मनुवादी बामसेफ विरुद्ध आंबेडकरी चळवळ - भाग १
- मनोज नागोराव काळे. ठाणे.
सजिव सृष्टी आणि मानवी इतिहासात सर्वात कमी वेळात सर्वात मोठी क्रांती करण्याचे काम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे, अवघ्या ३६ वर्षांमध्ये २००० वर्षांचा इतिहास रक्ताचा एकही थेंब न सांडता करुन दाखवण्याची किमया फक्त बाबासाहेबच करु शकले. नुसताच विषमतावादी, वर्चस्ववादी, वर्णभेदांचा इतिहास बदलला नाही तर त्याला पर्याय असा स्वातंत्र्य,समता, बंधुता व न्याय असणारा एक भारत आपल्या स्वाधिन केला.
भारतीय संविधानातुन स्त्री पुरुष समानता प्रस्थापित केली.
कायद्यानुसार जातीव्यवस्था संपवली गेली, जातीभेद करणे हा गुन्हा ठरवले गेले.
अस्पृश्य गणला गेलेल्या समाजाला तथागत सम्यक संबुद्धांच्या ओटीत टाकले व तो समाज जगातील सर्वात झपाट्याने प्रगती करणारा समाज ठरला आहे.

वरील क्रांती डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या बुद्धीमत्तेच्या, त्यागाच्या,दृढ निश्चयाच्या जोरावर घडवली, तत्कालीन कार्यकर्ते व समर्थकांचेही यात मोठे योगदान होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जिवनाचे दोनच व्यापक आणि प्रमुख ध्येय ठरवले होते व त्यानुसारच मार्गक्रमन केले.
१) जाती व्यवस्था मोडीत काढणे
२) प्रबुद्ध भारतीची निर्मिती करणे
१) जाती व्यवस्था मोडीत काढणे
२) प्रबुद्ध भारतीची निर्मिती करणे
आणि वरील दोन ध्येय पुर्ण करण्यासाठी डॉ बाबासाहेबांनी संपुर्ण हयात संशोधन कार्य करत राहीले, जातींची निर्मिती कशी झाली?, अस्पृश्यता का आली?, धम्म कसा वाढला - धम्माचा -हास कसा झाला?, वंशशुद्धी राहीली आहे का? शब्दप्रामाण्यवाद कसा घातक असतो, क्रांती व प्रतिक्रांती कशा प्रकारे होत गेली आहे?
मनुस्मृती किती जाचक आहे? कोणत्याही कट्टरपंथीयांचा देशाला किती धोका आहे?
या सर्व गोष्टींचे बाबासाहेबांनी अत्यंत कष्टाने उत्तरे शोधली व आपल्यासमोर मांडनी केली. बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनात सर्वच प्रश्नांची उत्तरे शोधली व आपल्याला रेडीमेड दिले.

तथागत सम्यक संबुद्धांनीही २५०० वर्षांपुर्वी भारतात पहिल्यांदा ब्राह्मणशाही मोडीत काढायचे काम केले होते,बहुतेक ब्राम्हणांनी धम्मात सर्वात आगोदर दिक्षा घेऊन धम्म स्विकारुन निर्वाण, अर्हतपद प्राप्त करुन घेतले होते त्यानंतर सर्व जाती समुह धम्मात प्रविष्ट होत गेले व हळुहळु ४५ वर्षात सारा देश "प्रबुद्ध भारत" बनला होता,पुढे तिनशे वर्षांनी ब्राह्मणांनी प्रतिक्रांती करुन धम्माला संपवले. संविधानाच्या रुपाने बाबासाहेबांनीही प्रबुद्ध भारताचे एक उद्दीष्ट्य समोर ठेवले होते व त्याचा कृतीकार्यक्रमही दिला होता. परंतु यावेळी ब्राह्मनवादी लोक मात्र धम्मात सामिल झाले नव्हते, उलट त्यांचे आरएसएस च्या माध्यमातुन ही आंबेडकरांची चळवळ हाणुन पाडायचे प्रयत्न सुरु होते.
