Sunday, 16 December 2018

मुस्लिम समाज कम्युनल, कट्टरपंथी आहेत असा बाऊ करुन ८५% लोकांवर सतत राज्य केले जाते.

मुस्लिम समाज कम्युनल, कट्टरपंथी आहेत असा बाऊ करुन ८५% लोकांवर सतत राज्य केले जाते.
- मनोज नागोराव काळे.ठाणे
छ. शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेपासुन डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहुन या देशात लोकशाही / रयतेचे राज्य / स्वराज्य स्थापन करेपर्यंत चा इतिहास वरवर तपासला तरी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की जेव्हा जेव्हा बहुजन चळवळीला भारतीय मुस्लिमांनी योगदान दिले आहे तेव्हा तेव्हा ब्राह्मणवादी व्यवस्थेला आपन जोरदार धक्का देण्यात यशस्वी झालो आहोत, शिवशाही किंवा स्वराज्य स्थापनेत मुस्लिनांचा मोठा वाटा होता पण शिवरायांचे स्वराज्य पेशव्यांनी हिसकाऊन घेतले आणि शिवरायांच्या सर्व मदत करणार्या मुसलमान,आलुतेदार, बलुतेदार, आठरा पगड जातीच्या सैनिकांना गुलामीत लोटले लव अमानुष छळ केला गेला.
बहुजनांच्या मनात मुस्लिमांबद्दल द्वेश पेरला गेला. त्या द्वेशाच्या आडुन ब्राह्मणवाद्यांनी आपली सत्ता कायम राखली.
इतिहासात आपन ज्यांना महामानव मानतो त्यांना ब्राह्मणांनी छळले हे आपनास माहीती आहे पन त्या महामानवांची मदत करणारे मुसलमान लोक आपल्यापासुन लपवले गेले होते ते पुढे काही उदाहरण म्हणुन देत आहे. ही यादी सोशल मीडीयावर नेहमी फिरत असते.
1)महात्मा फुलेंना पुन्हा शाळेत टाकायला सांगणारे -मुन्शी गफ्फार बेग
2) महात्मा फुलेना घर देणारे...-उस्मान बेग
3)राष्ट्रमाता सावित्रीआई ला शिक्षणात मदत करणारी सहशिक्षीका   -फातिमा शेख
4) डॉ.बाबासाहेब आंबेडकराना जगप्रसिद्ध चवदार तळ आंदोलनाला आपली जागा देणारे -फतेह खान
5)एम के गांधीच्या प्रभावाने दिड लाख पठाणांसहित अहिंसक सेना ऊभारणारे  -खान अब्दुल गफार खान
6)छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनख्यानी अफजलखानाचा कोथला काढला ती ख़ास वाघनखे बनवून देणारे
-रुस्तुमे जमाल हनेनान
7)शहीद भगतसिंगला त्याच्या गुप्त ठिकाणावर भोजन पाठवणारे.. -नसीम चंगेजी..
8) 1757 सर्वप्रथम इंग्रजाविरुद्ध लढा देणारे..- हजरत.टीपू सुलतान व् बंगालचा नवाब      सिराजुदौला
9)छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव वकील  -काझी हैदर
10)1857 च्या उठावामध्ये  दिल्ली पर्यन्त फासावर लटकवलेले 58000 मौलवी व त्यांचे असंख्य अनुयायी...
११) बाबासाहेबांना घटनासमिती वर जाता यावे म्हणून तेव्हाच्या प. बंगालच्या आता बांग्लादेश, च्या मुस्लिमांनी बाबासाहेबांना निवडून आणले म्हणून बाबासाहेब संविधान लिहू शकले.
आज लोकशाही स्थापन झालेली आहे व ती लोकशाही सुपुर्द करत असताना डॉ बाबासाहेबांनी जो संसदिय लोकशाही बद्दल धोका वर्तवला होता नेमके तेच झालेले आपन पाहात आहोत की आपन लोकशाहीचे मंदिर तर बांधले आहे पन त्यात देव बसवायच्या आत त्यात राक्षसाने ताबा मिळवला आहे. लोकशाही मार्गाने हुकुमशहा, सरंजामशाही लोकांनी संसदेवर ताबा मिळवला आहे.
सत्तर वर्ष झाले लोकशाही स्थापन करुन झाली तरीही ज्या धनगर समाजाची लोकसंख्या १२% आहे त्यांचा आजवर एकही खासदार होऊ दिला गेलेला नाही, मराठा समाज (जवळपास १५%) सत्तेत नेहमीच राहीला पन त्यांच्या नेत्यांना समाजासाठी काही करु दिलेले नाही, मराठा नेतेही स्वताचे घर भरन्याचेच काम करुन समाजाला वार्यावर सोडत गेले, आंबेडकरी विचारधारेच्या जनतेतुनही उमेदवार निवडणुन जाऊ नये यासाठी तर नेहमीच सर्व पक्ष एकत्र येताना आपन पाहीले आहे, जे हिंदु महार किंवा बौद्ध धम्मात जन्मले पन आंबेडकरी विचारधारेला विकु शकतात अशा विकाऊ लोकांना मात्र कॉंग्रेस भाजपाने मंत्री बनवले, महामंडळे दिली, त्यांना मीडीयाच्या मदतीने चर्चेत ठेवले, भटक्या विमुक्तांना शरद पवारांनी ४० वर्षांपर्यत फसवुन, गाजर दाखवुन फक्त वापरुन घेतले,
जे बाबासाहेब व फुलेंचे नाव घेतात पन या महामानवांचे विचार कवडीमोल भावाने निलाम करतात अशांना ब्राह्मणवादी लोकांनी बहुजनांचे नेते म्हणुन सतत चर्चेत ठेवले. त्याचेच पांचट वक्तव्ये ,कविता  मीडीयावर दाखवुन आंबेडकरी जनतेचा नेता किती नालायक व बावळट व मुर्ख असततात असा भास निर्माण केला गेला.
