Sunday, 16 December 2018

तुमच्या घरातील टिव्ही हा आरएसएस चा कार्यकर्ता आहे

तुमच्या घरातील टिव्ही हा “आरएसएस“ चा कार्यकर्ताच आहे.
-मनोज नागोराव काळे, ठाणे.
या लेखाचे अशाप्रकारचे शीर्षक वाचुन तुम्हाला अतिशयोक्ती वाटले असेल किंवा मी काहीतरी अफवा पसरवतोय असा तुमचा समज होऊ शकतो त्यासाठी पुर्ण वाचा व क्रमवारी व राजकीय उलथापालथ समजुन घ्या हि विनंती करतो,
टिव्ही चे महत्व मनुवादी आरएसएस या संघटनेने खुप आगोदर ओळखले व त्याचा उपयोग अतिषय कल्पकतेने करुन संपुर्ण भारतीय जनतेच्या मेंदुंचा ताबा त्यांनी मिळवला.व त्याचा परिणाम असा झाला की  अतिषय जहरी विषमतावादी,माणुसकीला काळीमा असणा-या विचारधारेचे लोक लोकशाही मार्गाने सत्तेच्या सर्वोच्च ठिकाणी जाऊन बसले,याचा आपन पुढे क्रमशः सविस्तर विचार करणारच आहोत.
भारतात 'टेलिविजन इंडीया' ची सुरुवात १५ सप्टेंबर १९५९ ला झाली,त्यावेळी रोज आर्धा तासाचेच प्रसारन केले जायचे, १९७५ ला त्याते नामकरन दुरदर्शन केले गेले. १९८४ नंतर रोज एक ट्रान्समिटर लावला जाऊ लागला व गावागावात दुरदर्शन कसे पोचेल यासाठी प्रयत्न केले गेले.
१)  गावागावात दुरदर्शन पोचले गेले व त्यावर अगदी सुरवातीलाच भारत पाक फाळणी व त्याचा झालेला त्रास दाखवणारी मालिका "बुनियाद" चे प्रसारण केले गेले.
२ ) २५ जानेवारी १९८७ ते ३१ जुलै १९८८ या काळात
७८ भागांमध्ये "रामायण" ही मालिका दाखवली गेली, भारतात घराघरात राम व रामायण पोचवले गेले, रामायणाने प्रत्येक भारतीयाला भुरळ घातली,  रामाच्या कट्टर भक्तांमध्ये भरघोस वाढ झाली. लोक रामायण लागले की टिव्हीलाच हळद कुंकु लावुन धुप अगरबत्ती करायचे. हार घालुनच मालिका पहायचे.
३) १९८८ ते १९९० या काळात ९४ भागांमध्ये महाभारत दाखवले गेले, रामभक्तीने सर्वाची मने ओथंबुन वाहत होती त्यात महाभारतातुन सांगितले गेले की “जेव्हा जेव्हा देशात पाप वाढते तेव्हा त्याचा विनाश करण्यासाठी प्रभु स्वतः जन्म घेतात“, त्याचबरोबर हे सांगितले की “धर्माचे काम करत असताना आपला भाऊ किंवा नातेनाईक जरी आडवा आला तरी त्याला ठार करणे हे आपले कर्तव्य असते“.
भारतात त्यावेळी टिवी नवीन होते, लोकामधंये शिक्षणाचे प्रमाण खुप कमी होते, विज्ञानाचा प्रचार प्रसार फारसा झालेला नव्हता त्यामुळे रामायण व महाभारत या मालिकांनी भारतीयांमध्ये धार्मिक भावनेला तिव्रतेने वाढवले. भारतीयांच्या मनावर व मेंदुवर राम व गितेचे संदेश बिंबवले गेले.