लोकशाही ला लोकांनी स्वखुशीने स्विकारले होते, सर्वकाही ठिक सुरु होते, त्यामळे आंबेडकरी चळवळ संपवण्यासाठी त्यात घुसखोरी करणे मनुवाद्यांना जमत नव्हते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी ब्राह्मणवाद्यांना सावधगीरीने दुर ठेवले व संघर्ष चालुच ठेवला, सतत चा मनुवाद विरुद्ध आंबेडकरवाद हा भारतभर संघर्ष सुरुच राहीला.
आंबेडकरी आंदोलनात घुसखोरी करुन आंबेडकरी चळवळ संपवने ब्राह्मनवाद्यांना अशक्य झाले, Dead ambedkar is dangerous than alive हे सर्व भारतीयांना कळुन चुकले.
मनुवादी लोकांनी या गोष्टीची ताकद ओळखली व यासाठी एक तोडगा काढला, आंबेडकरी विचार आत शिरुन संपवता येत नसतील तर आंबेडकरांच्याच नावाने समांतर चळवळ ऊभी करुन त्यातुन विचारांची मोडतोड करायची,
मनुवादी लोक नेहमी इतिहासात प्रत्येक वेळी बलाढ्य विरोधकांना परास्त करण्यासाठी वापरतात तोच मार्ग निवडला, ज्याप्रमाणे बिभिशनाला हाताशी धरुन रावन मारला, सुग्रिव ला हाताशी धरुन बाली मारला.
त्यांनी तसा मोहरा शोधण्याची चाचपनी सुरु केली व त्यांच्या हाती एक मोहरा लागला, ज्याच्या डोक्यात महाराष्ट्रातील शुर महार जातीबद्दल अतिषय तिरस्कार होता असा एक मोहरा त्यांनी हेरला. व त्याच्या हातुन आंबेडकरी चलवळीची गती रोखन्यात कसे यश मिळवले हे आपन पुढे पाहुयात.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महार जात लढाऊ जमात आहे हे सिद्ध करण्यासाठी शेकडो पुस्तके धुंडाळली होती, महार रेजीमेंट ची स्थापना बाबासाहेबांनी करुन घेतली होती, बाबासाहेबांनी महारांच्या विरतेचे प्रतिक असलेले भिमा कोरेगावच्या क्रांतीस्तंभला भेट देने सुरु केले कारण त्यामुळे या समाजात चेतना निर्माण झाली होती व अशा समाजाला जो व्यक्ती “ये गद्दार समाज है“ असो बोलतो तेव्हा तो बाबासाहेब व त्यांनी समाजाचा शोधलेला गौरवशाली इतिहास यावर शिंतोडे उडवायचे काम केले असा एक मोहरा मनुवाद्यांच्या गळाला लागला. तो होता कांशीराम.
कांशी तेरी नेक कमाई तुने सोती कोम जगाई
असा प्रचार सुरु झाला, कांशीरामने बाबासाहेबांना देशभर पोचवले असा धादांत खोटा प्रचार सुरु झाला. कांशीराम ला बाबासाहेब माहीत नव्हते तेव्हा उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया सत्तेची भागीदार होते व पंजाबातही तशीच परिस्थिती होती.
कांशी ने सोती कोम जगाई तो बाबासाहेब ने किसे जगाया था ? असो.
कांशी ने सोती कोम जगाई तो बाबासाहेब ने किसे जगाया था ? असो.
कांशीरामचा उदय हा बिभिशन किंवा सुग्रिव सारखाच झाला.त्यांनी खुप त्याग केला, सायकल वर फिरले, लग्न केले नाही, एकच कोट आयुष्यभर घातला,घरी गेले नाहीत असे त्यांचे समर्थक सांगताना दिसतात,पण आंबेडकरी चळवळीचे मुख्य दोन ध्येय होते त्यासाठी कांशीराम ने काय केले यावर कुनीही बोलत नाही? कारण हे उत्तर कांशीरामला सर्वात मोठा खलनायक बनवते. त्यानंतर वामन मेश्राम व विलास खरात हे दोन पाताळतंत्री प्रसवले गेलेत.