पण मागील चार वर्षात संविधान धोक्यात आल्यानंतर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ज्यांना विकत घ्यायची ताकत जगाच्या पाठीवर कुणाचीच नाही, त्यांनी देशपातळीवर नेतृत्व करायला सुरवात केली. सर्वच प्रश्नांना थेट आव्हान उभे केले व आजवरच्या भारतीय राजकारणाचा सखोल अभ्यास असल्याने त्यांनी सर्व वंचित समाजाला एकत्र करुन ब्राह्मणवादी वि. आंबेडकरवादी आसाच थेट लढा सुरु केला आहे.
सर्व विषमतावादी व धर्मांध लोक यावेळी बाळासाहेबांना विरोध करत आहेत असे दिसत आहे पन बहुसंख्य समतावादी लोक मात्र बाळासाहेबांना पुर्ण नेतृत्व बहाल करुन त्यांची ताकद वाढवत आहेत हे आपन पहात आहोत.
कॉंग्रेस पक्ष मृतावस्थेत आहे तरीही त्यांचा बहुजन राजकारणाकडे पहायचा तुच्छ दृष्टीकोन अजुनही बदलेला दिसत नाही, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जुलै पासुन कॉंग्रेसला युती करुन भाजपाला हरवण्यासाठी आपन एकत्र निवडणुका लढवु असे अवाहन केले असुनही कॉंग्रेस दुर्लक्ष करत गेले, कॉंग्रेसमधील मोगलाई नेतृत्वांना अजुनीह वंचितांबद्दल काहीही देणेघेणे वाटत नाही, अशावेळी भारतीय राजकारणात नेहमीच वंचित असलेला, नेहमीच वापरुन घेतला गेलेला मुस्लिम समाज स्वतःहुन या मनुवाद संपवण्याच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी पुढे आला. संविधान वाचवण्याच्या उदात्त हेतुने बैरिस्टर ओवेसी यांच्या एमआयएम या पक्षाने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांकडे लोकशाही वाचवण्यासाठी मदतीचा हात पुढे करुन ते स्वातंत्र्य,समता, बंधुता, न्याय या संविधानाच्या तत्वांना माऩतात व संविधान पर्यायाने भारतीय जनतेची सुरक्षितता टिकवण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष काम करेल, बाळासाहेबांचा शब्द अंतिम मानला जाईल असे ओवेसींनी पाच लाख लोकांसमोर जाहीर केले.
मुस्लिम जेव्हा बहुजनांच्या सोबत येतात तेव्हा बहुजन त्या कार्यात निश्चितपने यशस्वी होतात असा इतिहास असल्याने मनुवादी लोक मुळापासुन हादरुन गेले व त्यांना वंचित बहुजन आघाडी ला या युतीमुळे नुकसान होईल असा चुकीचा प्रचार सुरु केला. भाजपाला या युतीचा फायदा होईल असाही खोडसाळ प्रचार सुरु केला. वंचित बहुजन आघाडी ला जनतेने स्विकारले आहे व जनता आता वंचित बहुजन आघाडीला कॉंग्रेस व भाजपा पेक्षा मोठी ताकद बनवुन सोडणार आहे हे सत्य आहे व ती काळाची गरजही आहे.
ओवेसींबद्दल ते कट्टरपंथी आहेत असा आरोपही केला जातोय मी ओवेसींची वकिली करणार नाही पन सत्य काय आहे ते जरुर मांडेन ,ओवेसीवर आरोप करणारे लोक हे मुंबई दंगली, गोध्रा दंगली, सहरानपुर,उना, रमाबाईनगर हत्याकांड,.व इतर दंगलीचे नेतृत्व करणारांचे समर्थक आहेत. ज्या ओवेसीने फक्त धमकीवजा भाषन केले त्याला गुन्हेगार म्हणुन पाहताना तुम्ही ज्या पक्षांची गुलामी करता त्याचे नेते तर कत्तल करुण खुलेआम फिरत आहेत, लोकशाहीत मानाचे स्थानावर जात आहेत हे विसरता कामा नये. योगी आदित्यनाथ, वरुन गांधी, ठाकरे, आडवानी, विनय कटीयार व इतर कट्टरपंथीय लोक जसे भडकाऊ भाषन करुन त्यावर अंमलही करतात अशांनी फक्त एखाद्याच्या भाषनाचा बाऊ करुन समाजाची दिशाभुल करु नये ही विनंती.
भारतीय नागरिकाने धर्म जात पक्ष या गोष्टींना बाजुला करुन, स्वतःच्या घरातील ,वॉर्डातील, शहरातील सर्व प्रश्नांकडे एकदा पहावे, सत्तर वर्ष मदतान करुन प्रतिनिधी निवडुन देऊन किती विकास झाला याचे परिक्षण करावे. व यावेळी मतदान करताना तिच चुक परत करायची का यावर विचार करावा.
तुम्ही जोपर्यंत त्याच त्याच चुका करणार आहात तोपर्यंत तुम्हाला तोच तोच निकाल परत मिळत रहाणार आहे. परिवर्तन पाहीजे असेल तर पारंपारिक पक्षाला मतदान न करता नेता, नेत्याचे चारित्र्य, नेत्याचे ज्ञान, नेत्याची देशाबद्दलची बांधिलकी पाहुन मतदान करावे व देशाला वाचवावे.
- मनोज नागोराव काळे, ठाणे 8169291009

No comments:

Post a Comment

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...