३) १९९० पर्यंत धार्मिक जमिन खुसखुशीत बनवली गेली होती आता त्यात पेरनी करायला हरकत नव्हती हे धर्मांध मनुवादी म्होरक्यांनी जाणले व आरएसएस च्या लोकांनी टिव्ही च्या माध्यमातुन मना मनात राम पोचवला होता, त्यामुळे आयोध्या येथील बाबरी मज्जीद च्या खाली राम मंदिर आहे व येथे रामाचा जन्म झाला होता असा प्रचार सुरु केला गेला. त्यासाठी लालकृष्ण आडवानी यांनी सोमनाथ ते आयोध्या अशी रथयात्रा काढली.
४) ६ डिसेंबर १९९२, संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा महापर्निर्वाण दिन होता, त्या दिवशी आरएसएस च्या कारसेवकांनी आयोध्येतील बाबरी मज्जीद पाडली, धर्मनिरपेक्ष राष्ट्र निर्माण करणार्या महामानवाच्या स्मृतीदिनी धर्मांधतेचा कळस गाठला गेला व बाबरी मज्जीद पाडण्यात आली.
५) डिसेंबर- जानेवारी १९९२ या काळात मुंबई शहर हिंदु मुसलमान दंगलीने धगधगत राहीले, श्रीकृष्ण कमीशनच्या अहवालानुसार या दोन महिन्यात ९०० लोकांचे बळी गेले ज्यात ५७५ मुस्लिम व २७५ हिंदु, ५० लोक अज्ञात होते. या कमीशनने शिवसेनाप्रमुखांच्या भडखाऊ भाषनांना व ३१ पोलिसांनाही या दंगलीत दोषी ठरवले होते.
६) १२ मार्च १९९३ रोजा बाबरी कांड व मुंबई दंगलीची च्या विरुद्ध १३ साखळी बॉम्ब फोडुन डी कंपनी ने प्रतिशोध घेण्याचा प्रयत्न केला, त्यात डि कंपनी ला साथ देणारा संजय दत्तहीलहोता पन नंतर बाळासाहेब ठाकरेंनी संजय दत्तला वाचवले असे आजही बोलले जाते.
७) त्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना भाजपची सत्ता आली व या महाराष्ट्रात पहिला मुख्यमंत्री बनवला गेला, बाळ ठाकरेंनी मनोहर जोशी ला मुख्यमंत्री बनवले व त्यावेळी अतिषय गर्वाने सांगितले की या महाराष्ट्राला मी ब्राह्मण मुख्यमंत्री दिला याचा अभिमान वाटतो. नंतर केंद्रातही अटलबिहारी वाजपेयी प्रधानमंत्री बनले.
८)  ११ जुलै १९९७ ला, रमाबाई नगर, घाटकोपर मुंबई यथे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली गेली व जो लोक त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते त्यांचेयावर राखीव पोलिस दलाचा अधिकारी मनोहर कदम याने गोळीबार करण्याचा आदेश दिला, काही क्षणात ११ निश्पाप लोकांचा बळी घेतला गेला. गुंडेवार कमीशनने दिलेला अहवाल कुणीही लक्षात घेतला नाही, चार वर्षानंतर गुन्हा दाखल केला गेला व २० डिसेंबर २००२ ला मनोहर कदम ला अटक झाली.
८)  २७/ २८ मार्च २००२ ला गुजरात मधील गोध्रा शहरात हिंदु मुस्लिम दंगलीत एका दिवसात २५०० लोक मारण्यात आले.