एक उदाहरन पहा - समजा आपले ध्येय्य मुंबई सिएसटी स्टेशनला पोचायचे आहे, आपन आता कल्याण स्टेशन वर आहोत, आपन खुप कष्टाने दिल्ली पर्यंत जरी गेलो तरी त्याला आपन यश म्हणु शकत नाही. कारण सत्तर किलोमिटर वर ध्येय्य असताना सातशे किलोमीटर विरुद्ध दिशेने जाने याला महामुर्खपनाच म्हणता येईल याला यश बोलता येणारच नाही. कारण तुम्ही ध्येयाकडे गेलेले नाहीत. अगदी कांशीरामचे जीवन व कार्य असेच आहे.
१) डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवलेले प्रमुख व पहिले धेय्य होते "जाती निर्मुलन" याबद्दल कांशीरामचे कार्य किती आहे? थोडक्यात पाहु.
जाती निर्मुलन न करता जाती किती घट्ट होतील यासाठी कांशीराम व बामसेफ चोविस तास कार्यरत होते, महार किंवा बौद्ध समाज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर खुप प्रेम करतो, बाबासाहेब हे या समाजाची अस्मिता आहेत ,हा समाज बाबासाहेबांना जिव गेला तरी सोडु शकत नाही व बाबासाहेबांना जागृत होऊन सर्वच्या सर्व जाती धर्माचे लोक, भारतीय समाज उद्धारक, मुक्तिदाता मानु लागला तर आंबेडकरीचळवळीची गती थांबवने अशक्य होऊन जाईल याची जेव्हा कांशीरामला जाणीव झाली तेव्हा त्यांनी प्रत्येक जातीतुन एक व्यक्ती शोधला व त्याला त्या जातीची अस्मिता बनवली, प्रत्येक जातीमधील जाती बद्दल अभिमान वाढवला, त्या व्यक्तीचे त्या जातीसाठी किंवा त्या जातीच्या लोकांच्या उन्नतीसाठी काडीचेही योगदान नसले तरीही त्यांना तुमच्या जातीचा हाच हिरा आहे असे ठसवले गेले. व बाबासाहेबांपासुन एक एक समाज दुर होत गेला, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे जाती तोडो आंदोलनाला कांशीराम व बामसेफ ने जाती जोडो असे स्वरुप दिले. जे बाबासाहेबांच्या ध्येय्याच्या अगदी विपरीत होते पन बाबासाहेबांचेच नाव घेऊन बाबासाहेबांच्या समाजाचा पैसा घेऊन बाबासाहेबांनी ठरवुन दिलेल्या धेय्यापासुन सुशिक्षित लोकांना विरुद्ध दिशेने काम करीयला प्रवृत्त केले गेले व समाज बाबासाहेबांचे विचार न वाचता फक्त कांशीराम, मेश्रांम यांची बोलबच्चन भाषने ऐकुन बाबासाहेबांपासुन विरुद्ध दिशेने अज्ञानामुळे चालु लागला. जाती तोडो सोडुन जाती जोडो ला भर आला. जय भिम या क्रांती घोषाला शेकडो पर्याय दिले गेले, सर्व समाजाचे उध्दारक एकमेव बाबासाहेब असुनही प्रत्येक समाजाला वेगळा आयकॉन दिला गेला.
२) *जाती निर्मुलनासाठी दोनच मार्ग आहेत पहिला धर्मांतर किंवा अंतरजातीय विवाह - डॉ बाबासाहेब आंबेडकर*
कांशीराम,मेश्राम यांनी बामसेफ च्या माध्यमातुन बाबासाहेबांचा जातीनिर्मुलनाचा हा फॉर्म्युला खोडायचा प्रयत्न सतत सुरु ठेवला आहे. धर्मांतर करा व अंतरजातीय विवाह करा असे सांगुन बाबासाहेब थांबले नव्हते तर त्यांनी स्वतः या दोन्ही गोष्टी वैयक्तिक जिवनात करुन या क्रांतीची सुरवात केली होती.
