भारतीय नागरिकाला खुले पत्र
प्रति,
भारतीय नागरिक,
भारत.
भारतीय नागरिक,
भारत.
हे माझ्या भारतीय नागरिका, तुला "नागरिक" सुद्धा माझ्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी २६ जानेवारी १९५० ला बनवले आहे हे पहिल्यांदाच मी खुलासा करतो, कारण भारतीय संविधानापुर्वी या देशातील व्यक्तीला भारतीय असे नागरिकत्व नव्हते हे तुला माहीत असेल कदाचित नसेल माहीत तर आज पासुन ते मनावर कोरुनच ठेव.
बर, हे पत्र मी समस्त भारतीय जनतेलाच लिहायला घेतले याचेही एक कारण आहे ते म्हणजे आज तुझे ते नागरिकत्व धोक्यात आलेले मला स्पष्टपने दिसत आहे, आज तुमची कवचकुंडले धोक्यात आली आहेत, आज संविधान धोक्यात आले आहे.
भारतीय नागरिका माझ्या काही प्रश्नांची उत्तरे मी आज तुला या माझ्या मैत्रीपुर्ण पत्रव्यवहारातुन मागणार नाही, तुला उत्तरे देता येतीलच कारण ते सर्व प्रश्न तुझ्याशी व्यक्तीगत असणार आहेत.
माझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तु स्वतःच्याच मनाला विचारायचे आहे व स्वतालाच ते उत्तर प्रामाणिकपने द्यायचे आहे.

प्रश्न १.
हे भारतीय नागरिका, तुला आज तुझ्या जिवनात जे काही तुझे व्यक्ती म्हणुन हक्क व अधिकार आहेत ते कायदेशीर रित्या तुला कुणी मिळवुन दिले आहेत?

प्रश्न २.
हे भारतीय नागरिका, तुझ्या पुर्व पिढ्यातील कोणता पुर्वज १९५० पुर्वी शाळेत गेला होता का? नसेल तर का नव्हता गेला?

प्रश्न ३
हे भारतीय नागरिका, तुला मत देऊन स्वतःचा प्रतिनिधी निवडुण देण्याचा अधिकार कुणी दिला आहे?

प्रश्न ४
हे भारतीय नागरिका, तु रोज कामावर जातो तेव्हा तेथे ८ तास काम करतो व शिफ्ट संपवुन हक्काने घरी येतो, ते आगोदर १२ तास काम करावे लागायचे, तुला १२ चे ८ कुणी करुन दिले माहीत आहे का?

प्रश्न ५
हे भारतीय नागरिका, तुझ्या आया बहिनींना १९५० पुर्वी बापाच्या वारसा हक्क मिळत नव्हता, तो आता समान हक्क कोणामुळे मिळु लागलाय हे माहीत आहे का?

प्रश्न ६
हे भारतीय नागरिका, तु ज्या रस्त्याने फिरतो,ऊड्डानपुले पहातो, अनेक विकास प्रकल्प पहातो ते बनविणारे सार्वजनिक बांधकाम विभाग PWD कुणी साकार केले तुला माहीत आहे का?

प्रश्न ७
हे भारतीय नागरिका, तुझ्या घरात विज तर नक्की येत असण्र, बर मला सांग ते विज तुझ्या घरापर्यंत पोचवण्यासाठी पावर ग्रीड यंत्रना वापरली जाते ती या देशात कुणी सुरु केली?

प्रश्न ८
हे भारतीय नागरिका, अन्न, वस्त्र निवारा सोबत शिक्षणही मुलभुत गरज आहे व ते प्रत्येकाला मोफत मिळाले पाहीजे यासाठी कुणी खस्ता खाल्ल्या आहेत?

प्रश्न ९
हे भारतीय नागरिका, तु जुन्या काळी सप्तबंदीत बंदिस्त होता,काय खावे, काय नेसावे,कोणते दागीने घालावे, कोमते काम करावे हे तु स्वतः ठरवु शकत नव्हतास ते कोणी बंद केले व तुला खरे स्वातंत्र्य मिळवुन दिले?

प्रश्न १०
हे भारतीय नागरिका, या देशात जुलमी सत्ते विरुद्ध लढुन स्वकियांचो कल्याणकारी राज्य निर्माण करणारे शिवराय राजे झाले तेव्हा त्यांना राजा माणन्यास कुणी नकार दिला होता? व आज सर्व जातीपातीचे लोक राज्यकर्ते बनु शकतात याला कोणोचे योगदान आहे?

