Sunday, 16 December 2018

आपन कोणाचा प्रचार करत आहोत?

आपन कोणाचा प्रचार करत आहोत?

मनोज काळे, ठाणे.

मित्रांनो, आज मी जो विषय चर्चेला घेतो आहे त्यामगची भावना आहे की आपल्या उत्स्फुर्त शक्तीचा उपयोग कुणीतरी आपल्या नकळत स्वताच्या फायद्यासाठी करुन घेत आहे किंवा आपन स्वतःच अनावधानाने त्यांच्या प्रचाराचे काम करत आहोत जे लोक वरवर आपले वाटत असले तरी ते आपले हितचिंतक वाटत असले तरी ते आपल्या विरुद्ध आहेत ते आपल्या चळवळीचेही शत्रुच आहेत.

राहुल गांधी,राज ठाकरे, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, शरद पवार, केजरीवाल, सुषमा ताई, वामन मेश्राम, विलास खरात ही नावे बहुजन वंचित आघाडीच्या  कार्यकर्त्यांची तर नक्कीच नाहीत, पण या लोकांनी भाजप विरुद्ध कुठे काही विचार मांडले,  कुणी भाजपा वर टिका केली की आपले कार्यकर्ते बिनपगारी नोकरा सारखे त्यांचे कमेंट, लेख, बाईट्स व्हायरल करायला सुरवात करतात.
वरील नमुद केलेले सर्व नेते लोक त्यांचे विचार मांडतात तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांना ते विचार व्हायरल करायला पाहीजे, पन आपनच अति उत्साहाने ते व्हायरल करतो कारण काय तर ते भाजप, मोदी, शहा विरुद्ध बोललेले असतात.

पण आपन शत्रु क्रमांक एक विरुद्ध प्रचार करताना शत्रु क्रमांक दोनचे काम सोपे करत नाही ना याचे भान ठेवावे लागेल.
राज ठाकरे भिडे बद्दल कितीही प्रखर टिका करत असेल तरी त्याला वायरल करायचे काम मनसे च्या लोकांवर टाकावे आपन का त्याचे विचाराचा प्रचार करायचा, तसेच उद्धव ठकरेचे, हे तर संसार करतात भाजप सोबत पन त्यांनी काही भाजपवर टिका केली तर शिवसैनिका पेक्षा आपलेच लोक जास्त शेअर करत असतात, सुप्रिया ताईनी सत्यनारायण ला विरोध केला, राहुल गांधी राफेल वर काय बोलले की आपले कार्यकर्ते लगेच ते शेअर करायाला लागलेले दिसेले ते काम राष्ट्रवादीच्या लोकांना करु द्या ना, कशाला आपन एक शत्रु संपवायच्या नादात दुसर्याला मोठे करतोय.

*आपन फक्त बाळासाहेब व वंचित बहुजन आघाडीचे इतर नेते काय बोलतात याचाच सतत प्रचार केला पाहीजे.*

एकाला उरावरुन काढायचे व दुसर्याला बसवुन घ्यायचे या भानगडीतुन आपल्याला कायमचे बाहेर पडायचे आहे व मनुवादाच्या मानगुटीवर बसायचे आहे म्हणुन *आपन शेअर करत असलेली पोस्ट कोणाचे मतदार वाढवु शकते याचे भान राहु द्यावे*.

वंचित बहुजन आघाडी आपल्याला न्याय मिळवुन देऊ शकते त्यामुळे आपन भाजप चा विरोधक हा भारिप बहुजन महासंघ व  वंचित बहुजन आघाडीचा समर्थक असेलच या भ्रमात राहु नये.

- मनोज काळे, ठाणे  8169291009
  बाळासाहेबांचा खंदा समर्थक.

No comments:

Post a Comment

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...