९) १९ सप्टेंबर २००८ नाशिक,मालेगाव येथे बॉम्बस्फोट झाला व त्यात सहा लोक ठार झाले, ,शेकडो लोक जख्मी झाले याचा तपास एटीएस प्रमुख हेमंत करकरेंनी केला व त्यातील दोषी साध्वी प्रज्ञा शर्मा व कर्नल पुरोहित यांना अटक केली होती, त्यांनी याच्याकडुन ४० लैपटोप जप्त केले होते त्यातुन अनेक बडेबडे नेते अटक होणार होते ते होऊ नये म्हणुन मुबईवर जेव्हा काही पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा सिएसटी भागात करकरे, साळसकर, कामटे या पोलिसांची शान असणार्या अधिकार्यांना एका गाडीत बोलवले गेले व कामा हॉस्पिटल जवळच्या गल्लीत त्यांना ठार केले गेले यावर हु किल्ड करकरे व टु द लास्ट बुलेट हे पुस्तके उपलब्ध आहेत प्रत्येकाने ती वाचावित, याच पुस्तकांचा प्रचार कॉम्रेड पानसरे सर करणार होते म्हणुन त्यांचा खुन करण्यात आला आहे.
१०)  दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांची हत्या झाली, त्याच्यावर गोळ्या झाडणारांना पिस्तुल चालवायला शिकवणारा गुरु होता मनोहर कदम.
११) १९९३ च्या बॉम्बस्फोट व्यतिरिक्त महाराष्ट्रात, बुद्ध गया या ठिकणी झालेल्या सर्व स्फोटांचो आरोपी हे हिंदु आतंकवादीच आहेत त्यांच्यावर कोर्टात केस सुरु आहेत.
१२)  मुंबईत कर्नाटक एटीएस ने काही सनातन साधकांना नुकतेच अटक केले आहे, त्यांच्याजवळ शस्त्र व स्फोटकेही सापडली आहेत, पण पोलिसांनी व मीडीयाने मात्र लगेच अरेबन नक्सलचा समांतर ड्रामा सुरु करुन फक्त त्यावरच चर्चा सुरु ठेवली, सनातन साधकांचा विषय दाबला गेला.
वरील घटना या क्रमशः घेतल्या आहेत. या काही निवडक घटना आहेत, अशा अनेक घटना या काळात सतत होत गेल्या आहेत.
आरएसएस ने फक्त टिव्ही चा उपयोग करुन हिंदुंच्या मनात रामभक्ती ला जागृत करुन त्या भक्तीला मज्जीद पाडण्यापर्यंत पोचवले,  सारा देश अशांत झाला, १९९३ पुर्वी देशात कधीही स्फोट होत नव्हते पण जाणीवपुर्वक दशात अशांतता कायम रहावी असे वातावरन तयार केले गेले.
प्रत्येक बॉम्बस्फोट मनुवादी करायचे पन नाव मुस्लिमांवर टाकायचे, अटक होणारे हिंदु असायचे पन ती चर्चा केली जायची नाही, चित्रपट, टिव्ही, मालिका, बातम्या यातुन फक्त मुसलामन आतंकवादी असतो असाच सतत प्रचार सुरु ठेवला गेला.
देशाला मुसलमाना पासुन धोका आहे असा भास सतत कायम ठेवला जातोय, भारत पाक क्रिकेट मैचलाही तसेच कट्टर रुप देण्यासाठी टिवीवर सारखे ते रंगवले जाते.
हिंदु धर्म खतरे मे है अशी भिती घातली जाते व हिंदुंना मुस्लिमाबद्दल सतत चेतवले जाते.
या देशावर हजारो वर्षे मुस्लिमांनीच राज्य केले होते तरी सुद्धा हिंदु धर्म ,मराठी भाषा, संस्कृत भाषा त्यांनी संपवले नाही, संपवले असता तर आज देशात मुस्लिमांना विरोध करायला हिंदु सापडलेच नसते,आता तर गल्ली पासुन दिल्ली पर्यंत मनुवादी हिंदुत्ववादी ठेकेदारच सत्तेवर बसलेले आहेत व मुस्लिम अल्पसंख्यांख वंचित आहेत तरी हिंदु खतरे मे असा आव आनला जातो हा विरोधाभासही जनता समजु शकत नाही. इतके बहुसंख्य धर्मांध बनवुन ठेवले आहे. ( अपवाद)
रामायण मालिके पासुन ते आज आपल्या घरात टिव्हीवर येणारा प्रत्येक कार्यक्रम हा मनुवाद्यांचा प्रपोगंडा आहे, प्रत्येक मालिका ही व्याभिचार, व्यसन, गुन्हेगारी, लबाडी, षडयंत्र याचे उदात्तीकरन करणारी असते, अंधश्रद्धा वाढवने हे टिव्ही चे सर्वात मोठे काम आहे त्याचबरोबर जनतेला धार्मिक बंधनात गुंतवुन ठेवण्याचा या ५०० चैनल नी ठेकाच घेतलेला दिसेल.