प्रश्न ११
हे भारतीय नागरिका, तुझ्या माता भगिनींना आपापल्या नवर्याची गुलामी न करता सर्वांनी समान वागवावे वाटते पन तेच समतेचे कायदेशिर हक्क तुला कुणी दिलेत रे?

प्रश्न १२
हे भारतीय नागरिका, मला सांग इतक्या वेगवेगळ्या जाती,पंथात,भाषेत विस्कटलेला तुझा हा देश आज एकत्र कसा काय नांदतोय? काय कारण असेल याला?

प्रश्न १३
हे भारतीय नागरिका, तुझे पुर्वज आयटी,इंजीनियरींग,मेडीकल,तंत्रज्ञानात नव्हते, मग तु कसा काय या विभागात काम करतोस? धार्मिक नियम तर जिथे जगला त्याच कुटुंबाचा व्यवसाय करत करत मरा असा आहे, मग तुला तुझे करीयर स्वतः निवडायचा हक्क कुणी दिला?

प्रश्न १४
हे भारतीय नागरिका, मानवाला मानव म्हणुन जगण्यासाठी लागणारे जे मानवाधिकार लागतात त्याचे जनक कोण आहेत याचे तुला काही माहीती आहे काय?

प्रश्न १५
हे भारतीय नागरिका, तुला जो दिवाळीला बोनस मिळतो, तो बोनस का व कसा मिळतो हे तर सोड, पन तो तुला मिळालाच पाहीजे हि तरतुद कोण करुन ठेवलीय सांगता येईल का?

प्रश्न १६
हे भारतीय नागरिका,पुर्वी धार्मिक कायद्यानुसार स्त्रीला जीवनभर नवरा,मुलगा व बाप यांच्यावर अवलंबुन रहावे लागायचे, सती जायला लागायचे, तिला जिवंतपने आगीत ढकलले जायचे,
मात्र आता स्त्रीला आईच्या गर्भात आसताना पासुन संरक्षण आहे, ते कोणामुळे आहे?

प्रश्न १७
हे भारतीय नागरिका, पुर्वी तु मौजमजा म्हणुन प्राण्यांची हत्या करायचास, आता तु कोणत्या प्राण्याला मारु शकतो का? तु झाडे तोडु शकतो का? या सर्वांचे कायदेशिर रक्षण कोण केले?

बर प्रश्न खुप आहेत पन हे काही आता माझ्या मनात जे आले ते पटाटपट मी विचारुन मोकळा झालोय, तुझ्या सदसदविवेक बुद्धीला विचारुन तु या प्रश्नांची प्रामाणक उत्तरे शोध यातच तुला तुझा मुक्तीदाता सापडेल.
बर मी कधी नव्हे ते तुला पत्र का लिहीतोय हे आता सांगत आहे जरा निट लक्ष देवुन वाच, तुझी जात धर्म व वंश कोणताही असु दे पन तु भारतीय नागरिक आहेस, आणि त्या नात्याने वरिल सर्व प्रश्नांचे एकच उत्तर आहे हे समजले असेलच.
ते म्हणजे प्रज्ञासुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर.
वरील सर्व फायदे ,हक्क व सुविधा सर्वच्या सर्व भारतीय नागरिक या नात्याने वापरता, उपयोगात आणता मात्र या महामानवाला फक्त दलितांचा नेता म्हणुन मोकळे होता? किती रे तुम्ही कृतघ्न बनलात? तुमच्या रोजच्या जगण्यावर ज्या महामानवाचे आतोनात उपकार आहेत त्या महामानवाचे नाव घ्यायची तुम्हाला लाज वाटते? कारण त्यांची जात? त्याच जातीच्या माणसाने तुम्हाला वरील सर्वच्या सर्व अधिकार बहाल केलेत ते कसे काय चालतात?, ते सुद्धा मोफत..
त्यांचा तत्कालिन समाजाने खुप छळ केला होता तरीसुध्दा...
पन तुम्ही आज त्या बाबासाहेबांच्या वंशजांना जातीवादाने वागवु लागलात , त्यांना हलक्या जातीचे समजु लागलात, हे तुमच्या मानवी मनाला तरी पटतेय का पहा.
तुमच्या रोजीरोटी पासुन मेल्यास वारसा हक्कापर्यंत सर्वच्या सर्व अधिकार ज्या महामानवाने फुकटात दान केले त्यांच्यावर कसला रे सुड उगवताय? कसली रे ही माणुसकीची परतफेड?

