम्मत करत आहेत ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. त्यामुळे बाळासाहेब नेतृत्वासह समाजाचे पितृत्वही जपतात हे वेगळे सांगायला नको.
५. रिडल्स इन हिंदुइजम
- डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीलेले रिडल्स इन हिंदुइजम हे पुस्तक जेव्हा शासनाने छापायचे ठरवले तेव्हा काही हिंदु संघटनांनी त्याला तिव्र विरोध केला व हे पुस्तक धर्माविरुद्ध आहे असे म्हणुन याला धार्मिक वादाचे रुपांतर देऊन देशात अराजक पेटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी त्या मुद्याला धार्मिक किंवा जातीय रुप न येऊ देता तो मुद्धा संविधानाने दिलेले लेखन स्वातंत्र्य या दृष्टीकोनातुन लढले यश मिळवले. समाजाला एका मोठ्या अनिष्टापासुन दुर ठेवले.
६. सामाजिक सलोखा वाढवला.
- अकोल्यात बलदेवराव म्हैसने पाटील यांना बौद्धांचा कर्दनकाळ म्हणत असत इतकी दहशत त्यांच्या नावाची होती,ते गुरुदेव सेवामंडळाचे सेवाधारी होते, ते मराठा तरुणांना बलाची उपासना करण्याचे संदेश देत असत ,त्यांचा ज्या ज्या गावात दौरा होत असे त्या त्या गावात बौद्ध मराठा यांच्यातला वाद वाढत असत, अशा व्यक्तीच्या पत्नीला (चित्रलेखातई) १९९९ मध्ये बाळासाहेबांनी जि.प. मध्ये भारिप कडुन उमेदवारी दिली त्यांना निवडुन आणुन अकोला जि प च्या पहिल्या बालकल्यान सभापती बनवले. व समाजात जी अशांतता होती ती शांत करण्यात यश आले, यामागे बाळासाहेबांचा तत्कालीन परिस्थीचा प्रचंड अभ्यास होता व त्यातुनच हा सामाजिक अभिसरनासाठी उच्च कोटीचा प्रयोग यशस्वी केला, त्यानंतर अकोल्यात मराठा बौद्ध सलोखा वाढला.
समाजातील काही संघटनांना जातीवाद्यांनी हाताशी धरुन बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजात न पोचु देता, बाळासाहेब व आंबेडकरी कुटुंबा बद्दल चुकीच्या खोट्या बातम्या सतत पेरायचे व या समाजाला बाबासाहेबां नंतर नेतृत्वच राहीले नाही, समाजाला कोणी वाली राहीला नाही, नेत्यांनीच या समाजाची वाट लावली आहे अशी भावना प्रत्येकाच्या मनात रुजवण्यात मनुवादी यशस्वी झाले, सर्व मीडिया ने बाळासाहेबांचे नेतृत्व व कर्तृत्व न दाखवता एक बुजगावने पांचट कवी व इतर भंपक लोकांनाच समाजाचे नेते म्हणुन सतत प्रकाशझोत बहाल केला,या समाजाचा नेता किती लाचार आहे हेच जगाला दाखवले गेले पन आता मात्र सर्व काळे पडदे फाडुन हा भिमसुर्याचा प्रखर प्रकाश समाजाला दिसला आहे, आता प्रत्येकाला आंबेडकरी बाणा दिसला आहे, स्वाभिमानी व शीलवान नेता सगळ्यांनी हेरला आहे. बाळासाहेबांनी बाबासाहेबांप्रमाणेच समाजाचे नेतृत्व व पितृत्व सतत जपले आहे, आजवर लोकांनी साथ कमी प्रमानात दिली तरी सुद्धा हा पिता आपले समाजाप्रतीचे कर्तव्य सातत्याने करत राहीला....आता समाज एकमताने बाळासाहेबांसोबत उभा ठाकला आहे आता परिवर्तन होणारच आहे, मनुवादी अंधकरा आता हा प्रज्ञासुर्याचा प्रखर प्रकाश संपवणार आहे.
क्रमशः
मनोज नागोराव काळे,
8169291009
-------------------------------------------------
No comments:
Post a Comment