आपल्या देशाची प्रतिमा जगाला टिव्ही व सिनोमाच्या माध्यमातुन दिसत असते, त्यामुळे एकता कपुर ने भारतीय मालिकांमधुन मालिकेच्या मुख्य नायिकेला चार चार नवर्यांची बायको दाखवते व  सिआयडी, क्राईंम पेट्रोल या गुन्हेगारी बद्दल दाखवल्या जाणार्या मालिकातुन प्रत्येक वेळी गुन्ह्याची मास्टरमाईंड एक महीलाच असते असे दाखवले जाते. जगात आपन सांगतो की फुले,आंबेडकरांमुळे स्त्रीया शिकल्या आहेत तेव्हा हे टिव्ही वरुन दाखवतात की भारतीय स्त्रीया शिकुन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या, व्याभीचारी व संस्कृती भक्षक बनल्या आहेत. हा टिवी आरएसएसचे काम करतो आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतुन सर्व धर्म समभाव च्या आडुन फक्त हिंदु कर्मकांड व बामनवादी सणांचे उदात्तीकरन करुन ते सन कसे सार्वजनिक करता येतील यावर जोर दिलेला आहे.
आपल्या देशाचे प्रमुख प्रश्न आहेत रोजगार, शिक्षण, महागाई, अन्न, वस्त्र, निवारा, दवाखाने ई. पन सत्तर वर्ष झाले आपल्या या समस्या अजुनही सुटलेल्या नाहीत, लोकशाहीचा चौथा खांब मीडीया म्हणजे टिव्ही हा या प्रश्नांवर कधीही बोलत नाही, या प्रश्नाबाबत त्यांच्याकडे वेळ नसतो, टिव्हीवर सर्वाधिक वेळ कशाला असतो तर नविन सिनेमे येतात त्यांचे प्रमोशन, बाबा बुवा यांचे कार्यक्रम, सिरीयल बद्दल उत्सुकता वाढवने, क्रिकेट मैच चे विश्लेशन, ज्योतीष, पंचांग, टैरो कार्ड, कुबेर यंत्र, लक्ष्मी यंत्र, खाज खुजली चे ओषधे विकने आणि महत्वाच्या मुलभुत प्रश्नावंरुन जनतेला भटकावुन हिंदु मुसलमान, भारत पाकिस्तान, धार्मिक चर्चा, देशद्रोही कोण यावर चर्चा.
टिव्हीवर चर्चा असते नोटबंदीची व पैनेल वर पाहुने असतात अक्षय कुमार, रामदेव बाबा, साबळे, आठवले.
विषयातील तज्ञांना बोलावुन कोणत्याही विषयांवर चर्चा केली जात नाहा, ज्या नोटबंदीला जगातील अर्थतज्ज्ञांनी सर्वात मोठी चुक सांगितले ते न दाखवता आपल्याला टिव्हीने चित्रपट कलाकार व नाचे यांचे नोटबंदी बद्दल समर्थनाचे बाईट दाखवले गेले.