मात्र आरएसएस ने बामसेफ च्या आडुन बाबासाहेबांचा हा मनुवादाला मुळापासुन संपवण्याचा डाव हाणुन पाडायचे प्रयत्न केले,
मात्र आरएसएस ने बामसेफ च्या आडुन बाबासाहेबांचा हा मनुवादाला मुळापासुन संपवण्याचा डाव हाणुन पाडायचे प्रयत्न केले,
त्यासाठी बामसेफने त्यांच्या सामाजिक कार्यातुन तथागत बुद्धांचे नावही घेने टाळले, बामसेफच्या पोस्टरवर चाळीस लोकांचे महामानव म्हणुन फोटो छापले जातात पन तथागत बुद्धांचा फोटो चुकुनही छापला जानार नाही याची दक्षता घेतली गेली, कारण मनुवादाला संपवणारे ते पहिले महामानव होते व बाबासाहेबांनी समाजाला बुद्धाच्या मार्गाने जा असा आदेश दिला होता, बाबासाहेब माझ्या मागे या असे कधीच बोलले नव्हते, बाबासाहेबांनी बुद्ध मार्गानेच जगाचे कल्याण होणार आहे सांगितले होते मग *बामसेफ साठी बुद्ध अस्पृश्य का राहीले* ? हे कुणीही त्यांना विचारले नाही. यातुन त्यांचा बाबासाहेबांच्या बौद्ध धम्म घेण्याच्या क्रांतीला किती भयानक विरोध आहे हे दिसते.
दुसरा मुद्दा अंतरजातीय विवाहाचा, कांशीराम,मायावती, वामन मेश्राम व इतर काही कट्टर बामसेफ वाले अविवाहित राहीले, त्यामुेळे अंतरजातीय विवाहाचा प्रश्नच येत नाही, अविवाहीत राहुन कार्य करने ही भारतात आरएसएस ची प्रथा कांशीराम, मायावतीनी का जपली? बाबासाहेबांची अंतरजातीय विवाह करण्याचे अनुकरन का केले नाही? ( वामन मेश्राम ने आता लग्न केले आहे, त्यांची मजबुरी होती हे सगळा देश जानतो)
बामसेफने स्वताचे षडयंंत्र झाकण्यासाठी सरळ सरळ बाबासाहेबांचीच बदनामी सुरु केली, विलास खरात नामक जेम्स बॉन्डने बाबासाहेबांनी अंतरजातीय विवाह केला म्हणुन त्यांची हत्या झाली असा ग्रंथच लिहीला आहे ,त्या ग्रंथात *विलास खरात ने अशी मांडनी केली आहे की बाबासाहेबांना काहीच कळत नव्हते,त्यांची बुद्धी कामच करत नव्हती असा वाचकांना भास होतो*
आपन बाबासाहेबांना जगातील सर्वात मोठे विद्वान असे अभिमानाने सांगतो पन विलास खरात च्या पुस्तकात त्याने अशी मांडनी केली आहे की वाचताना वाटते बाबासाहेबांना काहीच कळत नव्हते, त्यांना कसे काय हे कळाले नसेल वगैरे,यातुन बाबासाहेबांच्या प्रतिमेला निश्चितपने डाग लागतो.
ब्राह्मण बायका विषकन्या असतात असा प्रचार सुरु केला, व अंतरजातीय विवाहालाही बदनाम करुन बाबासाहेबांनी जाती निर्मुलनासाठी सांगितलेला दुसरा जालिम उपायही बदनाम करुन टाकला.

स्वतः अनेक वर्षांच्या अभ्यासातुन बाबासाहेबांनी जाती तोडण्यासाठी सांगितलेले दोन्ही मार्ग जे मार्ग त्यांनी स्वतः अवलंबले व नंतर समाजाला करायला सांगितले ते बंद करायचे व जाती जोडो करायचे हे दोन्ही कामे आंबेडकरी चळवळीला मागे खेचनारी आहेत हे स्वतःला बुद्धिजीवी समजुन बामसेफ ला पैसा पुरवणार्या शिकलेल्या अडाण्यांना कधी कळालाच नाही का? झोपेचे सोंग सोडा व आरएसएसने आंबेडकरी चळवळ पोखरायला सोडलेल्या या उंदीर सेनेचा भाग बनु नका.
आपला बाप बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती चालायचे की बाबासाहेबांच्या विचारांच्या विरुद्ध दिशेने, बाबासाहेबांची बदनामी करुन बाबासाहेबांचे विचार संपवत असलेल्या बामसेफ चा उंदीर बनुन चळवळ पोखरायची हे प्रत्येकाने स्वताच ठरवावे लागेल.

क्रमशः
- मनोज नागोराव काळे, ठाणे, 8169291009
No comments:
Post a Comment