वरील सर्व गोष्टी तुझ्या जीवनात खुप महत्व ठेवतात हे मला चांगले कळते कारण मि सुद्धा एक नागरिक आहे तुझ्यासारखा...
पन आज वरील सर्वच्या सर्व अधिकार एक एक करुन काढले जात आहेत, तु तुझे नागरिकत्व जपशील तोवरच ते अधिकार शाबुत आहेत पन जर का तु मी हिंदु,मी मुसलमान,मी बौद्ध, मी ईसाई,मी शीख या भुमीकेत शिरलास तर मात्र माझ्या बाबासाहेबांनी तुझ्या रक्षणार्थ बनवलेला हा समता,न्याय,बंधुता,स्वातंत्र्य मनोरा जमिनदोस्त होईल, सध्या त्याचा पाया तोडण्यासाठी मानवतेचे शत्रु जोमाने कार्य करत आहेत.
हे सर्व मी भीमा कोरेगावच्या हिंदुत्ववादी लोकांकडुन बौद्ध व ओबीसी बांधवांवर झालेल्या अमानवीय हल्याबद्दल लिहीत आहे.
जे लोक जुलमी पेशवाई संपवल्याचे प्रतिक असलेल्या स्तंभाला वंदन करायला सहकुटुंब निघाले होते त्यांच्यावर दगडफेक केली, त्यांच्या गाड्या जाळल्या ज्या गाड्या त्यांनी भाड्याने आणल्या असतील, त्या लोकांना प्यायला पाणी मिळु नये म्हणुन सर्व दुकाने बंद ठेवली गेली, हीच परतफेड का वरील लिहिलेेल्या उपकारांची?

ज्या लोकांनी शिवरायांच्या सैन्यात राहुन शिवरायांचे राज्य सांभाळले त्यांच्यावर त्याच शिवरायांचे नाव घऊन हल्ला केला गेला तोही त्या लोकांच्या सांगण्यावरुन ज्यांनी शिवराय व शंभुराजेंचा धार्मिक छळ केला होता.
असो, प्रत्येकाला माझ्या बाबासाहेबांनी शिक्षण मिळवुन दिले आहे आता शिकुन सवरुन त्यांनाच जर दगड मारणार असाल तर त्यात चुक तुमच्यावर झालेल्या संस्कारांची आहे हे सगळ्यांच्याच लक्षात आले आहे.

पन वरील सर्व अधिकार काढुन टाकायला तेच लोक टपलेत जे लोक तुमच्या हातात दगड देऊन तुमच्याच उध्दारकर्त्यावर भिरकावायला लावतात.
आपण आपलाच खड्डा खोदतो आहोत का? याचे भान राहु द्या.

या लोकांनी छ. शिवरायांच्या पुण्यतिथीला रायगडावर हजार ढोल वाजवुन पाहीले की राजांना मानणारा समाज झोपेत आहे की जागा आहे? दुर्दैवाने तो झोपोतच निघाला पन आंबेडकरी लोकांनी तेव्हा त्या ढोल वाजवण्याचा विरोध केला हे तरी मोठ्या मनाने मान्य करा...आपन...नागरिक ...आहोत, पन ते आपन स्वतःच धोक्यात तर आणत नाहीत ना याचे भान राहुद्या.
जे लोक आज या नवपेशवाई च्या विरुद्ध उभे आहेत ते वरील नमुद केलेले व इतर सर्व मानवाधिकार अबाधित ठेवण्यासाठी लढत आहेत, त्यांची आपन ताकद बनुयात, आपले नागरिकत्व टिकवुन ठेवुयात.
आज आपन सर्वच नागरिकांनी हा विचार करायलाच हवा की शाळेत नागरिक शास्त्राचे पुस्तक सर्वात लहान का असायचे?
नागरिक म्हणुन आपले हक्क अधिकार आपल्याला कळुच नयेत हे त्या त्या काळचा राजकीय ताकतींनी प्रयत्न केले होते पन सध्या आपल्याला नागरिक म्हणुन पुर्णतः आपापसात जातीय भाडंने लावुनन उध्वस्त करायचे कट कारस्थान सुरु आहे.त्या कारस्थानात बळी न पडता आपल्या हक्क अधिकाराच्या रक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे.
ज्या अधिकारांमधे उपासनेचाही अधिकार आहे, त्यामुळे "धर्म खत्रे मे है" या वाक्याला कुणीही बळी पडु नये ही नम्र विनंती. आता थांबतो.
जय भारत
जय संविधान.

कळावे.
तुझाच नागरिक बंधु
- मनोज काळे
8169291009
तुझाच नागरिक बंधु
- मनोज काळे
8169291009
No comments:
Post a Comment