टिव्ही च्या माध्यमातुन मनुवादी लोक आपल्या मेंदुवर कब्जा करुन हळुहळु आपल्या विचारांनाही दुषीत करु शकतात हे २०१४ च्या निवडणुकात आपन पाहीले, भारतातील सर्वात बेकार बिनकामाच्या माणसाला प्रधानमंत्री बनविण्यात मनुवादी यशस्वी झाले, भलेही आपन आरएसएस च्या शाखेत जात नाही, पन त्यांनी टिव्ही च्या रुपाने त्यांचा कार्यकर्ता तुमच्या घरात सोडला आहे, जो तुमच्या मेंदुला आरएसएस चे विचार पुरवतो, तसे तुमचे मत बनवितो व तुम्हाला आरएसएस च्या कामाला लावतो.
विचार करा, टिव्ही पाहुन यापुढे राजकीय मत बनवु नका, आता परत मनुवादी सत्तेवर येतील तर त्यांना टिव्हीची गरज उरनार नाही. म्हणुन सावध रहा, टिव्ही जे दाखवतो ते सत्य असतेच असे नाही, स्वताच्या सदसदविवेक बुद्धीला विचारा की आजवर सत्तर वर्ष प्रत्येक वेळी आपला आजोबा, आपला बाप व आपन मत देत आलोय व काही घरान असे आहेत की त्याच्या घरात खासदार, आयदार, नगरसेवक सतत बनत आलेत, तरीही आपला एकही प्रश्न सुटलेला नाही याला कारण आहे तुमच्या घरातील टिव्ही..
कॉंग्रेस ने पाच वर्ष लुटले की टिव्ही दाखवतो की आता याला पर्याय भाजपा आहे, नंतर पाच वर्ष भाजपा आपल्याला व देशाला धुवुन खातात, परत तोच टिव्ही सांगतो की यांच्या पेक्षा कॉंग्रेस बरी होती त्यांनाच परत निवडुण द्या..हेच आपन सतत करत आलोय म्हणुन आपले सर्व प्रश्न सतत भिजतच पडलेत.
आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सर्व वंचितांना एकत्र करुन एक नवा सक्षम व प्रामाणिक राजकीय पर्याय उभा केलेला आहे तर आता तुमच्या घरातील आरएसएस चा कार्यकर्ता तुमच्या कानात सांगेल कि यांचा फायदा भाजपला आहे किंवा कॉंग्रेसला आहे, पन तुम्ही सावध रहा, आपल्या सत्तर वर्ष अडकलेल्या प्रश्वांना सोडवण्यात नालायक ठरलेल्यांना मत टाकायचेच नाही, आमचे मत फक्त वंचित बहुजन आघाडीलाच पडले पाहीजे.
मग आपल्या घरातील आरएसएस चा स्वयंसेवक म्हणजे टिव्ही का कुचकामी ठरेल व आपला विजय होईल.
“रामायण महाभारत“ मालिकांचे फळ कित्येक वर्षांनी पुर्णत्वास आले आहे आज “मोदी“ आपल्यावर राज्य करत आहेत, व जनतेचा पैसा त्यांच्या कॉर्पोरेट मित्र अंबानी अडानी च्या तिजोरीत खुलेआम भरत आहेत. सर्व टिव्ही चैनल्स संविधान संपुन या देशात पुन्हा मनुस्मृतीचे कायदे लागु व्हावेत यासाठी काम करत आहेत. त्यांनी मोदीजींच्या कारभाराकडे लोकांचे लक्ष जाऊ नये असेच कार्यक्रम राबवले जात आहेत.
अशा कठीन प्रसंगी आपला नेता जागृत आहे त्यामुळे आपले काम सोपे झाले आहे, आपन जास्त डोके न चालवता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर दाखवतील त्या दिशेने आपन जाऊयात, परत एकदा आपल्याला एक बुद्धीवंत आंबेडकर लाभले आहेत, आपन त्यांची ताकद बनुयात व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वश्रेष्ठ संविधान टिकवुन ठेवुयात.
सर्व भारतीय वंचितांना न्याय मिळवुन देऊयात.
जय भीम,जय संविधान.
-मनोज नागोराव काळे, ठाणे 8169291009

3 comments:

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...